बॅंकांचे खाजगीकरण : स्तुत्य उपक्रम

साहना's picture
साहना in काथ्याकूट
19 Mar 2021 - 1:05 pm
गाभा: 

भारत सरकारने एके काळी खाजगी आस्थापनाकडून बँका चोरून बळजबरीने आपल्या केल्या. मग ह्या चांगल्या चालणाऱ्या बॅंकांना सुशिक्षित लोकांची मनरेगा असल्या प्रमाणे वापरले. भ्रष्टचार माजवला. गरीब लोकांच्या ठेवी चुकीच्या लोकांना लोन म्हणून दिल्या, बँकांना जबरदस्तीने अल्पभूधारक शेती सारख्या रिस्की गोष्टींना कमी दरात लोन द्यायला भाग पाडले. शेवटी हि सर्व सर्कस एक ना एक दिवस कोसळणारच होती. पेटीम, गूगल पे, ऍमेझॉन इत्यादी आधुनिक कंपन्या आता फिनटेक मध्ये येत आहेत त्यामुळे बँकिंग क्षेत्रच मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे आणि ज्या निष्क्रियतेने सरकार डझन पेक्षा जास्त बँका चालवत आहे तो मॉडेल जास्त दिवस टिकेल अशी आशा नाही. अजून पर्यंत करदात्यांचे लक्षावधी कोटी रुपये ह्या बँकांत कृष्णार्पणमस्तु झाले. अनेक ग्रामीण भागांत जिथे एक बँक सुद्धा चालणे मुश्किल आहे तिथे भारत सरकारच्या विविध बँकाच्या तीन शाखा आहेत. स्टेट बँक जिथे आधीपासून आहे तिथे युनियन बँक ची शाखा का बरे उघडावी ? अर्थात सरकारी कामांत तर्क नसतो. जास्त शाखा म्हणजे जास्त कर्मचारी. मग नुकसान झाले तरी चालेल पण फुकट्या लोकांना सरकारी पगारावर पोसायला पाहिजे.

जुन्या काळी राजाची चाटुकारिता केली कि राजा मग एखादे गांव जहागीर म्हणून बक्षीस द्यायचा त्याप्रमाणे बँकांतील नोकऱ्या ह्या आधुनिक काळांतील जहागिरी होत्या.

देशाची प्रगती व्हायला पाहिजे तर भांडवल हे महत्वाच्या गोष्टींत गेले पाहिजे. बँकांचा नफा जास्त तर मग बँका जास्त रिस्क घेऊन लोन देऊ शकतात. त्यामुळे प्रगतीचा वेग वाढतो. त्याशिवाय कमी कर्मचारी असल्यास हेच मनुष्यबळ इतर चांगल्या उद्योगधंद्यांत वळते आणि समाजाचा फायदा होतो.

** सरकारी पावले का उचलली गेली आहेत ? **

आधीची ५ वर्षे मोदी सरकारने काहीही विशेष आर्थिक सुधार न करता वाया घालवली आहेत. अचानक मग आता हि उपरती का बरे सुचली ? ह्याचे कारण आहे कि सरकारी बँका धोक्यांत आहेत आणि ह्यांचे दिवस भरले आहेत. ह्यांना वेळीच बंद केले नाही तर पुढील १० वर्षांत सरकारला आणखीन पैसा ओतावा लागणार आहे.

संपूर्ण जुनाट बँकिंग क्षेत्र धोक्यांत आहे. येत्या काही वर्षांत मोदी सरकार आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी ठेवींचे दर बऱ्यापैकी कमी करणार आहेत अशी चिंन्हे आहेत. FD चे दार कमी झाले कि कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी होतात त्यामुळे कर्ज घेऊन नवीन उद्योग धंदे सुरु करण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रोजगार वाढतो. त्याशिवाय FD वर जास्त व्याज मिळत नसल्यास लोक इतर क्षेत्रांत पैसे गुंतवतात त्यामुळे आणखीन रोजगार निर्माण होतो.

सरकारी बँका मागील काही वर्षांत कँसर प्रमाणे वाढल्या आहेत आणि त्यांचे ओझे फारच कठीण झाले आहे. ह्या बँकांना शेप मधेय ठेवण्यासाठी रिसर्व बँक तसेच अर्थखाते ह्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जातो. हा अपव्यय सरकार कमी करणार आहेच पण त्याशिवाय रिलायन्स, गूगल, पेटीम, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी वेगवान आणि आधुनिक प्रकाची खाती लोकांना देतील अशी चिंन्हे आहेत. आधार कार्ड मुळे कागदपत्र व्यवहार अत्यंत सोपा झाला आहे. ऍमेझॉन ICICI क्रेडिट कार्ड तुम्ही हल्ली घरबसल्या ३-४ दिवसांत मिळवू शकता.

पण काही सूत्रांच्या माहितीप्रमाणे भारतांत रिटेल इंवेस्टिंग सुद्धा बऱ्यापैकी वाढणार अशी चिंन्हे आहेत. अमेरिकेतील रॉबिनहूड ऍप्प प्रमाणे स्वस्तांत आणि सहज स्टोक मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला अनेक कंपन्या आपली एप्स बाजारांत आणणार आहेत. एकदा हि ऍप्स लोकप्रिय झाली कि जुनाट बँकिंग व्यवस्था हळू हळू डायनोसॉर प्रमाणे नामशेष होत जाईल. काही मोठया कंपन्यांनी ह्या विषयावर RBI आणि निर्मला सीतारामन ह्यांची मनधरणी केली आहे.

नको असलेल्या बॅंक्स विकून सरकारी भार कमी करणे हि बँकिंग क्षेत्रांतील सर्वांत छोटी स्टेप आहे. ह्यानंतर आणखीन मोठी पाऊले सरकार घेईल असे वाटते. म्हणूनच सरकार आत्मविश्वासाने हा अजेंडा पुढे रेटत आहे.

टीप : संप करणाऱ्या लोकांना माझा अजिबात पाठिंबा नाही. नोकरी पसंद नसेल तर सोडून इतर ठिकाणी जा. उगाच संप करून कष्टकरी भारतीयांना त्रास देऊ नये. २०२१ मध्ये जास्त पैसे सरकारी बँक मध्ये ठेवूच नये. ३-४ बँक मध्ये विभाजित करून ठेवावे आणि किमान ७०% पैसे ICICI किंवा HDFC मध्ये ठेवावेत.

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 1:17 pm | आग्या१९९०

येस बँकेतही ठेवा.
सबप्राइम घोटाळा , त्यानंतर आलेली मंदी, सरकारने पॅकेज दिले तेव्हा कुठे सावरले. काय फायदा झाला खासगी बँकांमुळे तेथील सरकारचा?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 2:05 pm | चंद्रसूर्यकुमार

मी काही वर्षे येस बँकेतच क्रेडिट रिस्क डिपार्टमेंटमध्ये म्हणजे कर्जाची प्रोपोजल्स तपासून कोणाला कर्ज द्यावे आणि कोणाला नको ही शिफारस करणार्‍या विभागात होतो. मग करताय का येस बँकेवर चर्चा?

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 2:20 pm | आग्या१९९०

अच्छा ती तोट्यात जाण्याचे हे कारण होते हे माहीत नव्हते.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 2:29 pm | चंद्रसूर्यकुमार

अच्छा ती तोट्यात जाण्याचे हे कारण होते हे माहीत नव्हते.

या प्रतिसादावरून तुम्हाला येस बँकेत नक्की काय झाले आणि नक्की कुठे आणि कोणत्या पातळीवर प्रॉब्लेम झाला याविषयी घंटा काहीही माहित नाही तरी उगीच पिंका टाकायची हौस पूर्ण करून घेत आहात हे दिसतच आहे. तुमचे नाव दिसताक्षणी प्रतिसाद दुर्लक्षित करायचा माझ्या सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द?) दिलेला आदेश योग्य होता हेच खरे.

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 2:36 pm | आग्या१९९०

येस बँकेचे मढे सरकारी बँकेच्या गळ्यात नको, हेच म्हणणे आहे. ते खासगीवाले बघून घेतील.

सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द?)
अंतर्मन

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 3:26 pm | चंद्रसूर्यकुमार

अंतर्मन

धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

19 Mar 2021 - 8:48 pm | चित्रगुप्त

तार्किक मन आणि तर्कातीत मन हे शब्द सुमारे शंभर-पाऊणशे वर्षांपूर्वी डॉ. गणपुले यांनी त्यांचा पुस्तकातून प्रचलित केले होते ते मला जास्त सयुक्तिक वाटतात.

सॅगी's picture

19 Mar 2021 - 2:32 pm | सॅगी

एवढे होऊनही अशा कितीशा सरकारी बँका आहेत अमेरिकेत?

बुडीत चालणार्या व्यवसायांना सरकारने पॅकेज द्यावे हा भ्रष्टचार आहे. इथे खाजगी आहे कि सरकारी आहे ह्याचा फरक पडत नाही.

फायदा सरकारचा कशाला व्हायला पाहिजे ? किमान करदात्यांचा पैसा गरज नसलेल्या लोकांना पगार द्यायला खर्च होत नाही ह्यांत आनंद आहे.

येस बॅंक चे समभाग ४०० रुपयांवरून १४ रुपया वर आले आहेत आणि ह्यामुळे ह्या बँकेत इन्व्हेस्ट करणाऱ्या सर्व लोकाना चांगला धडा मिळाला आहे ह्यामुळे सर्वच बँकांत गुंतवणुकीसाठी आता जास्त खबरदारी गुंतवणूकदार घेतील ह्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र आणखीन मजबूत होईल. ह्या प्रकारच्या गोष्टी सरकारी बँकात घडत नाहीत कारण गुपचूप लोकांचा पैसे घालून सरकार आपल्या भ्रष्टचारावर पांघरून घालते. पर्यायाने ह्या समस्या वाढत जातात.

बापूसाहेब's picture

19 Mar 2021 - 1:34 pm | बापूसाहेब

लेख पटला. पण नेहमीचे सभासद गोंधळ माजवणार हे नक्की.. त्यामुळे मी रुमाल टाकून ठेवतो.

पण काही सूत्रांच्या माहितीप्रमाणे भारतांत रिटेल इंवेस्टिंग सुद्धा बऱ्यापैकी वाढणार अशी चिंन्हे आहेत. अमेरिकेतील रॉबिनहूड ऍप्प प्रमाणे स्वस्तांत आणि सहज स्टोक मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला अनेक कंपन्या आपली एप्स बाजारांत आणणार आहेत.

याची सुरवात ऑलरेडी झालेली आहे.. कितीतरी नवीन कंपन्या ट्रेडिंग साठी अँप्स लाँच करत आहेत.

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 1:39 pm | Rajesh188

सिटी बँक अडचणीत आली त्याचे महत्वाचे कारण कमी व्याजात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी ग्राहकाची लायकी न बघता दिलेले कर्ज .
कमी व्याजात कर्ज सहज उपलब्ध झाल्या मुळे रिअल इस्टेट उद्योग चा फुगा फुगला.
दोन रुपयाचे फ्लॅट ५० रुपयाला विकले गेले .
घेणारे कोण तर हेच कमी व्याजात बँक मधून लायकी पेक्षा जास्त कर्ज घेणारी मंडळी.
जेव्हा कर्जाचे हफ्ते पण हे खूप मोठी कर्ज घेणाऱ्या लोकांना भरता येईना .
तेव्हा कर्ज वसुली साठी फ्लॅट विकावा तर त्याचा भावाचा फक्त फुगाच फुगलेला .
कोणी घेण्यास तयार नाही.
बुडली सिटी बँक आणि त्या बरोबर ठेवीदार सुद्धा बुडले.
मग आहे दयाळू सरकार पॅकेज देण्यासाठी.
लोकांनी कर भरलेला पैसा ह्या नालायक बँकेला देवून तिचा जीव वाचवला.

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 1:39 pm | Rajesh188

सिटी बँक अडचणीत आली त्याचे महत्वाचे कारण कमी व्याजात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी ग्राहकाची लायकी न बघता दिलेले कर्ज .
कमी व्याजात कर्ज सहज उपलब्ध झाल्या मुळे रिअल इस्टेट उद्योग चा फुगा फुगला.
दोन रुपयाचे फ्लॅट ५० रुपयाला विकले गेले .
घेणारे कोण तर हेच कमी व्याजात बँक मधून लायकी पेक्षा जास्त कर्ज घेणारी मंडळी.
जेव्हा कर्जाचे हफ्ते पण हे खूप मोठी कर्ज घेणाऱ्या लोकांना भरता येईना .
तेव्हा कर्ज वसुली साठी फ्लॅट विकावा तर त्याचा भावाचा फक्त फुगाच फुगलेला .
कोणी घेण्यास तयार नाही.
बुडली सिटी बँक आणि त्या बरोबर ठेवीदार सुद्धा बुडले.
मग आहे दयाळू सरकार पॅकेज देण्यासाठी.
लोकांनी कर भरलेला पैसा ह्या नालायक बँकेला देवून तिचा जीव वाचवला.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 2:03 pm | चंद्रसूर्यकुमार

२००७-०९ च्या आर्थिक संकटामागे सरकारी धोरणांचा कसा वाटा होता हे समस्त पुरोगाम्यांचे लाडके रघुराम राजन यांनी लिहिलेल्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात वाचायला मिळेल. पहिल्यांदा आपल्याच धोरणामुळे संकट निर्माण करायचे आणि त्यात सगळे क्षेत्र अडकले की मग बेल-आऊट पॅकेजेस द्यायची आणि मग परत 'बघा सरकारने वाचवले की नाही' ही टिमकी वाजवायची याला काय अर्थ आहे? म्हणजे एखाद्याला डोंगराच्या कड्यावरून ढकलायचे आणि तो माणूस खाली पडायच्या आत दरीत मध्ये संरक्षक जाळी बसवायची आणि तो माणूस त्यामुळे वाचला की मग मुळात ढकलणार्‍याच त्याचे श्रेय द्यायचे. बरोबर ना?

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 2:21 pm | आग्या१९९०

पोळी भाजताना हा विचार करायला हवा होता ना?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 1:58 pm | चंद्रसूर्यकुमार

ग्राहकांची सोय हा एक मुद्दा झाला. पण त्यापेक्षा आणखी मूलभूत मुद्दा म्हणजे स्टेट बँक सोडून इतर सरकारी बँका या इंदिरा सरकारने दरोडेखोरी करून खाजगी मालकांकडून ताब्यात घेतल्या आहेत. तसे करायचा इंदिरा सरकारला काहीही नैतिक अधिकार नव्हता. त्यामुळे त्या बँका खाजगी क्षेत्राला परत द्यायलाच हव्यात.

अर्थकारण आणि त्यातही बँकिंग हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. या चर्चेत अधिक सहभाग घेईनच. काही विशिष्ट मिपा आयडींचे प्रतिसाद मी अन्य चर्चांमध्ये पूर्ण दुर्लक्षित करून पुढे जातो पण या चर्चेपुरता त्या नियमाला अपवाद करणार आहे.

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 2:06 pm | Rajesh188

त्यांनी लोकांच्या कष्टाच्या ठेवी डल्ला नव्हता मारला तर तसे होवू नये म्हणून खासगी बँकांचे राष्ट्रीय करण केले.
ह्या खूप प्रमाणिक आणि धडाडीचा पंतप्रधान असावा लागतो आणि तश्या इंदिराजी होत्या.
सामान्य लोकांच्या कष्टाच्या ठेवी ज्यांनी डल्ला मारला आहेत त्या ,
निरव मोदी,मल्ल्या आणि असे अनेक कर्ज बुडवे उद्योगपती ह्या विषयावर पण कॉमेंट देत जा.

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 2:10 pm | चंद्रसूर्यकुमार

सामान्य लोकांच्या कष्टाच्या ठेवी ज्यांनी डल्ला मारला आहेत त्या ,

जरा एस.जगन्नाथन या आर.बी.आय गव्हर्नरना इंदिरा सरकारने नक्की का पदावरून काढले याची माहिती घ्या आणि मग सामान्य लोकांच्या कष्टाच्या ठेवींची सरकारला किती काळजी होती याविषयी काहीतरी लिहा.

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 2:25 pm | आग्या१९९०

इतिहास आम्हालाही माहीत आहे. वर्तमानात या. सरकाराला अशी वेळ का आली, त्यातही धोरणात धेडगुजरीपणा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2021 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निरव मोदी,मल्ल्या आणि असे अनेक कर्ज बुडवे उद्योगपती ह्या विषयावर पण कॉमेंट देत जा.

