जेंव्हा कंपनीचा सिटीओ आउटडेटेड असतो , तेंव्हा काय करायचे ?

Primary tabs

जेडी's picture
जेडी in काथ्याकूट
19 Sep 2020 - 10:18 pm
गाभा: 

सद्दया कंपनीत महत्वाचे प्रॉडक्ट लॉंच झाले . त्यातील थोड्या इनहानसमेंट करायच्या होत्या . त्यासाठी कंपनीचे दिग्गज मदत करू शकले नाहीत आणि कसेतरी ते माझ्याकडे आले . मी वाचून , स्टडी करून अगदी नवीन गोष्टी वापरुन त्यावर सोल्यूशन काढले . त्याची पीओसी केली . प्रॉड वेगळा असल्याने miटीम लिडला समजावून सांगितले, त्यांच्या डिरेक्टर डेमो दाखवला . तो खुश झाला . पण त्यांच्या लिडला ते implement करायला जमेना . मग मी त्याच्या मशीनवर implement करून दिले . त्याला तुमच्या टेस्टिंग सर्व्हर वर रिपलिकेट कर म्हणाले तर ते ही जमेना . शेवटी त्यांच्या दुसऱ्या डेवलपर करून दिले . तिलाही सर्वर वर जमेना . शेवटी मी रात्रभर जागून त्यांना त्यांच्या सर्वर करून दिले . रात्रभर का तर , सर्वर ला अॅक्सेस फक्त इन्फ्रा ला , त्यातही तो इन्फ्रा वाला अगदीच .. तरीही दिले करून . आता दुसऱ्या सर्वर वरून अॅक्सेस करायचे तर एजिपी पोर्ट ओपेन होत नव्हती , जेकेमाऊंट चालेना . तो का होत नाही हे पण सर्व शोधून सर्व सक्सेस झाले, हयात पंधरा दिवस घालवून त्या डिरेक्टरला साक्षात्कार झाला की असे केल्याने काही प्रॉब्लेम येवू शकतो , कारण त्याला काहीच माहीत नाही , कारण पण देईना आणि live पण करू देईना . 15 दिवस माझ्या झोपेचे खोबरे करून हा माणूस माझ्या हातापाया पडत होता . सोल्यूशन सक्सेस झाल्यावर त्याला हे नंतर काही प्रॉब्लेम देवू शकते ह्याचा साक्षात्कार का झाला तेच मला कळेना .
मग त्याने साऊथ इंडियन लॉबी चा यार दोस्त सिटीओ ला पिन मारली आणि हे असले काय शिट वापरले वैगेरे बरळून गेला , त्याला लेटेस्ट टेक्नॉलजी ट्रेंड माहीत नव्हते . मी जीव तोडून प्रेझेंटेशन बनवले , डॉक्युमेंट बनवले , प्रेझेंट केले .. तरीही असले काय नसते, मला सर्व कळते असे म्हणत राहीला . कंपनीचा एम्प्लॉयी काऊंट 20 के प्लस आहे तरीही त्या सिटीओला जर यार दोस्तीसाठी ऐकून घेत नसेल तर काय करायचे ? बर एवढ्याने काही तोडगा निघाला का तर नाही , सरल अत्यंत घाणेरड्या लेवल ची तडजोड करून ते पुढे चाललेत .
कंपन्या असले सिटीओ का ठेवतात ? माझ्याकडे अधिकार आहे म्हणजे मी म्हणेल तेच खरे ?

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

20 Sep 2020 - 7:10 am | आनन्दा

कंपनी जितकी मोठी तितकी लवचिकता कमी..
शक्य असेल तर कंपनीला बाय बाय करा असे मी म्हणेन.
उत्पादन आहे की सेवा? सेवा क्षेत्राचा अनुभव अजिबात चांगला नाही.

जेडी's picture

20 Sep 2020 - 8:11 pm | जेडी

हो, तोच पर्याय आहे

उत्पादन आहे, पण उत्पादन सोडुन acquisition वर भर आहे...

