नोटिस पिरीयड सर्व्ह करताना दुसरी ऑफर आणि कंपनी निवड

Primary tabs

जेडी's picture
जेडी in काथ्याकूट
21 Nov 2020 - 9:41 pm
गाभा: 

सध्या नवीन जॉब शोधत आहे. मुलाखती देत आहे. एका कंपनीची ओफर मिळाली आहे. त्यानंतर सध्याच्या कंपनीत राजीनामा दिला. सध्या नोटीस पिरीयड सर्व्ह करत आहे .
माझ्या आजपर्यंतच्या करीयरमध्ये अगोदर ऑफर हातात घेवून नवीन जॉब शोधलेला नाही ; पण भरपूर लोक असे करताना पहिले .
कमी कालावधीत नवीन एम्प्लॉयी जॉइन होईल अशा कॅन्डीडेट ला कंपन्या प्राधान्य देतात असे ऐकून आहे . अरली जॉयनिंग हा बोनस मिळवणेचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही.
आता जॉबचे भरपूर कॉल्स येतात. जेंव्हा नोटिस पिरीयड सर्व्ह करत आहे असे सांगते, तेंव्हा लोक “ऑफर हातात आहे का”? असे विचारतात . होकारार्थी उत्तर दिल्यावर एचआर लगेच एक रॉऊंड अरेंज करतात. सतत कॉल करत राहतात पण पुढचे राऊंड संपवत नाहीत , पुनः पुनः कॉल करत राहतात . तर अशा परिस्थितीत नेमके कंपनीला काय सांगावे ? ओफर आहे की नाही? एका कंपनीची एचआर मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते.
समजा, नवीन ओफर मिळालीच तर पहिल्या कंपनीला काय सांगावे ? हे हातळताना सगळा गोंधळ होतो आहे. याबाबतीत मला मदत हवी आहे . शिवाय कंपनीची निवड कोणत्या निकषावर करावी ? आर्थिक हा मुद्दा आहेच पण आतापर्यंत मोठी , एमएनसी वैगेरे फुगा मी पाहिला आणि चुटकीसरशी फुटला पण . शिवाय छोट्या कंपन्यातील भरपूर काम , प्रोसेस नसणे , प्रोजेक्ट गेला तर जॉब जाण्याची भीती हे ही अनुभवून झालेय .
पूर्वी सतत जॉब चेंज केलेला नाही पण बराच अनुभव गाठीशी आहे. कंपन्या ठरलेल्या बजेट (नोकरी वर नमूद केलेले ) पेक्षा तुमचा आधीचे पॅकेज काय होते त्यावरच हाइक देणेसाठी आग्रही असतात तर नक्की कोणती भूमिका घ्यावी ?

प्रतिक्रिया

पैलवान's picture

21 Nov 2020 - 11:11 pm | पैलवान

जाणकारांकडून उत्तरांच्या प्रतीक्षेत..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Nov 2020 - 11:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुलाखतीसाठी अनेक कॉल्स येत आहेत त्याबद्दल अभिनंदन ग जेडे. सतत नकारघंटा वाजवणार्या आमच्या राजेशाने हे वाचायला हवे. असो.
तुझ्या अनुभवाला ईतरत्र किती पगार मिळतो त्याउपर +-१० ते२०% असावा असे आमचे मत. त्याहून जास्त असेल तर कठिण काळात नोकरी जायची भीती. कंपनी कोणती निवडावी? तुला पुढची ५ वर्षे नोकरीत कोणता रोल करायला आवडेल? कंपनीत तसे रोल करणार्या लोकाना विशेष प्राधान्य दिले जाते का? कंपनीच्या कामात्/नफ्यात असा रोल असणार्या लोकांचा सहभाग किती? उ,दा. गूगलचे उदाहरण घेउ- येथे कंपनीचा मूळ डी एन ए हा संगणक तण्त्रज्ञान हा आहे. बाकी मार्केटिंग्/सेल्स/एच आर वगैरे आहेच पण कंपनी चालते वा ओळखली जाते ती तिच्या तंत्रज्ञानामुळे(सर्च इंजिन्/जीमेल वगैरे)
कंपनी निवडताना तुझा डी.एन, ए(तुझी आवड) व कंपनीचा डी एन ए जुळतो का हे महत्वाचे आहे. कंसल्टिंग कंपनी असेल तर तुला कंसल्टिगचे काम मुळातून आवडायला हवे. क्लाएंटशी बोलणे, सादरीकरण,नविन शिकणे अशा गोष्टिंची तुला मूळातून आवड हवी.
एकदा हा डी एन ए जुळला की बाकी सर्व जुळून येते.