अरे देवा, तुम्ही सध्याच्या सरकारच्या अपयशावर, सद्य प्रश्नांवर बोलले की, तुम्हास ते पंडित नेहरुंचे कपडे परदेशात इस्त्रीसाठी कसे जात होते त्यावर बोलतील. लशीचा इकडे तुटवडा असतांना, पाकिस्तानला लशीच्या पुरवठ्याबद्दल तुम्ही बोलले की तुम्हाला ते वैश्वीकरण, विश्वगुरु, आपण सर्व भगवंताची लेकरं एक कशी आहोत यावर प्रवचनं ठोकतील. तुम्ही गॅस दरवाढीबद्दल बोललात की, तुम्हाला चुलीचं आणि चुलीतल्या लाकडाचं महत्व समजावून सांगतील. तुम्ही बँकांच्या खासगीकरणावर बोललात की, तुम्हाला इंदिरा गांधींच्या बँकांच्या धोरणांवर बोलावे लागेल. तुम्ही 'भाकरीवर' प्रश्न विचारला तर ते 'केक' खा म्हणतील. सरकारच्या एकूण पंधरा वर्षाचा हिशेबावर बोलू लागलो की ते तुम्हाला सत्तर साल मे क्या किया म्हणतील. तुम्ही नोटबंदीबद्दल बोललात तर तुम्हाला दिवा बत्ती आणि थाळी वाजविण्याचं महत्व समजावून सांगतील. तुम्ही करोनाच्या अपयशावर बोललात तर ते तुमच्या कुमकवत प्रतिकार शक्तीबद्दल बोलतील. केंद्रीय मंत्रीमंडळातील दहा मंत्र्यांची नावे सांगा म्हटले, की तुम्हाला ते 'हम दो और हमारे दो' चं म्हत्व समजावून सांगतील, सारांश इतकाच की यांचा आणि सद्य परिस्थितीच्या विचारांचा काहीही संबंध नसतो. निवडून दिलंय ना, भोगा फळं.

-दिलीप बिरुटे

सॅगी's picture

19 Mar 2021 - 3:34 pm | सॅगी

आपले प्रतिसाद मनोरंजक असतात...लिहीते रहा ही नम्र विनंती..

चौकस२१२'s picture

22 Mar 2021 - 10:35 am | चौकस२१२

मग नव्हतं निवडून द्यायचा... पहिली ५ वर्षानंतर संधी आली होती ना...? तुम्हाला लोकशाहीचा पण आदर करीत येत नाही अस दिसतंय
आत्ता का गळे काढताय आणि एवढीच कुचंबणा होत असले तर राहुलजी हा पर्याय आहेच .. लवकर करा आणा बाबा त्यांना एकदा सिहासनावर

भारतात कितीतरी अवघड jagiche दुखणे झालेले प्रश्न सोडव्याचं प्रयत्न हे सरकार करताय ( आणि त्यात चुका हि होत असतील ती काही जादूची कांडी नाही ) पण तुम्हाला तर सगळ्यातचह कला बेर दिसतंय....
आता समजा समान नागरी कायदा आणलं तर म्हणाल अल्पसंख्याकांची गळचेपी ,,
चालुद्या तुमचा रडीचा खेळ...

मुळात समान नागरी कायदा म्हणजे काय हे बहुसंख्य विरोध करणाऱ्या आणि मागणी करणाऱ्या लोकांना माहीतच नसते.
Ipc सर्व लोकांसाठी समान आहे.
दिवाणी कायदे सर्व लोकांसाठी समान आहेत.
पण नागरी कायदा समान नाही.
ही काय भानगड आहे?
नागरी कायदा हा प्रतेक धर्माच्या रिती रिवाजा शी संबंधित आहे.
साधं उदाहरण.
मुस्लिम लोक चुलत बहिणी शी लग्न करतात ते कायदेशीर आणि मान्य आहे.
हिंदू मध्ये चुलत बहिणी बरोबर लग्न करत नाहीत ते बेकायदेशीर आणि अमान्य आहे.
इथे समान नागरी कायदा कसा बनवणारा.
उदाहरण बरोबर च असेल.

बापूसाहेब's picture

22 Mar 2021 - 12:00 pm | बापूसाहेब

पण नागरी कायदा समान नाही.
ही काय भानगड आहे?
नागरी कायदा हा प्रतेक धर्माच्या रिती रिवाजा शी संबंधित आहे.
साधं उदाहरण.
मुस्लिम लोक चुलत बहिणी शी लग्न करतात ते कायदेशीर आणि मान्य आहे.

राजेश जी.. तुम्ही BJP विरोधात इतके आंधळे झालेला आहात कि कधी कधी आपण कशाचे समर्थन करतोय ते समजत नाहीये. मागे एकदा तुम्ही भारताच्या विभाजनाचे ( तुकडे पाडण्याचे ) समर्थन केले होते.. आणि आता इथं समान नगरी कायद्यला विरोध.. तुम्ही नक्की राजेश च आहात कि अजुन काही..??

Ok. म्हणजे धर्माच्या रिवाजानुसार असलेल्या गोष्टी मान्य आहेत तुम्हाला.. ओके. ठीक आहे
खालील गोष्टी देखील धर्माच्या रिवाजानुसार आहेत त्यादेखील त्यांनी मान्य कराव्यात. बघू xxx त किती दम आहे ते. -

चोरी - हाथ तोडणे.
इस्लाम सोडणे - मृत्यदंड.
एक्सट्रा मॅरिटल सेक्स - 80 कोडाचे फटके.
दारू पिणे - 40-80 कोडाचे फटके.
जादू किंवा जादूचे प्रयोग करणे - मृत्यदंड
बलात्कार - दगडाने ठेचून मारणे.

मुसलमान वैयक्तिक कायदा मंडळाचे दुटप्पी वर्तन स्पष्ट आहे कि त्यांना समान फौजदारी कायदा हवा आहे पण समान नागरी कायदा नको आहे...!!
म्हणजे "मजा " मारायला मुस्लिम पर्सनल लौ, आणि अंगाशी आल्यावर इंडियन पिनल कोड.. वाह.. हिपोक्रसी कि भी सीमा होती है.. !!!

BTW - ही कीड 1947 मध्ये पूर्ण साफ केली असती तर फार बरे झाले असते. काही वर्षांनी पुन्हा तुकडा मागून वेगळा देश मागितला नाही म्हणजे बरं.. !!!

मुस्लिम लोक चुलत बहिणी शी लग्न करतात ते कायदेशीर आणि मान्य आहे.
हिंदू मध्ये चुलत बहिणी बरोबर लग्न करत नाहीत ते बेकायदेशीर आणि अमान्य आहे

राजेश भाऊ एका देशात जिथे भारतापेक्षा जास्त वर्णाचे ( आणि धर्माची) विविधता आहे तेथील एक साधे उद्धरण देतो
- येथे एकपनीत्वचा कायदा आहे मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरी,,, म्हणजे जर उद्या कोणी भारतीय किंवा अरबी मुसलमान येथे कायमचा राह्यला येऊ इच्छहीत असले तर त्याला कुटुंब म्हणून एकच बायको असे येथील सरकार धरेल .. मग तुम्ही कितीही आंदाळ आपट करा
तुमचा भाजप विरोध इतकं आंधळा झालाय कि देश साथ काहीतरी चांगला असू शकेल आणि ते कोणत्याही सरकारने केले तरी ते चांगलेच असेल हे विसरता आहात आपण

जगात अनेक देशात सामान नागरी कायदा आहे इथे ख्रिस्ती बहुसंख्यांक आहेत तिथे सुद्धा

तुमही आणि तुम्ची विचारसरणी का असे धरून चालते कि समान नागरी कायदा म्हणजे "हिंदू कायदा"

चौकस२१२'s picture

22 Mar 2021 - 10:35 am | चौकस२१२

मग नव्हतं निवडून द्यायचा... पहिली ५ वर्षानंतर संधी आली होती ना...? तुम्हाला लोकशाहीचा पण आदर करीत येत नाही अस दिसतंय
आत्ता का गळे काढताय आणि एवढीच कुचंबणा होत असले तर राहुलजी हा पर्याय आहेच .. लवकर करा आणा बाबा त्यांना एकदा सिहासनावर

भारतात कितीतरी अवघड jagiche दुखणे झालेले प्रश्न सोडव्याचं प्रयत्न हे सरकार करताय ( आणि त्यात चुका हि होत असतील ती काही जादूची कांडी नाही ) पण तुम्हाला तर सगळ्यातचह कला बेर दिसतंय....
आता समजा समान नागरी कायदा आणलं तर म्हणाल अल्पसंख्याकांची गळचेपी ,,
चालुद्या तुमचा रडीचा खेळ...

सॅगी's picture

22 Mar 2021 - 11:27 am | सॅगी

इथे स्वतःच्या पक्षाचे सिंहासन सांभाळताना नाकी नऊ येताहेत, आणि म्हणे हे देशाचे सिंहासन सांभाळणार...

असो, असे लोकंही महान आणि अशांच्या नादी लागणारे त्यांचे पाठीराखे दसपट महान!!!

प्रदीप's picture

23 Mar 2021 - 8:19 am | प्रदीप

प्रा.डॉंच्या ह्या प्रतिसादांत लिहीलेल्या अनेक बाबींचा व सदर धाग्याचा काहीही संबंध नाही. इथपासून हा उपधागा सदर लेखाशी संबंधित नसलेल्या बाबींचा उहापोह करतो आहे.

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 8:49 am | मुक्त विहारि

हेच तर मिपाचे वैशिष्टय आहे ...

आणि त्यातही एक गंमत आहे ... इथे एकमेकांच्या प्रतिसादांना प्रतिवाद करणारे, एकत्र भेटले की मजा पण करतात...

त्यामुळे, इथले प्रतिसाद खूप मनांवर घ्यायचे नसतात...

अस्सल मिपाकर, लेखणीद्वारे भांडतो आणि जमेल तेंव्हा, एकत्र येऊन कट्टा पण साजरा करतो...

चौकटराजा's picture

19 Mar 2021 - 3:41 pm | चौकटराजा

अरे वा कॉन्फिडेन्शल रेकार्ड वर लाल शेरा मारायची सोय मिपात झाली !! आनंद आहे !

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 2:15 pm | शा वि कु

ज्यांच्याकडून घेतल्या त्यांनाच परत दिल्या तर न्याय्य होईल ना ? "खाजगी क्षेत्रा"ला परत देण्यास कसला न्याय ?

हे काही पटले नाही ब्वा. बाकी खाजगीकरण करण्यास पाठींबा आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 2:25 pm | चंद्रसूर्यकुमार

ज्यांच्याकडून घेतल्या त्यांनाच परत दिल्या तर न्याय्य होईल ना ?

हो बरोबर आहे. खरं तर तसेच करायला हवे. पण या बँकांचे १९६९ मधील मालक आता हयात नाहीत. ५० पेक्षा जास्त वर्षे झाली या सरकारी दरोडेखोरीला. या बँकांची स्थापना आणखी जुनी असल्याने संस्थापक हयात असायची शक्यताच नाही. तरीही या बँकांचे काही टक्के शेअर्स कोणत्या इंडस्ट्रीअल ग्रुपकडे असतील आणि तो ग्रुप अजूनही अस्तित्वात असेल तर त्या प्रमाणात शेअर्स त्या ग्रुपला द्यावेत असे मलाही वाटते. (उदाहरणार्थ नंतर युको बँक हे नामकरण झालेली बँक जी.डी.बिर्ला ग्रुपची होती). पण तसे नसेल आणि ते मालक, तेव्हाचे इंडस्ट्रीअल ग्रुप शेअरमालक वगैरे कोणीच अस्तित्वात नसेल तर तसे कसे करणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2021 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संप करणाऱ्या लोकांना माझा अजिबात पाठिंबा नाही.

व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेणा-यांना आपला बॉ एक भारतीय म्हणून पाठींबा आहे. (भारतात राहात असल्यामुळे)
बाकी, संस्थानिक, श्रीमंतांच्या सावकारक्या गेल्या, ब्यांकामुळे सामान्य लोक, कष्टकरी यांचा फायदा झाला.
कर्ज मिळू लागले, बँकेत पैसे ठेवणा-यांचे पैसे सुरक्षीत राहू लागले. खासगी ब्यांकां अपयशी ठरत होत्या, तेव्हाचाही निर्णयही राजकीयच असला तरी (त्यावरही खूप टीका झालेली आहे) त्याचं सरकारीकरण केल्या गेलं, हे अनेकांना माहिती आहे. अर्थात, भविष्यात पुन्हा त्याचं विलणीकरण वगैरे होत राहील यात माझ्या मनात शंका नाही.

नोकरी पसंद नसेल तर सोडून इतर ठिकाणी जा.

कुठे जातील बिचारे, त्यांच्या उपजिवेकाचाही विचार व्हावा असे वाटते. अगोदरच डिझेल पेट्रोल बरोबर इतरही जीवानावश्यक गोष्टीची महागाई वाढली आहे, त्यांची लेकरं, कुटुंब यांचाही सहानुभूतीने विचार व्हावा असे वाटते.

२०२१ मध्ये जास्त पैसे सरकारी बँक मध्ये ठेवूच नये.

मला वाटतं, पूर्वीच्या पद्धती चांगल्या होत्या, मडक्यात पैसे ठेवणे.
जमीनीत पैसे पुरणे वगैरे....!

ब्यांकात ठेवले तर, विजय मल्ल्यासारखे गरीब व्यावसायिक दहा एक हजार करोड घेऊन फरार झाले, तो निरव मोदी बीचारा बारा करोड घेऊन फरार झाला. सरकारने अशा बँकांना मदत वगैरे करु नये, असेही वाटते. सरकार तरी कुठे कुठे मदत करणार, नाही का ?

-दिलीप बिरुटे

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 2:32 pm | Rajesh188

दरोडे खोर कर्ज बुडवे ज्या खासगी बँकेचे मालक असतील त्या बँकेत पैसे ठेवण्या पेक्षा घरात पैसे ठेवू .ते सुरक्षित राहतील.
दरोडेखोर ना पेक्षा भुरटे चोर हे खूप सज्जन असतात.
सरकार नी त्या मध्ये नाक खुपसू नये.
डिजिटल वैगेरे काही नको आम्ही रोखीत व्यवहार करू

बापूसाहेब's picture

19 Mar 2021 - 7:14 pm | बापूसाहेब

कळीचा प्रश्न..

ब्यांकात ठेवले तर, विजय मल्ल्यासारखे गरीब व्यावसायिक दहा एक हजार करोड घेऊन फरार झाले, तो निरव मोदी बीचारा बारा करोड घेऊन फरार झाला. सरकारने अशा बँकांना मदत वगैरे करु नये, असेही वाटते. सरकार तरी कुठे कुठे मदत करणार, नाही का ?

हे लोकं ज्या बँकाकडून पैसे घेऊन पळून गेले त्या बँका राष्टियकृत होत्या कि खाजगी??

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 7:23 pm | चंद्रसूर्यकुमार

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सचे ७-८ हजार कोटी म्हणजे त्यामानाने बरीच चिल्लर रक्कम होती हे असे प्रश्न विचारणार्‍यांच्या अनेकदा लक्षात येत नाही. फक्त विजय मल्ल्या हा बराच 'हाय प्रोफाईल' होता आणि मिडियात त्याची उठबस होती त्यामुळे त्याचे नाव अधिक परिचयाचे एवढेच.

आय.बी.सी-२०१६ आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठ्या अशा ७ केस सोडवायला घेतल्या होत्या. त्या होत्या एस्सार स्टील, भूषण स्टील, मोनेट इस्पात, इलेक्ट्रोप्लास्ट स्टील, अलोक इंडस्ट्रीज, ज्योती स्ट्रक्चर्स आणि भूषण पॉवर. या सात कंपन्यांची मिळून एकूण थकीत रक्कम होती २.१३ लाख कोटी. त्यापैकी १.१३ लाख कोटी या प्रक्रीयेतून मिळाले. पण अगदी शून्य रूपये मिळण्यापेक्षा १.१३ लाख कोटी मिळाले हे पण काही कमी नाही.

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या सगळ्या जंजाळात विजय मल्ल्या हा खूप छोटा मासा होता.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2021 - 7:40 pm | श्रीगुरुजी

अलोक इंडस्ट्रीजचे समभाग घेऊन मी बराच अडकलो होतो. माझी सरासरी खरेदी किंमत १० रूपयांच्या आसपास होती. समभागाची किंमत रू. १:४० इतकी उतरली होती व किंमत वाढण्याची कोणतीही शक्यता नव्हती.

IBC मुळे रिलायन्स व अजून एका कंपनीने अलोकच्या थकीत २९,००० कोटी कर्जापैकी ५,०५० कोटी परतफेड करून जून २०२० मध्ये अलोकवर ताबा मिळविला. नंतर अलोकच्या समभागाची किंमत रोज ५ टक्क्यांनी वाढून जवळपास ५८ पर्यंत गेली होती. आता मागील २-३ महिने २०-२४ च्या दरम्यान किंबहुना स्थिर आहे. त्यामुळे मी फायद्यात आहे.

गणेशा's picture

20 Mar 2021 - 7:53 am | गणेशा

तोट्यात चाललेली अलोक इंडस्ट्री, संगणमताने दिवाळखोरीत आली असे वाचनात आले होते, खरं खोटे माहित नाही..
अलोक इंडस्ट्री दिवाळखोरीत दाखवून, आणि हजारो कोटी किंमतीच्या कंपनीला त्याच्या मुळ asset पेक्षा कमी किमतीत reliance ला विकले गेले... हे संगण मताणे झाले असे वाचलेलं आहे..
आणि तीच शक्यता आहे.

