कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
20 Jul 2020 - 7:17 am
गाभा: 

मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.

  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी

ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो. कार घेतल्यावर कारने जाईन.

पूर्वीचा कार चालवण्याचा फारसा अनुभव नाही. ही पहिलीच कार विकत घेत आहे. पायी, सायकल, बाईक कार, रेल्वे विमान इ. च्या प्रवासाचा अनुभव आणि आवड आहे. सध्याच्या आणि आधीच्या बाईकांचा प्रवास अकरा वर्षांत ९०००० किमी झाला आहे.

आधी, दोन-अडीच लाखांपर्यंतची एक जुनी गाडी घ्यावी असा विचार होता (अजूनही निर्णय होत नाहीये). पण ओएलेक्स / ट्रू वॅल्यू / इतर आणि प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. किंमती जास्त वाटत आहेत.

मी आइडेंटिफाय केलेल्या गाड्या -
टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/-

ह्युंदाई सॅन्ट्रो स्पोर्ट्झ Hyundai Santro Sportz Petrol ₹६४३५२०/-

ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ -

रेनॉ क्विड Renault Kwid RXT 1.0 ₹५१४६३९/-

  1. यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
  2. फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
  3. मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
  4. रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
  5. जुनी गाडी घ्यावी का?
  6. इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?

सर्व ह्युंदाई गाड्यांचे माहितीपत्रके
टाटा गाड्यांची माहिती
मारुती गाड्यांची माहिती

मदत, सल्ला, मार्गदर्शन इ.बद्धल मिपाकरांचे आगाऊ धन्यवाद.

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

20 Jul 2020 - 9:01 am | योगी९००

टोटल पाच जण आणि वर्षाकाठी एक दोन सहली असे असेल तर मागे डीकी असलेली गाडी घ्या. नाहीतर सामान ठेवायचे वांदे होतात.

स्विफ्ट डिझायर चा माझा अनुभव खूप छान आहे.पेट्रोल कारच घ्यावी असे मत आहे. दोन महिने जरी पडून राहीली तरी पहिल्या किकला (म्हणजे चावी पिरगळ्याला) चालु होते. मी पाच वर्ष वापरत आहे, अजून अ‍ॅवरेज,मेंटेनन्स वगैरे एकदम लिमिटमध्ये आहे.

मी तुमच्याजागी असतो, तर

मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजि+पेट्रोल चा विचार केला असता.
किंवा मारुती सुझुकी अर्टिगा हायब्रीड चा विचार केला असता.

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 10:44 am | मराठी_माणूस

पार्कींगची सोय आहे का ?

कांदा लिंबू's picture

20 Jul 2020 - 1:13 pm | कांदा लिंबू

पार्कींगची सोय आहे का ?

हो, आहे.

कपिलमुनी's picture

20 Jul 2020 - 10:59 am | कपिलमुनी

सेफ्टी चा विचार करता मारुती च्या गाड्या योग्य नाहीत , बाकी सगळे उत्तम आहे पण जीव सर्वात महत्वाचा!
ह्युंडाई चे इंजिन आणि परफॉर्मन्स सर्वोत्तम आहे, पण एव्हरेज कमी आहे.

त्यामुळे टाटा टियागो किंवा लो एन्ड अलट्रोज घ्या असे सुचवेन .

कांदा लिंबू's picture

20 Jul 2020 - 1:23 pm | कांदा लिंबू

मारुती व ह्युंदाई बद्धल हाच फीडबॅक माझ्या मित्रांनी दिलाय.

हं, टिआगो पसंत पडेल असं वाटतंय.

अभ्या..'s picture

20 Jul 2020 - 3:13 pm | अभ्या..

टाटा टियागो बेस्ट ओप्श्न आहे. माझ्या पत्नीस गाडी घ्यायची होती तेंव्हा कपिलमुनिने हिच सजेस्ट केलेली मला. टियागो एक्स झेड आहे. अ‍ॅलॉय व्हील, हर्मन साउंडस, एबीएस आणि इबीडी. २ एअरबॅग आहेत. व्हाईट कलर आहे.(पुधे मागे धंदा काहीच जमला नाही तर ओलाला किंवा ट्रव्हलला लावायचा आणि ड्रायव्हर मणून काम करायचा विचार असलेने व्हाईट) त्यावेळी टाटाचा सेल्स मॅनेजर क्लासमेट असलेने बरेच डिसकाउंट अ‍ॅड करुन ६ लाखाला ऑनरोड मिळाली.(११ फेब २०१९)
स्विफ्ट किंन्वा सॅन्ट्रो ची कंपेअर केली तर टेक्निकली आणि लुकनुसार टियागो साधारण वाटते पण काहि वैषिष्ट्ये टियागो सुपिरिअर आहे. एकतर बिल्ड क्वालिटी. नवीन स्विफ्टचा पत्रा पातळ केलाय, वेट ही कमी केलेय खुप मायलेज वाढवण्यासाठी. टियागो मज्बूत आहे तुलनेने. एनकॅप रेटिंग ला ४ स्टार आहेत. अ‍ॅक्सिडेंटला जास्त हानी होत नाही. स्विफ्टचे जरी ४ सिलिंडर आणि टियागोचे ३ सिलिंडर इंजिन असले तरी पेट्रोल मॉडेल ला टियागो जास्त अ‍ॅव्हरेज देते. साधारण २० किमी गावात आणि २५ किमी हायवेवर पडते. स्मूथ आहे. सुरुवातीच्या टियागोत व्हायब्रेशन प्रॉब्लेम होता पण आता नाहीये. पॉवर स्टीअरिंग रिस्पोन्सिव्ह आहे. जागा एका कुटुंबास पुरेशी आहे. लुक म्हणले तर नवीन टियागो मध्ये रॅपाराउंड हेडलॅम्प आणि न्यु ग्रिले आहेत. चांगला दिसतो तो. नवीन यलो कलरही कॅची आहे. सॅन्ट्रो आणि स्विफ्ट्पेक्षा हायवेवर सुरक्षित आणि पॉवर्फुल परफॉर्मन्स देते. फक्त इंजिन रिफाईनमेंटमध्ये उन्नेस बीस फरक आहे. पार्किंग इझी आहे. हरमन कार्डनचे ६ साउंड जबरदस्त आहेत. टाटा कनेक्ट ने अ‍ॅन्ड्रोईड कनेक्टिव्हिटी मिळते. सरव्हिसिंग कॉस्ट कमी आहेत. चांगल प्लॅन घेतले कंपनीचे तर स्वस्तात आण्खीनच पडते. पिकप ड्रॉप सर्व्हिस मिळते. आता टाटाचे पब्लिक बरेच सुधारले आहेत. चांगली सर्व्हिस देतात. फक्त फॅक्टरी फिटेड सीएनजी ऑप्शन अजुन नाही अ‍ॅव्हेलेबल.
चलवायच्या दृष्टीने म्हणले तर मलाही आधी येत नव्हती. लायसन होते पन कॉन्फीडन्स नव्हता. प्रॅक्टीसने १ महिन्यात आली व्यवस्थित. ३ ट्रिप सोलापुरच्या झाल्या. १ मुंबईअची. सो आता जमते ठिकठाक.

कांदा लिंबू's picture

21 Jul 2020 - 11:07 am | कांदा लिंबू

अभ्या, सविस्तर प्रतिसाद आवडला. First-hand experience मस्त लिहिलाय.
तुमचा फोन नंबर मला व्यनी कराल का?
...

टिआगो मॅन्युअल चालवण्याचा अनुभव अजून कुणाला आहे का?

विनोद वाघमारे's picture

27 Jul 2020 - 12:56 pm | विनोद वाघमारे

Oct. २०१८ ला रेड कलर पेट्रोल टियागो एक्स झेड घेतली. आधी येत नव्हती. पण आता येते, गावी अहमदनगर - राहुरी ला ५-६ वेळा जाऊन झाले.
हीच गाडी घेऊन प्रचंड समाधानी आहे. ऐसपैस जागा, मोठी डिकी, सेफ्टी फीचर्स, चालवायला सोपी, आणि सर्वात खास मुझिक सिस्टम. खूप चांगली गाडी आहे, सर्विस सेन्टर्स पण चांगली सर्विस देतात. मायलेज मला हायवे वर २३ पर्यंत मिळते, माळशेज मार्गे जाताना, आणि कल्याण मार्गे मुंबई मध्ये घुसल्यावर पुन्हा १७ - १८ पर्यंत खाली येते. पण तक्रार काहीच नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2020 - 4:57 pm | अत्रुप्त आत्मा

मुनिवर्यांंना +++++ १११११
टीएगो इज बेस्टस बेस्ट..फेमिली कार!

मारुती अल्टो(पेट्रोल सीएनजी) मी गेली 9 वर्ष वापरतो आहे. मेंटेनन्स नाही..पण मारुतीची गाडी बॉडी पत्रा कोलिटी टुकार आहे. त्याबाबतीत टाटा ग्रेट.

विजुभाऊ's picture

20 Jul 2020 - 11:02 am | विजुभाऊ

ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव चांगला आहे. सेदान आहे आणि कम्फर्ट खूप चांगला आहे. पेट्रोल चे अ‍ॅव्हरेजही बरे आहे. तुमचे रनिंग ही कमी आहे.
सँट्रो ही हॅच बॅक आहे. सामानाला जागा उरत नाही. मात्र गाडी खूपच चांगली आहे.
आय टेन लाँग रन साठी कम्फरटेबल वाटत नाही. तसेच जागा लहान पडते. ( चार लोकांसाठी चांगली आहे)
रेनॉल्ट क्वीड ही फारच लहान गाडी आहे.
सुझुकी एर्टीगा उत्तम आहे. मात्र यात अगदी मागची रांग फारच अडचणीची आहे. सामान असल्यास तर खूपच अडचणीची ठरते.
टाटा टियागो उत्तम आहे.
जुन्या गाडी साठी जाणार असाल तर ह्युंडाई एक्सेंट चा पर्याय पहा. सुझुकी स्विफ्ट डिझायर ही चांगली आहे.

