(एका क्षणात विदेहत्व !)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in काथ्याकूट
26 Nov 2020 - 4:13 pm
गाभा: 

(एका क्षणात विदेहत्व !)

आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा आमच्या सोत्रीअण्णांचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आम्हाला पण आवरला नाही. ही घ्या शिमग्या निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !

१. काऊ स्टँप अर्थात चैतन्यचूर्णाचे सेवन ही काही फार भारी गोष्ट नाही. पण पूर्वीच्या लोकांनी चैतन्यचूर्णाचे सेवन या गोष्टीचा उगीच मोठा बाऊ करुन ठेवला आहे. टल्ली होणे, विमान उडणे, किक बसणे, झालंच तर तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो असल्या जाहिरातीमूळे लोकांच्या मनात काऊ स्टँपच्या सेवना विषयी दहशत निर्माण झाली आहे. वास्तविकात चैत्यन्यचूर्णाचे सेवन आणि कायXचूर्णाचे (Xच्या जागी योग्य शब्द निवडा) सेवन यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत जोरात किक बसणे ही समान भावना उत्पन्न होते आणि दोन्ही च्या सेवनाने मोकळे होणे ही समान दैहिक घटना आहे.

इतर मार्गाने केलेल्या उत्सर्गांपेक्षा किक बसल्यावर काऊ स्टँपमूळे सूलभ उत्सर्ग होतो इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग काऊ स्टँप खाण्याची मौज काही और आहे. श्रीखंड पुरीची परमोच्चता चारपाच तासांच्या सुस्त झोपेत आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्‍यात होणारी घटना आहे. त्यामुळे ( त्याने जरी आपण मरत नसलो तरी मेल्या सारखे पडून रहाण्यातही फार मजा आहे) तसेच काऊ स्टँप च्या सेवनाने काय कमाल परिणाम येतात याची कल्पना कुणीही करु शकणार नाही.

२. मुद्दा फक्त असा आहे की काऊ स्टँप सेवना पूर्वीचे आपण इतरांपेक्षा फारसे वेगळे नाही आहोत हा अनुभव यायला हवा. पण स्वत:ला निर्व्यसनी म्हणवून घेणाऱ्या लोकांनी याबाबतीत पण अनंत लफडी करुन ठेवली आहेत.

मुळात आपण इतरांपेक्षा वेगळे नाही आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, वेगळेपणा सिध्द करण्यासाठी उगाच विलायती ब्रँड चे चैतन्यचूर्ण घ्यायची काहीच गरज नाही, कंबरेत लाथ मारल्यासारखी किक ही ही स्थिती दोन्हीतही आहेच. किंबहूना काउ स्टँप मधे ती जास्तच आहे. अजून आपण सूपरम्यान किंवा रजनी झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फारतर “मिठून” होता येईल याची जाणीव ठेवायची आहे. म्हणजे आपल्या कडे पॅन्टवर घालायची चड्डी नाही तर 'चट्टेरी पट्टेरी चड्डी आहे' ही जाणीव आपल्याला आहे. जसे याच चड्डीला आपण बर्मुडा म्हणतो म्हणत आपण टेचात वावरतो, किंबहुना आपण चड्डी नव्हे तर थ्री पीस सुट घातला आहे असा माज चाळीत फिरताना आपल्या चेहर्यावर दिसतो. तिच गोष्ट चैतन्य चूर्णाची असायला हवी. पण विलायती ब्रँड खाणे आपल्याला भारी वाटते तर काऊ स्टँपला मात्र आपण नाके मुरडतो.

दूर एक पानाचा ठेला आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो रात्री उशीरा बंद झाला तर आपल्याला संपली असं वाटत नाही, कारण आपल्या खिशात आपण एक्स्ट्रा पुड्या ठेउन आहे. आणि खिशातली पुडी जरी संपली तरी मित्र आपल्याला उधार देईल याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे, आपल्याला खिशातल्या पुडीची जाणीव होत असली तरी ठेला आणि खिसा या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी ठेल्याची आठवण होतेय अगदी तशीच (संपूर्ण) खिश्याची झाली की ठेला बंद झाला काय किंवा खिशातली पुडी संपली की काय दोन्ही एकच ! (काही समजले नाही ना? मला पण मी काय लिहिले हे अजिबात समजले नाही)

