Index Investing भाग २

अतरंगी's picture
अतरंगी in जनातलं, मनातलं
18 Apr 2021 - 3:39 pm

भाग १:- http://misalpav.com/node/48675

आपण जेव्हा आपल्या स्वकमाईचे पैसे जास्त परताव्याच्या अपेक्षेने गुंतवत असतो तेव्हा सर्वात आधी त्यातले फायदे आणि तोटे समजून घ्यायला हवेत. आपण ज्यात पैसे गुंतवत आहोत त्यात काय, किती आणि कोणत्या प्रकारची रिस्क आहे हे समजून घ्यायला हवे. या भागात आपण Index Investing चे आणि वेगवेगळ्या ईंडेक्सचे फायदे/ तोटे पाहू.

१. Broad Based Indices:-
ह्यात प्रामुख्याने Nifty 50, Sensex, Nifty next 50 सारख्या ईंडेक्स येतात. याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यातील कंपन्या फक्त मार्केट कॅप वर ईंडेक्स मधे असतात. ज्याचे मार्केट कॅप अधिक त्यांचे वेटेज पण जास्त. यामुळे मुख्यतः दोन तोटे होतात.
१.१ या ईंडेक्स मधे फार खोगिरभरती होते. टेक्निकली/ फंडामेंटली चांगले नसलेले स्टॉक पण यात असतात
१.२. जसे जसे एखाद्या कंपनीचे मार्केट कॅप वाढत जाते तसे तसे त्याचे वेटेज पण वाढत जाते. मग जास्त वेटेज असलेल्या मोजक्या कंपन्यावर निर्देशांकाची दिशा ठरायला लागते. एखादी कंपनी चांगली असली, ईंडेक्स पेक्षा जास्त परतावा देत असली तरी त्याचे वेटेज कमी असल्याने ईंडेक्सच्या परताव्यावर काही फरक पडत नाही.
१.३. सर्व Broad Based Indices चा परतावा हा मध्यम स्वरुपाचा आहे.

२. Sectoral Indices:- ह्यात एका ठराविक क्षेत्रातील कंपन्या एकत्र करुन मार्केट कॅप प्रमाणे त्यांना वेटेज देऊन त्याची ईंडेक्स तयार केली जाते. e.g Bank Nifty, Nifty IT, Nifty FMCG etc
२.१ या ईडेक्समधले सुद्धा स्टॉकचे वेटेज मार्केट कॅप वर ठरते. ज्याचे मार्केट कॅप अधिक त्यांचे वेटेज पण जास्त. यामुळे परत वर लिहिल्यासारखाच तोटा होतो. मोजक्या कंपन्या निर्देशांकाची दिशा ठरवतात.
२.२ कोणत्याही विशिष्ठ क्षेत्रात गुंतवणूक करताना त्या त्या सेक्टरची एक cycle असते ती लक्षात घ्यावी लागते. आपण जर चुकीच्या वेळेस पैसे गुंतवले तर चांगलाच फटका बसू शकतो किंवा परतावा मिळायला बराच मोठा कालावधी लागू शकतो.
२.३ या मधील अनेक निर्देशांक चांगला परतावा देत आहेत. IT, FMCG, Banking सेक्टर मधील निर्देशांकांनी सातत्याने बर्‍यापैकी चांगला परतावा दिलेला आहे.
जर सेक्टोरल cycle व्यवस्थित ओळखता आली तर यातून चांगला परतावा मिळू शकतो.

३. Thematic Indices:- एकाच संकल्पनेवर आधारीत निर्देशांक. e.g. Nifty Shariah 25, Nifty India Consumption Index etc
३.१ या ईडेक्समधले सुद्धा स्टॉकचे वेटेज मार्केट कॅप वर ठरते. ज्याचे मार्केट कॅप अधिक त्यांचे वेटेज पण जास्त. यामुळे परत वर लिहिल्यासारखाच तोटा होतो. मोजक्या कंपन्या निर्देशांकाची दिशा ठरवतात.
३.२ या मधील निर्देशांक वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारीत असल्याने त्यांचा परतावा मध्यम ते कमी स्वरुपाचा आहे.

