श्रीमंतीचे नियम??

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
20 Mar 2021 - 8:56 am
गाभा: 

भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.

चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे.

आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही.

धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_

विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल.

१) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे?

२) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या?

३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?

४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का?

१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे
१२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता
१३. न्यायिक सेवा (वकील वगैरे)
१४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१६. चेतनकला
१७. स्टँडअप कॉमेडी

प्रतिक्रिया

गणेशा's picture

20 Mar 2021 - 9:23 am | गणेशा

मी आता future रिटायरमेंट चा विचार करुन आणी सध्य स्तिथीतील नोकरी लवकरच म्हणजे अजून ७-८ वर्षात सोडत आहे.
त्यामुळे आत्ताच साईड बाय साईड व्यवसायात उतरलो आहे.
म्हणजे नंतर जम बसलेला असु शकतो.

तरी पैसे कमवणे हा उद्देश असला तरी
Ethically व्यवसाय करणे कधी हि ईस्ट ठरते. त्याने भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होतोच होतो. आणि भविष्यात तुमच्याकडे client एक योग्य व्यक्ती किंवा कंपनी म्हणुन जास्त पैसे देऊनही sarvise घेऊ शकतो..

बाकी श्रीमंत - गरीब असले कुठलेही parameter व्यवसायाला नसले पाहिजेत असे वाटते..

उपयोजक's picture

20 Mar 2021 - 2:29 pm | उपयोजक

अभिनंदन!
पूर्वी बनवलेली एक यादी आपल्यासहित इतरांनाही उपयोगी पडावी.

भरपूर पैसे देणारी+अल्प कालांतराने उत्पादनाची पुनर्निमिती करावी लागणारी उत्पादने आणि भरपूर पैसे देणारे+अल्प कालांतराने पुन्हा सेवा द्यावी लागणारे सेवा उद्योग यांची यादी.

यासाठी स्टॅटेस्टीकल डेटा गोळा केलेला नाही.साधारण अंदाज बांधून ही यादी बनवली आहे.त्यामुळे यात उणीवा असण्याची शक्यता असू शकते.मिपावरच्या तज्ञांनी यादी वाढवण्यास/संपादन करण्यास कृपया मदत करावी.

१. शेती

२. गाय/म्हैस/शेळी/मेंढी/खाण्यायोग्य पक्षीपालन

३. स्थानिक अन्नपदार्थ निर्मिती केंद्रे
(हॉटेल,फास्टफूड,रेस्टॉरंट,खानावळ,बेकरी पदार्थ इ.)

४. अन्नपदार्थ विक्री.
(दुग्धजन्य पदार्थ,स्नॅक्स प्रकारातले पदार्थ,लोणची,पापड,चटण्या,आईस्क्रिम इ.)

५. प्राशनयोग्य द्रव पदार्थ
(दूध,दारु,कोल्ड्रिंक्स,दुग्धसमाविष्ट द्रव पदार्थ उदा.चहा,कॉफी इ.)

६. मिनरल वॉटर

७. सौंदर्यप्रसाधने

८. कागद आणि प्लॅस्टीकवरील छपाई

९.राज्य/देश/आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिव्ही चॅनलसाठी व्हिडिओ शुटींग/व्हिडिओ एडीटींग

१०. पॅकेजिंग उद्योग

११. बँकींग

१२. ड्रायक्लिनिंग

१३. मनोरंजन उद्योग

१४. वाहनांची स्वच्छता/दुरुस्ती

१५. खनिज तेल उद्योग

१६. कारखाने/मोठी हॉटेल्स यांची विद्युतीय देखभाल

१७. वीजनिर्मिती उद्योग

१८. पर्यटन

१९. हॉटेल मॅनेजमेंट

२०. प्लॅस्टीक आणि रबरी वस्तूंची निर्मिती

२१. सलून/ब्युटीपार्लर

२२. रसायन निर्मिती/प्रक्रिया उद्योग

२३. औषध निर्मिती

२४. औषध वितरण

मी करत असलेली आणि माझ्या आवडीचे काही सांगतो..

Finance , Book keeping , health/ wealth planner , share market, Teaching,
Trek/outing planner , event management , photography .......................

राघव's picture

23 Mar 2021 - 7:19 am | राघव

या क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या बघून त्यांच्यात शेअर्स च्या माध्यमातून गुंतवणूक करणे हाही एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Mar 2021 - 1:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

जी उत्पादने आपण आणि आजुबजुचे लोक वापरतात त्याच कंपनीचे समभाग घ्यावे

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 1:43 pm | मुक्त विहारि

आचरणांत आणला नाही...

उत्तम शेती

मध्यम व्यापार

कनिष्ठ नौकरी

आणि सार्वकालिन सर्वोत्तम म्हणजे, सल्लागार....

परकीय आक्रमण झाले आणि आपण ही चतुःसुत्री, हरवून बसलो..

मराठी माणूस नौकरी करत असेल तर लग्न लगेच होते किंवा मग तो अतिशय श्रीमंत तरी हवा

आंद्रे वडापाव's picture

20 Mar 2021 - 11:00 am | आंद्रे वडापाव

तुम्ही लेखात दिलेल्या लिस्टमधील पर्यायांवर,
खालील थंब रुल लावून काट मारा वा नका मारू. निर्णय तुमचा...

"ज्या गोष्टी (ए आय /मशीन लर्निंगने) ऑटोमायझेशन करता येतील त्या नको..."
उदा. वाहन चालवणे...
बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार...

"ज्या गोष्टी (ए आय /मशीन लर्निंगने) ऑटोमायझेशन करता येणार नाही त्यावर फोकस करा..."
उदा. स्टँडअप कॉमेडी, कोणतीही कला..
गुगल, अँपल यांचे तीर्थरूप जरी आज आले, तरी (ए आय /मशीन लर्निंगने) ते घंटा जास्त काही करू शकत नाही साध्याला....

बरोबर,मी इंटरनेटवरून फिटनेस practices शिकले ज्यासाठी मी निर्बुद्धपणे खुप पैसा घालवला.

उपयोजक's picture

20 Mar 2021 - 2:51 pm | उपयोजक

कारखाने आणि वाहनउद्योग यातले ऑटोमेशन हे भारताय कितीजणांना परवडणारे असेल?

आताच जानेवारी २०२१ मध्ये माझा बालमित्र असलेला एक जन मेकॅनिकल अ‍ॅटोमेशन मध्ये आला आहे, आणि प्रगती पण चांगली आहे.
भारी आहे फिल्ड ते.. त्याचे प्रोजेक्ट पाहुन भारी वाटले...

आंद्रे वडापाव's picture

20 Mar 2021 - 3:30 pm | आंद्रे वडापाव

कारखाने आणि वाहनउद्योग यातले ऑटोमेशन हे भारताय कितीजणांना परवडणारे असेल?

कोणा सामान्य भारतीयाला ऑटोमेशन परवडणारे नाही,
म्हणूनच मी म्हटले,
की अश्या प्रकारावर फोकस करा, की जे उद्या ऑटोमेशन होणार नाही/ होऊ शकणार नाही.

भारत देशातून किती वहाने निर्यात होतील त्याच्या आकारमानावर ते अवलम्बून असेल. आपल्याकडे गोव्याचे बाजूला काजूच्या सम्बन्धित कारखाने आहेत तसे ते टर्की मधी देखील आहेत. दोन्ही चे विडिओ यू ट्यूब वर आहेत. ते पाहून तुम्हाला कळेल की आपले कारखाने पूर्ण यान्त्रिक नाहीत. मानवी हाताचे काम इथे आहे. उलट तर्की येतील कारखान्यात ९० टक्के काम यन्त्रच करते. पण तेथील उत्पादन खूप जास्त आहे. त्याना ते त्यामुळे परवडते. मोठ्या कारखान्याची युनिफॉर्मची मागणी मिळत असल्याने पुण्यात बाहेती यान्चे कारखान्यात बरीचशी कामे यन्त्रे करीत असतात. अतिशय गुन्तागुन्तीची किचकट कामे असतील तर ती माणूस ठेवून करणे बरे ठरते. रोबो हा पर्याय तिथे असत नाही. आता ड्रोन जसे स्वस्त होत आहेत तसे रोबोही असे माझा शेजारी जो या क्षेत्रात आहे तो सांगतो.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2021 - 1:45 am | मराठी कथालेखक

बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार...

असं एका रात्रीत वगैरे काही होत नाही. अजून पाश्चात्य जगातही विना ड्रायव्हर कारचे प्रयोगच केवळ चालू आहेत. भविष्यात होणारच नाही असे नाही. पण यात खूप गुंतागुंत असेल , तांत्रिक, कायदेशीर, विमा विषयक, अर्थिक गुंतवणूक ई..
अजून तरी ऑटो पायलट तंत्रज्ञान असून वैमानिकाशिवाय देशांतर्गत विमानेही उडत नाहीत. तिथे तर एअर ट्रॅफिक कंट्रोल, अद्ययावत यंत्रणा ई सगळे असून.. वैमानिकांचा पगार तर कार (वा बस, ट्रक ई) चालकाच्या पगाराच्या अनेक पट असतो.. पण वैमानिकाची नोकरी जाण्याची अजून भीती दिसत नाही .. तीच गोष्ट ट्रेन्सची ट्रेन निश्चित ट्रॅकवरुन धावते सिग्नल यंत्रणा असते, मध्ये कुणी घुसत नाही तरी लाख-दोन लाख पगाराचा मोटरमन असतोच. मग पंधरा-वीस हजार पगार असलेल्या ड्रायव्हरनेच काय घोडं मारलंय. बरं तो बिचारा सामान पण उचलून डीकीत ठेवतो, दार उघडतो, प्रवासात गप्पा मारुन मनोरंजन पण करतो.

हे सगळ्यात महत्वाचे ...

कोणतेही नवे तन्त्र आले की त्याला प्रस्थापित ज्याच्या पायाखालची वाळू सरकते त्याचा विरोध असतो ! दुसरे नवे तन्त्र स्वीकारण्यात काही भावनिक गोष्टीचा ही प्रभाव असतो. जसे ज्यावेळी विद्युत दाहिनी आली त्यावेळी हे काय निर्दयपणे प्रेताला एका खोलीत ढकलून द्यायचे किन्वा अहो वीज आणि लाकडाचा अग्नी यात लाकडाचा अग्नी हाच पवित्र आहे वगैरे असे प्रतिपादन करण्यात आले.

अपघाती मरण वा हार्ट अटॅक वगळता मरण हे देखील टप्प्याटप्याने येत असते. तांत्रिक बदलाचे तसेच आहे ! बँकेत संगणक आले त्यावेळी युनियन ने केवढा गहजब केला ! आज युनियनच म्हणेल स्टॅण्डबाय संगणक ठेवा बिघडला तर घोळ.नको .आजही ऑन लाईन सत्यनारायण पूजेपेक्षा भाविकाला ओढ आहे ती गुरुजींनी घरी येऊन समक्ष पूजा सांगण्याची !

जाता जाता- इताम्बूल मध्ये आताही एक मेट्रो लाईन ड्रायव्हर शिवाय चालत आहे ! अनेक सामाजिक समस्यांचा विचार करून काही ठिकाणी तांत्रिक प्रगती मुद्दाम होऊन नाकारावी लागते ! भारत याचे फार मोठे उदाहरण आहे !

Rajesh188's picture

22 Mar 2021 - 1:35 am | Rajesh188

Ai वर आधारित यंत्र ही माणसाला replace करत आहेत.
आता पर्यंत जे शोध लागले उपकरण निर्माण झाली ती माणसाला replace करत नव्हती तर माणसाला मदत करत होती.
त्या आता पर्यंत जी आधुनिक उपकरण आली नी त्या मुळे जी स्थिती निर्माण झाली ती मानवाच्या प्रगती साठी सकस होती.
त्याची आणि Ai वर आधारित तंत्राची तुलना करता येणार.
AI वर आधारित तंत्र फक्त माणसाला replace करण्यासाठी वापरले जाणार.
१) घरकाम करायला यंत्र

२) विविध उत्पादन करणाऱ्या कारखान्यात उत्पादन घेण्यासाठी माणसं ऐवजी यंत्र.
३), बँकेत जास्तीत जास्त AI च वापर करून माणूस विरहित बँक.
४), गाड्या,विमान,रेल्वे, चालवण्यासाठी माणसाची गरज लागणार नाही.
५) रोबोट चे तंत्र अजुन प्रगत झाले तर माणसाची सर्व च्या सर्व काम यंत्र करतील.
अगदी डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही.
यंत्र माणसापेक्षा ताकत वान होतील .
पण यंत्रात चैतन्य,भावना,संवेदना नसतात.
खरा प्रश्न हा आहे सर्वच काम यंत्र करू लागतील पण त्यांनी कोणासाठी काम करायचे.
माणसा साठीच ना.
विविध उत्पादन कोणासाठी माणसासाठी च ना.
विविध सेवा कोणासाठी माणसा साठीच ना.
जर पूर्ण कामगार वर्ग किंवा जगातील खूप मोठी लोकसंख्या काहीच कामाची नसेल तेव्हा हे प्रचंड उत्पादन कोण खरेदी करणार.
खूप कमी लोक .
आज १०० टीव्ही जगात विकले जात असतील तर ते २ च विकले जातील.
टीव्ही काही जीवन आवशश्य नाही.
जर २ टीव्ही ना ग्राहक असेल तर ९८ टीव्ही चे उत्पादन घेवून त्याचे काय करणार.
हे उदाहरण अन्न,पाणी,सोडून बाकी सर्व उत्पादन ला लागू होते.
अन्न पाणी,हवा असेल तर मानवाला बाकी कशाचीच गरज नाही.
नसलेली गरज आपण निर्माण केली आहे.

फुल्ल ऑटोमेशन मुळे जागतिक अर्थ व्यवस्था पूर्ण रसातळाला जाण्याची शक्यता च जास्त आहे.
ग्राहक वर्ग हा हवाच
त्यांची संख्या कमी होणे म्हणजे अर्थ व्यवस्था डब्यात जाणे सरळ हिशोब आहे.

डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही.
यावर ए आय फिजिशियन असा लेख मी लिहिणार होतो. माझे एक मित्र रेडिऑलोजिस्ट आहेत .माझ्या सोसायटीतच रहातात . ए आय या विषयावर त्यान्च्याशी गप्पा मारताना त्यानी मला असे सांगितले की येत्या काही वर्षात आमची गरजच लागणार नाही ! हजारेक सोनोग्राफी फोटो यंत्राला फीड करून सम्पूर्ण निरिक्षणे,फिजिशयन व सर्जनला सजेशन ई कामांसकट रिपोर्ट तयार करण्याचे काम यन्त्र करील.

अच्युत गोडबोले हे अभ्यासक म्हणतात " बॅंक्स शाल बी म्युझियम्स !! "

सुबोध खरे's picture

23 Mar 2021 - 8:15 pm | सुबोध खरे

डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही.

१९९५ च्या सुमारास संगणक आले त्यात आपली लक्षणे टाकून आपले आजार निदान करता येऊ लागले. २५ वर्षांनी स्थिती काय आहे?
डॉक्टरांची गरज अजूनच वाढलेलीआहे.

हजारेक सोनोग्राफी फोटो यंत्राला फीड करून सम्पूर्ण निरिक्षणे,फिजिशयन व सर्जनला सजेशन ई कामांसकट रिपोर्ट तयार करण्याचे काम यन्त्र करील.

अत्यंत बाळबोध विचार आहेत.

मी ज्या सोनोग्राफी उपकरणावर काम करतो ते सेकंदाला ७० प्रतिमा निर्माण करते म्हणजे एका रुग्णाचे यकृत मी तपासतो त्याला ३ मिनिटे लागतात गृहीत धरले तर १२६०० प्रतिमा माझा मेंदू ३ मिनिटात पाहून ते माझ्या मेंदूत साठवलेल्या आणि ३१ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रतिमांशी पडताळून हे व्यवस्थित आहे कि आजारी आहे हे ठरवतो. हे केवळ एका अवयवा बद्दल आहे. असे केवळ एका रुग्णाच्या एका व्यवस्थित अवयवाबद्दल लक्षात घेतल्यास प्रत्येक अवयवासाठी आणि प्रत्येक आजारासाठी संगणकाला अब्जावधी प्रतिमा शिकवाव्या लागणार आहेत.

या प्रतिमा पडताळून त्या रुग्णाचे अवयव ठीक आहेत का हे ठरवल्या जाईल. आणि ठीक नसेल तर कोणता आजार असू शकेल त्याच्या प्रतिमांशी संगणकाला तुलना करून अशा आजाराची शक्यता वर्तवावी लागेल यासाठी काही खर्व निखर्व प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागतील . हे काम रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरा कोणीही करू शकणार नाही.

असे झाल्यावर आजार किती गंभीर आहे हे ठरवण्यासाठी अजून फार मोठा पल्ला गाठावा लागेल.

उदा. माझ्या मित्राच्या आईला स्तनात गाठ होती ती पाहून मागच्या आठवड्यात मी त्यांना तो कर्करोगाच आहे परंतु तुमच्याकडे १०-१२ वर्षे तरी आहेत एवढे अनुभवाने सांगितले. ८० वर्षाच्या स्त्रीला हा फार मोठा दिलासा आहे. असा दिलासा संगणक देऊ शकेल असे पुढच्या २५ वर्षात तरी शक्य आहे असे वाटत नाही.

तेंव्हा येणाऱ्या २५ वर्षात तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला पर्याय होणार नाही.

माझ्या सोनोग्राफी उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते उदाहरणार्थ बाळाच्या डोक्याची प्रतिमा घेतली तर त्याचा व्यास आणि परिमिती संगणक मोजून देतो.

पण डोक्याचा आकार वेगळा असेल तर संगणक गोंधळतो.

हे मी अहंभाव दुखावला गेला आहे म्हणून लिहितो आहे असे नसून वस्तुस्थिती आहे.

साधा संगणकीय ई सी जी घ्या, जो गेली २० वर्षे तरी प्रचलित आहे त्यावर संगणक आपला अहवाल (रिपोर्ट) देतो. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक अवतार आहे.

त्या अहवालाबद्दल हृदयरोग तज्ज्ञ दुजोरा देत नाही तोवर त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.

राहिली गोष्ट. जी गोष्ट बिनडोकपणे वारंवार करावी लागते अशा कमी कौशल्याच्या गोष्टी मध्ये संगणक पुढे येईल याबद्दल शंका नाही.

पण एखाद्या स्त्रीला तू सुंदर दिसतेस हे संगणकाने सांगितले तर तिला त्याचे समाधान होईल का?

बाकी चालू द्या

पिनाक's picture

24 Mar 2021 - 12:35 am | पिनाक

तुमचा संगणक आणि त्याचे सॉफ्टवेअर AI वापरत नाही. या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आहेत आणि होताहेत. सध्याचा 1 दिवस हा 2010 मधल्या संपूर्ण वर्षाएव्हढा आहे हे संगीतलं तर किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करतो आहे हे लक्षात येईल. शिवाय आता हे सॉफ्टवेअर तुमच्या मशीन वर असण्याची गरजच नाही. त्याचा कित्येक जीबी डेटा क्लाऊड वर ठेवलेल्या सॉफ्टवेअर ला पुरवला जाईल आणि तिथे निर्णय घेऊन तुम्हाला कळवला जाईल. कॉम्प्युटर बिनडोक कामे करणार नाही या पुढे. तो projections करेल, rule based analysis करेल आणि निर्णय घेईल. I am sorry to say this, but most of the human work is doomed in coming decade and yours is the easiest to automate.

