रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - ४

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
1 Dec 2021 - 12:24 pm

पाँडिचेरी

पावसाची संततधार काही थांबायचं नाव घेत नव्हती आणि त्यामुळे आमची चिंता वाढतच चाललेली होती त्यात गूगल मॅप वर तामिळनाडू मध्ये पूर आला आहे रस्ते सुरु आहेत कि नाही ते तपासून घ्या असा सांगत होते. मित्राने पण तशाच आशयाचा फोटो पाठवला. पण आता काही पर्याय नव्हता. पाँडिचेरी चा पण बुकिंग आधीच केलेला होता. मग सकाळी सकाळी बस ने महाबलीपूरम ते पाँडिचेरी बस स्टेशन आणि बस स्टेशन ते हॉटेल असा प्रवास झाला. संपूर्ण रोड हा कोस्टल रोड असल्यामुळे थोड्या थोड्या वेळानंतर खाडी आणि दुतर्फा झाडी असा मस्त प्रवास सुरु होता. दुपारी आल्या नंतर एकटाच निघालो दुचाकीच्या शोधात पाऊस असल्यामुळे रिक्षाहि बघत होतोच. मग एका दुकानदाराने एकाच नंबर दिला त्याने गाडी आणि पेट्रोल असे ४०० रुपये एका दुचाकीचे घेतले. मग सर्वात पहिल्यांदा ऑरोविले ला जायचा ठरला हॉटेल पासून जवळपास ९-१० कि. मी. असेल.
सगळी ठिकाण जवळपास च होती. पण बोटॅनिकल गार्डन आणि paradise island हे पावसामुळे बंद होतं. दोन दिवस जेवढा जमेल तेवढा फिरून घेतला. पण पाँडिचेरी हे फिरण्यापेक्षा पण निवांत राहण्याचा ठिकाण आहे जस कि गोवा तसच हे पण, खा प्या आणि सुशेगात पडून राहा.

दुचाकी घेताना आधी सगळ्या बाजूने तिचे फोटोस काढून घेतले म्हणजे परत देताना काही कटकट नको.

ऑरोविले मध्ये चालत जाताना पायवाटेवर एक विशाल वटवृक्ष दिसला त्याच्या पारंब्यांच्या मधून पण नवीन झाडे येत होती काहीशे वर्ष पूर्वीचा असेल असा अंदाज

ऑरोविले

फ्रेंच कॉलनी

चिफ सेक्रेटरियात

वॉर मेमोरियल

पुडुचेरी म्युझीयम
.

पुडुचेरी म्युझीयमच्या बाहेर ठेवलेल्या काही पुरातन कालीन मुर्त्या

चुर्च

बीच

लक्षवेधी बुद्ध मूर्ती

पॅराडाइज बीच वरचा बोटींग बंद असल्यामुळे जवळच दुसऱ्या वॉटर स्पोर्ट्स रिसॉर्ट वर गेलो तिथला परिसर मस्त होता. पण सगळे वॉटर स्पोर्ट्स आपल्या इथल्या पेक्षा तिप्पट ते चौपट महाग असल्यामुळे आल्या पावली परत फिरलो.

पॉंडिचेरी पासून साधारण ३० कि मी अंतरावर विलूपुरं जंकशन आहे तिथून आमची रामेश्वरम ची ट्रेन टिकेट्स होती.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2021 - 12:42 pm | चौथा कोनाडा

पॉण्डीचेरी मस्तच आहे ! ऑरोविले मधले ते विशाल वृक्ष आणि संपुर्ण परिसर म्हणजे वेगळाच अनुभव आहे, वृक्षाचा फोटो सुंदर आलाय !
म्युझियम देखिल मला खुप आवडलं !
मला पॅराडाईझ बीच बघाच असा आमच्या गाईडने आग्रह केल्याने एका दिवसाची रजा टाकून दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळीच या बीचला गेलेलो.
चिन्नाम्बर नदीच्या मुखाशी असलेलं, तीन्ही बाजुनी पाण्याने वेढलेले बेट, तिथली रेती हा भन्नाट अनुभव आहे ! मोटारलॉन्च मधून बेटावर पोहोचण्याचा प्रवास अ ति शय रम्य आहे ! ही भेट रजा वसूल ठरली !

पाँडिचेरी हे फिरण्यापेक्षा पण निवांत राहण्याचा ठिकाण आहे जस कि गोवा तसच हे पण, खा प्या आणि सुशेगात पडून राहा.

अगदी, यासाठीच तिथं पुन्हा जायचेय.

कॅलक्यूलेटर, मस्त भटकंती वर्णन आणि झकास फोटो !

कॅलक्यूलेटर's picture

1 Dec 2021 - 4:33 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद चौ.को. तुमचे कौतुकाचे शब्द लिहायला अजून उत्साह आणतात

जेम्स वांड's picture

25 Dec 2021 - 9:42 am | जेम्स वांड

सगळे फोटो दिसत आहेत आणि ते खूप अवर्णनीय सुंदर आलेत, तुमची ट्रिप फोटोजमधून बघतोय अन ते मस्त आहेत.

कॅलक्यूलेटर's picture

8 Jan 2022 - 1:07 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2022 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्णन आणि फोटो मस्त.

-दिलीप बिरुटे

मस्त सुंदर भटकंती आणि सुंदर फोटो.
त्या वडाचे अजून सर्व दिशानी फोटो हवे होते म्हणजे त्याचा भव्य आकार समजला असता.

निनाद's picture

10 Jan 2022 - 7:13 am | निनाद

छान ट्रिप. अजून वर्णन विस्तार करायला हवा असे वाटले.

कॅलक्यूलेटर's picture

12 Jan 2022 - 5:54 pm | कॅलक्यूलेटर

धन्यवाद बिरुटे सर, सुरसंगम आणि निनाद, @ निनाद @ सुरसंगम : हो अजून २-३ फोटोस असतील पण अजून मराठी टायपिंग आणि फोटो चढवणे यातच खूप वेळ जातो. म्हणून तर अजून २-३ प्रवास वर्णने टाकली नाहियेत. नाहीतर जानेवारी २१ मध्ये डलहौसी, धरम शाला, पंजाब ऑगस्ट मध्ये हंपी बदामी आणि एक सीक्रेट प्लेसेस म्हणून धबधबा आहे देवकुंड च्या जवळ तिथे जाणं झाला आहे. बघू कधी वेळ मिळतो ते.

कॅलक्यूलेटर's picture

12 Jan 2022 - 6:00 pm | कॅलक्यूलेटर

या फोटो वरून कदाचित अंदाज बांधता येईल