ध्यानधारणा ....ज्याची त्याची....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
26 Nov 2021 - 10:43 am

प्रेरणा ... विपश्यना आणि रॅन्डम मी ... https://www.misalpav.com/node/49591 ...

--------
मुळात, ध्यानधारणा ही आवश्यक आहे का?

माझ्या अनुभवा नुसार, ध्यानधारणा ही अत्यावश्यक आहे...

मला जाणवलेले काही मुद्दे म्हणजे, आपणच आपली उन्नती करत जातो. हळूहळू का होईना पण, निश्र्चितच आपण आपल्याला ओळखायला लागतो. मनाचा मनाशी मनापासून संवाद होणे, म्हणजेच ध्यानधारणा. (हे माझे वैयक्तिक मत आहे.)

-------

ध्यानधारणा करण्यासाठी गुरूची आवश्यकता असते का?

माझ्या अनुभवा नुसार, गुरूची आवश्यकता नाही, पण योग्य रस्ता दाखवणारे कुठलेही वाक्य, मग ते वाचलेले असो किंवा ऐकलेले असो किंवा चर्चा करतांना सहज मनात उमटलेले भाव असोत, हे देखील सकारात्मक परिणाम कारकच ठरतात.

काही उदाहरण देतो, वाल्या कोळ्याचे आत्मज्ञान ध्यानधारणा केल्याने वाढले आणि त्यांचे वाल्मिकी ॠषीत रूपांतर झाले. आपल्या पापात आणि पुण्यात, कुणीही सहभागी होणार नाही, हे त्यांना नारद ऋषींच्या मुळेच पटले

दुसरे उदाहरण म्हणजे, धृव... स्वतःसाठी अढळपद मिळवणे, इतकीच त्याची माफक अपेक्षा होती आणि ध्यान धारणा करून, त्याने ती साध्य केली.

दोन्ही वेळा, नारद हे निमित्यमात्र ....

तिसरे उदाहरण म्हणजे, गौतम बुद्ध, झाडाखाली बसून विचार मंथन करतांना, त्यांनाही समाजोपयोगी गुह्यज्ञान मिळाले.

-------

ध्यानधारणे साठी, गुरू मंत्राची आवश्यकता आहे का?

मला तरी लागली नाही, पण खूपच अस्थिर मन असेल तर, त्याला एका ठिकाणी आणण्यासाठी, एखाद्या वाक्याची गरज असते, तोच गुरूमंत्र समजलात तरी हरकत नसावी...

दारूचे व्यसन कमी करण्यासाठी, मी, आज दारू पिणार नाही,
हेच वाक्य मनांत म्हणत होतो.

आता, मी आज दारू पिणार नाही, हे वाक्य गुरूमंत्र नाही, पण हेच वाक्य सतत मनांत घोळवत असल्याने, सौदी, कुवैत आणि अबूधाबी इथे, दारू पासून दूर राहण्यासाठी, मदत झाली.

एक सामाजिक उदाहरण देतो, कुणी "गण गण गणात बोते" हा मंत्र म्हणतो, तर कुणी, "दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा मंत्र म्हणतो, तर कुणी, "श्री स्वामी समर्थ" हा मंत्र जपतो ... तुम्ही कुठलाही मंत्र म्हणा, त्याचे अंतिम फलित एकच असेल आणि ते म्हणजे, मन एका जागी केंद्रीत होईल.

मन केंद्रीत करण्यासाठी एखाद्या वाक्याचा सतत केलेले स्मरण, म्हणजेच गुरूमंत्र...

सध्या तरी आमचा एकच जप सुरू असतो, एखाद्या नाण्याला असंख्य बाजू असतात.

---------
ध्यानधारणा करण्यासाठी, एकांताची आवश्यकता असते का?

हो. ध्यान धारणा करण्यासाठी मला तरी एकांताची आवश्यकता भासते. सामुदायिकरित्या ध्यान धारणा, मला तरी करता येत नाही. धृव आणि वाल्या कोळी, यांनी देखील एकांतवासातच ध्यान धारणा केली.

मुळात, माणूस म्हणजे, दोन पायांचे अर्धवट आणि अति उपद्रव देणारे माकड. त्यामुळे माणसाचे मन एका जागी स्थिर होणे फारच अवघड गोष्ट आहे. जरा काही खूट्ट वाजले की मन अस्थिर होते, खमंग वास नाकात शिरला की जीभ खळवळते, त्यामुळे एकांतवास ही ध्यानधारणा करण्यासाठी मला तरी आवश्यक वाटते.