सुबोध खरे's picture

24 Mar 2021 - 10:15 am | सुबोध खरे

किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करतो

संगणक मुळात ढ असतो त्याला अ + ब = क हे मुळात शिकवावे लागते. आज या मूलभूत कल्पना शिकवून काही दशके झाल्यामुळे आपल्याला असे वाटत असते कि संगणकाला सर्व काही येते.

मानवी शरीराच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो कि आपला स्वतःचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उजव्या हाताच्या अंगठ्याशी जुळत नाही. म्हणजेच आपण प्रत्येक व्यक्ती हि एकमेवद्वितीय ( युनिक) अशीच आहे. असेम्ब्ली लाईन मध्ये उत्पादन झालेली नाही.

आई वडिलांचा एखादा अवयव (उदा मूत्रपिंड) मुलाच्या शरीरात रोपण करण्यासाठी आणि तेथे टिकवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात.

हेच जीवशास्त्रीयदृष्ट्या अजिबात संबंध नसलेल्या नवऱ्याचे मूल आईच्या गर्भाशयात नुसते जगते नव्हे तर भूमितीय पटीने वाढत जाते ( ९ महिन्यात काही मायक्रोग्रॅम पासून ३ किलोग्रॅम पर्यंत). हे ज्या वेळेस वैद्यकशास्त्रास समजेल तेंव्हा अवयव रोपं अतिसाहय सोपे होईल.

दुर्दैवाने अभियांत्रिकीच्या लोकांचे जीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान हे नगण्यच्या जवळपास असते परंतु प्रत्येक गोष्टीचे गणितीय प्रारूप करता येईल हा अट्टाहास मात्र असतो.

हि सतत होत जाणारी वैद्यकशास्त्राची प्रगती संगणकाला सतत शिकवावी लागेल.

आणि शेवटी या प्रगतीचा मूळ हेतू हा मानवी जीवन सुलभ करण्यासाठी आहे हेच लोक विसरत आहेत.

त्यामुळे प्रत्येक प्रश्न अल्गोरिदमने सोडवणाऱ्या अभियंत्याला गरोदरपणामुळे बायकोच्या पोटात कसं तरी होतंय याचे उत्तर सापडत नाही.

त्याची स्वतःची आई आपल्या सुनेला "अगं, गरोदरपणात असं होतंच. याच्या वेळेस माझ्या पोटात पाणी सुद्धा ठरत नव्हतं, तू अजिबात काळजी करू नकोस " हे सांगते आणि त्यानेच बायकोचं समाधान होतं.

याने कितीही गुगल वाचून संप्रेरकांच्या उलथापालथीने होते असे सांगून तिला काही फरक पडत नाही तेंव्हा त्याला हतबल वाटतं.

जाता जाता -- २०१० च्या ३६५ पट वेगाने काम करणारा संगणक अजूनही करोनाची १०० % गुणकारी लस निर्माण करू शकलेला नाही.

असो

राजेश जी, चौराकाका, पिनाक..
नाही..

मशीन लर्निग algorithms, analysis करतील लाखो images चे, लाखो data चे.. ते माणसांच्या geography वरून, त्याच्या gender वरून किंवा आणखीन कसल्याश्या data वरून अनुमान काढतील की असे झाले तर पुढे भविष्यात काय होईल..

परुंतु, AI डॉक्टरांना replace करू शकणार नाही.

AI कितीही intellegent झाले तरी त्याच्या नावापुढे असलेला artificial हा word ते पुसू शकणार नाही.
- गणेशा

हे दोन विषय जबरदस्त क्रांती करत आहेत. एक उदाहरण म्हणुन पेपर मधे वाचलेल्या लेखाबद्दल सांगतो

१९९६ साली आय बी एम कंपनीने डीप ब्ल्यु नावाचा महा संगणक बाजारात आणला होता आणि त्याची जाहिरात म्हणुन त्यावेळचा सुप्रसिद्ध बुद्धीबळपटू कास्पारोव्ह्बरोबर त्याची प्रदर्शनीय मॅच लावली होती. कास्पारोव्हने ती जिंकली आणि मग मानवी मेंदु मशीन पेक्षा नेहमीच श्रेष्ठ असेल वगैरे स्तुती सुमने उधळुन त्या विषयावर पडदा पडला. ह्या पराभवातुन धडा घेउन आय बी एम ने समांतर गणक पद्धती(पॅरलल प्रोसेसिंग) वापरुन एका वेळेस अनेक प्रोसेसर लाखो गणिते करु शकेल असा पुढचा संगणक जन्माला घातला. आणि १९९७ साली पुन्हा तशीच एक मॅच झाली जी यावेळी डीप ब्ल्युने जिंकली. यात कास्परोव्ह जेव्हा चाली खेळताना २० शक्यता(प्रोबॅबिलिटी) विचारात घ्यायचा तेव्हा डीप ब्ल्यु साधारण २० लाख शक्यता विचारात घ्यायचा कारण तो १+१=२ असाच विचार करु शकायचा. पण तो कुठेही गाळणी (एलिमिनेशन) करत नसे.

त्यानंतर पुन्हा तशी मॅच झाली नाही पण संगणकाच्या गणन शक्तीला वाढवत बसण्याला असलेल्या मर्यादा ओळखुन शास्त्रज्ञ लोकांनी गाळणी पद्धत वापरायला सुरुवात केली. त्यात २० लाख शक्यतांपैकी किती चाली कास्पारोव्हने कधीच वापरल्या नाहीत, अमुक ओपनिंग केल्यास किती चाली बाद होतात, कितव्या मिनिटाला कुठली चाल होत नाही वगैरे अनेक शक्यता विचारात घेउन संगणक नेमक्या चाली निवडे. थोडक्यात शास्त्रज्ञ लोकांनी त्याला पॅटर्न ओळखायला शिकवले ज्यामुळे फालतु गोष्टी टाळुन नेमका निर्णय घेने त्याला जमेल. शिवाय हे निर्णय लक्षात ठेवुन पुढील वेळेस तो वापरेल म्हणजे दिवसेंदिवस त्याच्या निर्णय क्षमतेमधे सुधारणा होत जाईल. अशी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण यामुळे बुद्धीबळ खेळणे थांबले का? नाही, उलट स्पर्धेसाठी तयारी करताना आज यच्चयावत खेळाडु संगणक वापरतात आणि आजकालची लॅपटॉपवर चालणारी साधी सॉफ्ट्वेअर डीप ब्ल्युपेक्षा कैक पटीने जबरदस्त आहेत.

त्यामुळे फक्त तांत्रिक अंगाने विचार केला तर आज आपण करतो ती अनेक कामे भविष्यात बाद होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण नवनव्या संधी उपलब्ध होतील हेही तितकेच खरे आहे.तेव्हा परिस्थितीशी जुळवुन घेणे किवा बाजुला होणे हेच पर्याय आहेत.

गणेशा's picture

25 Mar 2021 - 1:37 pm | गणेशा

नक्कीच..
बरोबर..

आज वैद्यकाला मदत करतात ते इंजिनियर ! एखाद्या रुग्णालयाची पर्चेस ऑर्डर पहा ! त्यात कितीतरी गोष्टीना इंजिनिअर लोकांचा हात लागलेला आहे ! आणि तो पुढे लागण्याशिवाय पर्याय नाही. आज १ वर्षात आपण लस शोधू शकतो यात अनेक अत्याधुनिक उपकरणाची मदत झालेली आहे ! मानवी मेंदूचे गुणगान करताना माणूस आपल्या मेंदूतील प्रोसेसर वापरताना काहीही अडचण येत नाही असे गृहीत असते . पण जरा आजूबाजूला मानवी मेंदूच्या मर्यादांची लिस्ट पाहा . मुख्य म्हणजे अतिशय सूक्ष्म मापन करण्याची क्षमता नसणे हा माणसाचा एका मोठा दोष आहे . हात लावल्याने ताप आहे हे कळते पण तो किती आहे हे संशोधन करणारा इंजिनिअरच असेल ना ? कारण तो किती ताप आहे हे फार महत्वाचे मापन काही निरणयासाठी ठरू शकते.दूसरे महत्वाचे वैगुण्य म्हणजे स्तराधारित स्मृती . त्यामुळे मानवी मेंदूला स्थूलपणे प्रतिमा लक्षात ठेवता येत असलेली पण त्यात अतीसूक्ष्म ता आली की माणूस संगणकासारखे रिझल्ट देऊ शकत नाही ! मी जे हे प्रतिपादन करतो आहे ते मी जेंव्हा पुणे येथील आय एम डी आर् या संस्थेत आज्ञावलीतील पहिले धडे घेतले त्यावेळी जे ऐकले आहे त्यावर आधारित. मी आज जेंव्हा फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरतो त्यावेळी ते तयार करणार्या थॉमस नॉल व त्याचे सहकारी इंजिनीअर यांच्या पुढे आपण किती क्षुल्लक आहोत याचे भान येते.पण .... पण यात एक खास गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फोटोशॉप वापरणारे मेंदू त्या इंजिनिअरांच्या पलीकडचे आहेत . कारण क्रिएटिव्हिटी आली की संगणक ठप्प ! एखादा की बोर्ड काहीतरी वाजवू शकतो पण चाल लावू शकत नाही ! जिथे फक्त गणिती अनुमान आहे त्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमता नक्की पराक्रम गाजविणार ! तिला अगदी अमिताभ सारखा नाही तरी त्यासम ऍनिमेटटेड अमिताभ उभा करता येईल .पण कथा लिहिता येईल काय ? हा प्रष्णाचे उत्तर आजच्या भाषेत नाही असे आहे ! काळाच्या उदरात काय दडवून ठेवले आहे कुणास ठाऊक !

सुबोध खरे's picture

25 Mar 2021 - 7:29 pm | सुबोध खरे

माझा विषय रेडिओलॉजी ज्यात संगणकाचा सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सुद्धा माझ्या शाखेने सर्वात प्रथम उपयोगात आणायला सुरुवात केली. आणि याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहेच

परंतु यामुळे प्रशिक्षित क्षकिरण तज्ज्ञाची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेईल हे नजीकच्या भविष्यकाळात ( आपल्या आयुष्यभरात) तरी अशक्य आहे. उदा. छातीच्या क्षकिरण प्रतिमेचे विश्लेषण करून त्यात कर्करोग असण्याची शक्यता हि आता संगणक जास्त अचूकतेने करू लागला आहे. परंतु त्यासाठी अक्षरशः हजारो कर्करोगाच्या प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागल्या होत्या. असे संगणकाचे प्रशिक्षण केल्याने सर्वात मोठा फायदा सुदूर असणाऱ्या ठिकाणी जेथे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही तेथे सर्वात जास्त होऊ शकेल. आजसुद्धा अमेरिकेत केलेल्या स्कॅनच्या प्रतिमा भारतातील क्षकिरण तज्ज्ञ आपल्या दिवसा ( अमेरिकेत रात्र असताना विश्लेषण करून त्याचा अहवाल रात्रीत तेथे पाठवून डॉलर्स मध्ये कमाई करत आहेत

कारण यंत्र प्रशिक्षण (मशीन लर्निंग) देण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित शिक्षकच लागतात. एकदा यंत्राला शिकवले कि ते तेवढे काम जास्त उत्तम आणि सफाईने करते हे सत्य. आज तरी संगणक स्वतः स्वतंत्र विचार करू शकत नाही.

परंतु या यंत्राला कालबाह्य करणारे तंत्रज्ञान विकसित होत जाते तसे नवींन तंत्रज्ञान नव्या यंत्राला शिकवावे लागेलच. त्यासाठी त्या बुद्धीचे मनुष्यबळ लागणारच आहे.

यात अशिक्षित आणि अर्ध शिक्षित मनुष्यबळाचा ऱ्हास होईल हि मात्र वस्तुस्थिती आहे. जसे रिक्षा मोटारी आल्या तेंव्हा टांगे नाहीसे झाले आणि संगणक आल्यावर टायपिस्ट/ स्टेनोग्राफरची गरज नाहीशी झाली.

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2021 - 7:31 pm | मराठी कथालेखक

हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं पॉवरफुल्ल आहे म्हणता .. मेथी निवडायचं मशीन काही अजून आलं नाही पण !!

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 8:03 pm | मुक्त विहारि

मटार स्वस्त झाले की आर्थिक दृष्टीने बरे वाटते पण शारिरीक
दृष्टीने फायदेशीर पडत नाही....

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2021 - 9:29 pm | मराठी कथालेखक

तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे गोडवे गातात पण प्रत्यक्षात कितीतरी कंटाळवाणी आणि काहीतर घाणेरडी कामं माणसांना करायला लागतात.
माझ्याकडे एक व्हिडिओ होता माझ्याच सोसायटीच्या बाहेरचा तुंबलेलं गटार साफ करण्यासाठी एक माणूस (महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी ) कपडे काढून सांडपाण्यात उतरला होता. फारतर वर्ष -दीड वर्षातला असेल व्हिडिओ. माझ्यानं बघितलाही गेला नाही पुर्ण.. डिलीट केला.. पण आता वाटतं ठेवायला हवा होता.. महासत्तेच्या गप्पा मारताना अशा व्हिडिओची आठवण हवी... बरं हे पण कुठल्या खेड्यातलं नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतलं दृष्य... तळागाळातल्या माणसाचं जीवनमान सुधारत नसेल तर त्या ऑटोमेशनचं काय करायचं ?

आग्या१९९०'s picture

22 Mar 2021 - 10:07 pm | आग्या१९९०

काही काळापूर्वी CGI technology चित्रपटातील प्रमुख कलाकारांना बेकार करेल अशा बातम्या यायच्या परंतू तसे काही घडले नाही.

पिनाक's picture

24 Mar 2021 - 12:38 am | पिनाक

18 व्या शतकात रेल्वे नवीन नवीन पाहून भारतातील लोक जशा चर्चा करत असावेत त्याचा हा आधुनिक प्रकार वाटतो.

कंजूस's picture

24 Mar 2021 - 9:04 pm | कंजूस

पण त्याला आपल्याकडे पर्याय नाही.
या कामासाठी बोलावताना मी दोन साबण आणून देत असे आणि आंघोळ करायला लावत असे.

आग्या१९९०'s picture

22 Mar 2021 - 10:10 pm | आग्या१९९०

आजही शहरात रस्ते खणायला मशिन वापरले जात असेल परंतू जेथे वीज , टेलिफोनच्या वायर आणि पाण्याचे पाईप असतात त्याठीकाणी माणसेच टिकाव फावड्याने खोदकाम करतात.

चौकटराजा's picture

24 Mar 2021 - 1:43 pm | चौकटराजा

एक लक्षात घ्या १९८६ मध्ये मी संगणक वापरीत होतो . माणूस असो वा संगणक त्याला २ अधिक २ बरोबर चार हे शिकवावेच लागते . मानवी रोजगारी मध्ये पाहाल तर ८० टक्केचे वर कामे कोणतीही फार मोठी बुद्धीमत्ता वापरून होत नाहीत. म्हणून तर संगणकाला काही प्रमाणात का होईना माणसाचा पर्याय म्हणतात.

१९८६ चे सुमारास फाईल वाच रेकॉर्ड तयार कर व छाप ई . कामे संगणक करीत असे. हार्डवेअर व सॉफ्टवेअर मध्ये जशी प्रगती झाली तसे फिल्टर, सॉर्ट ई गोष्टीही संगणक करू लागला . मग एकच कमांड ना वापरता कमांडचा समूह ( मॅक्रॉस ) करून अधिकाधिक गुंतागुंतीची आज्ञा द्यायची सोय संगणकात झाली. इंटेल व मायक्रोसॉफ्ट यांनी जणू एकमेकांच्या गरजा समजून आपला संशोधनातला मार्ग चोखाळलेला आहे. हा सारा इतिहास संगणक कार्य शिकविताना शिकविला जातो.संगणकाला जशा मर्यादा आहेत तशा मानवी मेंदूला देखील .(मानवी मेंदूच्या मर्यादासंबंधी काही व्हिडीओ यू ट्यूब वर सापडतील ) मुख्य म्हणजे संगणक ,एकाग्रता ह्या हा गोष्टीची गरज नसलेलेभावना शून्य यंत्र आहे. या दोन बाबी माणसाच्या हातून कितीही अनुभव असला तरी चुका घडवून आणू शकतात. ड्रायविंग लायसन्स असलेला माणूसही अपघात करून शकतो नव्हे ज्यांच्या हातून अपघात झाले आहेत यात टक्केवारी लायसन्स असणारांचीच अधिक असते.

संगणक गणन विभाग व तर्क विभाग या दोनच्या संकराने चालतो .तर गणक फक्त गणन च करू शकतो . यामुळे संगणक आज्ञावलीला दोन गोष्टीची मदत लागते. संगणकाला ही पंचेंद्रिये असतात ( पेरेफेरल सेन्सर्स ) हे सेन्सर्स जितके अधिक जितके एकमेकांना संवादित तितके आज्ञावलीला मदत अधिक . आज्ञावलीत जितके व्हॅलिडेशन सखोल ,जितके लॉजिक सखोल ( डीप ली एम्बबेडेड इफ्स ( कंडीशनल स्टेटमेंट ) तितका मिळणारा रिझलट अधिक सत्याच्या जवळचा !

एकेकाळी हवामान खात्याची चेष्टा पु ल देशपान्डे आपल्या लेखात करीत ! आता तो विषय तितका चेष्टेचा राहिलेला नाही कारण अधिकाधिक सेन्सरचा शोध !
आज एकट्या फोटोशॉप हा सोफ्ट्वेअर ची प्रगति पाहिली की थक्क व्हायला होते. आवाजावरून टायपिंग हे मला एके काळी अशक्य वाटत असे आज बाजूला आपण माउसने जोडाक्षर काढले तर निमिशार्धात त्याचे रुपान्तर वेक्टर ग्राफिक्स मधे करून तो शब्द कॉपी पेस्ट करायची सोय झाली आहे.
आता आपल्या प्रश्नाचे उत्तर.
योग्य प्रकारचे सेन्सर असतील तर त्या यन्त्राला अगोदरच समजेल की मी जिथपर्यत खोदाई केली आहे त्यापुढे २ इन्चावर केबल जात आहे. यन्त्र थाबेल .कुठेतरी मानवी निर्णयाची गरज लागली तरी अशा निर्णय घेणार्या मानवी मेंदुन्ची गरज तुलनेने संख्यात्मक द्रुष्ट्या कमी असेल. आजही सी एन नी मशीनवर माणूस असतोच .त्याला फक्त जे रोबोही करू शकत नाही अशी गुन्तागुन्तीची कामे करावी लागतात.
आज काय आहे त्या संदर्भात उद्या काय असेल याची कल्पना करता येते ती आजच्या उपलब्ध असलेल्या तन्त्रमाहिती वर . त्यापेक्षा आणखी प्रगत असे काही फिजिक्स ने शोधून दिले तर कोणतेही क्षेत्र नसेल जिथे बेकारी नाही. भावना व नवनिर्मिती इथे मात्र संगणक अपुरा पडणार हे नक्की !

Rajesh188's picture

24 Mar 2021 - 2:38 pm | Rajesh188

रोबोट काय करू शकतात ,AI काय करू शकते हा प्रश्न नाही .
शेवटी जे काही शोध लागत आहेत,Ai वापरून रोबोट निर्मिती आणि उत्पादन ,सेवा,कामगार विरहित करून त्यांच्या वरचा खर्च तो कंपनीचं फायदा हा एक हेतू आहे .
दुसरा हेतू आहे वेग प्रतिस्पर्थी पेक्षा जास्त वेग हवा .
आणि तिसरा हेतू आहे दर्जा उत्तम ठेवणे.
आणि हे तिन्ही हेतू यांत्रिकी करण आणि AI आधारित तंत्र ,रोबोट, पूर्ण करू शकतात ह्या विषयी बिलकुल शंका नाही .
खरा प्रश्न हा आहे की
1) ज्याच्या साठी हे सर्व चालले आहे तो मानव च ह्या सर्व प्रक्रियेत बाहेर जात असेल तर त्याचा फायदा काय
.
२) उत्तम दर्जा ,असलेल्या आणि पूर्ण यांत्रिक पद्धती नी निर्माण केलेल्या वस्तू,सेवा ह्या तर hundred percent मानव जाती साठीच असणार.

