.

शिकवणारी राईड

Primary tabs

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
10 Jan 2021 - 8:50 am

#आजचीराईड
06.01.2021

God is everywhere. Devil lives in details. देव आणि सैतान यांच्या युद्धात देव जिंकला आणि त्याने सर्व जग व्यापलं. सैतानाला कानाकोपऱ्यात जाऊन तोंड लपवावं लागलं. Then onwards the devil started living in small details. असं असावं ते बहुदा अशी मी समजूत करून घेतली. तर हे सैतान छोट्या छोट्या डिटेल्समध्ये दडून बसतात आणि आपला परफॉर्मन्स खराब करत असतात. ते डीटेल्स शोधून त्या सैतानाला हरवायला हवं.

शिकवण देतात, प्रात्यक्षिक देतात, उदाहरणातून पटवून देतात, सराव करून घेतात, शिक्षा करतात, फटके देतात पण.. पण जाणीव मात्र आतून होते. आपोआप होते. बहुतेकदा ही जाणीव आपल्या नकळत काम करते. आता या लिखाणातून ती मला या घटनांपूरती, कशी जाणवली, तो प्रवास नोंदवायचा प्रयत्न करतोय. असा प्रयत्न पहिलाच म्हणून राईड आणि हे विचार यांची सरमिसळ होत राहील. कदाचित राईड बद्दल लिखाण कमी असेल बरंच. पण ते समजून घ्याल जरा.

गेल्या अडीच तीन वर्षांत काही सेंच्युरीज केल्या मी पण सायकल गृपातल्या महारथीची सर नाही त्याला. ते सकाळी जाऊन सेंच्युरी करून दुपारी जेवायला घरी येतात. मी सेंच्युरी करणार म्हणजे पूर्ण दिवस गेला. त्यांच्या भारीतल्या सायकली आहेत. मला मधेच काही छान दिसलं, नदी वगैरे तर तिकडे रमल्याने वेळ जातो हे खरं असलं तरी पूर्ण खरं नाही हे मला माहित होतच. ती माझी क्षमताच नाही, अजूनतरी, हे मनोमन पटलेलं होतं. 100 km साठी 25 average speed सतत टिकवून ठेवणं सोपं नाही हे खरंच. माझी सखी तर MTB. म्हणून 20चा स्पीड हे माझ्यासाठी टार्गेट ठरवलं. आणि 5 तासात सेंच्युरी पूर्ण करायची असा विचार करत आदल्या रात्री झोपलो.

गेल्या आठवड्यात कधीतरी (गेल्या वर्षी अस देखील म्हणता येईल :) ) शब्दकोडं सोडवत असताना Devil lives in details ही म्हण समजली होती. माझ्या समजुतीप्रमाणे त्याचा अर्थ लावून ती माहिती मेंदूत कुठेतरी file झाली असणार. पण समहाऊ सकाळी जाग आली आणि आवरताना ती म्हण परत आठवली. म्हणून मग अर्धातास उशीर झाला तरी चालेल असं म्हणत तारेच्या ब्रशने चेन नीट स्वच्छ केली. कापडाच्या छोट्या चिंध्या करून त्याने गियर्स कॅसेट नीट घासून स्वच्छ केल्या. आयुक्षात पहिल्यांदा गियर्स पांढरे दिसत होते. यात काल रात्री केलेलं लुब्रिकेशन निघून गेलं असणार म्हणून ते परत केलं.

पहिल्या 10 मिनिटातच या खर्च केलेल्या अर्ध्यातासाचा फायदा लक्षात येऊ लागला. ज्या चढावर 3-5/3-4 उतरावं लागायचं ते चढ 3-6/3-5 पार होऊ लागले. तेही केडन्स 80-90 राखून. दुसरी गोष्ट मग आणखी काय असे छोटे डीटेल्स असतील यावर लक्ष जायला लागलं. मग ठरवलं की केडन्सबाबत बिलकुल तडजोड करायची नाही. म्हणजे 30-40 फूट चढ असेल तर तेवढ्यासाठी कुठे गियर बदला म्हणून तसेच रेटायचो. ते बंद करून गरजेनुसार गियर बदलायला सुरवात केली. मग 3-6 वरून उतरत 3-4 करून ते पुरत नसेल तर 2-5 करायचं असं न करता 3-6 वरून थेट 2-6 करायचं आणि चढ संपला की परत 3-6 असं सुरू झालं. परिणामी शीळ फाट्यावर पहिला थांबा केला 22 km नंतर तेंव्हा अव्हरेज स्पीड 23.8 होता. काटाई ते शीळ घाण ट्राफिक असूनही! 2 छोटे डीटेल्स आणि त्यात दडलेले डेविल्स सापडले होते मला.

