नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
22 Sep 2020 - 1:29 am
गाभा: 

सध्या ज्योतिष शास्त्राच्या नावावर भलतीच तुफान चर्चा रंगली आहे.
नाडीभविष्याच्या पट्ट्यातून भविष्य कथना खेरीज अशा अनेक बाबी आहेत की ज्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी शोधक वृत्तीच्या तमिळ भाषिकांना उपयोगी पडेल असे डेटा बँकचे काम पुन्हा चालू झाले आहे.
काही दिवसापासून नाडी ग्रंथ भविष्यावरील इंग्रजी व हिंदीतील पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे काम हाती घेतले आहे. त्यात आता भर पडून भारतभरातील ३४३ नाडी केंद्रांचे पत्ते सादर केले आहेत. उद्देश असा की आपापल्या शहरा, गावाजवळच्या केंद्रातून नाडीपट्ट्यातून आपले भविष्य जाणून घेता यावे. केंद्रवाले माझे कोणी लागत नाहीत, पण प्राचीन भारतीय नाडी महर्षींच्या या अदभूत कार्याची माहिती व्हावी म्हणून हे पत्ते लोकांच्या उपयोगी पडावेत. काहींच्या ताडपट्टया तिथे सापडतील काहींच्या नाही. काहींना कथन समाधान कारक वाटणार नाही. तर काहींना हा खर्चिक प्रकार असल्याने त्या वाटेला न जाणे योग्य वाटेल. ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न असल्याने मला त्यात पडायची गरज वाटत नाही.
या पार्श्वभूमीवर ताडपट्ट्यात व्यक्तीचे नाव कोरून असते का असा प्रश्न मनात येतो. विशेेषतः जर व्यक्ती तमिळ न जाणणारी असेल तर तो आणखीन गंभीर बनतो.
सन २०१५ मधे मी आणि विवेक चौधरी नेपाळला भृगु संहितेच्या शोधात गेलो होतो. परतताना लखनौ व प्रतापगढच्या भृगु केंद्रांना भेट द्यायला निघालो होतो. लखनौला स्टेशनवरून सकाळी भृगुशास्त्रींना ठरल्याप्रमाणे आम्ही येत आहोत म्हणून फोन लावला तर कळले की ते आज भेटू शकत नाहीत. वाईट वाटले की आधी ठरवूनही असे घडावे म्हणून. दिवस फुकट जाणार होता. नाश्ता घेता घेता मी माझ्या पुस्तकातील नाडीकेंद्रांच्या पत्त्यातून लखनौ केंद्राचा फोन क्रमांक काढून संपर्क साधला.
'हो, याना १० वाजेनंतर' म्हणून तमिळटोन मधे उत्तर मिळाले. गुरुनाथना मी आधी ओळखत नव्हतो. ना त्यांनी माझे तमिळ मधील पुस्तक वाचले होते. पण भेटीच्या सुरवातीलाच त्यांनी आपण एखाद्या ताडपट्टीचे वाचन करून त्याचे चित्रिकरण करून द्यायला आढेवेढे न घेता मान्य केले. त्याच फ्लॅटमधे त्यांची मंडळी राहत होती. त्यांनी कपाळाला भस्मम, चंदनाचा टीका लावून, सजून एका ताडपट्टीच्या बंडलातील पट्ट्या सुट्या करत म्हटले, 'कोणाचे पहायचे आहे?'
'आम्ही त्यांना कुठलीही पट्टी चालेल' म्हटल्यावर काही पट्टीतील व्यक्तींची नावे वाचायला सुरु केले. एके ठिकाणी विवेक म्हणाला, 'सर ही पट्टी चांगली वाटते, यात नावाची फोड करून ती पहाणाऱ्यांना, पट्टीत नावे, जन्मदिनांक व ग्रहमान कसे लिहिलेले असते ते समजून घ्यायला सोपे जाईल.'
त्या पट्टीतील नावे असलेले, ग्रहपरिस्थिती व जन्म दिनांक असलेले श्लोक एका नोटबुकमधे लिहून काढल्यावर त्याच्या संदर्भाने चित्रीकरण सुरु झाले.