३. नवशिक्यांसाठी म्हणून सांगतो ही एक अत्यंत सोपी साधना आहे. शक्यतो सकाळी किंवा कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे, जमले तर कुठेतरी बुड टेकून, बसा. डावा हात पसरल्या सारखा पुढे करा व हातामध्ये थोडा खळगा तयार करा (त्यामुळे चूर्ण हातातच राहील) आणि त्यावर पुडी मधले चैतन्यचूर्ण घ्या जितके सहज मावेल तेव्हढेच. उजव्या हाताच्या तर्जनीवर थोडा (आपल्या वकूबा प्रमाणे) चूना घेउन तो चूर्णाला हलक्या हाताने मळा. सगळी कडे नीट लागला पाहिजे, चूर्णावर हलकेच थापट्या मारा, एकदा ते चूर्ण उजव्या हातात घ्या आणि डाव्या हातावरचा धुरळा झटकून टाका. आता परत चूर्ण डाव्या हातात घ्या. मग उजव्या हाताची तर्जनी अंगठ्या जवळ नेत, अलगद डाव्या हातावरचे चूर्ण उचला त्या आणि ते अलगद आपल्या दात आणि गालांच्या मधाल्या पोकळीत सरकवा दोन्ही हात झटकून टाका. आणि निवांत बसा. (डावखुऱ्या लोकांनी हाताची अदला बदल केली तरी चालेल)

आता शांतपणे स्वत:कडे लक्ष द्या : तत्क्षणी तुमचे सगळे विचार योग्य दिशेने धावायला लागतील (असे तुम्हाला वाटेल)! सकाळची वेळ असेल तर टमरेल घेऊनही धावावे लागेल लोकांना ही सिद्धी प्राप्त करून घ्यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !

टमरेल जागेवर ठेऊन, दरवाजा बंद करून शांतपणे बसा. तुमच्या लक्षात येईल की देह हलका होत आहे आणि आपल्याला मोकळे मोकळे वाटत आहे . यू आर ऑलमोस्ट डन !

४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे माप चूकत नाही तोपर्यंत मनात कोणतीही शंका आणू नका. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या अवस्थेची मजा घ्या.

दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीर मोकळे झाल्याची जाणीव होईल, म्हणजे देह हलका झालाय आणि ते आपल्याला कळतंय हा अनुभव येईल. याचाच पुढचा भाग म्हणून तुम्ही तर्जनी-नासिका मिलन देखिल या वेळी घडवून आणू शकता. (हे अर्थात ही केवळ एक सुचवणूक आहे)

तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मेंदू दीर्घकाल किक बसलेल्या अवस्थेत राहायला लागला की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : की आपण सर्व जाणीवांच्या पलीकडे पोचू लागलो आहे , जगात आपल्याहून भारी कुणीही नाही ! आजूबाजूला चाललेल्या इतरांच्या अविरत बडबडी कडे तुम्ही सहज दुर्लक्ष करू शकाल व त्याच वेळी अत्यंत वेगाने विचार करू शकाल.

शत्रुपक्षाच्या बडबडीतले आपल्याला सोयीचे तेवढे निवडू शकाल किंवा वादंग घालताना त्यांच्या तोंडात त्यांनी न बोललेले शब्दही घुसडू शकाल किंवा त्यांच्या बोलण्यातून कोणताही अनर्थ काढू शकाल अनेक दिवस अशी साधना केल्यावर हळूहळू “आता पर्यंत आपल्याला आपण येडे आहोत असे वाटत होते. वास्तविकात आपण “सर्वज्ञ” आहोत याची तुम्हाला जाणीव होईल ! आणि मग कोणत्याही विषयावर तुम्ही अधिकार वाणी ने बोलू शकाल कोणाशीही कितीही वेळ न थकता वादंग घालू शकाल.

हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण मी सर्वज्ञ आहे ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, बाकीचे सगळे अत्यंत मूर्ख आहेत मी सोडून जगात दुसरा कोणी शहाणा नाही !

यालाच काही कुपमंडूक कुत्सित पणे “अहंगंड” असे म्हणतात . खरतर `अहंगंड ' असं काही नाही. ते स्वत:ला हुशार समजणाऱ्या बावळट लोकांचे केवळ एका आर्ग्युमंट आहे , तर मी एकटाचा सर्वज्ञ आहे ही वास्तविकता आहे.

