दि. १३ सप्टेंबर चे मुख्यंत्री ठाकरे जी यांचे भाषण

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
14 Sep 2020 - 5:43 pm
गाभा: 

काल मुख्यमंत्री ठाकरे जी यांनी जनतेसाठी भाषण केले ते तुम्ही सर्वांनीच पाहिले ऐकले.
ते काल जे बोलले त्यात काहीच ठोस असे काहीच नव्हते.
त्यांच्या भाषणात ओज कधीच जाणवत नाही. भाषणातला साधेपणा आवडायचा . त्यात सच्चेपणा वाटयचा.
काल जे जाणवले ते म्हणजे या पूर्वी ते इतके अगतीक होऊन कधीच बोलले नाहीत.
अर्ध्या तासाच्या त्यांच्या भाषणात महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न / कोविड रुग्णांना होणारी खाटांची गैरसोय. याबद्दल ते काहीच बोलले नाहीत.
सरकार चे खरे प्रयत्न काय चालू आहेत याबद्दल संदिग्ध अवस्थेत ठेवले.
दुसरे म्हणजे काल त्यांच्या भाषणातुन जे जाणवले ते हे की हे मराठा आरक्षण चिघळेल चळवळ चिघळेल या भीतिने ते ग्रासले होते.
त्यांचे भाषण ऐकून तुमचे काय मत आहे ते सांगा. साधकबाधक पण निकोप चर्चा होऊ देत.
त्यांचे संपूर्ण भाषण या इथे सापडेल

उद्धव ठाकरें जी ची प्रशासनावर पक्कड सुटली आहे हे जाणवले.
घरी बसून काम करणे ही कदाचित त्याची तब्येतीमुळे मर्यादा असू शकेल मात्र त्या ऐवजी शिवसेनेचा एखादा चांगला प्रतिनिधी पाठवता आला असता.
ठाकरे जी ची ना त्यामुळे ग्राउंड रिपोर्ट सहज मिळु शकतो. प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांचा धाक ही बसू शकतो
आश्चर्य याचे वाटते की शिवसेनेला त्यांच्या पक्षात एकही लायक मंत्री/ सदसय मिळू नये.
विरोधी पक्षात असताना देखील वाजपेयी नी नरसिंह रावांच्या विनंतीला आणि देशाच्या त्या वेळच्या गरजेला ओळखून सहकार्य केले होते
सेनेला स्वतःच्या पक्षात असा कोणीच नेता गवसू नये हे नवल आहे पण इतर पक्षातही जनतेशी थेट संपर्क साधेल असा कोणीच मित्र मिळू नये यात उद्धव ठाकरें जी यांच्य मर्यादा समजून येतात.( खरे तर हे काम आदित्य ठाकरे जी ही करू शकले असते. )
कालच्या भास्।अणातून एकूणच असे चित्र समोर येतेय की शिवसेनेचे सगळेच मंत्री जनतेसमोर येत नाहिय्येत. केवळ राऊत आक्रस्ताळी भाषणे ठोकताहेत. उद्धव ठाकरे जी अगतीक होऊन सगळे नुसते पहात आहेत. व्रुद्ध लियर प्रमाणे

प्रतिक्रिया

नीलस्वप्निल's picture

14 Sep 2020 - 6:35 pm | नीलस्वप्निल

सम्पादक साहेबान्ना वचक बसावला तरी निम्मे काम होइल.

शिवसेना इतकी अगतिक कधीच पाहिली नव्ह्ती

सेनेला स्वतःच्या पक्षात असा कोणीच नेता गवसू नये हे नवल आहे पण इतर पक्षातही जनतेशी थेट संपर्क साधेल असा कोणीच मित्र मिळू नये यात उद्धव ठाकरें जी यांच्य मर्यादा समजून येतात.(

पक्षातील सगळी लोकं, कंगना आणि चिवसेनेवर.. ओह सॉरी शिवसेनेनेवर आणि पर्यायाने सरकार वर जे जे टीका करतायेत त्यांना ठोकण्यात व्यस्त आहेत.. आणि संजय राऊत सामना मध्ये शिव्यालेख.. ओह सॉरी अग्रलेख लिहिण्यात व्यस्त आहेत.. !!