बँकेचे कर्ज बुडल्यात जमा आहे, त्यामुळे asset जरी १२००० कोटी असले तरी निम्म्या किमतीत आम्ही settle करतो आम्हाला विका, या साठी तोट्यातील कंपनी, बुडीत करुन कंपनीच्या मानाने नाममात्र price ला विकल्या गेली..
विकली, घेतली आक्षेप नाही.. पण जाणून बुजून विकत घ्यायची असल्यास मूल्यांकण कमी केले होते असे वाचल्याने हि शक्यता असु शकते हे तेंव्हाही वाटले होतेच.

गुरुजी,

बाकी मार्केट मध्ये असे speculative stocks वर खाली न्हेणे बऱ्याचदा पहायला मिळते..
मी तरी अश्या stocks पासून लांब राहतो..

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2021 - 10:01 am | श्रीगुरुजी

अलोक एकेकाळी नफ्यातील कंपनी होती. परंतु अतिरिक्त उत्पादन, घटलेला asset turnover ratio, वाढती स्पर्धा, स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक, ५००+ दुकाने काढणे व अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे त्यातील बरीच दुकाने बंद पडणे आणि प्रचंड कर्ज यामुळे ही कंपनी दिवाळखोर झाली होती. हे होण्यात काही संगनमत असावे असे वाटत नाही. कंपनीचे निर्णय २००४ पासूनच चुकत गेले.

कंपनीच्या २९,००० कोटी रूपयांच्या कर्जापैकी १ कोटी रूपये सुद्धा वसूल झाले नसते. कंपनी बंद झाल्याने हजारो कर्मचारी बेकार झाले असते.. रिलायन्स व JM Financial Asset Reconstruction कंपनीने त्यापैकी निदान ५०५० कोटी रूपये तरी फेडले व हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी वाचविली. त्यांना ही कंपनी खूप स्वस्तात मिळाली हे नक्की. परंतु अगदीच काही नसण्यापेक्षा त्यातून थोडेतरी कर्ज वसूल होऊन उत्पादन सुरू राहिले ही जमेची गोष्ट आहे.

बापूसाहेब's picture

19 Mar 2021 - 7:42 pm | बापूसाहेब

हो हे मी वाचले होते कि विजय मल्ल्या आणि निरव मोदी हे त्यामानाने फार छोटे मासे आहेत. पण निरव मोदी आणि मल्ल्या आणि अश्या इतर कर्जबुडव्यांची बरीचशी संपत्ती बँकांनी जप्त केली आहे त्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही असे म्हणणे चूक आहे. आणि महत्वाचे म्हणजे ही कारवाई विशेष करून मोदी सरकारच्या काळात झाली आहे.. आणि त्यांना मिळालेली बहुतांश कर्जे ही UPA सरकारच्या काळात दिली गेली आहेत.

तुम्ही या गोष्टी फाट्यावर मारणार तरीही
@ बिरुटे @ 188 @आग्या इ. FYI.

------------

पण माझा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे to म्हणजे हे कर्जबुडवे लोकं कुठून कर्ज घेतात?? खाजगी बँका कि राष्ट्रीयकृत बँका? कि दोन्ही??
जर दोन्ही असेल तर % wise डिस्ट्रिब्युशन कसे आहे.
कोणी जाणकार असेल तर उत्तर द्या plz.

यावरून हे समजेल कि खाजगी बँका जास्त घोटाळे करतात कि राष्ट्रीयकृत.

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 8:42 pm | आग्या१९९०

चांगले आहे की. मागच्यांनी ज्या चूका केल्या त्या ह्यापुढे हे सरकार करणार नाही,त्यामुळे बँका तोट्यातही जाणार नाही. इतकी खात्री असताना सरकारी बँकांचे खासगीकरण करायची घाई का करतेय हे सरकार?

आज देशांतील बँकांची आर्थिक स्थिती पहिली तर उत्तर मिळेल :

npa

npa

npa

तेंव्हा, एक तर तो सत्कारणी तरी लागतो किंवा विध्वंसक तरी होतो...

म्हणूनच, घराणेशाही टाळायची असते...

मी माझा पैसा, पोस्टात ठेवतो...

कारण एकच, अद्याप तरी, पोस्टात आर्थिक भ्रष्टाचार झालेला नाही, असे ऐकीवात आहे आणि माझा एकही पैसा पोस्टाने बुडवलेला नाही..

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 7:49 pm | शा वि कु

घराणेशाही म्हणजे नक्की काय ?
तुम्ही सतत उल्लेख करता म्हणून.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:07 pm | मुक्त विहारि

थोडा अभ्यास स्वतः करा, अडलेच तर उत्तर देतो..

1. बलिष्ठ साम्राज्ये का नष्ट झाली?

2. आखाती देश, काल, आज आणि उद्या

3. दक्षिण कोरिया

4. माफिया

5. टाटा, बिर्ला, लालभाई, मफतलाल, बजाज, महिंद्रा, किर्लोस्कर...

6. मॅक डोनाल्ड

7. स्वित्झर्लंड

8. इस्त्रायल

9. विशेष पर्व

10. जपान

स्वतः वाचा, मनन करा, चिंतन करा, नक्कीच समजेल...

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 8:13 pm | शा वि कु

मला माझ्यादृष्टीने कल्पना आहेच.
तुम्हाला काय वाटतं, आणि घराणेशाही म्हणजे सर्वोच्च एव्हिल असं का वाटतं ह्याची उत्सुकता आहे. इथले कम्युनिस्ट पोलीस तुम्हाला तुम्ही कम्युनिस्ट का असं विचारायला नाही आले, म्हणलं आपण कर्तव्य पार पाडूया :))

बाकी वाचा मनन चिंतन करा वैगेरे पॅट्रोनाइझ करायची गरज नाही. सरळ उत्तर द्यायची इच्छा नाही म्हणलं तरी चालेल.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:29 pm | मुक्त विहारि

मग झालं तर...
-----------
सरळ उत्तर द्यायची इच्छा नाही म्हणलं तरी चालेल....

सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे, वाचलंत की समजेलच... थोडे कष्ट करा.....

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 8:31 pm | शा वि कु

ओक्के !

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:34 pm | मुक्त विहारि

तुम्ही, सामना आणि सिंहासन, हे सिनेमे, बघीतले आहेत का?

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 8:39 pm | शा वि कु

सामना फार पूर्वी पाहिलाय. सिंहासन नाहीच.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:54 pm | मुक्त विहारि

सिंहासन, हा सामना चित्रपटाचा दुसरा भाग आहे...

पण सिहासन चित्रपट बघण्यापुर्वी, खालील पुस्तके वाचा

मुंबई दिनांक आणि सिंहासन

पुस्तके वाचलीत तर, सिनेमा समजायला सोपा जाईल...

संवाद अतिशय चपखल आहेत, त्यामुळे आजही उपयोगी पडतात...

सिंहासन, एकाच वेळी अनेक पातळ्यांवर फिरतो...

दलित, सवर्ण

गरीब, श्रीमंत

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष

इच्छा आणि हव्यास

चंद्रावरचा एक डाग

जातपात

स्मगलिंग

बेकारी

अंतर्गत कलह

एकाच घटने बाबतचा, विविध पक्षांचा दृष्टिकोन

ह्यातील एका घटनेवर, "सैराट" बेतला आहे ... फक्त कथानक उलटे फिरवले आहे ...उदाहरण देतो, कालीचरण आणि डाॅन,

आयला, जवळ जवळ, परिक्षणच लिहिले की....

असो,

सिंहासन बघा आणि मनापासून आनंद घ्या... फक्त स्वतःचा दिनू होऊ देऊ नका...

साहना's picture

19 Mar 2021 - 9:31 pm | साहना

> बाकी, संस्थानिक, श्रीमंतांच्या सावकारक्या गेल्या, ब्यांकामुळे सामान्य लोक, कष्टकरी यांचा फायदा झाला.

कसला फायदा ? आणि दुसऱ्याची संपत्ती चोरून आणि त्याच्या घराला आग लावून आपला फायदा करून घेणे योग्य आहे काय ?

>कर्ज मिळू लागले, बँकेत पैसे ठेवणा-यांचे पैसे सुरक्षीत राहू लागले. खासगी ब्यांकां अपयशी ठरत होत्या, तेव्हाचाही निर्णयही राजकीयच असला तरी (त्यावरही खूप टीका झालेली आहे) त्याचं सरकारीकरण केल्या गेलं, हे अनेकांना माहिती आहे. अर्थात, भविष्यात पुन्हा त्याचं विलणीकरण वगैरे होत राहील यात माझ्या मनात शंका नाही.

कर्ज आधी मिळत नव्हते काय ? आधी योग्य माणसालाच कर्ज मिळायचे त्यानंतर सरकारने हस्तक्षेप करून जे लोक मते देतील त्यांनाच कर्ज द्यायला सुरुरवात केली म्हणून भारतांत दारिद्र्य वेगाने पसरले.

> खासगी ब्यांकां अपयशी ठरत होत्या

अजिबात नाही. खाजगी बँक चांगल्या चालत होत्या, त्यांचे जे काही पायाशी होते ते सरकार आणि रिसर्व बँक ह्यांच्या धोरणांनी होते.

> भविष्यात पुन्हा त्याचं विलणीकरण वगैरे होत राहील यात माझ्या मनात शंका नाही.

एकदा बैल पळाला कि झोपा होत नाही. बँकाच्या ठेवींचा विमा असतो त्यामुळे बँकांतील पैसे बुडण्याची शक्यता नसतेच. एकदा लोकांना उच्च दर्जाची सेवा ह्याची सवय झाली कि पुन्हा सरकारी दळिद्री कारभार त्यांना मानवत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2021 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधीची ५ वर्षे मोदी सरकारने काहीही विशेष आर्थिक सुधार न करता वाया घालवली आहेत.

मोदी सरकारने सर्वच क्षेत्रांचं वाटोळं केलेलं आहे, सगळीकडेच ती बोंब आहे, सदरील महोदयांच्या काळ आणि कर्तुत्वावर आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ, निरर्थक घालवायचा नाही, असे ठरवले आहे. :)

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 2:18 pm | आग्या१९९०

आधीची ५ वर्षे मोदी सरकारने काहीही विशेष आर्थिक सुधार न करता वाया घालवली आहेत. अचानक मग आता हि उपरती का बरे सुचली ? ह्याचे कारण आहे कि सरकारी बँका धोक्यांत आहेत आणि ह्यांचे दिवस भरले आहेत. ह्यांना वेळीच बंद केले नाही तर पुढील १० वर्षांत सरकारला आणखीन पैसा ओतावा लागणार आहे.

आधीची पाच वर्षे सरकारने आर्थिक सुधारणा न करता वाया घालवली म्हणण्यापेक्षा ह्या पाच वर्षात देशाच्या अर्थकारणाचा पुरा बट्याबोळ करून टाकला असं म्हणा. कसा केला ह्याच्या फार तपशीलात जायची गरज नाही.
सरकारी बँका धोक्यात आहेत तर sbi ला येस बँकेत पैसे टाकायला का सांगितले? तेच पैसै तोट्यातील सरकारी बँकांमध्ये गुंतवायला उपयोगी आले असते.
सरकार फक्त तोट्यातील सार्वजनिक बँकाच विकत नाहीये, फायद्यातील स्वकष्टाने उभारलेले उद्योगही खासगी उद्योगांना विकत आहे. उदा: Concor. ह्याला कसले तरी डोहाळे म्हणतात.

साहना's picture

19 Mar 2021 - 9:32 pm | साहना

> फायद्यातील स्वकष्टाने उभारलेले उद्योगही खासगी उद्योगांना विकत आहे. उदा: Concor.

चांगली गोष्ट आहे. धंदा करण्यासाठी सरकार नाही. राजा व्यापारी तो प्रजा भिकारी.

मोदी सरकार हे आर्थिक बाबतीत काहीच व्यवस्थित करू शकलेले नाहि.. उलट अर्थव्यवस्था कामाजोरच झाली.. विशेष करून नोटबंदी नंतर च्या काळापासून

त्यामुळे बँकांचे खाजागीकरण म्हणले कि त्याचे फायदा तोटा काय हे नंतर कळतीलच, पण हे सरकार हा निर्णय घेतेय त्यानेच धडकी भरतेय..कारण कितीही असले तरी काँग्रेस कडे असलेले अर्थशास्त्रीय ज्ञान bjp कडे नाहीये..आणि असले तरी ते व्यवस्थित कामातून दिसले नाही..

त्यामुळे बँकांचे खाजगी करण केल्यावरच त्याचे परिणाम दिसतील हे नक्की..

गेल्या वर्षी yes बँकेचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच..
Yes बँक डबघाईला आली होती, तिला वाचावाण्यासाठी sbi / lic सहित बऱ्याच बँकांना,संस्थांना सरकारने मदत करायला सांगितली होती..
आणि लोन जास्त प्रमाणात बुडवणारे कोण होते तर अनिल अंबानी, zee चे मालक वगैरे..

खाजगीकरण झाल्यावर, कोण कोणाला किती लोन कसे देईल सांगता येत नाही..
अंबानी /अडाणी किंवा इतर उद्योजक स्वतः बँक चालवतील हे हि आता सांगता येत नाही..

Nbfc चे बँकेत रूपांतर केले जाऊन फक्त नफा हे ध्येय ठेवून त्या कश्या लोन देतील आणि कोणाला किती हे हि येणारा काळ ठरवेल..

सरकार pf चे पैसे पुन्हा देऊ शकेल का हे सुद्धा आता नीट सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे..

आणि खाजगी करण चांगले कि वाईट हे येणारा काळ दाखवेलच..

बाकी अल्पभूधारक शेतकरी किंवा पीक कर्जे यावर विमा असतो..
सरकार चा या विमाधारक कंपनी वरती कसलाच अंकुश नसल्याने पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नव्हतेच.. उलट येथे हि ह्या खाजगी विमा कंपनीने त्यांच्याच फायद्याने कसे वागायचे ठरवलेले होते...
असो त्यामुळे ह्या सगळ्या कड्या आहेत..आणि योग्य आर्थिक ज्ञान असल्या शिवाय या सर्व गोष्टी राबवल्यास देश अजून खाली जाऊ शकेल..

या खाजगी करणावर मला डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार वाचायला नक्कीच आवडेल.. असे इतर हि कोणी तज्ञ असतील त्यांचे हि मत. वाचून कळेल काय फायदे काय तोटे..
कारण एक सामान्य माणुस म्हणुन जे सरकार करेल तेच मान्य करण्या शिवाय कुठलाही पर्याय माझ्याकडे नाहीच..

असो..
आणि सरकारी कंपन्या,बँका विकून सरकार भार कमी करत असेल तर लोककल्याण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य अश्या गोष्टींकडे सरकार नीट लक्ष देईल अशी आशा करतो..ते हि करणार नसेल तर मग खाजगी करण करा किंवा नका करू सामान्य नागरिकाला काहीच हाती लागेल असे वाटत नाही..

बँकांच्या खाजगीकरणाचा निर्णय स्तुत्यच आहे, पण त्याच्या अंमलबजावणी बद्दल साशंक आहे. निर्मला सितारामन यांच्या कडूंन चांगले काही कार्य घडण्याची अपेक्षा मी तरी ठेऊ शकत नाही!

पण सेनापती असणाऱ्या मोदी न सुद्धा अर्थ शास्त्र आणि अर्थ व्यवस्था ह्या मधील काडी ची समज नाही.
त्यांचे आता पर्यंत चे सर्व निर्णय देशाला आर्थिक संकटात टाकत गेले आहेत.
त्यानं एकच कळत फायदा .
आणि तो पण फक्त मित्रांचा.
मोदी नी न लाजता dr Manmohan सिंग ह्यांचा सल्ला अर्थ विषयी निर्णय घेताना नक्की घ्यावा.
त्या मध्ये काही कमी पना नाही.

आग्या१९९०'s picture

19 Mar 2021 - 2:44 pm | आग्या१९९०

मनमोहन लाख सल्ले देतील पण ते समजले तर पाहिजे. बोकील बिकील कसे सुटसुटीत सांगतात.

भारत सरकार चे रेल्वे मंत्री म्हणजे अतिशय बुद्धिमान आणि तेजस्वी व्यक्ती मत्व.
रेल्वे चे खासगी करण करणे कसे योग्य आहे हे सांगताना त्यांच्या बुद्धीचे तेज सहस्त्र सूर्या पेक्षा जास्त तेजाने चमकत होते.
केवढी ती अफाट बुध्दी मत्ता.
काही क्षण तर भारतीय जनता त्यांच्या बुध्दी च्या अफाट तेजामुळे बेशुद्ध च पडली.
काय ते दिव्य वाक्य.
" रस्त्यावर फक्त सरकारी वाहन च मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करतात का?"
केवढे ते बुध्दी चे तेज.
जे रस्ता वाहतूक आणि रेल्वे ह्यांची तुलना करतात ती ह्या ग्रहावरील व्यक्ती असूच शकतं नाही ..
आमच्या सारख्या सामान्य बुध्दी च्या माणसानं दिव्य बुध्दी चे ज्यांना वरदान आहे त्या रेल मंत्री असलेल्या व्यक्ती ला..
रेल वाहतूक आणि रस्ता वाहतूक ह्या मधील फरक कसा समजावं वां.