३) यंत्र उत्पादक,सेवा पुरवणारे आणि ग्राहक माणूस हे सत्य कधी बदलू शकत नाही.
४) सेवा घेण्यासाठी,उत्पादित साहित्य घेण्यासाठी हे ग्राहक कसे निर्माण करायचे.
५) कारखानदार, investment करणारे,भांडवलदार,हे उत्पादक किंवा सेवा
पुरवणारे असणार पण ह्या व्यतिरिक्त त्या मध्ये माणूस सहभागी नाही.
फक्त यंत्र सहभागी आहेत.
६) purchhes पॉवर असणारी लोकसंख्या अशा वेळी वाढेल की कमी होईल.
६) नक्कीच कमी होईल .
मग हा सर्व डोलारा नक्कीच कोसळणार आहे.
ते उद्या होणारच आहे.
माणसाच्या जीवनात यंत्राचा सहभाग किती असावा .
काही टक्केच असावा.
कोणतेही गोष्ट मर्यादे बाहेर गेली की अनिष्ट परिणाम होणारच.
स्किल develop करू ,नवीन संधी मिळतील.
हे पोकळ वाक्य आहे.
AI च्या पुढे माणसाचे स्किल काय असणार.
त्यांची निर्मिती,दुरुस्ती,आणि त्यांचा वापर इथ पर्यंत च मर्यादा आहेत.
आणि हे काम काही लाख लोक च पुरेशी आहेत पूर्ण जगात.
मग बाकी कित्येक अब्ज लोकांनी काय करायचे.
दरोडे,चोऱ्या,हिंसा,नेटवर्क हॅक करणे,system वर हल्ला करणे .
ह्या क्षेत्रात स्किल develop karave लगेल.
आणि गरज च सर्व शोधाची जननी असते.
नेटवर्क कसे हॅक करायचे,रोबोट कसे हॅक करून आपल्या ताब्यात ठेवायचे,ड्रायव्हर लेस गाड्या त्यांची system corrupt करून कुठे कुठे फिरवाय च्या.
ह्या विषयात बाकी लोक स्वतः ला झोकून देतील.

चौकटराजा's picture

23 Mar 2021 - 10:20 am | चौकटराजा

जिथे बुद्धीतील हिशेब वा मापन या भागाचा वापर होतो तिथेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग होईल . जिथे सारासार विचार हाच महत्वाचा आहे इथे यंत्राचे काही काम नाही ! मग मेथी निवडणे हे सारासार विचाराने करण्याचे काम आहे का ? तर एका अर्थाने ते खरे आहे ! मी स्वतः: मेथी निवडताना कधी कात्रीचा वापर करत तर कधी हाताने खुडतो .हा निर्णय मेथीच्या पानाचे स्वरूप ,गड्डी चा ओलेपणा यावर अवलंबून असतो असे अनेक सेन्सर्स मानवी देहात मेंदूला निर्णय घेण्यास मदत करतात तितके यंत्राला लाभत नाहीत .सबब काही कामे दिसायला जरी सोपी असली तरी मशीनच्या दृष्टीने ती गुंतागुंतीची असतात .

राजेश जी, चौराकाका, पिनाक..
नाही..

मशीन लर्निग algorithms, analysis करतील लाखो images चे, लाखो data चे.. ते माणसांच्या geography वरून, त्याच्या gender वरून किंवा आणखीन कसल्याश्या data वरून अनुमान काढतील की असे झाले तर पुढे भविष्यात काय होईल..

परुंतु, AI डॉक्टरांना replace करू शकणार नाही.

AI कितीही intellegent झाले तरी त्याच्या नावापुढे असलेला artificial हा word ते पुसू शकणार नाही.
- गणेशा

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Mar 2021 - 11:03 am | चंद्रसूर्यकुमार

वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी.

नाही हो. साठ हजारात श्रीमंत म्हणावे अशी लाईफस्टाईल नाही ठेवता येणार. त्यात ई.एम.आय वगैरे असेल तर विसराच.

साहना's picture

23 Mar 2021 - 2:47 am | साहना

इतर सर्व खर्च भागवून जर महिन्याला ६०,००० रुपये वाचत असतील तर श्रीमंत म्हणू शकतो.

साधारण मासिक उत्पन्न :
घरचे भाडे emi : ४०,०००
फोन, इंटरनेट, वीज इत्यादी : ३५००
आरोग्य : २०००
वस्त्र : ३०००
चित्रपट, सैरसपाटा : २०००
गाडी, पेट्रोल इत्यादी : १०,०००
अन्न : ६०००
नोकर आणि साफसफाई : ३०००
रिटायरमेंट साठी सेविंग : ४०,०००
धर्म आणि दान : २०००

म्हणजे साधारण कर भरल्यास हातांत १,४०,००० तरी महिन्याला आले पाहिजेत.

तरी ह्यांत वर्षाला एकदा प्रदेश प्रवास, इतर कुटुंबीय, लग्न आणि वडीलधाऱ्यांचे आरोग्य, मुलाची फी इत्यादी गोष्टी घातल्या नाहीत.

बापरे!!!!

प्रत्येकाची आर्थिक स्वातंत्र्याची, चौकट वेगळी असते...

Bhakti's picture

20 Mar 2021 - 11:34 am | Bhakti

कायिक आरोग्यसेवा
म्हणजे काय?
न्यायिक सेवा (वकील हे सगळ्यात बेस्ट आहे... वैयक्तिक सल्ल्यासाठी वकीलाची बडबड १/२ तास म्हणून १००० वगैरे रुपये मोजावे लागतात.

उपयोजक's picture

20 Mar 2021 - 1:29 pm | उपयोजक

यात मानसोपचारतज्ज्ञ येणार नाहीत

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Mar 2021 - 12:02 pm | चंद्रसूर्यकुमार

आपला एखाद्या विषयात हातखंडा असेल तर तो कंटेन्ट सरळ युट्यूबवर अपलोड करावा. हल्ली व्हिडिओ बनवायला फार खर्च येत नाही आणि ते फार कठीण काम आहे असेही नाही. आजच्या काळात डेटा हा राजा आहे. एकदा एखाद्या युट्यूब चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर लोक यायला लागले की त्या जनतेला गुगल जाहिराती दाखवून पैसे कमावते आणि त्यातील काही वाटा त्या चॅनेलवाल्यांना देते. त्यातून भरपूर कमावता यायची संधी आहे. भाऊ तोरसेकरांच्या प्रतिपक्षलाच जवळपास १ लाख ८८ हजार सबस्क्राईबर्स आहेत आणि जवळपास तीन कोटी व्ह्यू त्या चॅनेलचे झाले आहेत. त्यातून लाखांमध्ये (म्हणजे एखाद लाख नाही- १५-२० लाख वगैरे) कमावायची संधी आहे. प्रगत लोकेने मागच्या वर्षी पुढील व्हिडिओ अपलोड केला होता.

त्यातून कळेल की त्याला महिन्याला त्यावेळी ५०-६० हजार मिळायला लागले होते. प्रगत लोकेच्या चॅनेलला जितके व्ह्यू त्यावेळी होते त्यापेक्षा भाऊंच्या व्हिडिओंचे व्ह्यू आता चांगले १०-१५ पटींनी जास्त आहेत. म्हणजे यातून किती कमावायची संधी आहे बघा.

मी यूट्यूब पर्यटन खूप करतो. नोमॅडिक इंडियन, सॅव्ही फर्नवे हे माझे आवडते चॅनेल्स आहेत. नोमॅडिक इंडियन अफगाणिस्तानला गेला होता आणि तालिबानने ज्या बामियानच्या बुध्दमूर्ती तोफा लावून तोडल्या तिथे तो गेला होता. त्या ठिकाणचा व्हिडिओ आहे. ही मंडळी पण अशीच लाखांमध्ये कमावतात. कोल्हापूरची मुक्ता नार्वेकर पण छान व्हिडिओ अपलोड करते. कोकणी रानमाणूसचे पण व्हिडिओ आवडतात. फक्त युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना चांगला कंटेंट देता आला पाहिजे आणि मधूनमधून सारखे काहीतरी अपलोड केले गेले पाहिजे. नाहीतर प्रेक्षक नियमितपणे आले नाहीत तर त्याचा उपयोग नाही.

आताच्या काळात स्क्रीन रेकॉर्डिंग करून कोणालाही कोणतेही व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. आणि असे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आंतरजालावर कुठे पसरतील यावर व्हिडिओ बनविणार्‍याचे काहीच नियंत्रण राहत नाही. विशाल मलकान आणि त्याची बायको मेघना हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून शेअरमार्केटचे प्रशिक्षण देत आहेत. इतकी वर्षे ते पंचतारांकित हॉटेलांमध्ये सेमिनार घ्यायचे पण लॉकडाऊनमुळे त्यांना ऑनलाईन क्लास घेणे भाग पडले. ते या क्लासेससाठी ६ आकड्यांमध्ये चार्ज करतात. पण एकदा ऑनलाईन क्लास घ्यायला सुरवात केल्यानंतर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी स्क्रीन रेकॉर्ड करून ते व्हिडिओ पसरवले. अनेक टेलिग्राम चॅनेलवर ते व्हिडिओ बघायला मिळतील. काही टेलिग्राम चॅनेलवाले तर त्याचाही धंदा करतात. म्हणजे विशाल-मेघना लाखांमध्ये चार्ज करत असतील तर आम्ही तुम्हाला तेच व्हिडिओ एक हजारात देतो वगैरे. तेव्हा काही वर्षांनी असा कंटेंट पैसे देऊन विकणे हा धंदा राहणारच नाही. त्यापेक्षा सरळ युट्यूबवर अपलोड करावे, नियमित प्रेक्षक गोळा करावेत आणि त्यातून पैसे कमावावेत. जर प्रेक्षकांना युट्यूबवर फुकटात बघायला मिळत असेल तर असे व्हिडिओ रेकॉर्ड करून विकणे हा प्रकारच बाद होईल. फक्त त्यासाठी नियमितपणे चांगला कंटेंट देता आला पाहिजे आणि चांगले मार्केटिंग जमले पाहिजे.

उपयोजक's picture

20 Mar 2021 - 2:55 pm | उपयोजक

धन्यवाद. मी यातला माहितगार नाही पण हे गणित तितके सोपे नसावे असे वाटते.

k

हा आहे सर्वात श्रीमंत युट्यूबर रायन काजी. वय ९ वर्ष.
https://en.wikipedia.org/wiki/Ryan%27s_World

चौकटराजा's picture

20 Mar 2021 - 12:27 pm | चौकटराजा

अगदी गणिती हिशेबाने पहायचे झाले तर ज्याच्या कमाईपेक्षा खर्च कमी आहे तो श्रीमन्त ! ज्याचे बरेचसे पैसे हप्ते भरण्यात जातात तो गरीब ! आता आपण गरीब व्हायचे की श्रीमन्त हे ज्याचे त्याने मला आयुष्याकडून काय हवे त्यावर ठरते.
तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या पुढच्या पिढी ला मी काहीतरी मोठ्ठे देणे लागतो तर तुम्ही अधिक गुन्तत जाता पैसे मिळविण्याच्या खटपटीत रहाता ! तुम्हाला असे वाटत असेल की मरणा पर्यंत मित्र -सरणापर्यंत नातेवाईक बाकी आपण एकटेच येतो व जातो ! तर तुम्ही तुमच्या साठी ठरवलेल्या जीवनशैलीतून पुढे विनासायास जाऊ शकता ! देवाने आपल्याला जशी बुद्धी, शक्ती दिली तशी पुढच्या पिढीलाही तो देईल अशी खात्री असेल तर मुलांसाठी प्लॉट घेतला आहे व त्याचे हप्ते मी माझ्या आवडी निवडी बाजूला ठेवून हप्ते भरत आहे अशी तुमची अवस्था होणार नाही !

कोणत्याही व्यवसायातून पैसा मिळविण्यासाठी कल्पकता ,कष्ट करण्याची तयारी,,काहीशी लबाड वृत्ती व नशीब अशा अनेक गोष्टी लागतात. ज्यात फारसे डोके चालवावे लागत नाही ( उदा झेरॉक्स चे दुकान ) अशा व्यवसायात तीव्र स्पर्धा उत्पन्न होते .केटरींग ची तीच तऱ्हा असू शकते .काही व्यवसाय विशेष पदवी घेतल्याखेरीज ज्ञान असले तरी करता येत नाहीत उदा सी ए ,फार्मासिस्ट ई.

एक सर्वसाधारण नियम असा आहे की कोणत्याही व्यवसायात अगदी शिखरावर जायची तयारी व क्षमता असेल तर उज्ज्वल निकम होता येते नाहींतर " ट्रू कॉपी " चा स्टॅम्प मारून सही करणारा नोटरी होता येते ! एक जण बंगल्यात राहातो दुसरा फ्लॅट मध्ये पण रसरसून जगायची वृत्ती असणारा आनंदयात्रीच खरा श्रीमंत असतो . दागिने ,फ्लॅट ,कपडे,,हॉटेलिंग, मोटार ई ला बरेचसे लोक जीवनशैली म्हणतात पण व्यायाम ,संगीत,,संवाद हास्य विनोंद ,प्रेम,,स्नेह,भटकंती हे जीवनशैली नाहीतर काय आहे ,,?

आहे हे ठीक आहे/ नाही वाटणारे दोन गट ?

उपयोजक's picture

21 Mar 2021 - 8:17 am | उपयोजक

आपण भारताबद्दल बोलत आहोत. इथे आनंदयात्री असण्याला समाज फारसे महत्व देत नाही. असा आनंदयात्री फारसे पैसे कमवत नसेल,आहे त्यात समाधानाने जगत असेल आणि तो त्याचे समर्थन करत असेल तर 'Loser's philosophy' असा शिक्का मारुन कमवण्याची कुवत नाही ते सांगा ना! हा बोनसही मिळतो.

आपल्या भारतीय समाजात जेव्हा एखादी व्यक्ती आपण पैसे मिळवण्यासाठी काय काय कष्ट केले , शून्यातून आर्थिक वैभव कसे निर्माण केले याबद्दल सांगतो त्यावेळी त्याचे भरभरुन कौतुक होते. मग दररोज संध्याकाळी तुडूंब पिल्याशिवाय झोप येत नसली तरीही चालतं. किती लोक त्याला "तू आनंदी आहेस का? आनंदात राहण्यासाठी तू काय काय केलंस?" असा प्रश्न विचारतात? एखाद्या आनंदयात्र्याला आपला समाज फार काळ आनंदात राहू देत नाही.

संगणक शाखेतून न शिकलेले कितीतरी अभियंते हे आयटी कंपनीत चांगले पॅकेज मिळते म्हणून काम करतात.किती मायकालाल ठरवतात की मी ज्या शाखेतून शिकलो त्याच्याशी संबंधित क्षेत्रातच एखादा व्यवसाय करुन त्यातून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईन आणि हे करताना चाळीशी आली तरी चालेल. किती जण हे आपल्या पालकांना सांगू शकतात?
२२-२३ पर्यंत शिक्षण, २६ पर्यंत लग्न आणि २७ पर्यंत एखादं अपत्य याच चाकोरीतून जाणारा आपला भारतीय समाज आहे. त्याला विरोध करण्याचे धाडस फार कमी लोकांमधे आहे. अफाट लोकसंख्या असल्याने पावलोपावली स्पर्धा अटळ आहे.

मध्यंतरी KBC मधे एक अपंग मुलगी हॉट सीटवर आली होती.तिने आपला संघर्ष सांगितला. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते. "हमारे बाबुजी ने कहा था; के जब तक जीवन है तब तक संघर्ष है।" अमिताभसारख्या अब्जाधीश महानायकाला संघर्ष चुकत नसेल तर आपण कोण?

संघर्षाची सवय होणे हेच चांगले असेही कधीकधी वाटते.

चौकटराजा's picture

21 Mar 2021 - 9:31 am | चौकटराजा

आपण भार्ता बद्द्ल खरेच बोलत आहोत का ..... ? मला नाही वाटत ! मी सोनमर्ग पासून कन्याकुमारी पर्यन्त व जेसल्मेर पासून भूवनेश्वर पर्यन्त भारत पाहिलेला आहे. जब तक जीवन है तब तक संघर्ष है हे तर खरेच ! अगदी आपले शरीर देखील लाखो व्हायरसेस ,फंगी ई सह वाईट हवामान याबरोबर संघर्ष करीतच असते. अमिताभ निवॄत्त होत नाही कारण त्रुप्तीशी त्याचा संघर्षच चालू आहे !

१८० किमी चालत जाऊन पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेणारे वारकरी एका बाजूने आपण त्याना आळशी ( आळशी तरी कसे म्हणावे २० १५ ते वीस कि मी चालणे हे काय आळशीपणाचे लक्षण आहे का ?) म्हणू पण त्यान्चा जो जीवनानन्द त्याना मिळत आहे त्याला किती सम्पतीचा त्याग त्याना करावा लागतो.

चरितार्थ हा कुणाला चुकलेला नाही. आरोग्य, चांगली हवा, काहीशी करमणूक यासाठी सम्पत्ती अवश्यकच आहे पण एक क्रिकेट सीरीज झाली की आठ दिवसात दुसरी, एक १०० कोटीचा सिनेमा आला की आठ दिवसात दुसरा ,दर आठवड्याला पिकनिक ,आधीचा सदरा फाटला नसला तरी नवीन सदरा हे काय आहे ..? हे सारे उत्तम आहे हे पटविण्यासाठी मग यातून रोजगार निर्मिती होते असा सिद्धात मान्डायचा ! मग आपण दुबाईला राहायचे बायकोला परभणीला ठेवत आयुष्य जगायचे व बख्ख्ळ पैसा कमावायचे असा फोर्म्युला सुरू होतो.

वाढत्या रहाणी मानाचे आकर्षण एका बाजूला तर दुसर्या बाजूला प्रचंड स्पर्धा ,यान्त्रिकीकरण , क्रुत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता वापर याने एक भयानक जग आपल्यासमोर उभे रहाणार आहे ! तरीही एक मुलाला कम्पनी म्हणून दुसरे मूल हवेच हा हट्ट कायम रहाणार आहे !

भारत व इन्डिया यान्चा असा अर्धनारी नटेश्वर होणार आहे !!

की पैसेही चांगले मिळतात. मिपावर अगदी सगळे नसले तरी बहुतांश मिपाकरांची इंटेलेक्चुअल लेवल ही चांगली आहे. त्यामुळे नोकरी,व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती करुन त्यातून पर्यटन,हौसमौज करणे शक्य होत असावे. चांगले आहे किंबहूना आपण सगळेच मिपाकर पोट भरले आहे म्हणून इथे लेखनासाठी वेळ देऊ शकत आहोत. बर्‍यापैकी पैसा मिळवणे आणि मन आनंदित करणारे काही करायला पुरेसा पैसा शिल्लक राहणे हे चांगलेच आहे. सर्वांना हे जमले तर आनंदच वाटेल.