कांदा लिंबू's picture

20 Jul 2020 - 1:27 pm | कांदा लिंबू

टाटा टियागो उत्तम आहे.

विचार चालू आहे.

कांदा लिंबू's picture

20 Jul 2020 - 1:17 pm | कांदा लिंबू

मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप कुप अवदले !

सुरुवातीला मला मिसळपाव हे सदस्यनाम घ्यायचं होतं, पण त्याचं मिसल्पव झालं. आता झालं ते झालं, जाऊ द्या.

आपलं नाव कुणालातरी आवडलंय यातच आनंद मानून खाली बसतो.

बाकी जुन्या धाग्यांच्या लिंकांबद्धल धन्यवाद, साहेब! वाचतो आहे.

चौथा कोनाडा's picture

20 Jul 2020 - 8:51 pm | चौथा कोनाडा

:-)

संपादक मंडाळा विनंती करून नाव सुधारणा करता येईल !
(पण मिसळपाववर मिसळपाव कसं तरीच वाटतं ना ? त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )

कांदा लिंबू's picture

27 Jul 2020 - 10:02 pm | कांदा लिंबू

त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )

तुमच्या सुचनेचा मान राखून कांदा लिंबू सदस्यनाम घेतले आहे.

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा

ज्जे बात हैं ! एक नंबर !

मिसल्पव चे कांदा लिंबू झालात !

ग्रेट, कांदा लिंबू साहेब !

नामांतर चिरायू होवो !

:-)))

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2020 - 1:04 pm | संजय क्षीरसागर

ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ -

सुखद रंग बघून घेऊन टाका !

एकदा चालवायला लागलात की माझी आठवण काढाल !

कांदा लिंबू's picture

20 Jul 2020 - 1:42 pm | कांदा लिंबू

गोंधळ उडतोय राव.

  • मारुतीच्या गाड्या - सुरक्षितता नाही
  • ह्युंदाईच्या गाड्या - वापराचा खर्च जास्त
  • टाटाच्या गाड्या - परफॉर्मन्स नाही (म्हणजे काय?)

असा फ़ीडबॅक मिळतोय.

त्यात, क्रंपल झोन, एबीएस, इबीडी, एअर बॅग्स... अशी भुते दिवट्या घेऊन नाचताहेत.

कोणता झेंडा घेऊ हाती?

कपिलमुनी's picture

20 Jul 2020 - 2:07 pm | कपिलमुनी

मी १० वर्षे i10 वापरत आहे, हुंडाई च्या गाड्या 5 लोकांसाठी आरामदायी नसतात, वर सुचवलेलें कप्पा इंजिन 12-14 मायलेज देते.
शिवाय

लोकल कंपनीला महत्व द्या , टाटा समूह समाजाप्रति बांधिलकी दाखवतो आहे आणि शिवाय गाड्या मध्ये सर्व फीचर आहेत, सो लोकल ला व्होकल करा

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2020 - 4:06 pm | संजय क्षीरसागर

काहीही विचार न करता

ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ -

सुखद रंग बघून घेऊन टाका !

कारवाल्यानी खर्चाचा विचार करायचा नाही > सगळं सुख केरात जाईल > कंफर्ट बघा > एक नंबर गाडीये !

कपिलमुनी's picture

20 Jul 2020 - 2:08 pm | कपिलमुनी

टाटांच्या गाड्या परफॉर्मन्स नाही म्हणणारे अजून इंडिका च्या काळात वावरत आहेत.
तुम्ही टेस्ट राईड घ्या, कम्फर्ट बघा ,रनिंग कोस्ट काढा आणि पुन्हा धाग्यावर या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2020 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टाटाची इंडिगो डिझेल, आणि टाटाची झेष्ट पेट्रोल वापरलीय. झेष्ट मस्त होती. पेट्रोलचा खर्च जास्त वाटत होता, त्यामुळे ती विकली.
तिला एक स्पीडचं बटन होतं ते खूप आवडायचं मला. चांगला रोड लागला त्याला प्रेस केलं ना अहाहा.....!

नव्या टाटाच्या कोणत्या गाड्य आहेत आता माहिती नाही.

-दिलीप बिरुटे

गाड्यांचे जास्त अनुभव नाही..

पण नवीन गाडी घ्यायची असती तर बजेट थोडे सैल करून मी
Vokeswagan किंवा टोयोटो च्या कुठल्या गाड्या आहेत हे पाहिले असते असे वाटते..

पोलो /ameo /liva ect

पण तुम्ही जितके जास्त ऐकत वाचत जाल त्यात confusion जास्त होत जाईल असे वाटते..

घेऊन टाका ..
याच धंद्यात आहे म्हणून अगदी छातीठोक पणे सांगतो ... पैसा वसूल गाडी आहे !

- विटेकर
( गेली ३२ वर्षे आटोमोबाइल क्षेत्रात खुड्बुड करणारा )

कांदा लिंबू's picture

21 Jul 2020 - 11:13 am | कांदा लिंबू

तुमचा फोन नंबर मला व्यनी कराल का?

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Jul 2020 - 1:15 pm | अनिरुद्ध.वैद्य

कशी आहे हो ?

भीडस्त's picture

21 Jul 2020 - 8:17 pm | भीडस्त

चालवून बघा
मैं तो खुश हूँ
(ए एम टी लॅग सोडला तर, पण आता दीड वर्षात सवय झालीय)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2020 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बलेनो घ्या. चाम्गली आहे. अवरेज पण थोडी मागे आदळते असे वाटते. पण इतकं तितकं चालायचंच.

-दिलीप बिरुटे
(बलेनोवर खुश असलेला)

कपिलमुनी's picture

20 Jul 2020 - 6:21 pm | कपिलमुनी

मी बलेनो घेणार होतो , पण एकदा खड्डे असलेल्या रस्र्यावर टेस्ट राइड घेतलि ,
अरारा ... सस्पेशन अतिशय खराब !... त्यामुळे लगेच रद्द केली.

बलेनो मध्ये सर्वाधिक लेग रूम आहे . त्यामुळे रीअर सीट कन्फर्ट मस्त आहे .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2020 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले भारतीय रस्ते हायवे सोडले तर जवळ जवळ खड्ड्यांनीच भरलेले आहेत.
सस्पेन्शनच्या बाबतीत सहमते......

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

20 Jul 2020 - 8:17 pm | सुबोध खरे

मागच्या वर्षी माझी इंडिका जुनी झाली म्हणून नवी गाडी घ्यायची होती तेंव्हा काही संशोधन केले.
मारुती ह्युंदाई आणि टाटा या गाड्या भारतात कुठेही दुरुस्त होतात. त्यामुळे या तीनचाच विचार केला होता.
आता शहरात गाडी चालवायची म्हणून स्वयंचलितच घ्यायची ठरवली होती त्यामुळे

मारुती स्विफ्ट डिझायर AMT
ह्युंदाई XCENT AUTO
टिगॊर AMT

पहिली गाडी मारुती ८०० होती. पण त्याचा पत्रा फारच पातळ आहे आणि एकंदर बांधणी मजबूत नाही अन्यथा मारुतीच्या देखभालीला दुसरा पर्याय नाही.
मारुती स्विफ्ट डिझायर गाडी फार छान प्रशस्त आहे पण वजन ८५० किलो.

ह्युंदाईच्या गाड्या तुलनेत महाग आहेत आणि सुटे भाग बरेच महाग पडतात. तेवढे( बजेट) सोडले तर गाड्या उत्तम आहेत.

टाटाची इंडिका १२ वर्षे चालवत होतो त्यामुळे टाटाच्या गाडीचा भरवसा नक्की आहे. म्हणून शेवटीं टाटा टिगॊर XZA हि गाडी सव्वा सात लाखाला घरपोच घेतली. टिगॊर वजन १०४० किलो. (स्विफ्ट डिझायर वजन ८५० किलो.)

हा फरक का? असे विचारले असताना टाटांचे व्यवस्थापक म्हणाले डॉक्टर साहेब A B C तिन्ही पिलर्स मध्ये सुरक्षिततेसाठी ट्विस्टेड आयर्न बार्स आहेत स्टील घरचंच आहे.

बाकी टाटा च्या गद्यातील सर्वात चांगल्या बाबी काय आहेत?
१) ए सी उत्तम असतो ( नॅनो चा एसी सुद्धा)
२) सस्पेन्शन उत्तम असते

टाटा च्या गाड्या स्वस्त अशी एक जनमानसात "प्रतिमा तयार करण्यात आली" आहे.

त्याच्या पलीकडे पाहायला शिकलात तर टाटा इतकी उत्तम गाडी तितक्या कमी पैशात मिळणार नाही

बाकी कपिलमुनी यांनी लिहिलेल्या ताजमहालाला माझी वीट लावू इच्छित नाही

कांदा लिंबू's picture

21 Jul 2020 - 11:12 am | कांदा लिंबू

टाटा इतकी उत्तम गाडी तितक्या कमी पैशात मिळणार नाही.

+१

ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा विचार करत आहात, (त्याच वेळी उद्या ७ ते १० वर्ष्यानी तिला समजा विकून पुन्हा नवी गाडी घ्यायची वेळ येईल तेव्हा),
रिसेल व्हॅल्यू कुठल्या गाड्यांना चांगली मिळेल, असाही एक अँगल, विचारात घ्यावा, असे सुचवितो.

विजुभाऊ's picture

21 Jul 2020 - 10:01 am | विजुभाऊ

7 ते 10 वर्षात टेक्नाॅलाॅजी इतकी बदललेली असूल की जुध्या गाड्यो एकदम विंटेज ठरतील
नंतर गाडीविकल्यावर इतके पैसेयेतील हा विचार आत्या करू नका.

