रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - ५,

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
1 Dec 2021 - 4:23 pm

रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - ५,
रामेश्वरम आणि धनुष्कोडी
याचसाठी केला होता हा अट्टहास. पाम्बन पुलावरून ट्रेन समुद्रातून ५-१० मिनटांसाठी जाते ते याची देही याची डोळा अनुभवायचे होते म्हणून विलुप्पुरम ते रामेश्वरम असं ट्रेन चे आरक्षण केला होता. आणि गाडी सकाळी सकाळी तिथे पोचणार होती. मुलांना सात वाजताच उठवला म्हणजे तोवर ते फ्रेश होतील. आणि मग वाट पाहायला लागलो. वाटेत असंख्य मोरांचा वेगळ्या वेगळ्या रूपात दर्शन होत होतच. शेवटी एकदाचा पाम्बन ब्रिज आला आणि ट्रेन एकदम सावकाश चालू लागली असं वाटत होतं कि हा क्षण जाऊच नये थांबून राहावा. पण काळ हा असाच वाळू सारखा आपल्या हातातून निसटतो जेव्हा वाटत हळू हळू जावा तेव्हा भर्रकन जातो आणि जेव्हा वाटत भर्रकन जावा तेव्हा युगांसारखा भासतो.
पुढच्याच थांबा रामेश्वरम होता. तिथे उतरुन फक्त अंघोळ आणि कपडे बदलण्यासाठी एक खोली घेतली कारण रात्रीच मदुराई ला जायचा होतं. समुद्रस्नान मग २२ कुंडांमध्ये स्नान तिथे एजंट लोक मागे लागत होते १०० रुपये २२ कुंड स्नानासाठी आणि प्रत्येक जण सोबत एक बादली घेऊन फिरत होता ते कोड काही आम्हाला समाजल नाही. आम्ही २५ रुपयांचा तिकीट घेऊन साधारण रांगेतून गेलो. आत गेल्यावर कळाल कि ज्यांनी १०० रुपये दिले आहेत त्यांच्या अंगावर पूर्ण बादली पाणी ओतणार आणि त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी थोडा अजून पाणी देणार. माझा मुलगा प्रत्येक कुंडात ३-४ वेळा तरी पाणी अंगावर घेत होता. आणि लहान म्हणून ते पण त्याच्या अंगावर पाणी ओतत होते. स्नान करून परत रूम वर आलो आणि मग कपडे बदलून रामेश्वरम दर्शन. मंदीर खूप मस्त आहे एका रेषेत सरळ खांब आणि असे हजारो खांब आहेत. रेल्वे प्रवासावर निर्बंध असल्यामुळे गर्दी खूपच कमी होती मग आरामात दर्शन झाल. कार्यक्रम झाल्यानंतर एक रिक्षा ठरवली ९०० रुपये आणि रामेश्वरम आणि धनुष्कोडी फक्त रामेश्वरम साठी ४०० रुपये.
आम्हाला बराच उशीर झाला होता तरी पण रिक्षावाल्याने अजिबात घाई गडबड केली नाही आणि तरी पण सर्व स्थळ दर्शन व्यवस्थित करून आणलं. पण यात एक गडबड झाली माझ्याकडून आमच्या सौचा मोबाईल खराब झाला. गेल्या गेल्या दुरुस्त करून आणीन किंवा नवीन घेईन या बोलीवर पुढची ट्रिप कोणतीही भांडण न होता पार पडली.