मग सगळी जबाबदारी शेवटी मामुंकडे ( गैरसमज करून घेऊ नये.
नवीन शॉर्ट फॉर्म आहे.. माननीय मुख्यमंत्री ) यांच्या डोक्यावर येऊन पडणार.. त्यांनी तरी एकट्याने कुठे कुठे लक्ष द्यावं....
चालायचंच... !! घ्या समजून तुम्ही..

प्रसाद_१९८२'s picture

14 Sep 2020 - 6:57 pm | प्रसाद_१९८२

'आपल्याला करोनाचा "कोथळा" काढायचा आहे, तो काढावाच लागेल', 'घरात बसून कोमट पाणी प्या', 'घरात राहून पत्ते, गोट्या, कॅरम वगैरे खेळत राहा', 'रस्तावर अजिबात दिसू नका', वगैरे....वगैरे डायलॉग वरिल भाषणात आहेत का ?

Gk's picture

14 Sep 2020 - 9:18 pm | Gk

वर बसलेला तर इतकेही बोलत नाही
आत्मनिर्भर

बाप्पू's picture

14 Sep 2020 - 11:19 pm | बाप्पू

वरच्या माणसावर लय लक्ष मोगाभाऊ तुमचे..

बाकी तुम्ही शिवसेनेची बाजू घेऊन खिंड लढवताय ही त्या वरच्या माणसाचीच करामत आहे. नाहीतर या जन्मात आमच्या नशिबी हे भाग्य नव्हते..

हेच मामू (माननीय मुख्यमंत्री ) उ. ठा. समजा BJP च्या पाठिंब्यावर मामू बनले असते तर त्यांची इतकी वकालत केली असती का मोगाभाऊ??
दया पुस्तकावर हात ठेवून उत्तर...

Gk's picture

15 Sep 2020 - 7:37 am | Gk

आम्ही कुणाचीही बाजू घेत नाही
आम्ही महाराष्ट्रात रहातो, महाराअष्टर सरकार आणि भारत सरकार दोन्ही आमचेच आहे

ऑपरेशन भाजप महाराष्ट्रात तडफडून मेल्यानंतर भाजपावाळ्याना महाराअष्टर ठाकरे सेना शत्रू वाटू लागली आहे , हा तुमचा दोष आहे

सागर गुरव's picture

15 Sep 2020 - 8:13 am | सागर गुरव

आम्ही कुणाचीही बाजू घेत नाही

असे म्हणायचे आणि हळूच एका बाजूला जाऊन बसायचे....;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2020 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>ऑपरेशन भाजप महाराष्ट्रात तडफडून मेल्यानंतर भाजपवाल्यांना महाराष्ट्रात सेना शत्रू वाटू लागली आहे.

विषयच संपला. केंद्र सरकार स्वत: सर्वच ठिकाणी अपयशी ठरल्यानंतर सरकारने सर्व विषयांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून माध्यामाद्वारे सुशांत-रियाचक्रवर्ती वाजवले. ज्वलन्त प्रश्न म्हणून मिपावरही वाचण्यात आला. नंतर एका सेवानिवृत्त अधिका-याला सेना पदाधिका-यांनी मारहाण केली. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही म्हणे, नंतर महाराष्ट्र माझाही आहे महाराष्ट्र आता सुरक्षित राहिला नाही म्हणून कंगना बाईचं थेट राज्यपालाला साकडे. पंतप्रधान यांचीही भेट झाली म्हणे, महाराष्ट्र आता सुरक्षित राहिलेले नाही. नंतर संजय राऊत वाहिन्यांनी वाजवले. सारांश महाराष्ट्र आता सुरक्षित राहिला नाही, अशी व्यवस्थित मांडणी केंद्रसरकार माध्यम आणि व्यक्तींना हाताशी धरुन करीत आहे.

महाराष्ट्र सरकारला करोनाच्या काळात आरोग्याच्या किती सुविधा दिल्या, किती मदत केली. महाराष्ट्राला संकटातुन बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार म्हणून किती प्रयत्न केले गेले, उलट यव आणि त्यव कारणाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा फक्त विडा उचलला. महाराष्ट्र संकटात असतांना त्याचं राजकारण भाजप प्रणित करीत राहिले, एकशे पाच सदस्य असे बाहेर घेऊन बसणे त्रासदायक आहे हे समजू शकतो. महाराष्ट्र संकटाशी झुंजत असतांना आपण मोराला दाना-पाणी घालण्यात व्यस्त होता,

मुख्यमंत्री यांच्या बोलण्यात आत्मविश्वास नसेल, पण एक विश्वासाने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. सरकार आज ना उद्या पडेल या आशेवर भाजपांनी समर्थक सरकारांनी त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने चुका केल्या असतील, सरकार जेव्हा पड़ायचे तेव्हा पडेल, पण त्यांचे प्रयत्न उत्तम होते. आजही उत्तम काम सुरु आहे. सरकार पड़ावे म्हणून अनेक प्रयत्न झाले, होत आहेत पण 'करोना को हराना है म्हणून लोकांना दिवाबत्तीच्या -थाली-टाळ्याच्या भरवशावर महाराष्ट्र सरकारने तरी सोडले नाही' असे मला वाटते.

जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

सागर गुरव's picture

15 Sep 2020 - 11:40 am | सागर गुरव

निवडुन आल्यावर तडफडत ३ कुबड्यांवर सरकार स्थापन करणार्यांना भाजप तडफडताना दिसतोय.....गंमतच आहे... :)

ते उद्याच्या सामना मध्ये वाचा..
कोथळा, फौज, आई भवानी, तलवार अशी ऐतिहासिक वाक्ये..
गटारीतले किडे, मुतरे इ इ अशी वैज्ञानिक वाक्ये..
हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल अशी व्याकरणातील वाक्ये..

फक्त तिकडेच वाचायला मिळतात..

सागर गुरव's picture

15 Sep 2020 - 1:12 pm | सागर गुरव

अहो हे तर रोजचेच आहे....सामना याच भाषेने पावन झालेला असतो....

धर्मराजमुटके's picture

14 Sep 2020 - 7:01 pm | धर्मराजमुटके

मला एकदा मुख्यमंत्री नाहीतर गेलाबाजार पंतप्रधान करा प्लीज. मी पहिली बंदी 'खंजीर' या शस्त्रावर घालणार. राजकारणी लोक सारखे त्याच्या उपयोग करतात. नाहीतर किमान प्रत्येक राजकारण्याने पाठीवर बसणारे चिलखत २४ तास घालावे असा नियम तरी करुन टाकतो. कारण हा लुच्चा खंजीर नेहमी पाठीतच घुसतो.

बोलण्यात आत्मविश्वास नव्हता.
सत्तेत तीन पक्ष सामील आहेत पण टीका मात्र शिवसेना वरच होत आहे तिलाच टार्गेट केले जात आहे.
गृह खाते सेने कडे नाही तरी त्या संबंधातील आरोप सेने वरच होत आहेत आणि बाकी दोन्ही पक्ष काहीच बोलत नाहीत ह्या मुळे ते नाराज झाले असावेत.
त्यांनी सर्व मुद्धा ना स्पर्श करण्याचा व्हिडिओ मध्ये प्रयत्न केला आहे.
त्यांचा स्वभाव तसा शांत आहे आक्रमक पना जो सामना मधून दिसतो ती संजय जी ची karamat आहे.
उध्दव जी ची तशी भाषा नाही सौम्य पने बोलणे हाच त्यांचा स्वभाव आहे.

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 6:22 am | चौकस२१२

बाकीचे दोन पक्ष कशाला बोलतील, उधोजी परस्पर भोगत आहेत तर बरंच कि
काँग्रेस ला आयतं मिळालं ( काकांचं कृपेने)
बरं राष्ठ्रवादी काय मामू चा "चंद्रशेखर" करायला कधीही तयार परत भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला मोकळे ! ( मग गप्पा होतील वाजपेयीच्या मैत्रीची आठवण आणि महाराष्ट्रात उरलेली ४ वर्शे स्थिरता यावी म्हणून...)
भोग आता उद्धवा .. (पण त्या राऊतांना सांभाळ रे बाबा)

बाकी दोन पक्ष कुठेही दिसणार नाहीत कारण ते फक्त वयक्तीक स्वार्थासाठी सत्तेत आहेत. विशेषतः काँग्रेस.
राष्ट्रवादी बद्दल नो कमेंट्स कारण या पक्षाचा कोणताही अजेंडा नाही.. येन केन प्रक्रारे सत्ता मिळवणे आणि आपल्या पक्षातील नाना, भाऊ, दादा इ ची राजकीय सोय लावणे हेच काम...
त्यामुळे या सरकारमधील राजेश टोपे (कोरोना मुळे माहिती पडले ) आणि मामू वगळता दुसऱ्या कोणाचं नाव पण माहिती नाही... !