कोहंसोहं१०'s picture

21 Jul 2020 - 12:00 am | कोहंसोहं१०

२०३० पर्यंत 'electric vehicle' पॉलिसी अंतर्गत पेट्रोल डिझेल गाड्यांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम व्हायची शक्यता आहे. जी गाडी ठरवाल ती लागल्यास electric vehicle मध्ये सहजपणे रूपांतरित करता येईल की नाही हेही विचारून बघा.

हो आणि बजेट सैलवणार असाल तर मग, "टेस्ला"चाही विचार करावा.

टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या Car1

रेनॉल्ट ट्रीबर घ्या
car2

कपिलमुनी's picture

21 Jul 2020 - 9:57 am | कपिलमुनी

ट्रायबर ही स्पेस च्या दॄष्टिने बेस्ट एम पी व्ही आहे .
पण ... ३ सिलेंडर १.० इन्जिन ७ सीटर साठी खुप कमी आहे. त्यातून ते टर्बो चार्ज नाही. त्यामूळे पर्फोर्मन्स वर परिणाम होतो. शिवाय अव्हरेज कमी आहे.

अजुन NCAP crash अजुन टेस्टींग झाले नाही, त्यामुळे सेफ्टि ची खात्री रिझल्ट नंतर देता येईल.

मोठ्या फॅमिलि साठी उत्तम गाडी आहे, रेनॉ यासाठी टर्बो चार्ज इंजिन आणणार आहे , ते आल्यावर गाडी उत्तम होइल.

बजेट असेल तर अल्त्रोज बेस्ट इन क्लास अहेच .

सुबोध खरे's picture

21 Jul 2020 - 10:11 am | सुबोध खरे

ट्रायबर हि मारुती व्हॅन किंवा इको च्या वर्गातील गाडी आहे.

१ लिटरचे ७२ बी एच पी इंजिन घेतले तर ७ जणांना घेऊन घाट चढायला गाडीला कष्ट होतील. शिवाय ए सी जेमतेम चालेल.
जास्त माणसे भरायची असतील तर उत्तम

तियागो ५ सीट आणि १२०० सिसि इंजिन ८४ बी एच पी. तुलना करून पहा.

आरामदायक गाडी हवी असेल तर वर सुचवलेल्या पैकी कोणतीही आपल्या आवडीची गाडी घ्या

हल्ली मोठी डिकी का नसते? मागे चपाटल्याने किमि वाढतात?

बरीच कारणे आहेत. टॅक्स हे तर आहेच पण काहीजण कमी पार्किंग जागेसाठी हचबॅक प्रेफर करतात. हॅचबॅक त्याच्याच सेदान पेक्षा थोडेसे जास्त मायलेज देते. ट्रॅफिक मध्ये सोपी जाते चालवायला. फक्त थोडासा जागेचा आणि डिकी चां त्याग इंडियन लोक आरामसे करतात कारण सेदान १ लाखाने तरी महाग असते. सामान ठेवायला हाचबॅक ला लहान का होईना डिकी असते. जास्त असेल तर छतावर करिअर बसवायची सोय असतेच. जवळ जवळ सगळ्याच कंपन्या सेदान आणि हच्बॅक अशा एकाच इंजिन स्पेसिफि केशन चां काढतात. पुंतो आणि लीनिया. इंडिका आणि इंडिगो, टीयागो आणि तीगोर, फिगो आणि अस्पायर, स्विफ्ट आणि डिझायर, लोक त्यांच्या खिषानुसार आणि आवडीनुसार घेतात.

विजुभाऊ's picture

21 Jul 2020 - 10:03 am | विजुभाऊ

टॅक्सेस कमीहोतात

कांदा लिंबू's picture

21 Jul 2020 - 11:11 am | कांदा लिंबू

इथे #SaferCarsForIndia या मोहिमेअंतर्गत केलेल्या चाचण्यांचे निकाल आहेत.

इथे टिआगोच्या चाचणीचा रिपोर्ट आहे.

टिआगोच्या चाचणीचा विडिओ

...

सुरक्षिततेचा विचार केल्यास टिआगो / अल्ट्रॉझ घ्यावीशी वाटतेय.

स्वानुभवावरून सांगतो, हैद्राबाद मध्ये प्रामुख्याने गाडी राहणार असेल तर अशी गाडी घ्या कि गाडीला कुणी घासलं, ओरखडा पडला, चढता/उतरता दाराला पोचा आला, सिग्नलला कुणीतरी बम्परला धडकला (किंवा हे असं होणारच आहे हे डोक्यात ठेवा) तर तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही आणि दुरुस्तीचं काम थोडक्यात भागेल.
तुम्ही नवी आणि जुनी असे दोन्ही पर्याय खुले ठेवलेत म्हणून, वर ज्या ज्या गाड्या सर्वानी बघा म्हणून सांगितल्या आहेत त्या एकदा चालवून पहा आणि २-३ वर्ष जुनी गाडी घ्या. आपण नोकरदार लोक आहोत, कशाला नव्या गाडीचा घसारा भरायचा? जर नवी घेणार असाल तर ती गाडी पार आयुष्यभर वापरा ( हे माझे मत!).

जेम्स वांड's picture

21 Jul 2020 - 10:39 pm | जेम्स वांड

ड्रीमच राहणार!

Shevrolet cruise घ्यायची होती तेव्हा पैसा अन लायकी नव्हती आज थोडा आहे तर गाडीच बंद झाली, चलता है....

परत कधी घेऊचे सगळे पॅरामीटर्स अन आमची गणिते जुळून आली तर मला महिंद्रा थार घ्यायला आवडेल , त्या गाडीत चार्म वाटतो राव एक अलगच

rain6100's picture

22 Jul 2020 - 12:47 pm | rain6100

आपली ड्रीम कार सिम्पल स्कोडा रॅपिड रायडर किंवा रायडर प्लस फायनल झालीय ... पुढच्या महिन्यात घेणार आहे ..

कपिलमुनी's picture

22 Jul 2020 - 1:03 pm | कपिलमुनी

माझी ड्रीम कार हिंदुस्तान काँटेसा- . रग्गड पैसे असतिल तर २.० इंजिन टाकून रिस्टोअर करायचे ड्रीम .
भारतातील एकमेव मसल्स कार

contessa

c1

जेम्स वांड's picture

22 Jul 2020 - 1:09 pm | जेम्स वांड

कसलं रग्गड प्रकरण आहे राव. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा, देव तुमचे मागणे मंजूर करो हीच प्रार्थना.

रच्याकने, कॉन्टेसा घेतली तर थेट केरळात धाडा, काही मित्रांचे अनुभव अन युट्युब मुशाफिरीवरून एक लक्षात येतंय की केरळी लोक गाड्या मोडीफाय, रिस्टोर अन सुंदर बनवण्याच्या कलेत क्रेझी टॅलेंटेड असतात.

सुबोध खरे's picture

23 Jul 2020 - 6:38 pm | सुबोध खरे

Contessa is not technically a Muscle car as the original meaning of muscle car is that a performance car built to be focused for drag racing which is a two-door coupe. Contessa is a four-door sedan model, not a drag racing focused car and has only limited power output.

१८०० सी सी च्या इंजिनाची शक्ती फक्त ८८ बी एचपी होती. त्या काळात ती शक्ती भरपूर होती. ( उदा मारुती ८०० ची ३७ बी एच पी होती).

परंतु आता अगदी सध्या मिड साईझ कार सुद्धा त्यापेक्षा जास्त शक्तीची इंजिने असलेली आहेत.

आपली सध्या असलेली टियागो सुद्धा ८४.५ बीएचपी ची आहे

टिआगो JTP सुद्धा ११२. ५ बी एच पी ची येते.

कपिलमुनी's picture

23 Jul 2020 - 7:56 pm | कपिलमुनी

@डॉक्टर:
टाटा टिगोर मध्ये मागच्या सीटची रचना तीन लोकांसाठी आराम दायक आहे का ?
इंडिका ही मागच्या सीटसाठी सेगमेंट मध्ये सर्वोत्तम होती,
टिगोर मध्ये तेवढी स्पेस आहे का ?

सुबोध खरे's picture

23 Jul 2020 - 8:10 pm | सुबोध खरे

तिगोरची लांबी टियागो पेक्षा २३ सेमी ने जास्त आहे (376. 5 सेमी विरुद्ध 399. 3 मिमी) आणि व्हील बेस ५ सेमी ने जास्त आहे ( टिगॊर हि टियागो खेचून लांब केल्यासारखी आहे).

त्यामुळे मागच्या सीट च्या लेग स्पेस मध्ये सहा इंचाचा फरक आहे यामुळे टियागो पेक्षा टिगॊर च्या मागच्या सीट वर उंच माणसांना जास्त आरामशीर पणे बसता येते.

अर्थात स्त्रियांना/ कमी उंचीच्या माणसांना फारसा फरक पडत नाही कारण दोन्हीची रुंदी सारखीच आहे १६७.७ सेमी.

माझी टिगॊर आहे आणि पत्नीची टियागो त्यामुळे थेट तुलना करून पाहिली आहे.

https://www.cardekho.com/compare/tata-tiago-and-tata-tigor.htm

सुबोध खरे's picture

23 Jul 2020 - 8:10 pm | सुबोध खरे

पत्नी ची नव्हे पुतणीची

सुबोध खरे's picture

23 Jul 2020 - 8:12 pm | सुबोध खरे

इंडिका ची रुंदी १६६. ५ सेमी होती आणि टियागो /टिगॊर १६७.७ सेमी.