प्रवासाबद्दलचे साद्यंत अनुभव भटकंती विभागात वाचायला आवडतील. :)

चौकटराजा's picture

21 Mar 2021 - 1:33 pm | चौकटराजा

बुद्धीमत्ता असली की श्रीमंत होता येते नव्हे २१ व्या शतकात तीच श्रम , भांडवल ई गोष्टीचा पराभव करीत वरचढ ठरणार आहे पण ती आली तरी श्रीमंत कशासाठी व्हायचे याचे निरनिराळ्या माणसाचे निकष फार भिन्न असतात . तसे म्हणाल तर ५ किलो सोन्याचा सदरा घालणारा माणूस हा आनंदयात्रीचा असतो तत्वतः कारण त्याला त्यातून काहीतरी आनंद नक्कीच मिळत असतो पण एवढे सोने जमविण्यासाठी त्याला अपार कष्ट , कल्पकता ,फसवाफसवी ,गुन्हेगारी ई कशाचाही वापर दीर्घकाळ करीत बसावे लागते ते केवळ मी सोन्याचा सदरा घातला या एका आनंदासाठी !

आपल्या धाग्याचे शीर्षक आर्थिक सुरक्षेततेसाठी काय काय केले पाहिजे असे असावयास हवे होते . श्रीमंती, आर्थिक सुबत्ता व आर्थिक सुरक्षितता या तशा वेगळ्या गोष्टी आहेत . उदा जे दुसर्या अनेकांना येत नाही ते तूम्हाला येत असेल व ही प्रक्रिया अव्याहत असेल हा खरा आर्थिक सुरक्षिततेचा मंत्र आहे . आपला एक मिपाकर च सांगत होता त्याला टिकून राहण्यासाठी गेल्या १५ वर्षात तीन वेळा त्याच्या क्षेत्रातील नवीन असे काहीतरी शिकावे लागले . यात त्याच्या बुद्धीमत्तेपेक्षा त्याच्या मानसिकतेचा विजय अधिक आहे . येत्या १० वर्षात आजचे ६० टक्के रोजगार अस्तित्वातच असणार नाहीत अस कयास आहे . १९७० च्य सुमारास टेलिफोन ऑपरेटर , स्टेनोग्राफर या अजरामर लाईन्स आहेत असते म्हटले जात असे ! आज टाईपरायटिंग इन्सटिट्यूट प्रसादाला तरी सापडेल का जगात ?

जाता जाता - पियानो वाजविण्यासाठी पियानो विकत घ्यावा लागतो त्यासाठी पैसे लागतात पण संगीताचा आनंद शीळ वाजवूनही मिळविता येतो . मुळात तुम्हाला संगीताचा आनंद लुटण्याची दैवी देणगी आहे की नाही हे महत्वाचे ! ती श्रीमंती मिळविण्याचा कोणताही फार्म्युला जगात नाही !

प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अनुभव वेगळा असतो. उपचारासाठी पैसे नसल्याने एकुलता भाऊ गमावला ह्याचे प्रचंड दुःख राजेश्वर ला झाले आणि हीच परिस्तिथी आपल्या मुलांवर ओढवू नये म्हणून हृदयावर दगड ठेवून तो दुबईला गेला आणि बायकोला परभरणीत ठेवले. इतर लोकांची मनस्थिती आपण जणू शकत नाही त्यामुळे विनय ठेवून लोकांना त्यांचे स्वतःचे हित कश्यांत आहे हे समजण्याची टाकत आहे असे मानून चालावे.

धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चारी गोष्टीचा बॅलन्स अत्यंत आवश्यक आहे. ह्या समाजांत संपन्नता नाही तो समाज काहीही उच्च दर्जाची मूल्ये निर्माण करू शकत नाही. वाल्मिकी पासून कालिदास पर्यंत भारतांतील सुबत्ता, चांगले व्यवस्थापन इत्यादी त्याच्या कार्यासाठी पोषक होते. आर्यभट असो वा ब्रम्हगुप्त सर्वांचे ज्ञान हे भारत समृद्ध होता म्हणून शक्य झाले. आर्थिक सुबत्ता हा अध्यात्माचा सुद्धा पाया आहे. पतिव्रता हे बिरुद सुंदर आणि युवा स्त्रीच मिरवू शकते त्या प्रमाणे वैराग्य सुद्धा ज्याने राजभोग सोडून दिला त्या बुद्धाला शोभा देते. नाहीतर वृद्धा नारी पतिव्रता ह्याला काहीही अर्थ नाही.

आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो. आज शाकाहाराची सर्वांत मोठी चळवळ अमेरिकेत आहे. बीफ का खाऊ नये ह्यावर जास्त रिसर्च अमेरिका प्रकाशित करते. ध्यान मार्गांचे आणि योगा चे महत्वाचे संशोधक आहे अमेरिकेत आहेत. इतकेच नव्हे धर्मादायी, पर्यावरण, बाल आरोग्य, स्त्री अधिकार, मानव अधिकार, पशु अधिकार ह्या अनेक विषयावर खरोखर मन लावून काम करणाऱ्या मोठ्या संघटना अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि मुक्त समाजांत निर्माण झाल्या (सोव्हिएट मध्ये नाही).

> एक भयानक जग आपल्यासमोर उभे रहाणार आहे

सर्वच पिढ्या असे भाकीत वर्तवत आल्या आहेत आणि काळपुरुषाने त्यांना चुकीचे ठरवले आहे.

कानडाऊ योगेशु's picture

23 Mar 2021 - 9:36 am | कानडाऊ योगेशु

आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो.

१०० % सहमत.
चंदेल राजकाळात झालेली खजुराहो ची शिल्पकला वा अजंठा वेरुळ येथील शिल्पकला ह्याला फार मनुष्यबळ लागले असणार आणि त्याकाळची अर्थव्यवस्था अश्या लोकांचे पालनपोषण करायला सुदृढ होती. किंबहुना ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते.

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 10:00 am | मुक्त विहारि

परकीय आक्रमण नसल्याने, शांतता पण होती ....
------

ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते.

आणि शांतता, हा पण एक महत्वाचा भाग आहे...

चौकटराजा's picture

25 Mar 2021 - 5:35 pm | चौकटराजा

शिल्पकला व स्थापत्यकला कधीपासून काव्य शास्त्र विनोद या सदराखाली येउ लागली बुवा ? इन्डिया गेट ,ताजमहाल हे सारे भव्य आहे ! मग भारत देश संपन्न हे नक्की का ? आता आठवत नाही पण शहाजहान बादशाहला शिव्या घालणारी एक कविता लिहिली गेली आहे ताज बान्धल्यावर म्हणे त्याने कारागिरान्चे हात तोडून टाकले !

चौकटराजा's picture

25 Mar 2021 - 5:16 pm | चौकटराजा

सर्वच पिढ्या असे भाकीत वर्तवत आल्या आहेत आणि काळपुरुषाने त्यांना चुकीचे ठरवले आहे. अशा किती पिढ्याचा अभ्यास तुम्ही केला आहे ?
मी वतरवलेला एक केवळ अन्दाज तो ही आज जे तांत्रिक ज्ञान व लोकसंख्येचे स्वरूप यावर आधारित आहे ! तो उलट चुकला तर आनंदच आहे ! तुम्ही मात्र वेळोवेळी कुठल्या पिढीने काय काय वर्तवले व कधी याचा नीट शोध घ्या ! कारण तुमचे विधान घडून गेलेल्या गोष्टीवर आधारित आहे आमचे नाही !

आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो आरे बाप रे लई भारी शोध आहे ! संत ज्ञानेश्वर , तुकाराम सर्व सुबत्ता भोगणारे होते म्हणायचे !पैसे गाठीशी आल्यावर माणसात काव्य बुद्धी एकदम जन्म घेते ? माडगूळ कर आता याचे कसे उत्तर देणार नि रस्त्यावर सामानसह फेकून दिलेले बाबूजी ( सुधीर फडके ) तरी कसे देणार आता ?

जयंत कुलकर्णी's picture

20 Mar 2021 - 12:53 pm | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मी नुकतेच अनुवाद केलेले हे पुस्तक माझ्यामते उपयोगी पडावे...

पैशाचे मानसशास्त्र
गेल्या काही दिवसात एका पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला. हे पुस्तक अनुवाद करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरूणांसाठी. मी वाचत गेलो आणि झपाट्याने त्याचा अनुवादही पूर्ण केला. अनुवाद सोप्यात सोप्या शब्दात करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा अनुवादही तुम्हाला सोपा आणि रंजक वाटेल. असो आता पुस्तकाबद्दल -
श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही.
त्यांनी या पुस्तकात प्रस्तावना आणि वीस प्रकरणात हा विषय मांडून एकप्रकारे आपल्याला मदतच केली आहे. ज्याप्रमाणे वॉल्डन आपल्याला जिवनाची काही रहस्यं उलगडून दाखवते त्याचप्रमाणे हे पुस्तक आपल्याला सध्याच्या काळात पैशाशी कसे वागावे याचे धडे देते आणि ते अत्यंत आवश्यक आहेत. कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय... अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल.
उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो - दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. - तुमची प्रकृती आणि पैसा.
तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे.
वित्त उद्योगात म्हणजे - गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे.
गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे.
काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे.
मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही.
चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का?
याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही.
आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थविज्ञानासारखे (नियम आणि समीकरणे). मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही (भावना आणि त्याच्या अनेक छटा)
आपण काय शिकलो नाही आणि काय शिकायला पाहिजे ते या पुस्तकातून जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल...
आता प्रत्येक प्रकरणात कशावर लिहिले आहे हे पुढच्या लेखात लिहीन पण तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेले असेल आणि मला पुढे लिहावे लागणार नाही. नव्हे, तुम्ही ते वाचावेच असा माझा आग्रह आहे...
- जयंत कुलकर्णी.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 5:40 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2021 - 9:32 pm | प्रकाश घाटपांडे

परिचय खुप आवडला. सध्या माझ्यासाठी महत्वाचा विशय आहे

प्रकाश घाटपांडे's picture

22 Mar 2021 - 12:38 pm | प्रकाश घाटपांडे

आत्ताच पुस्तक अक्षरधारा मधून आणले व वाचायला सुरवात केली आहे

उपयोजक's picture

20 Mar 2021 - 1:30 pm | उपयोजक

फारच छान. वाचलेच पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2021 - 3:09 pm | श्रीगुरुजी

आता श्रीमंत कोणाला म्हणावे?

माझी व्याख्या -

यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 4:26 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

वामन देशमुख's picture

20 Mar 2021 - 4:41 pm | वामन देशमुख

माझी व्याख्या -

यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.

++९

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2021 - 9:50 pm | प्रकाश घाटपांडे

माझी व्याख्या -

यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.>>>> वा क्या बात है|

कंजूस's picture

20 Mar 2021 - 4:52 pm | कंजूस

पण आत्मविश्वास नाय.

तुषार काळभोर's picture

20 Mar 2021 - 6:11 pm | तुषार काळभोर

वाचतोय.

माझी डिग्री मला हाती मिळाली तेंव्हा माझ्या संपूर्ण परिवाराचे नेट वर्थ होते ७५ हजार रुपये. पण माझ्या विशीतच मी स्वतःला श्रीमंत म्हणू शकते इतकी लक्षमी देवीची कृपा झाली. ह्याला सरस्वती देवीची कृपा सुद्धा कारणीभूत होती. म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकते.

१. नशीब प्रचंड प्रमाणात महत्वाचे आहे. पण सर्वच गोष्टी नशिबाने होतात असेही नाही आपले प्रयत्न आवश्यक आहेत.

२. मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा

असल्या पराभूत मानसिकतेला काहीही अर्थ नाही. ह्या सर्व लोकांना अपंगत्व सुद्धा आहे जी मी इथे मांडणार नाही. मराठी लोक विविध क्षेत्रांत योगदान देतात, बौद्धिक तसेच शारीरिक दोन्ही प्रकारची कामे उत्कृष्ट पणे करतात, पुरोगामी आहेत आणि बुरसटलेल्या विचारणा तिलांजली देण्याची क्षमता सुद्धा ह्यांच्यात आहे. मराठी माणसाने टिळक निर्माण केले तसे आगरकर सुद्धा केले. कान्होजी आंग्रे केले आणि शिवाजी सुद्धा केले. ब्राम्हण पेशवे केले तसेच आंबेडकर प्रमाणे दलित सुद्धा केले. ह्या विविधतेने मराठी माणसाने अमुकच एका क्षेत्राला बळकावले असे दिसत नसले तरी प्रत्येक क्षेत्रांत मराठी माणसाने जबरदस्त ठसा उमटवला आहे.

यशस्वी होण्याची काहीही युक्ती नाही. आणि मराठी माणसाने मोठे ध्येय ठेवले पंगुसिमा लोकांना आदर्श मानू नये.

महाराष्ट्र राज्याचे किमान ४ तुकडे केले तरी राज्याची प्रगती वेगाने होईल.

३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?

लोक जितके जास्त तितकी समृद्धी जास्त. त्याशिवाय भौगोलिक स्थान आणि हवामान सुद्धा महत्त्वाचे आहे. सर्वाधिक संपत्ती उच्च मूल्याच्या वस्तुंनी निर्माण होते (गाड्या, कम्प्युटर चिप्स, सॉफ्टवेर, इत्यादी) अश्या गोष्टींचे शोध आणि काम फक्त शहरांत होऊ शकते कारण शेकडो प्रकारच्या लोकांची मेहनत त्यांत जाते. (आमच्या पूर्वजांनी सुद्धा हे ओळखले होते आणि गावाच्या संपन्नतेसाठी १८ पगड जाती हव्यात हे त्यांनी हेरले होते. आता समृद्धी साठी १८,००० प्रकारच्या लोकांची गरज भासते हि गरज फक्त शहरे पुरवी शकतात)

४. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे.

असल्या याद्या बनवून फायदा नाही. कारण त्यांत व्यक्तीची प्रतिभा सुद्धा पाहायला पाहिजे. एक चांगला प्लम्बर मुंबईत एका सुमार दर्जाच्या IT वाल्या पेक्षा कित्येक पटीने जास्त कमावू शकतो.

-- माझी टीप

तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणूक करायला शिका. गुंतवणूक हि क्षमता, माणसे, बाजार आणि संपत्ती तीन प्रकारची असते. सगळी कडे चक्रवाढ दर हि संकल्पना समजून घ्या. ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.

मुक्त विहारि's picture

21 Mar 2021 - 10:38 am | मुक्त विहारि

नक्की लिहा...

काही वेळा, तुमचे विचार पटत जरी नसले तरी, माझेच विचार पारखून घ्यायला मदत होते... वैचारिक मतभेद असणे, हे लोकशाहीचे महत्वाचे लक्षण आहे...आणि हे आपण दोघेही जाणतो...

मराठी माणूस व्यापारात मागे असला तरी सामाजिक स्थित्यंतरांमधे ठसा उमटवत होता,उमटवत आहे हे मान्य आहे आणि त्याचा अभिमानही आहे. सर्वांना सर्व जमणे शक्य नाही हे ही खरे पण "सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ति" हे ही तितकेच खरे आहे. अगदी कर्तुत्ववान पेशव्यांनाही राज्यशकट हाकण्यासाठी बर्‍याचदा कर्ज घ्यावे लागले होते.

ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.

खरंच लिहा. मागेही हेच म्हणालो होतो. _/\_

उपयोजक's picture

23 Mar 2021 - 7:51 am | उपयोजक

१. नशीब प्रचंड प्रमाणात महत्वाचे आहे.

भरपूर कष्ट करायची एखाद्याची तयारी आहे पण नशीब साथ देत नाहीये असे असेल तर श्रीमंत होण्याचा विचार सोडून द्यावा का? की अजून काही उपाय करता येतील? कारण बर्‍याचदा आपण पेपरात वाचतो की झोपडपट्टीत राहणारी मुलगी बनली पोलिस अधिकारी, चहाची गाडी चालवणार्‍याचा मुलगा १०/१२ वीच्या गुणवत्ता यादीत किंवा एकंदरीत गरीबाच्या मुलाने मिळवलेले घवघवीत यश. पण ही उदाहरणे अपवादात्मक असतात. झोपडपट्टीत राहणार्‍या सर्वांनाच संघर्ष पाचवीला पुजलेला असतो. त्यातले बरेचसे कष्टाळूही असतात तरीही हजारात एखादाच तसे घवघवीत यश मिळवतो , आपली आर्थिक स्थिती बदलवून टाकतो. आता यात नशीबाचा सहभाग खूप मोठा असेल तर कष्टाला तसे फारसे महत्व नाहीच की!

> पण ही उदाहरणे अपवादात्मक असतात.

अजिबात नाही. आमच्यातील प्रत्येक परिवार काही पिढी मागे अत्यंत गरीब होता. अगदी टाटा पासून अंबानी पर्यंत कोणीही इथे अपवाद नाही. झोपडपट्टीतील लोक सुद्धा ३-४ पिढ्यांत तेथून बाहेर येतात. चहावाल्याचा मुलगा श्रीमंत झाला हे सांख्यिकी दृष्टया खूप दुर्मिळ वाटले तर प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा गरीब होते हा नियम मात्र जवळ जवळ सर्वत्र लागू पाडतो. ज्या समाजांत आर्थिक स्वातंत्र्य जास्त तिथे हि प्रगती आणखीन वेगाने होते तर जिथे आर्थिक स्वातंत्र्य कमी तिथे हि प्रगती हळू होते त्यामुळे भारत त्यामानाने बराच गरीब आहे.

> भरपूर कष्ट करायची एखाद्याची तयारी आहे पण नशीब साथ देत नाहीये असे असेल तर श्रीमंत होण्याचा विचार सोडून द्यावा का?

माझ्या मते भगवान श्रीकृष्ण ह्यांची गीता शेवटी हेच सांगते. कर्म करावे, फळाची अपेक्षा करू नये. कर्मयोग म्हणजे आपण पाऊल उचलत राहावे, शेवटी गंतव्य स्थानावर पोचावे कि नाही हि श्री ची इच्छा. खूप कष्ट केले म्हणून श्रीमंत होणार असे नाही, आणि श्रीमंत झाले म्हणून ते उपभोगता येते असेही नाही. अवघ्या टिशींत किडनी फेल किंवा अपघात होऊन मेलेले लोक पहिले आहेत. त्यांना पहिले कि मला दोन वेळचे खायला मिळते हेच मोठे भाग्य वाटते.

त्यामुळे जे काही आहे त्यासाठी भगवंताचे आभार मानावेत आणि कष्ट करत राहावे.

गवि's picture

23 Mar 2021 - 4:17 pm | गवि

प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा गरीब होते हा नियम मात्र जवळ जवळ सर्वत्र लागू पाडतो.

व्युत्क्रमही तितकाच लागू.

गरीब व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा खूप श्रीमंत (अर्थात बहुधा जमीनदार, जहागीरदार, सावकार इ इ) होते

हा नियमही जवळ जवळ सर्वत्र लागू पडत असावा अशी शंका येते..

फुकट मिळालेल्याची पुढील पिढीला किंमत असण्याची शक्यता कमीच.

हे एक फिरते चाक, टर्निंग व्हील आहे असे वाटते.

Bhakti's picture

21 Mar 2021 - 10:24 am | Bhakti

गुंतवणूक हि क्षमता, माणसे, बाजार आणि संपत्ती तीन प्रकारची असते.
सगळी कडे चक्रवाढ दर हि संकल्पना समजून घ्या. ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.


नक्की लिहा

.

चौकटराजा's picture

22 Mar 2021 - 6:20 am | चौकटराजा

की कोणतीही गुंतवणूक ही सदा सर्वदा फायदेशीर असतेच असेही नाही ! वाढत्या लोकसंख्येला आळा एकाएकी बसणार नाही सबब त्यातल्या त्यात फायदेशीर गुंतवणूक जमीन ही असेल पण कधीतरी तो आळा बसणारच !

