नसती आफत !!!

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
12 May 2020 - 7:12 pm

( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. )
नसती आफत !!!
आबाने अपल्या वयाची आता सत्तर वर्षे पूर्ण केली होती . जन्मभर शेतात काम केले ,एकुलत्या एक मुलाचे शिक्षण करून त्यालाही मोठ्या शहरात नोकरीला लावले . घरात म्हणाल तर आताही दोनच माणसे, एक आबा अन दुसरी त्याची पासष्ठ वर्षे पार केलेली बायको बयाक्का . वृद्धत्वा मुळे व त्यातच त्याला असणारी आनेक व्यसना मुळे, आबाला मधुमेय व उच्चरक्तदाबाचा त्रास अनेक वर्षा पासून होत होता,. आज तर कहरच झाला ,आबा एकदम चक्करच येऊन पडला . त्याची बायको बयाक्का खूपच घाबरली ,तिने आबाला गाडीतून सरळ शहरात आणले व एका खाजगी दवाखान्यात स्वतंत्र दोन खाटेच्या रूम मध्ये दाखल केले .
सुदैवाने मुख्य डॉक्टरांची गाठ पडल्याने त्यांनी आबाला एक,दोन इंजेकशन व कांही औषदे , सलाईन दिली .एक कसले तरी सलाईन देणार इतक्यात त्या गडबड्या नर्सच्या हातातून ती सलाईनची बाटली सटकली व खाली असणाऱ्या लोखंडी खुर्ची वर पडून फुटली . या बाटलीत कसले तरी साखरेच्या पाका सारखे (लोमोडेक्स) सलाईन संपूर्ण खुर्चीवर सांडले . डॉक्टर, नर्स वर खूप चिडले व नाराज होऊन उद्या बघू म्हणत तिथून निघून गेले . या सर्व गोष्टीमुळे बयाक्का खूपच घाबरून गेली होती .या पूर्वी निरोप देऊन ही आपला भाऊ सदू ,अजून कसा काय आला नाही ,याच्या कडे तिचे सर्व लक्ष लागले होते .
सकाळ होताच सदू पण तत्परतेने दवाखान्यात हजर झाला .बायाक्काने सदूला आबा जवळ नेहले .आबा निपचित पडून जोर जोरात श्र्वास घेत होता . दाजीची हि आवस्था पाहून तो पण कावरा बावरा झाला होता . सदूला बघून बायाक्काच्या जीवात जीव आला " सदू तू आलास, लई बर वाटल बघ " मग तिने आबा चक्कर येऊन पडल्या पासून सर्व गोष्टी कशा घडल्या याची इतंभूत माहिती सदूला दिली . सदू पण चांगलाच घाबरून गेला होता अन हे सर्व ऐकत असताना नकळत ,नेमका खुर्चीवर सांडलेल्या चिकट सलाईन मध्ये बसून टाकला . हे सर्व चिकट सलाईन त्याच्या विजारीला, शर्टाला एखादा रंग द्यावा त्या प्रमाणे चिकटून बसले . हे सर्व लक्षात आल्या वर त्याला पण नेमके काय करावे हे सुचेना झाले
त्याची हि अवस्था पाहून बायाक्काला देखील अशा परिस्थितीत हसावे का रडावे हेच कळेना झाले . यावर उपाय म्हणून तिने एक नामी युक्ती शोधून काढली . ती सदूला म्हणाली "एक काम कर ,माझ्या पिशवीतले लुगडे घे .समोरच्या न्हाणीत जाऊन अंघोळ कर आनं तवर माझे हे लुगडे लावून घे .खोलीला आतून कडी लावून गुमान बस ,तो पर्यंत मी तुझ्या साठी हेंच काहीतरी कापड व जेवण घेऊन येतो . " असं म्हणत ती लग बीगीने घरा कडे निघून गेली . अक्काने सांगितल्या प्रमाणे सदूने करकचून लुगडे नेसले व एखाद्या नव्या नवरी सारखा डोक्यवरून पदर हि घेतला.पूर्वी गणपतीच्या कार्यक्रमात सदूने नाटकात महिलेची भूमिका केली होती, त्याचा उपयोग आज त्याच्या कामी आला . दाराला आतून जाम कडी लावली व खाटेवर तो झोपून टाकला .आबाच निपचित पडून जोर जोरात श्र्वास घेण चालूच होत मधीच कधी तरी तो चढाला लागणाऱ्या एस.टी.प्रमाणे गेअर बदलत असे .समजा चुकून माकून ह्या खोलीत कोण तरी दुसरा माणूस आला असता, तर ह्या बाईचा पेहराव आणि त्याची हि झुपकेदार पीळ घातलेली ,वर चढवलेली आकडी मिशी पाहून,तिथेच बेशुद्ध पडला असता.