काही क्षण तर भारतीय जनता त्यांच्या बुध्दी च्या अफाट तेजामुळे बेशुद्ध च पडली.

काहीही, मी ही भारतीयच आहे, भारतातच आहे, मी नाही ब्वॉ बेशुध्द वगैरे पडलो...

हा, आता झोपेचे सोंग घेतलेल्यां चमचेमंडळींबद्दल बोलत असाल तर माहीत नाही बुवा...

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 3:24 pm | मुक्त विहारि

मी पोस्टात पैसे ठेवतो ...

Bhakti's picture

19 Mar 2021 - 3:28 pm | Bhakti

तुमचा लेख वाचून सरकारचा दृष्टीकोन समजला.
बाकी
संप करणाऱ्या लोकांना माझा अजिबात पाठिंबा नाही. नोकरी पसंद नसेल तर सोडून इतर ठिकाणी जा.
Bank मध्ये असणारे ..ओळखीचे लोक काल परवा पर्यंत मोदी सरकारचे गुणगान गात होते.. रात्रीतून बदलून शाप देऊन लागले..
पण ..ज्याचं जळत त्यालाच कळत...
बदलांच लोण कोण कोणत्या क्षेत्रात येणार आहे अजून काय माहित...

करोडो ठेवीदार असणाऱ्या भारतीय लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील ह्याची हमी सरकार बँका दरोडेखोर लोकांना चालवायला देण्या अगोदर देणार आहे का?
हाच कळीचा प्रश्न आहे.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 3:46 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 3:43 pm | मुक्त विहारि

1. दळणवळणाचा वेग आणि सुटसुटीतपणा वाढल्याने, कामे लवकर होतात...

2. येत्या 2-3 वर्षांत, जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार, कॅशलेस करण्याचा सरकारचा विचार आहे..

3. सरकारी खात्यात निर्णय घ्यायला वेळ लागतो.

4. आर्थिक अंकूश सरकारचाच राहणार

5. पुढील टप्पा, पतपेढ्या असतील

6. मोदींना एकच गोष्ट समजते आणि ती म्हणजे देशाचे संरक्षण .. ज्यांना मोदींच्या कार्यपद्धतीची जाणीव आहे, ते मोदींना पाठिंबा देणारच..

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे,

कुठल्याही गोष्टीला विरोध, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष करत असतील तर, ती गोष्ट जनतेच्या भल्यासाठीच असते....हे माझे तर्कशास्त्र आहे...

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 4:08 pm | Rajesh188

तुम्ही काही ही न लिहता फक्त ती जागा ब्लँक ठेवली तरी मिपाकर ते वाचू शकतात.
कशाला टाइप करायचे कष्ट घेता

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 4:15 pm | मुक्त विहारि

सेम टू यू ....

साहना's picture

19 Mar 2021 - 9:35 pm | साहना

सामान्य लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. वर्षानुवर्षे खर्डेघाशी करत लठ्ठ पगार घेत आपला बँक बॅलन्स वाढवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हे निर्णय पचनी पडणार नाहीत हे स्वाभाविक आहे पण त्याच वेळी काळ बदलला आहे आणि त्याला सामोरे त्यांना जावेच लागेल.

प्रचंड मोठ्या शाखा त्यांत असंख्य कर्मचारी, आपलेच पैसे काढायला मोठी प्रोसेस, "सेवा" हा शब्दच ठाऊक नसावा अशी वागणूक. २०२१ असली सावकारी वृत्ती बॅंका चालणार नाहीत. ह्यांचे वय झाले असेल त्यांनी रिटायर होण्याकडे नजर लावावी आणि जे तरुण असतील त्यांनी इतर मार्ग शोधावे.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 9:44 pm | मुक्त विहारि

उत्तम काम करत असेल तर ठेवतीलच...नविन कर्मचारी घेऊन, त्याला प्रशिक्षित करण्यात, खाजगी आस्थापने, वेळ घालवत नाहीत...

विशेष पर्व, हे पुस्तक जरूर वाचा, आणि असेच एक पुस्तक वाचनांत आले होते, लक्ष्मी मित्तल, यांच्या संदर्भात, मध्यम आणि तळागाळातील माणसांना, आस्थापने बदलली तरी त्रास न देण्याचा, त्या दोघांनीपण सल्ला दिला आहे...

चौकटराजा's picture

19 Mar 2021 - 4:11 pm | चौकटराजा

सामान्य लोकाना कर्ज मिळण्याची सोय तसेच सरकारी प्रकल्पासाठी पैसे उपलब्ध होण्याची सोय ही सुरक्षिततेच्या बदल्यात अशा स्वरूपात बँकांचे सरकारी करण करण्यात आले .सरकारी बँकांना अयोग्य अशा प्रकल्पाना कर्जे देण्याचा राजकीय दबाव आणून नागवले गेले आहे ! मग ते राजकीय लोकांच्या प्रकल्पातून व मोठमोठ्या उद्योग समूहातून . असा कोणताही कायदा नाही की सरकारी बँकेतील ठेवी सुरक्षित असतात ! सरकार म्हणजे शेवटी समाजच म्हणून ते आपल्याला फसवणार नाही अशा ठोकताळ्यावर सरकारी बँका सुरक्षित आहेत असे म्हटले जाते .

खाजगीकरणात एक फायदा व तितकाच मोठा तोटा असा की ,नफा हा त्याचा कणा आहे त्यामुळे साधन सामाग्री चा वापर योग्य तर्हेने होतो तर लुटारू वृत्ती हा त्याचा काळा चेहरा आहे ! अवाजवी गोष्टीवर खर्च करून मालाची व सेवेची किमत वाढवायची त्यात नफा मात्र कमी करायाचा नाही .व्यवसाय वाढविण्यासाठी काही ही करायचे स्वातंत्र्य असल्याने खाजगी कारणात धोके पत्करणे व अनॆतिकता वाढीस लागते . सरकारी मालकी ५१ टक्के व ४९ टक्के खाजगी मालकी व व्यवस्थापन पूर्णपणे खाजगी असा काहीसा फॉर्म्युला आल्यास काहीतरी तरणोपाय आहे पण त्यात नफयांचा काही वाटा ( पगार न देता ) थेट व्यवस्थापनाला दिला गेला पाहिजे म्हंजे सरकार जिथे भागेदार आहे ते सर्व जनहितार्थ तोट्यातच चालवायचे असते की समजूत मागे पडेल .

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2021 - 4:17 pm | श्रीगुरुजी

शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज देणे, कर्जवसुलीसाठी जप्ती न करणे इ. खाजगी बॅंकांसाठी बंधनकारक असते का?

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 4:22 pm | मुक्त विहारि

ज्या गोष्टीला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष विरोध करतात, ती गोष्ट जनतेच्या भल्यासाठीच असते, हे माझे वैयक्तिक मत आहे....

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 4:28 pm | Rajesh188

कष्टाच्या ठेवी खासगी बँकेत सुरक्षित असतील ह्यांची हमी सरकार देणार आहे का.
बाकी लायकी पेक्षा जास्त कर्ज बँकांनी कुणालाही देवू नयेत
उद्योगपती ना योग्य तारण न घेता कर्ज दिल्यामुळे बँका बुडाल्या आहेत आणि हे जगात खूप देशात घडले आहे.
शेतकरी लोकांचे कर्ज त्यांच्या जमिनी च्या किमती पेक्षा जास्त नसते.
जमीन जप्त करून बँका ते आरामात वसूल करू शकतात..
पण उद्योग पती ना दिलेले कर्ज तारण च नसल्या मुळे वसूल होत नाहीत.
नाही तर.
माल्या ,निरव (ही फक्त उदाहरणे आहेत असे खूप आहेत ) ह्यांची कर्ज त्यांची मालमत्ता विकून वसूल झाली असती .
पण तसे घडले नाही.
देश साक्षी आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 6:07 pm | चंद्रसूर्यकुमार

प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत शेती, दुध उत्पादन, कुटिरोद्योग, सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्यूएबल उर्जा वगैरे प्राथमिकतेच्या क्षेत्रांना एकूण लोन बुकच्या ४०% रक्कम सगळ्या बँकांना द्यावीच लागते. तसे ने केल्यास रिझर्व्ह बँक संबंधित बँकांना या क्षेत्रांना जितकी कर्जाची रक्कम ४०% पेक्षा कमी पडेल तितक्या किंमतीचे नाबार्डचे बाँड घ्यायला भाग पाडते. रिझर्व्ह बँकेचे हे नियम १९७० मध्ये आले. तेच १९६९ च्या दरोडेखोरीच्या आधी केले असते तर कदाचित 'बँका ग्रामीण भागात कर्ज देत नव्हत्या' ही नेहमीची रड करायला वाव नसता.

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 6:50 pm | शा वि कु

चर्चेसाठी महत्वाचा प्रतिसाद.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 6:53 pm | मुक्त विहारि

म्हणजे, शेतकरी वर्गाला, खाजगी बॅन्का कर्ज देऊ शकतात का?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 7:06 pm | चंद्रसूर्यकुमार

हो देऊ शकतात. शेतकर्‍यांनाच कर्ज द्यायला हवे असे नाही पण प्रायोरिटी सेक्टरमध्ये एकूण ४०% कर्ज द्यावे लागते त्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये शेतीचा समावेश होतो. त्यामुळे खाजगी बँका तांत्रिकदृष्ट्या शेतकर्‍यांना कर्ज देऊ शकतात. आता या ४०% पैकी नक्की किती कर्ज प्रत्यक्ष शेतकर्‍यांना दिले जाते हे बघायला हवे. आणि प्रायोरिटी सेक्टरमध्ये शेतीचा समावेश आहे म्हणजे शेतीशी संबंधित उद्योगांचाही (फूड प्रोसेसिंग वगैरे) समावेश होतो. या उद्योगांना नक्कीच खाजगी बँका कर्ज देतात.

माझे काही मित्र बँकेत या विभागात होते. ४०% कर्ज म्हणजे तशी बरीच मोठी रक्कम होते. तसेच अनेक बँका या कर्जासाठी स्पर्धेत असल्याने या कर्जासाठी व्याजाचा दर कमी पडतो. एकदा अशी वेळ आली होती की आमच्या बँकेने अधिक ठेवी मिळवायला फिस्क्ड डिपॉझिटचे व्याजाचे दर वाढवले. आमचे हे पी.एस.एल कर्जाचे ग्राहक होते (मुख्यतः गुजरातमधील डेअर्‍या) त्यांना एक तर कर्जाची गरज नसायची पण तरीही सगळ्या बँकांचे रिलेशनशीप मॅनेजर्स गळ्यात पडून कर्ज घ्या कर्ज घ्या म्हणून मागे लागायचे आणि त्यामुळे व्याजाचा दरही कमी असायचा. त्यात आमच्या बँकेने फिक्स्ड डिपॉझिटचे दर वाढविल्याने त्यावर मिळणारे व्याज त्यांना त्या काळापुरते थोडेसे जास्त होते. तेव्हा त्या डेअर्‍यांनी असे रिलेशनशीप मॅनेजर्सनी गळ्यात मारलेले कर्ज घेऊन आमच्याच बँकेत फिक्स्डला लावले होते. अर्थात हा फरक फार जास्त नव्हता पण जेवढा होता तेवढा त्यांच्यासाठी 'फोकट का पैसा' असेच होते. ही माहिती मला माझ्या मित्रांकडून कळली होती.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 7:12 pm | मुक्त विहारि

मोठ्या लोकांच्या, मोठ्या गोष्टी...
------------

> प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत शेती, दुध उत्पादन, कुटिरोद्योग, सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्यूएबल उर्जा वगैरे प्राथमिकतेच्या क्षेत्रांना एकूण लोन बुकच्या ४०% रक्कम सगळ्या बँकांना द्यावीच लागते

चुकीचा नियम होता आणि आहे. बँकांनी कुणाला लोन द्यावे ह्यांत "रिस्क" सोडल्यास इतर गोष्टींना महत्व देऊ नये. नाहीतर विनाकारण संपत्तीची नासाडी होते आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावतो. इतकीच खाज होती तर असली कर्जे स्टेट बँक कडून द्यायची होती इतर बँकांवर विनाकारण बंधने का ?

गरज नसताना सुद्धा मी गलेलठ्ठ शेतकी कर्ज युनियन बँक कडून घेतले आहे. कारण त्यांना देणे भाग होते आणि गरजू शेतकर्यांपेक्षा नाममात्र शेतकऱ्याला देणे जास्त फायद्याचे असल्याने ते मला कर्ज द्यायचे.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 10:24 pm | चंद्रसूर्यकुमार

चुकीचा नियम होता आणि आहे.

नक्कीच चुकीचा नियम आहे.

दुर्दैवाने खरे असावे, असा अंदाज आहे...

ह्याचा मला तरी, एका अर्थाने फायदाच झाला...

मी शेतकरी आहे,असे म्हटल्यावर, कर्ज घ्या, असे सांगणारे, अनावश्यक फोन बंद झाले...

साधारण पणे संभाषण असे.....एक नाट्यछटाच लिहीतो...
------------
टळटळीत दुपारची वेळ... बायकोने केलेला कोळंबीचा रस्सा आणि तांदूळाची भाकरी खाऊन, मी घोरत पडलेलो आणि अचानक फोनची रिंग वाजते... अशावेळी खरंतर फोन घेऊच नये, पण असेल कुणाचा तरी,म्हणून फोन घेतो...

मी : हॅलो

ती: तुम्ही फलाणा ढेकणा बोलताय ना?

मी: हो, मीच तो

ती: सर, आमच्या बॅन्केने, एक नविन लोन स्कीम काढली आहे.

मी: अहो, पण मला लोन नको आहे.

ती: सर, पण जरा स्कीम तर ऐकून घ्या...

मी: (आता तशी पण झोप उडालीच आहे, तर, बोलत बसू या) ठीक आहे . सांगा ...

ती: 4-5 मिनीटांत सगळी स्कीम समजावून सांगते. आणि विचारते की, सर, तुम्हाला ही स्कीम कशी वाटली?

मी: अरे व्वा छानच ...

ती: सर, मग तुम्हाला किती लोन हवे आहे?

मी: 40-50 लाख तरी लागतीलच पण एकदा माझ्या CA ला विचारावे लागेल..

ती: सर, कधी हवे आहे.

मी: शक्यतो उदूयाच, कारण 40-50 लाख मी सहज खर्च करू शकतो.

ती: मग मी डाॅक्युमेंटस् घेऊन कुणाला पाठवू?

मी: ते नंतर बघू... पण मला 2 गोष्टी हव्या आहेत. एक म्हणजे, पैसे लगेच हवेत आणि दुसरे म्हणजे, पुढची किमान 20 वर्ष मी एकही पैसा व्याज देणार नाही...

ती: अहो असे कसे? व्याज तर द्यावेच लागेल.

मी: अहो, मी शेतकरी आहे. तुमच्या पैशांतून मी, शेतीला कुंपण घालीन, जागा लागवडी खाली घेईन आणि मग त्यात नारळ लावीन... आता चांगल्या पैकी उत्पन्न हवे असेल तर किमान 20 वर्ष तरी थांबायला लागेलच...

ती: म्हणजे, तुम्ही नौकरी करत नाही...

मी: कशाला? तुम्ही फक्त नौकरी करणार्या माणसालाच कर्ज देता का?

ती: हो,

मी: अहो, पण उद्या नौकरी जाऊ शकते, जागा मात्र आहे तिथेच राहते...

ती: बरं मी कळवते नंतर .....

नंतर परत कधी त्या बॅन्केचा फोन येत नाही...

त्या कॉल सेंटर ला कदाचित हे माहित नसेल ... नाहीतर भारतात शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही असे कसे असेल
त्याचे नियम आणि ते देणाऱ्या बँक वेगळ्या असतील एकतर पण इतर देशात तरी जसे इतर कोणताही उद्योग तसे शेती कडे बघितले जाते आणि तसे कर्ज मिळते
त्यात साधारण हेच नियम असणार कि हो
- - कर्ज घेणार्यांचे काहीतरी भांडवल स्वतःचे असले पाहिजे
- कर्ज कसे फेडणार याचा बिझिनेस प्लॅन
- या आधीची शेती याचाही जमाखर्च
- फक्त साधन सामुग्री पाहिजे असेल ( हैड्रोपोनिक किंवा अवजारे) तर त्यावर लीज इत्यादी

हा अशी जर मागणी असेल कि शेती तुन उत्पन्न य्यायाल २० वर्षे लागतात आणि तोपर्यंत ना मुद्दल ना वय्याज देणार तर कोण देईल हो कर्ज?
एक वेळ सरकार स्वताच्या खिशातून काही तरी मदत देईल ... पण असे कर्ज द्व्यावे अशी अपेक्षा? अगदी ना नफा ना तोटा तत्व्वर चालणारी बँक सुद्धा देणार नाही

मुक्त विहारि's picture

23 Mar 2021 - 6:59 am | मुक्त विहारि

वृक्ष लागवड आधारित आहे...

50-50 पार्टनर शिप ऑफर केली होती... जागा माझी, गुंतवणूक त्यांची.. तारण म्हणून, भांडवलाच्या दुप्पट किंमतीचे फ्लॅट अधिक शेत... ह्यात त्यांचे नुकसान काहीच नाही...