ही सार्वभौम सर्वज्ञ पणाची जाणीव तुम्हाला तो पुरेल जोपर्यत चैतन्यचूर्ण तुमच्या गालात आहे आणि “परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी” असं लोक जरी आपल्या बाबती म्हणायाला लागले तरी ते काना आड करण्याचे कौशल्य तुमच्या अंगी बाणेल !
_________________________________________

हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. गांजा ओढल्यावर ही असाच अनुभव येतो असे अनेक सिध्द लोक म्हणतात. पण त्यामुळे होणारे दुष्परीणामाही तेवढेच भेदक आहेत. अर्थात चैतन्यचूर्णाचे ही काही दुष्परीणाम आहेतच पण तो आजचा विषय नाही. ज्याला संसारात राहूनही सर्वज्ञ व्हायचे आहे त्याला चैतन्यचूर्णाशिवाय पर्याय नाही. काही लोक हाच अनुभव मदयपानातूनही येतो असे सांगतात आणि तो मार्गही प्रचलित आहे . पण याचा एक तोटा आहे ; एकतर ते बरेच महाग पडते कारण त्यात ही बरेच प्रकार आहेत आणि गेल्या दहा हजार वर्षात कुणीही मद्यपी “सर्वज्ञ” सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि प्रखरतेने सर्वज्ञता मांडतो तितकी कोणताही मद्याचार्य मांडू शकला नाही. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.

इथले नवसदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील आणि अनुभवी सदस्य मला अनुमोदन देतील अशी अपेक्षा करतो, (जे मला अनुमोदन देणार नाहीत त्यांचा मार्ग हमखास भरकटला आहे हे त्यांनी व इतरांनी समजून घ्यावे). असल्या फालतू लोकांना मी पुरून उरेनच. कारण या जगात मी एकटाच सर्वज्ञ आहे आणि यावर विवादाची गरज उरत नाही.

पैजारबुवा,

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 4:18 pm | शाम भागवत

दादा देणारा मी पहिला.

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 4:20 pm | शाम भागवत

आता सगळं वाचतो. दोन पॅरे वाचले. म्हटलं, १ ला नंबर पटकावून पैजारबुवांचे पैजार मस्तकी धारण करावेत.

पाय काढून पाठवायला सांगा की.. ;-)

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 4:34 pm | शाम भागवत

😀

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 4:29 pm | शाम भागवत

जबरी लिहलंय.
🙏

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Nov 2020 - 4:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

दादा देणारा मी पहिला.

दादा नको...ताई नको ... साहेब नको.. उठा नको नी राठा नको.. टरबुज नको नी चंपा नको

हवे आहे ते केवळ तुमचे आशिर्वाद

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 4:41 pm | शाम भागवत

🙏
दाद च दादा झालं.
माझ्याकडूनच लोंबता बॉल पडल्यावर तुम्ही काय सोडणार आम्हाला.
तरीपण एकदम स्टेडियम बाहेर व तेही राजकारणी लोकांत नका ना भिरकावू.
😀

डॅनी ओशन's picture

26 Nov 2020 - 4:42 pm | डॅनी ओशन

*विनम्र संजय क्षीरसागर मोड ऑन*

ज्ञानोबाचे पैजार, तुम्ही गाय छाप या कर्करोगकारक वस्तूचा जो उदोउदो केला आहे, तो अत्यंत टुकार आहे. अर्थात, हे काही तुमच्या अध्यात्मिक ज्ञानाचे उदाहरण नव्हे, ते तर तुम्हात शिगोशिग भरले आहे. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखात नक्की काय चूक आहे हे दाखवण्यासाठी स्वतंत्र लेख लिहिला अशी आशा. तुमच्या सारख्याच एका महान तत्वज्ञाला हेच करण्याची विनंती केली आहे.

*विनम्र_मोड_error_404_Press_"गामापैलवान"_to_restart*

हे अत्यंत अतुलनीय काम केले ! कोणत्याही विषयात अर्थपूर्ण योगदान देणे सोडून केवळ तेजोभंग करण्याचे काम सातत्याने करता ! माझ्या "रोमान्स विथ म्युसिक" मध्ये पण पहिला प्रतिसाद असाच दिला होता, स्वतः गाणे म्हणले नाही, ना स्वतः कधी अध्यात्माचे लिखाण केले !