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2021 - 10:03 pm | प्रकाश घाटपांडे

लहानपणी मला ज्याच्याकडे जास्त पैसा तो जास्त सुखी असे वाटत असे

Rajesh188's picture

21 Mar 2021 - 10:36 pm | Rajesh188

श्रीमंती ही स्थलकाल सापेक्ष आहे.मुंबई ,न्यूयॉर्क,आणि खेडेगावातील श्रीमंत व्यक्ती चे मोजमाप वेगळे असते.
फक्त व्यक्ती पुरताच विचार केला तर सर्व गरजा आरामात भागतील एवढे धन असेल तर तो श्रीमंत आणि सुखी च माणूस असतो.
गरजा व्यवस्थित भागात असून अजुन पैसे जमा करण्याचा हेतू हा फक्त आपले अधिकार गाजवण्याची जी प्राण्याची नैसर्गिक वृत्ती आहे त्याच्या शी निगडित आहे.
अधिकार हे बुध्दी नी गाजवता येतात , सत्ता असेल तर गाजवता येतात आणि मनगटात ताकत असेल तरी गाजवता येतात.
त्या मधून biproduct म्हणून रोजगार निर्माण होतात ही गोष्ट वेगळी आहे.
लोकांना रोजगार मिळावा म्हणून खूप पैसे कमावण्याचा हेतू ह्या जगात कोणाचाच नसतो.
१०० sq feet च्या bedroom मध्ये झोपेचे मिळणारे सुख आणि करोडो रुपये खर्च करून सजावट केलेल्या ५०० sq feet bedroom
मध्ये मिळणारेे झोपेचे सुख एक सारखेच असते त्या मध्ये काहीच फरक नसतो.
सुखाचा चा उपभोग हा शरीराने च घेतला जातो.
मग ते शारीरिक सुख असू ध्या,विविध चविष्ट अन्न ग्रहण करण्याचे सुख असू ध्या.सुखाची जाणीव शरीर च करून देते.
त्या मुळे आरोग्य आणि उत्तम शरीर हीच खरी संपत्ती आहे .
शरीर रोगिट असेल तर त्या व्यक्ती कडे किती ही पैसे असले तरी तो सुखाचा उपभोग घेवू शकतं नाहीं
पहिला माणूस जंगलात भटकत होता तेव्हा एका जागेवर स्थिर होण्यात च त्याला सुख वाटत होते
स्थिर जीवन आणि आधुनिक साधनांचा वापर करण्याचे सुख घेणारी ज्यांचे वय आता ५० च्या आसपास आहे ती जगातील शेवटची पिढी असेल.
आता आयुष्भर अस्थिर जीवन ,आयुष्यभर संघर्ष करण्यात च माणसाचा वेळ जाईल.
तंत्र सारखे बदलत असल्या मुळे टिकून राहायचे असेल तर आयुष्भर नवीन स्किल प्राप्त करण्या शिवाय पर्याय नाही आणि ती धडपड फक्त टिकून राहण्यासाठी करायची आहे आवड म्हणून नाही.
परत माणसाचे जीवन १००० वर्ष पाठीमागे जात आहे.
कशाचीच शास्वती नाही आयुष्भर अस्तित्वात राहण्यासाठी संघर्ष ( माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याची हीच स्थिती होती)
आमची पिढी ही मानवाच्या इतिहासातील सर्वात सुखी पिढी म्हणून ओळखली जाईल.

याला मी एक आणखी गोष्ट जोडेन जी सर्वात महत्वाची आहे ती म्हनजे उत्तम सन्तुलित मन ! मी मागे पुरुषत्व यावर एक लेख वाचला होता .त्यात दाढी, मिशा, लिंग म्हणजे खरे पुरुषत्व नव्हे तर मी पुरूष आहे असे वाटणे हे खरे पुरुषत्व आहे व त्याचे बाह्य व्यवछेदक लक्षण म्हणजे स्त्री विषयी आकर्षण साधारणपणे वयात आल्यानन्तर हयात भर वाटणे असे लेखकाने प्रतिपादित केले होते. श्रीमन्तीचे असेच काही असते " मी श्रीमन्त आहे असे मला वाटले पाहिजे " हे श्रीमन्तीचे प्रमुख लक्षण आहे ! त्याचे दिसेल असे रूप म्हणजे सत्ता ,आरोग्य व स्वातन्त्र यान्चा त्रिवेणी संगम ( यात पैसा कुठे आला ... तर नक्कीच आला कारण काही प्रमाणात या तिन्ही गोष्टी साठी पैसा लागतो ). पण पैसा हे साधन न रहाता साध्य झाले की या तिन्हीचा संकोच झालाच म्हणून समजा !

चौकस२१२'s picture

22 Mar 2021 - 6:01 am | चौकस२१२


त्या मुळे आरोग्य आणि उत्तम शरीर हीच खरी संपत्ती आहे .

१००% खरे आहे , आटोक्यात सर्व करावे , हे हि खरे पण हे हि खरे कि "पैशाने जरी सर्व प्रश्न सुटत नसले तरी बऱ्याच गोष्टी सोप्या करण्यात / शक्य करण्यात मदत हि निशिच्त होते ..
माझे मन मारे उदार असेल पण गरजूंना मदतीला माझ्याकडे आधी पैसा हवा ना .!. उगाच साधुत्वाचे सोंग पांघरून नाही करता येणार अशी सेवा
परंतु एकूण भारतीय मनस्थितीत अनेकदा असे दिसते कि पैसे मिळवणे म्हणजे वाईट...
अरे पण दोन टोके कशाला...सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न का करू नये..तो गाठणं अवघड आहे हे मात्र खरे

सोत्रि's picture

22 Mar 2021 - 10:15 am | सोत्रि

आमची पिढी ही मानवाच्या इतिहासातील सर्वात सुखी पिढी म्हणून ओळखली जाईल.

एवढं वगळता बाकी सर्व प्रतिसादाशी सहमत!

- (सुखी माणसाचा सदरा शोधणारा) सोकाजी

चौकटराजा's picture

22 Mar 2021 - 12:05 pm | चौकटराजा

ज्या शी तुम्ही सहमत नाही तेच परम सत्य आहे !!! १९५३ साली जन्माला आल्यामुळे मी हे अनुभवले आहे !! खरे तर त्यापेक्षाही आता जे साधारण पणे ८० ते ८५ वर्षे वयाचे आहेत ते अधिक भाग्यवान !

कमनशिबी कशी? कृपया उलगडून सांगा.

Rajesh188's picture

22 Mar 2021 - 4:09 pm | Rajesh188

१) वयाच्या १२ ते पंधरा वर्षा पर्यंत
शिक्षण हे हसत खेळत होते
. आता वयाच्या चार वर्षा पासून शाळा आणि अभ्यास ह्या साठी दबाव
बालपण कोमोजून जात.
२) मैदानी खेळ,व्यायाम,गिर्या रोहन ह्या वर लहान वयात पूर्ण लक्ष आणि मोकळीक.
३) शाळा ही शिक्षण घेण्यासाठी होती फक्त जास्त मार्क मिळावे म्हणून नव्हती.
मार्क हे हुशार असण्याचे प्रमाणपत्र नव्हते तर..
बाकी activity आणि विषयातील सखोल
ज्ञान हेच त्याचे प्रमाण पत्र होते.
आता गाईड,जे परीक्षेत येईल तेवढाच अभ्यास आणि त्या वर मिळणारे भरघोस मार्क हे हुशार असण्याचे प्रमाण पत्र आहे..
पण सखोल अभ्यास त्या विषयात नसतो.
४) नोकरी ही सरकारी असेल तर कायम स्वरुपी.
खासगी असेल तरी कायम स्वरुपी.
तंत्र सारखे बदलत नसल्या मुळे पूर्ण नोकरीत तुम्ही सुरक्षित.

५) एकत्रित कुटुंब पद्धत असल्या मुळे घरात खूप माणसं ,एकटेपणा जाणवत नव्हता
वरिष्ठ नागरिकांची सेवा करण्यास खूप लोक असायची
नातू,मुल,सूना घरातच असायच्या.
एकटेपणा जाणवत नव्हता.
आता नवरा ,बायको,एक मुलगा.
आत्ताची पिढी व्यक्ती स्वतंत्र ला महत्व देणारी .
त्या मुळे सर्व च वयातील लोकांना एकटेपणा आणि नैराश्य ह्यांनी ग्रासले आहे.
आमच्या पिढीत लोकांनी रॉकेल चे दिवे पण बघितले आहेत आणि अती आधुनिक विजेचे दिवे पण बघितले.
बैलगाडी पण आम्ही चालवली आणि अतिशय आधुनिक अशी मर्सिडीज पण आम्ही चालवली.
आयुष्यात खूप मोठा संघर्ष कधीच करावा लागला नाही .
आता वय वर्ष दोन पासून संघर्ष नशिबात येतो.
बालपण हरवून जाते.
तारुण्य चुकीच्या सवयी मध्ये जाते.
आणि म्हातारपण केविलवाणे जाते.

चौकटराजा's picture

22 Mar 2021 - 5:12 pm | चौकटराजा

१९५० च्या सुमारास जन्माला आलेली पिढी मानवी इतिहासातील सर्वात भाग्यवान पिढी असे मीच मागे एका धाग्यावर मिपात लिहिले होते. आता असे पहा तो धागा राजेश१८८ यानी पाहिल्याची शक्यता मला कमी वाटते तरीही त्यानी अगदी त्याच शब्दात या पिढीच्या भाग्याचे वर्णन केले आहे.

दुसरे असे की असे जर म्हटले की आजची पिढी कम नशीबवान आहे असे प्रत्येकच पिढी म्हणते तर आमच्या पूर्वीच्या पिढीचा आमच्या कमनशीबाचा मुद्दा काय असे माहीताय ? ते म्हणत "लेकानो तुम्ही नशीबाने जरा कमीच आमच्या वेळी काय नीरसे दूध असे कासंडी तोंडाला लावून प्यायचे आम्ही ! ( काय भारी निकष आहे नाही ? )

तिसरे असे म्हणायचे की आमच्या पिढीपेक्षा आमच्या मागची पिढीच कमी नशीबवान असे परंपरागत चालत आले आहे असे मानायचे झाले तर माझ्या प्रतिसादात माझ्या मागची ( म्हण्जे आज जे ८० ते ८५ आहेत ) त्यान्ची पिढी अधिक भाग्यवान असे मी म्हटले आहे .

याचा अर्थ हे नशीब वगरे पिढी पिढीच्या उतरण्डीवर अवलंबून नसून ते सर्व साधारण सुखाची सर्वांगीण पातळी यावर अवलम्बून आहे ! शिवाजी महाराजांचे काळातील वा सम्राट अशोकाचे काळातील पिढी आमच्या वा आमच्या मागच्या पिढीपेक्षा भाग्यवान होती असे कधीच म्हणता येणार नाही !

उपयोजक's picture

22 Mar 2021 - 7:46 pm | उपयोजक

१) म्हणजे तांत्रिक प्रगती जसजशी वाढत गेली तसतसा तणाव वाढत गेला असे म्हणावे का?
२) आजची पिढी आजच्या काळात जन्मल्याने कमनशिबी असली तरी ती आजच्या काळात जन्माला आली यात त्यांचा काय दोष? त्यांनी यातून सुटका कशी करुन घ्यावी? हीबतांत्रिक प्रगती प्रामुख्याने पाश्चात्त्यांची देणगी आहे.त्या पाश्चात्यांचे प्रबोधन करावे का? त्यांना प्रगतीचा वेग जरा धीमा करायला सांगावा का?

प्रगती चा वेग constant असू ध्या त्यासाठी
वेगाने बदल घडवत वेगाने बदल नकोत.
साधी गाडी चालवताना पण constant स्पीड ठेवले तर इंधन बचत तर होतेच पण इंजिन ला सुद्धा त्रास होत नाही.
ऑटोमेशन मुळे
आर्थिक प्रगती चे फायदे कमीत कमी लोकांना मिळतील .
फक्त उत्पादन वाढून वस्तू स्वस्त होतील असे म्हणायला लॉजिक आहे.
पण इंडस्ट्री वाढ आणि रोजगार वाढ समांतर झाली तर निरोगी अर्थ व्यवस्था निर्माण होईल.
पण फक्त इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक वाढ ,त्या मधून भरमसाठ उत्पादन होत असेल आणि रोजगार निर्मित च होत नसेल तर रोजगानिर्मिती कशी होणार.
बेकरी कमी करणे हाच आता पर्यंत च प्रश्न होता आणि तो प्रश्न निकाली काढण्यासाठी industrialization झाले पाहिजे हा मार्ग होता.
आणि खूप मोठ्या प्रमाणात तो यशस्वी पण झाला.
पण ऑटोमेशन मुळे उत्पादन वाढ नक्कीच होईल पण रोजगाराच्या संध्या कमी होतील असे समजायला जागा आहे.
जगात खूप मोठी जनसंख्या बेरोजगार असेल तर उत्पादन वाढ कोणासाठी.
यंत्राचा वापर केला की कमी वेळात काम पूर्ण होते आणि कामगार लागत नाहीत .
पण लवकर काम पूर्ण करून कुठली स्पर्धा jinkayachi आहे.

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 7:39 am | मुक्त विहारि

एकदा एक शेतकरी, बोअरवेल खणण्यासाठी, मशीन आणतो.

सरपंच म्हणतो, ह्या मशीनच्या वापरामुळे, गावातील कामगारांचा रोजगार बुडाला. माझ्याकडे मजूर आहेत, ते कुदळ आणि फावडे वापरून, विहीर खणून देतील....

गावातच रहायचे असल्याने, शेतकरी माणसाने, कुठला पर्याय निवडायचा?

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 8:16 am | चौकस२१२

अवघड आहे हा प्रश्न सोडवणं .. याला झटपट समाधानी उत्तर नाही...
एक उत्तर म्हणजे:
मशीन वापरलं तर तुमची विहीर लवकर खणून होईल , लवकर पाणी मिळेल त्यावर तुमचा शेतीचा "व्यवसाय " चांगला होईल आणि मग तो भाजी काढायला किंवा शेतीतील इतर कामाला तुम्हाला मजूर लागतीलच कदाचित काम एवढे होईल कि २ पाल्यात काम चालेल आणि तीच गावातील माणसे तुस्तही कमल ठेवत येतील... त्यातील दोन माणसे काचचित शेतीमाल बाजारी नेण्यास तुम्हाला लागतील.... असा विकास होऊ शकतो.. पण जर सर्वच जण जर असून बसलं कि आम्ही हातांनीच करणार तर अवघड आहे

अजून एक उदाहरण माल चढ उतरवण्यास पॅलेट आणि फोर्कलिफ्ट कारखान्यात किंवा शेतीचं ठिकाणी पण वापरणे.. कराल तर मजुरी कामे कमी ना कराल तर उद्योग हळू हळू चालणार ,
मग असं कुठेतरी मधय गाठलेच पाहिजे कि

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 9:05 am | मुक्त विहारि

सरपंच ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाच्या आमदाराची ओळख काढायची... आणि सरपंचाला बरोबर घेऊन जायचे...

दुसरा मार्ग असा आहे की, तडजोड करायची... पण, तडजोड एकदा केली की, सतत करावी लागते...

तिसरा मार्ग सगळ्यात सोपा आणि आर्थिक दृष्टीने फायदेशीर, बाबा महाराज यांचे मंदिर स्थापन करणे....

शहरातील नियम, गावांत चालत नाहीत... शहरांत तुम्ही लपूनछपून कामे करू शकता, गावांत काहीच लपून रहात नाही..गावातील, लोकांना, तुम्ही "कुणीतरी" आहात, हे सतत दाखवावे लागते...

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 9:07 am | मुक्त विहारि

मशीन शिवाय पर्याय नाही ...

कपिलमुनी's picture

25 Mar 2021 - 3:43 pm | कपिलमुनी

बोअर आणि विहीर यातला फरक सरपंचाला माहिती नाही की शेतकऱ्याला ?
बोअरच्या बजेट मध्ये कोणता माणूस विहीर खणून देईल ?

चौकटराजा's picture

23 Mar 2021 - 2:34 pm | चौकटराजा

मी जिथे कामाला होतो तिथे एखादे व्हाउचर नॅरेशन सकट प्रिंट होऊन येत असे. नेहमी लागणारी अनेक नॅरेशन कोडीफाईड करून ठेवली होती. ही गोष्ट १९९५ च्या दरम्यानची असेल . आजही राष्ट्रीकृत बँकेत व्हाउचर हाताने लिहिले जाते. कारण खाजगी नोकरीत नव नवे प्रयोग करून नोकर वर्ग कमी कसा होईल हे पाहावे लागते .सरकारी नोकरीत मुद्दाम होऊन अप्रगत राहून नोकर्या टिकवाव्या लागतात !

जसजसे सरकारीकारण कमी होत जाईल तसतसा रोजगार कमी होत जाईल .माझ्यासारखे " कॉस्ट " वाले असतील तर रोजगार तीव्रतेने कमी होत जाईल . अशा रीतीने तणाव वाढत जाईल यात शंका नाही !

तुमच्या दुसर्या प्रष्णांचे उत्तर असे की आज कोणत्याही तरुणाला एक लाख पगार असला तरी त्याचे महिन्याचे सेव्हिंग ५०००० इतके असले पाहिजे कारण त्याला नोकरीवरून कधी हाकलतील याचा पत्ता याचा पत्ता नाही ! ( नारायण मूर्तीच्या भाषेत नो बडी नोज व्हेन युवर कंपनी स्टॉप्स लविन्ग यू ) कर्ज चोरीचा धंदा करायचा म्हटला तरी मिळेल ! पण अमेरिकन लोकांसारखे या कर्ज नावाच्या सापळयात अडकून आपली जीवनशैली उगीच चंगळ बाजींची करू नये ! शक्यतो एकाच मुलाला जन्म देऊन त्याचे मनापासून पालनपोषण करावे मुलगी झाली तरी !

आजच्या पिढीला अनेक संकटांचा सामना करावयाचा आहे त्यात उपभोगाच्या सांधनांनी मिळणारे अतिरिक्त फायदे वाचवून किती वाचवणार ?

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 2:39 pm | मुक्त विहारि

आर्थिक षडरिपू आणि इतरही अनेक आर्थिक रिपू, जितके टाळता येतील, तितके टाळणेच उत्तम...

सुबोध खरे's picture

25 Mar 2021 - 12:02 pm | सुबोध खरे

१९५० च्या सुमारास जन्माला आलेली पिढी मानवी इतिहासातील सर्वात भाग्यवान पिढी

अजिबात नाही.

१९७० पर्यंत लोकांकडे गॅसच काय रॉकेल पण नसे. रेशन च्या लांब रांगेत उभे राहून तांबडा गहू विकत मिळत असे.

लोक डालडा खात असत तूप म्हणून. दुधासाठी कार्ड काढायचं पहाटे उठून मैलभर रांगेत उभं राहून टोन्ड दूध विकत घ्यायचं. घरात लग्न असलं तर चार महिने अगोदरपासून काटकसर करून साखर वाचवून ठेवायची. ( ( सामना चित्रपटातील कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हां सांगेल काय हे गाणं पहा)

कोकणात जायचे असेल तर मुंबई सेंट्रल स्थानकात आदल्या दिवशी रात्री रांग लावून झोपायचं. कोकणात पोचल्यावर पहिल्याच दिवशी परतीच्या आरक्षणाची झकाझकी करायची.

घरी फोन येण्यासाठी १५ वर्षे थांबायला लागत असे. मुंबईतल्या मुंबईत फोन न लागणे रॉंग नंबर जाणे हे सर्रास असे.