सामुदायिक प्रार्थना आणि मंत्रोच्चार, हे ध्वनी प्रदूषण करण्या शिवाय इतर कुठलेही काम करत नाहीत... अर्थात,हे माझे वैयक्तिक मत आहे.

घरचा गणपती सार्वजनिक करू नये
--------
ध्यानधारणा कशी करावी?

कुठल्याही गोष्टीला सुरूवात करायची असेल तर एक Starting Point लागतोच.

मी झोपण्यापुर्वी स्वतः साठी काही मिनिटे काढायचो आणि दिवसभरात मी काय चुकीच्या गोष्टी केल्या? ते आठवायचो.

साधारण पणे, 6-7 महिन्यांत, चुकांवरचे उपाय देखील मिळत गेले.
--------
थोडक्यात सांगायचे तर, प्रत्येकाची ध्यानधारणा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

27 Nov 2021 - 8:10 pm | कर्नलतपस्वी

फार मोठ्या विषयाला हात घातलाय.

ध्यानधारणा करण्यासाठी गुरूची आवश्यकता असते का?

कळत नाही कोण गुरूस्वरूपात भेटेल. एकलव्याचे मानस गुरू. एखादी परीस्थिती, एखाद्या वाक्यांत परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य असते.

रामबोला चा संत तुलसीदास होण्यासाठी त्याच्या बायकोने केलेला उपहास कारणीभूत झाला म्हणजे एक प्रकारे ती त्याची गुरूच नाही का.

" अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रीति !
नेकु जो होती राम से, तो काहे भव-भीत ? "

माऊलीनीं सांगितल्या प्रमाणे,

भावॆंवीण भक्ति भक्तिवीणे  मुक्ति । बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ ।। १।।
ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं । तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं ।। ४।।

भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह । गुरुवीण अनुभव कैसा कळॆ ।। २।।
समर्थानीं सांगितल्या प्रमाणे सदगुरू स्वताःच आपला शिष्य शोधून काढतो, शिष्याला गुरूचा शोध करण्याची जरूर नाही.

आभ्यास करणे आपल्या हाती, कसा करायचा हे ज्याने त्याने ठरवायचे

म्हणून हरीपाठ आमचा नित्यनेम.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2021 - 8:21 pm | मुक्त विहारि

मुख्यतः 3

आर्थिक, प्रापंचिक आणि हिंदू हितवादी... (हिंदू हितवादी, मग ह्यात चाणक्य ते सावरकर व्हाया छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज, हे पण आलेच... खरं तर हिंदू धर्माची विजिगिषू वृत्ती, छत्रपती शिवाजी महाराज, यांनीच जागी केली)

आर्थिक म्हणजे, पैसा कसा वाचवावा? हे शिकवणारे

प्रापंचिक म्हणजे, संसार कसा करावा? काळाची पावले ओळखून, संसाराची होडी कुठल्या बंदरावर न्यावी? हे सांगणारे

बाकी, इतर गोष्टींसाठी असंख्य गुरू आहेत .... माझे दारूचे व्यसन कमी करण्यासाठी, श्री. तुषार नातू यांची जबरदस्त मदत झाली... सुदैवाने, तुषार नातू यांचे मंदिर नाही ...

मुक्त विहारि's picture

27 Nov 2021 - 8:30 pm | मुक्त विहारि

एकदम बरोबर ....

आपले दोष कमी करणारा, कुठलाही गुरू चालेल...

काम, क्रोध, इत्यादि दोषांचे निवारण करणारा मित्र किंवा त्रयस्थ हा पण गुरूच

दैवाने, तुषार नातू यांचे मंदिर नाही ...
हे वाक्य मला अत्यंत भावले .. कारण कोणत्याही विषयात न्यान आणि मार्गदर्शन देणारा "शिक्षक" जरूर असावा ... पण "गुरु " या शब्दपासून जरा दूरच राहतो आपण.. कारण "गुरु" म्हणलं कि आधी त्यावर श्रद्धा पाहिजे वैगरे अंधत्व आले... म्हणजे हा जो गुरु / ताई महाराज वैगरे हि व्यक्ती अप्लायसारखीच षडरीपूं ना सामोरी जाणारी असते , अपलायसारखीच जगणार आणि मरणार, जीव सृष्टीचे आणि समाजाचे नियम त्या व्यक्तीला तेवढेच लागू होतात जेवढे आपल्याला हे विसरावे अशी भक्त गणांची अपॆक्षा असते.... देवत्व दिले जाते !
तयामुळे देव जरी आहे हे मान्य केले तरी त्याचे हे असले "अध्यात्माचे दलाल " नामंजूर .. गुरु बिझिनेस बिझिनेस मुर्दाबाद