*स्वगत*- श्या. ये दुनिया हमको विनम्र होनेईच नई देती.

*संजय क्षीरसागर मोड ऑफ*

राजाभाउ's picture

26 Nov 2020 - 4:46 pm | राजाभाउ

बुवा __/\__ __/\__ घ्या.
बाकी काही काही म्हणायाचे नाहीये.

बेकार तरुण's picture

26 Nov 2020 - 4:50 pm | बेकार तरुण

लै हसलो.... एक नंबर लिहिले आहे !!!

ईतका जड विषय सहज सोपा करुन सांगायची तुमची कला वाखाणण्याजोगी आहे... तरी माहोल, हेवन असे शब्द असायला हवे होते... तसेच तासभर माणिकचंद चघळुन जो रीझल्ट मिळतो तो या सहज सोप्या साधनेत ५ मिनिटात मिळतो हे बेसिक ऑब्सर्वेशन मिसिंग आहे म्हणुन १० पैकी ९.७५ गुण

प्रकाश घाटपांडे's picture

26 Nov 2020 - 4:58 pm | प्रकाश घाटपांडे
यश राज's picture

26 Nov 2020 - 5:34 pm | यश राज

१ नंबर लिहिलेय ... नमस्कार स्विकारा ... _/\_

लेखापेक्षा प्रतिसाद जबरा आहेत!!
बाकी पैजारबुवांचे पैजार मस्तकी धारण करावेत असे वाटू लागले आहे

उपयोजक's picture

26 Nov 2020 - 6:42 pm | उपयोजक

मोठ्ठा ठ्ठो! :)))

कानडाऊ योगेशु's picture

26 Nov 2020 - 9:41 pm | कानडाऊ योगेशु

ती अंगुलीमुद्रा लेखात दिलेली नसल्याने आमचा निषेढ.
गायछाप चोळतानाची मुद्रा दाखवल्यास आम्हीही आपल्या पंथात सामील होऊ.

डीप डाईव्हर's picture

26 Nov 2020 - 10:44 pm | डीप डाईव्हर

बिलकुल असहमत !!!!!
माझ्या गुर्जींनी मला ओम स्टँप सेवन करायला सांगितलय. माझ्या पोराला त्याच्या गुर्जींनी चव्हाण स्टँप सेवन करायला सांगितलय. आणि माझ्या नातवाला त्याच्या गुर्जींनी विमल स्टँप सेवन करायला सांगितलय. आणि तुम्ही इथे सांगताय कि फक्त काऊ स्टँपच तुमचा उद्धार करू शकते? मग आम्ही त्याचे सेवन करणारे, आम्हाला त्याचे सेवन करायला सांगणारे आमचे सगळ्यांचे गुरुजी मूर्ख आहोत? आम्हाला सगळ्यांना मूर्ख ठरवून काऊ स्टँपचे प्रमोशन करणाऱ्या तुमच्या लेखाचा तीव्र णीषेध.
😛 😝 😂

अनन्त अवधुत's picture

26 Nov 2020 - 11:35 pm | अनन्त अवधुत

या उप्पर काय म्हणणार. दंडवत__/\__.
जहबहरिहि लिहिला आहे.

संजय क्षीरसागर's picture

27 Nov 2020 - 1:40 am | संजय क्षीरसागर

सर्कस मधला ज्योकर हा कसबी कसरतकारांपेक्षाही उच्च दर्जाचा असतो. आधीच्या कसरतवीरांनी दाखवलेलं कमालीचं कौशल्य सुद्धा किती जुजबी होतं हे तो `विडंबनात्मक शैलीनं दाखवून' लोकांना हसवतो. असे आमचे निरिक्षण आहे

पण विदुषकाकडे काहीही वकूब नसतांना त्यानं विडंबनाचा प्रयत्न केला तर ते निव्वळ माकडचाळे ठरतात असे आमच्या अल्पमतीला वाटते.