हे चित्रण विवेकच्या मोबाईलवरून केले गेले आहे. शिवाय माझा मोबाईलवरील चित्रण मिळून (65,167 views•18 Jun 2015) इतक्या प्रचंड प्रमाणात पाहिले गेले आहे.


कुंडली बनवताना जन्मस्थळ, जन्मवेळ व जन्मतारीख या गोष्टी मूलभूत डेटा म्हणून वापरला जातो.


नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.


ते कसे ते पाहू.

त्यामुळे सामान्य जोतिषशास्त्राच्या संकल्पनांना तडा जातो. असे झाल्याने जोतिषशास्त्री फुरंगटतात. आलेत मोठे हे लुंगीवाले, यांना काय कळतय? म्हणून संभावना त्यांच्या पदरी पडते. आमच्या सारख्या संशोधक नाडीप्रेमींवर खोटेपणाचा, आमचे त्यांच्याशी साटेलोटे असल्याचा आळ येतो. या सर्वाला टक्कर देत आम्ही नाडी ग्रंथ प्रेमींनी १८००शे स्कॅन्सचा डेटा गोळा केला आहे.

ही डेटाबँक माझ्या पश्चात अशा संस्थेच्या किंवा विश्वविद्यालयात ठेवली जावी कि जे इंडॉलॉजीचे अभ्यासक आहेत त्यातील ताडपत्यावरील तमिळ लेखनाच्या शोधकार्याला वाहून घेतलेल्यांना त्यातील डेटा सहजपणे उपलब्ध व्हावा व त्यांचे शोधकार्य विद्वानांसमोर ठेवले जावे...

प्रतिक्रिया

कंजूस's picture

22 Sep 2020 - 6:49 am | कंजूस

चांगला उपक्रम.
पण तुमच्याकडे कोणतती नाडीपट्टी आहे त्यावर आणखी पेनाने अधोरेखीत करू नका. म्हणजे ती कुठे द्यायची असेल तर.

नाडीपट्टीतील भविष्य खरे/खोटे ठरणे हा दुसरा विषय आहे. असलेले जुने ग्रंथ संग्रहित करणे हे आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2020 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय कमाल आहे, सगळं ग्रेट, तुफानच आहे. लगे रहो सेठ.
(फक्त शिर्षक वाचून प्रतिक्रिया दिली आहे)

-दिलीप बिरुटे

डॉ साहेब,
कबड्डीच्या खेळात दुसर्‍या पाळ्यांमध्ये जाऊन फक्त स्पर्श रेषेला स्पर्षकरून परतल्यासारखे वाटले.
आपल्या सारख्या अन्य विचारी व्यक्तीं कडून व्यस्ततेचे विषय संपले की क्लिप पाहून प्रतिसाद दिला जावा.

प्रचेतस's picture

23 Sep 2020 - 11:37 am | प्रचेतस

तुमचं नाव आहे का हो सर एखाद्या पट्टीत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2020 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, भारताच्या एवढ्या वाढत्या आबादीची नावं असायला, खूप पट्ट्या लागणार. अर्थात 'काना' म्हणजे...लतिका 'वेलांटी' म्हणजे 'माधुरी' अशी जोडजाड करायची तर नावे कशीही कुणाची कशीही सापडतील.

मला एक उत्सुकता आहे, त्या पट्टीत मी प्राचार्य कधी होणार आणि माझ्या या कलत्या आयुष्यात एखादी सुंदर अप्सरा आयुष्यात डोकावू शकते, असा काही उल्लेख असेल का ? अप्सरेच्या कमरेत हात घालून समुद्रकिनारी हलक्या पावलांनी एकेक पाऊल टाकतोय. ' बाहोमे चली आ, हमसे सनम क्या परदा' असे काही स्वप्नवत असेल काय या कल्पनेने हुरळून गेलो.