कपिलमुनी's picture

23 Jul 2020 - 8:27 pm | कपिलमुनी

धन्यवाद

पण व्यवहारिक अडचणी मांडू शकतो.
1) भारतातील रस्त्यांची अवस्था बघता ग्राउंड clearance cha vichar करायला हवा.
2) जास्त वेगाने धावणारी गाडी आपल्या इथे योग्य नाही रस्ते धड नाहीत त्या मुळे जास्तीजास्त 100 ते 150 हाच उच्च वेग झाला
3) गाडी ची मजबुती हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे अपघात झाला तर कमीत कमी धोका निर्माण व्हावा.
4) गाडीचा दुरुस्ती खर्च आणि सुटे भाग ह्यांची किंमत कमी असावी आणि उपलब्धता जास्त असावी.
5) कमीत कमी तांत्रिक कमतरता असावी .
अपघाताचे तांत्रिक दोष हे मोठे कारण आहे.
6) शहरात पार्किंग ची जागा हा मोठा प्रश्न आहे त्या मुळे गाडीचा आकार पण विचारात घेणे.
7) शेवटी किंमत.
आपल्या परवडेल तेवढीच असावी .
बँका कर्ज देण्यास तयारच असतात पण गाडी
पासून होणारा फायदा आणि त्या वर आपण करत असलेला खर्च ह्याचे गुंनोत्तर योग्य असावे..

Trump's picture

25 Dec 2021 - 6:47 pm | Trump

+१

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2020 - 12:20 am | मराठी कथालेखक

कार पेक्षा sub 4 मीटर SUV म्हणजे compact SUV चा विचार करावा असे मी सुचवेन. मग त्यामध्ये टाटांची नेक्सॉन, ह्युंदाईची व्हेन्यु आणि महिंद्राची XUV300 हे पर्याय आहेत. मारुतीने आणि रेनो वा निस्सान ने पण काही मॉडेल आणले आहे वाटते नक्की आठवत नाही.
माझ्याकडे टाटा इंडिका व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन) सुमारे आठ वर्षापासून आहे, चांगली गाडी आहे, किंमत आणि सुविधा यांचा विचार केल्यास नक्कीच स्वस्त आहे. देखभाल खर्चही जास्त नाही.

सुबोध खरे's picture

24 Jul 2020 - 10:13 am | सुबोध खरे

व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन) हे १.३ लिटरचे डिझेल इंजिन जगातील सर्वात जास्त निर्मिती झालेल्या आणि अत्याधिक लोकप्रिय असलेल्या इंजिनपैकी एक आहे.
हे अतिशय उत्तम दर्जाचे, थोडेसे आवाज करणारे असले तरी डिझेलचा पुरेपूर वापर करणारे ( कमी डिझेल वापरून जास्तीत जास्त शक्ति देणारे) इंजिन आहे.

आता याचे उत्पादन थांबवले असले तरी पुढची १० वर्षे याचे सुटे भाग विकत मिळतील अशी कंपनीने ग्वाही दिली आहे तेंव्हा आपल्याकडे असलेली गाडी आपल्याला अजून ७ वर्षे सुखात चालविता येईल. (तोवर विजेवर चालणाऱ्या मोटारी येतीलच)

https://auto.economictimes.indiatimes.com/news/auto-components/goodbye-f...

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2020 - 1:53 pm | मराठी कथालेखक

माहितीबद्दल धन्यवाद.
इंजिन चांगले आहे पण माझ्या कारचे मायलेज तितकेसे चांगले मिळत नाही. अर्थात तो तितकासा महत्वाचा मुद्दा नाही.
मला खरं तर टाटा इंजिन असलेली व्हिस्टा घ्यायची होती पण त्यात VX हे सर्वात वरचे मॉडेल नसल्याने मी फियाट इंजिनची गाडी घेतली.

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2020 - 1:23 pm | चौथा कोनाडा

मारूती, ह्युंडाई, टाटा इ. चर्चेवरुन नुकताच मला एकाने पाठवलेला हा मथळ्यासकट्चा मजेशीर व्हिडो तुकडा आठवला :

टाटांनी इंडिका हे अतिशय सुमार दर्जाचे डिझेल इंजिन वाहन भारतीय बाजारपेठेत उतरवल्यानंतर पुढील वीस वर्षांत प्रदुषण पातळीत किती भयंकर वाढ होईल याचे भाकित इ.स. २००० मध्येच वर्तविण्यात आले होते.

त्यावेळी स्वस्त डिझेल कार आणि डिझेल प्रदुषणाची बरीच चर्चा झाल्याचे आठवतेय ! इंडींका गेमचेंजर ठरली, बाकी इतर कंपन्यांनी देखील अश्या गाड्या बाजारात आल्या.
काही वर्षांनंतर प्रदुषण हा विषय दुय्यम होत गेला !

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2020 - 2:08 pm | मराठी कथालेखक

इंडिका जास्त प्रदूषण करते असे कधी सिद्ध झाले ? इतर कोणत्याही वाहनांप्रमाणेच टाटाची वाहने देखील त्या त्या काळची प्रदूषण मानकांची पुर्तता करणारी आहेत. (बी एस २, ३ वा ४ ई). माझी २०१२ साली घेतलेली व्हिस्टा BS4 मानकांची पुर्तता करणारी आहे.
बाकी उत्पादकाने कितीही चांगली , कमी प्रदूषण करणारी वाहने बनवली तरी पुढे तिची योग्य ती आणि वेळचे वेळी देखभाल करणे चालक/मालक यांची जबाबदारी आहे. आणि वाहनचालक हे करतायत की नाही ह्यावर लक्ष ठेवणे ही वाहतूक शाखेची / सरकारची जबाबदारी आहे. याआधीचा PUC हा प्रकार अगदीच निष्प्रभ ठरला होता. आता online PUC मुळे खोट्या सर्टिफिकेटला बराच आळा बसेल अशी आशा करुयात (अर्थात त्यावरही काही जुगाड काढले नाहीतर) . जर टॅक्सी चालकाने आपली इंडिका व्यवस्थित ठेवली नसेल आणि त्यामुळे प्रदूषण वाढले तर त्यात टाटा कंपनीचा दोष कसा ?
तसेच डिझेल मध्ये भेसळ होत असेल का ? असल्यास त्यामुळे प्रदूषण किती वाढत असेल याचाही विचार व्हायला हवा.

लिओ's picture

25 Jul 2020 - 12:56 pm | लिओ

येणारा काळ हा बॅटरी / इलेक्ट्रिक वाहनाचा आहे, यात काहि शंका नाहि,

मध्यंतरि काहि बातम्यात एकले कि भारतात डिझेलचे भाव काहि ठिकाणी पेट्रोल च्या भावापेक्षा जास्त झाले. हि परिस्थिती तात्पुरती आहे कि भविष्यात डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव सर्वसाधारण एकाच पातळीवर राहतील, यावर थोडा प्रकाश टाकावा,

डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव यामुळे मालवाहतुक, शेती , उद्योग क्षेत्र यावर होणारा परिणाम हे बाजुला ठेवुन फक्त वैयक्तिक प्रवासी वाहनावर काय परिणाम होइल यावर चर्चा अपेक्षित आहे

धन्यवाद

वामन देशमुख's picture

25 Jul 2020 - 2:35 pm | वामन देशमुख

टाटा नेक्सन पेट्रोल ऑटोमॅटिक वापरण्याचा अनुभव कुणाला आहे का?

सुबोध खरे's picture

25 Jul 2020 - 7:29 pm | सुबोध खरे

मी टेस्ट ड्राइव्ह घेतला आहे.

इंजिन टिगॊर चंच आहे. परंतु तेच इंजिन टर्बो चार्जेड असल्याने आणि त्याचा पॉवर मॅप वेगळा असल्याने त्याची शक्ती बरीच जास्त आहे. १२० पी एस आहेआणि टॉर्क १७० एन एम आहे पण तो १७५० आर पी एम इतक्या खालच्या पातळीला येत असल्याने त्या गाडीला जोरदार पीक अप आणि शक्ती आहे. ( तुलनेसाठी टिगॊर ८६ पी एस. टॉर्क ११३ एन एम @ ३३०० आर पी एम).

त्यातून स्पोर्ट मोड वर ठेवून चालवली तर एखाद्या रेस कार सारखी वेग घेते. शिवाय NCAP च्या सुरक्षा चाचणीत ५ स्टार आहेत. ( टिगॊर ४ स्टार)

ज्याला एस यु व्ही घ्यायची आहे त्याच्यासाठी अतिशय उत्तम.

ती गाडी चालवून मी खरं तर तिच्या प्रेमातच पडलो. परंतु माझी एकंदर गरज एवढी ( खरं तर मला गाडीची गरजच) नाही. आणि ती १० लाखाच्या वर जाते. त्यामुळे मी तो विचार सोडला.

तुम्हाला आवडली असेल तर एकदा चालवून पहाच.

माझ्या कडे BS4 टाटा नेक्सन पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. गाडी अतिशय मजबूत, ग्राउंड क्लिअरन्स उत्तम. शिवाय ऑटोमॅटिक असल्याने लॉन्ग रनिंगला थकवा जाणवत नाही. मात्र गाडीचे मायलेज बऱ्यापैकी कमी आहे, हायवे ला १५-१६ तर शहरात ११-१२, खूप जास्त ट्राफिक असेल तर मात्र ८-९ कि.मी./ली. आणि AMT असल्याने गियर लॅग प्रकर्षाने जाणवतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नंबर गाडी.

कांदा लिंबू's picture

27 Jul 2020 - 10:26 pm | कांदा लिंबू

टिआगो, अल्ट्रॉझ, आइटेन निऑस आणि आज... निक्सन.

आतापर्यंत चार चाचणी-चालने (टेस्ट ड्राइव्हज्) करून झाल्यात. सर्वच गाड्या (safety, comfort, mileage, maintenance...इ चा विचार करता) आपापल्या परीने योग्य वाटत आहेत.

घरापासून ३.५ किमीवर सर्वच गाड्यांची दुकाने एका ओळीत आहेत. टाटाच्या शोरूममध्ये अगदी थंड प्रतिसाद मिळाला. ह्युंदाईच्या शोरूममध्ये राजेशाही स्वागत झालं.

डाउन पेमेंटची जोड झाली तर किमतीला ९.८४ पर्यंत जाणारी निक्सन एक्सएमए पेट्रोल आवडेल असं वाटतंय.

लिंबू-मिरची

गाडीच्या ड्राइव्हर सीटवर कांदा लिंबू बसेल पण गाडीच्या ग्रिलला मात्र लिंबू मिरची असेल!