शिवाय, मी काही त्यांना फोन केला न्हवता, ते माझ्या कडे आले होते...

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 4:24 pm | चंद्रसूर्यकुमार

खाजगी बँकांमध्ये कोणालाही कर्जे दिली जातात म्हणून खाजगी बँका धोकादायक हे येस बँकेचे उदाहरण दाखवून नेहमी म्हटले जाते. पण असे म्हणणारे एक गोष्ट विसरतात की सरकारने गेल्या ५० वर्षात करदात्यांचे अक्षरशः लाखो कोटी रूपये टाकले आहेत. ते समजा सरकारने टाकले नसते तर या सरकारी बँका अनेकदा बुडल्या असत्या. म्हणजे येस बँकेसारखे काही झाले तर ते लगेच दिसते पण सरकार वेळोवेळी अशी इक्विटी बँकांमध्ये टाकत असते ते दिसत नाही म्हणून असल्या लोकांना बोंबा मारायला वाव मिळतो.

१९७० च्या दशकात बँकांचे नुकतेच राष्ट्रीयीकरण झाले होते आणि त्यावेळी इंदिरा गांधींना समाजवादाचे भूत सवार झाले होते. त्यातूनच १९७० च्या दशकात 'लोन मेळावे' भरत असत. त्यातून कोणालाही कर्ज दिले जायचे. परतफेड होते आहे की नाही वगैरे गोष्टींना फाट्यावर मारले गेले होते. संजय गांधींच्या मारूतीला किती सरकारी बँकांचे असेच कर्ज दिले गेले होते. सध्याचा जो एन.पी.ए चा घोळ झाला आहे त्यालाही सरकारी धोरणेच (त्याच अर्थतज्ञ मनमोहनसिंगांच्या सरकारची) कारणीभूत आहेत. खाजगी कंपन्यांना वीजेचे प्रकल्प उभारायची कंत्राटे द्यायची पण कोळशाचे लिंकेज महिनोनमहिने मिळायचे नाही. प्रकल्पावर काम सुरू झाले आणि पुढचे काम पूर्ण करायच्या आधी पर्यावरण क्लिअरन्सेस असेच महिने महिने मिळायचे नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातून बँका एन.पी.ए दाखवायला लागू नयेत म्हणून कर्जाचे 'एव्हरग्रिनींग' करायच्या. असे अनेक सांगाडे बँकांच्या (सरकारी सुध्दा) कपाटात बंद होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये एक दिवस रघुराम राजन गव्हर्नर असताना ते दरवाजे उघडले गेले आणि नक्की एन.पी.ए किती याचा हिशेब सुरू झाला. तो पूर्ण झाला ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ मध्ये. तोपर्यंत एन.पी.ए चा आकडा होता तब्बल ९ लाख कोटी. त्यानंतर मोदी सरकारने ऑक्टोबर २०१७ मध्ये २.१ लाख कोटीची इक्विटी सरकारी बँकांमध्ये टाकली. असले प्रकार किती दिवस चालणार आहेत?

मागे मिपावरच लिहिले होते ते परत लिहितो. खाजगी बँकेत घोटाळे होतात म्हणून सरकारी बँका हव्यात हे म्हणणेच मुळात चुकीचे आहे. घोटाळे टाळायला रिझर्व्ह बँकेचे कडक सुपरव्हिजन पाहिजे. बँकांचा सुपरव्हायजर म्हणून रिझर्व्ह बँक हवी असे मला वाटते पण त्या रिझर्व्ह बँकेकडे अर्थव्यवस्थेत किती मनी सप्लाय असावा याचे अमर्याद अधिकार असावेत का याविषयी माझी मते वेगळी आहेत पण तो विषय नाही म्हणून त्याविषयी लिहित नाही. उलट सरकारी बँकेत घोटाळे झाले तर त्याचा भुर्दंड करदात्यांना म्हणजे तुमच्याआमच्यासारख्यांना बसतो. पण खाजगी बँकेत घोटाळे झाले तर त्याची किंमत त्या बँकेचे शेअर ज्यांच्याकडे असतात तेच चुकती करतात. त्यातही येस बँकेसारखे प्रकार होतात तेव्हा कुठेतरी रिझर्व्ह बँकेचेही अपयश असते. बाकी राणा कपूरांनी येस बँकेत नक्की काय काय प्रकार केले होते याविषयी नंतर कधीतरी लिहेन. हे मी पब्लिक डोमेनमध्ये कधी लिहिले नव्हते कारण बँकेतल्या आतल्या गोष्टी अशा बाहेर आणणे (आणि ते पण तिथेच नोकरी करत असताना) योग्य नव्हते असे मला वाटते. पण आता राणा कपूर तुरूंगात आहेत आणि तिथे घोटाळा झाला आहे हे जगजाहीर आहे त्यामुळे काही आतले डिटेल द्यायला हरकत नसावी.

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 4:32 pm | Rajesh188

लवकर लिहा
बाकी इथे फक्त सामान्य लोकांच्या पैशाची सुरक्षितता ह्याची च काळजी आहे..
बाकी राजकारणात सामान्य लोकांना इंटरेस्ट नाही

हो का?

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 8:48 pm | Rajesh188

एक शंका आहे.
खासगी बँक बुडाली की त्या बँकेचे ज्याच्या कडे शेअर असतात ते त्याची किंमत चुकती करतात असा उल्लेख आपण केला आहे .
तर काही प्रश्न निर्माण होतात.
१) बँकेचे promotor नी केलेल्या चुकी मुळे बँक बुडाली तर बाकी शेअर होल्डर नी का शिक्षा भोगावी .
बँक तोट्यात जाणे आणि घोटाळे होवून ती बुडणे ह्या मध्ये नक्कीच फरक आहे.
२) बँक बुडाली अशी बातमी मीडिया मध्ये आली की त्या बँकेचे शेअर आपटतात.
त्या मुळे प्रमोटर कडून वसुली शक्यच नाही.
३) बुडालेल्या बँकेत नवीन भांडवल टाकलं तर च ती संस्था परत उभी राहून शेअर चे भाव वाढले की वसुली करता येईल .
पण बुडीत बँकेत कोण आपला पैसा गुंतवणे पसंत करेल.
४) pramotar बँकेत घोटाळा करून तेच पैसे बनावट कंपनी ओपन करून गुंतवू शकतो.
म्हणजे सरळ जबाबदारी टाळू शकतो.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:59 pm | मुक्त विहारि

उत्तरे, वाचायला आवडतील...

शा वि कु's picture

19 Mar 2021 - 9:30 pm | शा वि कु

शेअरहोल्डर ने नुकसान सहन करायचे नाही असे एकसुद्धा नुकसान नाही. इक्विटी ची संकल्पनाच ती आहे. प्रोमोटर ने फ्रॉड केला असल्यास त्याच्याकडून नुकसानभरपाई त्याचे घरदार विकून वसूल केली जाते. (Corporate veil is lifted.)
शेअरहोल्डर्स कडे कंपनीचे डायरेक्टर नेमण्याचे हक्क असतात. प्रोमोटर ने ह्यांव केले म्हणून आम्ही नुकसान भोगणार नाही असे म्हणणे कोणीही ऐकणार नाही.

बुडीत कंपनीचे शेअर केवळ भांडवल घातल्याने उभारी घेणार नाहीत. भांडवल चढ्या दराने घातले तरच वाढतील. उदा, कंपनीची किंमत १० रुपये प्रति शेअर असताना 12 रुपये प्रतिशेअर न नवे शेअर सबस्क्राईब झाले तर आणि तरच शेअरचे भाव १० वरून थोडेसे वर जातील. आणि हे असे सरकारशिवाय कोणीही करणार नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 9:32 pm | चंद्रसूर्यकुमार

खासगी बँक बुडाली की त्या बँकेचे ज्याच्या कडे शेअर असतात ते त्याची किंमत चुकती करतात असा उल्लेख आपण केला आहे .

नाही. एन.पी.ए मुळे बँकेचे नुकसान झाले तर त्याची किंमत शेअरधारक शेअरच्या किंमती खाली पडल्याच्या स्वरूपात चुकती करतात. बँक बुडणे ही खूप पुढची पायरी आहे. त्यासाठी एकतर बँकेने दिलेली कर्जे मोठ्या प्रमाणावर बुडित व्हायला हवीत किंवा बँकेकडे असलेल्या कॅशपेक्षा जास्त कॅशची मागणी होऊन 'रन ऑन द बँक' व्हायला हवा. बरेच अगदी बँक बुडेपर्यंत एन.पी.ए आले तरी बँकेत कोणा मायबापाने नवीन इक्विटी टाकली तरी बँक तगू शकते. सरकारी बँकांमध्ये ती परिस्थिती असते आणि ही इक्विटी करदात्यांच्या पैशामधून टाकली जाते. त्यामुळे सरकारी बँकेत एन.पी.ए आले की ते आपल्यासारख्या करदात्यांच्या खिशाला कात्री लावत असतात. पण खाजगी बँकेत (बँक दिवाळखोर होईपर्यंत) ती कात्री त्या बँकेच्या मालकांना म्हणजे शेअरधारकांच्या खिशाला लागते- सगळ्या करदात्यांच्या नाही.

येस बँकेला स्टेट बँक वगैरे सरकारी बँकांकरवी तगविण्यात आले यावरून मग सरकारी बँका पाहिजेत खाजगी बँका नकोत वगैरे बोलणार्‍यांच्या दोन गोष्टी लक्षात येत नाहीत--

१. येस बँक खाजगी बँकांमध्ये एच.डी.एफ.सी, आय.सी.आय.सी.आय, अ‍ॅक्सिस आणि कोटकनंतर पाचव्या क्रमांकाची मोठी बँक होती. सरकारी बँकांमध्येही स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा आणि कदाचित बँक ऑफ इंडिया याच बँका येस बँकेपेक्षा मोठ्या होत्या. म्हणजे ही बँक भारतीय बँकिंगमध्ये पहिल्या १०-१२ मध्ये तरी नक्कीच होती. इतकी मोठी बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येणे हा प्रकार भारतीय बँकिंगमध्ये अभूतपूर्व होता. अर्थात सरकारी बँकांमध्ये सरकारने वेळोवेळी इक्विटी टाकली नसती तर तीच वेळ सरकारी बँकांवरही आली असती ही गोष्ट वेगळी पण आपल्यासारख्या करदात्यांनी या सगळ्या सरकारी बँकांना तिथपर्यंत येऊ दिले नव्हते. भारतात आतापर्यंत अनेक लहानसहान बँका बुडल्या आहेत पण स्वातंत्र्यानंतर सात दशकात येस बँकच्या आकाराची बँक बुडायची वेळ पहिल्यांदाच आली होती. तेव्हा येस बँक हा अपवाद आहे नियम नाही. आणि इतकी मोठी बँक दिवाळखोरीच्या टोकापर्यंत गेली याचाच अर्थ विविध पातळ्यांवर ते आधी शोधून काढण्यात आलेले अपयश आहे. रिझर्व्ह बँकेचे दरवर्षी सगळ्या बँकांच्या लोन बुकचे ऑडिट होते. असे असताना नक्की कोणते नग येस बँकेच्या लोन बुकमध्ये आहेत हे रिझर्व्ह बँकेला कळले नाही? दुसरे म्हणजे बरीच वर्षे येस बँकेचे मुख्यालय मुंबईत वरळीला नेहरू सेंटरमध्ये होते (बहुतेक अजूनही असेल. बघायला हवे). ही इमारत सरकारी आहे. तिथे खाजगी कंपनीला जागा कशी मिळाली? तसेच येस बँकेचे काम बरोबर २००४ मध्येच चालू होणे आणि सरकारी इमारतीत ठाण मांडणे यामागे राणा कपूरांची एका केंद्रीय मंत्र्याशी असलेली जवळीक होती असे ऐकले होते. खखोदेजा. असो. तरीही ज्या रिझर्व्ह बँकेला कडक पर्यवेक्षक म्हणून नेमले आहे त्याच पर्यवेक्षकाला इतकी वर्षे राणा कपूर शेंड्या कसे लाऊ शकले? तेव्हा दरवेळी खाजगी बँकेने अमुक केले तमुक केले असे म्हणताना पर्यवेक्षक पण चुकला याकडे लोकांचे सोयीस्कर दुर्लक्ष होते.

२. येस बँक ही मोठी बँक बुडली असती तर त्यामुळे अर्थव्यवस्थेचे बरेच जास्त नुकसान झाले असते. याला too big to fail असे म्हणतात. त्यापेक्षा बँक तगविण्यासाठी कमी रिसोर्स लागले असते. त्यामुळे सरकारने ती बँक तगवायचा निर्णय घेतला. पण राणा कपूरना पहिल्यांदा हाकलले, त्यांच्यानंतर सीईओ आला होता त्याला पण हाकलले. किती सरकारी बँकांमध्ये अशाप्रकारे प्रमुखांना या कारणाने हाकलले गेले आहे?

बुडालेल्या बँकेत नवीन भांडवल टाकलं तर च ती संस्था परत उभी राहून शेअर चे भाव वाढले की वसुली करता येईल .
पण बुडीत बँकेत कोण आपला पैसा गुंतवणे पसंत करेल.

जर अशा आजारी बँकेचे शाखांचे नेटवर्क, ठेवीदारांची संख्या वगैरे चांगली असेल तर भविष्यात परत बिझनेस उभा राहू शकेल असे वाटत असल्यास गुंतवणुकदार असे पैसे गुंतवू शकतात. स्टेट बँकेने येस बँकेचे शेअर्स १० रूपये प्रतिशेअर घेतले त्यावेळी शेअरची किंमत १० पेक्षा जास्त होती. येस बँकेच्या लोन बुकमधून छत्तिसगड पॉवर, कॉक्स अ‍ॅन्ड किंग्ज वगैरे नग गेले की भविष्यात शेअरची किंमत वाढेल अशी आशा करायला हरकत नाही. अजून ३-४ वर्षांनंतर स्टेट बँक ८-१० पटींनी जास्त रिटर्न घेऊन येस बँकेच्या बाहेर पडली तरी आश्चर्य वाटायला नको. तेव्हा हे पैसे रिकव्हर होतील. काळजी नसावी.

प्रश्न हा की कोणत्या सरकारी बँकेने असे जबरदस्त रिटर्न आपल्या लोन बुकच्या दर्जामुळे दिले आहेत? दरवेळी सरकारने इक्विटी टाकली की यांचे शेअर्स तेवढ्यापुरते वधारणार. बघायचेच असेल तर गध्यांचे सरताज असलेले बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक वगैरे बघा.

तेव्हा मला वाटते की खाजगीकरण करावे कारण सरकारचे बिझनेसमध्ये असायचे काहीच कारण नाही. दुसरे म्हणजे काही गैरव्यवहार झाले तर त्याचा तपास कोण करणार? तर सरकार. असे असेल तर सरकारने त्या बिझनेसमध्ये असणे यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. तो टाळण्यासाठी सरकारने बँकिंगमध्ये नसावेच. आणि त्याबरोबरच रिझर्व्ह बँकेने कडक पर्यवेक्षण ठेवावे.

४) pramotar बँकेत घोटाळा करून तेच पैसे बनावट कंपनी ओपन करून गुंतवू शकतो.

१९९८ मध्ये अशा काही घटना घडल्या होत्या. काही कंपन्यांनी शेअरमार्केटमध्ये शेअर लिस्ट करून पैसे उभे केले आणि ते पैसे घेऊन कंपनीचे प्रोमोटर्स पळून गेले. पण अशा गोष्टींमध्ये कोणत्याही बँकेचा कोणी नव्हता. त्यामुळे याविषयी काही बोलता येणार नाही. घोटाळा करून मनी लाँडरींग म्हणाल तर त्याच कारणासाठी राणा कपूर तुरूंगात आहे. याविषयी नंतर कधीतरी लिहेन.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2021 - 10:33 pm | श्रीगुरुजी

येस बँकेच्या समभागाने दोन वेळा चांगला फायदा करून दिला. त्यामुळे हाव सुटली. तिसऱ्यांदा समभाग घेतले पण यावेळी अडकलो. राणा कपूरमुळे भाव गडगडला आणि सध्या ७५% समभाग कुलुपात बंद आहेत. भविष्यात समभागाचा भाव पूर्व किंमतीला येण्याची शक्यता कितपत आहे?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Mar 2021 - 10:37 pm | चंद्रसूर्यकुमार

भविष्यात समभागाचा भाव पूर्व किंमतीला येण्याची शक्यता कितपत आहे?

मी टेक्निकलवाला त्यामुळे भविष्यात काय होईल यापेक्षा चार्टवर बाय सिग्नल आहे का हे बघून विकत घ्यायचा निर्णय घेतो :)

शाम भागवत's picture

20 Mar 2021 - 8:41 am | शाम भागवत

@गुरूजी.

अजून ३-४ वर्षांनंतर स्टेट बँक ८-१० पटींनी जास्त रिटर्न घेऊन येस बँकेच्या बाहेर पडली तरी आश्चर्य वाटायला नको.