-दिलीप बिरुटे
(स्वप्नाळू)

शशिकांत ओक's picture

23 Sep 2020 - 5:23 pm | शशिकांत ओक

आणायला आधी क्लिप पाहिली पाहिजे व नंतर स्वतः च्या नाडी पट्टीचा शोध घेण्यासाठी कष्ट केले पाहिजेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2020 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स.न.वि.वि. स्वप्नातून सत्यात यायला क्लिप बघायची गरज नाही. लोकांना उल्लू बनवायचे जे काही जगभर उपक्रम आहेत त्यातला हाही एक उपक्रम आहे, असे माझे व्यक्तीगत मत आहे. आपल्यालाला माझे म्हणने पटले पाहिजे असे काही नाही. नाडीतील ते 'कूट' लेखनाची भाषा किंवा ती भानगड केवळ तामिळभाषेचा एक्सपर्टच वाचू शकतो, अर्थात त्यांनाही ते झेपत नाही असे असतांना. लोकांच्या मनोभावनेचा फायदा घेऊन लोकांना नादी लावण्याचा प्रकार आहे. पाच हजार वर्षापूर्वी कोणी महर्षीने आपलं भविष्य त्या नाडीपट्टीत लिहुन ठेवणे ही थाप आजच्या काळात चालणारी नाही, बाकी चालू ठेवा.

मिपाकर आदरणीय प्रकाश घाटपांडे साहेब हे ज्योतिषाच्या बाजूने आहेत की विरोधक आहेत आजवर मला जालीय प्रवासात समजलेले नाही, पण त्यांचा एक लेख मी कायम संग्रही ठेवलेला आहे. प्रचंड आवडलेला लेख आहे. जिज्ञासूंना नाडीपट्टीची एक चिकित्स तोंडओळख निश्चित होईल.

नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

1 Oct 2020 - 12:28 pm | शशिकांत ओक

क्लिप पहायची गरज नाही

प्रत्यक्ष प्रमाण पहायला नकार दिल्याने बुद्धिवादी लोकांचा कल समजून येतो. यापूर्वी हेच उद्गार मा श्री रिसबुडांनी मला नाडी ग्रंथ भविष्य कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायची गरज नाही. आम्ही ते तर्कानेच ठरवू शकतो. असे म्हटले होते याची आठवण झाली.
तुम्ही क्लिप पाहिली किंवा नाही तरी मला फरक पडत नाही. पण त्या निमित्ताने बुद्धी वादी प्रत्येक वेळी प्रत्यक्ष प्रमाणाचा आग्रह धरतात. पण पुरावा सादर केला तर तो पहायची गरज नाही म्हणतात. चालायचंच.

शशिकांत ओक's picture

23 Sep 2020 - 5:23 pm | शशिकांत ओक

आणायला आधी क्लिप पाहिली पाहिजे व नंतर स्वतः च्या नाडी पट्टीचा शोध घेण्यासाठी कष्ट केले पाहिजेत.

सतिश गावडे's picture

23 Sep 2020 - 5:44 pm | सतिश गावडे

हे कष्ट करण्यात जे लोक मदत करतात त्यांनाही काही हजारात मोबदला द्यावा लागत असेल ना? निदान काही शेकड्यात तरी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2020 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोटापाण्यासाठी काही दक्षिणा आवश्यक असते, एकदा की तुम्ही दक्षिणा द्यायला लागले की तुम्ही समाधानासाठी ती कृती वारंवार करीत राहता, असे माझे व्यक्तीगत मत आहे.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

23 Sep 2020 - 5:18 pm | शशिकांत ओक

केलेल्या पट्टीत एखाद्याचे नाव कसे येते हे पहायला सादर केले आहे. जर त्या व्यक्तीचे नाव, जन्म दिनांक, ग्रहमान येत असेल तर माझ्या संदर्भातील पट्टीवर माझेही नाव असायला हवे.
क्लिप पाहून झाली का?

लेखात म्हणतात ते खरं आहे.

१९६८ भृगु संहिताचे एक प्रकाशन कुणी नवीन छापलेले आणले होते. त्यात साठ वर्षांच्या आवर्तनाने सर्व कुंडल्या होत्या. त्यातली एक आपल्या वेळेशी जुळतेच . त्या पानावर जाऊन भविष्य वाचायचं. नाडी ग्रंथात तेच असेल.