कपिलमुनी's picture

28 Jul 2020 - 1:19 am | कपिलमुनी

९.८४ लाख बजेट असेल तर एकदा होंडा अमेझ ची टेस्ट राईड घेउन बघा

अभ्या..'s picture

28 Jul 2020 - 8:22 am | अभ्या..

अमेझ भारीच आहे. पण १० लाखापर्यंत बजेट म्हणाल्यावर खूप ऑप्शन उपलब्ध आहेत.
आधीचे ५ ६ लाखाचे बजेट असलेने तुलनेने कमी ऑप्शन होते.
बऱ्याच सेडान, मिनी एस्युवही किंवा टॉप एन्ड ह चबॅक १० लाखापर्यंत मिळू शकतात.
अगदी स्कोडा रॅपिड रायडर सुध्दा ह्या विभागात येते

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 10:39 am | सुबोध खरे

स्कोडा रॅपिड रायडर हि गाडी उत्तम आहे विशेषतः त्याच्या व्हेरिएबल जॉमेट्री टर्बोचार्जर मुळे त्याला जबरदस्त शक्ती आहे.

परंतु या जास्त गुंतागुंतीच्या रचनेमुळे ( आणि फोक्सवागेन गटातील गाडी असल्यामुळे) त्याचे सुटे भाग भरपूर महाग आहेत.

पाच वर्षात गाडी विकून टाकायची असेल तर विचार करावा

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 10:32 am | सुबोध खरे

अमेझ ला होंडा सिटीचा ग्लॅमर नाही किंवा होंडा सिटीची मुलायमता हि नाही.

केवळ स्वस्तात गाडी उपलब्ध करून द्यायची म्हणून होंडा सिटीची काटछाट करून ठोकळेबाज (BOXY) गाडी बनवली आहे

हे मा वै म

१० लाखाच्या बजेट मध्ये नेक्सन हि नक्कीच जास्त चांगली आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2020 - 11:04 am | अनिरुद्ध.वैद्य

शिवाय अत्यंत क्मी ग्राऊंड क्लिअरंस!

(अवांतर, सिटीची काटछाट न्व्हे, तर ब्रियोला डिक्कि जोडलीय)

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2020 - 10:04 am | अनिरुद्ध.वैद्य

जबर आहे! घेऊन टाका!

एक्सेंट काढल्यावर मी ती किंवा सेल्टॉस (बजेट मध्ये बसली तर) घ्यायच्या विचारात आहे!!

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jul 2020 - 11:16 am | लॉरी टांगटूंगकर

अभिनंदन आणि शुभेच्छा!
बहुतांश गाड्यांची चर्चा झालेली असतांना नविन लॉन्च झालेली ऑरा, आणि जुलै मधला लाँच पुढे गेलीली आय २० मिस झालेली दिसते आहे. आय २० एक दोन महीन्यात लॉन्च होईल असे दिसते आहे. सुंदर गाडी. ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी च्या ऐवेजी सीव्हीटी अथवा डीसीटी बघणे.
बाकी नेक्सॉन अतिषय खतरनाक गाडी आहे.
दुकानात निर्ल्लज होउन डिस्काउंट घेणे. आत्ता सर्व ऑटो कंपन्या सेल्स नंबर कमी असल्याने प्रेशर मध्ये आहेत. जितक्या अ‍ॅक्सेसेरीज पदरात पाडता येतील त्या पाडणे. टाटा वाले शोरुम हॅन्डलींग चार्जेस च्या नावाखाली दहा एक हजार घेतात. ते घासाघीस करुन कमी करणे. शोरुम ने न ऐकल्यास कंपनीला मेल करणे. क्रिपा होनी चाहीये.
शोरुम मधील अ‍ॅक्सेसेरीज महाग असतात. त्या गळ्यात मारायचा जोरदार प्रयत्न होईल. हाणून पाडणे. विमा ऑफ मार्केट कम्पेअर करणे. तिथे दोन पाच हजार कमी होउ शकतात. अ‍ॅन्टी रस्ट /टेफ्लॉन/ईतर कोटींग न घेणे. ते नवीन गाडीला कंपनीने देलेलं अस्तय. एक काही तरी वॉरंटी मध्ते पहील्या वर्षाचे किंवा पंधरा हजार कीमीचे ऑईल आम्ही देउ म्हणून काही तरी पैसे घेतात (गोल्ड किंवा एंजिन प्रोटेक्शन म्हणून) ते न घेणे. कारण ऑईल स्वस्त पडतं आणि त्यातून पहील्या वर्षात (दहा हजार किमी मध्ये ऑईल बदलावे लागत नाही.
थोडक्यात एक्स शो रुम सोडल्यास प्रत्येक पैशाचे कारण आणि वर्थ चेकवणे आणि ठरवणे. सर्विसिंग चे लोक वेगळे असतात त्यामुळे नंतरच्या रिलेशन वर याचा परिणाम होणार नाही.

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 11:48 am | सुबोध खरे

ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी च्या ऐवेजी सीव्हीटी अथवा डीसीटी बघणे.

ए एम टी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) हे सर्वात स्वस्त ट्रान्समिशन आहे आणि त्यात तुम्ही गियर बदलण्याऐवजी योग्य वेळेस कॉम्प्युटर गिअर बदलतो.

यामुळे गाडी तुम्हाला पाहिजे तेंव्हा आणि तेवढ्या पटकन वेग घेत नाही.

परंतु गाडीचे ऍव्हरेज हे मॅन्युअल गियर इतकेच( आणि आपले ड्रायव्हिंग खराब असेल तर आपल्यापेक्षा जास्त) मिळते.

सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) यात आपल्याला गिअर बदलल्याचे धक्के अजिबात बसत नाहीत आणि गाडी स्मूथ पणे वेग घेते.

तुलनाच करायची असेल तर मोटार सायकल चे ट्रान्समिशन आणि ऍक्टिव्हा चे ट्रान्समिशन पहा.

फरक हा आहे कि मोटारीला सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) बसवले तर इंजिनची शक्ती जास्त असावी लागते त्यामुळे त्याचे ऍव्हरेज कमी येते. ( त्याच सीसी च्या गाडीत सी व्ही टी ऍव्हरेज जास्त मिळते) आणि सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) उत्पादन खर्च जास्त असल्याने गाडीची किंमत महाग असते शिवाय देखभालीचा खर्च जास्त येतो.

परंतु गाडी अतिशय मुलायम चालते

डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) यात गिअर पटकन बदलतो आणि यामुळे गाडीला वेग पटकन मिळतो पण गाडी ऍव्हरेज मध्ये मार खाते आणि अर्थात उत्पादन खर्च जास्त असल्याने गाडीची किंमत महाग असते शिवाय देखभालीचा खर्च जास्त येतो.

शोरुम मधील अ‍ॅक्सेसेरीज महाग असतात. त्या गळ्यात मारायचा जोरदार प्रयत्न होईल. हाणून पाडणे.
एक्स शो रुम सोडल्यास प्रत्येक पैशाचे कारण आणि वर्थ चेकवणे आणि ठरवणे. सर्विसिंग चे लोक वेगळे असतात त्यामुळे नंतरच्या रिलेशन वर याचा परिणाम होणार नाही.

बाडीस

चौकस२१२'s picture

28 Jul 2020 - 2:46 pm | चौकस२१२

एक कल्पना ( भारतात उपलब्ध आहे कि नाही माहित नाही, नसल्यास दुर्लक्ष करा )
नवी कोरी किंवा दुसऱ्या हाती गाडी घेण्यापेक्षा
शोरूम ची जी दाखवण्यासाठी वाहने ठेवलेली असतात ती पहिल्या वर्षात ते कमी किमतीत विकतात !
अर्थात त्यात उरलेली वॉरंटी जशीच्या तशी जिवंत राहते का ? हे सर्वात महत्वाचे आहे ..
बघा विचारा .. मला तरी एकदा याचा चांगलं अनुभ आलं आहे , ५ पैकि चार वर्षाची आणि ट्रान्समिश् न ची १० पैकी ९ वर्षाची वॉरंटी ( मित्सुबिशी ३८०) मिळाली आणि पैसे चांगलेच वाचले

कपिलमुनी's picture

29 Jul 2020 - 12:51 am | कपिलमुनी

भारतात हा पर्याय उपलब्ध आहे पण टेस्ट राईड साठी चालवणारे सगळेच उत्तम सारथी नसतात त्यामुळे क्लच आणि गियर बॉक्स चे काम निघते.

अनय सोलापूरकर's picture

30 Jul 2020 - 12:29 pm | अनय सोलापूरकर

नमस्कार ,
आपल्या निवडक गाड्या उत्तम आहेत.
सब ४ मीटर एस यु वी सेगमेन्टचा नक्की विचार करा, असे सुचवेन.

ओटोमेटिक पण पहा. शहरातील गर्दी किन्वा रिकामा हायवे , ड्राईव आरामदाई एकदम. !!
मी ग्र्यान्ड आय १० पेट्रोल - स्पोर्ट्स ओटोमेटिक २०१७ सप्टेम्बर पासून वापरत आहे. ओन रोड रु.७ लाख.
२ एअर ब्याग्स, उत्तम सस्पेन्शन. [पण ए.बी.एस. नाही, आत्ता च्या मोडेलचे स्पेसिफिकेशन्स माहिती नाही]
पुणे शहर तसेच , पुणे सोलापूर हायवे, लातूर , सातारा, गोवा, कर्णाटकात शिवमोग्गा पर्यन्त मित्र व कुटुम्बासोबत प्रवास झाला , एकूण २१+ ह. कि.मी.
ओटोमेटीक मुळे थकवा कमी जाणवतो. माझा अनुभव. सलग १२ तास असा ३ वेळा प्रवास केला आहे.
साधारण - एसी - १४-१६ कि.मी प्रती लीटर / विना एसी - १५-१७ कि.मी प्रती लीटर
सरविसिन्ग चार्जेस पण कमी आहेत.
नवीन कार साठी शुभेछा.