शा वि कु's picture

20 Sep 2020 - 8:47 am | शा वि कु

डिप्रेसिंग आहे फारच.
सगळीकडे कोणी ना कोणी असतंच असं.

खरय, इतके डिप्रेसिंग वाटतय की बास...

भीमराव's picture

20 Sep 2020 - 6:24 pm | भीमराव

खरच समस्या आहे का राजकीय विडंबन आहे?

जेडी's picture

20 Sep 2020 - 8:11 pm | जेडी

खरच समस्या आहे हो...

कानडाऊ योगेशु's picture

20 Sep 2020 - 8:06 pm | कानडाऊ योगेशु

कंपन्या असले सिटीओ का ठेवतात ?

वैयक्तीक हितसंबंध.
टेक्नोलोजीमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये साधारणपणे दर दोन वर्षांनी बदल होतात.हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.
पण ही गोष्ट जर लक्षात घेतली तर विनाकारण डोकेफोड करण्याची गरज राहत नाही.

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2020 - 8:18 pm | चौथा कोनाडा

एकदा असले डबडे लोक वरच्या पातळीवर पोहोचले की असल्याच लोकांचा कंपू तयार करतात.
हाताखालची प्रामाणिक माणसं कष्ट करत राहतात, त्यातच त्यांचा वेळ जातो, त्यांना असल्या राजकारणाचा गंध ही येत नाही, मग बिचारे राजकारणातल्या चालीला बळी पडतात.
असल्या नीच डबड्या लोकांनी काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचं आयुष्य उद्धवस्त केलेलं पाहिलंय !
ज्यांनी योग्य वेळी दुसरा पर्याय शोधला त्यांचा फायदा झाला.
वेळीच असल्या गटारीतून बाहेर पडणं उत्तम.

फारएन्ड's picture

20 Sep 2020 - 9:53 pm | फारएन्ड

तुम्ही लिहीले आहे त्या पॅटर्न ला स्टीव्ह जॉब्ज "बोझो एक्स्प्लोजन" म्हणत असे :)
https://guykawasaki.com/how_to_prevent_/

सेवा कंपन्यात किती बिझनेस आणला वैगेरे असु शकते हो... पण उत्पादन कंपनीत पण?

नीलस्वप्निल's picture

20 Sep 2020 - 9:25 pm | नीलस्वप्निल

घरोघरी... मातीच्या चुली... त्यातल्या त्यात चान्गली कम्पनी पहा आणि ही सोडुन दया

फारएन्ड's picture

20 Sep 2020 - 10:10 pm | फारएन्ड

जे केले आहे ते सगळे व्यवस्थित डॉक्युमेण्ट करा. स्लाइड सेट असेल तर तो ही ठेवा. यातून तुमच्या कंपनीला नक्की काय फायदा आहे ते तुमच्या डोक्यात पहिल्यांदा क्लिअर असू दे. मग त्याचे २-मिनीट "एलेव्हेटर पिच" तयार करा - म्हणजे सिनीयर मॅनेजमेण्टशी बोलायची संधी मिळाली तर दोन मिनीटांत उत्सुकता निर्माण होईल इतपत समजावता यायला हवे - ज्यातून मग पुढे मीटिंग वगैरे ठरवून त्यावेळेस डीटेल समजावता येइल.

त्यानंतर ते सोशलाइज करण्याच्या संधी शोधा. सीटीओला इंटरेस्ट नसेल तरीही इतर अनेक लोक महत्त्वाचे असू शकतात, ते निर्णय घ्यायला भाग पाडू शकतात. तुम्ही बनवलेले जर खरोखरच कंपनीच्या फायद्याचे असेल तर आज ना उद्या ते 'सेल' करायची संधी उफाळून येइलच.

हे असे काम जर पुन्हा सहज वापरता येइल इतके 'तयार' करून ठेवले तर ते कधीही वाया जात नाही हा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव माझा स्वतःचा आहे.