मार्कस ऑरेलियस's picture

21 Nov 2020 - 11:35 pm | मार्कस ऑरेलियस

हा प्रकार मी एकदा केलेला आहे २०१४ मध्ये . मला अक्षिस बन्केची ऑफर होती , ती स्विकारत असतानाही मी रितरर सॅलरी निगोशियेशन मध्ये स्पष्ट सांगितले होते की तुम्ही जे ऑफर करत आहात ते मार्केट स्टँडर्ड पेक्षा खुप म्हणजे खुपच कमी आहे पण केवळ तुमचे ब्रॅन्ड नेम पाहुन मी ऑफर स्विकारत आहे.
त्यांची ऑफर स्विकारली आणि नंतरही जॉब शोधत राहिलो. अन देवाच्या कृपेने मला लगेच दुसरी ऑफर मिळाली तब्बल २५-३०% जास्त ! अक्षिस ला दाखवले हे पहा मी म्हणालोच होतो की तुम्ही मार्केट स्टँडर्ड पेक्क्षा खुप कमी ऑफर करत आहात . हे पहा पुरावा. ते सॅलरी री निगोशियेट करायला तयार झाले होते पण मीच नको म्हणालो अन त्यांची ऑफर धुडकावली. ह.र. ने देखील जास्त कटकट केली नाही कारण त्यांना आधीच माहीत होते की ते मला खुपच कमी ऑफर करत होते !

बाकी मी एकदम अ‍ॅनार्चो कॅपिटॅलिस्ट आहे . त्यांउळे कंपन्या जे करतात त्यात काहीच चुक नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
त्यामुळे स्वतःचे स्किल्सेट्स अपडेट करत राहाणे, कायम मार्केट मध्ये अ‍ॅक्टिव्ह रहाणे आणि महत्वाचे म्हणजे निगोशियेशन्स स्किल्ल्स शिकणे ( की ज्यासाठी अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्द आहेत) हे अत्यंत महत्वाचे आहे. This is part of your career !! You have to OWN YOUR CAREER. No one is gonna help you with that.

बाकी नवीन जॉब शोधासाठी शुभेच्छा !
इतरांच्या वैविध्यपुर्ण अनुभवांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत !

-
मार्कस ऑरेलियस

ईश्वरदास's picture

21 Nov 2020 - 11:40 pm | ईश्वरदास

आधीच नमुद करतो कि मी प्रोजेक्ट बेस EPC कंपनी मध्ये काम करतो, पण माझा एक आयटी वाला मित्र आहे ज्याने पहिला स्वीच मारत असताना (पहिल्या च कंपनी मध्ये ५ वर्ष काम केल्यानंतर) एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, सिलेक्ट झाला, ऑफरलेटर घेतले, सध्याच्या कंपनी मध्ये राजीनामा दिला आणि नंतर अजून एक इंटरव्ह्यू देऊन तिसऱ्या च कंपनी मध्ये रुजू झाला. हे बर्यापैकी आयटी वाल्यांना शक्य आहे पण मॅन्युफॅक्चरींग वाले किंवा प्रोजेक्ट बेस EPC वाले अशा प्रकारच्या कंपनी मध्ये थोडं अशक्य वाटत आहे.

कानडाऊ योगेशु's picture

22 Nov 2020 - 12:44 am | कानडाऊ योगेशु

एका कंपनीची एचआर मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते.