१९८४ साली माझा एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाचा निकाल आईवडिलांना कळवण्यासाठी पुण्यातून ट्रँक कॉल बुक केला होता ६ तास होऊनही मुंबईत कॉल लागला नाही. शेवटी ९ वाजता केंद्रीय तारघर बंद झालं.

बहुसंख्य गावातुन नजीकच्या रस्त्यापर्यंत डोलीत घालून रुग्णाला आणायला लागायचं. वैद्यकीय उपचार जेमतेमच होते.

रेल्वेच्या पुढच्या प्रवासाचे बुकिंग करण्यासाठी पुढच्या स्थानकावर पत्र/ तर पाठवायचे. ते पोचले नाही तर आडवळणी स्थानकावर बायकामुलांसकट लटकत बसावे लागत असे.

चाळीतच ओलावा होता सारखा दांभिकपणा दुसरा नसेल. नवरा बायकोला सुद्धा खाजगी बोलायची चोरी होती. सेक्स म्हणजे अंधारात कसं तर आटपून घेण्याची गोष्ट होती. दीड खोलीत पाच मुलं आईवडील आजी आजोबा रहात असतील तर अजून काय होणार?

उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.

१०० पैकी १०० लोक चाळीतून फ्लॅट मध्ये गेले. एक तरी उदाहरण आहे का गंगा उलटी वाहिल्याचं?

एक तरी मुलगी आनंदाने एकत्र कुटुंबात जायला तयार आहे का?

संतती नियमन न करता ८-१० पोरं काढून त्यातील अर्ध्या मुलांची जबाबदारी मोठ्या भावंडांवर टाकणारा काळ चांगला कसा असेल?

गेलेल्या काळापेक्षा येणारा काळ चांगलाचा असणार आहे आणि तो नसला तर ती चूक जुन्या पिढीचीच आहे.

उपयोजक's picture

25 Mar 2021 - 12:20 pm | उपयोजक

उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.

सहमत. +११११११११११११११११११११११११

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Mar 2021 - 12:31 pm | चंद्रसूर्यकुमार

उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.

१००% सहमत. उगीच जुन्या काळाविषयी नोस्टाल्जियाचे गळे काढण्यात काही अर्थ नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Mar 2021 - 12:31 pm | प्रकाश घाटपांडे

उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.

सहमत आहे

आग्या१९९०'s picture

25 Mar 2021 - 12:44 pm | आग्या१९९०

अगदी खरंय.
सार्वजनिक स्वच्छतागृह आठवणही नको. घरात गुळाचा डबा लपवून ठेवत.

म्हणजे 1970 नंतर चा ज्यांचा जन्म आहेत ते.
माझा जन्म 1975 चा आहे आणि मी माझे अनुभव वरून ती पिढी भाग्यवान होती असे मत व्यक्त केले होते.
माझे बालपण गावी च गेले खरे म्हणतात तशी 8 मुल तेव्हा कोणालाच नव्हती एकदा अपवाद असू शकेल.
चार मुल सरासरी त्या वेळी असायची.
माझ्या लहानपण पासून गावात वीज होती.वीज नव्हती तो काळ मी बघितलेला नाही .
गावात 10 पर्यंत मराठी शाळा आणि तीन किलोमीटर वर कॉलेज अगदी graduation पर्यंत.
गावात st ची सोय , जवळ जवळ प्रतेक घरात आड ( आड म्हणजे लहान विहीर चार पाच फूट व्यास असलेली) त्याचे पाणी वापरले जायचे.
पिण्यासाठी आणि बाकी घरगुती वापरा साठी.
पाण्यासाठी वण वण हा प्रकार नव्हता.
शेती साठी धरणातून आलेला कालवा होता.
बाकी विहारी चे पाणी असायचेच.
आता पेक्षा जास्त आणि वेळेवर पावूस असायचाच.
योग्य भोगलिक ठिकाणी गाव असल्या मुळे पाण्याचा दुष्काळ हा प्रकार काही अनुभवलं नाही.
फक्त घरात संडास नव्हती.त्या साठी पूर्ण मोकळे रान आपलेच
तो पण मोठा कार्यक्रम असायचा सर्व मित्र मिळून एकत्र त्या कार्यक्रमासाठी बाहेर पडायचो .
आणि जी जागा आवडेल त्या जागी पार्सल सोडून घरी यायचो.
अन्न,धान्य ह्यांची कमी असायचीच नाही.
ना रासायनिक खत,ना हायब्रीड बियाणे उत्तम दर्जा चे अन्न धान्य,.
प्रतेक घरात पाळीव जनावर ही असायचीच.
बैल, गायी,म्हैस , शेरड्या ह्या असायच्याच.
शाळा म्हणजे अती महत्वाची असली काही भानगड नव्हती.
पण शाळेत शिक्षक मात्र प्रामाणिक पने च शिकवायचे.
पाठांतर,स्पेलिंग ,पाढे, ह्यांचे असायचेच.
त्या मुळे आम्हाला बेरीज वजाबाकी करायला अजुन पण calculator ची गरज लागत नाही.
भाषा ही व्याकरण शुध्द च असली पाहिजे ह्या विषयी शिक्षक आग्रही असतं.
त्या मुळे अमेरिकेत सर्वात योग्य आणि व्याकरण शुध्द इंग्लिश मराठी लोक बोलतात असा त्या विषयी केलेल्या सर्वे चा निष्कर्ष होता.
दहावी सहज झाली ती पण first class नी.
विशेष काही लोड न घेता.
आणि सर्व विषयच सखोल अभ्यास करून
फक्त येणाऱ्या प्रश्नाची उत्तरं पाठ करून नाही.
दहावी पर्यंत मनसोक्त मैदानी खेळ ,व्यायम शाळा,जॉगिंग सर्व करून झाले...
दहावी नंतर सहज प्रवेश आता सारखे हाल नव्हते .
१२ वी नंतर मुंबई ,मुंबई मध्ये सहज प्रवेश कॉलेज मध्ये..
Bsc पण आरामात झाली .
आणि पुढे नोकरी पण.
त्या मुळे भयंकर संघर्ष करावा लागला नाही.
सर्व सहज साध्य होत गेले.
त्या मुळे आम्ही सर्वात सुखी असे मी मत व्यक्त केले होते

चौकटराजा's picture

25 Mar 2021 - 5:04 pm | चौकटराजा

फक्त वस्तू च्या खरेदी विक्री वर आधारलेली जीवनशैली स्वीकारली की मग आमची पिढी भाग्यवान आहे असे म्हटले की कुणाकुणाच्या डोक्यात जाते. मग तुम्ही नॉस्टेलज्या नावाच्या रोगाचे पेशंट आहात असे प्रतिपादिले जाते. प्रवास हा अनुभव आहे तो आनंद स्वतः:ची गाडी असली की जसा घेता येतो तसा एस टी च्या गाडीतून देखील कारण चालकाच्या जबाबदारीतून आपण मोकळे होतो . अलीकडे या बाबींकडे लक्ष देऊन काही म्हणू लागलेत " ओला" ने जाऊ !

मी तुमच्या पेक्षा लहान आहे बराच...
पण खेडेगावातील बालपण, जीवन, शेती.. झाडे.. निसर्ग.. मित्र..
वेळ.. निवांत पणा.. भेसळ नसलेले अन्न धान्य मुबलक.. आणि मोठ्यांचा आदर अश्या अनेक बाबतीत जुनी पिढी चांगलीच होती..

प्रत्येकाचे विचार, राहणीमान आणि मत वेगळे वेगळे असु शकते..
तुम्ही म्हणताय. त्यातला मतीत अर्थ बरोबर आहे..

फोन करायला मिळत नव्हता म्हणुन काळ वाईट की फोन मुळे मान दुखते आहे हे वाईट हा हि ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे...

पण शुद्ध हवा... आरोग्य.. Stress कमी असणे ह्या चांगल्या गोष्टी जुन्या पिढी कडे होत्या..

प्रत्येक पिढीला काही तरी खास मिळते.. नविन पिढी हि दुसऱ्या गोष्टीं साठी भाग्यवान आहेच...
पण आपणाला काय वाटते त्यावर आपले मत बनते..
दुसर्यांना तसे नाही वाटले तरी हरकत काहीच नाही...

असो,
मुळ धाग्याच्या उद्देशानुसार मात्र,
नविन पिढी ला नविन कौशल्य दाखवणे , व्यवसाय करणे आणि इतर जास्त सोप्पे हि आहे, आणि बऱ्याचदा गरजेचे हि आहे..
त्यामुळे नविन गोष्टींना सामोरे जाताना आपण कसे गेले पाहिजे काय काय केले पाहिजे हे सुद्धा योग्यच

सुबोध खरे's picture

25 Mar 2021 - 7:55 pm | सुबोध खरे

पण शुद्ध हवा... आरोग्य.. Stress कमी असणे ह्या चांगल्या गोष्टी जुन्या पिढी कडे होत्या..

काय राव विनोद करताय?

आपले जुन्या काळाबद्दल भरपूर गैरसमज आहेत असं दिसतंय .

आरोग्य -- Life expectancy in India is estimated to have gone up from 31 years in 1947

१९७५ साली भारताची आयुर्मयादा ५० होती.

https://www.google.com/search?q=longevity+in+india+in+1975&rlz=1C1CHBD_e...

जी आज जवळ जवळ ७० आहे

शुद्ध हवा -- चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया किती धूर खात होत्या आणि किती मरत होत्या याची सांख्यिकी आपण पाहिलेली नाही.

Over 800 million people in India are affected by indoor air pollution, mainly caused by smoke from burning solid, according to a report by the Global Alliance for Clean Cookstoves.

– About one million deaths occur annually in India due to household air pollution, according to a report by The Lancet Respiratory Medicine Commission.

https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-i...

Stress कमी असणे उत्पन्नाचे साधन नाही, गरिबी, शिक्षण नाही किती तरी बाल मृत्यू अपमृत्यु पाहिलेल्या लोकांना स्ट्रेस नव्हता हे म्हणणे किंवा रोजचं जगणं हे ज्याच्या दृष्टीने युद्धाचा प्रसंग आहे त्यांना स्ट्रेस नाही हे म्हणणे हि त्या माणसांची क्रूर थट्टा आहे.

poverty and stress हे गुगलून पहा. जितके जास्त लोक तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आणलं तितका त्यांच्या आयुष्यातील तणाव कमी होईल

बाकी तुम्ही "स्ट्रेस" म्हणताय हा शहरी श्रीमंत लोकांच्या चोचल्याचा भाग आहे का? आज रोटीवर लावायला अमूल बटरच नव्हतं प्रकारचं.

Rajesh188's picture

25 Mar 2021 - 8:22 pm | Rajesh188

तुम्ही गूगल वर अवलंबून तुमची मतं सांगत आहात मी अनुभव सांगत आहे.
चुलीवर स्वयंपाक म्हणजे धूर च धूर हा पण तुमचा गैर समज च आहे.
चांगली वाळलेली लाकड असतील तर ती जास्त धूर निर्माण करत नाहीत.
फक्त चूल पेतवताना धूर निर्माण होतो एकदा पेटली की कमी प्रमाणात निर्माण होतो.
लोकांच्या गरजा कमी होत्या त्या मुळे जास्त पैसा पण नको होता.
लोकांचे आयुष्य आता वाढलं आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं.
फक्त साथी चे रोग आणि काही बाकी रोग(आता corona aahe तसे,मलेरिया,हगवण )
ह्यांनी माणसं मरत असतं.
उपास मार होवून नाही.
शेती उत्तम उत्पादन देत होती त्या मुले अन्न धान्य ची कमी नव्हती.पैसे फक्त कपडे आणि मीठ,साखर अशा काहीच गोष्टी साठी लागत असत.
तेव्हा पण दुग्ध व्यवसाय, poultry व्यवसाय होतच
अगदी पूर्ण काळातली उदाहरण देत नाही.
केरोसीन रेशन दुकानात मिळत होते च पण खुल्या बाजारात सुद्धा हवं तेवढे मिळत होते.
आता पेक्षा नक्कीच चाळीस पन्नास वर्ष पूर्वी जन्म घेतलेल्या लोकांनी आयुष्य सुखात काढले आहे.
तुम्ही dr झाला तेव्हा तुम्हाला सहज प्रवेश नक्कीच मिळाला असणार .
आणि किती खर्च झाला हो तुम्ही dr होण्यासाठी.
काही हजार च खर्च झाले असतील.
आता pvt मध्ये dr होण्यासाठी करोड खर्च येतो.
पैसे देवून शिक्षण मिळत नाही वस्तू मिळते.
भरपूर पावूस,भरपूर शेती ,आणि भरपूर शेती उत्पादन हे होतेच त्या वेळी.

Rajesh188's picture

25 Mar 2021 - 10:15 pm | Rajesh188

CORONA virus नष्ट होईल इतका भंपक प्रतिसाद तरी माझा नाही.
ज्या भागात जास्त तापमान असेल तिथे covid चा व्हायरस वाढणारा नाही असली बकवास मत तरी मी व्यक्त करत नाही.
तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन delete केला होता.
विसरले की काय.
तुमचे प्रतिसाद चुकीचे आणि ऐकीव माहिती वर आधारित आहे .
३० ते ४० वर्ष पूर्वी खेडे गावात सर्व सुविधा होत्या.
तुम्ही कोणत्या आदिवासी गावात राहत होता तिथे तुम्ही म्हणता तशी स्थिती असेल.

सुबोध खरे's picture

26 Mar 2021 - 9:30 am | सुबोध खरे

थापाडेराव

CORONA virus नष्ट होईल

मी असा प्रतिसाद कधीही दिलेला नाही

उगाच परत थापा मारू नका

बाकी उष्ण प्रदेशात करोना वाढणार नाही हे जागतिक आरोग्य संघटनेने काढलेले अनुमान होते मी नाही आणि माझ्या लेखात मी तसे स्पष्टपणे लिहिलेले होते. अशी पाच अनुमाने चुकीची ठरली आहेत. त्या मी मारलेल्या थापा नव्हत्या.

अर्थात आपल्याला त्याचे विविक्षित विस्मरण होईलच.

https://timesofindia.indiatimes.com/india/covid-19-in-india-five-predict...

तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन delete केला होता. हा लेख काढून टाकण्यासाठी मीच मिपा प्रशासनाला सांगितले होते.

अर्थात त्याचेही आपल्याला बरोबर विस्मरण झाले असेलच.

Rajesh188's picture

26 Mar 2021 - 1:53 pm | Rajesh188

Dr खरे तुम्ही पाहिले एक dr आहात .
आणि भारतीय सशस्त्र दलात तुम्ही कर्तव्यावर होता.
एक तर तुम्ही dr आणि त्याच बरोबर तुमचा अनुभव अती प्रचंड.
तुमची स्वतःची मतं विकसित होण्यास काहीच अडचण नाही.
विविध व्हायरस,जिवाणू ह्यांचा अभ्यासक्रमात अभ्यास झालाच आहे आणि अनुभव पण आहे.
तरी who नी corona विषयी जी मत व्यक्त केली त्या वर तुम्ही बुध्दी न वापरता विश्वास का ठेवला
तुम्हाला स्वतःची बुध्दी नाही का?,
व्हायरस तापमान वाढले की नष्ट होतो हे जगाच्या इतिहासात एकदा पण घडले नाही..
मग तुम्ही who chya पाठी का लपत आहेतं
तुम्हाला स्वतंत्र मेंदू आहे की नाही.
सरळ सरळ तुम्ही त्या धाग्यावर चुकीचे दावे करत होतात
बाकी सभासद तुमची चूक दाखवत होते तरी तुम्ही काही heka सोडत नव्हता .
शेवटी mipa प्रशासन नी धागा च delete केला.
देवाने मेंदू दिला आहे त्याचा वापर करा.
Who नी काही पण बोलू ध्या तुमचा मेंदू वापरा ना.

सुबोध खरे's picture

26 Mar 2021 - 8:59 pm | सुबोध खरे

तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन delete केला होता.

हा लेख काढून टाकण्यासाठी मीच मिपा प्रशासनाला सांगितले होते.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Mar 2021 - 8:23 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी खर आहे. त्या काळातले प्रश्न ही आरोग्याचे होतेच

Rajesh188's picture

25 Mar 2021 - 8:48 pm | Rajesh188

१९७० च्या पुढे चांगले डॉक्टर होते,सरकारी हॉस्पिटल होती, गावात dr ची क्लिनिक होती.
Medical store होती,उत्तम डॉक्टर होते.
साबण पासून कोलगेट पर्यंत,सर्व होते,शाम्पू होते.
खरे साहेब कोणत्या काळातील वर्णन करत आहेत हे त्यांनी एकदा तपासून बघावे.
राजदूत गाडी होती,बजाज च्या स्कूटर होत्या.
सायकल होती,टीव्ही होते.
सर्व काही होते.
आणि ह्या आधुनिक साधना बरोबर .
शुद्ध हवा होती,शुध्द पाणी होते.लोकं सामाजिक भान राखून असायचे .
एकमेकाशी उत्तम संबंध होते.
लोकांकडे वेळ होता एकमेकाशी गप्पा मारण्यासाठी.
त्या वेळी माझ्या गावात चार तालमी होत्या आज एक पण नाही.
तरुण पिढी ला व्यायामाची आवड च नाही.
मैदानात खेळायला मुलांना आवडत नाही.
आम्ही कब्बडी पासून,खो खो पर्यंत बरेच खेळ खेळत असू .
आता खेळ फक्त मोबाईल वर.
प्रतेक नदी प्रदूषित आहे.
हवेच्या प्रदूषण नी सर्वोच्च क्षमता गाठली आहे.
मुंबई मध्ये हवेत किती प्रदूषण असते त्याचे आकडे रोज दिले जातात बघत जा.
साधं kg मध्ये प्रवेश हवा असेल तरी काही हजार लागतात.
आणि शिक्षणाचा दर्जा वाढला आहे असे मत मी तरी व्यक्त करणार नाही.

पूर्वीच्या चांगल्या गोष्टी
१. सरकारी नोकरी आजच्यापेक्षा बरीच सहज मिळायची. पेन्शन होती. सरकारी नोकरीतच काय पण खाजगी नोकरीतही बर्‍यापैकी शाश्वती होती,स्थिरता होती. या आर्थिक स्थिरतेमुळेच तत्कालीन मुलांचे आयुष्य बर्‍यापैकी तणावरहित गेले.
२. तत्कालीन मुलांना आजच्याइतकी करिअरची तीव्र स्पर्धा नव्हती.
३. छोट्या शहरातल्या बहुतांश लोकांना त्यांच्याच शहरात किंवा शहरालगत नोकरी मिळायची. मुंपु गाठावे लागत नव्हते.
४. मुंबई/पुण्यात आजच्याइतकी गर्दी नसल्याने दगदग आणि मानसिक तणाव कमी होता.
५. माणूसकी जास्त होती.
६. स्मार्टफोन वगैरे नसल्याने मुले मैदानात जास्त खेळत. त्यामुळे प्रकृती चांगली रहायची.
७. पूर्वी शाळकरी मुलांना अपवादात्मक चष्मा असायचा.
८. घरे आजच्याइतकी महाग नव्हती.
९. वैद्यकीय क्षेत्रात आजच्याइतकी लूट नव्हती कारण फॅमिली डॉक्टर हा प्रकार अस्तित्वात होता.