शुद्ध् लेखन चुकान्साठी माफी असावी.
` अनय'

प्रविन ९'s picture

31 Jul 2020 - 4:53 am | प्रविन ९

मी Eco Sport Titanium ही घेण्याचा विचार करत आहे. स्विफ्ट डिझायर गेल्या महिन्यात विकली आणि मारुती ने सर्व डिझेल गाड्या बंद केल्याने Brezza कॅन्सल. महिन्द्रा XUV 300 W6 Diesel च्या तुलनेत Eco Sport Titanium उजवी वाटतेय.

Alloy Wheel, Inbuilt GPS, Projector Headlamp, Fog Lamp, DRL, Auto ORVM, Boot Space, Ground clearance, Key less entry, Dual tone Interior etc. याबाबत मला फरक जाणवला.

प्रविन ९'s picture

31 Jul 2020 - 4:59 am | प्रविन ९

Xuv 300 W6 आणि Ecosport Titanium दोन्ही गाड्यांची किंमतीत With Accessories मला 50,000 फरक जाणवला. Ecosport Titanium जास्त फिचर्स देत आहे. कोणाला या गाडी चा अनुभव असेल तर कृपया मार्गदर्शन करावे

कांदा लिंबू's picture

3 Aug 2020 - 5:07 pm | कांदा लिंबू

मिपाकरांच्या बहुमूल्य मार्गदर्शनानंतर, आज टाटा नेक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल ग्रे रंग बुक केली.‌

पुढचं अपडेट कार हातात आल्यावर करीन.

शाम भागवत's picture

3 Aug 2020 - 5:20 pm | शाम भागवत

अभिनंदन!

अभ्या..'s picture

3 Aug 2020 - 5:22 pm | अभ्या..

मस्त. आवडला चॉइस.

गणेशा's picture

3 Aug 2020 - 8:26 pm | गणेशा

अभिनंदन..

कांदा लिंबू's picture

3 Aug 2020 - 7:10 pm | कांदा लिंबू

रच्याक, कारचा इन्शुरन्स अजून ठरायचा आहे.

एक वर्ष पूर्ण अधिक दोन वर्ष थर्डपार्टी साठी, डीलर चाळीस हजार वजा दहा हजार डिस्काउंट = तीस हजार असे म्हणत आहे.
त्याचसाठी, पॉलिसी बाजार वर तेवीस हजार असा आहे.

नवीन वाहनासाठी, डीलरव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कुणी इन्शुरन्स घेतला आहे का?

माझा सध्याचा हिशेब

कारची किंमत: ७७००००
आरटीई: ९४०५०
लॉजिस्टिक: ९५००
हायपोथिकेशन: १५००
फास्टटॅग: ५००
------------------
एकूण: ८७५५५०
वजा : ९५०० सूट
-----------------
निव्वळ एकूण: ८६६०५०
मोफत अक्सेसरी: १००००

याशिवाय-
इन्शुरन्स: सुमारे २३०००

अंतिम एकूण सुमारे: ८८९०५०

कपिलमुनी's picture

4 Aug 2020 - 1:16 am | कपिलमुनी

सात लाख ते नऊ लाख बजेट हाइक झालि

सुबोध खरे's picture

4 Aug 2020 - 10:17 am | सुबोध खरे

होऊ द्या खर्च.

गाडी फारच छान आणि आरामशीर आहे. निदान ७ वर्षे तरी चिंता नाही.

शिवाय पंचतारांकित सुरक्षा आहे.

गाडी हातात आली कि पहा. चालवण्याचे काय सुख आहे ते.

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2020 - 10:49 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन, कांदा लिंबूसाहेब ! आता होऊ द्या जोरदार आउटींग, टाटा नेक्सन संगे !
पुणे, पिंचिंवाडीत आला तर आम्हाला राईड द्यायची विसरू नकात !

आता आय डी बदलुन कांदा नेक्सन असं करायला हरकत नाही :-)

कांदा लिंबू's picture

21 Sep 2020 - 5:32 am | कांदा लिंबू

दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी काल टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल कार हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन.

डॉ. खरे, श्री. विटेकर आणि अभ्याशेठ यांनी फोनवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचे आणि सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

- कांदा लिंबू

सुबोध खरे's picture

21 Sep 2020 - 9:51 am | सुबोध खरे

उत्तम.

पंच तारांकित गाडी हातात आली.

त्यातील म्युझिक सिस्टीम अत्युत्कृष्ट आहे.

अभिनंदन

कानडाऊ योगेशु's picture

21 Sep 2020 - 10:09 pm | कानडाऊ योगेशु

अभिनंदन कांदा लिंबु!

आता मी ही नवीन कार घ्यायचा विचार करतोय.
नुकतीच लॉन्च झालेली किया सॉनेट कशी आहे?
मार्कॅटींग तर जबरदस्त चालु आहे. २० लाखाच्या गाडीचे फिचर्स १० लाखात अशी मार्केटींग स्टेटमेंट वाचनात आले.
घ्यावी का?

कपिलमुनी's picture

22 Sep 2020 - 12:10 am | कपिलमुनी

१० लाखात येणारी ८३ पी एस ची अंडर पॉवर वाटली . १.० टर्बो ची किंमत ११ च्या आस्पास आहे

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2020 - 8:05 pm | चौथा कोनाडा

कांदा लिंबूजी, टाटा निक्सन हाताt आली. अभिनंदन !

सेरू०९२७'s picture

1 Oct 2020 - 10:36 am | सेरू०९२७

Medium sized Automatic transmission असलेली सध्या चांगली फॅमिली कार कोणती?

सुबोध खरे's picture

1 Oct 2020 - 11:06 am | सुबोध खरे
सेरू०९२७'s picture

1 Oct 2020 - 11:14 am | सेरू०९२७

Thanks!

सेरू०९२७'s picture

3 Oct 2020 - 2:17 pm | सेरू०९२७

Hyundai Grand I-10 NIOS Magna (Corporate) ही कार कशी आहे?

कानडाऊ योगेशु's picture

30 Nov 2020 - 11:36 pm | कानडाऊ योगेशु

@कांदा लिंबु
गाडी घेऊन महिना झाला. रिव्यु लिहिणार होतात त्याची आठवण करुन देतो.

मी ही गेले कित्येक दिवस कार घ्यायचा विचार करत आहे पण काहीनाकाही कारणाने निर्णय घेणे पुढे जात आहे.
माझे मत अल्ट्रोझ्/टियागो/टिगोर आणि अगदीच जास्त झाले तर नेक्सॉन ह्या टाटा च्या गाड्याकडे झुकतेय पण कुटुंबाला सनरूफ हवे आहे आणि कार ऑटोमॅटीकच हवी आहे त्यामुळे अल्ट्रॉझचा पर्याय रद्द झाला.
सेदान च्या ऐवजी कॉम्पॅक्ट एस.यु.वी घेण्याकडे जास्त कल आहे.
वेन्यु,क्रेटा,एक्स.यु.वी ३००,नेक्सॉन आणि ब्रेझा ह्या सर्वांची टेस्ट ड्राईव्ज घेऊन झाल्यात. पण निर्णय होत नाही.
माँ का आशिर्वाद आणि जेब मे कुछ पैसे लेकर एम.जी हेक्टर ही पाहुन आलो. भन्नाट गाडी आहे. (किंमत २० + लाख)
क्रेटा घेण्याचा विचार करणार्यांनी हा पर्याय ही विचारात घ्यायला हरकत नाही.
पण बजेट १४ लाख क्रॉस झाले तर पाच आसनी गाडी घेणे महागडे वाटते.

सुबोध खरे's picture

1 Dec 2020 - 10:02 am | सुबोध खरे

सन रूफ हे गॅलरी गिमिक आहे निदान भारतात तरी.

कारण गाडीत बसून ऊन खाता यावे हा हेतू भारतात अजिबात उपयोगी नाही. भारतात बहुसंख्य ठिकाणी वर्षात ९ महिने तरी ऊन असते आणि त्यातील ६ महिने भाजून टाकणारे. त्यासाठी बऱ्याच गाड्या भरपूर पैसे लावतात.

अलास्का किंवा उत्तर युरोपीय देशांसाठी हि सुविधा उपयुक्त आहे

"सौना" या सुखसोयीसाठी भारतात सोफिस्टिकेटेड माणसे भरपूर पैसे देतात तसेच आहे.

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2020 - 11:35 am | चौथा कोनाडा

अगदी खरे !

शहरात शायनिंग करण्यासाठी उनछ्त उघडून एसीतून बाहेर डोकावून आनंदात पोल्युषन खात आनंदी होतात ते पाहून हसायला येते.

मराठी_माणूस's picture

1 Dec 2020 - 11:45 am | मराठी_माणूस

बाहेर डोकावण्याचा भारतात एक धोका म्हणजे पतंगाचा मांजा

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2020 - 12:12 pm | चौथा कोनाडा

+१

🙂

या बरोबर आणखी बरेच धोके आहेत !

कपिलमुनी's picture

1 Dec 2020 - 11:23 am | कपिलमुनी

नेक्सॉन एक्स एम एस 10 लाख
सोनेट 12 लाख
या दोन गाड्या सन रुफ सहीत उत्तम आहेत .

श्रीरंग_जोशी's picture

1 Dec 2020 - 1:50 am | श्रीरंग_जोशी

भारतात इलेक्ट्रिक कार किती प्रमाणात दिसू लागल्या आहेत? अमेरिकेत काहे वर्षांत त्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. भारतीय मूळ असणार्‍या अमेरिकनांमध्येही हे प्रमाण उल्लेखनीयपणे वाढत आहे.

मी जिथे राहतो तिथे वर्षातले अनेक महिने खूप थंड वातावरण असल्याने त्या काळात इलेक्ट्रिक कार्च एका चार्जवर चालण्याची क्षमता जवळपास निम्म्याने कमी होते. असे असूनही गेल्या दोन-तीन वर्षात इलेक्ट्रिक कार्सची संख्या वाढताना दिसत आहे.