असा प्रॉब्लेम होतो खरा. पण प्लॅन बी साठी हे गरजेचे आहे. असे एक उदाहरण ऐकण्यात आहे. नोटीस पिरियड मध्ये ऑफर हातात होती व त्याने दुसरा जॉब हुडकला नाही.ज्या कंपनीची ऑफर होती तिथे काही कारणास्तव ऑफर रद्द झाली आणि नंतर मग दुसरा जॉब हुडकण्याची वेळ आली.
दुसरेही उदाहरण पाहिले आहे. जसजसा नोटीस पिरियड कमी होत जातो तसतसे पॅकेज मध्ये निगोशिएट करता येऊ शकते. (स्किल्ड जॉब असेल तर.)
बाकी एच.आर ने इथिक्सच्या गोष्टी सांगितल्या तर सरळ दुर्लक्ष करणे.
बेंगलोरमधल्या एका नावाजलेल्या आय.टी कंपनीत जॉब सोडला तेव्हा तिथल्या एच.आर ने मला जॉब सोडु नये म्हणुन माझे बौध्दीक घेतले. ह्याच इथिक्स मॉरल वगैरेच्या गोष्टी केल्या. काही दिवसांनंतर कळले ती स्वतः तेव्हा नोटीस पिरियड सर्व करत होती.

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2020 - 5:38 pm | चौथा कोनाडा

बेंगलोरमधल्या एका नावाजलेल्या आय.टी कंपनीत जॉब सोडला तेव्हा तिथल्या एच.आर ने मला जॉब सोडु नये म्हणुन माझे बौध्दीक घेतले. ह्याच इथिक्स मॉरल वगैरेच्या गोष्टी केल्या. काही दिवसांनंतर कळले ती स्वतः तेव्हा नोटीस पिरियड सर्व करत होती.

हा .... हा .... हा .... यालाच इथिक्स म्हणतात !

कंपनीची एच आर आणि त्यांचे सो कॉल्ड एथिक्स नक्की काय असते तेच समजत नाही.
माझ्या एका मित्राला त्याच्या कंपनीने एका दुपारी फोन करुन बोलावून घेतले.
आणि सांगितले की त्याच्या विरुद्ध काही एस्केलेशन्स आहेत आणि त्या साठी कंपनीने त्या इसमाला कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या मित्राने राजिनामा द्यावा .
मित्राने जेंव्हा विचारले की काय एस्कलेशन्स आहेत त्या वेळेस एच आर ने ते आम्ही डिस्क्लोज करु शकत नाही असे साम्गितले.
त्यावर मित्राने मी राजिनामा देणार नाही असे सांगितले.
एच आर ने त्यावर तुला टर्मिनेट करावे लागेल असे सांगितले.
आम्हाला टारगेट पूर्ण करायचे आहे.
या कम्पनीतली ही एच आर नंतर दुसर्‍या एका कंपनीत केलेल्या फ्रॉड साठी जेलची हवा खातेय.

टेक महिन्द्र मधील एच आर चे हे संभाषण ऐका.
एथिक्स हा शब्द एच आर साठी हा फक्त इतरांच्या बाबतीत वापरायचा शब्द असतो
याला अर्थात दुसरी बाजूही आहे.
कंपनी जेंव्हा कोणाला ऑफर देते , त्या व्यक्तिच्या जोईनिंग डेट वर विसंबुन प्रोजेक्ट प्लॅन केला जातो आणि त्या व्यक्तीने जॉईन नाही केले तर प्रोजेक्ट वर परिणाम होतो. ही जबाबदारी एच आर ला घ्यावी लागते

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा

कॉर्पोरेट कर्मचारी विश्वात गाजलेला ध्वनीतुकडा !
या तुकड्यामुळे कंपनीप्रमुखांनी जाहिर माफी मागतली असल्याचे आठवतेय.

विजुभाऊ's picture

22 Nov 2020 - 6:04 pm | विजुभाऊ

कंपनी कॉस्ट कटिंग च्या सबबीखाली लोकांना कमी करते मात्र या कंपनीप्रमुखाना मिळणारा पगार ऐकाल तर तोंडातले बोट चार दिवस बाहेर येणार नाही.
https://economictimes.indiatimes.com/tech/ites/tech-mahindra-ceo-gurnani...

