DDLJ

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
6 Jun 2020 - 9:37 pm

#दिलवाले_दुल्हनिया_ले_जायेंगे

टीव्हीवर डीडीएलजे सुरु आहे. राज (शारक्या) नुकताच युरोप टूर वरून परतला आहे. आपण सिमरनच्या प्रेमात आहोत हे त्याला आता कन्फर्म झालंय. तो स्विमिंग पूलजवळ बसलाय. तेवढ्यात त्याचे वडील अनुपम खेर तिथे येतात. शारक्याच्या हातात 'बीयर'चा टिन देतात. आणि मी शेगावचं दर्शन घेऊन आल्यावर वडील ज्या कॅज्युअलतेने मला, "किती वेळ लागला बे दर्शनाले?" असं विचारायचे त्याच कॅज्युअलतेने ते शारक्याला विचारतात, "लडकी का नाम क्या है?"

हातात बीयरचा टिन आणून देणं वगैरे तर कहर आहे. आम्ही शेगावचा प्रसाद वडिलांच्या हातात देताना डाव्या हाताने दिला म्हणूनसुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत. मुळात दर्शनाला लागलेला वेळ विचारायचं कारण, चिरंजीव इतक्या वेळ कुठं शेण खात बसले होते हे जाणून घेणे हेच असायचं. इकडे पोरगा एक महिना युरोपात काय दिवे लावून आला वगैरे प्रश्न अनुपम खेरला अजिबात पडत नाही. पुढे मग अनुपमजी शारक्याला कुठल्याही परिस्थितीत सिमरनशी लग्न करायचं असं बजावून भारतात पाठवतात. 'मैने तुम्हे जिंदगीभर ये तुनतुना बजाने के लिये पैदा नही किया था' असंही सांगतात. तसा प्रेमविवाहाला वगैरे आमच्या घरात विरोध नव्हता. आता वडिलांच्या पोटी शारक्या जन्माला आला नाही ह्यात त्यांची काय चूक ! त्यामुळे कुठल्याच सिमरनने आम्हाला भाव दिला नाही हा भाग वेगळा. पण इथं सिच्युएशन वेगळी आहे हे लक्षात घ्या. सिमरनचं आपल्यावर प्रेम आहे ह्यावर शारक्या अजूनतरी कॉन्फिडन्ट नाहीये. अश्या परिस्थितीत,लंडन ते भटिंडा प्रवासखर्च लक्षात घेता, जिथं पोरीच्या मनात काय आहे हे माहिती नाहीये, तिथं आमच्या वडिलांनी काही आम्हाला "जाओ ,लेकर आओ मेरी बहू को" वगैरे म्हटलं नसतं भाऊ !! आणि 'आपल्या देशात काय कमी आहे का पोरींची! त्यातली कर एखादी पसंत' असा अत्यंत प्रॅक्टिकल सल्ला दिला असता.

पुढं अनुपम खेरसुद्धा शारक्याला मदत करायला भारतात येतात. आणि सूनमुख पाहिल्यावर त्यावर अभिप्राय देताना ते, "Excellent,Fantastic,Done!!" असं उदगारतात. माझ्या मते, ह्या प्रसंगातला बाप हा आदर्श बापाच्या व्याख्येतली जी प्रीमियम कॅटेगिरी असेल त्यात येतो. आपल्या इथले वडिल किमान मुलासमोर तरी मुलीविषयी मत देत नाही. बाकी मुलीचे वडिल,काका,मामा,भाऊ ह्यांच्याविषयी भलेही यथेच्छ चर्चा करतील. कारण लहानपणापासून ज्या मुलाला,"थोबाड बघितलं का आरश्यात?" हेच सुनावलं आहे त्याला लग्नासाठी मुलगी मिळते आहे हेच त्यांच्यासाठी मोठं यश असते. वडिलांनी मत दिलंच तर ते "जोडा शोभून दिसेल" ह्यापेक्षा वेगळं नसते. ह्यातला छुपा अर्थ, नगाला नग मिळाला ना...बस्स! असा असतो.

पुढे अनुपम खेर सिमरनला पळवून नेण्याचा सल्ला शारक्याला देतात. नव्हे, त्याच्यासाठी तिकीट वगैरे काढून स्वतः स्टेशनवर बॅग घेऊन उभे राहतात. एवढा मिलेनियर बाप अश्या प्रसंगी स्पेशल गाडी न करता भारतीय रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेनवर कसा काय अवलंबून राहतो हा एक प्रश्नच आहे म्हणा! पण असो! आता आमच्यासोबत घडलं जरी असतं तरी इथे आम्ही स्वकर्तृत्वाने माती खाल्ली असती. आमच्याकडे बघून अमरीश पुरीने,"जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी" तर नक्कीच म्हटले नसते.याउलट त्याने स्पेशल गाडी बोलावून आमची पाठवणी केली असती.

