देवाचिये द्वारी

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
8 Nov 2020 - 7:17 am

मला ह्दयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली त्या अनुभवाविषयी लिहिले आहे चार भागात. त्यापैकी दुसरा भाग
: २
देवाचिये द्वारी.
"त्याचे" घर हेच  शेवटचे विश्रांती स्थान असते सर्वांचे,असे म्हणतात. शेवटी तिथेच जायचे आहे. सर्वांनाच.अपवाद नाहीच.फक्त कोण ,कधी, कसा ,तिथे पोहचणार?हे मात्र इकडच्या कुणाला कधीच ठाऊक नसते. आणि तिथे जायला कुणीही कधीच तयार ही नसतो. भितीच वाटत असते जाण्याची.त्या कल्पनेचीही.आपण कायम इथेच राहणार आहोत हेच गृहीत धरून असतात सगळे .आपण या जगात येतो,तेव्हाच  श्वासांची संख्या ठरलेली असते म्हणे. ती संपली की सारेच संपले.आपले इथले अस्तित्व ही. आपल्या श्वासांची नक्की संख्या अन ते केव्हा संपणार हेही ठाऊक नसते.त्या विषयीचे आपले अज्ञान हे एक वरदानच आहे.अज्ञानातील आनंदामूळे तर जगणे सुसह्य आहे.
  त्या क्षणी बहुतेक मी,'त्याच्या ' घरापर्यंत पोहचलो.दार ठोठावले.पण 'त्याने 'दार उघडले नाही .मग परतलो. किंवा परत पाठविला गेलो. का ,कसा, परतलो ?कुणी परत पाठवले?ठाउक नाही.
इकडून तिकडे जाण्या बाबत ,तिथे  घेण्याबाबत ,तिथेही काही नियम ,व ते राबवणारी यंत्रणा वगैरे ;असेल का? त्यानुसार  माझ्या साठी  ठरविलेली वेळ,ती, नव्हती का?
  कदाचित माझ्या येथील वास्तव्यातील ,पूर्वनिर्धारित ,
पूर्वनियोजित श्वाससंख्या संपलेली नव्हती. त्या संख्येची मोजणीत चूक झाली, पण वेळीच चूक लक्षात येउन ती सुधारली,व त्यामुळेच ठोठावूनही,दरवाजा उघडला नव्हता,आत घेण्यात आले नव्हते.असे तर झाले नाही? या भूतलावर,माझ्या कडून व्हायची काही कामे ,अजून बाकी आहेत आणि त्यासाठी तर ही 'वापसी'नसेल?

  श्रीमद्भागवताचे दशम स्क॔दातील पहिल्या अध्यायात एक श्लोक आहे.
"विपर्ययो वा किं न स्याद् गतिर्धातुर्दुरत्यया।
उपस्थितो निवर्तेत निवृत्त:पुनरापतेत्॥"
अर्थात,विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुध्दा टळतो आणि टळलेला सुध्दा परत येतो.
  विधात्याने काही विशेष कारणासाठी तर माझा मृत्यू टाळला नाही?  कोण जाणे?
    "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी"
ही अवस्था नकळत अनुभवली होती का  ?
                  नीलकंठ देशमुख .
                    8793838080
      nilkanthvd1@gmail.com

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

9 Nov 2020 - 10:28 am | महासंग्राम

आपलं लिखाण खूप चांगलं आहे, तुमच्याकडे अनुभवाचा मोठा साठा खचितच आहे तो नक्कीच वाचायला आवडतो.
तरी दोन सूचना करवश्या वाटतात. बरोबर वाटत असेल तर घ्या, अन्यथा दुर्लक्ष केलं तरी चालेल.

१ लिखाण प्रकाशित करण्याआधी पूर्वपरीक्षण करण्याची सोय मिपाने दिलीये त्याचा वापर करून आपण त्यातलं व्याकरण, परिच्छेद आणि आपलं लिखाण प्रकाशित केल्यावर कसं दिसेल याची सुविधा आहे, ते एकदा वापरून पहा. कारण बरेचदा अर्धवट वाक्य, परिच्छेद यामुळे लिखाण चांगलं असूनही लिंक तुटते.

२. शक्य झालं तर आपला संपर्क क्रमांक आणि इ मेल आयडी लेखात टाकणं टाळावं. त्याचा गैर वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 6:02 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. सुचनांचा विचार करीन.आता हे पूर्ण झाले आहे.
नावासोबत मोबाईल व इमेल देण्याचे कारण कुणाला वैयक्तिक संपर्क करणे असल्यास सोपे जावे हा हेतू .

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2020 - 8:11 pm | चौथा कोनाडा

नावासोबत मोबाईल व इमेल देण्याचे कारण कुणाला वैयक्तिक संपर्क करणे असल्यास सोपे जावे हा हेतू .

वैयक्तिक संपर्क करण्यासाठी मिपावर "व्यक्तिगत संदेश" ची सोय आहे. कुणीही संपर्क केलातर तिथे नोटीफिकेशन दिसते.

छान लिहिता तुम्ही.. पण खूपच लवकर संपला हा भाग.
मोठे भाग लिहा.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 5:59 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. जे जसे सुचते तसे लिहिले. मोठे वाचायला लोकाना वेळ ही नसतो हल्ली. तुमच्या सारखे अपवाद. पण हे नक्की लक्षात ठेवीन. पूढे

गवि's picture

9 Nov 2020 - 1:08 pm | गवि

चांगले लिहिताय.

पण म्हटल्याप्रमाणे चार भाग आगोदरच लिहिलेले असतील तर एकदमच प्रकाशित करावेत.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 5:56 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. उरलेले दोन भाग एकदम टाकत आहे