अजून एक म्हणजे जेफरी मूर व क्लेटन ख्रिश्चनसन यांची पुस्तके वाचा/ऐका. विशेषतः "Innovator's Dilemma". एखाद्या मोठ्या व वर्षानुवर्षे प्रोसेसेस सेट झालेल्या कंपनीत नवीन कल्पना, प्रॉडक्ट्स कसे आणावेत याबद्दल अतिशय उपयोगी पुस्तके आहेत.

राघव's picture

21 Sep 2020 - 2:17 pm | राघव

फारएण्ड म्हणताहेत तसे एलेव्हेटर पिच जेव्हा तयार कराल, तेव्हा त्यात रेवेन्यू फिगर्स जरूर द्या.
आपल्या कडील मॅनेजमेंटच्या बहुतांश लोकांना [केवळ] पैशाची भाषा समजते [हे दुर्दैवी असले तरीही] हा स्वानुभव आहे. याचं प्रमुख कारण त्यांना त्यांच्या Year End targets साठी या फिगर्स खूप कामाच्या असतात. त्यामुळे savings/generation prospects हा एक तगडा पॉईंट असतो. सोबत नवीन कल्पनांना चालना देण्याची बांधीलकी आणि त्यामुळे भविष्यात तयार होऊ शकणारी तंत्रज्ञांची फळी, ह्या फोडण्या नवीन बिझिनेस आणण्यासाठी चवदार असतात.

एक ठामपणे लक्षात ठेवा - हे निव्वळ राजकारण आहे. डोके उठते पण जर आपली बाजू योग्य असेल तर खेळायला काय हरकत असावी?
अनेक जी-हुजुरे वर बसलेले पाहिलेत. ते सहज निघणारे नसतात. मग आपला वैताग वाढवण्यापेक्षा, त्यांना पद्धतशीरपणे वापरून घेण्याचं धोरण ठेवलं तर आपला त्रास खूप कमी होतो.

कंपनी तडकाफडकी सोडून शक्यतो आपल्यालाच त्रास होतो. पुन्हा जिथे जाऊ तिथे असे लोक्स राहणारच नाहीत असे तर नाहीच्चे. त्यामुळे सिनिऑरिटीचा उपयोग इथेच होत असल्यास ते नक्की करावे. बाकी फार झाले तर सोडण्याचा पर्याय कधीही उपलब्ध असतोच.

अवांतरः
अ कंपनीत पटत नाही म्हणून ब कंपनीत जाणं आणि
ब कंपनीत जास्त चांगली संधी [अर्थ/तंत्रज्ञान] आहे म्हणून जाणं
---- यात दुसरा मार्गच बरोबर असं मला वाटतं. :-)

ही सर्व हकिकत तपशिलवार कळवा (शक्यतो टेक्नीकल डिरेक्टर). तुम्ही कंपनीच्या हिताचं काम करतायं म्हटल्यावर मधले कुणीही तुमचं काहीही वाकडं करु शकणार नाहीत. नवीन प्रॉडक्ट असल्यानं तुमचाही वट वाढेल. तुम्ही उत्तम स्कील-सेट डिवेलप केला असेल तर फ्रस्ट्रेशनमधे येऊन कंपनी अजिबात सोडू नका.

कानडाऊ योगेशु's picture

21 Sep 2020 - 2:02 am | कानडाऊ योगेशु

प्रत्येक कंपनीची एक जातकुळी असते ती लक्षात घेऊन आपल्यालाही त्यानुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतात. गुगल अ‍ॅपल सारख्या कंपन्या बाहेरुन जरी रिझल्ट ओरिएंटेड वाटत असल्या तरी त्यांचेही एक स्थिर झालेले वर्क कल्चर आहे आणि तिथेही फक्त टिकुन राहण्यापुरते काम करणारे बरेच जण असतील. माझे स्वतःचे असे वैयक्तीक मत आहे की वयाच्या एका टप्प्यानंतर व्यवस्थापनाशी मतभेद करुन घेणे हितावह नाही.

