ब्लूबेरी ,रास्पबेरी ,ब्लॅकबेरी आणि चेरी उलटा केक

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
17 May 2020 - 12:58 pm

ब्लूबेरी ,रास्पबेरी ,ब्लॅकबेरी आणि चेरी उलटा केक
साहित्य:
- वरील फळे फ्रोझन किंवा ताजी (फ्रोझन असतील तर ती तशीच वापरावी आधी फ्रीझर मधून बाहेर काढून ठेवू नयेत) १.५ कप
- १.५ कप सेल्फ रेझिंग फ्लावर ( किंवा मैदा + बेकिंग सोडा+ बेकिंग पावडर )
- १२० ग्राम लोणी ( कोमट झालेले )
-२ अंडी
- ३/४ कप दूध
- ३/४ कप कॅस्टर शुगर
कृती
लोणी आणि कॅस्टर शुगर इलेकट्रीक बिटर ने फेसून घयावीत
त्यात अंडी एक एक करून घालावीत .. वेग कमी करून मैदा आणि दूध हळू हळू घालावे ३० सेकंड अजून फेटावे
- केक पात्रात खाली बटर पेपर घालून त्यावर थिजलेल्या बेरी पसराव्या आणि त्यावर मैद्याचे मिश्रण पसरावे
१८०° अंश से . वर ४० मिनिटे ठेवावे
- केक झाल्यावर काढून ५ मिनिटे बाहेर ठेवावा
- एक ताटली घेऊन केक उलटवावा आणि वरती कॅस्टर शुगर चाळणीतून भुरभुरावी
- बौसनबेरी आयस्क्रीम बरोबर किंवा साध्या व्हनिला क्रीम बरोबर छान लागेल
IMG_7670[1]
IMG_7672[1]
IMG_7673[1]
IMG_7675[1]
IMG_7677[1]
IMG_7679[1]
माझा हा प्रयोग काहीस फसला आहे ( नीट फुगला नाही , बेरि नित दिसत नहित आणि अंड्याचा वास जास्त लागला) त्यामुळे मी केलेला आणि पुस्तकातील हे दोन्ही फोटू दिले आहेत !
IMG_7681[1]

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 May 2020 - 4:41 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...

मन्या ऽ's picture

18 May 2020 - 11:11 pm | मन्या ऽ

घरी बेक करणाऱ्यांचा प्रचंड आदर वाटतो मला. कधी केक ट्राय केलेला नाहीये मी. पण अंड्याचा वास राहिला म्हंजे व्हॅनिला इसेन्स कमी पडला / घालायचा राहिला असेल..