आजच्या चांगल्या गोष्टी
१. पूर्वीपेक्षा करिअरचे भरपूर आणि विविध पर्याय उपलब्ध आहेत. आज कलचाचणीद्वारे नेमके करिअर शोधायला मदत मिळते.
२. करमणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध.
३. इंटरनेट सहज,कुठेही उपलब्ध असल्याने क्षणात जगाशी जोडले जातो. काहीजणांच्या नोकर्‍या लॉकडाऊन काळात WFH मुळेच टिकल्या , शिक्षण सुरु राहिले.
४. वेगवान वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध.
५. गुगल आणि युट्यूबमुळे कुठेही,केव्हाही दर्जेदार शिक्षण उपलब्ध होते. काहीवेळा तर शाळा/कॉलेजातल्या मास्तरांपेक्षा दर्जा चांगला असतो.
६. माहिती तंत्रज्ञान उद्योगामुळे खाजगी क्षेत्र असूनही अनेकांना चांगले पैसे मिळाले,परदेश पाहता आला. काहीजण अमेरिका,ब्रिटन,ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशात कायमचे स्थिरावले.

रंगीला रतन's picture

25 Mar 2021 - 5:25 pm | रंगीला रतन

भाषा ही व्याकरण शुध्द च असली पाहिजे ह्या विषयी शिक्षक आग्रही असतं.
हे फारच आवडले :)

चौकस२१२'s picture

22 Mar 2021 - 5:54 am | चौकस२१२

- कमी भांडवल आणि उधार घेणे सोप्पे )
- कोणतेही उत्पादन नाही
- कोणालाही "माझे उत्पादन/ सेवा घे म्हणून मागे लागावे लागत नाही " असा एक वयसाय म्हणजे
आर्थिक "उलाढाल" करण्याचाच व्यवसाय
येथे "उलाढाल" हा शब्द महत्वाचाच गुंतवणूक नव्हे, दोन्हीत फरक आहे हे लक्षात घ्यावे
यात अर्थात आले ते म्हणजे शेअर मार्केट , किंवा विविध डेरीवेटीव्ह म्हणजे फुचर , ऑप्शन , वॉरंट इत्यादी
हे झाले याचे फायदे परंतु यात पडताना "अतिशय " काळजी घेऊन आणि अभ्यास करून मगच उतरावे ... यातील धोके
- यात बहुतेकदा उधारी वर किंवा इंग्रजीत ज्याला लिव्हरेज वर धंदा केला जात असल्यामुळे "गुंतवलेलंय पैशापेक्षा कितीतरी अधिक गमावणायची शक्यता पण असते हे वीरू नये
- यात "टिप्स देणारे" "ग्यारन्टीड प्रॉफिट पद्धत "असले क्लास किंवा काही साफ्टवेर विकणारे लबाड आणि चालू लोकं / कंपन्या तुम्हाला खूप सापडतील... त्यापासून सावध राहा
एक साधं प्रशा असतो जर हे "ट्रेडिंग गुरु" एवढे भारी आहेत तर ती लोक स्वतः टेडिंग करून कमवतात की असले कोर्स विकून जास्त पैसे कमवतात .. बर ते स्वतः ट्रेडिंग करून कमवत असतील तर मग सेबी मध्ये ते परवाना धारक आहेत का? आणि मग एवढे जर चांगले असतील तर सेबी अधिपत्याखाली म्यानेज्ड फंड का नाही चालवत ? असो तो एक वेगळाच विषय आहे

दुसरा एक लांब पाल्याचा आणि जास्त भांडवल लागणार व्यास म्हणजे प्रॉपर्टी / वास्तू मधील गुंतवणूक...आणि खास करून यात पण "एकातून दुसरे " असे वर्षानुवर्षे करून आशयवस्तूंची मालकी जमवणे
थोडक्यात (अर्हताःत हे त्या त्या देशातील आयकर नियमनवर, तेथील व्याज दार, भांड्यातून मिळणारी रक्कम आणि भांड्यवर देणे हे कितीपत बिनधोक्याचे आहे यावर अवलंवून आहे )
उदाहरण:
राहत्या घराशिवाय , गुंतवणुकीचे घर १ घेणे २०% आपले ८०% कर्ज समजा घर १० कोटी CHE
काही वर्षांनी त्याचे पुनर्मूल्य कारेन आणि समजा ते ११ कोटी असले तर ११ कोटीच्या ८०% बँक कर्ज द्यायकेल तयार असते म्हणजे तसे करून ते वरील पैसे त्यातून घेणे आणि ते गुंतवणूक क्रमांक २ चाय घरासाठी जे परत २०% लागतील तयासाठी वापराने ( घर क्रमांक विकायचे नाही )

चौकटराजा's picture

22 Mar 2021 - 6:12 am | चौकटराजा

यांत्रिक तांत्रिक प्रगतीने अनेक रोजगार नष्ट होणार आहेत पण जगातील आस्तिकता , देवाच्या कोपाची भीती , पितरे आपल्याला त्रास देण्याची भीती , ईश्र्वरा विषयी वाटणारी कृतज्ञता , सणवार रूढी यांचे आकर्षण ,देवाचे अस्तित्व मान्य केल्यानंतर स्वामी, महाराज , गुरु माँ ,साध्वी या वर्गाविषयी ओढ ही कायम राहाणार आहे ! सबब
फुलांची शेती
हार करण्याचा व्यवसाय
उदबत्या चे उत्पादन
देवघरे निर्माण करण्याचा व्यवसाय
पौरोहित्य
१३ व्या चा स्वयंपाक
संक्रान्तीचा तिळगूळ
सुगडी तयार करणे
देऊळ व्यवसाय
कीर्तने
पूजा साहित्य निर्मिती
नारळ
देवीसाठी साड्या
दसऱ्याला आपट्याची पाने विक्री
खंडेनवमीला झेंडूची फुले
शिमग्याला लाकडे
रंगपंचमीला रंग

ई व्यवसायांना मरण नाही !!

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 9:36 am | मुक्त विहारि

बाबा महाराज, यांचे प्रार्थना स्थळ तयार करा ... आता देवाला कुणी विचारत नाही...निदान डोंबोलीत तरी हीच परिस्थिति आहे.. फक्त, मारूतीचे मंदिर, आर्थिक फायदा देते, कारण एकच शनी...

व्हिलन जितका तगडा, तितके हिरोचे महात्म्य जास्त, संदर्भ, बॅटमॅन मधल्या जोकरचे वाक्य...

तळमजल्यावरचे घर मात्र हवेच....

साईबाबा, यांचे मंदिर सगळ्यात उत्तम परतावा आणि तो पण पिढ्यानपिढ्या....

देवाच्या मंदिरात चोरी होते पण बाबा महाराज यांच्या मंदिरात चोरी झालेली मी वाचलेली नाही आणि ऐकलेली नाही....

चौकस२१२'s picture

22 Mar 2021 - 6:41 am | चौकस२१२

२५) अभियांत्रिकी किंवा इंटिरियर डिझाईन/ प्रोडक्ट डिझाईन साठी भारताबाहेरून कामे मिळवणे .. ज्यात खालील फायदे दिसतात
- कमी भांडवल, उत्पादन नाही
- निर्यात असली तरी सरकारी कटकट नाही / कमी
- परदेशी चलन मिळण्याहची शक्यता आणि त्याचे काही फायदे
- तुलनेने तशी जास्त चांगला दर मिळू शकतो
- बहुतेकदा दिलेल्या सेवेचे पैसे वेळेवर मिळण्यास सोपे ( भारतातील यात काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांशी बोललो त्यावरून )
- आजकाल लॅपटॉप सुधाच चांगल्या ग्राफिक कार्ड असलेले मिळत असल्यामुळे अशी डिझाईन सॉफ्टवेर त्यावर काम करतात आणि इंटरनेट डेटा स्वस्त आहे तेव्हा कुठूनही काम करता येते

तोटे:
-शिरकाव अवघड आणि प्रतिस्पर्धी ,,,पण जर आपल्याला खास काही गोष्टी येत असतील तर परदेशी उद्योग काम द्यायला राजी असतात
- परदेशातील स्तहनिक नियम जसे कि बांधकाम डिझाईन चे नियम माहिती असणे अवयषयक
- अवेळी काम !

चौकस२१२'s picture

22 Mar 2021 - 6:43 am | चौकस२१२

२६) करोनाच्या काळात आंतरजालावर शिकणे आलेच मग त्यात नृत्य , गायन शिक्षण आले पण तयात अजून एक.. एक मित्र चक्क कीर्तन शिकतोय

एखादी गोष्ट शिकण्याचा चांगला वेग हे सुद्धा श्रीमंतीला पोषक असावं. सध्याच्या काळात सातत्याने शिकत राहणं महत्वाचं. नवीन कौशल्ये,जुनी अपडेट करणे यासाठी शिकण्याचा वेग चांगला हवा. कॉलेजचं शिक्षण सलगपणे पूर्ण केलेल्या उमेदवाराला केटी किंवा एक-दोन इयर डाऊन होऊन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीपेक्षा निश्चितच जास्त संधी उपलब्ध असणार आहेत. सलग पास होत गेलेली व्यक्ती जबाबदारीने वागणारी आहे, अभ्यास झेपतो हे गुण सलग पास होणार्‍या व्यक्तीत दिसून येतात. म्हणून तुम्ही एखादी गोष्ट किती लवकर शिकता यावरही आर्थिक समृद्धी अवलंबून असते.
दुर्दैवाने भारतातले बहुसंख्य अभ्यासक्रम हे डावा मेंदू अधिक वापरणार्‍यांच्या सोयीचे असेच बनवले गेले आहेत. अशा ठिकाणी उजवा मेंदू बर्‍यापैकी वापरणारी मुले मागे पडतात, शिक्षणात काहीवेळा अपयशही येते. अशा मुलांनी उजव्या मेंदूला पोषक अशाच क्षेत्रात जाणे आर्थिक भरभराटीसाठी चांगले.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीचा जॉब लॉकडाऊनमधे गेला. वय ४२. कंपनीच्या बसनेच ये जा. त्यामुळे दुचाकी शिकला नव्हता. आता नवीन जॉब शोधताना सर्व्हिस सेक्टरमधे फिरतीचे जॉब काही ठिकाणी मिळाले पण बाईक येत नाही हे समजल्यावर नकार मिळायचा. बाईक शिकतो म्हणून सांगितलं तरी काम देणारे मालकलोक विश्वास ठेवायचे नाहीत. "हे काय वय आहे काय बाईक शिकायचं? पडला बिडलात तर जबाबदार कोण?" म्हणून नको म्हणायचे. शेवटी हा गाडी शिकला. एका उद्योजकाला भर रहदारीच्या रस्त्यातून सफाईदारपणे चालवून दाखवली. मग त्याला नोकरी मिळाली. वय जास्त आहे म्हणून शिकणं जमणार नाही वगैरे गोष्टी आजच्या काळात उमेदवारांनीही सांगू नयेत.शिकण्याची तयारी ठेवावी. यश येईल न येईल तो पुढचा भाग.
शिवाय कोणी शिकण्याची तयारी दाखवली तर काम देणार्‍यानेही थोडा सैल हात सोडावा. अगदीच अविश्वास दाखवू नये किंवा पूर्वग्रहदूषितपणे वागू नये असे वाटते.

श्रीमंती ही व्यक्ती आणि काळ सापेक्ष नाही काय? पैसा कितीही मिळो, त्याने समाधान होणारच नाही. कारण पैसा हे समाधान मिळवण्याचं साधनच नाही मुळात. समाधान त्या पैशाच्या योग्य विनियोगातून कदाचित थोडे बहुत मिळू शकेल. :-)

तसेही पैसा कमावणे एक गोष्ट आणि त्याचा विनियोग करणे वेगळी गोष्ट.
खूप पैसा आहे पण वापरलाच नाही तर त्या व्यक्तीला श्रीमंत म्हणता येईल काय? खूप आलेला पैसा उधळून टाकला तर ती व्यक्ती श्रीमंत म्हणता येईल काय?

पैसा कसा कमवायचा, किती कमवायचा, विनियोग कसा करायचा आणि पुनर्गुंतवणूक कशी करायची ह्या सर्व बाबी निगडीत आहेत. त्यांचा समतोल साधता आला पाहिजे.
बाकी व्यवसाय कोणता निवडायचा त्याचे स्वॉट अ‍ॅनालिसिस करून मग त्यात उतरणे श्रेयस्कर. आणि सोबतच एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊ न देण्याची खबरदारी ठेवणे हिताचे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

23 Mar 2021 - 9:54 am | ॲबसेंट माइंडेड ...

सर्वोत्तम प्रतिसाद.
+१

चौकटराजा's picture

23 Mar 2021 - 10:01 am | चौकटराजा

मी एक ब्रन्डेड टी शर्ट ( अदिदास ) गेले १५ वर्षे वापरीत आहे ! आता त्याचा रंगच विटला त्यामुळे वापर घरातच !
मी वुडलॅंन्ड कंपनीचे सेकंड वाले सँडल्स घेतले ६०० रु ते साडे नऊ वर्षे वापरले
त्यानंतर मी आदिदास कंपनीचे सेकंड वाले सँडल्स घेतले ते गेले साडेसात वर्षे वापरीत आहे ! याबरोबर माझ्याकडे वॉकिंग शू आदिदास सेकंड ९०० त घेतलेले आहेत ते मी गेले ८ वर्षें वापरीत आहे ! वुडलँड चे लेदर शू असेच ऑफर मध्ये १२०० ला घेतलेत.
१९८५ साली फिलिप्स डेक ( ओरिजिनल ) ची म्युसिक सिस्टिम घेतली ती २००५ पर्यंत वापरली !
फ्लोरा फाउंटन ला उत्तम दर्जाच्या बर्म्युडा ८० रु ते मिळतात अगदी कोर्या करकरीत त्याचे कापड कॉडराय डेनिम ई प्रकारचे असते !
इथेच १५० रू ता नवी कोरी पँट १५० ते १८० रु त मिळते . त्याची किंमत इतरांना विचारली तर ती आठशेला तरी असेल असे सांगतात !
२००१ मध्ये यामाहाचा की बोर्ड घेतला तो २०१८ पर्यंत वापरला सध्या कॅशियो चा अरेंजर सिंथेसायझर घेतला आहे !
मी एम ८० ही गाडी १९९५ त घेतली टी २२ वर्षे वापरली पुन्हा नोंदणी सह ! तीच्यावरून जबर फिरलो !
आता प्लेझर ही गाडी वापारित आहे तिनेही भरपूर .फिरतो !
आमच्या सोसायटीत इतरानी जितके पैसे फर्निचरच्या लेबर साठी दिले तेवढ्यात मी योग्य सुतार आठवून पूर्ण फर्निचर ( मटिरिअल सह ) फ्लॅट सजविला आहे ! कोणत्याही इंटेरिअर डेकोरेटर ची मदत ना घेता ! ( जे मिपाकर घरी आलेत त्यांनी तो पाहिला आहे )
कोणतीही चारचाकी घेतलेली नाही ! गरज पडल्यास ओला आहेच !

आयुष्यात कधीही कर्ज घेतले नाही पण बराचसा भारत पाहिला ,युरोपातील तीन देशाना पत्नी सह भेटी दिल्या .सुमारे ३००० चित्रपट मी १९७० पासून पाहिलेत . पुस्तके वाचली ! नाटकात काम देखील केले!
आज माझ्या खर्चापेक्षा माझे सेव्हिंग जास्त आहे !मी कुठल्याही अधिकार पदावर नव्हतो ! ना माझी पत्नी !
तुम्हाला पैसे कसे मिळवावे ,कर्ज कुठून मिळेल हे सांगणारे अनेक भेटतील पण सुज्ञपणे खर्च कसा करावा याचे एकही पुस्तक बाजारात आहे का ... ?
ते पुस्तक माझ्याकडे आहे !
लेखक निराद चौधरी म्हणतात " बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर !! "

आमचे एक गूरू म्हणून गेले आहेत, "अंथरूण पायापेक्षा, मोठेच ठेवा."

Rajesh188's picture

23 Mar 2021 - 10:44 am | Rajesh188

पैसे किती कमावत आहोत हे जसे महत्वाचे आहे त्या पेक्षा जास्त ते पैसे तुम्ही कसे वापरत आहात हे महत्वाचे आहे.
आणि आर्थिक स्थिरता हवी असेल तर पैसे योग्य रिती नी वापरले पाहिजेत.
एकच प्रकारची आणि पगाराची नोकरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती वेग वेगळी असते त्याला हेच कारण आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Mar 2021 - 10:59 am | अनिरुद्ध.वैद्य

!

गणेशा's picture

23 Mar 2021 - 5:17 pm | गणेशा

चौराकाका,

प्रतिसाद आवडला..
बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर !! हे वाक्य लाजवाब...

तरीही काही बाबतीत मी स्वतः असे करत नाही..प्रत्येकाचे वेगळे गणित असते..प्रत्येक माणुस वेगळा..

काटाकासर करणे हे नेहमी चांगले, माझे वडील हि तुम्ही म्हणता तसेच आहेत, अगदी तंतोतंत...

पण जीवन म्हणजे काय? गरज तेथे खर्च आयडीयल असेल, परंतु मला छान राहिला आवडते, माझ्याकडे ऑफिस साठी ३ आणि ट्रेक, running असे सगळे इतर४-५ ब्रँडेड shooes आहेत,
Apache असताना मला बुलेट आवडते तर ती मी घेतली.
फर्निचर मला जास्त आवडत नाही तर ते माझ्याकडे जवळ जवळ कमीच आहे.. पण मला घराचे रंग, त्याचे गेट

माझे ब्रँडेड शर्ट्स आणि गॉगल मला आवडतात..आत्ताच rayban घेतोय या महिन्यात

आणि या सर्वातून जेंव्हा मला वाटते खर्च जास्त होतोय,तेंव्हा मी नविन गोष्टीं शिकतोय, नविन तंत्रज्ञान आत्मसात करतोय, नविन मार्ग शोधतोय..नविन क्लास लावून माझे skills वाढवतोय..

मान्य आहे, शांती, समाधान जास्त महत्वाचे,
पण मला संघर्ष करणे त्याहून जास्त प्रायोरिटीचे वाटते, कदाचीत, या अश्या स्वभावाने माणसाची जास्त प्रगती होत असेल किंवा त्याच्या कडे असणाऱ्या skills जास्त use होऊन जे तो करण्याचे धाडस करणार नसेल ते करु शकत असेल.

आणि मला वाटते, अतिरिक्त खर्च वाचवून नंतर कुठे पैसे spend करायचेत याप्रमाणेच नंतर काय खर्च करायचाय, यावरून आता खर्च करत असताना हि पैसे कसे निर्माण करायचे हे हि तितकेच महत्वाचे..

आणि मला वाटते,
तुमच्याकडे किती पैसे save आहेत यावरून तुम्ही श्रीमंत ठरत नसतात, तर तुम्ही तुमच्यावर, तुमच्या आवडीवर तुमच्या मनाप्रमाणे त्या त्या वेळेस किती पैसे खर्च करू शकता यावर तुमची श्रीमंती ठरते...

म्हणुन मी म्हणू इच्छितो.. (कोणी आधीच म्हणाले असेल तर माहित नाहि)

"जो वर्तमानात खर्च करू शकतो, त्यालाच जगण्याचा अर्थ कळतो.. " - गणेशा

(अवांतर - आपण ऑर्कुट काळात भेटलेलो आहोत काय, तुम्ही चित्र काढता काय? )

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 6:13 pm | मुक्त विहारि

तेंव्हा मी नविन गोष्टीं शिकतोय, नविन तंत्रज्ञान आत्मसात करतोय, नविन मार्ग शोधतोय..नविन क्लास लावून माझे skills वाढवतोय.....

हे आवडले...

