लाचलुचपत विभाग खरेच प्रामाणिक असतो काय?

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in काथ्याकूट
26 Dec 2020 - 8:27 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

बर्‍याच दिवसांनी लेख लिहतोय. त्याचं असं झालं की जानेवारी २०२० मध्ये मी रहात असलेल्या इमारतीत आमच्याच मजल्यावर माझ्या १ रुम किचन पेक्षा जास्त जागा असलेल्या अशा बाजुच्याच मोठ्या १ बी.एच.के. फ्लॅटमध्ये स्थलांतरीत होण्याची संधी चालुन आली. आणि मी ती उचलली. तसेच त्या समोरच्या पार्टीलाही छोटा फ्लॅट हवा होता म्हणुन त्यांनी माझा फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही फक्त जागेची अदलाबदल केली. आमची अजुन टी.एम.सी. मध्ये नोंदणीकृत सोसायटी नाही. अनाधिकृत अपार्टमेंटच आहे. तर सगळी कागदपत्र , पैसे अशी तजवीज वगैरे करेपर्यंत फेब्रु. २०२० च्या महिन्या अखेरीस टी.एम.सी मध्ये अधिकृतरित्या नोंदणी करुन फ्लॅट मात्र नावावर झाला. मार्च १८ पासुन घरातुन काम करावे लागत असल्याने घरीच होतो मग आठवड्याने जागेची अदलाबदल २५ मार्चच्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सगळं सामान फक्त इकडुन तिकडे हलवुन गृहप्रवेश केला.

आता फक्त इलेक्ट्रिक मिटर आणि घराचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर करणे एव्हंढेच काम बाकी राहिले आणि इकडे कडक टाळेबंदी चालु झाली. संपुर्ण ४ महिने २/३ वेळा टी.एम.सी कार्यालयात खेपा घालुन झाल्या तेव्हा बाहेरच्या बाहेरच तिथल्या पोलिसांनी ऑफिस बंद म्हणुन अडवले. पण प्रोपर्टी टॅक्स भरण्यासाठी मात्र एक खिडकी उघडी होती तेव्हा या वर्षीचा मार्च २०२० ते एप्रैल २०२१ चा टॅक्स भरला. त्याच खिडकीमध्ये टॅक्स नावावर करणारा कागद "मिळकतीचे हस्तांतरण" हा फॉर्म ५ रु. भरुन घरी आलो सगळा फॉर्म भरला आवश्यक ती कागद पत्रे जोडली आणि टाळेबंदी संपेपर्यंत ४ महिने गप्प बसलो.

टॅक्स नावावर झाल्या खेरीज इले. मीटर नावावर होत नाही त्यामुळे मला आलेली इले. बीले आम्ही एकमेकांशी अदलाबदल करतो.

सप्टेंबर नंतर मग हळुहळू सर्व शिथलीकरण झाल्यावर एके दिवशी तो कागद / फोर्म भरुन एक खिडकी योजनामध्ये गेलो व सगळी जरुरी कागद पत्रांसहित त्यांच्याकडे सुपुर्द केला. खिडकीवाल्यांनी हस्तांतरणाचा कागद मिळाला असा शिक्का मारुन एक पावती दिली आणि १५ दिवसांनी या असे सांगुन आतल्या लिपिकाचे नांव त्यावर लिहले आणि त्यांना भेटायला सांगितले.

खरी गोष्ट इथुन सुरु झाली. मी जेव्हा त्यांना भेटायला जायचो तेव्हा ते कुठे तरी वसुलीला गेलेत असे आजुबाजुचे सहकारी सांगत आणि काही जण तर आम्हाला करोनासाठी अतिरिक्त कर्तव्य (ड्युटी) ला जावं लागत आहे तुमचे काम एव्हढ्यात होणार नाही असे सांगत.

शेवटी एकदाची त्या लिपिकाची गाठ पडली आणि मी माझ्याकडचा पावतीचा कागद त्यांना दाखवला. तोंडात अख्खं गुटख्याचं पाकिट रिकामं केले होते म्हणुन समोरच्या खिडकीत जावुन महाशय आधी ते रिकामं करुन आले. पलिकडे कोणी उभे असता तर नक्कीच त्यांना महशायंचे तोंडात ब्रह्मांड दिसलं असतं.

तर जाग्यावर आल्यावर महाशयांनी माझ्या पावती वरची तारिख बघितली आणि म्हणाले की अहो तुमची सप्टें.ची तारिख आहे इथे बघा आधीच ३ गठ्ठे आहेत तेव्हा या कामाला वेळ लागेल. प्राध्यान्यक्रमाने तुमचा फॉर्म या ४ थ्या गठ्ठयात आहे. तेव्हा जरा वाट पाहावी लागेल.

