ढासळला वाडा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
29 May 2020 - 12:32 pm

खालील फोटो पाहून सुचलेली कविता:
ढासळला वाडाफोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune

ढासळला वाडा

ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती

सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या
दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या

टणक होते जूनेर लाकूड, उन वारा पाऊस खाऊन
भुगा केव्हाच झाला त्यांचा, अंगी खांदी वाळवी लेवून

भक्कम चिर्‍या दगडांची ढिसळली छाती
लेपलेल्या चूना पत्थरांची झडली माती

पक्षी उडाले, गडी माणसे गोतावळा गेला
कुबट भयाण गूढ अंधार काळा उरला

जुन्या पिढीने भोगले, जूनेच वैभव लयास गेले
नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे आले

- पाषाणभेद

villeageकरुणकविताराहती जागास्थिरचित्र

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

29 May 2020 - 12:44 pm | पाषाणभेद

(या वरूनच सुचलेल्या आगामी आकर्षणाची झैरात येथेच उरकून घेतो. :-) . )
(लॉकडाऊनमुळे एकाच स्क्रिनवर खेळ दाखवण्यात येईल. तिकीट दर जास्त असू शकते. त्वरा करा अन थेटरमध्येच पहा.)

नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे.

- क्रमशः

गणेशा's picture

29 May 2020 - 1:27 pm | गणेशा

अप्रतिम

चित्रगुप्त's picture

29 May 2020 - 3:18 pm | चित्रगुप्त

कविता आवडली. कधीकाळी वैभवशाली असलेल्या उत्तुंग इमारती आता पडक्या अवस्थेत बघणे खेदजनक खरेच, पण त्यातही एक आगळे सौंदर्य असते. या इमारती म्हणजे " नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे" नसून अभिमानाने, कसोशीने जपण्याचे वैभव असते, हे युरोपातील प्रत्येक गावा-शहरात बघून जाणवते.
.
.
.
.