८वित शास्त्र शिकवणारे मास्तर हे जीवनात शिक्षक म्हणून वंद्य होते पण ते फक्त शिक्षक, उद्या त्यांनी जरा गुन्हा केला तर त्यांना समजलं सामोरे .. तिथे दया माया नाही .. तसेच या सर्व "बापूंबद्दल असले पाहिजे "
गणित असो अथवा अध्यात्म ते शिकवणारी व्यक्ती फक्त एक "शिक्षक " म्हणून आदरास पात्र ठरते .. पण "गुरु" या नावाखाली दडलेले देवत्व अजिबात नाही ... ! त्रिवार नाही

बोलघेवडा's picture

29 Nov 2021 - 11:31 am | बोलघेवडा

मुवि सर, आपल्या मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे.
ध्यानाला धार्मिक गोष्टींशी जोडल्यामुळे फायद्या पेक्षा नुकसानच अधिक झाले आहे. त्यामुले जिम करताना जो आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन असतो तो ध्यान करताना नसतो.

खरतर ध्यान ही अतिशय सोपी आणि नैसर्गिक क्रिया आहे. पण अनेक गोष्टींचे अवडंबर करून ठेवल्याने ती काहीतरी चमत्कारिक, अवघड गोष्ट आहे असं बऱ्याच लोकांना वाटत.

विशेषतः तरुण वर्ग, ध्यान म्हणजे म्हातारं झाल्यावर करायचा प्रकार समजून दुर्लक्ष करतात.

Nitin Palkar's picture

2 Dec 2021 - 8:16 pm | Nitin Palkar

खूपच छान प्रतिसाद.

सौंदाळा's picture

29 Nov 2021 - 12:12 pm | सौंदाळा

खूपच छान लेख आणि प्रतिसाद, वाचतोय.
प्रत्येकाची ध्यानधारणा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
तुमची आणि इतरांची देखिल पद्धत वाचायला आवडेल.
साधारणपणे खालील मुद्दे:
कधी करता आणि किती वेळ (रोज /आठड्यातुन एकदा /दोनदा, वेळ : ३० मिनिटे /१ तास, दिवसाच्या कोणत्या वेळी : पहाटे/ सकाळ / दुपार /संध्याकाळ /रात्री)
पध्दत : बसुन / देवासमोर बसुन / डोळे बंद करुन / पद्मासनात बसून : देव, गुरु यांचे नामस्मरण करता का अजून काही (प्राणायाम / दिवसाची उजळणी वर लिहिल्याप्रमाणे वगैरे)
आलेले अनुभव
धन्यवाद

मुक्त विहारि's picture

29 Nov 2021 - 1:13 pm | मुक्त विहारि

गणपती स्तोत्र, मनांत चालूच असते...

अंघोळ करायची आणि स्तोत्र म्हणत रहायचे...

मुळांत किती वेळा म्हटले? हयाची गणना करायची नाही ... नामस्मरण हे भगवंताला दिलेले अर्ध्य आहे ... अर्ध्य देतांना कुणीही किती थेंब पाणी दिले? हे मोजू शकत नाही, तसेच मी समजतो ...

अशी गणना, ना धृवाने केली ना वाल्या कोळ्याने ....

नामस्मरण करतांना, वेळ, स्थान, ह्या बंधनांत मी अडकू शकत नाही ..

नामस्मरणाचा एक फायदा झाला की मन थोडे स्थिर व्हायला लागले ...

मनाला वळण लावायचे असेल तर, मनाला मोकळे सोडा.... भरकटण्याला कंटाळून, मन हळूहळू स्थिर व्हायला लागले...

