आले वादळ गेले वादळ, निसर्गाचं वादळ पुण्यात जाऊन हरवले !

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Jun 2020 - 8:47 pm
गाभा: 

मोठा गाजावाजा करत निसर्गाचे वादळ आज सकाळी मुरुडात दाखल झाले, कोकणाचे हाल झाले, मुंबईची नुसतीच हुल उठली पण मुंबईला जाणार्‍या वादळाची नंतर बातम्यांमधून जी दिशा हरवली ती उशीरा पर्यंत वादळ नेमके कोणत्या दिशेने गेले ते नीटसे कुणाला कळलेच नाही. नाही म्हणायला काही जण नासिक नासिक म्हणत होते कदाचित तिकडे ते पोहोचेलही पण मुरूड आणि नाशिकच्या मध्ये अजून काही आहे की नाही.

चक्रीवादळाने दोनदा सह्याद्री ओलांडून चक्रीचे साध्या वादळात अंशतः शमन झाले तरी वादळी स्थिती वादळी स्थिती असते. वादळाने दिशा बदललीच तर बदललेल्या दिशेकडच्या वाड्या वस्त्यांनाही काही पूर्वसूचना मार्गदर्शन मदत काही हवे की नको?

नाही म्हणायला सोशल मिडीयावर एखाद दुसर्‍या महाभागांनी वादळाची दिशा बदलून पिंपरी चिंचवडच्या उत्तरेकडून नाशिक कडे पुढे सरकेल अशी शक्यता वर्तवली पण त्याला हवामान खात्याचा दुजोरा नव्हता मी पाहिलेल्या बातम्यांमध्येही कुठे उल्लेख आढळला नाही. संध्याकाळी पाचा का पाऊणे पाचच्या हवामान खात्याच्या वेबसाईटवर दुपारी साडे तीन वाजता ते पुण्यापासून ४५ किमी उत्तर पश्चिमेला अक्षांश रेखांश ही दिलेले पण बातम्यांमध्ये पत्ता नव्हता ते अक्षांश रेखांश गूगल मॅपवर मुळशीच्या पलिकडे आणि लोणावळ्याच्या अलिकडे दिसत होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बातम्यांचा पत्ता नव्हता. म्हणजे आधुनिककाळातील माध्यमांच्या प्रभावा खाली वादळ मुंबईकडे चालले म्हणून पुणेकरांनी बिनधास्त रहायचे आणि मध्ययुगिन लोकांप्रमाणे जे काही वारे अनुभवायाचे त्या अनुभवाने पुणेकरांनी ठरवायचे की काय करायचे ! पुणेकर तसे टेकड्यांची कवचकुंडले घेऊन आलेले नशिबवान लोक आहेत आले वादळ गेले वादळ काय फरक पडतो म्हणा. (एखाद्या टेकडीवरील उडाले दोनचार पत्रे किंवा पडली दोनचार झाडे तर पुणेकरांचे आयुष्य तसे थांबत नाही) काही वेळाने पुण्यातील कर्वेरोडावर समुद्र आणि निसर्ग (रेस्टॉरंट) कसे शांत आहेत या बद्दलचे पुणेरी विनोद व्हॉट्स अ‍ॅपवर फिरावयास लागले. मोठा गाजावाजा करत निसर्गाचे वादळ आज सकाळी मुरुडात दाखल झाले, कोकणाचे हाल झाले, मुंबईची नुसतीच हुल उठली पण मुंबईला जाणार्‍या वादळाची नंतर बातम्यांमधून जी दिशा हरवली ती उशीरा पर्यंत वादळ नेमके कोणत्या दिशेने गेले ते नीटसे कुणाला कळलेच नाही. नाही म्हणायला काही जण नासिक नासिक म्हणत होते कदाचित तिकडे ते पोहोचेलही पण मुरूड आणि नाशिकच्या मध्ये अजून काही आहे की नाही.

चक्रीवादळाने दोनदा सह्याद्री ओलांडून चक्रीचे साध्या वादळात अंशतः शमन झाले तरी वादळी स्थिती वादळी स्थिती असते. वादळाने दिशा बदललीच तर बदललेल्या दिशेकडच्या वाड्या वस्त्यांनाही काही पूर्वसूचना मार्गदर्शन मदत काही हवे की नको?