४. Strategy Indices:-माझ्या मते हा सर्वात महत्वाचा विभाग. यात वेगवेगळे फंडामेंटल, टेक्निकल फॅक्टर यांची Objective रित्या नियमबद्ध मांडणी करुन त्यात ज्या कंपन्या शॉर्टलिस्ट होतील, त्यांच्या आधारे ईंडेक्स व त्यातील कंपन्या ठरतात.
४.१ यामधे कंपन्या शॉर्टलिस्ट करताना काही ठराविक क्रायटेरिया ठरवलेले असतात. त्यात बसणार्‍या कंपन्या आणि त्यांचे मार्केट कॅप यावर त्यांचे वेटेज ठरते. पण बर्‍यापैकी सर्व ईंडेक्स मधे स्टॉकच्या वेटेजची कमाल मर्यादा ५% वगैरे ठरवलेली आहे. त्यामुळे कोणत्याही एक स्टॉकमुळे निर्देशांक फार हेलकावे खात नाही.
४.२ या निर्देशाकांमधे तुम्ही कोणता फॅक्टर निवडून गुंतवणूक करु ईच्छिता की फक्त परतावा बघून हे आधी ठरवावे लागेल. मागील भागात लिहिल्याप्रमाणे Momentum, Jensen’s alpha, Volatility, Beta वगैरे सारखे टेक्निकल फॅक्टर, Quality, Value सारखे फंडामेंटल फॅक्टरवर आधारीत किंवा टेक्निकल + फंडामेंटल वर आधारीत निर्देशांक तुम्ही निवडू शकता.
४.३ जास्तीत जास्त आणि सातत्याने परतावा देनार्‍या अनेक ईंडेक्स या विभागात आहेत. यातील अनेक ईंडेक्स ह्या बॅक डेटावर आधारीत आहेत.

खालिल दुव्यावर तुम्हाला प्रत्येक ईंडेक्सची पद्धत वाचायला मिळेल.
https://www.niftyindices.com/Methodology/Method_NIFTY_Equity_Indices.pdf

हा मागील अनेक वर्षात चांगला परतावा दिलेल्या ईंडेक्सचा डेटा.

Index CAGR

खालील दुव्यावर तुम्हाला NSE Indices वर लिहिलेले रिसर्च पेपर वाचायला मिळतील.

https://www.niftyindices.com/reports/research-paper

यातील Nifty Alpha Low Volatility 30 आणि Nifty 200 momentum 30 या दोन ईंडेक्स मी फॉलो करतो. जमल्यास ह्या दोन्ही ईंडेक्स, त्याचे फायदे, तोटे, मर्यादा हे समजून घ्या. आंतरजालावर या दोन्ही ईंडेक्स विषयी बरेच ईतर लेखसुध्धा आहेत. जमल्यास ते पण वाचा.
Nifty Alpha Low Volatility 30 वर ICICALPLV हा ETF आणि Nifty 200 momentum 30 वर UTI चा ईंडेक्स फंड उपलब्ध आहे. Nifty Alpha 50 चे रिटर्न सुद्धा चांगले आहेत. पण त्यावर अजून तरी कोणताही फंड उपलब्ध नाही.

वर दिलेल्या लिंक मधील ईंडेक्स मेथडॉलॉजी आणि रिसर्च पेपर जरुर वाचा. वाचताना अनेक ठिकाणी बोअर होईल, कंटाळा येईल पण दिर्घकालीन गुंतवणूक आणि वेल्थ क्रिएशन हे दोन्ही अतिशय बोअरींग पण Highly rewarding विषय आहेत हे लक्षात ठेवा. स्वतः अभ्यास केल्याशिवाय आणि एखाद्या स्टॉक, फंड, संकल्पनेविषयी तुम्हाला जो पर्यंत विश्वास वाटत नाही तो पर्यंत गुंतवणूक करु नका.

आता लक्षात रहावे म्हणून Index Investing चे फायदे सगळ्यात शेवटी लिहित आहे.