चौथा कोनाडा's picture

29 Nov 2021 - 12:40 pm | चौथा कोनाडा

मुविसाहेब, ध्यानधारणेसारखा विषय अतिशय सोप्या शब्दात मांडलात हे भावले.
दिलेले काही अनुभव देखिल आवडले.
आर्थिक, प्रापंचिक आणि हिंदू हितवादी असे तीन गुरू देखिल छानच !

प्रत्येकाची ध्यानधारणा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

यात सर्व आलेच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Nov 2021 - 3:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझे दोन पैसे
१.अध्यात्मात गुरुची आवश्यकता असते का? माझ्या मते कुठल्याही गोष्टीत अखंड प्रयत्नाने हळूहळू प्रगती होत जाते. पण आपले मर्यादित आयुष्य लक्षात घेता एकेका गोष्टीसाठी किती वेळ खर्च करणार? विद्या,कला अशा सर्व क्षेत्रात आपण कोणाची ना कोणाची मदत्/मार्गदर्शन घेतोच. तसेच याबाबतही आहे. यादृष्टीने मला गुरुची आवश्यकता वाटते.

२. मंत्राची आवश्यकता आहे का? मन स्थिर करण्यासाठी उपयोग होत असेल तर मंत्र जपावा. नसल्यास डोळे मिटुन स्वस्थ बसावे आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करावे.

३. एकट्याने की समूहाने? प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. पण खरा अभ्यास एकट्यानेच होत असावा.

४. वयाचे/वेळेचे बंधन- व्यायाम ,अभ्यास्,अध्यात्म या सर्वांनी सर्व वयात करायच्या गोष्टी आहेत असे मला वाटते. वयानुसार /वेळेनुसार प्रमाण कमी जास्त होऊ शकते. पण "केल्याने होत आहे रे" किवा "स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही" म्हणुन झेपेल तेव्ह्ढे केले पाहिजे. नाहीतर आमचे तबल्याचे गुरुजी म्हणतात तसे "झाकीर हुसेन ला १ कोटी रुपये दिले म्हणुन काय त्याच्यासारखा तबला वाजविता येइल का? आपणच घासायला हवी"

असो. विषय खोल असल्याने येथेच थांबतो.

मुक्त विहारि's picture

29 Nov 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि

1. आपल्याला जे क्षेत्र मनापासून आवडते, त्या क्षेत्रातील गुरू हवाच, पण त्या एका गुणामुळे, त्या व्यक्तीची पूजा करायला जाणे, मला तरी अयोग्य वाटते, प्रत्येकाचे पाय मातीचेच असतात.

2. सहमत आहे

3. समुहाला नेता असतो आणि मग नेता म्हणेल तसे वागायला लागते. त्यामुळे, ध्यान धारणा, एकांतवासातच आणि मनातल्या मनांत करून.

4. "झाकीर हुसेन ला १ कोटी रुपये दिले म्हणुन काय त्याच्यासारखा तबला वाजविता येइल का? आपणच घासायला हवी".... सहमत आहे.

Nitin Palkar's picture

2 Dec 2021 - 8:18 pm | Nitin Palkar

आणखी एक छान प्रतिसाद..

कानडाऊ योगेशु's picture

29 Nov 2021 - 7:24 pm | कानडाऊ योगेशु

१.अध्यात्मात गुरुची आवश्यकता असते का?
माझ्या मते हो आणि हवीच. अध्यात्म म्हणजे पोहोणे शिकण्यासारखे आहे. स्वतःहुन पोहायला शिकलेला कुणीही माझ्या माहितीत नाही.

मुक्त विहारि's picture

29 Nov 2021 - 7:27 pm | मुक्त विहारि

यांना कधी गरज भासली नाही

मग आपल्याला पण नको

मार्ग मिळाला की आपणच चालायचे...

माझ्या मते, अध्यात्म म्हणजे, स्वतःच स्वतःला ओळखणे...

गौतम बुद्धाला देखील गुरू न्हवता...