Gk's picture

15 Sep 2020 - 7:41 am | Gk

आम्ही कुणाही राजकारण्यांचे दादा नाना नाही, तरी 60 वर्षे आमचे सगळे छान होत आहे
शहाचा मुलगा किरकेट बोर्डाचा चेअरमन झाला म्हणे

बाप्पू's picture

15 Sep 2020 - 10:31 am | बाप्पू

तुम्ही माझा प्रतिसाद परत वाचा..

Gk's picture

15 Sep 2020 - 10:40 am | Gk

तुम्हीही माझा प्रतिसाद पुन्हा वाचा

त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात नोकरी , शिक्षण , प्रमोशन , रेल्वे विमानात जागा, स्वतःचे स्वतः मिळाले की कुनाकडून वशिला लावून घेतलात ?

सागर गुरव's picture

15 Sep 2020 - 11:35 am | सागर गुरव

६० वर्षांत खांग्रेस मध्ये नेत्यांनी आपल्या मुलाबाळांना पदे नाही दिली म्हणताय की काय??

Gk's picture

15 Sep 2020 - 12:03 pm | Gk

सगळेच देतात

तळे राखील तो पाणी चाखील

लाख मेले तर चालतील पोशिंदा जगला पाहिजे वगैरे राजेशाहित होते

आता आमच्यासाठी नेते काम करावेत व मरावेतसुद्धा , त्यांच्या पोरालाही द्यावे आम्हालाही द्यावे

सागर गुरव's picture

15 Sep 2020 - 12:20 pm | सागर गुरव

आत्ता कसं बोललात....हे विधान महत्वाचं आहे...

शेवटी कोणीही "दुध का धुला" नाही...कोणीही

>>>आम्ही कुणाही राजकारण्यांचे दादा नाना नाही, तरी 60 वर्षे आमचे सगळे छान होत आहे>>>
याचा अर्थ तुम्ही लांगुलचालनाच्या धोरणाचे लाभार्थी दिसताय.

Gk's picture

15 Sep 2020 - 12:17 pm | Gk

तुमचे छान होत नाही आहे का ?

मग मागच्या 7 वर्षात तरी झाले ना तुमचे भले ?

>>>तुमचे छान होत नाही आहे का ?>>>
आधी आमचे काही छान होण्याची शक्यताही दिसत नव्हती, गेल्या सात वर्षात किमान तसे होण्याची चिन्हे तरी दिसायला लागली आहेत.
आणी
>>>त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात नोकरी , शिक्षण , प्रमोशन , रेल्वे विमानात जागा, स्वतःचे स्वतः मिळाले की कुनाकडून वशिला लावून घेतलात ?>>>
असली लाचारी वाट्याला यायला नको म्हणून तर तुमच्यासाठी टवाळकीचा विषय असला तरी "आत्मनिर्भर" होऊन स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग चोखाळणे जास्ती योग्य वाटतंय.

>>>तुमचे छान होत नाही आहे का ?>>>
आधी आमचे काही छान होण्याची शक्यताही दिसत नव्हती, गेल्या सात वर्षात किमान तसे होण्याची चिन्हे तरी दिसायला लागली आहेत.
आणी
>>>त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात नोकरी , शिक्षण , प्रमोशन , रेल्वे विमानात जागा, स्वतःचे स्वतः मिळाले की कुनाकडून वशिला लावून घेतलात ?>>>
असली लाचारी वाट्याला यायला नको म्हणून तर तुमच्यासाठी टवाळकीचा विषय असला तरी "आत्मनिर्भर" होऊन स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग चोखाळणे जास्ती योग्य वाटतंय.

Gk's picture

15 Sep 2020 - 12:42 pm | Gk

आम्हीही आत्मनिर्भरच आहोत

तुम्हीही आहात , हे ऐकून आनंद वाटला

Gk's picture

15 Sep 2020 - 1:21 pm | Gk

वाजपेयींने पेन्शन बंद करून अन मोदीजीनी नोकर्या बंद करून आत्मनिर्भर केले आहे

शिवसेने सारखे व्यक्तिपूजक पक्ष शेवटी अश्याच प्रकारे शेवटी नष्ट होतील. (हे भक्त मंडळींना सुद्धा लागू होते आणि खांग्रेस ला सुद्धा ).

