टेबलटॉप - क्लोज-अप आणि मॅक्रोज

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in मिपा कलादालन
3 Jan 2021 - 3:16 pm

बर्‍याचवेळेस वस्तुंचे त्यांच्या नैसर्गिक वातवरणात फोटो काढण्यात अनेक अडचवी येतात - जोरात वाहनार्‍या वार्‍यामुळे होणारी वस्तुची अस्थिरता, अपुरा प्रकाश, बॅकग्राऊंड क्लटर , आणि आपल्याला हवा तसा फोटो काढाण्यास ती जागा पुरक नसनं. ह्या सगळ्या अडचनींवर मात करायला टेबलटॉप फोटोग्राफी कामाला येत. ह्याचा व्यावसायिक उपयोग सहसा प्रोडक्ट आणि फुड फोटोग्राफीसाठी होतो. पन आज आपण काही साधी उदाहरणे बघुत.

नवीन वर्षातील ह्या धाग्याची सुरुवात आपण गणपतीबाप्पाला नमस्कार करुन करुयात.
ही सुंदर गणेशमुर्ती दोन वर्षापूर्वी फेअरवेल गिफ्ट स्वरुपात माझ्याकडे आली. ही मुर्ती जवळपास तीन इंच उंचीची आहे. बॅकग्राउंड बोखे मिळण्यासाथी थर्माकॉलच्या एका स्लॅबला , एक गिफ्ट रॅप पेपर चोळामोळा करुन लावला आणि त्याची चंदेरी बाजू बॅकग्राउंड म्हणुन वापरली ( असा बोखे बनवायची संकल्पना युट्युब विडिओ मध्ये मिळाली, त्याचा शोध मी लावला नाही हे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.) ह्या फोटोसाठी तीन फ्लॅशलाईट वापरले, त्यातला एक मास्टर म्हणुन सॉफ्ट्बॉक्स मधुन मुख्य स्त्रोत म्हणुन मुर्तीच्या समोर डाव्या बाजुला ४५ अंशामध्ये. बाकीचे दोन स्लेव्ह मोड्मध्ये. एक मुर्तीच्या बरोबर मागे जांभळा जेल ( जांभळ्या रंगाची थोडी पारदर्शक पट्टी जी फ्लॅशहेडवर बसते, त्यामुळे फ्लॅशच्या प्रकाशाचा रंग बदलतो ) लावून त्यावार एक स्नूट चढवून ( स्नूट मुळे फॅशच्या उजेडाचा कोन नियंत्रित होतो, म्हणजे तो उजड जास्त मोठ्या भागात पसरत नाही) ठेवला. मुर्तीमुळे तो झाकला गेला आहे ओपाआप. तीसरा फ्लॅश निळ्या रंगाचा जेल लावुन उजवीकडे असलेल्या भिंतीवरून तो प्रकाश परिवर्तीत करेल अशा पद्धतीने ठेवला आहे. ह्या तीन फ्लॅशच्या पॉवर सेटींग हा एक खेळ खंडोबा आहे. तीन्हीचा योग्य समन्वय साधण्यासाठी बर्‍याच प्रयोग करावे लागतात.
असो इतका सगळा उपद्व्याप करून शेवटी हवी तशी प्रकाश योजना मिळाली. अजुन थोडीशी भर म्हणुन गिंपमध्ये प्रोसेसिंग करताना पाउस निर्माण केला.
DSC_2697_final

पूढचा फोटो आहे बाळकृष्णाचा. ही मुर्ती सुद्धा गेल्यावर्षी भेट स्वरुपात मिळाली. ही साधारण चार इंच उंच आहे. तिला रूंद पाया नाही त्यामुळे आधाराशिवाय ती उभी रहात नाही. त्यामुळे मूर्तीला थोडा नैसर्गिक वाटेल असा आधार देण्यासाठी मागे एक जाडजुड पुस्तक ठेवले आणि ते लपवायला फुलांच्या कुंडीमध्ये ठेवायचे गोटे/दगड वापरले आहेत. सोबत रंगसंगती म्हणून मोरपिसाची भर घातली. सेट अप बर्‍यापैकी वरच्या फोटोसारखच आहे. पण इथे चार फ्लॅश वापरले आहेत. मुख्य स्त्रोत अजुनही सॉफ्ट बॉक्सच आहे. पण मुर्तीच्या चेहर्‍यावर उजव्या बाजुला खुपच गडद सावली पडत होती म्हणुन अजुन एक फ्लॅश बाजुच्या भिंतीवरुन परावर्तीत करुन फिल लाईट म्हणुन वापरला आहे. उजव्या बाजुला अजुन एक जांभळा जेल लावलेला फ्लॅश भिंतीवरुन परावर्तीत केला आहे. डाव्या बाजुला एक फ्लॅश निळ्या जेल सकट लाईट स्टँड वर माउंट केला आहे. त्याला सॉफ्ट बनवन्यासाठी स्टीम इनहेलरचा भांडं चढवलं आणि इतकं करुनही काम झालं नाही म्हणुन एक पांढरी कापडी पिशवी त्याभोवती गुंडाळली. गिंप मध्ये हिमवर्षाव सुद्धा केला.
DSC_3250_3

आता तिसरा फोटो आहे तारा ह्या देवतेचा क्लोज अप. खर तर हा टेबलटॉप नाही पन टेबलटॉप मध्ये जास्त सोप्या पद्धतीने काढता आला असता. ह्याला टेबलटॉप मध्ये काढण्यासाठी रीफ्लेक्टरची काळी बाजु बॅकग्रोउंड म्हनुन वापराच्यी आणि उजव्या बाजुने एक फ्लॅश भिंतीवरुन परावर्तित करायचा. फ्लॅश आणि मुर्ती भिंतीच्या शक्य तितक्या जवळ ठेवायच्या आहेत त्यामुळे उजेड जास्त पसरनार नाही.