तसंही एका मुलीचा बाप झाल्यापासून, शारक्याकडे धावत जाणाऱ्या सिमरनचा हात पकडणाऱ्या बापाच्या भावना काय असतात ह्याचा थोडाबहुत अंदाज आला आहे. आजकाल हा प्रसंग पाहताना क्षणभर का होईना पण मी अमरीश पुरीच्याच बाजूने असतो. कारण,

बाप आखिर बाप होता है !

समाप्त

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

6 Jun 2020 - 10:07 pm | जव्हेरगंज

समाप्त? लगेच?

गोष्ट रंगात आली होती.. लिव्हा अजून!!

चिनार's picture

7 Jun 2020 - 8:26 pm | चिनार

लिवतो पुढचा भाग..
जव्हेर भाऊची विनंती म्हणजे आदेश आहे आपल्यासाठी!!

रुपी's picture

6 Jun 2020 - 10:31 pm | रुपी

हा.हा.. मस्तच.

खरंच अजून लिहायला हवे होते.

मन्या ऽ's picture

7 Jun 2020 - 6:46 pm | मन्या ऽ

DDLJ एकदा तरी बघावा म्हणते!

सौंदाळा's picture

7 Jun 2020 - 6:48 pm | सौंदाळा

हेच म्हणतो, लवकर संपवलेत
मस्त, तीन / चार भागांची सिरीज पाहिजे होती.

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2020 - 7:28 pm | संजय क्षीरसागर

इतकं सहज लिहीलंय, ते जाम आवडलं !

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2020 - 7:49 pm | टवाळ कार्टा

=))

रीडर's picture

7 Jun 2020 - 8:23 pm | रीडर

हाहा... खूप छान आणि खुसखुशीत :)

चांदणे संदीप's picture

7 Jun 2020 - 9:07 pm | चांदणे संदीप

अज्जून लिहा. वाचतोय.

सं - दी - प

चौकस२१२'s picture

8 Jun 2020 - 5:52 am | चौकस२१२

मस्त
"एवढा मिलेनियर बाप अश्या प्रसंगी स्पेशल गाडी न करता भारतीय रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेनवर कसा काय अवलंबून राहतो हा एक प्रश्नच आहे म्हणा!"

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2020 - 12:32 pm | चौथा कोनाडा

मस्त, आवडलं !
अजून मोठं भारी झालं असतं !

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jun 2020 - 1:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लैच शॉर्ट झाला आहे
हे म्हणजे समोर श्रीखंडाचे अख्खे पातेले भरुन ठेवलेले असताना त्यातली फक्त एक चारोळी खाल्ल्या सारखे वाटले
पैजारबुवा,

सिरुसेरि's picture

8 Jun 2020 - 3:26 pm | सिरुसेरि

डिडिएल्जे मधुन शाहरुख , काजोल यांच्याइतकाच भाव खाउन घेलेला कलाकार म्हण्जे अमरीश पुरी . कुठल्यातरी लेखात वाचलेली आठवण म्हणजे , या फिल्मपुर्वी , अमरीश पुरी यांच्या नातवंडांना त्यांच्या शाळेतील इतर मुले चिडवायची की " तेरा दद्दु तो हमेशा हिरोसे मार खाता है ." पण डिडिएल्जे गाजु लागल्यावर मग मात्र या नातवंडांना शाळेमधे आदराची वागणुक मिळु लागली .

अमरीश पुरी यांच्या निधनानंतर "घरातल्या प्रेमात हरवु लागलेल्या मुलींना नजरेच्या धाकात ठेवणारा परखड बाप गेला." अशी एक हेडलाईन आठवली .

तुमचे लेख नेहमीच मजेशीर, खुसखुशीत असतात. वर सगळ्यांनी म्हंटल्याप्रमाणे अजून लिहा ddlj वर खरंच !!!

तेव्हा DDLJ खूप आवडला होता
हम आपके है कौन आणि DDLJ साधारण एकाच वर्षी पुढे मागे रिलीज झाले होते
पण हम आपके है कौन फारच श्रीमंती थाटाचा वाटला होता आणि DDLJ जास्त आवडला होता
आत्ता बघताना बऱ्याच गोष्टी खटकतात
हिरोईन टू टायमिंग करणारी वाटू नये म्हणून त्या कुलजितचे पात्र खलनायकी केले आहे थोडे जेणेकरून राज चे hero असल्याचे ठसावे

रातराणी's picture

11 Jun 2020 - 11:27 am | रातराणी

मस्त लिहलंय एकदम! अजून लिहा.

चिगो's picture

11 Jun 2020 - 1:23 pm | चिगो

चिनारभाऊ, वाईच आटोपतं घेतलं की हो.. आणखी लिहावं, ही विनंती..

तो भडकमकर मास्तरांचा लेख आठवला, DDLJ वाचल्या-वाचल्या..