पाऊस

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
14 Jun 2020 - 4:15 pm

! पाऊस !

नभ आलं अंधारुन
वाराही झाला बेभान
टप टप टपोर्‍यांची
झाली भुमीवर पखरण,

जाणुनी भेटी लागी आस
भुमी कुशीत घेई त्यास
मृदगंध तो दरवळे
लागे एकमेका सहवास,

थेंब कुशीत हो निजला
रोपें अंकुर हो धरला
नवथर अवनीने
शेला हिरवाईचा हो ल्याला,

वीज कडाडुन घेई तान
रानी मोरपंखी कमान
ढवळ्या पवळ्याच्या हो घुंगरांसंगे
शेते नांगरु वेगानं,

आला पाऊस पाऊस
वारा सांगे दाहो दिशांनी
धान पेरा रे धान पेरा
बळीराजाच्या हो कानी
बळीराजाच्या हो कानी.

कविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

14 Jun 2020 - 4:23 pm | गणेशा

थेंब कुशीत हो निजला
रोपें अंकुर हो धरला
नवथर अवनीने
शेला हिरवाईचा हो ल्याला,

मस्त..

हा नविन format कसा केलाय?

प्रमोद देर्देकर's picture

14 Jun 2020 - 4:25 pm | प्रमोद देर्देकर

सगाची कृपा. कंकाच्या धाग्यावर पहा त्याने उदा. दिलंय

सतिश गावडे's picture

14 Jun 2020 - 4:36 pm | सतिश गावडे

आणि मी जे CSS box shadow चे उदाहरण दिले होते त्याचा कल्पक वापरही.

प्रचेतस's picture

14 Jun 2020 - 7:10 pm | प्रचेतस

मस्तच हो प्रमोदशेठ. खूप दिवसांनी लिहिलेत.
लिहीत राहा.

प्राची अश्विनी's picture

14 Jun 2020 - 7:17 pm | प्राची अश्विनी

सुरेख!

मन्या ऽ's picture

14 Jun 2020 - 9:30 pm | मन्या ऽ

आवडली..

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2020 - 8:18 am | ज्ञानोबाचे पैजार

हिरवा शेला ल्यालेली ही पाउस कविता आवडली
पैजारबुवा,

कौस्तुभ भोसले's picture

17 Jun 2020 - 4:19 pm | कौस्तुभ भोसले

मस्तच सुरेख

हिरव्या चौकटीत पावसाची कविता!!
आवडली. आइडिया आणि कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2020 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

वाह!