ज्याच्या हाती गृह खाते आणि शिक्षण खाते असते त्याच्या हाती सत्ता ! मुख्यमंत्री कुणीही का असेना ? उद्धव ठाकरे ह्यांचे नाव बाळासाहेबांनी ठेवले तेंव्हा कदाचित एक दिवस लोक "उद्धवा अजब तुझे सरकार" म्हणून खिल्ली उडवतील म्हणूनच. हा बाळासाहेबांचा कदाचित लॉन्ग टर्म विनोद होता !

शिवसेना संपूर्ण आगतिक झालेली पार्टी आहे. ज्या कारणासाठी हा पक्ष उभा झाला होता ती कारणे २०२० मध्ये विशेष लागू होत नाहीत. आणि नव्या युगांत पक्षाला रेलेवंट ठेवण्याची ताकद उद्धव आणि बाळ पेंग्विन मध्ये अजिबात नाही. ह्या उलट शिवसेनेच्या नाकर्ते पणा मुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती भाजप भरून काढत आहे. डेव्ह फर्नांडिस हे थोडे अजागळ नेते असले तर मोदींच्या पाठिंब्याने ते महाराष्ट्राला चांगले नेतृत्व देऊ शकत होते, किमान मूढमती आणि बारामती ह्यांना सत्तेपासून दूर ठेवत होते. आणखीन १० वर्षांत शिवसेना खल्लास होईल असा माझा कयास आहे.

सध्याचे उद्धव हे खुर्चीला ढुंगण आणि हाराला गळा पाहिजे म्हणूनच खुर्चीत आहेत. थोडेफार मराठी बोलणारा बोंबे स्कॉटिश मध्ये शिकलेला ठाकरे घराण्याचा वारस खुर्चीत आहेच हेच ते मराठी मनाला समाधान ! सध्याचे सरकार हे काँग्रेसी सरकार असून उद्धव त्याचा चेहेरा आहे. वापरून झाल्यानंतर बेगॉन स्प्रे ने मेलेल्या झुरळाला आम्ही जसे फेकून देतो तश्या प्रकारे ह्या माणसाची हाकलपट्टी काँग्रेस करून संपुन शिवसेनेला मान खाली घायला लावणार ह्यांत काहीही शंका नाही.

टीप : शिवसेनेचे नोटी हरामखोर प्रवक्ते नोटा मोजायच्या लायकीचे सुद्धा नाहीत. पायाची वहाण नेहमी पायांत ठेवावी उगाच डोक्यावर घेऊन नाचू नये अशी गोमंतक प्रांतात म्हण आहे. सामना मध्ये लिहिता लिहिता ह्या माणसाला खरोखरच आपण विद्वान आहोत असे वाटायला लागले आहे.

व्यक्तिपूजक पक्ष शेवटी अश्याच प्रकारे शेवटी नष्ट होतील. (हे भक्त मंडळींना सुद्धा लागू होते आणि खांग्रेस ला सुद्धा ).

भाजपचा इतिहास बघा.. आणि काँग्रेस चा... हे विधान आत्ता जरी भाजप ला लागू होते असे वाटत असले तरी ते निमित्त मात्र आहे, व्यक्ती पेक्षा पक्ष हे तिथे बऱ्यापकी टिकून आहे आधी वाजपेयी होतेच कि लोकांना आवडणारे.. मग महाजन आले असते आता मोदी उद्या आणखीन कोणी .. पक्ष कदाचित सत्तेत नसेल पण एका कुटुंबावर किंवा व्यक्तीवर च्या "भक्ती" मुळे उभा राहिला आहे असे समजणे चुकीचे ठरेल...भाजपला विरोध जरूर करावा कोणीही पण वरील विधान मात्र चिकटवू नये असे वाटते

व्यक्तिपूजक पक्ष म्हणजे राष्टवादी, आत्ता शिवोवसेना, उद्या MANSE ( जिवंत राहिली तर) आणि काँग्रेस तर काय आहेच इंदिरा गांधींपासून

Rajesh188's picture

15 Sep 2020 - 9:52 am | Rajesh188

Bjp व्यक्ती पूजक नाही त्यांचे अध्यक्ष नेहमी बदलत असतात.
बाकी काही पक्ष व्यक्ती पूजक आहेत हे पण मान्य.
पण कोणता ही पक्ष असू ध्या उमेदवारी घराणे शही पद्धती नी च तमाम सर्व पक्षात दिली जाते .
हे पण स्वीकारणे गरजेचे आहे एकदा चांगला कार्यकर्ता असेल तर घराणे शाही डावलून चांगल्या कार्यकर्त्या ला उमेदवारी मिळत नाही
(काही अपवाद असू शकतात )