नाही म्हणायला सोशल मिडीयावर एखाद दुसर्‍या महाभागांनी वादळाची दिशा बदलून पिंपरी चिंचवडच्या उत्तरेकडून नाशिक कडे पुढे सरकेल अशी शक्यता वर्तवली पण त्याला हवामान खात्याचा दुजोरा नव्हता मी पाहिलेल्या बातम्यांमध्येही कुठे उल्लेख आढळला नाही. संध्याकाळी पाचा का पाऊणे पाचच्या हवामान खात्याच्या वेबसाईटवर दुपारी साडे तीन वाजता ते पुण्यापासून ४५ किमी उत्तर पश्चिमेला अक्षांश रेखांश ही दिलेले पण बातम्यांमध्ये पत्ता नव्हता ते अक्षांश रेखांश गूगल मॅपवर मुळशीच्या पलिकडे आणि लोणावळ्याच्या अलिकडे दिसत होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बातम्यांचा पत्ता नव्हता. म्हणजे आधुनिककाळातील माध्यमांच्या प्रभावा खाली वादळ मुंबईकडे चालले म्हणून पुणेकरांनी बिनधास्त रहायचे आणि मध्ययुगिन लोकांप्रमाणे जे काही वारे अनुभवायाचे त्या अनुभवाने पुणेकरांनी ठरवायचे की काय करायचे ! पुणेकर तसे टेकड्यांची कवचकुंडले घेऊन आलेले नशिबवान लोक आहेत आले वादळ गेले वादळ काय फरक पडतो म्हणा. (एखाद्या टेकडीवरील उडाले दोनचार पत्रे किंवा पडली दोनचार झाडे तर पुणेकरांचे आयुष्य तसे थांबत नाही) काही वेळाने पुण्यातील कर्वेरोडावर समुद्र आणि निसर्ग (रेस्टॉरंट) कसे शांत आहेत या बद्दलचे पुणेरी विनोद व्हॉट्स अ‍ॅपवर फिरावयास लागले. वादळाचा केंद्र बिंदू लोणावळ्याच्या टेकड्या ओलांडून पुढे जाईल का या बद्दल मनात प्रश्न होता रात्री आठ वाजता हवामान खात्याच्या वेबसाईटने केंद्रबिंदूची पोझीशन लोणावळ्याच्या पलिकडे दाखवली एकुण पुणे शहर वारेवावधान आणि पाऊसाने भिजले तरी केंद्रबिंदूच्या कक्षेतून अवघ्या काही अंशाने वाचले असावे. तसे पश्चिम किनार्‍यास वादळांचा अनुभव कमी त्यामुळे पश्चिम किनारपट्टी जिथे बिनधास्त असते तेथे किनारपट्टीपासून सह्याद्री आणि टेकड्यांची कवचकुंडले ल्यालेल्या पुणेकरांसाठी नळी फुंकली निसर्ग-तंत्र-माध्यमांनी, आले वादळ गेले वादळ!!

* दुसर्‍या दिवशी म्हणजे ४ जून २०२० ला आलेली त्रोटक वृत्ते

** टाईम्स ऑफ ईंडिया

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

3 Jun 2020 - 9:35 pm | Rajesh188

Skymet वर आज सकाळी हवामानाचा अंदाज बघितलं तेव्हा मुंबई मध्ये आजचा वाऱ्याचा वेग 30 किमी प्रती तास दाखवत होते.
आणि उद्याचा वाऱ्याचा वेग 13 किमी प्रती तास.
म्हणजे चक्रीवादळ ची कोणतीच चिन्ह skymet दाखवत नव्हत.
फक्त टीव्ही वाले बोंब मारत होते.