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2020 - 1:16 pm | चौथा कोनाडा

हे एक्सेक्युटिव्ह लोक म्हणजे माकडे आय मिन माकडीण असतात. पाणी गळ्यापर्य्ंत आलं की माकडीण जशी पिल्लांना पायाखाली घेते तसे हे हाताखालच्या कष्टकर्‍यांचा बळी देत असतात. आणि याच अधिकारी पदाचा वापर करत हाताखालच्या कष्टकर्‍यांना कृष्णपत्र करत असतात.
(अनुभवावरून हे माझे सर्वसाधारण मत आहे, याला अपवाद असणार्‍या सन्माननिय लोकांनी स्वतःला वगळावे)

अमर विश्वास's picture

22 Nov 2020 - 6:13 pm | अमर विश्वास

नवीन जॉब ऑफर स्वीकारताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात ...
(तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता हा माहीत नाही म्हणून जनरल प्रतिसाद देतोय )

१. तुम्ही सध्या करिअरच्या कुठल्या टप्प्यावर आहात आणि पुढच्या ३ ते ५ वर्षात कुठे पोचायची इच्छा आहे हे ठरावा. काही कंपन्या उत्तम पगार देतात पण वर्क - लाईफ बॅलन्स गणलेला असतो .... त्यामुळे नक्की काय हवे ते आधी ठरावा
२. एक ऑफर हातात असताना दुसरी शोधणे / सॅलरी निगोशिएट करणे यात गैर काहीही नाही. फक्त चुकीची माहिती देऊ नका / माहिती लपवू नका.
३. रहाता राहिला प्रश्न एथिक्स चा ... तर प्रोफेशनली दुसरा जॉब शोधणे यात काहीच गैर नाही. तसेच जॉब हे ओपन मार्केट आहे ... म्हणजे मागणी - पुरवठ्याप्रमाणे किंमत ठरत असते ... जसे एखादे विशेष स्किल असेल तर पुरवठा (रिसोर्स चा) कमी त्यामुळे किंमत (पगार) जास्त ... आपली किंमत आपणच ठरवायची. त्यामुळे सॅलरी निगोशिएशन मध्ये गैर काहीच नाही ... तुम्हाला कमीत कमी सॅलरी देणे हे HR चे काम आहे तर जास्तीतजास्त मोबदला मिळवणे हे तुमचे
४. अन एथिकल काय आहे ? तर एकदा ऑफर स्वीकारल्यावर पुन्हा सॅलरी साठी निगोशिएट करणे / ऑफर स्वीकारल्यावर ठरलेल्या वेळी जॉईन ना करणे

बाकी पैसा कोई भगवान नही ... लेकिन भगवानसे ज्यादा काम भी नही हे लक्षात ठेवले म्हणजे झाले

मी आय टी मध्ये टेक्निकल आर्किटेक्ट म्हणुन काम करते.
साह्जीकच माझ्यातली टेक्निकल स्ट्रेंथ समजणारी कंपनी मला हवी आहे. ज्या कंपन्या काहीही न समजणारया टेक्निकल डिरेक्टर किंवा सिटिओ ठेवतात त्या कंपन्यात मला काम करायला आवडणार नाही. नुसते बोलबच्चनगिरी करणार्यालाही प्राधान्य देणार्या कंपन्या मला नको आहेत पण हे बाहेरुन समजणे अवघड आहे.

नुसते फाड्फाड इंग्रजी बोलता आली म्हणुन त्यांना अतिशहाणे समजणारी कंपनीही मला नको आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Nov 2020 - 4:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गूगल, अ‍ॅमेझॉन वगैरे कंपन्यात प्रयत्न करावास असे आमचे मत. फाड्फाड इंगजी,बोलबच्चनगिरी न करता तेथे चांगले काम मिळते असे ऐकले आहे. शिवाय टीम वगैरे न बनवता स्वतंत्रपणेही काम करता येते.