म्हणजे आपला 'क्लोन' दर साठ वर्षांनी जन्माला येतोच.

अती सुंदर उत्तम उपक्रम.

Gk's picture

23 Sep 2020 - 9:02 pm | Gk

हातात फ्ल्यूट घेतलेला

इतके लिहिण्यापेक्षा सरळ कृष्ण लिहायचे की

शशिकांत ओक's picture

23 Sep 2020 - 10:45 pm | शशिकांत ओक

त्या व्यक्तीचे मुरलीधर किंवा नंदलाल असे ही होऊ शकले असते. ज्या नवीन नामक माणसासाठी पान उघडले तो लाल कृष्ण वडिलांचे नाव मान्य करत असेल तर?

Gk's picture

24 Sep 2020 - 6:38 am | Gk

मग सरळ नंदलाल लिहायचे , मुरलीधर लिहायचे

भविष्यात आधार कार्ड येणार आहे , हे नाडीवाल्याना माहीत नव्हते का ? मग सरळ आधार कार्ड नंबर लिहून भविष्य लिहायचे

शशिकांत ओक's picture

24 Sep 2020 - 8:08 am | शशिकांत ओक

लेखन कर्त्या महर्षींनी काय करायला हवे यावर आपले भाष्य टीका करायची म्हणून केली अशी वाटते. नाडी वाचकांना त्यातील अर्थ किंवा संदर्भ कसा लावून सांगावा लागतो याचे ते प्रात्यक्षिक आहे. जी त्याच्या जन्माचे कारण होती ती, आई नीला व जातकाच्या नावात 'नवीन' ही अक्षरे आहेत. असे तिथे का लिहिले गेले? तर मग वडिलांचे नाव सांगताना तसे सरळसरळ का सांगितले नाही? ताडपट्ट्यातील लेखन श्लोक आहेत का? वगैरे वर इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या अभ्यासकांच्या साठी तो शोध विषय आहे.

गामा पैलवान's picture

26 Sep 2020 - 2:15 am | गामा पैलवान

हे म्हणजे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता येणार म्हणून आजच संगणकास मराठीत सूचना देणे झाले! ;-)
-गा.पै.

आनन्दा's picture

26 Sep 2020 - 4:08 pm | आनन्दा

तसे नाही..

भविष्यात तुम्ही पिंका टाकणार म्हणून आजच तुमचा आयडी उडवण्यासारखे

Gk's picture

26 Sep 2020 - 4:13 pm | Gk

2000 मध्ये आधारकार्ड येणार व तुमचा नंबर हा असेल , हे सांगणे म्हणजे एक भविष्यच झाले

त्यानिमित्ताने ओथेनटिक झाले असते , ताडपत्री आधार लिंक झाली असती म्हणजे मग मल्ल्याला कर्ज मिळाले नसते

शशिकांत ओक's picture

25 Sep 2020 - 10:14 pm | शशिकांत ओक

ताडपट्ट्यातील लेखन श्लोक आहेत का? वगैरे वर इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या अभ्यासकांच्या साठी तो शोध विषय आहे.

असतील तर त्यांना विनंती की शोध कार्यात सहभागी व्हावे.

सतिश गावडे's picture

26 Sep 2020 - 5:27 pm | सतिश गावडे

शोध कार्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीची पट्टी फुकटात वाचण्यात येईल की त्याचे पैसे पडतील? पैसे पडत असल्यास किती पैसे पडतील?

शोध कार्यात सहभागी होण्याच्या आवाहनाच्या निमित्ताने गिऱ्हाईक शोधण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2020 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पट्टी फूकट कशी कोण वाचेल ? तो काही सामाजिक उपक्रम आहे का ? आपल्याला जर काही जाणून घ्यायचे असेल तर मानधन तो देनाही पडेगा.

शोध कार्यात सहभागी होण्याच्या आवाहनाच्या निमित्ताने गिऱ्हाईक शोधण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?