अर्थात, अशा माकडचाळ्यांना सुद्धा दाद देणारे लोक असतात पण त्यांचाही आकलनाचा वकूब तितकाच असतो असे नमूद करावेसे वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Nov 2020 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार

लेखात खोड काढण्यासारखे काही नाही कारण ते वस्तुस्थितीचं वर्णन आहे.

पण तुमचा प्रतिसाद अशासाठी इंटरेस्टींग वाटला की वर्णन केलेल्या साधनेने क्षणात विदेहत्व प्राप्त होते. याचाच अर्थ आपण सर्वज्ञ झालो याची आपल्याला जाणीव होते , तसं झालं नाही तर दुसर्‍यांचेही ऐकून घ्यायची वाईट सवय जडू शकते . आपण ठरवलं तर त्या स्थितीत बसून कोणत्याही विषयामधे आपणच सर्वज्ञ आहोत आणि बाकी सगळी दुनिया मुर्ख आहे असा विचार करता येतो. मनात चाललेले विचार स्वैर पणे व्यक्त करण्याचा निर्ढावलेपणाही येतो. मेंटल अ‍ॅक्टीविटी सर्वस्वी बेलगाम होते.

इथे तुम्ही नमुद केलेली साधना न करताच केवळ कल्पनेच्या जोरवर त्याचे आकलन करायचा प्रयत्न करत आहात.

चैतन्य चूर्ण दोन बोटांच्या चिमटीतून गालामागे सरकवल्यावर तुमच्या मनात नक्की काय सुरु झाले ते क्रमवार सांगाल का ? म्हणजे प्रतिसादाला उत्तर देता येईल.

पैजारबुवा,

आनन्दा's picture

27 Nov 2020 - 11:31 am | आनन्दा

वारलो हे वाचून!

सोत्रि's picture

27 Nov 2020 - 2:51 pm | सोत्रि

दंडवत

- (दंडवत घालणारा) सोकाजी

कानडाऊ योगेशु's picture

27 Nov 2020 - 4:49 pm | कानडाऊ योगेशु

प्रेरणा
पैजारबुवा कुठेही वैयक्तीक न होता दिलेला प्रतिसाद वाचुन आपल्याबद्दल्चा आदर द्विगुणित झाला कि वो!

संजय क्षीरसागर's picture

27 Nov 2020 - 11:37 pm | संजय क्षीरसागर

अध्यात्मिक आकलन दर्शवते ते फक्त आपण इथे विडंबन म्हणून मांडले आहे. आपली साधना आपल्याला लखलाभ होवो आम्हाला विदेहत्त्व प्राप्त असल्याने त्याची गरज नाही.

अर्थात, मागे आमच्या धाग्यावर आपण आम्हाला शब्द दिला होता त्याचे सोयिस्कर विस्मरण झाले हे पाहून आपण कोणतीही साधना कितपत सचोटीने करत असाल असे मात्र नक्की वाटले.

असो, विडंबनाचे सर्वमान्य नियम या धाग्याच्या निमित्ताने लिहिले इतकेच. आपण ते फारसे लावून घेऊ नका.

pspotdar's picture

28 Nov 2020 - 1:05 am | pspotdar

जरा धिरे से पादना

सुबोध खरे's picture

30 Nov 2020 - 9:32 am | सुबोध खरे

@ संजय क्षीरसागर

या विडंबनाला आलेले जुन्या मिपा करांचे प्रतिसाद पाहिले तर आपल्या एकंदर धाग्यातील मजकुरापेक्षा लोकांना आपला भंपकपणा जास्त जाणवतो आहे.

लक्षात घ्यायचं असेल तर घ्या

अन्यथा भरपूर वेळ काढून मेगाबायटी प्रतिसाद दिल्यास फाट्यावर मारण्यात येईल

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2020 - 10:55 am | ज्ञानोबाचे पैजार

@ संजय क्षीरसागर या विडंबनाने आपण दुखावले गेला असला तर सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो.

आपण असे लिहिता :-

"मागे आमच्या धाग्यावर आपण आम्हाला शब्द दिला होता त्याचे सोयिस्कर विस्मरण झाले हे पाहून आपण कोणतीही साधना कितपत सचोटीने करत असाल असे मात्र नक्की वाटले."

आपण असे म्हणालात त्या मुळे आम्हाला जुने धागे उकरावेच लागले.

http://misalpav.com/comment/1068915#comment-1068915

हाच तो प्रतिसाद ना ज्याचा तुम्ही उल्लेख करत होतात?