कानडाऊ योगेशु's picture

29 Nov 2021 - 8:21 pm | कानडाऊ योगेशु

माझ्या अल्पआकलनानुसार अध्यात्मिक गुरु म्हणजे ज्याच्याप्रती समर्पणाची भावना निर्माण होते अशी व्यक्ती अथवा ज्याची अशी कुवत असु शकते अशी अधिकारी व्यक्ती.
ध्रुव बाल्यावस्थेत होता व वाल्याकोळी अशिक्षित्/असंस्कृत होता त्यामुळे नारदमुनींना त्यांना भानावर आणण्यासाठी फार मोठ्या युक्त्या कराव्या लागल्या नाही पण स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांना पारखण्यासाठी व रामकृष्ण परमहंसांना स्वामींना वास्तवाचे भान देण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले.
हेच कारण असावे कि लहान मुले पोहायला/सायकल चालवायला लवकर शिकतात पण तिच गोष्ट करण्यासाठी मोठ्यांना फार प्रयत्न करावे लागतात.

गुरु म्हणजे ज्याच्याप्रती समर्पणाची भावना निर्माण होते अशी व्यक्ती अथवा ज्याची अशी कुवत असु शकते अशी अधिकारी व्यक्ती.
अध्यात्म , धर्म, वैगरे शिकायला मार्गदर्शक जरूर असावा , त्यात गैर नाही पण "सगळ्यांचे पाय मातीचे असतात" हे विसरून जाऊन आशय व्यक्तीपुढे "समर्पणाची भावना" आणि त्यातून येणारी व्यक्तिउजा, अंधश्रद्धा वैगरे कशाला? कारण तसे झाले कि मग ती हाडामासाची व्यक्ती जणू अजरामर देवत्व असलेली वैगरे होते ... एवढेच माझे म्हणे आहे
गणित अर्थशास्त्र तसच अध्यात्म ..
सिव्हिल कोड, क्रिमीनल कोड जसा गणिताचं मास्तर ल लागू होतो तो कोणत्याही गुरु बाबाबा बाबी ला लागू झलकेह पाहिजे
गणतीचंय मास्तराने शिकवलेले जर पातळ नाही तर मास्तर तुम्ही चुकीचे शिकवताय असे सरळ मेहता येते तेच एखाद्या गुरु बद्दल बोला ,, भक्त एकतर मारायला तरी येतील किंवा तुम्हाला येड्यात काढतील .. पळपुटे उत्तर " श्रद्धा नाही ना मग अनुभूती कशी येणार वैगरे "

मुक्त विहारि's picture

30 Nov 2021 - 10:35 am | मुक्त विहारि

मार्ग दाखवला की गुरूचे काम संपले ....

एखाद्या गुरु बद्दल बोला ,, भक्त एकतर मारायला तरी येतील किंवा तुम्हाला येड्यात काढतील .. पळपुटे उत्तर " श्रद्धा नाही ना मग अनुभूती कशी येणार वैगरे "........ सहमत आहे ....

मूकवाचक's picture

30 Nov 2021 - 12:54 pm | मूकवाचक

सहमत. ध्यानधारणेमागचा हेतू मात्र लक्षात घ्यायला हवा. तणावमुक्ती, विश्रांत अवस्था, चित्ताची एकाग्रता इ. साध्य करण्यासाठी ध्यान करायला गुरू आणि गुरूकृपा यांची गरज नसते. या गोष्टी 'ट्रायल एरर' पद्धतीने प्रयत्न करूनही साध्य करता येतात.

मन हळूहळू एकाग्र होत जाते

संगणका बरोबर, चेस खेळतांना देखील, हा अनुभव आला

कर्नलतपस्वी's picture

29 Nov 2021 - 7:55 pm | कर्नलतपस्वी

एक ओजंळ माझी.....
थोडे विस्तृत लिहीण्याचा प्रयत्न, बघा पटतंय का?

कुमार१'s picture

29 Nov 2021 - 8:10 pm | कुमार१

छान लेख.

मार्गी's picture

1 Dec 2021 - 2:45 pm | मार्गी

नमस्कार सर, माफ करा, पण ध्यान व धारणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सो त्या एकत्र लिहीणं चूक आहे. धारणा म्हणजे एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर मन लावून धरायचं. मनामध्ये एखादी गोष्ट धारण करायची. ध्यान म्हणजे जे काही सुरू असेल ते बघत राहायचं. मनाच्या स्क्रीनवर, शरीराच्या पडद्यावर जो चित्रपट त्या क्षणी सुरू असेल तो फक्त बघत राहणं म्हणजे ध्यान.

सोत्रि's picture

1 Dec 2021 - 3:40 pm | सोत्रि

हेच म्हणतो.