पुढला टप्पा चौकफाटा. अंतर 36 km. 20 km नंतर थांबू ठरवून निघालो. स्वतःवर खुश होतो. पनवेल अलीकडच्या ट्रॅफिकमधून सुटलो. चालवण्यात खास लक्ष द्यायची गरज उरली नाही आणि विचारचक्र परत सुरू झालं. म्हटलं अजून काही डीटेल्स असू शकतात. काय असेल बरं? अचानक गृपात कधीतरी बघितलेली इमेज आठवली. त्यात मांडी आणि पोटरीच्या कोनाबद्दल सांगितलेलं. पण आणि एक होतं. की पेडलवर चवडा असायला हवा. अचानक लक्षात आलं.. आजवर इकडे कधीच लक्ष दिलेलं नाहीए. पावलांचा अंतर्वक्र भाग पेडलवर आरामात ठेऊन चालवायचो सायकल.

आता जाणीवपूर्वक पेडलवर चवडा ठेऊन पेडलींग सुरू केलं. सवयीने परत पाय सोयीच्या जागी जायचा पण तो परत मागे घेऊन चवडा पेडलवर सेट करायला लागलो. परत परत, हट्टाने..पुढल्या 10 km मध्ये लक्षात आलं की चढ अधिक सहज पार होतायत. आणि गुडघ्यावर ताण येत नाहीये. खटकन स्मृतीतून अजून एक माहिती येऊन योग्य जागी चपखल बसली. 2 दिवसापूर्वी लिगामेंट टेंडन आणि मसल यातला फरक आणि जागा ही माहिती समजून घेतली होती. तीही file अशीच पडून होती. लिगामेंट खूपच कमी आणि टेंडन्स कमी फ्लेक्सिबल असतात. लिगामेंट सांध्यात हाडं एका जागी राहावीत वाटेल तशी हलू नयेत यासाठी असतात. पावलांच्या खळग्यात पेडल असेल तर अँकल वापरलाच जात नाही आणि त्यामुळे ओघाने काफ मसलही फार वापरात येत नाहीत. आणि मग तो ताण गुडघ्याच्या लिगामेंटला सहन करावा लागतो. बिचारा त्याचं जे कामच नाही ते करताना थकून दुखायला लागतो. गेले अनेक महिने calf raises चा व्यायाम करूनही ही जाणीव झालीच नव्हती कधी. पूर्ण प्रवासात लक्ष याकडेच राहिलं. अनावधानाने पुढे सरकलेला पाय मागे घ्यायचा. परिणामी बहुतेक सगळा ताण मांड्या आणि पोटऱ्या यांच्या स्नायूंनी घेतला. ते त्यांचं कामच आहे. त्यामुळे 10 मिनिटांच्या विश्रांतीत ते परत ताजेतवाने व्हायचे. लिगामेंट त्यांचं काम करत राहिले आणि त्यांनी मला बिलकुल त्रास दिला नाही.

केवळ ठरवलं होतं म्हणून 25 km नंतर मोजून 15 मिनिट विश्रांती घेतली आणि झपाझप चौक फाटा गाठला. Average स्पीड 23.6! निवांत लस्सी घेऊन परत प्रवास सुरु केला. आता 42 km अंतर बाकी होतं. आणि कर्जत पर्यंत मोठे आणि नंतर छोटे असे सततचे चढ असणार होते. शिवाय आता ऊन देखील चांगलंच तापलं होतं. आता स्पीड कमी होणार हे उघड होतं पण तरी स्वतःला टार्गेट दिलं की 20च्या खाली उतरायचं नाही. नुकताच झालेला आराम आणि हरणारे 3 डीटेल्स मध्ये लपलेले डेविल्स यामुळे कर्जत पर्यंतचे मोठे चढ बघताबघता पार झाले. आता थेट नेरळ पार करून आडबाजूला असलेल्या मंदिरात आराम करायचं ठरवलं.

मंदिरातून परत निघालो आणि आता माथ्यावर तापणाऱ्या उन्हाने आणखी एक डिटेल सांगितला. सकाळी निघायला साडेसात होऊन गेले होते. हे बरोबर नव्हे. सकाळी मॅक्स साडेसहाला सुरवात व्हायला हवी. त्यासाठी तयारी, चकाचक तयारी आदल्या रात्री व्हायला हवी. सकाळी झोपायचा आणि आदल्या रात्री tp करत जागायचा मोह सोडायला हवा. गोष्टी छोट्या आहेत पण त्या न केल्याची किंमत आता चुकवावी लागतेय. या लास्ट 20 km मध्ये 1 लिंबू सरबत आणि एक उसाचा रस असे थांबे करावे लागले. ज्यात वेळ गेल्याने टोटल टाइम वाढला. 7 तास ऐवजी तो वेळ कमी होऊ शकला असता. पण तरी 106 km राईड 4:56 तासात पूर्ण झाली हे कमी नव्हे. Average स्पीड 21.6. माय पर्सनल रेकॉर्ड!

