गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ६ शहारा

@tul's picture
@tul in जनातलं, मनातलं
6 Jul 2020 - 11:52 am

प्रियांसी

impulsive attitude वाली वैगरे तू आहेस याचा अंदाज आहे मला
गेली दोन वर्ष तुझ्या नकळत तुझ्या प्रत्येक हालचालीकडे, तुझ्या उठण्या बसण्याकडे लक्ष होतं माझं.
पुरुष मूळचा शिकारी त्या शिकाऱ्या प्रमाणे तुझ्यावर पाळत होती. चांगल्या नजरेने हां :)
मला ते friday yoga day वैगरे ज्याम कंटाळवाणं वाटायचं पण त्या सेशनला तुला एकदा जाताना पाहीलं आणि मी ही येऊ लागलो. केवळ तुझ्यामुळे काही महिने स्वास्थ का खयाल झाला. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. त्या योग टीचर ने माझी शिकारी नजर ओळखली बहुदा आणि मी घाबरून बंदच केलं येणं.
तुझ्या बरोबर लंच टाइम पण adjust केलेला. लांब बसायचो एकटाच तुला बघत. माझं जेवण झालं तरी हात धुवायला उठायचो नाही. तू उठलीस की यायचो तुझ्या पाठी, पण तुला कधीच कळलं नाही. तसा घाबरून लांब राहायचो. ऑफिसच्या एका अवॉर्ड फंक्शनला मुद्दामहून तुझ्या बाजूची खुर्ची पटकावली. खूप राजकारण करून. तुला नसेल कळलं कारण तुमचा मोठा ग्रुप होता. तेव्हा तू मँगो कलरचा खूप छान ड्रेस घातला होतास. तुझ्या ओढणीच्या एका स्पर्शाने शहारून गेलो. तुझ्या बाजूला काही तास बसण्यात एक विलक्षण आनंद मिळाला शब्दात नाही सांगू शकणार. तुझ्या त्या परफ्युमचा सुंगंध अजूनही माझ्या नाकात घर करून आहे. तीच ती पिवळ्या ड्रेस मधली माझ्याशी आता बोलते आहे किती हे सुखावणारं आहे. जमिनी सोडून हलकंसं तरंगल्यासारखं वाटतं हल्ली. खडूस बॉस अमितही चांगला वाटू लागलाय.
कविता करायला लागलोय. direct शायरीच
थांब लिहितोच इथे.

कली का फूल होते
बदल की बरसात होते
दूध का मक्खन होते
शौक का जूनून होते
किसने देखा है
दुनिया देखे न देखे
मैंने चाहत का प्यार होते देखा है

प्रियांसी हे शब्द केवळ तुझ्याचसाठी
तुझा
फक्त तुझा

https://youtu.be/iYBPYui5Pxc

मुक्तकलेख