तळणीचे मोदक - मैदा न वापरता

देवीका's picture
देवीका in पाककृती
27 Aug 2020 - 2:35 pm

तळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.

पण आजकाल, असा प्रश्ण नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.

बहुतेकदा, मैदा वापरूनच करतात. पण मैदा प्रकृतीला चांगला नाही, तेव्ह हि कृती मी माझ्या, आईची मैद्याशिवाय मोदक कसे करावे ती देत आहे.

१ वाटी रवा,
१/२ वाटी कणीक,
१ टेबलस्पून तांदूळाचे पीठ. होय. ह्या पीठाने मस्त खुसखुशीतपणा येतो.
दुसरं म्हणजे, तेलात न तळणे हि एक खासियत आहे. तेल पित नाहित.
रवा छान मळला की, मोदक छान क्रिस्पी रहातात तर कणीकेने अतिशय कडक होत नाहीत.

सारण हे नेहमीच्याच पद्धतीने करायचे आहे.

पीठ मात्र सगळी नीट कालवून घ्यावी.

पुर्ण रेसीपी नीट समजायला, तळणीचे मोदक इथे बघाल तर कळेल....

प्रतिक्रिया

छान. मी तळणीचे मैदा नसलेलेच मोदक खाल्ले आहेत. मस्त लागतात.
तो मेदाचाही करतात हे मात्र मला माहिती ही नव्हते

मला मात्र आवडतात, गव्हाच्या कणिकेचे साखर युक्त उकडलेले मोदक.
आमच्या घरी हे दोन्ही आणि कोकणातला कधी कधी मोदक बनतो.

गव्हाच्या कणिकेचा साखरेचा मोदक ज्युसी होतो, त्यामुळे तो अप्रतिम लागतो..
यावेळेस पाककृती टाकणार होतो, बघू पुन्हा करताना मी स्वतःच सगळा करून येथे देता येतो का बघतो..

देवीका's picture

30 Aug 2020 - 3:06 pm | देवीका

नक्की द्या तुमची कृती.