दिवस जात होते काम काही होत नव्हते एके दिवशी मात्र तुम्ही ४ ह. भरलेत तर काम लवकर होईल असे कानावर आले. मला काही हे पटत नाहीये.
आता प्रश्न हा आहे की या महाशयांना कसे सामोरे जावे?
१) मी त्यांना नाही म्हणालो तर ते माझे काम ३ गठ्ठे पुर्ण झाल्यावरच करणार पण त्याला कितीही अगदी १ ते २ वर्षही लागु शकतात. मी जिथ पर्यंत अगदी बाळबोध चेहर्याने त्यांना विचारणार तेव्ह तेव्हा ते अजुन वेळ लागेल असेच सांगणार. आणि मला थांबावेच लागणार कारण मुळात तिकडे जावुन शहानिशा कशी होणार की आता कोणत्या महिन्याच्या गठ्ठ्याचे काम चालु आहे ते. माहिती अधिकार या योजने अंतर्गत मी काम कुठपर्यंत आले आहे ते पाहु शकतो काय?
२) मी जर त्यांना पैसे घेताना लाच. लु. विभागाकडुन कारवाई करवुन पकडुन दिले तर ते (म्हणजे त्यांचे सहकारी सुध्दा) पुढे आयुष्यभर माझे कोणतेच काम करणार नाहीत अडवणुक करतील, डुख ठेवतील असे वाटत आहे.
३) शिवाय यापुढे इमारतीच्या इतर कोणत्याही सदस्यांचे सुध्दा जर टीएम.सी. मध्ये काहीही काम झाले नाही तर ते मला वाळीत टाकतील.

या सर्वांवर काय उपाय तुम्हाला सुचवासा वाटतोय? . गप्प बसुन माझा क्रमांक येण्याचे वाट पाहु की सरळ ४ ह. देवुन मोकळा होवु?

प्रतिक्रिया

तुम्हाला काय हवं आहे? आपलं काम कसंही करून व्हायला हवं आहे का आपलं काम नियमानुसार आणि वेळेवर व्हायला हवं आहे यावर पुढचं अवलंबून आहे.

कानडाऊ योगेशु's picture

26 Dec 2020 - 10:14 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही इतर वेळेला काय करता?
म्हणजे ट्राफिक पोलिसाने पकडले व तर तुम्ही रदबदली करता कि पावतीनुसार दंड भरता?
तुमची प्रवृत्ती जर सामोपचाराने पुढे जायची असेल तर इथेही तसेच करा असे म्हणेन.
४ हजाराबाबतीत बार्गेंनिग होते का ते पहा.
तुम्हीच लिहिले तसे असा चरित्रहिन कारकुन काही अनावश्यक गुंता करुन ठेवु शकतो.

गामा पैलवान's picture

27 Dec 2020 - 3:05 am | गामा पैलवान

प्रमोद देर्देकर,

एका बाबतीत माझा अंदाज सांगतो.

तुम्ही म्हणालात की :

मी जर त्यांना पैसे घेताना लाच. लु. विभागाकडुन कारवाई करवुन पकडुन दिले तर ते (म्हणजे त्यांचे सहकारी सुध्दा) पुढे आयुष्यभर माझे कोणतेच काम करणार नाहीत अडवणुक करतील, डुख ठेवतील असे वाटत आहे.

या प्रकारे कोणीही वाळीत पडल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. उलट जर लाचखाऊस पकडून दिलंत तर तुम्हाला सगळे टरकून राहतील.

आ.न.,
-गा.पै.

रीतसर अर्ज करून पोच पावती घ्यावी.
काम किती दिवसात पूर्ण करावी लागतील ह्याची काही तरी सरकारी नियमावली असते.
एक तर करावेच लागेल किंवा काम का होणार नाही त्याचे कारण तर तर देतीलच.
पहिली पद्धत काय आहे ते समजून घ्या आणि त्या मार्गाने जा.
लाचलुचपत कडे जाण्यासाठी तुमचा मार्ग तरी योग्य असायला हवा .
नाही तर तुम्ही च गैर कानुनी काम करून घेण्यासाठी लाच देत आहात अशी उलटी केस व्हायची.

