भितीत फायदा नसतो?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
8 Aug 2020 - 12:26 pm
गाभा: 

'डर के आगे जीत है' हा हिंदी वाक्प्रचार बर्‍याचदा धाडसाचं महत्त्व सांगण्यासाठी वापरला जातो.पण खरंच भितीमुळे दरवेळी नुकसानच होतं का?दरवेळी 'भिती' ही प्रगतीतली धोंडच ठरते का? उदा.गुन्ह्यात सापडलो तर आपल्याला शिक्षा होईल या भितीपोटी कितीतरी गुन्हे व्हायचे टळतात.'बागुलबुवाची भिती दाखवून आई आपल्या लहान मुलाला जेवू घालते.' फार काय अगदी कोर्टातही साक्षीदाराला त्याच्यादृष्टीने पवित्र अशा ग्रंथावर हात ठेवून शपथ घ्यायला लावणं हा सुद्धा भिती वापरुन घेण्याचाच प्रकार आहे.परीक्षेत नापास होण्याच्या भितीने अभ्यास करणारी मुलं,नोकरी जाण्याच्या भितीने स्वत:चा आक्रमकपणा नियंत्रणात ठेवणारे कामगार अशी बरीच उदाहरणे देता येतील जिथे भितीमुळे हवा तो परिणाम साधला गेलेला आहे.किंबहूना भितीमुळे जितक्या लवकर परिणाम साधतो तितक्या लवकर भिती दूर झाल्याने साधत नाही.सुरक्षा प्रणालीची अर्धवट माहिती कामगाराला झाली तर आपल्याला ती पूर्ण माहिती झालीय या गैरसमजात तो ती डायव्हर्ट करुन 'स्वत:ची हुशारी' सिद्ध करायला जाऊ शकतो आणि जीवाशी खेळ होऊ शकतो.अशा ठिकाणी 'भितीचं महत्त्व' लक्षात येईल.
पाप घडलं तर परमेश्वर शिक्षा करेल या भितीपोटीच कितीतरी 'पापं' टळतात.देव आहे की नाही हे निश्चित माहित नसूनही 'आपल्याकडून काही भ्रष्टाचार घडला असल्यास देवानं आपली श्रीमंती काढून घेऊ नये यासाठी मोठमोठे धनी उद्योजक देवळांना देणग्या देतात.'याच पैशातून समाजोपयोगी कामे मंदिरांकडून केली जातात.
भिती नष्ट करुन ज्याची भिती वाटते त्यामागचं गमक उघडं करुन ज्ञान वाढल्याने जेवढ्या लवकर काम होण्याचा परिणाम साधला जातो त्याहीपेक्षा अधिक लवकर अज्ञानातून येणार्‍या भितीमुळे होत असेल तर भिती 'निरुपयोगी' कशी?

प्रतिक्रिया

शा वि कु's picture

8 Aug 2020 - 6:57 pm | शा वि कु

डार्क नाईट रायसेसचा आजिबात न उल्लेख केल्याचा निषेध :))

Fear is why you fail.
-there is no fear in me. There's anger.

—How can you move faster than possible, fight longer than possible, without the most powerful impulse of spirit.... The fear of death ?

पण ह्याची आणखी एक बाजू आहे असे वाटते. तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी भीतीमुळे होतात म्हणताय, तितक्याच वाईटही होतात. आणि अज्ञानातून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी भीती हा एकमेव उपाय नाही असे वाटते. भीती आहे आणि चुका टाळल्या जातायत हे तर ओकेच आहे. पण आता ज्ञान उपलब्ध आहे, तिथे तरी अज्ञान घालवून भीती मारण्यात काय वाईट ?