- (साधक) सोकाजी

मुक्त विहारि's picture

1 Dec 2021 - 5:42 pm | मुक्त विहारि

ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

मुक्त विहारि's picture

1 Dec 2021 - 5:44 pm | मुक्त विहारि

ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

स्वधर्म's picture

2 Dec 2021 - 12:19 pm | स्वधर्म

मुवि, महत्वाच्या विषयावरचा लेख. धन्यवाद.
या निमित्ताने मनात आलेला एक प्रश्न विचारून घेतो. : मी काही ध्यानाचे प्रकार शिकलो आहे आणि काही काळ नियमित ध्यानही केले आहे. त्याचे फायदे जाणवूनसुध्दा ते रोज केले जात नाही. त्याऐवजी काही पुस्तके वाचावी, मनोरंजन करून घ्यावे, किंवा इतर काही तरी करावे असे वाटते आणि ध्यान नियमितपणे केले जात नाही. हे असे का होत असावे?

विषय बराच मोठा आहे हा. पातंजल योगसूत्रांत कोणत्याही ध्यानात येणार्‍या अडथळ्यांचे ४ प्रकार सांगीतले आहेत -
१. लय - ध्यान करतांना हटकून येणारी झोप किंवा आळस, सुस्तपणा हे लय प्रकारात मोडतात. हे तमाचाराचं लक्षण आहे.
२. विक्षेप - ध्यान करतांना भलतेच सगळे विचार येणे आणि त्यात वाहवत जाणे हे विक्षेप प्रकारात मोडतं, हे बहिर्मुख वृत्तीचं लक्षण आहे.
३. कषाय - राग, द्वेष, मोह वगैरे षड्रिपूंच्या माध्यमातून भूत-भविष्य च्या चिंतनात गुंगून जाणे कषाय प्रकारात मोडतं. हे देखील बहिर्मुख वृत्तीचं लक्षण आहे.
४. रसास्वाद - हे अंतर्मुख वृत्तीचं लक्षण आहे. ध्यानात आनंद यायला लागतो आणि साधक त्यातच गुंगून पडतो. त्यापलिकडे जाणार्‍या मार्गासाठी हा अडथळा असल्याचं सांगीतलं आहे.

काही हरकत नाही

मनाला एका साच्यात बांधून ठेवू नये

आपल्याला कृष्ण पण हवा आणि राम पण हवा

घरचे सुग्रास जेवण मिळाले तर चटकमटक खायला, माणूस बाहेर जातोच

प्रमाणा मध्ये सर्व काही असावे

Nitin Palkar's picture

2 Dec 2021 - 8:38 pm | Nitin Palkar

खूप चांगला, महत्वाचा विषय. अतिशय सोप्या शब्दात दिलेली माहिती.
माझेही दोन पैसे.
काही वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकी माहितीनुसार स्वतःच ध्यान धारणेचा प्रयत्न केला. सुरुवातीस तीन ते पाच मिनिटे एका जागी सुखासनात (मांडी घालून पाठीशी उशी घेऊन) बसत असे. योगासनांच्या वर्गात शिकवल्याप्रमाणे थोडेसे संथ आणि दीर्घ श्वसन करत असे. मन निर्विचार वगैरे करण्याचा प्रयत्नही केला नाही. मनातल्या मनात एखादा श्लोक मात्र म्हणत असे. हळू हळू हा कालावधी वाढवू लागलो. नंतर मनात केवळ चांगले विचार आणणे प्रयत्नपूर्वक जमू लागले. काही कालावधीनंतर स्वतःलाच फायदे जाणवू लागले.

वेळ लागतो

पण, मन हळूहळू स्थिर व्हायला लागते

जेम्स वांड's picture

8 Dec 2021 - 1:20 pm | जेम्स वांड

आणि ध्यानस्थ बसण्याचा अनुभव अलग आहे, पण तो इथं मांडावे तर लोक माझी सालटी सोलतील त्यामुळे पास.

सोत्रि's picture

8 Dec 2021 - 1:45 pm | सोत्रि

असुदे की अलग अनुभव. सांगा तुमचा अनुभव बिंधास्त…

धाग्याचा विषयच आहे - ध्यानधारणा ....ज्याची त्याची

- (ध्यानाचा प्रयत्न करणारा) सोकाजी

मुक्त विहारि's picture

8 Dec 2021 - 4:21 pm | मुक्त विहारि

माणसाला, एका चौकटीत बंदिस्त करता येत नाही ....