कंजूस's picture

27 Dec 2020 - 9:41 am | कंजूस

म्हणजे असं की प्रॉपर्टी विवरण असलेला कागद ( डॉक्युमेंट) कोणते आहे. त्याचा मालक म्हणून नोंद.
यामध्ये तीन चार प्रकार आहेत.
बहुतेक तुमची इमारत अपार्टमेंट म्हणून नोंद झाली आहे. म्हणजे प्रत्येक रहिवासी सभासदाने आपापला tax भरायचा.
----------
TMC बद्दल माहिती नाही पण इतर नगरपालिकांंचे कामकाज डिजिटल झाले आहे। फॉर्म योग्य ती डॉक्युमेंट्स जोडली आहेत का पाहून एन्ट्री देतात. तीन/पाच दिवसांनी तारीख असते।

------------
इलेक्ट्रिक मिटरचे आमच्याकडे महावितरण पाहते. चोख काम आहे. सध्या ग्राहकांचे मीटर पाहण्यास इमारतीत जाता येत नाही म्हणून वेळ लागत असेल.

-------------------

लाच देणे वगैरे चर्चा अशी लेखी स्वरुपात करू नये हे माझे मत.
लेखाचे नाव बदलावे.

--------------
मला स्वत:ला कामकाज सुरळीत होण्याचाच अनुभव आहे.

अदलाबदल केली म्हणजे काय केले.
खरेदी खत केले की बक्षीस पत्र केले ,नक्की काय केले .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2020 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं काम करुन घ्या. नसत्या उठाठेवी करीत बसल्याने मनावर नसत्या गोष्टीचा ताप राहात असतो, आणि ते ओझं मनावर घेऊन फिरावे लागते. त्याचा परिणाम कुठेही उमटतो. राग, त्रागा, चीडचीड. वगैरे असे माझे मत आहे, याचा अर्थ तुम्हाला चुकीचा मार्ग स्वीकारा असे सांगत नाही. नियमांनी काम करुन घेण्यासाठी आपल्याकडे तो संयम आवश्यक आहे, त्रास सोसण्याची तयारी असल्यास नियमांनी काम करुन घ्यावे.

माहितीच्या अधिकारात आपलं काम कुठपर्यंत आलं आहे, अशी माहिती मागता येणार नाही असे वाटते. माहिती अधिकारी आता नियमित माहिती मागण्यांच्या अनुभवाने आता कट मारायला शिकले आहेत. जसे की. माहिती अधिकार कायदा २००५ अनव्यये आपण विचारलेली माहिती प्रश्नात्मक किंवा अमुक धमुक स्वरुपाची असल्यामुळे देता येणार नाही. किंवा योग्य विभागाकडे वेगळा अर्ज करावा. किंवा काहीही त्यात आपला वेळ जातो. आपण काय माहिती मागणार आहात त्याचं स्वरुप एकदा ठरवून घ्यावे म्हणजे त्यांना माहितीची टाळाटाळ करता येणार नाही.

अशा व्यक्तींची लाचलूचपत अधिका-यांकडे तक्रार करता येईल का याबाबतीत माझं मत जरा कन्फ्यूज असतं. लाच घेणारा व्यक्ती नालायक असतो, निर्लज्य असतो, अशा व्यक्ती जेलात गेल्या पाहिजेत. धडा मिळाला पाहिजे हेही खरं आहे. पण एवढ्याने त्याला शिक्षा होईलच, त्याच्यावर कार्यवाही होईलच याची काही शाश्वती वाटत नाही. दुसरा भाग असा की तक्रार केल्यानंतर आपलं काम पेंडिंग राहात नाही, लाचलुचपत विभागाचे अधिकारी तुमच्या कामाचे फॉलोअप घेतात. पण तेही काम वेळेत झालं पाहिजे नाय तर येरे माझ्या मागल्या.

तिसरी गोष्ट, असा संबंधित व्यक्ती जेलात गेली तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. तितकं आपलं मन पक्क असेल तर कायदेशीर कार्यवाही नक्की करा. नाय तर स्वतः फिलिंग हळहळ वाटणा-यापैकी असाल तर फिर रहने दो. :)

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

27 Dec 2020 - 1:46 pm | कंजूस

+१

तेजस आठवले's picture

27 Dec 2020 - 12:39 pm | तेजस आठवले

कळव्यात कुठ्ली बिल्डिन्ग ?
काम होण्याची वाट पहा असेच सुचवीन

कंजूस's picture

27 Dec 2020 - 1:44 pm | कंजूस

लाचलुचपत विभागाचे
लाचलुचपत निर्मुलन विभागाचे

जानु's picture

27 Dec 2020 - 7:05 pm | जानु

<<तसेच त्या समोरच्या पार्टीलाही छोटा फ्लॅट हवा होता म्हणुन त्यांनी माझा फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही फक्त जागेची अदलाबदल केली. आमची अजुन टी.एम.सी. मध्ये नोंदणीकृत सोसायटी नाही. अनाधिकृत अपार्टमेंटच आहे.>>
वरील वाक्यात तुमच्या मर्यादा आहेत. या व्यवहारात भविष्यात तुमचे आणि इतरांचे नुकसान होईल.
अशी कामे करतांना आपले हात मोठ्या दगडाखाली सापडणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

