गाभा:
अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे. तसे झाले तर चीन संतापून तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकतो.
आता भारताने सुद्धा वन चायना धोरणाला मूठमाती देऊन तैवानशी संबंध वाढवून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. त्यासाठी भारत बहुतेक आधी अमेरिकेने मान्यता द्यायची वाट पहात असावा.
https://m.timesofindia.com/world/us/us-lifts-self-imposed-restrictions-o...
प्रतिक्रिया
13 Jan 2021 - 8:30 am | मराठी_माणूस
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/13012021/0/0/
काही नैतीकता शिल्लक आहे का ?
13 Jan 2021 - 10:58 am | मुक्त विहारि
काही राजकारणी लोकांचा आणि नैतीकतेचा संबंध नसतो.
13 Jan 2021 - 1:17 pm | मराठी_माणूस
इथे राजकारणी नाहीय्येत
13 Jan 2021 - 8:30 pm | मुक्त विहारि
हे मलाही माहिती आहे
13 Jan 2021 - 9:29 am | कंजूस
कमला हरिस -
. वोग मासिक फोटो.
13 Jan 2021 - 2:53 pm | साहना
४०० पेक्षाही जास्त प्रकारची केळीची बाग बनवणारा हा अफलातून भारतीय ह्याची दखल जगाने घेतली आहे
https://www.atlasobscura.com/articles/how-many-kinds-bananas-are-there
ह्याच विषयावरून आंबा ह्या विषयावरील हा लेख सुद्धा आठवला (गोव्याच्या मानकुराडच्या नखाचीही सर हापूस आंब्याला नाही असे अनेकांना म्हटले असता वाईट वाटते पण सत्य आहे हो) :
https://www.livemint.com/mint-lounge/features/my-mango-is-better-than-yo...
13 Jan 2021 - 5:35 pm | कंजूस
महाराष्ट्रात काही लोक चवीप्रमाणे अशी क्रमवारी लावतात.
१)रत्नागिरी हापूस
२) दैवगड हापूस
३) बलसाड हापूस
इतर प्रकारात उत्तर भारतात
१)दशेरी
२) हापूस
३)रुमाली
४)लंगडा
परदेशांत केसर अधिक आवडू लागला आहे.
मानकुर फारच थोडा बघायला मिळतो.
19 Jan 2021 - 7:51 pm | सुबोध खरे
गोव्याच्या मानकुराडच्या नखाचीही सर हापूस आंब्याला नाही
याच्याशी मात्र अजिबात सहमत नाही.
हापूसची चव मानकुराड ला नाही हे १०० % सत्य
गोव्यात ५ वर्षे राहून हे अनुभवास आलेले आहे.
बाकी माहेरचा कावळा गोरा असतो हि उक्ती याबाबत सत्य आहे.
13 Jan 2021 - 4:24 pm | तुषार काळभोर
चीन तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकत नाही. थयथयाट करण्यापलिकडे ते काही करू शकणार नाहीत.
एकतर तैवान बेट असल्याने तिथे पुरेसे सैन्य, विमाने, रणगाडे नेणे ही खर्चिक अन वेळखाऊ बाब आहे. आणि ते होईपर्यंत तैवान (आणि जापान-अमेरिका सुद्धा) शांत बसणार नाहीत. जर चीनने असा प्रयत्न केलाच तर ही कदाचित दुसर्या महायुद्धातील नॉर्मंडी अथवा डंकर्क इतकी मोठी घडामोड असेल. फक्त इथे समोर तैवान्+जापान्+अमेरिका+कदाचित द कोरिया असतील. सध्याच्या काळात इतका मोठा आंतरराष्ट्रीय धोका अन आर्थिक बोजा चीन ओढावून घेणार नाही.
भारताचे तैवानशी चांगले सांस्कृतिक अन व्यापारी संबंध आहेत. मात्र राजकीय संबंध नाहीत. तसे ते अमेरिकेचेही नाहीत. अर्थात अमेरिकेने केल्यास नाटो सदस्य देश, भारत, जापान, द. कोरिया सुद्धा राजकीय संंबंध प्रस्थापित करतील हे नक्की. पण प्रश्न असेल की कधी. नजीकच्या भविष्यात असे घडण्याची शक्यता कमी दिसते. मात्र आर्थिक उलाढाल वाढवून चीनसोबतच्या व्यापारावरील अवलंबित्व किंचीत का होईना कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
13 Jan 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा
मुंडे प्रकरणात निवडणूक आयोगाकडुन मुंडे यांच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता नाही असे मत आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/advocate-aseem-sarode-facebook...