१. इंडेक्स मध्ये कोणता स्टॉक येणार, त्याचा क्रायटेरिआ काय, त्याचे वेटेज कसे ठरणार, कोणता स्टॉक जाणार, कधी जाणार, त्याचा क्रायटेरिआ काय हे सगळे निफ्टी च्या वेबसाईट वर स्वच्छ लिहिलेले आहे. उगीच कोणाच्या तरी विचारक्षमतेवर अवलंबून स्टॉक ची खरेदी विक्री होत नाही. स्टॉकची एंट्री, एक्झिट, वेटेज याची पद्धत objective, well defined आहे. यामुळे यात कोणतीही सापेक्षता येत नाही. सगळे नियमबद्ध असल्याने परतावा चांगला व सातत्याने मिळू शकतो.

२. कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले इंडेक्स फंड मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार हे माहित असल्यास त्यातील कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. फंड हाऊस, फंड मॅनेजर कोणतेही असले तरी फरक पडत नाही कारण शेवटी त्यांना इंडेक्स मध्ये जे स्टॉक ज्या प्रमाणात आहेत तेच त्या प्रमाणातच घ्यावे लागणार.

३. Strategy Indices मधील Alpha, Low Volatility आणि momentum हे घटक मला महत्वाचे वाटतात. जर आपण थोडा अभ्यास केल्यास लक्षात येईल की मेजॉरिटी चांगले, उत्तम परतावा दिलेले स्टॉक्स हे Low Volatile असतात. नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिआ, एशिअन पेंट्स सारखे उत्तम परतावा दिलेले स्टॉक्स पहा त्यांचे Daily Returns चे standard deviation अतिशय कमी आहे. पण फक्त Low Volatility स्टॉक्स हे लाँग टर्म मधे फार जास्त रिटर्न देऊ शकणार नाहीत. कारण फक्त तोच एक क्रायटेरिया धरला तर कोल ईंडीया वगैरे सारखे स्टॉक्स पण त्यात येतात. Low Volatility सोबत Alpha किंवा momentum याचे कॉम्बिनेशन हे कमी standard deviation मधे चांगला परतावा देऊ शकेल.
(जर कोणास Alpha, Low Volatility आणि momentum हे घटक माहीत नसतील, समजत नसतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर ती देता येईल.)

४. वर लिहिल्या प्रमाणे Strategy Indices यातील जवळ जवळ सर्व ईंडेक्स मधे एका स्टॉकचे वेटेज जास्तीत जास्त किती असावे यावर बंधने आहेत. त्यामुळे कोणत्याही एक स्टॉकमुळे निर्देशांक फार हेलकावे खात नाही.

५. Alpha, Low Volatility आणि momentum ह्या घटकांमूळे आपली गुंतवणूक कायम चांगल्या आणि मार्केटपेक्षा जास्त रिटर्न देणार्‍या स्टॉक्स मधे होत राहते.

६. ह्या ईंडेक्स ज्या प्रकारे तयार केल्या आहेत त्यामुळे आपोआपच ईक्विटी पोर्टफोलिओ मधे Diversification येते. शिवाय जे सेक्टर चांगले रिटर्न देत आहेत त्यात गुंतवणूक होत जाते.
७. ईंडेक्स फंड सोडून बाकी जे फंड आहेत त्यात फंड मॅनेजरच्या परफॉर्मन्स सारख्या रिस्क पण लक्षात घ्यायला हव्यात. ईंडेक्स फंड मधे तुम्हाला फक्त मार्केट रिस्क आहे.

Index Investing हे साधे सरळ आणि सोप्पे आहे. बाजारातील अनेक Investment Products पेक्षा कमी जोखमीचे आहे. शिवाय आधी सारखे आता फक्त निफ्टी, निफ्टी नेक्स्ट ५०, बँक निफ्टी ईतकेच पर्याय न राहता अनेक वेगवेगळे ईंडेक्स फंड येत आहेत. म्युच्युअल फंड मधे गुंतवणूक करताना आधी ह्या पर्यायावर नक्की विचार कएउन पहा.

Disclaimer:-

१. ईतरत्र पूर्वप्रकाशीत.

२. वर ऊल्लेख केलेल्या ईंडेक्स/Instruments मधे लेखकाची व त्याच्या नातेवाईकांची गुंतवणूक आहे.

३. लेखक सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. लेखकाकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

गुंतवणूकलेख