पाहता वळून मागे

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
14 Jun 2020 - 11:22 am

पाहता वळून मागे
दिसते गर्दी चूकांची
सोडून मोती ते सारे
केली वेचणी फुकांची

डोळे भरून हिरवा
नाही पाऊस पाहिला
आतून सूर लावत
नाही मल्हार गायिला

जोडून छंद नवखे
कुठे स्वानंद शोधला
अर्थार्जनात केवळ
तो मी आनंद शोधला

मी जाऊन मंदिरात
ना अहंकार सांडला
देऊन दान भक्तीचा
कसा बाजार मांडला

इवलेच पोट माझे
हे उशिराच कळाले
क्षण अनमोल सारे
ते हतातूनी गळाले

कविता

प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

21 Jun 2020 - 10:51 am | मन्या ऽ

छान! भावना पोचल्या..