हा प्रतिसाद देताना मी जे काही लिहिले होते त्याचे मी तंतोतंत पालन करीत आहे (असे अर्थात मला वाटते)

मी म्हणालो होतो


पण याचा अर्थ या नंतर पुन्हा कधीही टवाळी करणार नाही असा नक्कीच नाही. "क्यो की मै अपने कमजोर स्टुडंट का हाथ कभी नही छोडता"

मी यावेळी असेही म्हणालो होतो

तुमच्या पुढील लेखनाला अनेक अनेक शुभेच्छा, तुम्ही स्वांतसुखाय लिहित रहा आम्ही त्याचा आनंद घेत राहू

तेव्हा तुम्ही लिहिणे थांबवू नका आणि आम्हाला कुठे फट दिसली की आम्ही विडंबने करणे थांबवणार नाही. "क्यो की मै अपने कमजोर स्टुडंट का हाथ कभी नही छोडता"

पैजारबुवा,

१.

तेव्हा तुम्ही लिहिणे थांबवू नका आणि आम्हाला कुठे फट दिसली की आम्ही विडंबने करणे थांबवणार नाही

माझ्या लेखनात तुम्ही चूक काढून दाखवाल ? काय बिशाद आहे ! तुम्ही विदेहत्त्वावर लिहूनच दाखवा आणि मग काय भंबेरी उडते ते पाहा. मला असली फालतू विडंबनं करायची गरजच नाही, त्या लेखावरच तुम्हाला तुम्ही लेख लिहिलायं का विडंबन केलंय ते समजणार नाही.

२. माझा सगळा लेख जसाच्या तसा कॉपी/पेस्ट मारुन त्यात किरकोळ बदल करत तंबाखू खाऊन येणार्‍या किकला विदेहत्त्व म्हणणं हे तुम्ही घेतलेल्या आयडीला आणि तुम्ही आयुष्यभर अनुसरत असलेल्या भक्तीमार्गात कुठे बसतं याचा विचार करा.

३. ते एक असो, कुणी अध्यात्म करो किंवा न करो, व्यक्तिला किमान कृतज्ञता असणं ही सर्वोत्तम इमानदारी आहे. तिथं तुम्ही लिहिलंय :

तुमच्या लेखनातून तुमचा व्यासंग नक्की जाणवतो, तुमच्या कडे अनेक वेगवेगळे विषय हाताळाण्याचीही क्षमता आहे. उदा एखाद्या गजलेचा आस्वादात्म्क लेख लिहावा तर तो तुम्हीच किंवा मागे एकदा तुम्ही ग्रेस वर एक लेख लिहीला होता त्या नंतर मला ग्रेस नव्याने भेटायला लागला. तुम्ही लिहिलेली "रुणुझुणु" ही लेखमाला, किंवा भय इथले संपत नाही हे लेख खरोखर वाचनिय आहेत. तुमच्या गेसाल्ट वरच्या लेखाने तर मला जगा कडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, वाटले अरे? असेही काही असू शकते ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. या नव्या दृष्टीकोनाचा मला वैयक्तीक आयुष्यात खुप फायदा झाला.

याचं विस्मरण व्हावं ही तुमच्यासाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.

४. माझ्या संगीताच्या धाग्यावर सुद्धा तुम्ही हाच प्रकार केला होता पण त्या मागची नेमकी मानसिकता मी अशी काही खोलली की त्या धाग्यावर सदस्यांचे विधायक प्रतिसाद यायला लागले. तुमच्यासारखे शंभर जरी आले तरी तुम्ही माझा गाण्याचा आनंद हिरावून घेऊ शकणार नाही आणि दिवसेंदिवस ते बहरतच जाईल. पण तुमच्या या मानसिकतेमुळे तुम्ही आयुष्यात कधीही स्वतःच्या गाण्याचा आनंद घेऊ शकणार नाही. अर्थात, ही वृत्ती सोडून तुम्ही कधी गायलात आणि इथे ते सादर केलंत तर पहिला प्रोत्साहनाचा प्रतिसाद माझा असेल . पण सध्या तरी तुम्ही जे इतर सदस्य गाऊ शकले असते त्यांना हतोत्साह करुन ठेवलं आहे हे नक्की.

हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सच अहंकार आहे आणि कोणत्याही मार्गानं जा, तो तुम्हाला स्वतःची स्वतःशी भेट होवू देणार नाही.

तुम्हाला पटो किंवा न पटो, नेमकीच हीच गोष्ट मी इथे २. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स ! सांगितली आहे.

५. बाकी (२/३ अपवाद वगळता) त्यांच्या स्वतःच्या धाग्यावर पराभूत झालेले सदस्यच तुम्हाला इथे टाळ्या वाजवतांना दिसतील आणि एक्झॅक्टली हेच मी नक्की प्रॉब्लम काये ? इथे सांगितलं होतं !

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 12:03 pm | सुबोध खरे

सर्कस मधला ज्योकर हा कसबी कसरतकारांपेक्षाही उच्च दर्जाचा असतो.

परत साफ चूक

विडंबन करण्यासाठी आपल्याला त्यात विषयात निपुणता असावीच लागते असे नाही.

परंतु एखाद्याच्या अतिरेकात किती भंपकपणा आहे हे खुसखुशीत शैलीत दाखवता आले पाहिजे - आचार्य अत्रे

साष्टांग नमस्कार हे नाटक लिहिताना किंवा ब्रम्हचारी सिनेमा लिहिताना अतिरेक कसा आहे हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलेले आहे.

"ब्रम्हचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू" हे सांगणाऱ्या एका महंतांची भंबेरी उडवणाऱ्या आचार्य अत्रे यांनी काही ब्रम्हचर्य पाळले नव्हते.

माईसाहेब तो माईसाहेब...पैजारबुवा सुभानल्ला...
अरे काय अघोषित 'विडंबन सप्ताह' वगैरे चालू आहे का मिपावर 😀

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 12:06 pm | सुबोध खरे

इथे तुम्ही नमुद केलेली साधना न करताच केवळ कल्पनेच्या जोरवर त्याचे आकलन करायचा प्रयत्न करत आहात.

चैतन्य चूर्ण दोन बोटांच्या चिमटीतून गालामागे सरकवल्यावर तुमच्या मनात नक्की काय सुरु झाले ते क्रमवार सांगाल का ?

हायला हे म्हणजे नोबॉल वर षटकार मारला

परत फ्री हिट आहेच

शाम भागवत's picture

27 Nov 2020 - 12:11 pm | शाम भागवत

फ्री हीटचा चेंडू कोणीच टाकायला तयार नाही. आता कसं व्हायचं?

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 12:15 pm | सुबोध खरे

थोडा धीर धरा.

सर्वज्ञांवर विश्वास ठेवा.

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2020 - 1:28 pm | टवाळ कार्टा

कहर आहे हा लेख...त्या वरच्या २ फोटोंच्या खाली मिपाचे हॉल ऑफ फेम म्हणून पैजारबुआंच्या पायाचा फोटो लावा =))

nanaba's picture

27 Nov 2020 - 4:26 pm | nanaba

हहपुवा
हे मात्र फक्त बाबा आणि सासरे ट्राय करू शकतात, नव्हे करतात.

साष्टांग दंडवत स्वीकारावा पैजारबुवा.
लेख वाचुन क्षणभर चक्रावलोच . हे काऊ ष्टयांप चैतन्यचूर्ण आहे तरी काय हे कळेना.
कळेना कळेना कळेना ढळेना
ढळे नाढळे संशयोही ढळेना ||

आणि  तुमचा 'पेरणा'लेख पुन्हा एकदा वाचल्यावर तर -

अवघाचि जाला गळांठा
एकाहून एक मोठा
कोण खरा कोण खोटा
कळेना जाले 

मग पुनश्च  तुमचा लेख वाचल्यावर  मात्र --

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे। 
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते काऊ-ष्टयांपेचि योगे॥  

.... हे स्पष्टपणे आकळले. मग गुगलबाबाला शरण गेल्यावर तर या काऊ ष्ट्याम्प उर्फ  'गाय' छापची  महती तर अधिकच समजली.हे गायछाप भारतातच काय, अख्या जगात फेमस आहे. थेट डोण्याभाऊ ट्रम्पतात्या सुद्धा 'गाय' चे  फ्यान आहेत.
.