बाहेरून काहीच समजत नाही. आणि ज्या वेळे समजते त्या वेळेस आपण मुरलेल्या लोणच्यासारखे झालेले असतो.
मोठ्या कंपनीत काम करताना अनेक गोष्टी आयत्या तयार मिळतात ( उदा : टेम्प्लेट्स , टेस्ट स्क्रिप्ट्स टेक्निकल रेफरन्स वगैरे)
लहन कम्पनीत हे स्वतः अनुभव घेऊन करावे लागते.
कष्टाच्या बाबतीत कंपनी लहान मोठी असे काहिही नसते.
बाकी तुमचे टॅलेंट ओळखून्न तुम्हाला काम देणारी कंपनी हे सूख फार थोड्यांच्या नशिबात असते

माहितगार's picture

24 Nov 2020 - 5:40 pm | माहितगार

.... एका कंपनीची एचआर मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते. ...

पहिली गोष्ट पहिले, वेठबिगारी आणि गुलामगिरी या मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे अखिल मानवतेने स्विकारून दोनेक शतके तरी सहज होऊन गेली आहेत, भारतीय राज्यघटना, एकवेळ मतदानाचा अधिकार मुलभूत अधिकार म्हणून देत नाही पण 'व्यवसाय स्वातंत्र्य' मूलभूत अधिकार म्हणून देते. त्यामुळे अपेक्षेला न उतरणारे काम सोडून दुसरे काम मिळवणे तुमचा मूलभूत अधिकार आहे त्यात अनैतिक काहीही नाही.

मला मुलाखतीत बाँड लिहून मागणार्‍या एका मॅनेजींग डायरेक्टरांचे मी व्यवस्थित बौद्धीक घेतले. ज्या व्यक्तिचे मन कामात रमणे थांबते त्याला कामात जबरदस्तीने अडकवून ठेवण्याने क्वालिटी वर्क मिळणे संभव नसते. व्यवसाय चालवणे जेवढी कला आहे तेवढीच कर्मचारी टिकवणे ही कला आहे आणि ती कंपनीतील वरीष्ठ आणि एच आरची स्वतःची जबाबदारी आहे. एखाद दिवशी अचानक एखादा कर्मचारी उपलब्ध नाही तर त्याची जागा लगेच भरून काढता येईल इतके त्याचे स्वतःचे संपर्क आणि संबंध सुदृढ असावयास हवेत आणि त्यासाठीच त्यांना गलेलठ्ठ पगार मिळत असतात. चार प्लेसमेंट सर्विसेस हाताशी असतात. आता एथिक्सच्या गप्पा करणार्‍यांना हे कसे ऐकवायचे ही आपली कला आहे. किमान बाँड नावाची कलमे मी प्रत्येकवेळी यशस्वीपणे नाकारू शकलो तसे अगदीच प्रत्येकाला प्रत्येकवेळी जमेल असे नाही पण लेखी बाँड ही वेठबिगारी आहे हे निश्चित.

हातात जॉब ठेऊन दुसरा जॉब मिळवण्यासाठी खोटे बालून कामाच्या वेळेत काम बाजूस ठेऊन दुसरीकडे मुलाखतीस जाणे यात तत्वाला जराशी मुरड घालावी लागते. हातातले काम तातडीचे आणि गंभीर नसेल तर तत्वास अशी मुरड अवश्य घालावी. कारण आपण आपल्या इतरही अत्यावश्यक कामांसाठी अथवा आजारी पडलो तर कामातनं सुटी घेतच असतो. तातडीच्या आणि गंभीर कामेही लोक बाजूला ठेऊन मुलाखतींना पळतात ते मी स्वतःच्या तत्वांसाठी टाळले. चालू कंपनीतील बॉस काय म्हणतो या पेक्षा सर्वसाधारणपणे कंपनीच्या अल्टीमेट कस्टमरची ड्यूडेट चुकणार नाही आणि कंपनीचे मोठे आर्थीक नुकसान होणार नाही हे पाहून मुलाखती केल्या म्हणजे तुम्ही नैतिक दृष्ट्या योग्य मार्गावर आहात.