चौकस२१२'s picture

24 Nov 2021 - 5:17 pm | चौकस२१२

थंड वातावरण असल्याने त्या काळात इलेक्ट्रिक कार्च एका चार्जवर चालण्याची क्षमता जवळपास निम्म्याने कमी होते. !

असे होते हे माहिती नवहते ! किती असते तापमान? आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो! आणि कोणती गाडी ? टेस्ला ?
अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत पण पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ?

चौकस२१२'s picture

24 Nov 2021 - 5:20 pm | चौकस२१२

थंड वातावरण असल्याने त्या काळात इलेक्ट्रिक कार्च एका चार्जवर चालण्याची क्षमता जवळपास निम्म्याने कमी होते. !

असे होते हे माहिती नवहते ! किती असते तापमान? आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो! आणि कोणती गाडी ? टेस्ला ?
अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत पण पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ?

श्रीरंग_जोशी's picture

29 Nov 2021 - 10:03 am | श्रीरंग_जोशी

मी राहतो ते राज्य (मिनेसोटा) हिवाळ्यात अलास्कानंतर सर्वाधिक थंड असणारे अमेरिकेतले राज्य आहे. जानेवारी फेब्रुवारीत उणे २०~२५ फॅ काही वेळा असते. Polar Vortex आल्यास उणे ५० फॅ तापमान देखील मी अनुभवलेले आहे. गेल्या फेब्रुवारीत एका आठवड्यात कमाल तापमान १ फॅ होते.

अतिशीत तापमानांत नव्या कार्सचे अथवा त्यांच्या आगामी मॉडेल्सचे परिक्षण करणार्‍या टेस्टिंग फॅसिलिटीज मिनेसोटामधे आहेत.

मी आजवर स्वतः इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचारही मनात न आणल्याने आजवर फारशी माहिती काढली नाही. इलेकट्रीक कार बाळगणार्‍या परिचित व हापिसातल्या सहकर्‍यांकडून जे कळले ते म्हणजे मिनेसोटात राहणार्‍यांनी इलेक्ट्रीक कार बाळगायची असली तरी त्याखेरीज (स्वतःजवळ) पारंपारिक इंधनाची कार किंवा किमान हायब्रीड कार असावीच लागते.

>> आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो!
नेमके माहित नाही पण अमेरिकेत उत्पादन किंवा सेवा विकताना (अन जाहिरातीतही) शक्य होईल तेवढी पारदर्शकता पाळली जाते. टिव्हीवरच्या औषधांच्या जाहिरातीत ते कुणी घ्यावे पेक्षा कुणी घेऊ नये व शक्य असणारे साइड इफेक्ट्स यावर जाहिरातीचा जवळपास निम्मा वेळ खर्च होतो :-) .
>> अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत
हा निष्कर्ष कुठल्या देशातल्या किमतींशी तुलना करुन काढला आहे?

>> पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ?
पूर्ण इलेक्ट्रिक कार किमान दिड किंवा बहुतेकवेळा बजेट कारच्या दुपटीहून अधिक किमतीला असतात असे माझे (ढोबळ) निरीक्षण आहे. अनेक अमेरिकन मिपाकर टेस्ला कार्स बाळगत असणार त्यापैकी कुणी याबाबत नेमकी माहिती देऊ शकेल.

बायनरी डिजीट्स आठवले... :)

चौकस२१२'s picture

30 Nov 2021 - 5:41 am | चौकस२१२

>> अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत
हा निष्कर्ष कुठल्या देशातल्या किमतींशी तुलना करुन काढला आहे?

ऑस्ट्रेलिया ,
आता जवळ जवळ सर्व गाड्या येथे आयात होतात पूर्वी फोर्ड, टोयोटा होल्डन ( जि एम चा स्थानिक ब्रँड) आणि निसान बनयायच्या
सर्व बंद पडल्या ... सुझुकी च्या काही गाड्या भारतातंतून येतात !
अमेरिकेच्या २/३ भूभाग आणि लोकसांख्या फक्त २६ मिलियन .. काय गाड्या बनवणार डोंबल ! काही लोक तर म्हनतात आता घ्या सामावून अमेरिकेचे ५२ वे राज्य ( देशद्रोही लेकाचे !) सोबत न्यू झीलंड फुकट देतो ...!

श्रीरंग_जोशी's picture

30 Nov 2021 - 8:54 am | श्रीरंग_जोशी

अमेरिकेत सध्या नव्या कारची सरासरी किंमत ४०,८५७ डॉलर्स एवढी दिसत आहे जी ऑस्ट्रेलियन चलनात ५७,११८ डॉलर्स (या क्षणी असणार्‍या विनिमय दरानुसार) इतकी येत आहे.
अमेरिका क्षेत्रफळाने मोठा वाटत असला तरी पूर्ण वर्षभर सहजपणे राहण्यासारखा भूभाग एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत बराच मोठा आहे.
अमेरिकेत भरपूर खपणार्‍या कार ब्रॅन्ड्सचे पार्टस परदेशातून आयात केले जातात (जपान, द. कोरिया इत्यादी).

सुबोध खरे's picture

1 Dec 2020 - 10:02 am | सुबोध खरे

भारतात इलेक्ट्रिक कार किती प्रमाणात दिसू लागल्या आहेत
अगदी मुंबईतही नगण्य

श्रीरंग_जोशी's picture

1 Dec 2020 - 10:38 am | श्रीरंग_जोशी

उत्तरासाठी धन्यवाद. अमेरिकेतही इलेक्ट्रिक कार खरेदी करणारे किमान मध्यम-मध्यम किंवा उच्च मध्यम आर्थिक गटात मोडतात असे माझे निरीक्षण आहे.

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2020 - 11:40 am | चौथा कोनाडा

+१
सध्याच्या नजिकच्या काळात भारतातही या वर्गाला वीजगाडी घेणे परवडणारे असेल असे वाटत नाही.

सुबोध खरे's picture

1 Dec 2020 - 12:19 pm | सुबोध खरे

वीजगाडी घेणे परवडणारे नाही पेक्षा चार्जिंग स्टेशन्स जोवर सहज उपलब्ध होत नाहीत तोवर लोक घेणार नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही.

टिगॊर ऑटोमॅटिक टॉप मोडेल साडे अकरा लाखात मिळते. त्यामुळे विकत घ्यायला परवडणार नाही असे नाही.

https://www.cardekho.com/tata/tigor-ev/price-in-pune

प्रसाद_१९८२'s picture

1 Dec 2020 - 12:28 pm | प्रसाद_१९८२

दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही.
--------

हिरो लेक्ट्रो या इलेक्ट्रिक सायकलची किंमत सध्या २२,००० रु. आहे.
तीच्या बॅटरीचे आयुष्य ५०० Charging Cycle आहे. बॅटरी बदली करायची तर तीचीच किंमत १२,००० रु. आहे. आता एका २२००० रु.च्या सायकलला इतका खर्च येतो तर ईलेक्ट्रिक कारला कीती खर्च येईल याचा विचार करावा लागेल.

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2020 - 2:10 pm | चौथा कोनाडा

एकंदरीत हे सर्व प्रकरणच खर्चिक आणि गैरसोयीचं असणार आहे बराच काळ !
.... आणि बॅटरी डिस्पोझलचं यंत्रणा खरंच नीट काम करणार हा मोठा प्रश्न आहे. हजारोंनी जुनाट कचरा वाहने जागा अडवून सडताहेत ... !

मला वाटत इतकी देखील गैरसोय होणार नाही.
लवकरच पेट्रोल आणि डिझेल ऐवजी लोक CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देतील. कंपनी मध्ये 4 नवीन गाड्या आलेत as a cab म्हणून. कधी बसण्याचा योग नाही आला पण इलेक्ट्रिक बस मध्ये प्रवास केलाय.
एकदम मस्का चालत होती बस. कोणातही डिस्टर्बन्स नाही आणि आवाज पण नाही. एकदम स्मूथ वाटली.

सरकारने चार्जिंग स्टेशन्स अव्हेलेबल केल्यास लोक इलेक्ट्रिक कार्स नक्की घेतील असे वाटते.

बाकी तांत्रिक बाबी बद्दल अनुभवीच सांगू शकतील.

शाम भागवत's picture

2 Dec 2020 - 11:07 am | शाम भागवत

सरकारने चार्जिंग स्टेशन्स अव्हेलेबल केल्यास लोक इलेक्ट्रिक कार्स नक्की घेतील असे वाटते

यासाठी पावर ग्रिड व टाटा पॉवर एकत्र येत आहेत, अस ऐकलं होतं

सुबोध खरे's picture

2 Dec 2020 - 12:13 pm | सुबोध खरे

इलेकट्रीक कार हेच भविष्य आहे यात शंकाच नाही.

आताच टाटाची टिगोर एका रिचार्ज मध्ये २१३ किमी जाते. म्हणजेच तुलनात्मक रित्या आज १५ ते १८ लिटर पेट्रोलची टाकी असल्यासारखे आहे. टिगॊर १५ अँपिअर च्या प्लग वर रिचार्ज होऊ शकते.

याच्या बॅटरीची किंमत १०० $ / KWH म्हणजे साधारण १ लाख ६० हजार रुपये इतकी असावी असा अंदाज आहे. आणि १० वर्षांपूर्वी याच बॅटरीची किंमत १००० $/kwh होती.

टेस्ला रोडस्टर गाडीचा पल्ला आताच १००० किमी जाण्याचा आहे म्हणजेच भविष्यात इलेक्ट्रिक कारचा पल्ला पेट्रोल कार पेक्षा जास्त असेलच

https://www.tesla.com/roadster

The drivetrain in an ICE vehicle contains 2,000+ moving parts typically, whereas the drivetrain in an EV contains around 20.
म्हणजेच एकदा गाडी विकत घेतली कि त्याची सर्व्हिस करण्याचा कालावधी बराच लांब असेल. शिवाय स्पार्क प्लेग खराब झाला, टाकी गळू लागली, पेट्रोल चोरीला गेलं, PUC करायचं राहिलं, एक्झॉस्ट पाईपला भोक पडलं त्यामुळे आवाज फार होतो अशा असंख्य बारीक बारीक कटकटीपासून मुक्तता असेल.