इतक्यात दारावर टक्क ss टक्क आवाज झाला .सदूला वाटलं अक्का आली वाटत म्हणून त्यानं अंदाज घेत हळूच दार उघडले पण तो कोणीतरी डॉक्टर होता, तसा सदू मागे फिरला आणि भिंती कडे तोंड करून खाटेवर झोपून टाकला .
"हं काय म्हणतोय पेशंट "
तसे भितींकडून बाईचा आवाज आला "बरा है "
" गोळ्या दिल्या काय"
परत बाईचा आवाज "नाss ही,आत्ता देणार है" .
पूर्वी गणपतीच्या कार्यक्रमात सदूने नाटकात महिलेची भूमिका केली होती, त्या वेळेची हि आवाजाची जादू त्याच्या चांगलीच कामी आली.
हा प्रकार पाहून डॉक्टर चांगलाच वैतागला .अहो !! आज्जी असं घाबरून ,भिंतीकडे तोंड करून चालणार नाही .पेशंटला तुम्ही धीर दिला पाहिजे .त्याला काय पाहिजे नको ते विचारून तुम्ही त्याची सेवा केली पाहिजे .मी नर्सला पाठवून देतो .उपाशी पोटी पेशंटचे युरीन तपासायला पाहिजे .नर्स तुम्हाला सगळे समजावून सांगेलच असे म्हणत तो निघून गेला .तसा सदूने सुसकारा सोडला.आता सदू चांगल्याच धर्म संकटात सापडला होता .
परत एकदा दारावर टक ss टक झाली . आता हि नर्स आत येणार म्हंटल्या वर सदूने आपल्या मिश्या दिसू नये म्हणून नाकावर चांगलाच करकचून पदर बांधून घेतला व दार उघडले तसे एक नर्स हातात एक मोठी बाटली घेऊन तिने आत प्रवेश केला . तिने या बाईकडे पाहून म्हणाली "आज्जी एवढा करकचून नाकाला पदर बांधायला, तुमच्या मालकांना कांही महामारीचा रोग झाला नाही . हि बाटली घ्या ,मी पेशंटला डोक्या कडून उचलते आणि तुम्ही त्यांचे दोन्ही पाय धरून वर उचला . त्यांचे तपासणी साठी युरीन घ्यायचे आहे . हे सगळ ऐकल्यावर सदूने एकदम नाक मुरडूले आणि म्हणाला "कस तर वाटssतय" . नर्स पण चांगलीच फटाकडी होती . एवढ लाजायला काय झालं .आता म्हातारपणी नवऱ्याची सेवा करायला नको .मी बघा माझा नवरा दोन महिने दवाखान्यात अजारी होता . मी कधी दिवस म्हंटला नाही का रात्र म्हंटली नाही ,अहोरात्र त्याची सेवा केली .आजारी नवरा म्ह्णजे देव आहे आणि बायको हि सावित्री आहे. आता मात्र सदूचा नाईलाज झाला .दाजींचे पाय धरून उचलणार इतक्यात त्याच्या तोंडावरील पदर एकदम निसटला आणि त्याच्या लांब झुपकेदार आकडी मिशा बाहेर आल्या हे पाहून ती नर्स जोरात किंचाळी, पेशंटला तिने तसेच खाली टाकले आणि तिने तिथून एकदम धूम ठोकली . कदाचित तिला हा मिशीवाला सदू म्हणजे यम वाटला कि काय कुणास ठाऊक .एवढ्यात बायाक्का घरातून अली अन सगळ्या गोष्टीचा उलघडा झाला .

विनोदलेख

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

14 May 2020 - 8:31 pm | योगी९००

हा हा... आवडला किस्सा...

योगी ९०० यांच्य अभिप्राया बद्दल मना पासून आभार.