[कविता' २०२०] - क्वारंटाईन!

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
4 May 2020 - 12:43 pm

क्वारंटाईन!

आलो तुझ्याचसाठी
सेव्हन समुद्रावरून
कंटाळून प्रेमाला, सदा
करून ऑनलाईन

सखये आलो कमवून
बंडल काही डॉलरांचे
निवांत फिरूया दोघे
सारे स्पॉट टुरिस्टांचे

यंदाच करून शुभमंगल
पुढच्या वर्षी लिटल सन
पाहतो उघड्या डोळ्यांनी
हे ड्रीम फ्लाईटात बसून

हाय! पडला हाती छाप
विथ सरकारी डिझाईन
तू तिकडे लुकिंग फॉर्वर्ड
मी इकडे क्वारंटाईन!

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 2500px;
}

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2020 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा. आवडली रचना. झिंगाट परफ्यूम मारून आलोय असे आठवले.

बोहनीचा टायमाला आलो म्हणून +१ देतोय.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

4 May 2020 - 3:10 pm | जव्हेरगंज

रुबाबदार कविता! इंग्रजी शब्दांची फोडणी आवडली!

+१

प्रचेतस's picture

4 May 2020 - 3:28 pm | प्रचेतस

मात्र इंग्रजी शब्दांचा अतिरेक खटकला म्हणून कविता आवडली असूनही गुण देत नाही.

श्वेता२४'s picture

4 May 2020 - 4:16 pm | श्वेता२४

समयोचित खुसखुशीत कविता

मीअपर्णा's picture

4 May 2020 - 5:40 pm | मीअपर्णा

अशा कविता येणार असतील तर आमच्यासारखे इतरवेळि क्विता फारशी न वाचणारे लोक देखील वाचतील

+१

पलाश's picture

4 May 2020 - 9:06 pm | पलाश

+१.
इंग्रजी शब्द जरा जास्तच प्रमाणात आले आहेत. तरीही ही कविता मस्तच आहे त्यामुळे +१ .

Prajakta२१'s picture

4 May 2020 - 9:12 pm | Prajakta२१

+१

OBAMA80's picture

5 May 2020 - 6:56 am | OBAMA80

+१

तुषार काळभोर's picture

5 May 2020 - 7:55 am | तुषार काळभोर

इंग्रजी शब्द असले तरी कविता मराठीच आहे. अन् त्या शब्दांचा वापर 'marathi शब्द न सुचल्याने' असा नसून कल्पकतेने योजलेला आहे.
म्हणून आवडली..

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:28 am | चांदणे संदीप

+१ प्रतिसादाला....
आणि
+१ कवितेला!

सं - दी - प

अग्निवेश गिरीश भोसले's picture

19 May 2020 - 11:30 pm | अग्निवेश गिरीश भोसले

बरी आहे