👆
हे वाचलं नाहीत का?
😀

शाम भागवत's picture

20 Mar 2021 - 8:47 am | शाम भागवत

येस बँकेच्या लोन बुकमधून छत्तिसगड पॉवर, कॉक्स अ‍ॅन्ड किंग्ज वगैरे नग गेले की भविष्यात शेअरची किंमत वाढेल अशी आशा करायला हरकत नाही

त्यासाठी कुठे 👆 लक्ष ठेवले पाहिजे हे ही लिहिले आहे की.
😉

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 11:50 pm | Rajesh188

सर्व प्रश्नांची उत्तर दिलीत त्या बद्द्ल धन्यवाद.
बँकिंग बद्द्ल अजुन माहिती मिळाली.

शाम भागवत's picture

20 Mar 2021 - 8:58 am | शाम भागवत

राणा कपूर प्रमाणे कोचरबाईंना पण भोगायला लागतंय. व्हिडिओकॉनचे धूत गेले आणि सगळंच बदलून गेलं.
परमेश्वर इच्छा बलियेसी.

गणेशा's picture

20 Mar 2021 - 9:08 am | गणेशा

नुकतीच laksmi विलास बँक हि private बँक foreign lender DBS मध्ये मर्ज करण्यात आली..
मला वाटते rbi ने देशाबाहेरील संस्थेला मर्ज होऊ दिलेली हि पहिलीच बँक असेल.

विशेष म्हणजे, ठेवीदारांचे पैसे वाचवण्यासाठी शेअर होल्डर चे सर्व पैसे यात zero झाले...
म्हणजे ज्यांच्याकडे शेअर होते त्यांची किंमती शून्य झाली.

राजेश जी,

Promotor आणि share holder थोडे सोप्प्या शब्दात सांगतो,

समजा एक किंवा काहि लोक एकत्र येऊन व्यवसाय चालू करतात ते promotor, पण business वाढीसाठी त्यांना लोन ची गरज भासते, पण त्या बदल्यात त्याचा intrest आणि परतावा द्यावा लागतो.. त्यामुळे promotor लोन ऐवजी आपली हिस्सेदारी समभाग मार्केट मध्ये आणतो,
त्यावेळेस आमचे fundamental हे आहे, एव्हडे भविष्यात काम आहे, मागील growth अशी आहे अशी अनेक fundamental गोष्टीं पाहून शेअर holder त्या कंपनीचा हिस्सा एक प्रकारे विकत घेतात.
म्हणजे loan ऐवजी हि रक्कम कंपनीला परवडते, पण नफा मात्र devide होतो..
पण उद्या promotor ने कंपनी दिवाळीत काढली तर त्या कंपनीचे समभाग घेणारे हि म्हणजेच शेअर holder यांच्यावर परिणाम होतो, कारण ते त्या कंपनीचे शेअर धारक असतात. आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होतेच.

समजा, एक मार्ट असेल आणि त्यांचा business खुप चांगला चाललेला असेल, त्या नंतर त्यांच्या एका ठिकाणावरून येणाऱ्या cash flow मधून दरवर्षी पुन्हा एक शाखा उभी राहू शकत असेल, मागचे सगळे fundamental चांगले असेल तर त्या पासून profit घेण्या साठी त्याचे शेअर चांगल्या भावाला घेतले जातात,
पण हे fundamental false पणे दाखवले असतील, आणि त्यामुळे दिवाळखोरी आली तर जेथे profit कमवायचे होते तेथे तोट्यात हिसस्सेदारी करावी लागते..

शेअर घेणे म्हणजे हिस्सेदारी विकत घेणे होय, त्यामुळे फायदा तोटा दोन्ही मध्ये सहभाग राहतो..

उद्या कंपनीचे दिवाळे निघाले तर तुमच्या share ला पण किंमत उरत नाही..

अलीकडची उदाहरणे घ्याल तर
Laksmi vilas bank
Rcom
Yes bank.

-
Yes bank मात्र आता पुन्हा जोमाने उभे राहताना दिसते आहे, बँकेचे नविन managment aggresive आणि भरीव काम करताना दिसते आहे आणि काही वर्षातच ती पुन्हा जुन्या लेवल कडे गेलेली असेल..

मी तरी yes बँकेला आता specukative न समजता त्याचे शेअर घेतो आहे.

Technically मागे, १३ rs ला १००० शेअर ते २१ रुपयाला विकले.
आता हि कालच पुन्हा १४.७० ला १००० शेअर घेऊन ठेवलेत भविष्यात २२ plus ला विकेल.

Fundamentali म्हणाल तर banking क्षेत्रात hdfc चांगली आहे.
आणि त्याचे शेअर मी long term साठी घेतलेले आहेत, मग त्यात every deep ला खरेदी करायची..

यामध्ये fundamental आणि technical दोन्ही अभ्यास आपलेच असतात आणि ते योग्यच असले पाहिजेत..
मागे असा धागा काढताना, अर्धे लिहून झाले होते, बघतो वेळ मिळाल्यास post करतो..

आग्या१९९०'s picture

20 Mar 2021 - 10:51 am | आग्या१९९०

समजा एक किंवा काहि लोक एकत्र येऊन व्यवसाय चालू करतात ते promotor, पण business वाढीसाठी त्यांना लोन ची गरज भासते, पण त्या बदल्यात त्याचा intrest आणि परतावा द्यावा लागतो.. त्यामुळे promotor लोन ऐवजी आपली हिस्सेदारी समभाग मार्केट मध्ये आणतो,

थोडं अवांतर होईल ह्या धाग्यावर, परंतू नव्वदच्या दशकात कंपन्या convertible आणि non convertible debentures द्वारे बाजारातून गुंतवणूकदारांकडून कर्ज उभारत असतं. ह्यात सामान्य गुंतवणूकदारही हे debentures खरेदी करू शकत असे. हे ठराविक मुदतीचे असायचे आणि त्यावर आकर्षक व्याज मिळत असे. कंपनीच्या दृष्टीने हा महागडा प्रकार होता. हल्ली हा प्रकार दिसत नाही.

गणेशा's picture

20 Mar 2021 - 11:11 am | गणेशा

Debunture ला पर्याय म्हणूनच bonds आहेत.
जे कमी व्याज दर देत असतील तरीही debunture पेक्षा जास्त secured असतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, market वरती त्याचे व्याज depend नसतात, debunture is fully dependent on companies market value

आग्या१९९०'s picture

20 Mar 2021 - 11:17 am | आग्या१९९०

कळलं नाही.
Debenture वरील व्याज फिक्स होते. उदा: एस्सार ऑईलचे १३ की १४ % होते.

गणेशा's picture

20 Mar 2021 - 11:58 am | गणेशा

माझा equity संदर्भात अभ्यास जास्त आहे, त्यामुळे exact सांगू शकेल असे नाही.
पण debenture वर fixed व्याज कंपनी देत असेल तर ती नक्कीच collteral वरती असेल, For liquidity.

सोप्या भाषेत सांगायचे तर, माझ्याकडे x मशिन्स आणि y asset असतील आणि त्यातील y asset collateral दाखवून मी fixed debenture वर fixed व्याज देत असेल.

पण यात ती asset इतर कोणालाच मग मला विकता किंवा भाड्याने देता येत नसते.

त्या पेक्षा कंपन्या floating debanture वापरतात , पण liquidity प्रॉब्लेम मुळे fixed debunture essar oil ने दिले असेल.

प्रदीप's picture

20 Mar 2021 - 12:18 pm | प्रदीप

मजजव़ळ्च्या फायनॅन्शियल अकौंटिंगच्या पुस्तकांतून शब्दशः

Mortage Bond is a form of long- term debt that is secured by the pledge of specific property.

Debenture is a debt security with a general claim against all assets rather than specific claim against particular assets.

Subordinated Debentures are debt securities whose holders have claims against only the assets that remain after the claims of general creditors are satisfied.

तेव्हा कंपनीचे दिवाळे निघाले, तर सर्वप्रथम क्लेम मॉर्गेज बाँड्सवाल्यांचा, त्यापुढील क्लेम, डेबेंच्युर्स व कंपनीच्या ऑपेरशन्स्शी संबंधित इतरांचा-- सप्लायर्स, कंपनीचे कर्मचारी वगैरे-- व त्यापुढे जर अ‍ॅसेट्स राहिलेच, तर सबॉर्डिनेटेड डेबेंच्युर्सवाल्यांचा.

म्हणजे-- डेबेच्युर्स, सबॉर्डिनेटेड डेबेण्च्युर्स हे बाँड्स आहेत, ज्याप्रमाणे फर्स्ट, सेकंड बाँड्स हेही बाँड्सच आहेत. पण त्यांच्या कूपन- रेट्स मधे त्यांच्या रिस्कप्रमाणे फरक असतो-- मॉर्गेज बाँड्स--> डेबेण्च्युर्स--> सबॉर्डिनेटेड डेबेन्च्युर्स असे चढत्या क्रमाने.

आग्या१९९०'s picture

20 Mar 2021 - 12:48 pm | आग्या१९९०

बरोबर. ह्यात कंपलसरी कन्वर्टिबल इन इक्विटी आणि नॉन कंपलसरी कनव्हर्रटीबल डिबेंचर होते. कंपलसरी कन्वर्टिबल डिबेंचर म्हणजे कंपनी बुडाली की पैसे बुडाले.

अनुप ढेरे's picture

20 Mar 2021 - 3:30 pm | अनुप ढेरे

शेअर होल्डर नी का शिक्षा भोगावी .

शेअर होल्डर्स हे मालक असतात. शेअर हा मालकी हिस्सा असतो कम्पनीमध्ये. कंपनीच्या फायद्याचा हिस्सा मालकांना मिळतो. (डिव्हिडंड). त्यामुळे जेव्हा व्यवसाय बुडतो तेव्हा मालकांचे भान्डवल बुडते. त्यामुळे शेअर होल्डरचे भांडवल बुडते. यात अन्यायकारक काहीच नाही. शेअर विकत घेताना ( म्हणजेच कंपनीचा मालकी हिस्सा विकत घेताना) धंदा बुडण्याची शक्यता किती हा विचार करणे आवश्यक आहे. म्हणुनच थेट शेअर अभ्यास असल्याशिवाय घेऊ नयेत. म्युचुअल फंड (त्यातही इन्डेक्स फंड) सही है हे ध्यानात ठेवावे.

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 6:24 am | चौकस२१२

खाजगी करणाला टोकाचा विरोध करणाऱ्यांनी हे आपले वाक्य जरूर वाचावे
म्हणजे येस बँकेसारखे काही झाले तर ते लगेच दिसते पण सरकार वेळोवेळी अशी इक्विटी बँकांमध्ये टाकत असते ते दिसत नाही म्हणून असल्या लोकांना बोंबा मारायला वाव मिळतो.

आनन्दा's picture

23 Mar 2021 - 9:12 am | आनन्दा

तसे ते नाही.

सरकारी बँकांचे सर्वेसर्वा मंत्री असतात.. आणि सरकार मंत्री वगैरे म्हटले की भ्रष्टयाचार आलाच. तो तर शासनाचा अविभाज्य भाग आहे, त्यामूळे सरकारी बँकेत भ्रष्टाचार झाला तर त्यात नवल नाही.

खासगीमध्ये भ्रष्टयाचार झाला तर मात्र धर्म बुडाला :)

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 4:33 pm | मुक्त विहारि

हम गलतीयोंसे सिखते है.... M told to James Bond...

भारतीय लोकांची बचत करण्याची सवय आहे आणि त्या मुळेच जागतिक मंदी मध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था बाकी देशांसारखी कोलमडून जात नाही.
अमेरिकन लोकांना ती सवय नाही आज कमवा आणि आजच संपवा अशी त्यांची वृत्ती असते.
म्हणूनच अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कर्ज बाजारी देश आहे.
ठेवी वर व्याज कमी करणे म्हणजे उधळपट्टी ला प्रोत्साहन देणे आहे.
बाकी ठेवी वरचे व्याज,कर्जाचे व्याज हे अर्थव्यवस्था कशी आहे ह्याच्या शी संबंधित असावे त.
कृत्रिम पने त्या मध्ये कोणी हस्तक क्षेप करू नये.
पाश्चिमात्य देशांन follow करण्याची बिलकुल गरज नाही.
आपल्या देशाला जे योग्य तेच धोरण असावे.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 6:51 pm | मुक्त विहारि

एक नविन शब्द पण मिळाला ...हस्तक क्षेप
-----------
ज्ञाना बरोबर, शब्दकोश पण....

कर्नलतपस्वी's picture

19 Mar 2021 - 8:03 pm | कर्नलतपस्वी

या विषयातील ज्ञान जवळपास शून्य, लेख व त्यावरील प्रतीसादा मुळे पुष्कळ गोष्टी लक्षात येऊ लागल्या. लेखकाचे व प्रतीसादकांचे धन्यवाद. स्पष्टवक्ते पणा हवा पण उपमर्द नसावा

Point Noted

अनन्त अवधुत's picture

20 Mar 2021 - 12:36 pm | अनन्त अवधुत

चांगला धागा आहे. लेखक आणि प्रतिसादकांचे आभार.

इथे विशिष्ट प्रकारचे प्रतिसाद लिहिणाऱ्यांना एक साधी गोष्ट कळत नाही. बॅंकिंग हा बिझनेस आहे. सरकारी असो व खाजगी. जे लोक सरकारी बँकांबरोबर डील करतात त्यांना माहीत असते की सरकारी बँकांचे बजेट तुटपुंजे असते आणि पैसे उधळणे वगैरे प्रकार तिथे केले जात नाहीत. पण बिझनेस असल्यामुळे एखाद्याला कर्ज द्यायचे तर रिस्क analysis करूनच ते दिले जाते. विजय मल्ल्याला कर्ज देणे ही चुकीची गोष्ट नव्हतीच. कारण त्याचे assets, त्याच्या बिझनेस चे रिस्क analysis केले असता रेड flags बहुधा आले नसावेत. शिवाय तो MP असल्याने पळून गेला हे देखील आश्चर्यच आहे. पण सरकारी बँकेला तो असे काही करू शकेल याची कल्पना असणे अशक्य आहे. दुसरा महत्वाचा मुद्धा सरकारने अर्थशास्त्राचे / इकॉनॉमी चे वाटोळे केले असे म्हटले जाते. या बँकांचे npa हे मागील दशकांपासून आहेत. किंबहुना या सरकारने बँकिंग मध्ये अतिशय चांगल्या सुधारणा आणल्या आहेत. बँका जे NPA चे आकडे दाबून ठेवायच्या ते उघड करून बॅड लोन्स एक तर वसूल करावेत किंवा मग राईट ऑफ करावेत हे चालू आहे आणि हे असेच असले पाहिजे. शेवटचा मुद्दा खाजगिकरणाचा. खाजगीकरण का करायचं आहे? तर छोट्या बॅंक्स liquidity requirements किंवा overall regulatory requirements ला नीट प्रकारे implement करू शकत नाहीत. त्यांच्या शाखांचे पण नीट सुलगीकरण झालेले नाही. एकतर या बँका एकत्रीकरण करायला हव्यात, जे सध्या चालू आहे किंवा मग विकून टाकायला हव्यात. ज्या बॅंक्स मध्ये सरकारचा strategic इंटरेस्ट नाही, त्यात सरकारला रस नाही. बँक मोठी आणि भक्कम असेल तर ती strategic गोष्टींसाठी वापरता येते (उदाहरणार्थ चीन च्या प्रतिस्पर्धे मध्ये आफ्रिकन देशांना कर्जे देऊन आपले राष्ट्रीय हित साधणे). ती सरकारी आहे की खाजगी हे बिनमहत्वाचे असते. बऱ्याच गोष्टी असतात ज्या सर्व सामान्यांना माहीत नसतात तेव्हा ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसते तिथे तोंड मोकळे सोडणे हे फारसे चांगले नाही.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:57 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, पोस्ट जिंदाबाद...

पोस्ट सुद्धा एक प्रकारची बँक आहे. पोस्टाला मिळालेले पैसे कसे गुंतवले जातात याची कल्पना नाही. पण जर पोस्ट तोट्यात असेल तर ती सुविधा चालवण्यात काहीच (टपाल) हशील नाही. माझ्या मते पोस्टाचा बिझनेस sustainable नाही. सरकारचं पाठबळ आहे म्हणून चालू आहे.

ज्या काळी बँकिंग आणि विमा सेवा देशांत प्रगल्भ नव्हत्या तेंव्हा पोस्टल सेविंग स्कीम ह्याला अर्थ होता. आता त्याला अजिबात अर्थ उरलेला नाही. सामान्य जनतेची ठेव पोस्टल खाते घेऊन भारत सरकारला देते आणि भारत सरकार कर्ज म्हणून ते पैसे धरणे, रस्ते इत्यादीत गुंतवते. विभीषणाने पैसे उधार आणून रावणाला द्यावेत असा हा प्रकार. बहुतेक वेळा भारत सरकार नवीन पैसे छापून ह्या कर्जाची किंमत कमी करते.

अक्खे पोस्ट खातेच सस्टेनेबल नाही.