पाम्बन ब्रिज

खरं तर त्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत पण काही उधार शब्द आणि मोबाईल ची मदत घेऊन एक विडिओ तयार केला आहे. सर्वाना आवडेल अशी अपेक्षा

माणसाळलेला मोर मुलांच्या हातून खाऊ खाताना

समुद्रावरून ट्रेन जाताना असं नजारा दिसतो

समुद्रावरून ट्रेन जाताना असं नजारा दिसतो

रामेश्वरम मंदिर गोपुर आणि मी

त्सुनामी मध्ये उध्वस्त झालेले चर्च

राजबिंडा मोर

धनुष्कोडी समुद्राची सुरुवात आणि भारताचा शेवटचा टोक इथे आम्हाला वेलकम टू श्री लंका आणि रोमिंग चार्जेस पण आले

विभीषण मंदिर

सर अब्दुल कलाम यांचं घर अन म्युझीयम

अतिशय सुरेख असं नटराजन मंदिर

प्रतिक्रिया

https://www.instagram.com/reel/CWJE8QWLgW7/?utm_medium=copy_link

विडिओ नीट प्ले होत नाहीए इंस्टाग्राम ची लिंक इथे तुम्ही तो विडिओ पाहू शकता

कॅलक्यूलेटर's picture

1 Dec 2021 - 4:42 pm | कॅलक्यूलेटर

https://www.instagram.com/reel/CWJE8QWLgW7/?utm_medium=copy_link

विडिओ नीट प्ले होत नाहीए इंस्टाग्राम ची लिंक इथे तुम्ही तो विडिओ पाहू शकता

मित्रहो's picture

14 Dec 2021 - 10:42 am | मित्रहो

हे फोटो बघून रामेश्वरम ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याला आता सोळा वर्षे झालीत. आम्ही कारने गेलो होतो. तो एक वेगळाच अनुभव होता. त्याकाळी धनुष्कोडीला मात्र जाता आले नाही.

Bhakti's picture

14 Dec 2021 - 10:58 am | Bhakti

छान!

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2021 - 1:23 pm | चौथा कोनाडा

वाह, मस्तच !
भारी लिहिलंय, तुमच्या बरोबरच प्रवास करतो आहे असं वाटलं !
retv345
प्रचि, नेहमी प्रमाणे सुंदरच !
आमचा हा योग कधी येतो काय माहित !

कॅलक्यूलेटर's picture

8 Jan 2022 - 1:02 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद

एक_वात्रट's picture

20 Dec 2021 - 3:18 pm | एक_वात्रट

प्रवासवर्णनाचे पाचही भाग वाचले, आवडले. बाकी चारही ठिकाणे प्रसिद्ध आहेत, पण रेणीगुंटांच्या मंदिरांबाबत आत्ताच तुमच्याकडून ऐकतो आहे.

पण काळ हा असाच वाळू सारखा आपल्या हातातून निसटतो जेव्हा वाटत हळू हळू जावा तेव्हा भर्रकन जातो आणि जेव्हा वाटत भर्रकन जावा तेव्हा युगांसारखा भासतो.

हे मात्र खरं.

मदुराई आणि रामेश्वरम पाहून झाले आहे, पाँडिचेरी आणि महाबलीपुरमची सहल कित्येक दिवस बनून तयार आहे, पाहू कधी योग येतो ते!

जेम्स वांड's picture

25 Dec 2021 - 9:47 am | जेम्स वांड

हा भाग, सुंदर चित्रण केले आहेत, त्याशिवाय इतर टुरिस्ट प्लेसेस अन मंदिरांसोबत आम्हाला डॉक्टर कलामांचे घर दाखवल्याबद्दल पण आपले असंख्य आभार सरजी.

गोरगावलेकर's picture

26 Dec 2021 - 10:43 am | गोरगावलेकर

खूप सुंदर झाली आहे सहल.

कॅलक्यूलेटर's picture

8 Jan 2022 - 1:03 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद

कॅलक्यूलेटर's picture

8 Jan 2022 - 1:05 pm | कॅलक्यूलेटर

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे धन्यवाद

विकास...'s picture

4 Feb 2022 - 12:29 am | विकास...

एकदम भारी वर्णन
पाम्बन पुलावरून जायचेय नक्की बघू कधी जमतेय ते..

कॅलक्यूलेटर's picture

4 Feb 2022 - 5:30 pm | कॅलक्यूलेटर

@विकास धन्यवाद