13 Jan 2021 - 7:55 pm | खेडूत
लोकं तसे नेते..वेगळी काय अपेक्षा आहे?
संभाजीनगर नंतर आता धाराशिव असाही उल्लेख आला आहे सी एम ओ कडून! निवडणुकीची तयारी झाली वाटतं.
13 Jan 2021 - 10:06 pm | सौंदाळा
नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ प्रकरणात अटक
बातमी
19 Jan 2021 - 3:41 pm | मदनबाण
आपल्या देशात प्रत्येक बाबतीत राजकारण केले गेले आणि केले जाते ! पण एकाच बाबतीत कधीच कोणते राजकारण केले गेले नाही, कोणी कोणला मदत केली नाही, कोणासाठी न्याय मागितला गेला पाहिजे असे देशातील मिडियाला देखील वाटले नाही, सगळे मौन होते.
हे कोण ? तर काश्मिरी पंडीत. ज्याच्या बायकांची अब्रु लुटली गेली, संपत्ती पळवली गेली आणि पुरुष कापले गेले ! जे पळाले तेच वाचले आणि स्वत:च्याच देशात आश्रित झाले, ज्यांना कोणी वालीच उरला नाही असे ते हतबल आणि शरणार्थी ! :(
आज सर्वस्व लुटले गेलेल्या काश्मिरी पंडीतांना स्वतःच देशात निर्वासित म्हणुन ३१ वर्ष झाली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details
19 Jan 2021 - 3:55 pm | बाप्पू
काश्मीरी पंडीत आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध.
संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस.
आणि भारत सरकारचे पुन्हा एकदा अभिनंदन की अश्या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून 370 कायद्याला केराची टोपली दाखवल्याबद्दल.
आता तरी काश्मीर मध्ये मुळ हिंदूंचे पुनर्वसन करून तिथे लोकसंख्येचा योग्य तो समतोल साधला गेला पाहिजे.
देशविघातक जमातीची लोकसंख्या एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वाढून दिली की हे असेच होते त्यामुळे ही वाळवी प्रमाणात ठेवण्यासाठी त्यांच्यावर कडक निर्बंध आणि लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कायदा करणे अत्यावश्यक आहे.. अन्यथा अजुन एक पाकिस्तान अटळ आहे.
19 Jan 2021 - 5:31 pm | मदनबाण
किती काश्मिरी पंडीत आतंकवादी झाले आहेत ? एक तरी शोधुन दाखवता येइल का ? नाही,कारण ते खूनशी वृत्तीचे नाहीत, ते बलात्कारी वृत्तीचे नाहीत आणि ते लुटारु वृत्तीचे देखील नाहीत. पण काश्मीर मध्ये मात्र आतंकवादीच्या जनाज्याला गर्दी करणारे मात्र शांतता प्रेमी समाजाचे आहेत नाही का ?
शाहीन बाग झाले तरी मिडिया यांचीच बाजू घेत राहिला. लव्ह जिहादाच्या घटना होत राहिल्या तरी मिडिया डोळे बंद करुन बसला होता... आता तांडव सुरु झाले !
असो...
आज महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी आहे, त्यांना कोटी कोटी नमन !
जाता जाता :- हिंदूंच्या स्त्रिया,मुली आजही फसवल्या जात आहेत, पळवल्या जात आहेत आणि बलात्कार करुन भोगल्या जात आहेत, तरी काही मिडियावाले म्हणतात लव्ह जिहाद असं काही नाहीच आहे.
मेरठ: नौकरी के नाम पर हिंदू लड़कियों को फंसाकर रेप, फिर पोर्न वीडियो से ब्लैकमेलिंग के जरिए कराता था धर्मांतरण, मो. आफताब गिरफ्तार
शादीशुदा सोहैल ने सन्नी बन कर युवती को फंसाया, धर्म परिवर्तन के लिए मारपीट, 'लव जिहाद' में गिरफ्तार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details
19 Jan 2021 - 8:00 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
21 Jan 2021 - 10:59 pm | श्रीगुरुजी
मे २०२१ मध्ये केरळ, तामिळनाडू, पॉंडीचेरी, बंगाल व आसाम या ५ राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी एबीपी न्यूज व सी-व्होटर यांनी केलेल्या निवडणुकपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज रोचक आहेत.
बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस २९४ पैकी १५४ जागा मिळवून सत्ता राखेल असा अंदाज आहे. परंतु २०१६ च्या तुलनेत तृणमूलला ५७ जागा कमी मिळतील. दुसरीकडे भाजपने २०१६ मध्ये फक्त ३ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२१ मध्ये भाजप तब्बल १०२ जागा जिंकण्याचा अंदाज आहे.
तामिळनाडूत द्रमुक २३४ पैकी १६० जागा जिंकून सत्तेवर येईल, तर अद्रमुकची संख्या १२४ वरून वर येऊन सत्ता गमवावी लागेल.
केरळमध्ये सध्या सत्तेवर असलेले डाव्या आघाडीचे सरकार १४० पैकी ८६ जागा जिंकून सत्ता टिकवेल. २०१६ प्रमाणे २०२१ मध्येही कॉंग्रेसप्रणित आघाडीचा पराभव होईल. आटोकाट प्रयत्न करूनही भाजपला जास्तीत जास्त २ जागा मिळू शकतील.
१२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत सत्तेवर असलेल्या
भाजपप्रणित रालोआची सदस्यसंख्या ८६ वरून ७७ वर घसरली तरी सत्ता टिकून राहील. कॉंग्रेसची संख्या २६ वरून ४० वर पोहोचेल.
३० सदस्यांच्या पॉंडीचेरी विधानसभेत सध्या सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-द्रमुक आघाडीला १४ जागा मिळतील. भाजप-अद्रमुक आघाडीला १६ जागा मिळून सत्तांतर होईल.
https://www.google.com/amp/s/www.financialexpress.com/india-news/assembl...
21 Jan 2021 - 11:26 pm | श्रीगुरुजी
इंडिया टुडे हे साप्ताहिक दरवर्षी जानेवारी व ऑगस्टमध्ये मतदार सर्वेक्षण करून मतदारा़चा व जागा़चा अंदाज देतात. आज जाहीर झालेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार जर आज लोकसभा निवडणुक झाली तर रालोआला ३२१ जागा मिळून (त्यात एकट्या भाजपला २९१ जागा) रालोआ पुन्हा सत्तेत येईल. कॉंग्रेसप्रणित संपुआला ९३ जागा मिळतील (त्यात एकट्या कॉंग्रेसला ५१ जागा).
एकंदरीत पंतप्रधान मोदी व रालोआची लोकप्रियता अबाधित आहे, तर कॉंग्रेस अजूनही गाळात आहे. टाळेबंदी, टाळेबंदीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था, पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन, शिवसेना-अकाली दल या पक्षांनी दिलेली सोडचिठ्ठी, चीनबरोबरील युद्धस्थिती अशा गोष्टींचा मतदारांवर प्रभाव पडलेला दिसत नाही.
https://www.indiatoday.in/mood-of-the-nation/story/covid-china-no-challe...
https://www.indiatoday.in/mood-of-the-nation/story/motn-poll-pandemic-re...
22 Jan 2021 - 2:10 pm | मदनबाण
युएइ आणि आपले संबंध अधिक घनिष्ट होत असुन दोन्ही देशांना या संबंधातुन मोठा फायदा होणार आहे.
UAE Air Force to help 3 Rafale fighters reach India, 7 more in April
UAE Air Force to help 3 Rafale fighters reach India, 7 more in April
Desert Knight 2021 :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise
22 Jan 2021 - 3:13 pm | Rajesh188
सुशांत सिंग विषयी काहीच व्हिडिओ पोस्ट करत नाही.
खून होती आत्महत्या ह्या विषयी latest काहीच माहिती तुम्ही देत नाही.
कसा मिळणार सुशांत ला न्याय.
राम कदम,कंगना,आणि बरेच जण सुशांत विषयी गप्प आहे.
सुशांत ला न्याय देण्याची लढाई बिहार निवडणूक झाली की संपली काय?
आणि सीबीआय नी काय दिवे लावलेत त्या केस मध्ये त्याची पण माहिती न्यायप्रिय अर्णव महाराज देत नाहीत.
22 Jan 2021 - 3:18 pm | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-letter-...
"नामांतर करायचेच...................."
औरंगाबाद च्या नाव बदलण्यासंबंधीचे तेथील नागरिकाचे मत