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 6:39 am | चौकस२१२

सहमत पिनाक

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 9:02 pm | Rajesh188

सध्या फक्त आपण खासगी बँकेत सामान्य लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील का?
एवढ्याच मर्यादित विषयात बोलत आहोत.
खासगी बँका कशा गरजेच्या आहेत,,,हा भाग नंतरचा आहे.
पाहिले बेसिक प्रश्नांची उत्तरं तरी मिळू ध्या .
नंतर दुसऱ्या देशांना कर्ज द्यायला जा.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 9:11 pm | मुक्त विहारि

आपला पैसा, सुरक्षित कसा ठेवायचा? ही आपली वैयक्तिक जबाबदारी असते...

मी माझ्या परीने, पोस्ट हा पर्याय निवडला आहे.

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,

लग्न करायचे ते आपण आणि पोसायचे इतरांनी, अशी वृत्ती असेल तर, मग शेजारी बायकोला घेऊन पळून गेला तर बोंबलण्यात काही अर्थ नाही...

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 9:12 pm | मुक्त विहारि

आपला पैसा, सुरक्षित कसा ठेवायचा? ही आपली वैयक्तिक जबाबदारी असते...

मी माझ्या परीने, पोस्ट हा पर्याय निवडला आहे.

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,

लग्न करायचे ते आपण आणि पोसायचे इतरांनी, अशी वृत्ती असेल तर, मग शेजारी बायकोला घेऊन पळून गेला तर बोंबलण्यात काही अर्थ नाही...

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 9:17 pm | Rajesh188

विश्वास नाही का.
सरकारी पोस्टावर च तुमचा विश्वास आहे हे वाचून बरं वाटलं.

माझा मोदींशिवाय, कुणावरच विश्र्वास नाही...

पोस्टात पैसे ठेवत होतो आणि आहे, कारण, पोस्टावर कुठल्याच व्यक्तीचा किंवा संघटनेचा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग नाही...स्वातंत्र्याच्या आधीपासूनच पोस्ट खाते आहे...

उद्या, "मोदींनी", पोस्ट जर खाजगी केले तरी पोस्टातच ठेवीन...

हां पण कधी काळी भविष्यात, कॉंग्रेसने जर, पोस्ट खाजगी केले तर मात्र, लगेच पैसे काढीन....

कॉंग्रेस, माझ्यासाठी नाही, ह्यावर माझा ठाम विश्र्वास आहे....

सरकारी बँकेत पैसे सुरक्षित असतील याची गॅरंटी कोण देणार? सरकार. सरकार पैसे कुठून आणतं? लोकांकडून टॅक्स गोळा करून. थोडक्यात कुणी सरकारी बँकेत fraud केला, तर सरकार तुमच्या माझ्या खिशात हात घालतं आणि नुकसानभरपाई देतं. थोडक्यात, fraud ची वसुली सरकार ज्यांना त्या बँकेशी काही देणं घेणं नाही अशा लोकांच्या खिशातून करतं. विरोध आहे तो या साठी आहे, की हे मॉडेल चालवणे सरकारची जबाबदारी नाही. सरकार ने बँके बद्दल कायदे बनवावेत. बँका चालवू नयेत. बँक त्याने चालवावी ज्याला तो बिझनेस करायचा आहे आणि ज्याला तो बिझनेस करता येतो. बाकी शेवटच्या वाक्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. Foreign policy, इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि इकॉनॉमी वर मी बोलू शकतो. अशा रद्दड कॉमेंट्स माझ्याशी बोलताना टाळाव्यात ही अति नम्र विनंती.

हे वाक्य नेहमी ऐकायला मिळते,जेव्हा खासगीकरण ह्या विषयावर चर्चा होते तेव्हा वरील वाक्य समर्थक वापरतात.
पण ते पूर्ण सत्य आहे का?
साधं लहान उदाहरण घेतले तर थोडे समजायला सोपे जाईल.
मुंबई मध्ये एक हौसिंग सोसायटी आहे तिथे राहणाऱ्या व्यक्ती ल maintance द्यावा लागत नाही उलट सोसायटी च प्रतेक मे मेंबर ल वार्षिक दोन ते तीन लाख देते.
कारण त्यांची अजुन एक कमर्शिअल बिल्डिंग आहे त्याचे भाडे च खूप येते की खर्च भागून उलट पैसे शिल्लक राहतात.
सरकार ला पण हे उदाहरण लागू पडत .
कर वसूल करून सरकारी खर्च भागवला जातो.
पण सरकार नी जर उद्योग पण चालवले तर त्या मधून जो नफा मिळेल तो अतिरिक्त पैसा सरकार कडे येईल आणि फक्त लोकांकडून करवसुली करून खर्च भागविण्याची वेळ येणार नाही.
लोकांवर कराचा बोजा कमी होईल.
एलआयसी,Hpcl,भारत पेट्रोलियम,आणि अशा काही संस्था ह्या फायद्यात चालू आहेत.
आणि त्यांनी मिळवलेला फायदा सरकार ला समाज उपयोगी कामासाठी उपयोगी पडत आहे.
फक्त योग्य नियंत्रण ठेवून सरकार नी काही उद्योग चालवले तर ते देश हिताचेच आहे.
फक्त भोंगळ कारभार नसावा.

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 6:42 am | चौकस२१२

फक्त योग्य नियंत्रण ठेवून सरकार नी काही उद्योग चालवले तर ते देश हिताचेच आहे.
फक्त भोंगळ कारभार नसावा.

हे बरोबर आहे राजेश पण ते तसे होत नहिना !

अर्धवटराव's picture

19 Mar 2021 - 10:07 pm | अर्धवटराव

सरकारी बँकेत पैसा राहु देऊ कि काढुन टाकु?

प्रश्न दुपदरी आहे.
बँका, किंवा इतर कुठल्याही व्यवस्था, या व्यवसायासाठी आहेत कि रोजगारासाठी ?
भांडवलशाही म्हणते तो विव्वळ व्यवसाय आहे
साम्यवाद (समाजवाद नाहि) म्हणतो ति रोजगार हमि योजना आहे
समाजवाद म्हणतो कि व्यवसाय जरुर करावा पण कमिटमेण्ट अर्धवट टाकु नये.

समाजवादाचं म्हणणं योग्य वाटतं.

आपण बसमधे प्रवासाला बसलो. रस्त्यात गाडी बिघडली. गाडी मालकाला ति दुरुस्त करणं अव्यवहारीक वाटलं. त्याने निम्मे पैसे ग्राहकांना परत करुन कलटी मारली. अगदीच वाईट परिस्थिती असेल तर दिवाळं घोषीत करुन सरळ हात वर केले. व्यवहार दृष्टीने यात काहि चुक नाहि.
बस मालकाने परत केलेल्या रकमेतुन, काहि कमि जास्त करुन, कदाचीत उर्वरीत प्रवास पूर्ण झाला. किंवा आपल्याला उर्वरीत प्रवास स्वखर्चाने करावा लागला. प्रवाशांचं अर्ध्या पैशांचं नुकसान झालं. पण प्रवास वेळेत, ठरलेल्या किमतीत पूर्ण न होण्यामुळे जे मुल्यात्मक नुकसान झालं त्याचं मोजमाप कसं करणार?

लोकांनी बेंकेत पैसा ठेवला, बँकेत नोकरी सुरु केली. खेळ अर्ध्यावर आला आणि बँकेत गडबड झाली. मुल्यात्म्क जोखीम कशी निस्तरणार?

बँका, किंवा इतर व्यवस्था, खासगी असाव्या कि सरकारी हा प्रश्न नाहि कदाचीत.
त्यांचं नियमन किती काटेकोरपणे, प्रामाणीकपणे, आणि पारदर्शीपणे होतं हा खरा प्रश्न.
लोकांचा नियमन व्यवस्थेवर सकारण/अकारण भरोसा नसणं हि मुख्य समस्या.

सरकारने जनतेच्या रोजगाराची, जीवनातल्या विवीधांगी सुरक्षेची हमी घ्यावी का? अगदी १००% घ्यावी.
त्याकरता सरकार सांगेल ते नियम जनता चोखपणे पाळेल का? उत्तर संदिग्ध आहे.
सरकार देखील आपलं कर्तव्य चोखपणे बजावतं काय? हे ही संदीग्ध आहे.

असो. तूर्तास २५% पैसा एसबीआय मधे ठेवावा. उरलेला इतर ठिकाणि गुंतवावा.

> समाजवाद म्हणतो कि व्यवसाय जरुर करावा पण कमिटमेण्ट अर्धवट टाकु नये.

समाजवादाचे तत्व तसे अजिबात नाही आहे.

समाजवादी तत्वाप्रमाणे सरकारी लोकांना जास्त अधिकार आणि एकाकडून पैसे घेऊन सरकारने गरजू म्हणून घोषित केलेल्या लोकांना (गरज पडली तर नुकसान करून) द्यायचे.

> आपण बसमधे प्रवासाला बसलो. रस्त्यात गाडी बिघडली. गाडी मालकाला ति दुरुस्त करणं अव्यवहारीक वाटलं. त्याने निम्मे पैसे ग्राहकांना परत करुन कलटी मारली. अगदीच वाईट परिस्थिती असेल तर दिवाळं घोषीत करुन सरळ हात वर केले. व्यवहार दृष्टीने यात काहि चुक नाहि.
बस मालकाने परत केलेल्या रकमेतुन, काहि कमि जास्त करुन, कदाचीत उर्वरीत प्रवास पूर्ण झाला. किंवा आपल्याला उर्वरीत प्रवास स्वखर्चाने करावा लागला. प्रवाशांचं अर्ध्या पैशांचं नुकसान झालं. पण प्रवास वेळेत, ठरलेल्या किमतीत पूर्ण न होण्यामुळे जे मुल्यात्मक नुकसान झालं त्याचं मोजमाप कसं करणार?

अगदी बरोबर प्रश्न आहे. पण इथे बस मध्ये बसताना आपण जेंव्हा तिकीट विकत घेतले तेंव्हा आपले काँट्रॅकट काय आहे आणि ते काँट्रॅक्त्त बसवल्याने व्यवस्थित पणे पाळले कि नाही हे महत्वाचे आहे. मुक्त आर्थिक व्यवस्थेंत आपोआप ह्या गोष्टी जुळून येतात फक्त काँट्रॅक्त्त मोडणाऱ्या माणसाला शिक्षा करण्याचे काम सरकारने केले पाहिजे.

उदाहरणार्थ मी नीता वोल्वो ने मुंबईहून गोव्याला जाते. नीता च्या नियमाप्रमाणे मी १००० रुपये तिकीट मोजावे आणि त्या बदल्यांत मुंबईहून गोव्यांत घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांची. अमुकच तासांत घेऊन जाऊ अशी मात्र खात्री ते देत नाहीत पण बस मोडल्यास दुसरी बस ताबडतोब पाठवून आपल्याला गंतव्य स्थानी घेऊन जातात. ह्याच्या उलट पावलु ची सेवा आहे. ते फक्त ८०० रुपयांत तुम्हाला गोव्यांत घेऊन जातात, नीता पेक्षा जास्त वेगाने ह्यांची बस जाते पण बस मोडल्यास ते फक्त तिकिटाचे पैसे परत देतात. पण त्यांचे तिकीट म्हणून मार्केट दर पेक्षा २०० रुपये कमी आहे.

सर्वच सेवा अश्या असतात. स्टेट बँक सरकार बुडवणार नाही ह्याची खात्री असल्याने लोक त्यांची निकृष्ट दर्जाची सेवा दुर्लक्षित करतात. तर ज्यांचा खेळता पैसा आहे ज्यांना अनेक सेवा सुविधा हव्या आहेत असे लोक ICICI/HDFC पसंद करतात.

२०२१ मध्ये भारत सरकारने १०-१२ बँका का चालवाव्यात ह्याला काहीही अर्थ नाही. सरकारी बँकच हवी असेल तर पाहिजे तर सर्व शाखांचे विलीनीकरण स्टेट बॅंक मध्ये करावे आणि जास्त असलेल्या शाखा बंद कराव्यात इतरांना विकून टाकाव्यात. एकाच गावांत स्टेट बॅंक आणि बँक ऑफ बरोडा ने शाखा टाकावी म्हणजे चितळे बंधूनी भांडून एकाच बिल्डिंग मध्ये दोन दुकाने टाकून तोच माल एकमेकांशी स्पर्धा करत विकावा.

मागील १० वर्षांत जे बदल संपर्कक्षेत्रांत झाले आणि ज्या पद्धतीने BSNL/MTNL ने प्रचंड पैश्यांचा अपव्यय केला, त्याच पद्धतीने येत्या १० वर्षांत सरकारी बँक आर्थिक क्षेत्रांत गोंधळ माजवणार आहेत.

अर्धवटराव's picture

19 Mar 2021 - 11:55 pm | अर्धवटराव

कमिटमेण्ट अर्धवट टाकु नये याचाच अर्थ प्रसंगी पदरमोड करुन नुकसान भरपाई करावी.
त्याकरता सरकारकडे एकच मार्ग उरतो... आहे रे वर्गाकडुन प्रेमाने पैसा काढावा =))

अवांतरः
बँकांनी फक्त आर्थीक फायद्याच्याच विचार करुन कर्ज द्यायचे म्हटले तर अशी अनंत क्षेत्रे आहेत जिथे आर्थीक फायदा किरकोळ/उशीराने होतो पण एकुण जगणं उत्तम व्हायला तिथे पैसा पुरवणं आवष्यक असतं.
हे काहिसं डिग्री कोर्सला सायन्स-आर्ट्स घ्यावे कि अभियांत्रीकी या अंगाने जातं

बँकांना भलेही हा विचार करायची गरज नसते, पण सरकारला तो करावा लागतो. किंबहुना ते मुख्य कर्तव्य आहे सरकारचं. यासाठी सरकारने आपली स्वतंत्र यंत्रणा उभारतो म्हटलं तर ति एक प्रकारची बँकच झाली. आता या बँकेला स्वतःचा फायदा देखील बघावा लागेल, अन्यथा तिला आवषक त्याठिकाणी अर्थ पुरवठा करणं जमणार नाहि. त्यामुळे तिथे व्यावसायीकता देखील आली.

प्रायव्हेट सेक्टरचा उद्देश फायद्याने फायद्याचे फायद्यासाठी काम करणे
सरकारचा उद्देश फायद्याने लोककल्याणाचे काम करणे

मूळ उद्देशच भिन्न आहे.

साहना's picture

20 Mar 2021 - 11:02 pm | साहना

> बँकांना भलेही हा विचार करायची गरज नसते, पण सरकारला तो करावा लागतो.

तुम्ही जास्त खोलांत जाऊन विचार केला तर तुम्हाला लक्षांत येईल कि ह्या तुमच्या व्यक्तव्याला काहीही अर्थ नाही. नाहीतर आपण उदाहरण द्या.

जिथे भांडवलावर खात्रीशीर रिटर्न मिळण्याची शक्यता असते तिथे व्याजदर कमी आणि जिथे धोका जास्त तिथे व्याजदर कमी हे निव्वळ नफाखोरीचे लक्षण नसून समाजहित सुद्धा आहे. व्याजदर कमी असल्याने जास्त लोक अश्या खात्रीशीर धंद्यांत जातात आणि जिथे व्याजदर जास्त तिथे कमी लोक जातात आणि पर्यायाने ह्यातील अनेक कर्जे बुडली तरी बँक आर्थिक दृष्ट्या सुधृद राहते. सरकार असो वा खाजगी बँक हे तत्व सगळीकडे समान आहे.

अर्धवटराव's picture

22 Mar 2021 - 7:06 pm | अर्धवटराव

अगदी साधं उदा. घ्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला काहि टेक्नीकल कोर्स करुन व्यवसाय/नोकरीच्या संधी मिळत असतील (जावा/एम्बडेड सिस्टीम च्या कोर्सेसचं पेव फुटलं होतं दोन दशकांपूर्वी. सिडॅक वगैरे संस्थांचे कोर्सेस पण असायचे) तर बँका त्याला कर्जपुरवठा करायला आरामात तयार होतील. बिहारच्या एखाद्या विद्यार्थ्याला दिल्लीला जाऊन सनदी नोकरीच्या तयारीसाठी बँका कर्ज देतील का? नोकरी मिळण्याचे गुणोत्तर व्यस्त प्रमाणात असल्यामुळे बँकांसाठी तो रिस्की व्यवहार असेल. बँका एक रुपया देखील पणाला लावणार नाहि. लाऊ पण नये. पण सरकार अशा वेळी हजार रुपयाची रिस्क देखील घेईल. कारण कोलॅटरल फायदे केवळ आर्थीक नसुन सामाजीक आहेत. अश वेळी बँकांना त्यात इंट्रेस्ट नसणं आणि सरकारला त्यात इंट्रेस्ट असणं, दोन्ही स्वाभावीक आहे. आणि त्यांच्या दिमतीला सारखीच आर्थीक व्यवस्था आहे.

तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, पण माझ्यामते सरकार म्हणजे सरकारी बँक नाही.

सरकारला अश्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे असेल तर अनेक मार्ग आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर पासून बँक guarentee पर्यंत.