(आमची अजुन टी.एम.सी. मध्ये नोंदणीकृत सोसायटी नाही. अनाधिकृत अपार्टमेंटच आहे.)
वरील वाक्यात तुमच्या मर्यादा आहेत. या व्यवहारात भविष्यात तुमचे आणि इतरांचे नुकसान होईल.
अशी कामे करतांना आपले हात मोठ्या दगडाखाली सापडणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2020 - 11:01 pm | श्रीगुरुजी

टॅक्स नावावर झाल्या खेरीज इले. मीटर नावावर होत नाही त्यामुळे मला आलेली इले. बीले आम्ही एकमेकांशी अदलाबदल करतो.

अर्ज केला आहे ना? मग डोक्याला त्रास करून घेऊ नका. मालमत्ता कर तुमच्या नावावर पाठविणे हे संपूर्णपणे महापालिकेचेच काम आहे. ते त्यांनाच त्यांच्या सवडीनुसार करू दे. तोपर्यंत मालमत्ता कर व वीजवापराची जेवढी बिले येतील ती वेळेवर भरत रहा. भरलेल्या सर्व बिलांच्या पावत्या, मालमत्ता कर भरल्याची पावती जपून ठेवा.

नुकतेच नवीन घर बांधल्याने मालमत्ता पत्रक, नवीन वीज मीटर, पूर्णत्वाचा दाखला, सुधारीत मालमत्ता कर यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयात भेट दिली आहे. त्या अनुभवावरच सांंगतोय. अगदीच गरज असेल तर स्थानिक नगरसेवक, आमदार यांच्या ओळखीतून काय करून घ्या.

वीज मीटर मालकाच्या नावावर होणे आवश्यक आहे. तुम्ही भविष्यांत फ्लॅट विकायला निघाल तेंव्हा हे प्रकरण अंगाशी येईल पण सध्या विशेष घाई काहीही नाही. फ्लॅट मध्ये आग वगैरे लागली तर मात्र प्रकरण महागात पडेल. असली कामे नेहमी एजन्ट ला घेऊन करावीत. ५-१० हजार रुपयांत मनातही एजेंट हे काम सहज करून देईल.

वीज मीटर एक प्रॉपर्टी आहे.
*तसे मीटर बाजारात विकत मिळते पण ती प्रॉपर्टी नसते.

*तो मीटर वीज मंडळाकडे आपल्या / कुणाच्या नावे असणे ही नोंद असली की ती प्रॉपर्टी होते.

* कुणाच्या नावावर आहे हे वीज बिलावरच्या नावावरून कळते.

* त्या व्यक्तीकडून NOC लागते. "मी अमुक घर या व्यक्तीस विकले आहे आणि माझ्या नावावरचे मीटर ( क्रमांक ---) डिपॉझीटसह
त्याच्या नावावर करण्यास काहीच हरकत नाही."
*तर ही NOC, घर खरेदी रेजिस्ट्रेशन अग्रीमेंटचे पार्ट टु आणि मीटर नावावर करण्याचा अर्ज दिला की अधिकारी एक चलन तयार करतो. साधारण रु २५०रु. ते चलन वीज मंडळाच्या क्याशरला भरून पावती घ्यायची.
*मग एक इन्सपेक्टर तुमच्या घरी येऊन पावती आणि मीटर पाहून जातो. आणि नंतर पुढल्या महिन्यात बील तुमच्या नावाने येते.
यामध्ये स्थानिक नगरसेवक, आमदार, एजन्ट यांना हाताशी धरण्याचे काहीच कारण नाही.
---------------------

या वरच्या केसमध्ये
१) बिल्डरच्या नावे मीटर वीज बिलात दाखवलेले असतात.
२) बिल्डरकडून 'अ'ने घर खरेदी केलेले अग्रिमेंट कॉपी.
३) अ'कडून 'ब'ने घर खरेदीकेलेले अग्रीमेंट आणि 'अ'ची NOC,
४) 'ब'चा मीटर ट्रान्सफर अर्ज. असे कागदपत्र दिल्यास काम होईल.

कामास वेळ लागणे ही वेगळी गोष्ट आहे. पण हा व्यवहार चोख आहे.

हस्तर's picture

29 Dec 2020 - 3:27 pm | हस्तर

चुकून पण आडवे जाऊ नका
मी स्वतः पोस्ट सारख्या तद्दन फालुटू खात्यात तक्रार केली होती एकदा त्यांनी पार्सल सरळ मुख्य सेंट्रल ला अडकवून ठेवले