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 4:56 pm | चौकस२१२

"पण कोणता ही पक्ष असू ध्या उमेदवारी घराणे शही पद्धती नी च तमाम सर्व पक्षात दिली जाते "
वर्तमानात याचे प्रमाण भाजपत वाढत असले तरी इतिहास आणि एकूणच तिथे हे कमी याला कारण पक्ष हा कुटूंबावर नाही तरी काहीतरी का होईना तत्वावर आहे ( ती तत्वे अवडतात कि नाही हे येथे गौण आहे) घराणेशाही चे ओंगळ प्रदर्शन जेवहा काह्ही लायकी , पूर्व काम नसताना जेव्हा केवळ आईचा खून झाला म्हणून राजीव ला पंतप्रधान केलं तेवहा दिल्ली ला झाले, शिवाजी उद्यानात एक दिवस अचानक तलवार हाती घेतलेले नातू व्यासपीठावर दिसले ( वांद्र्याचे) आणि बारामतीचे २ नातू एकदम लाँच zale ) तेव्हा ...
आता हा आरोप भाजपवर हि होऊ शकतो पण सरसकट नाही ..

चिर्कुट's picture

15 Sep 2020 - 9:56 am | चिर्कुट

नावडतीचे मीठ अळणी असा प्रकार आहे एकंदरीत.

उद्ध्वजी निदान सर्वसामान्य लोकांना भेडसावणा-या प्रश्नांवर बोलत आहेत. त्यांच्या काही मर्यादा आहेत, हे मान्य. शिवाय कोरोना परिस्थितीवर आणखी उपाय करता आले असते, हे ही मान्य.

पण.. पण... पण.. खालील प्रश्नांची उत्तरे स्वतःची स्वतःला देउन पहा -
१. २०१४ ला पूर्ण बहुमताने निवडून आलेल्या मोदींची पाठराखण करणारे (६० वर्षांची घाण ६ महिन्यात कशी निघेल, तुम्ही पंतप्रधान निवडून दिलाय जादूगार नाही, इ.) आता ७-८ महिन्यांच्या परावलंबी सरकारवर टीका करायला पुढे का? ते ही करोना सारखे न भूतो, न भविष्यती संकट लगेच आलेले असताना, केंद्रातून अडवणूक चालू असताना?

२. उद्ध्वजी निदान सर्वसामान्य लोकांना भेडसावणा-या प्रश्नांवर बोलत आहेत, त्यांच्यावर भयंकर टीका मात्र मोर उडवणे, 'मातीच्या घड्यातून पाणी प्या', 'देशी कुत्री पाळा', 'खेळणी खेळा' वगैरे सध्याच्या काळात असंबद्ध सल्ले देणा-या 'मन की बात' वर एक शब्द टीका नाही, असं का?

३. सुशांत, कंगना सारख्या फालतू विषयांवर २-३ महिने चाललेल्या की चालवलेल्या गदारोळावर कुणीही काहीही बोलणार नाही? तिकडे बिहारात जाऊन महाराष्ट्राची धुणी कोण धुतंय? आणि का?

Gk's picture

15 Sep 2020 - 11:04 am | Gk

काँग्रेस , रा वा , सेना .

आता भाजपाला कुणी उरले नाही , स्वबळावर यायची तयारी सुरू करावी

Gk's picture

15 Sep 2020 - 11:54 am | Gk

अयोध्या निकाल लागला अन दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र भाजप सेना युती मोडली

दोघे नाचत होते , मी मुख्यमंत्री होणार आणि अयोध्येला जाणार

आता पर्यंत शिवसेना च्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्र मध्ये पाय रोवले.
लाडकी असणारी शिवसेना लगेच 6 महिन्यात लायक कडून नालायक कशी वाटायला लागली.

प्रसाद_१९८२'s picture

15 Sep 2020 - 12:58 pm | प्रसाद_१९८२

आता पर्यंत शिवसेना च्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्र मध्ये पाय रोवले.

--
पाय रोवले ??
तुमचा अभ्यास दांडगा आहे. तरिही तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेचा एक ही आमदार नव्हता त्यावेळी भाजपाचे, महाराष्ट्रातील विविध भागातून १४ आमदार निवडुन आले होते. आणि त्यांच्या बरोबर शिवसेना देखील नव्हती.