एवढेच काय, या गायछापचा इतिहास पार 'जुन्या करारा'तील मोझेस पर्यंत जातो.
.

इंग्लंडामिरेकेत तर फार पूर्वीपासून बायकोच्या नकळत गुपचूप 'गाय'छाप चघळायला जाणार्या पुरुषांना  'गाय -डिसीव्हर' म्हणत.
.

गायछापच्या योगे  ते अश्या उन्मनी अवस्थेत वावरत असतात की ते आहेत तरी की नाहीत असा संशय यावा. 
.

सिगार मध्ये 'गायछाप घालून ओढणार्याला तिकडे 'गाय-बॉय' म्हणत.
.

तर  गायछाप सेवन करणाऱ्या  पोरींना  'गाय-परी' म्हणत. त्या मदालसा  'बर्लेस्क' नृत्य करीत. 
.

असो. आमच्यापुरते बोलायचे, तर तुमचा लेख वाचून आम्ही इथल्ल्या  पटेल स्टोरातून गायछाप आणून त्याचे सेवन करते जालो. लगेचच उन्मनी का काय म्हणतात तश्या अवस्थेस प्राप्त होऊन आपले शरीर अगदी हलके झाले असून आपण वरवर - वरवर - वरवर - वरवर जात आहोत, याची पुन्हा एकदा (संदर्भ इथे बघावा) प्रचिती आली, आणि आता आपण सदेह स्वर्गाला  जाणार, याची खातरीच पटली. तिकडे स्वर्गात रंभा  मेनका उर्वशी तिलोत्तमा वगैरेचे ड्यांस बघायचे आहेत, आणि एवीतेवी 'सदेह' स्वर्गास जाणे घडून येणार आहे, तर ती डॉ प्रकाश वेरेकर वाली सुप्रसिद्ध  'म्यान -वूमन झिंग सॉ' वाली अंगठी सुद्धा तिकडे घेऊन जावी म्हणतो. 
या विषयावर आणखी कोदकाम करत आहोत. अजून काही रत्ने गवसली, तर पेश करूच. तोपर्यंत एक नवीनच विश्व खुले करून दिल्याबद्दल अनेक आभार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2020 - 8:11 am | ज्ञानोबाचे पैजार

काउ स्टँप चा इतिहास इतका प्राचिन आहे की तो पार जुन्या करारा पर्यंत पोचतो हे ठाउक नव्हते.

तात्यां ना आता काउस्टँप खाण्यासाठी बराच वेळ आहे तेव्हा पर एकदा त्यांच्या बरोबर एक काउस्टँप कट्टा झालाच पाहिजे.

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते काऊ-ष्टयांपेचि योगे॥

हा श्लोक इथे देउन काउस्टँप च्या महानतेचा एक अजोड पुरावा दिल्या बद्दल माझ्या कडून तुम्हाला काउस्टँपचा एक बॉक्स आणि चुन्याच्या १० डब्या लागू झाल्या आहेत.

पैजारबुवा,

सतिश गावडे's picture

27 Nov 2020 - 8:38 pm | सतिश गावडे

विडंबन आणि प्रतिसाद, दोन्ही कहर आहेत. मजा आली वाचताना. :)

वामन देशमुख's picture

28 Nov 2020 - 1:13 am | वामन देशमुख

लइ भारी !

प्रचेतस's picture

28 Nov 2020 - 9:12 am | प्रचेतस

कहर आहात माउली

चौकटराजा's picture

29 Nov 2020 - 9:18 am | चौकटराजा

आमचे परममित्र आत्मुबुवा यांनी " खाऊन" फेकून दिलेल्या पुडीचा कागद खाऊन बघितला !कागदाचा हा प्रभाव तर मालाचा काय असेल ? खरेच की " आता या परत उरले नाही काही ,देहीची विदेही होऊन गेलो ! " असे वाटाया लागले ! त्यामुळे पैजारबुवा तुमचा लेख हे विडंबन आहे आहे असे मी मानीत नाही ! तो खरोखरच नोबेल शोध आहे !

खेडूत's picture

29 Nov 2020 - 12:57 pm | खेडूत

____/l\____

:)

प्रचेतस's picture

30 Nov 2020 - 11:17 am | प्रचेतस

एकदम झक्कास विडंबन.
मजा आली.