शक्यतोवर हातात जॉब ठेऊनच दुसरा शोधावा नाही तर निगोशिएशन मध्ये फारमोठे नुकसान होऊ शकते. दुसरी एखादी ऑफर मिळवून त्या ऑफरच्या बळावर स्वतःच्या कंपनीत ऑफर देणार्‍या कंपनीचे नाव न सांगता निगोशिअ‍ॅट करून पहाण्याचाही मार्ग असतो तो अनेक जण पत्करताना दिसतात तसे हातात ऑफर असून त्याच रकमेच्या आधारे तिसरा जॉबशी निगोशिएट करणे या दोन मार्गांनी मिळणारी वाढ चांगली असू शकते. १० टक्क्याच्या आसपास वाढ कोणतीही कंपनी सहज देण्यास तयार होऊ शकते ऑफर पंधरा टक्क्या पेक्षा कमी असल्यास स्वतःच्याच चालू कंपनीत निगोशिएट करण्याचा मार्ग उपलब्ध असल्यास अवश्य करून पहावे. हातात समजा सध्याची कंपनी धरून ३ ऑफर आहेत तर कामाचे वातावरणाची सुसह्यता आणि कंपनी टर्नओव्हर आणि मिळणारी ऑफर आर्थिक आणि पोझिशन सुद्धा यां चारीचा मेळ कुठे अधिक व्यवस्थित बसतो हे पहाणे सयुक्तिक असावे. सहसा चालू कंपनीत फिनांशिअल आणि पोझीशनचा बेस्ट पॉसिबल डिमांड पण बाहेर न पडता करुन बघावी जे काही मिळाले त्या नंतर इतर कंपनीत ट्राय करावा.

धागा लेखात अजून एक त्रास नोंदवला आहे तो म्हणजे एकाच कंपनीने वारंवार अनेक वेळा मुलाखतींना बोलावणे आणि अशा मुलाखती देताना कामाच्या वेळांशी पुन्हा पुन्हा तडजोड करावी लागणे. हा खरेच गंभीर प्रकार आहे. मुख्यत्वे या प्रकारात सद्य चालू कंपनीतील आपल्या कामाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो त्यामुळे बॉस मंडळी कातावतात कामाच्या उत्पादकतेसाठी बॉस मंडळी तणाव वाढवतात त्यात कामाचे वातावरण आणि पगाराबद्दल समाधान नसेल तर एकुण मनस्थिती आणि दबाव बाहेर पडण्याचे होतात मग निगोशिएशन न ताणता जॉब बदलण्याच्या निर्णयावर व्यक्ती येतात हे मुलाखतीसाठी हकनाक वारंवार बोलावणार्‍या आणि बसवून ठेवणार्‍या समोरच्या लोकांना माहित असते, त्यांना तुमची गरज तपासायची असते गरज वाढवायची असते, गरज वाढली की कमी किमतीत माणूस मिळतो. या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आजकाल दूरध्वनी आणि ऑनलाइन मुलाखतीचे सुलभ मार्ग आहेत मुलाखतीचे किती राऊंड असतात आणि त्यातील काही दूरध्वनी आणि ऑनलाईन मिळून होऊन जाऊ शकतील का पहाणे उचित असावे.

प्रत्यक्ष मुलाखतीस वेळ ठरवून बोलवून फार दीर्घकाळ थांबवण्याचा प्रकार होत असल्यास सेल्सची माणसे आपल्याकडे अपॉईंटमेंट हँडल करतात तसे करावयास हवे त्या बद्दल मागे कधीतरी सविस्तर लिहिले आहे पण थोडक्यात दिलेल्या वेळेपेक्षा दहा किंवा पंधरा मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागला तर एकदा आठवण देऊन पहावी हातात दुसरी पुढची अपॉईंटमेंट नसेल तरी असल्याचे सांगावे. पंधरा पंधरा मिनीट वाढवून मागत राहील्यास हातातली अपॉईंटेमेंट पूर्ण करून येतो किंवा ऑनलाईन मिटींग करून येतो असा निरोप लिहून अर्ध्या एकतासा नंतरची अपॉईंटमेम्ट किंवा पुढच्या दिवसाची अपॉईंटमेंट मागावी. अर्थात सगळी काळजी घेऊनही चालू कंपनीतल्या वेळा आणि काम चुकून ताण वाढणे हा प्रकार होतोच हा सगळ्यांच्या बाबतीत होत असतो हाता खालचा कर्मचारी सारख्या सुट्ट्या का घेतोय आणि त्याला जॉब बदलावा वाटू नये असे वातावरण आणि संधी देण्याची जबाबदारी बॉसची आणि कंपनीची असते. दिलेली ऑफर आपल्याच कंपनीची अधिक चांगली कशी आहे हि संकल्पना नैतीकतेचे लेक्चर न पाजता देण्याची जबाबदारी त्या त्या एच आरची असते. व्यक्तिगत संवाद कुठे कसे होतील हे सांगता येत नाही पण समोरची व्यक्ती चुकीच्या पद्धतीने संवाद साधते यात तुम्ही अनैतीक नसता.