माहितगार's picture

3 Jun 2020 - 10:17 pm | माहितगार

तसे सरकारी कारभार हवामान खात्याकडून येणार्‍या अधिकृत माहितीवर चालतात म्हणजे वादळ मुंबईवरून मध्येप्रदेशकडे जाणार हा अंदाज हवामान खात्यातूनच वर्तवला गेला असणार. मला या विषयातले फारसे गम्य नाही पण लॉजीकली बघता हवामान खात्याचा कालचा अंदाज बहुधा वादळ अलिबागच्या पलिकडून लँड करेल असा असावा आणि पुढे उत्तर महाराष्ट्र आणि पुढे मध्यप्रदेशचा भाग वेगळ्या हवेचा दबावपट्टा दर्शवत होता त्यावरुन त्यांचे कालचे कयास असावेत ते काल साठी ठिक असतीलही. वादळाचा लँडींग अंश अपेक्षेपेक्षा वेगळा येऊन ते अलिबागच्या अलिकडे मुरुडला येणार म्हणल्यावर हवामान खात्याने मुंबई बद्दलचे अंदाज बदलले नाही बदलले तरी पुणे मार्गे नासिक हा इतर सर्वसामान्य व्यक्तींनी केलेल्या अंदाजाचा वेळीच विचार करावयास हवा होता.

सह्याद्रीमुळे अंशतः वादळ शमले असे गृहीत धरले तरी सह्याद्रीच्या दोन रांगा ओलांडून लोणावळा पार करते म्हणजे पुणे शहराच्या दृष्टीने अगदीच हलक्यात घेण्यासारखेही नव्हते. पुणे मुंबई एवढे सखल नसेलही पण सर्वसामान्य पुरात पुण्याच्या सखल भागातील झोपडपट्ट्याही कुटूंबे स्थलांतरीत करावी लागतात तर टेकड्या पत्र्यांच्या झोपडपट्ट्यांनी व्यापलेल्या आहेत. किंवा अगदी सह्याद्री ओलांडून देशावर वादळ उतरले हे आजच्या काळात सॅटेलाईट मधून हवामान खात्यास दिसत नसणार काय ? की वादळ बारामतीतून गेलेतरच दखल घ्यायची आणि मुळशी-खेड मधून गेले तर दखल घ्यायची नाही असे काही आहे ? तो सरकारी कारभार झाला. मुंबईच्या बातम्या तसेही असंख्य चॅनल्सकडून कव्हर होतात, पुणे बाजूला असूनही तो मान तेवढा पुण्याच्या नशिबी येत नसावा. इतर खासगी वाहीन्यांचेही सोडून द्या करोना काळापासून मी साम टिव्ही पुण्याच्या लोकल काही बातम्या अधिक देईल का म्हणून अधून मधून चेक केला पण पुणे शहर अथवा जिल्ह्याची म्हणून अधिकची बातमी पहाण्यास मिळत नाही. कोणत्याही शहराची बातमी बघायची आणि त्यासाठी चॅनलचे तोंड ताटकळत बसायचे हा एक भयंकर प्रकार असावा. असो.

सतिश गावडे's picture

3 Jun 2020 - 9:52 pm | सतिश गावडे

हे वादळ रायगडच्या किनार्‍यावर धडकी देत पुढे सरकले. रायगड जिल्ह्यात खुप नुकसान झाले. सर्रास घरांची कौलं, पत्रे उडालेत.

माहितगार's picture

3 Jun 2020 - 10:30 pm | माहितगार

केवळ किनाराच नाही वादळाने ज्या अर्थी सह्याद्री ओलांडला त्याअर्थी घाट माथ्यावरच्या वाटेत आलेल्या गावांनाही अनपेक्षीत फटका बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूरचित्रवाणी माध्यमे तंत्रज्ञान खर्चामुळे पुर्वसुचने शिवाय इतर क्षेत्रातील बातम्या देऊ शकत नाहीत हेही एक वेळ समजता येईल पण वादळ पुढे गेलेल्या ग्रामीण भागात अजूनही प्रिंट माध्यमात बरेच प्रतिनिधीत्व असावे पण संबंधीत ग्रामीण भागाच्या वादळ विषयक बातम्या प्रिंट माध्यमातूनही येताना फारश्या दिसल्या नाहीत.

चौकटराजा's picture

6 Jun 2020 - 8:01 pm | चौकटराजा

आमच्या भागात खूप झाडे पडली . केबलच्या तारा तुटल्या ३० तास वीज नव्हती. व इन्टनेट व टीव्ही चार दिवस बन्द होता. चार दिवस सर्व जगापासून अगदी अल्ग क्वारन्टाईन. न्यूज पेपर ही नाही. आता नेट व टी व्ही चालू झाला आहे !!