चौकटराजा's picture

23 Mar 2021 - 6:27 pm | चौकटराजा

अच्युत गोडबोले म्हणतात " आज नोकरीत टिकून रहायचे असेल तर नवीन काहीतरी शिकावेच लागेल. पण त्यात एक अडचण अशी येऊ शकते की तुम्ही जे शिकत आहात त्यापेक्षा तन्त्रज्ञानाचा बदलण्याचा वेग जास्त असणार आहे ! मी १९८८ मधे कोबोल ही प्रोग्रामिंग भाषा शिकलो . पाच वर्षात ती गैरलागू झाली. मला फायदा इतकाच की सोफ्टवेअर प्रोग्राम म्हणजे काय .. ? इतपत मला कळले.

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 6:38 pm | मुक्त विहारि

पण प्रत्यक्षात आणतोच असे नाही...

उदा. सायकलचे पंक्चर काढता येणारा मनुष्य, पंक्चरचे दुकान टाकेलच असे नाही...

ज्ञानलालसा महत्वाची...

चौकटराजा's picture

23 Mar 2021 - 6:20 pm | चौकटराजा

आकुर्ट काळात भेटलो असू आता काही आठवत नाही . तिथे मूळ नाव आय डी मधे होते. खर्च करण्याच्या धोरणात एक गोष्ट महत्वाची जे खर्च वयानुसार करायला हवेत ते करावेत. उदा. लग्नात थोडे तरी का होईना फोटो काढणे पण करिझ्मा आल्बम ची गरज नाही तो धूळ खात पडून रहात. अलिकडे एकाने लग्नात एथनिक ड्रेस चक्क भाड्याने आणून वेळ मारून नेली .लग्न झाल्यावर हनीमून करणे खर्चिक वाटले तरी करावे ! कारण काट्कसर काळ पुन्हा मागे आणत नाही !

मुळात सर्वात मोठी गोष्ट खर्च करण्यात महत्वाची की आपली चंगळ करण्याची व्याख्या हळू हळू बदलत नेणे .उदा. सुरुवातीच्या काळात पुस्तक ग्रन्थालयातून आणून वाचा नंतर सवलतीत पुस्त्काचे सन्च मिळतात का पहा ! नन्तर जसे जसे पैसे वाढत जातील तसतसे पुस्तक एकेक विकत घेऊन वाचा !

गणेशा's picture

23 Mar 2021 - 6:53 pm | गणेशा

__^__

चौकस२१२'s picture

24 Mar 2021 - 7:07 am | चौकस२१२

अलिकडे एकाने लग्नात एथनिक ड्रेस चक्क भाड्याने आणून वेळ मारून नेली

अहो गंमत म्हणजे
- रोजच्या जीवनात सूट घालण्याची सवय आणि गरज असून सुद्धा लग्नाचे कपडे म्हणून नवरा / नवरी ते १ दिवसापूर्वी भाड्याने घेतात हे सर्रास पाश्चिमात्य देशात असते ...
- रोजच्या जीवनात सूट घालण्याची गरज आणि शक्यता नसून ( ऐपत असली तरी) केवळ लग्नाचाच म्हणून सूट घेण्याची "प्रथा" भारतात आहे ! का कोण जाणे , ३५ ते ४० अंश सेल्सिसाय असलेल्या मुंबई पुण्यात कोण डोंबलाचा सूट घालणार? एक वेळ दिल्ली चंदीगढ ला ठीक आहे .. पण म्हणनात ना गोरा साहेब गेला पण राखाडी साहेब राहिला तो असा! असो सहज विरोधाभास जाणवला म्हणून माहिती म्हणून लिहिले

राघव's picture

23 Mar 2021 - 5:23 pm | राघव

खूप आवडले.

बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर

वाचायला पाहिजे! :-)

मराठी_माणूस's picture

23 Mar 2021 - 11:13 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/mumbai-news/work-of-the-transmission-line-was-h...

अशी कृपा असल्यावर श्रिमंत व्हायला काय वेळ लागतो

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 11:29 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद ....

मराठी_माणूस's picture

1 Apr 2021 - 11:10 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/pune-news/toll-rates-on-pune-satara-highway-inc...

अजुन एक कृपा.
दुसर्‍या एका धाग्यात कौशल्य आणि त्या द्वारे श्रिमंत कसे होता येइल हा विषय होता.
इथे कोणते कौशल्य उपयोगी पडले असेल.

पण आता नवीन स्किल हे तुमच्या आवडीच्या क्षेत्रात आत्मसात करावे लागत नाही तर तुमची आवक चालू राहावी म्हणून जबरदस्ती नी शिकावे लागते.
आणि स्ट्रेस वाढण्याचे हे महत्वाचे कारण आहे.
त्याचाच परिणाम म्हणून तरुणांमध्ये व्यसनं करण्याचे प्रमाण वाढत आहे
दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि रात्री दारू किंवा तस्तम नशेत आनंद शोधायचा प्रयत्न होताना दिसतो.
अगदी मोठमोठे उद्योगपती पण त्याच जीवन शैली मधून जात आहेत.
त्यांना पण भीती २४ तास आहे .
की मी मागे तर पडणार नाही ना
स्पर्धा सर्व स्तरावर आहे.
आपण त्या स्पर्धेत किती सहभाग घ्यायचा हा आपला निर्णय .
स्पर्धेत सहभागी तर होणे हे अटळ आहे पण किती त्याचे प्रमाण आपण ठरवायचे आहे.
माणसाने वयाची पन्नाशी गढली की अंत जवळ आला आहे ह्याची जाणीव होवू लागते.
आणि पाठी वळून बघितले की ५० वर्ष आयुष्य आपण स्वतसाठी जगलोच नाही ह्याची जाणीव होते.
पण वेळ तर निघून गेलेली असते.
जसे वय वाढत जात तसे व्यर्थ च आपण धावत होती ह्याची सल तर टोचत राहतेच.
माणसाने आपले सर्व छंद जोपासले च पाहिजेत. गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.ते गरजेचेच आहे.

हे म्हणण्याआधी तुम्ही तो पुरेसा मिळवला आहे का हे पहा. हे जर खरं असेल तर याचाच व्यत्यास "आधी पुरेसा पैसा मिळवावा मगच पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे" हे तत्वज्ञान मांडावं. सदर धागा हा श्रीमंत होण्यासाठी काय करता येईल याबद्दल आहे. त्यावरुन भरकटून पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे,मन:शांती महत्वाची वगैरे भरपूर पैसे मिळवून झाल्यावर सांगायचे तत्वज्ञान धागाविषयापासून दूर नेते आहे. पैसा मन:शांती घालवत असेल तर गरीबी मन शांत ठेवते का? ठेवत नसेल तर आधी श्रींत होण्याबद्दल बोलुयात. :)

चौकटराजा's picture

24 Mar 2021 - 6:25 am | चौकटराजा

या पुरेसा शब्दातच गोची आहे ! मी डोळसपणे आजूबाजूच्या लोकांना पाहात असतो. फारसा पैसा नसतानाही नवरा बायकोत वाद नाही . मुलांवर प्रेम आहे ,बायकोने आपले घर लक्ख ठेवले आहे,,पैसा नाही सबब इतर धनिक पुरूषाचे आकर्षण आहे असे नाही असे निम्न अर्थिक स्तरातले संसार मी आजूबाजूला आजही पहात आहे ! म्हणूनच म्हटले " मला मी श्रीमन्त आहे असे वाटले पाहिजे " ही श्रीमन्तीतील मुख्य पायरी आहे.

मी आजही माझ्या कुटुम्बाला रोज हसत ठेवत असतो. माझी धाकटी मुलगी म्हणते बाबा ही आपली खरी श्रीमन्ती आहे. ते ती बाहेरून विकत आणलेली कछ्ही धाबेली खात म्हणत असते. यात दोन गोष्टी आल्या ! आवडती वस्तू रेडीमेड आणल्याची लाईफ स्टाएलही झाली व मौजमजा करीत ती खाण्याचा मोफत आनन्द ही लुटता आला. वस्तू च्या उपभोगाची कल्पना लाईफ स्टाईल शी आज जोडली जाते हे अमेरिकन " बाजार " आधारित संस्क्रुतीचे बाळ आहे. मग दागिने, कपडे, गाडी, फ्लॅट, उन्ची सेन्टस, महागडे वाढदिवस, बायकोला भारी भेटवस्तू, मुलाना महागडी मोटर सायकल ,पार्ट्या हेच जीवन वाटू लागते. व मग ते मिळविण्यासाठी संघर्ष हेच जीवन असे तत्वज्ञान हिरीरीने मांडले जाते.

मी तरी व्रुद्धापकाळात " अफोर्डेबल व रिव्हर्सीबल " असे दोन निकष जमतील तरच वैद्यकीय उपचार घ्यावयाचे ठरवले आहे ! मला वॉरेन बफे व सन्त तुकाराम यान्च्याबद्द्ल
सारखाच आदर आहे !!!

उपयोजक's picture

24 Mar 2021 - 8:00 am | उपयोजक

ही अतिशयोक्ती वाटते. :)

आता काळ बदललाय. तुमच्या तरुणपणीची स्थिती आता राहिली नाही. ती स्थिती आज आणताही येणार नाही.

आज मुलींच्या होणार्‍या नवर्‍याबद्दलच्या अपेक्षा अतोनात वाढल्या आहेत. "नॉन आयटी क्षमस्व,नॉन MBBS क्षमस्व,नॉन CA क्षमस्व" असे लिहून येतात मुली अपेक्षांच्या कॉलममधे. शिकलेल्या,चांगलं मिळवणार्‍या मुली सोडाच पण १०/१२ वी शिकलेल्या मुलींच्याही याच अपेक्षा आहेत. मिपाकरांची इंटेलेक्चुअल लेवल बरीच वरची असल्याने हे असे काही मिपाबाह्य जगात घडते आहे हे कदाचित माहित नसावे किंवा आपल्यापर्यंत हे दाहक वास्तव पोहचत नाही तोपर्यंत कशाला लक्ष द्या वगैरे विचार होत असावा. परंतु मिपाबाहेरच्या जगात गरीबी,वाढत्या अपेक्षा, प्रबोधनाने न बदलणारी जनता आहे. "गुण्यागोविंदाने संसार करा. फक्त पैशाकडे पाहू नका" हा भरल्यापोटीचा गुडीगुडी सल्ला आजच्या काळात अजिबात कामाचा नाही. "पैसा सगळ्या गरजा भागवत नसला तरी बहुतांश गरजा पूर्ण करण्यासाठी पैसाच लागतो!"
श्रीमंतीची अपेक्षा न ठेवता नवरा बायको,मुले आनंदात राहतात हे अपवादात्मक, क्वचित कुठेतरी दिसले असेल. सगळा समाज तितका समजुतदार नाही. सध्या लग्ने ही आर्थिक डिल या तत्वावर होतात. 'जोवरी पैसा तोवरी बैसा' हेच चालते. हळवे होऊन किंवा नॉस्टॅल्जिक होऊन आजचे वास्तव बदलणार नाहीये. आजचे प्रश्न आजच्या मार्गांनीच सोडवले पाहिजेत.

चौकटराजा's picture

24 Mar 2021 - 9:25 am | चौकटराजा

आजच्या मुलीची मानसिकता हा एक वेगळा धागा होउ शकतो. त्या मानसिकतेचे दुश्परिणाम देखील दिसू लागले आहेत. कारण मुळात अशा मुलीचे आईवडीलच माझ्या सारखे नसतात. माझी मुलगी आजच्या काळातीलच आहे ! पण कोणत्याही मुलीला ठराविक प्रमाणात भावनिक ,आर्थिक सुरक्षितता हवीच असते. ती माझे लग्न झाले त्या काळात देखील माझ्या बायकोने पाहिली होती. ( मी ज्या कम्पनीत कामाला होतो तिथे वस्तू मिळायला दहा वर्षाचा वेटिंग पिरियड होता ! )

सुरक्षेततेचे रुपांतर चंगळीत झाले की समस्या निर्माण होतात .त्याला मग मनोरुग्ण म्हणून उपाय करण्याखेरीज गत्यन्तर नसते. माझा एक नातेवाईक मुलगा नोकरीही हवी व पत्रिका ही जुळली पाहिजे या हट्टापायी आज वयाच्या ६१ व्या वर्षीही अविवाहित आहे.

आयुष्यात कितीतरी समस्या स्वतः चा व परिसराचा नीट अभ्यास न केल्याने उदभवतात . निसर्ग व नशीब फार कमी वेळा घाला घालतात.

चौकस२१२'s picture

25 Mar 2021 - 9:42 am | चौकस२१२

( मी ज्या कम्पनीत कामाला होतो तिथे वस्तू मिळायला दहा वर्षाचा वेटिंग पिरियड होता ! )
गेले ते दिन गेले !
सुमित कि बजाज ( स्कुटर ) ?

सुबोध खरे's picture

24 Mar 2021 - 10:33 am | सुबोध खरे

Money is like a sixth sense without which you cannot make a complete use of the other five.

W. Somerset Maugham

A Luxury Once Tasted Becomes a Necessity

Joe Bautista ...

luxury becomes necessity when your neighbour buys it.

subodh khare

दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि रात्री दारू किंवा तस्तम नशेत आनंद शोधायचा प्रयत्न होताना दिसतो.
पैसा-स्ट्रेस-व्यसन(कोणतंही) हे समीकरण होता कामा नये.
माणसाने आपले सर्व छंद जोपासले च पाहिजेत. गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.ते गरजेचेच आहे. बरोबर.

उपयोजक's picture

24 Mar 2021 - 8:08 am | उपयोजक

१)नोकरी करत असताना भरपूर वेळ द्यावा लागणारा किंवा खर्चिक छंद असू नये.छंद हा काही कालांतराने धुंदीचं स्वरुप धारण करतो.त्यात जाणारा पैसा,वेळ गरीबीला कारणीभूत ठरु शकतो.

२) छंदातून चांगली आर्थिक कमाई होत असेल तर दुधात साखर. पण तसे नसेल तर तो छंद वेळीच सोडलेला बरा. असे छंद वाट लावतात. :(
हा धागा वाचावा. http://www.misalpav.com/node/47786

सुबोध खरे's picture

24 Mar 2021 - 10:34 am | सुबोध खरे

गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.

पण गरज आणि चैन यातील सीमारेषा कशी ठरवणार?

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? तुमच्या शेजाऱ्याने विकत घेतली कि.

उदा. व्हॅक्युम क्लिनर

चौकटराजा's picture

25 Mar 2021 - 5:22 am | चौकटराजा

गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.
कमाई तुमच्या हातात काही १०० टक्के असत नाही पण कितीतरी प्रमाणात गरज नक्की असते.
सबब मीच वर एका ठिकाणी म्ह्टल्याप्रमाणे आपली गरज कमाई नुसार बदलत जावी . १९७७ साली आग्फा चा क्लिक थ्री कॅमेरा ( त्यावेळी किंमत १५० रु. ) मला पगार ३८० रु. येथपासून आज २७ हजाराचा सोनी कॅमेरा असा प्रवास मी प्रत्येक कमोडिटीच्या बाबतीत केला आहे ! हळू हळू अंथरूण वाढवत न्यावे मग तसे तसे पाय पसरत जावे ,फक्त अंथरूण वाढवण्यातच जर लक्ष दिले तर पाय पसरण्याची मजा संपून जाईल. व अचाटपणे पाय पसरण्याची आकांक्षा बाळगली तर डी एस के होण्याची शक्यता असते .
उत्पादन व उपभोग यांचा सुरेख संगम आयुष्यात आनंद निर्माण करतो.

आग्या१९९०'s picture

25 Mar 2021 - 9:15 am | आग्या१९९०

अचाटपणे पाय पसरण्याची आकांक्षा बाळगली तर डी एस के होण्याची शक्यता असते .

+१

प्रकाश घाटपांडे's picture

24 Mar 2021 - 7:12 pm | प्रकाश घाटपांडे

प्रसिद्ध रशियन लेखक टॉल्स्टॉय यांची एक सुरेख कथा आहे. एका लोभी माणसावर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला ‘सकाळ संध्याकाळ पर्यंत जितक्या जमीनीवर तुझी पावूले पडतील तितकी जमीण तुझी होईल. आता तुला किती जमीन हवी हे तू ठरवायच आणि त्या प्रमाणे प्रयत्न करायचा’ माणूस लोभीतर होताच शिवाय लोभामुळे विचार क्षमता ही गमावून बसला होता. म्हणूनच देवाच्या बोलण्याचा आशयही समजू शकला नाही. त्याने विचार केला कि चालत राहिलो तर अशी कितीशी जमीन त्याब्यात येणार त्या पेक्षा पळत निघालो तर जास्ती जास्त जमीन आपल्याला मिळवता येइल. बस ठरल पळायच.

मास्तर! हा देश तमाशानं बिघडला नाही आणि किर्तनानं सुधारलाही नाही. - पिंजरा

वामन देशमुख's picture

23 Mar 2021 - 9:59 pm | वामन देशमुख

उत्तम चर्चा सुरु आहे; वाचतो आहे.

"धडधाकट गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती" यासारखे साफ खोटे, दिशाभूल करणारे आणि अवसानघातकी विधान दुसरे नसेल.

मानवी जीवनात सुख-दुःख हे सर्वत्रच आहे. श्रीमंती (म्हणजे मुख्यतः आर्थिक सुबत्ता) दुःख कमी करण्यास आणि सुख वाढवण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. तुम्हाला लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि तुम्ही श्रीमंत आहेत तर तुम्हाला अधिक भव्य रीतीने (टॅंकबंडच्या बसऐवजी स्वित्झर्लंडची फ्लाइट!) करता येईल, आणि ब्रेकअपच्या दुःखात बुडून जायचे आहे तर तेही अधिक भव्य (बॅगपाइपरऐवजी ग्लेनफिडिच!) रीतीने करता येईल!

आता प्रश्न आहे, भरपूर पैसा कसा कमवावा?

सर्वसाधारणपणे, आपल्या कौशल्याचे रूपांतर पैशात करण्याचे कसब तुम्हाला श्रीमंतीकडे नेते. तथापि समाजातील सर्वांनाच हे करता येते असे नाही, त्यांच्याकडे उपयुक्त कौशल्य असतेच असेही नाही. म्हणूनच की काय, इतर लोकांना श्रीमंत व्हायची संधी उपलब्ध असते!

माझ्या मते, पोट भरण्याची, गरिबीतून बाहेर पडण्याची, संपदा निर्माण करण्याची, श्रीमंत होण्याची... आजच्याइतकी प्रचंड संधी, ज्ञात मानवी इतिहासात पूर्वी केंव्हाही नव्हती. ज्याला कोणतेही समाजपयोगी काम करता येते अश्या प्रत्येक व्यक्तीला आज मागणी आहे.

ज्याला/जिला श्रीमंत व्हायचे आहे -- मर्यादा ज्याची त्याने आपापल्या कुवतीनुसार ठरवावी -- त्याने/तिने -

१. आपल्या कौशल्याला उपयुक्त बाजार शोधावा किंवा बाजाराला उपयुक्त कौशल्य शोधावे.
२. आपल्या कौशल्याला सतत मागणी राहील याची तजवीज करावी किंवा मागणीप्रमाणे कौशल्य बदलावे.
३. भरपूर पैसे कमवावे आणि कमावलेल्या पैशापैकी किमान ७५% पैसा खर्च करावा.
पैसा असो की पाणी, फार काळ साठवून ठेवता येत नाही, खराब होत जाते.
४. मध्यम वयात आपल्या खर्चाच्या प्रमाणात पैसे कमविण्याचे उद्दिष्ट ठेवावे.
५. उतारवयात आपल्या पैश्याच्या प्रमाणात खर्च करण्याचे नियोजन करावे.

हे सर्व कायदेशीर मार्गाने साध्य करणे सहज जरी नसले तरी शक्य आहे.