असो तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Nov 2020 - 7:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

स्वतः आय. टी. मधे गेली १७-१८ वर्षे घासत आहे आणि कामगार,आर्किटेक्ट ते मुकादम सगळी कामे केली आहेत म्हणुन २ शब्द सांगतो
१. एथिकल असे काही नसते. मनासारखा पगार अणि काम मिळेपर्यंत नोकरी शोधत रहा. मी तर असे लोक बघितलेत की एका कंपनीची ऑफर घेउन कामावर रुजु होउन त्याच दिवशी दुसरी ऑफर आली म्हणुन फरार(अ‍ॅब्स्काँडिंग) झालेत.
२.नोटीस काळ जसा जसा कमी होतो तसे तसे आपली किंमत वाढवत नेणारे लोक्स( अर्ली जॉईनर्स)
३.क्लायंट साईडला काम करणार्‍यांना सर्विस कंपनीत आणि व्हायसेव्हर्सा काम करणे जड जाऊ शकते (उदा. विप्रो सर्विस प्रोव्हायडर आणि एच डी एफ सी बँक क्लायंट)
४. कंपनीच्या नावावर जाऊ नका. लहान कंपनीत आयुष्य काढलेले आणि ऊलट मोठ्या एम एन सी तुन हाकलुन दिलेले लोक्स बरेच बघितलेत.
५. स्वतःला अपग्रेड करत राहणे मस्ट आहे. तुमची स्पर्धा दरवर्षी खोर्‍याने बाहेर पडणार्‍या पदवीधारकाशी(हो, कारण आजकाल अभियंते परवडत नाहित, एम बी ए तर नाहिच) आहे.
६. वर्क लाईफ बॅलन्स पण बघा. नाहितर घरचे जागे तेव्हा आपण झोपलेले असे होत राहिल.

बाकी आठवेल तसे सांगेन

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 8:03 pm | मुक्त विहारि

गेले ते दिन गेले

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Nov 2020 - 8:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

मी हे करणे टाळ्तो! ग्रोथ ऑर्गनीक असावी अस कोण एक म्हणुन गेलंय अन ते पटलं म्हणून बाकी काही नाही. शिवाय, जॉब सर्च वगैरे मोस्टली आता नेटवर्कींग थ्रु असल्याने ऑफर घेऊन आरामात नोटिस पिरेड सर्व्ह करुन नवी कंपनी जॉईन करायची. बास.

सिरुसेरि's picture

24 Nov 2020 - 9:08 pm | सिरुसेरि

सध्याच्या करोनाजन्य काळात जागतीक मंदीचे सावट निर्माण झाले आहे . अशा परिस्थितीत जॉब बदलणे कदाचीत धोक्याचे ठरु शकते . आत्ता ऑफर देणारी पुढची कंपनी पुढे मागे " करोनाजन्य काळ" , "जागतीक मंदी" हि कारणे देउन कदाचित उलटण्याचीही शक्यता आहे . अर्थात हि केव़ळ एक शक्यता आहे . असे घडेलच असे नाही . आणी घडणारही नाही .

तरिही या शक्यतेचा थोडाफार विचार करुन जर आहे त्या कंपनीत तुमच्या काम , पगार किंवा अन्य समस्या यांच्यावर जर मार्ग निघत असेल तर सध्या तरी तिथेच थांबता आले तर चांगलेच .

हा धागा वाचुन पुर्वी लिहिलेला लेख आठवला . ( जाहिरात ) https://www.misalpav.com/node/39300