Rajesh188's picture

15 Sep 2020 - 1:54 pm | Rajesh188

पाय रोवले म्हणजे महाराष्ट्र च्या सत्तेत पाय रोवले.
जास्त पाठी जायची गरज नाही त्या वेळची आणि परिस्थिती वेगळी होती निवडणूक वेगळ्या मुद्धा वर लढल्या गेल्या होत्या.
अनेक घटना घडल्या त्याचा परिणाम राजकारणावर झाला.
आणीबाणी, इंदिराजी,राजीव जी ह्यांची हत्या.
भारतीय जनता पार्टी नी सत्तेची पायरी चढली ती हिंदुत्वाचे राजकारण करून.
अडवाणी ह्यांची रथ यात्रा आणि बाबरी मशीद चे patan ह्या महत्वाच्या घडणा घडल्या.
महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर bjp ला शिवसेना शिवाय पर्याय नव्हता आणि सेने ला bjp शिवाय पर्याय नव्हता.
सत्तेचे च्या जवळ जाण्या साठी सेनेनी नी पण भूमिपुत्र ही भूमिका मवाळ करून हिंदुत्व स्वीकारले .
Bjp नी अनेक राज्यात अनेक पक्षा शी युती केली आणि अनेक राज्यात सत्तेत सहभागी झाली आणि खरं हेतू दाखवायला suravat केली.
मित्र पक्षांचे खाच्चि करणं.
सेनेच्या जागा प्रतेक निवडणुकीत कमी होत गेल्या आणि bjp च्या वाढत गेल्या .
मित्र पक्ष कमजोर करायचे धोरण bjp ni राबवले म्हणूनच.
सेने सहित अनेक पक्षांनी bjp शी घटस्फोट घेतला.
ह्या मध्ये काही चूक नाही सेनेची.
तिला गद्दार म्हणता येणार नाही.

.म्हणजे सेने सहित अनेक मित्र पक्षांचा उपयोग bjp ni शिडी सारखा केला हे वाक्य चुकीचं नाही.

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 5:02 pm | चौकस२१२

सेने सहित अनेक पक्षांनी bjp शी घटस्फोट घेतला.
तिला गद्दार म्हणता येणार नाही.

अरे मग निवडणुकी आधीच घ्य्याचा होत आना खिशात राजीनामे घेऊन कशाला फिरत होता...
आणि वर काय ढोंग तर " बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली"
अरे बाळासाहेबांची इच्छा होती शिवसेने स्वबळावर साता मिळवावी.. यातील "स्वबळावर" हा शब्द विसरला वाटतं?

सागर गुरव's picture

15 Sep 2020 - 5:41 pm | सागर गुरव

खिशातले राजीनामे फक्त दाखवायलाच होते...
मित्रपक्षाबरोबर सत्तेत असतानाही, मित्रपक्षाच्याच विरोधात मुखपत्रातुन कुंथायचे आणि तरीही निर्लज्जपणे सत्तेचा उपभोग घ्यायचा असा दुतोंडीपणा करणारी फक्त शिवसेनाच...

तिला गद्दार म्हणता येणार नाही.

खंडुजी खोपडे किंवा सुर्याजी पिसाळ म्हणता येईल बहुदा..

Gk's picture

15 Sep 2020 - 6:26 pm | Gk

पक्षीय घटस्फोट कधीही घेता येतो

सत्तेत असताना असे घटस्फोट झाले तर जनतेला किंमत भोगायला लागते , निवडणूक लागते , कामे अडतात

म्हणून एकदा आलेले सरकार पाडू , पडू नये , आपली कामे व्हावीत

प्रसाद_१९८२'s picture

15 Sep 2020 - 6:32 pm | प्रसाद_१९८२

आणि वर काय ढोंग तर " बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली"
--

बाळासाहेब कॉंग्रेसबद्दल काय म्हणाले होते, हे कॉंग्रेसी विसरलेले दिसतात. म्हणून अशी विधाने ते करत आहेत.
--

शा वि कु's picture

15 Sep 2020 - 6:44 pm | शा वि कु

"गाडीभर पुरावे" आणि "नाही नाही नाही" यांचा पण उल्लेख व्हावा. म्हणून हा प्रतिसाद.
बाकी चालू द्या.

