निवेंडी, रत्नागिरी जिल्हा येथे, शेतकरी मीटिंग

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
21 Feb 2021 - 7:15 pm

मला एक वैयक्तिक मेसेज आला आहे. कोकणातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला, मदत व्हावी. एकजूटीने माहितीची देवाणघेवाण व्हावी, यासाठी, खालील मेसेज देत आहे.

गरजू शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा. मी त्याच सुमारास, सांगली येथे जाणार असल्याने, मी ह्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही.

==========

सस्नेह नमस्कार,
मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायं. ४.०० वाजता श्री.उल्हास पिंपुटकर,निवेंडी यांच्या घरी शेतकरी बंधुभगिनींची सभा आयोजित केलेली आहे.

या सभेला श्री बाळ माने चेअरमन. श्री. सतीश शेवडे संचालक रत्नागिरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी उपस्थित राहून केंद्र सरकारच्या आधारभूत हमी भाव भात खरेदी संबधी चर्चा करणार आहेत.

तरी निवेंडी, भगवतीनगर, चाफे, धामणसे, ओरी, कळझोंडी, गणपतीपुळे, आणि मालगुंड या ग्रामपंचायत हद्दी मधील भात शेती, आंबा, काजू, नारळ, सुपारी व मसाला पिके उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,
श्री. उल्हास पिंपुटकर

==================

ज्यांना कुणाला, मीटिंगला जायचे असेल, त्यांनी मला वैयक्तिक मेसेज करावा. उल्हास पिंपुटकर, यांचा मोबाईल नंबर देईन.

एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.

शेतीबातमी