मिजास - अलक

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
3 Feb 2021 - 11:16 pm

मिजास - अलक

-------------
परश्या डोकं धरून , झाडू बाजूला ठेवून कचऱ्याच्या घाण वास मारणाऱ्या ढिगाजवळ बसला होता . कचऱ्याचे ढीग उपसून उपसून त्याला त्याचं स्वतःचं
आयुष्यच कचरा झाल्यासारखं वाटत होतं . रस्त्याने जाणाऱ्या , चांगले कपडे घालून मिरवणाऱ्या जनतेकडे पाहून , आपण असे फिरू शकत नाही याचं
त्याला नैराश्य आलं होतं .
कचरेवाल्या राधाबाईने जवळ येऊन त्या तरुण पोराच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व ती म्हणाली , " चांगली कापडं घालनाऱ्या मान्सांपेक्षा आपण
भारी हावोत . आपण हावोत म्हून तर त्यांची मिजास चालतीया ! "

हे ठिकाण