त्यासाठी बँकिंग मध्ये उतरायची गरज नाही

साहना's picture

23 Mar 2021 - 2:36 am | साहना

+१

पब्लिक गुड म्हणजे सामाजिक हिताची कामे हि सरकारी कर पैशानीच झाली पाहिजेत म्हणजे त्यावर लोकशाही मार्गाचा अंकुश राहतो. लोकांना उत्तर देण्यास सरकार बांधील राहते. बँकाच्या मार्गे असल्या गुंतवणुकी म्हणजे अप्रत्यक्ष कर आहे आणि बँकांतील बहुतेक गुंतवणूकदार हे मध्यमवर्गीय असल्याने फक्त मध्यमवर्गीयांवर असलेला कर आहे.

साहना's picture

23 Mar 2021 - 2:34 am | साहना

> बिहारच्या एखाद्या विद्यार्थ्याला दिल्लीला जाऊन सनदी नोकरीच्या तयारीसाठी बँका कर्ज देतील का? नोकरी मिळण्याचे गुणोत्तर व्यस्त प्रमाणात असल्यामुळे बँकांसाठी तो रिस्की व्यवहार असेल. बँका एक रुपया देखील पणाला लावणार नाहि. लाऊ पण नये. पण सरकार अशा वेळी हजार रुपयाची रिस्क देखील घेईल. कारण कोलॅटरल फायदे केवळ आर्थीक नसुन सामाजीक आहेत.

पण तुमचा मूळ मुद्दा असा आहे कि काही क्षेत्रे अशी असतांत ज्यांत गुंतवणूक करून "सामाजिक हित" साध्य केले जाते. अश्या क्षेत्रांत बँका कधीही गुंतवणूक करणार नाहीत कारण त्यांत १००% नुकसान असते. ह्याचे उदाहरण म्हणजे गांवातील शाळा. शाळेवर फक्त खर्च होतो, उत्पन्न काहीच नाही. पण विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होतो. शाळा सुरु करण्यासाठी कुणीच बँक तुम्हाला लोन देणार नाही. पण तर हीसुद्धा शाळा बांधण्यात गुंतवणूक करणे समाज हिताचे आहे आणि काही प्रसंगी त्यांत सरकारने गुंतवणूक करावी अशी अपेक्षा सुद्धा रास्त असू शकते. (सीमे नजदिक असलेल्या रस्त्यांचे बांधकाम हे राष्ट्र हिताचे आहे पण त्यावर परतावा नाही, सर्व जनतेला वॅक्सीन देणे समाजहिताचे आहे पण त्यावर परतावा नाही).

पण अशी गुंतवणूक करण्यासाठी "बँक" हे पूर्ण पणे चुकीचे माध्यम आहे. कारण बँकेतील पैसे हे लोकांचे पैसे असतात, ते घेऊन बळजबरीने हे पैसे समाजहितासाठी वाळवणे नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे पण त्यामुळे नफा आणि सुरक्षितता ह्या दोन गोष्टीवर आधारित बँक ह्या संस्थेला विनाकारण "चॅरिटी" ह्या क्षेत्रांत घुसवले जाते आणि त्यातून सर्वांचीच रिस्क वाढते.

समाजहित उपयोगी कामासाठी "कर" हि संकल्पना ह्यासाठीच आहे. सरकारने गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जरूर चालवाव्यात पण स्टेट बँकेला निवृत्त्त लोकांच्या ठेवी विद्यार्थ्यांना कर्ज म्हणून देण्यास भाग पाडू नये.

--

बिहारी विद्यार्थ्याला लोन देण्यांत बँक घाबरत आहे ह्याचा अर्थ काय ? तर त्या पैश्यांवर परतावा असण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे १०० कोटीची एकूण कर्जे दिली तर कदाचित ८० कोटीच परत येतील. ह्या उलट इलेकट्रिशिअन च्या कोर्स करणाऱ्या लोकांवर १०० कोटी खर्च केले तर ११० कोटी परत येतील.

इथे बँक आणि सरकारची विचारसरणी वेगळी का असायला पाहिजे ? सरकारजवळ जर १०० कोटी असतील तर ते खात्रीशीर रोजगार मिळवणाऱ्या गरीब लोकांना देणे रास्त नाही का होणार ? सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पण बनण्याची शक्यता कमी असणाऱ्या व्यक्तीला का बरे प्राधान्य द्यावे ? अश्या लोकांना प्राधान्य देणे म्हणजे चुकीच्या करियर निवडीला त्यांना प्रोत्साहन देणे नव्हे काय ? इथे सरकारने भले नुकसान सोसून अश्या व्यक्तींना लोन द्यावे हा मुद्दा पटला नाही.

लोन लवकर मिळते ह्याचा अर्थ काय ? तर लोन घेण्याचे कारण जे आहे ते किती "सेफ" आहे हे ग्राहकाला त्यातून समजते. गृहकर्ज सोपेपणाने मिळते कारण गृह आणि जमीन ह्याला खूप किंमत आहे. बँका आपला फायदा पाहत असताना नकळत ग्राहकाला हि महत्वाची माहिती पुरवत असतात. ह्या उलट रिस्की व्यवहारांत पैसे गुंतवण्यासाठी कर्ज मिळणे कठीण होते ह्यातून रिस्क किती आहे हे ग्राहकाला आपोपाप समजते. सनदी नोकरीच्या शिक्षणासाठी बँक कर्ज देत नसेल ह्याचा अर्थ त्या शिक्षणात काहीही फायदा नाही आणि नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे हि महत्वाची माहिती ग्राहकाला मिळते.

ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे अमेरिकेतील साधायची विद्यार्थी कर्जे. अमेरिकन सरकारने तुम्ही दिलेले उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना कर्जे देण्यास बँकांना भाग पाडले. आता त्याची परिणीती अश्यांत झालीय कि प्रचंड पैसे खर्च करून पूर्णपणे निरुपयोगी डिग्र्या घेऊन मुले हफ्ते फेडत बसली आहेत. सरकारी हस्तक्षेप नसता तर बँकांनी लोन दिलेच नसते.

लोन ह्या प्रकारांतील फायद्या नुकसानाची गणिताने फक्त बँकेचे नाही तर ग्राहकांचा सुद्धा प्रचंड फायदा होतो. फक्त कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा सुद्धा प्रचंड फायदा होतो. उदाहरण पहा. तुम्ही एक फ्लॅट घ्यायला गेलात, कागदपत्रे पाहून HDFC ने तुम्हाला कर्ज देण्यास नकार दिला. मग भलेही तुमच्याकडे प्रचंड पैसा असला तर ते घर घेणे हिताचे ठरेल काय ? अनेक ग्राहकांची कर्ज अँप्लिकेशन अश्या प्रकारे रीजेक्त व्हायला लागली मग त्या प्रोजेक्त चे रेप्युटेशन मार्केट मध्ये काय होईल ? आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण प्रकल्पावर काय प्रभाव होईल आणि असे होऊ नये ह्यासाठी बिल्डर मग काय आणि किती मेहनत घेईल ????

आता भारत सरकाने कायदा केला कि SC/ST लोकांची गृह कर्जाची अँप्लिकेशन बँक रिजेक्त करू शकणार नाही. ह्यामागील हेतू चांगला असला तरी परिणाम काय होईल ? ह्यातून नुकसान कोणाचे होईल ? SC/ST लोक ह्या नादांत चुकीची कर्जे आणि चुकीच्या प्रकल्पांत आपले पैसे घालतील. बिल्डर लोक सुद्धा मग आपले काळे प्रकल्प ह्या लोकांना टार्गेट करून निर्माण करतील.

अर्धवटराव's picture

23 Mar 2021 - 8:48 pm | अर्धवटराव

समाज कल्याणकारी प्रकल्पांची कर्जे नॉन-बँकींग व्यवस्थेतुन देता येतील हे ठिक. पण त्या कर्जावर व्याज आकारणे, अल्प/उशीरा का होईना पण प्रॉफीट कमवणे, एक कर्ज परतफेड झालं कि ते दुसरीकडे गुंतवणे, अत्यंत बेभरोशाचे पण भविष्यकालीन कदाचीत आवष्यक ठरणारे प्रकल्प उभारणे, पायलट प्रोजेक्ट सुरु करुन प्रायव्हेट सेक्टरला हस्तांतरीत करण्यापूर्वी त्याला नावारुपाला आणणे, आंतरराष्ट्रीय राजकारणात उपयोगी ठरणार्‍या गुंतवणुकी करणे, सोनं-चांदी वगैरे मुल्यवान धातुंचे व्यवस्थापन करणे... हज्जारो गोष्टी असतील जिथे सरकारला आपल्या हक्काच्या बँकींग व्यवस्थेची गरज पडत असेल. प्रत्येक वेळी प्रायव्हेट बँकांच्या चेकलिस्टला अनुसरुनच आपले व्यवहार करणे सरकारच्या हिताचे नाहि. मॉनीटरी प्रॉफीट ड्रिव्हन फायनान्स मॅनेजमेण्ट कितीही आवष्यक असली तरी त्या पलिकडे प्रचंड मोठा कारभार असेल सरकारचा.

असो.

Rajesh188's picture

19 Mar 2021 - 10:33 pm | Rajesh188

जेवढी बँक मोठी तेवढे तिच्यात होणारे घोटाळे पण मोठे असतात.
मोठे झाड कोसळले तर मोठे नुकसान करते आणि लहान झाड कोसळले तर कमी नुकसान करते.
त्या मुळे मी काही पैसे लहान लहान पत संस्थे मध्ये सुद्धा गुंतवतो.
म्हणजे एकाच बँकेत सर्व रक्कम न गुंतवता.
विविध बँकेत,विविध योजनेत गुंतवतो.
सर्व बँका काही एक साथ बुडणार नाहीत.

मूर्खांसारखे उद्योग करू नका. पतसंस्थेतले पैसे काढून सरकारी किंवा खाजगी "बँकेत" ठेवा असा सल्ला द्यावासा वाटतो. पतसंस्था बुडण्याची शक्यता आणि बँक बुडण्याची शक्यता यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

बापूसाहेब's picture

20 Mar 2021 - 12:40 am | बापूसाहेब

पतसंस्था म्हणजे बँकिंग च्या आडून चाललेली सावकारी च आहे....!!!

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 6:47 am | चौकस२१२

पत संस्थे .. नाहि .. नको .. धोका

पोस्ट बँक देत नाही त्या पेक्षा जास्त व्याज देते परत सुरक्षित पण आहे .
त्या मुळे लोक पोस्टर पैसे ठेवतात.
सुरक्षा आणि जास्त व्याज असे दोनी फायदे कोणतीच बँक देत नाही.
जिथे जास्त रिटर्न तिथे धोका पण जास्त.
धोका पत्करून अशा ठिकाणी पैसे गुंतवले जातात.
सरकारी सर्व वाईट आणि खासगी सर्व चांगले
असला आत्मघाती विचार मी तरी करत नाही.
खासगी बँका फक्त फायदा बघणार आणि जबाबदारी कशाचीच घेणार नाहीत.
ICICI बँकेत दहा हजार रुपये deposite ठेवावे लागते ते पैसे काढता येत नाहीत..
म्हणजे ती चाळण आहे अती गरीब लोकांना लांब ठेवायची.
उद्या ते दहा हजाराच्या जागी १ लाख आकडा करून अजुन मोठी चाळण लावतील.
सरकारी बँका झीरो deposite वर अकाउंट ओपन करून देतात..
फरक तर आहेच ना.
सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रात बँक असल्याचं पाहिजेत.
म्हणजे मनमानी करता येणार नाही.
बस बंद असल्या की रिक्षा आणि ओला ,उबर चे भाडे तिप्पट होते .
तसेच आहे हे.

चौकटराजा's picture

20 Mar 2021 - 6:06 am | चौकटराजा

सरकारी सर्व वाईट आणि खासगी सर्व चांगले
असला आत्मघाती विचार मी तरी करत नाही.

मी स्वतः: सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी केली असल्याने दोन्ही ठिकाणाचे फायदे तोटे या बाबतचे वास्तव मला परिचित आहे ! मी समाजवादी विचाराचा माणूस असलो तरी आळशीपणा , कामचुकारपणा याला माझ्या मनात थारा नाही .पण सरकारात सर्वच माणसे आळशी असतात असे नाही व खाजगीत सर्वच साहेब लोक प्रोफेशनल असतात असेही नाही असा माझा अनुभव आहे ! ( तीन तासाचा ओव्हर टाईम न देता मसाला डोशावर काम भागवून भारतातील पहिल्या सोळा श्रीमंतात नाव असणारा लुटारू उधोगपती मी पाहिला आहे ) त्यात्या देशात ,प्रांतात,,कंपनीत वा सरकारी मालकी असलेल्या कंपनीत कोणती कार्य संस्कृती निर्माण करायची हे तेथील लठ्ठ पगार घेणार्यावर बरेचसे अवलंबून असते ! असा मॅनेजर ,आयुक्त ,मंत्री जोवर तिथे असतो तो वर त्याने दाखविलेली कार्य संस्कृती इथे स्थूलमानाने पाळली जाते.मग ती काटेकोरपणाची असते किंवा अजागळपणाची ! नफ्यावर आधारलेला भांडवल वाद असो वा कल्याणावर आधारलेला समाजवाद असो जिथे प्रामाणिकपणा वरच्या पातळीवर नसतो तिथे फक्त ऱ्हास संभवतो !

शाम भागवत's picture

20 Mar 2021 - 8:33 am | शाम भागवत

एकदम वास्तव प्रतिसाद.
जसा राजा तशी प्रजा

माणसं येथून तेथून सारखीच असतात हजार वर्षापूर्वी जेवढं माणूस स्वार्थी होता तेवढाच आज पण स्वार्थी आहे.
हजार वर्षापूर्वी माणूस जेवढं क्रूर होता तेवढं आज पण आहे.
जग बदलत गेले पण माणूस तोच आहे.
तो नाही बदलला.
Biological कारण असेल त्या पाठी मागे.
सरकारी संस्थेत काम करणारा माणूस काम चुकार,आळशी ,कार्यक्षम नसतो असे काही नाही.
कोणतीही संस्था कशी प्रगती करेल हे त्या संस्थेचे व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक काय लायकीचे आहेत त्यावर निर्धारित करते.
T chandrshekhar हे ठाणे शहराचे आयुक्त होते तेव्हा आमूलाग्र असा बदल शहरात घडवून आणला होता.
T N शेषन ह्यांनी पूर्ण निवडणूक व्यवस्था बदलून च बदलून टाकली होती.
आणि आज जी निःपक्ष निवडणूक होत आहे ही त्यांचीच कृपा आहे.
त्यांच्या अगोदर निवडणूक म्हणजे बूथ capture करणे, एकाच व्यक्ती नी पूर्ण गावचे मतदान करणे असले प्रकार चालायचे.
कायदे पण तेच होते आणि कर्मचारी पण तेच.
गो रा खैरनार कधीच राजकीय दबावात आले नाहीत.
किती तरी उदाहरणे आहेत.
मध्ये भाटिया (नाव आठवत नाही) नावाचे आयएएस ऑफिसर होते त्यांनी महसूल खात्यात साफ सफाई चालू केली होती.
त्या मुळे खासगी चांगले आणि सरकारी वाईट असे काही नाही.
भारतात दोन दीन मिनिटांनी वाहतुकीचे नियम मोडणारे दुबई मध्ये वाहन चालवत असतील तर एक पण वाहतुकीचा नियम मोडत नाहीत.
माणूस तोच असतो.

सुक्या's picture

20 Mar 2021 - 11:52 pm | सुक्या

"आणि आज जी निःपक्ष निवडणूक होत आहे ही त्यांचीच कृपा आहे."

हायला ...
मग ते ईवीएम वर झालेल्या निवडनु़कांचा शिमगा होतो ते काय असते ?

चीत भी मेरी पट भी मेरी और सिक्का मेरे बाप का. आसं आसतंय त्ये.

भारताच्या आता पर्यंत च्या इतिहासात शेषन सहेबान सारखा एक पण निवडणूक आयुक्त झाला नाही
केंद्र सरकार पण त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याची हिम्मत करत नव्हते..
कारण ती व्यक्ती च स्वच्छ चरित्र ची होती.
निवडणुकीत किती खर्च करण्याची कायद्या नी परवानगी आहे तो खर्चाचा आकडा ओलांडण्याची कोणाची हिम्मत नव्हती..
निवडणूक आयोगाचे कर्मचारी प्रतेक सभेत कॅमेरा घेवून ते व्हिडिओ शूटिंग करायचे..
मंडपाचा खर्च किती,गाड्यांचा खर्च किती ,अशी तपशीलवार माहिती गोळा करायचे.
आणि नियम पेक्षा जास्त खर्च झाला तर निवडणूक रद्द झालीच म्हणून समजा.
कर्तव्य दक्ष अधिकारी.
आता त्या दर्जा चे निवडणूक अधिकारी नाहीत.
पण त्यांनी दाखवून दिलेल्या रस्त्यावर चालत आहेत..
पण तो धाडसी पना आता नाही.
युग पुरुष नेहमी जन्म घेत नाहीत.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 7:32 am | मुक्त विहारि

तुम्ही लिहीत रहा...

आणि इथे चुकीला माफी नाही त्या मुळे आता एडिट सुद्धा करू शकत नाही.