अमेरिकेत एक बाईक रेसिंग स्पर्धा असते. त्यात फक्त 100 cc बाईक ना परवानगी असते. म्हणजे सगळ्या बाईकची क्षमता सारखीच. फरक बाईक चालवण्याच्या कौशल्यातला. म्हणजे कुठल्या परिस्थितीत बाईक कसा प्रतिसाद देईल, कशी कामगिरी करेल याचा हरघडीचा करेक्ट अंदाज, ती कामगिरी बाईक कडून करून घ्यायचं कौशल्य आणि आपल्या रायडिंग कौशल्याचा करेक्ट अंदाज या गोष्टी मुख्य. तरच अपघात न करता स्पर्धा जिंकणे शक्य. आपण जितकं स्वतःकडे लक्ष देऊ, आपल्या सखीकडे लक्ष देऊ, mindful राहू तितके अधिक चांगला परफॉर्मन्स देऊ शकू. व्यायामात मसल माईंड कनेक्शन महत्वाचं म्हणतात. योग तर हेच आहे की स्वतःच्या शरीर मनाशी सुसंवाद. या राईडमध्ये मी ते थोडंफार करू शकलो. मला इन्फो होतीच पण चुकून त्या झोन मध्ये गेलो आणि डिटेल्समधले डेविल्स दिसायला लागले. अजूनही अनेक डीटेल्स असतील. असले प्रवास संपत नसतातच.

-अनुप

https://photos.app.goo.gl/Y9T1irki6hoLwUBDA

https://photos.app.goo.gl/WJdDKHiqYU1hb1DXA

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Jan 2021 - 9:13 am | कंजूस

लिहीत राहा.

अन्या बुद्धे's picture

11 Jan 2021 - 8:22 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

प्रदीप's picture

11 Jan 2021 - 10:25 am | प्रदीप

असेच लिहीत रहा.

अन्या बुद्धे's picture

11 Jan 2021 - 8:22 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी !
हार्दिक अभिनंदन !
पयला फोटो मस्त.
दुसरा फोटो दिसत नाय !

अन्या बुद्धे's picture

11 Jan 2021 - 8:24 pm | अन्या बुद्धे

एक एन डी स्टुडिओ बाहेरचा आहे..
दुसरा त्या राईडचे स्टॅट्स आहेत..

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा

एक एन डी स्टुडिओ बाहेरचा आहे..

+१ झकासच !

दुसरा त्या राईडचे स्टॅट्स आहेत..


बाकीच्याणी पाहू नये म्हणून पब्लिक शेअरींग दिले नाही काय ?

धन्यवाद!

अन्या बुद्धे's picture

12 Jan 2021 - 10:03 am | अन्या बुद्धे

काहीतरी गडबड झाली ओ.. परत इथेच प्रतिसादात लिंक नीट द्यायचा प्रयत्न करतो

पॉइंट ब्लँक's picture

11 Jan 2021 - 7:27 pm | पॉइंट ब्लँक

बरीच नवीन माहिती आणि बारकावे समजले. तुमच्या सर्व राईडस साठी शुभेच्छा :)

अन्या बुद्धे's picture

11 Jan 2021 - 8:24 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

अन्या बुद्धे's picture

12 Jan 2021 - 10:09 am | अन्या बुद्धे
मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 1:05 pm | मुक्त विहारि

आवडले...

तुम्ही डोंबिवली येथे राहता का?

अन्या बुद्धे's picture

12 Jan 2021 - 10:33 pm | अन्या बुद्धे

नव्हे.. बदलापूर

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 11:13 pm | मुक्त विहारि

काटई नाका आणि शिळ फाट्याचा उल्लेख आला, म्हणून विचारले...

कोणे एके काळी, मी सकाळ संध्याकाळ, सायकल चालवत होतो. पण, तेंव्हाची डोंबिवली वेगळी होती.

आता धाडस होत नाही...

अन्या बुद्धे's picture

13 Jan 2021 - 11:06 am | अन्या बुद्धे

हौ.. तिकडले मित्र सांगतात.. डोंबिवली बाहेर पडणे आणि परत येणे हेच दिव्य आहे..