Rajesh188's picture

21 Sep 2020 - 2:21 am | Rajesh188

भीती ,दरारा निर्माण करणे.
अगदी खालच्या पोस्ट वर काम करून सुद्धा बॉस च्या टेबल वर बसून आरे तुरे करणारे पण बघितले आहेत.
बॉस च्या बारीक बारीक चुका पण रेकॉर्ड करून ठेवणे.
बाकी राजकारण सर्व च ठिकाणी चालते.
पण राजकारण करून ह्या व्यक्ती ला त्रास दिला तर काय काय घडू शकते ह्याची सुप्त भीती नेहमी बॉस च्या मनात राहिली पाहिजे.

वामन देशमुख's picture

21 Sep 2020 - 6:22 am | वामन देशमुख

अनुभव वाचून सहानुभूती वाटली.

केस-टू -केस विचार करावा लागेल, ब्लॅंकेट-स्ट्रॅटेजी चालणार नाही, तरीही, माझा एक सिमिलर अनुभव आहे. कंपनीच्या हेडकाऊन्टचा विचार करता अगदी लहान आहे.

अश्याच एका प्रसंगानंतर मी सहा-सात वर्षे काम केलेली कंपनी, पाच वर्षांपूर्वी तडकाफडकी सोडली. कंपनीच्या स्थापनेनंतर एका वर्षाने मी जॉईन झालो होतो. कंपनीच्या बांधणीत-उभारणीत माझा सिंहाचा वाटा होता. ती कंपनी माझी सर्वात लाडकी प्रेयसी होती! पण सिइओचा साला (ऑपेरेशन मॅनेजर) आणि माझं (प्रोग्रॅम मॅनेजर) हळूहळू पटेनासं झालं. एके दिवशी काही कारणाने त्याचा माझा जोरदार वाद झाला आणि मग मी बाहेर पडलो.

पुढचे सहा महिने, पैसे कमावण्यासाठी म्हणून, अक्षरशः काहीही केले नाही. मग फ्री-लान्सिंग कन्सल्टिंग करू लागलो.

सद्यस्थिती:

  • वर्षातले सहा-आठ महिनेच काम करतो.
  • त्याच कंपनीला आणि इतरही कंपन्यांना पाच-सात पट दराने सेवा पुरवतो.
  • सिइओ व्यक्तिगत आणि व्यावसायिक घट्ट संपर्कात आहे.
  • सिइओचा साला जेवढ्यास-तेवढ्या व्यावसायिक संपर्कात आहे.

क्लिशे वाटणारं, पण सत्य असलेलं मॉरल:

नोकर आणि कंपनी हे सेवादाते आणि ग्राहक अश्या संबंधात असतात. सेवादात्याने ग्राहकाशी सेवेच्या मोबदल्यापुरता संबंध ठेवावा. बाकी, आयुष्य खूप मोठं आहे!

- पूर्वी एकच ग्राहक असलेला आणि आता अनेक ग्राहक असलेला सेवादाता

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Sep 2020 - 9:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

कधी कधी तुमची कल्पना सध्याच्या कंपनीत पसंत पडत नसेल तरी ती कुठेतरी उपयोगी येइलच. सर्वर पाहिजे तितके अमेझॉन, गूगल अ‍ॅझुर क्लाऊड्वर तयार करता येतील. पाहिजे ते सॉफ्टवेअर टाकु शकाल.नोकरी करता करता फ्री लान्सिंग करु शकता, कदाचित यातुन पुढे वामन जीं सारखी स्वतःची कंपनी /बिझनेस करु शकाल.
शेवटी ज्याच्याकडे आयडिया आहे, तिकडे लोक पैसा लावायला तयार असतात. त्यामुळे ही कंपनी नाही तर दुसरी.
निराश होउ नका. डोके तासुन धार लावत रहा.

सामान्यनागरिक's picture

21 Sep 2020 - 12:14 pm | सामान्यनागरिक

आपण जे काही केलंय ते काहीतरी जबरदस्त असेल यात शंका नाही.
पण आमच्या अल्पमतीला काही कळलं नाही.
कदाचित आम्हीही त्या सीटीओ सारखेच ऑट्डेटेड असु.
हरकत नाही. पुलेशु!