Rajesh188's picture

15 Sep 2020 - 1:55 pm | Rajesh188

पाय रोवले म्हणजे महाराष्ट्र च्या सत्तेत पाय रोवले.
जास्त पाठी जायची गरज नाही त्या वेळची आणि परिस्थिती वेगळी होती निवडणूक वेगळ्या मुद्धा वर लढल्या गेल्या होत्या.
अनेक घटना घडल्या त्याचा परिणाम राजकारणावर झाला.
आणीबाणी, इंदिराजी,राजीव जी ह्यांची हत्या.
भारतीय जनता पार्टी नी सत्तेची पायरी चढली ती हिंदुत्वाचे राजकारण करून.
अडवाणी ह्यांची रथ यात्रा आणि बाबरी मशीद चे patan ह्या महत्वाच्या घडणा घडल्या.
महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर bjp ला शिवसेना शिवाय पर्याय नव्हता आणि सेने ला bjp शिवाय पर्याय नव्हता.
सत्तेचे च्या जवळ जाण्या साठी सेनेनी नी पण भूमिपुत्र ही भूमिका मवाळ करून हिंदुत्व स्वीकारले .
Bjp नी अनेक राज्यात अनेक पक्षा शी युती केली आणि अनेक राज्यात सत्तेत सहभागी झाली आणि खरं हेतू दाखवायला suravat केली.
मित्र पक्षांचे खाच्चि करणं.
सेनेच्या जागा प्रतेक निवडणुकीत कमी होत गेल्या आणि bjp च्या वाढत गेल्या .
मित्र पक्ष कमजोर करायचे धोरण bjp ni राबवले म्हणूनच.
सेने सहित अनेक पक्षांनी bjp शी घटस्फोट घेतला.
ह्या मध्ये काही चूक नाही सेनेची.
तिला गद्दार म्हणता येणार नाही.

.म्हणजे सेने सहित अनेक मित्र पक्षांचा उपयोग bjp ni शिडी सारखा केला हे वाक्य चुकीचं नाही.

प्रश्न सोप्पा आहे पण त्याचे उत्तर महाकठीण आहे.
>>>लाडकी असणारी शिवसेना लगेच 6 महिन्यात लायक कडून नालायक कशी वाटायला लागली.>>>
तेच कि. ६ महिन्यातच काय पण गेल्या ६ वर्षातही दोघांमध्ये सगळे आलबेल नसल्याची भनकही शिवसेनेच्या परखड मुखपत्राने कुणाला लागून दिली नाही :)

Gk's picture

15 Sep 2020 - 2:38 pm | Gk

महाराष्ट्र वांड लोकांचा प्रदेश आहे, इथे राजकारणाचे आडाखे चुकू शकतात

औरंगजेब आधी गुजरातचा सुभेदार होता
मग दिल्लीचा शहेनशहा झाला

पण त्याचे थडगे मात्र महाराष्ट्रात बनले

सुबोध खरे's picture

15 Sep 2020 - 6:45 pm | सुबोध खरे

औरंगजेब आधी गुजरातचा सुभेदार होता

मग दिल्लीचा शहेनशहा झाला

पण त्याचे थडगे मात्र महाराष्ट्रात बनले

काय सांगताय?

तुमच्या आवडत्या दद्दू ( औरंगजेब) याबद्दल तुमच्या तोंडून असे उद्गार?

अजून "किती अच्छे दिन" हवे आहेत.

अजि मी ब्रम्ह पाहिले

Gk's picture

15 Sep 2020 - 7:09 pm | Gk

माझा 12 फेब्बूरवारीचा हॅपी बर्डे मी बाबराच्या नावाने 14 फेब्बुरवारीला करतो

सुबोध खरे's picture

15 Sep 2020 - 7:41 pm | सुबोध खरे

तुम्ही दर १४ तारखेला वाढदिवस करा

बाबर, अकबर, हुमायून, औरंगजेब, तैमूर लंग -- तैमूर अली खान नाही )=( अशा सर्व जणांच्या नावाने.

हा का ना का

आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जाऊ.

कालच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा

लवकर मोठे व्हा

आपले भांडण एकमेकांशी नाहिय्ये.
मुद्दा सोडून प्रतिसाद देवू नये ही विनंती.
ठाकरे, फडणवीस, मोदी , पवार , खडसे हे सगळे आपले नातेवाईक नाहीत. त्यांच्याकडून आपल्याला काहिही मिळणार नाहिय्ये.
धाग्यावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काय जाणवले ते लिहूया