लो कल्लो बात....! इतकं थेट आणि स्पष्ट लिहिल्याबद्दल आपल्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो. :)

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2020 - 12:28 pm | प्रकाश घाटपांडे

शोध कार्यात सहभागी होण्याच्या आवाहनाच्या निमित्ताने गिऱ्हाईक शोधण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?>>> ही ट्रिक सर्व व्यावसायिक वापरतात. उदा.पेपर मधे आरोग्य पुरवणी ही जागरुकता नावाखाली भय निर्माण करतात

ओक साहेब आपला उपक्रम स्तुत्य आहे. मी क्लीप पाहिली. शंकेखोर काहीही म्हणोत जे शास्त्र इतके वर्ष टिकून आहे त्यात काहीही तथ्य नाही हे म्हणणे धाडसाचे आहे. मी स्वतः काही वर्षा पूर्वी भृगु संहिता नुसार माझे भविष्य पाहायला गेलो होतो. पुण्यात सिटी पोस्ट जवळ कुठेतरी. नक्की आठवत नाही ३०-३५ वर्षा पूर्वी. माझे नाव वगैरे काहीही न सांगता फक्त जन्म वेळेनुसार मी लेखा परीक्षक होणार हे सांगितले होते ते आठवते. पण ती संस्कृत मध्ये आहे असे मला त्या वेळी सांगितले गेले. म्हणजे नाडी पट्टी हि तमिळ मध्ये आणि भृगु संहिता हि संस्कृत मध्ये असा प्रकार आहे का ? माझी शंका अगदीच बाळबोध आहे पण आपण यावर काही प्रकाश टाकाल का ?

शशिकांत ओक's picture

2 Nov 2020 - 6:54 pm | शशिकांत ओक

नाडी पट्टी हि तमिळ मध्ये आणि भृगु संहिता हि संस्कृत मध्ये असा प्रकार आहे का ? माझी शंका अगदीच बाळबोध आहे पण आपण यावर काही प्रकाश टाकाल का ?

नाडीपट्टीतील भाषा जुनी तमिळ आहे. शिवाय मोडी प्रमाणे एकाला एक अक्षर जुळवून लिहायच्या प्रघातामुळे ती जास्त किचकट आहे. तर भृगुसंहितेची लिपी देवनागरी आहे. मजकूर संकृत मधील आहे. प्रतापगढ (उ.प्र.) मधील केंद्रात पाली लिपीतून लेखन आहे पण भाषा संकृत आहे.
भृगुवक्ता किंवा वाचक आपल्याला सांगताना संस्कृत लेखनाचे रुपांतर हिंदीतून पंजाबी लेहज्यात करताना दिसतात.

२२८७ वेळा टिचक्या पडल्या असल्या तरी व्हिडिओ क्लिप १० जणांनी तरी उघडून पाहिली की असेल याची शंका मला आहे.
आपण उत्सुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद. आपली ऐकायची इच्छा असेल तर भृगुसंहितेचे वाचनाचे प्रात्यक्षिक इथे सादर करेन.

विदिओ क्लीप मी पहिली ,पण पट्ट्यावर फोकस बरोबर नसल्या मुळे आणि तमिळ भाषा येत नसल्या मुळे काही समजत नाही.

शशिकांत ओक's picture

3 Nov 2020 - 8:39 pm | शशिकांत ओक

शोधून सादर करेन.

शशिकांत ओक's picture

3 Nov 2020 - 10:28 pm | शशिकांत ओक

पहा आवडतोय का ते.

समिक्शा's picture

7 Nov 2020 - 3:37 pm | समिक्शा

नक्कीच आवडेल

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2021 - 3:58 pm | प्रकाश घाटपांडे

नाडीपट्टीतील कथनात कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या आधीच बनून तयार आहे.>>> नाडी पट्टीचे कथन वा वाचन नाही केले तरी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी जन्माला येणार्‍या व्यक्तीची कुंडली आत्ता माझ्याकडे बनून तयार आहे.