Contrary to what many believe, the batteries in electric vehicles don't degrade over time (or over miles/kilometers driven either). The graph of the battery capacity of Tesla Model S/X vehicles shows that after driving 270,000km (roughly 168,000 miles), the batteries still had 91% of their original capacity... the bottom line is that the batteries lose about 1% of capacity every 30,000km

चौकस२१२'s picture

24 Nov 2021 - 5:31 pm | चौकस२१२

हे अजुनहि हे अजूनही बऱ्याच देशात दिवास्वप्नं आहे खरे कारण चार्जिंग स्टेशन ,, अगदी इंच अन इंच जिथे मापलेले आहे त्या सिंगापुर मध्ये सुद्धा विजेवर चालणाऱ्या गाड्या एवढया सर्वत्र नाहीत!

कांदा लिंबू's picture

5 Apr 2021 - 9:22 am | कांदा लिंबू

उशिरा का होईना, पण पुरेश्या वापरानंतर हा रिव्यू लिहिला आहे.

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

माझ्या एका मित्राचा टाटा पंच Accomplished AMT घेण्याचा विचार आहे. परवा आम्ही टेस्ट राइड घेतली. मी मध्यम रहदारीच्या रस्त्यावर चालवली. पाच प्रवासी असताना सिटी मोडवर टाटा पंच बराच चांगला पिकअप घेते. पुढल्या सीट्स अगदी आरामशीर आहेत, मागच्या सीट्सना लेगरूम थोडी कमी वाटते. अर्थात ही निरीक्षणे, रस्त्यावरची केवळ पाच -सात किमी टेस्ट राईड आणि शोरूममधील अर्धा-एक तास पाहणी यावर आधारली आहेत.

टाटा पंच विषयी सल्ला / मत / अहवाल याबद्धल मिपाकरांचे आभार.

टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला टेस्ट ड्राइव्ह घेतली आणि लगेच बुक केली आणि १२ नोव्हेंबर ला हातात आली. मधले variant घेतले- ऍडव्हेंचर. डिलिव्हरी घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी २५० किमी लॉन्ग ड्राइव्ह झाली.
आधीची गाडी सँट्रो झिंग आहे आणि १७ वर्षे रनिंग होऊनही उत्तम आहे आणि त्यांच्या "sheer driving pleasure" ह्या ब्रीदवाक्यास पूर्णपणे न्याय देते.
नवीन गाडीत आवडलेले फीचर्स म्हणजे ड्रायव्हर सीट वरून मिळणारी उत्तम व्हिझिबिलिटी, अप्रतिम सस्पेन्शन, मुबलक ग्राउंड क्लीअरंस आणि सुंदर साऊंड सिस्टिम . बऱ्याचदा आई वडील आणि आम्ही दोघे असा प्रवास करत असल्याने ३६० लि ची बूट स्पेस खूप महत्वाचा फॅक्टर ठरला आणि मागे बसणाऱ्यांसाठी ऐसपैस लेगरूम आणि आरामदायी सीट्स ह्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नाही. सर्वात महत्वाचे पंचतारांकित सुरक्षा ! गाडीचा दणकट पणा अक्षरशः जाणवतो !

एक थोडी खटकणारी बाब म्हणजे गिअर शिफ्टिंग ह्युंडाई च्या तुलनेत मुलायम नाही ! कदाचित पहिल्या सर्व्हिसिंग नंतर ते सुधारेल अशी आशा आहे !

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2021 - 6:18 pm | चौथा कोनाडा

उत्तम परीक्षण, उपयुक्त परीक्षण !

तर्कवादी's picture

24 Nov 2021 - 7:31 pm | तर्कवादी

एक थोडी खटकणारी बाब म्हणजे गिअर शिफ्टिंग ह्युंडाई च्या तुलनेत मुलायम नाही ! कदाचित पहिल्या सर्व्हिसिंग नंतर ते सुधारेल अशी आशा आहे

बरोबर .. पहिल्या सर्विसिंगच्या वेळी सर्विस सेंटरला सांगा त्यानंतर सुधरेल.
पेट्रोल आहे की डिजेल ?

पेट्रोल आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन घेतले !
आणि कांदा लिंबू ह्यांचे हा धागा काढल्याबद्दल विशेष आभार ! दिग्गज मंडळींची मतं कळाली.

एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णी यांनीच घेतलेली टाटा मोटर्स इआरसीचे आनंद कुलकर्णी यांची देखील पहावीच अशी सुंदर मुलाखत यू ट्यूबवर आहे (/ होती, आता शोधले तर सापडली नाही)

जेम्स वांड's picture

25 Nov 2021 - 12:15 pm | जेम्स वांड

मध्ये डिझेल कार घ्यायची आहे, काहीतरी सुचवा की मंडळी

@ कपिलमुनी @डॉ. सुबोध खरे आपणांकडून जास्त अपेक्षा आहेत बघा चांगल्या सल्ल्याच्या.

सुबोध खरे's picture

25 Nov 2021 - 12:48 pm | सुबोध खरे

स्विफ्ट / स्विफ्ट डिझायर घ्या. याचे १.३ लिटर DDIS फियाटचे CRDI इंजिन अतिशय उत्तम आहे आणि ३-४ लाख किमी सुद्धा चालते. डिझायर ची डिकी/ बूट प्रशस्त आहे.

५० ते ६० हजार किमी पेक्षा जास्त चालली गाडी शक्यतो घेऊ नका कारण त्यानंतर बारीक बारीक काम निघते.

मारुती ट्रू व्हॅल्यू कडून घेतल्यास आपल्याला ८-१० % महाग पडेल. परंतु १ वर्षाची वॉरंटी मिळते आणि गाड्या नीट पारखून घेतलेल्या असतात.

टाटा च्या जुन्या गाड्या तेवढ्या चांगल्या राहत नाहीत.

ह्युंदाईचे सुटे भाग फार महाग आहेत त्यामुळे सेकण्ड हॅन्ड गाडी शेवटी महाग पडते.

कपिलमुनी's picture

25 Nov 2021 - 2:49 pm | कपिलमुनी

सेकंड हॅन्ड डिझेल हा निर्णय का घेतला आहे?

सध्या डीझेल आणि पेट्रोलच्या किंमतीमध्ये फार फरक नाही.

माझ्या मते सेकंडहॅन्ड गाडी घ्यायची असेल तर पेट्रोल घ्यावी.

डिझेल गाडीचे रनिंग जास्त झालेले असते. 15 वर्षांनंतर रिन्यू होत नाही. इन्शुरन्स ,मेंटनन्स, सर्व्हीस कॉस्ट तुलनेने जास्त असते.

गाड़ी घेताना लाखभर रुपये जास्त द्यावे लागतात.

5 वर्षांहून कमी वय आणि 50,000 पेक्षा कमी रनिंग असलेली गाडी डिझेल मध्ये मिळणे अवघड आहे.
याच रेंज मध्ये पेट्रोल मध्ये खूप उत्तम ऑप्शन असतात.

तरीही डिझेल हवी असा निर्णय असल्यास स्विफ्ट , स्विफ्ट डिझायर, ब्रेझ्झा , एस क्रॉस, नेक्सॉन, टोयोटा इटीऑस यांची डिझेल इंजिने उत्तम आहेत.

सध्या फोर्ड ने प्रोडक्शन बंद केले आहे, त्यामुळे त्यांची मॉडेल स्वस्तात आहेत पण स्पेयर चा प्रॉब्लेम येउ शकतो.

मारुतीने डिझेल इंजिन बंद केलीं आहेत त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला गाडी विकायची असल्यास त्याची किंमत कमी येऊ शकते.

15 वर्षा नंतर गाडी स्क्रॅप मध्ये जाणार हे ध्यानात ठेवून डिझेल गाडी घ्या.

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

+ १

१०१.९९% सहमत !

डिझेलपेक्षा सीएनजी हा पर्याय जास्त किफायतशीर असेल !

कपिलमुनी's picture

29 Nov 2021 - 3:53 pm | कपिलमुनी

नेक्सॉन घेण्यापूर्वी A पिलर चा इशू बघून घ्यावा.

शिवाय रिअर विन्डो मधील दृष्यमानता कमी आहे.

कांदा लिंबू's picture

7 Feb 2022 - 6:50 pm | कांदा लिंबू

A पिलर चा इशू

सहमत.

निक्सनमधला A पिलर हा बराच बोजड आणि उजवीकडे-पुढे पाहण्यात अडथळा आणणारा आहे. (उजवीकडचा आरसाही तसाच आहे.) सवय नसणाऱ्यांना क्वचित दुर्दैवी प्रसंगी अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आपल्या उजव्या लेनमध्ये १५-२० फूट पुढे असणारा दुचाकीस्वार, पिलर आणि आरश्यामुळे जवळजवळ पूर्णतः झाकला जातो, आणि तो दुचाकीस्वार एकदम आपल्या लेनमध्ये आला तर आपली तारांबळ उडू शकते. अर्थात सवयीने यावर सहज मात करता येते.

निक्सनचे पिलर्स मोठे असण्याचे कारण म्हणजे ते (या सेगमेंटमधील) इतर कार्सच्या पिलर्सच्या तुलनेत खूप जास्त मजबूत आहेत.

डोक्यावरच्या आरशातून, मागची खिडकी तुलनेने लहान असल्यामुळे मागचा रास्ता थोडा कमी दिसतो, अर्थात रिव्हर्स करताना स्क्रीनवर पाहता येतेच.

याशिवाय, (कदाचित ग्राउंड क्लिअरन्स चांगला ठेवलेला असल्यामुळे) गाडीत प्रवेश करताना तुलनेने लहान दारांतून आत गेल्यासारखे वाटते.