Tara2

वापरायच्या जवळपास सगळ्या युक्त्या वरील तीन फोटोंमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे आता सेटअप बद्दल जास्त चर्चा न करता इतर फोटो पाहुत.

कृष्णाचे फोटो काढताना घेतलेले काहि मोरपिसाचे क्लोज-अप
DSC_3087_00001

मोरपिसावर थोडं पाणी शिंपडुन काढलेले फोटो.
DSC_5801_merged

DSC_5804_merged

मुगाच्या फुलाचे क्लोज अप- बॅकग्राउंडला जांभळा आणि फिकट नारिंगी रंगाचे गिफ्ट रॅप
DSC_5938

DSC_5931

DSC_5927.JPG

DSC_5912

गोकर्णाच्या फुलाचे क्लोज अप

DSC_7601

DSC_7534

DSC_7516

बडीशेपचं फुल

DSC_5629_2

DSC_5583_2

कोथिंबिरिच फुल
DSC_6247

मोहरींच फुल
DSC_6146

आमची मॅक्रो लेन्स फोकस ब्रिद करत असल्यामुळे कसबसा जमलेला स्टॅकिंचा एकमेव प्रयोग

DSC_4775_merged

छोटी कर्दळी- फोटो काढताना स्प्रेअर ने निर्माण केलेला खोटा पाऊस.

DSC_6773_01

DSC_6776_01

जाताजाता एक किडा ;)
गेल्यावर्षी शास्त्रज्ञांनी अब्जावधी रुपये खर्च करुन ब्लॅक होल चा फोटो काढला होता. तो ब्लर झालेला फोटो काय माझ्यातल्या फोटोग्राफरला बघवला नाही. मग मी स्वत:च तसा उत्कृष्ठ फोटो बनवायचा ठरवल. मी काढलेला फोटो . आणि त्या फोटोला किती भक्क्म शास्त्रोक्त पाया आहे हे दाखवण्यासाठी त्याच सेट अप सुद्धा देत आहे ;)
DSC_1525_1

DSC_1523

प्रतिक्रिया

कंजूस's picture

3 Jan 2021 - 8:26 pm | कंजूस

सर्व प्रयोग आवडले.

पॉइंट ब्लँक's picture

4 Jan 2021 - 6:11 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद __/\__

फोटोग्राफी तंत्रातील तपशील समजत नाहीत पण सर्व फोटो आवडले.

पॉइंट ब्लँक's picture

4 Jan 2021 - 6:12 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद __/\__ , एकदा तुम्ही कॅमेर उचलुन फोटो काढायला चालु करा, सगळं समजेल, इतका विशेष काहि नसतं त्यात.

तुषार काळभोर's picture

4 Jan 2021 - 10:06 am | तुषार काळभोर

पहिले तीन फोटो एकदम मस्त आहेत. तारा चा फोटो खूप आवडला. पूर्ण काळा बॅकग्राउंड असलेला क्लोजअप (अंधाराचा उपयोग करून), पोस्ट प्रोसेसिंग न करता काढणे विशेष कसब आहे.
फुलांच्या क्लोजअप मध्य पहिली फुले आणि बॅकग्राउंड यात फारसा कॉण्ट्रास्ट नसल्याने परिणामकारक वाटत नाहीत. पण पुढील फुले मात्र एकदम आकर्षक अन लक्षवेधक आहेत.
कृष्णविवराचा फोटो काढण्यासाठी अतिशय भक्कम तांत्रिक पाया वापरला आहे, आणि तोदेखील डीप लर्निंग ते लिनीयर अल्जेब्रा इतका लांब, रुंद आणि खोल!

पॉइंट ब्लँक's picture

4 Jan 2021 - 6:15 pm | पॉइंट ब्लँक

पहिले तीन फोटो एकदम मस्त आहेत. तारा चा फोटो खूप आवडला. पूर्ण काळा बॅकग्राउंड असलेला क्लोजअप (अंधाराचा उपयोग करून), पोस्ट प्रोसेसिंग न करता काढणे विशेष कसब आहे.

धन्यवाद __/\__

फुलांच्या क्लोजअप मध्य पहिली फुले आणि बॅकग्राउंड यात फारसा कॉण्ट्रास्ट नसल्याने परिणामकारक वाटत नाहीत.

हे मत प्रामाणिकपने मांडल्या बद्दल खुप आभारी आहे. नक्की विचार करेन ह्यात कशी सुधारणा करता येइल ह्यावर :)

उपयोजक's picture

4 Jan 2021 - 1:25 pm | उपयोजक

गुग्गुल क्रोमात

पॉइंट ब्लँक's picture

4 Jan 2021 - 6:16 pm | पॉइंट ब्लँक

अजब. गूगल क्रोम मधुनच अपलोड केलेत आणि लेख लिहिला आहे राव!

MipaPremiYogesh's picture

4 Jan 2021 - 6:55 pm | MipaPremiYogesh

वाह काय सुरेख आहेत सगळेच फोटो. एक्सिफ सांगू शकाल काय

पॉइंट ब्लँक's picture

5 Jan 2021 - 8:34 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद. फोटो फ्लिकर वर आहेत. जर फोटोवर क्लिक केलं तर तुम्हि फ्लिकरवर जाल. तिथे एक्सिफ दिसतील तुम्हाला :)