शतशब्दकथा: अंगरखा

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
4 May 2020 - 2:53 am

पुन्हा तेच आटपाट नगर होते. तोच राजा होता. तेच दरबारी होते. तीच प्रजा होती. तोच लहानगा होता. आणि पुन्हा तोच जादूचा अंगरखा होता. राजा पुन्हा बाहेर पडला. पुन्हा तो मुलगा ओरडला, "राजा नागडा!" राजा संतापला. परत गेला.

दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. तिसऱ्या दिवशीही तसंच. हे आता रोजचंच झालं. पब्लिकला त्याचं काही वाटेनासं झालं. कुजबूज चर्चेत बदलली. चर्चा मोठ्या आवाजात. आंदोलने झाली. उठाव झाले. दडपले गेले. राजा काही बधेना. जादूचा अंगरखा घालून फिरणे सोडेना. कुणाचेच ऐकेना. सूज्ञांनी हात टेकले. लोक दुर्लक्ष करू लागले.

एक दिवस राजाला विषाणू डसला. राजा आजारी पडला. व्हेंटिलेटरवर गेला. खपला.

जादूचा अंगरखा आता भलताच लोकप्रिय झाला होता.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

खूप दिवसांनी लिहिलंत, मस्त.

कुमार१'s picture

4 May 2020 - 10:43 am | कुमार१

आवडली .

मराठी कथालेखक's picture

4 May 2020 - 1:00 pm | मराठी कथालेखक

काही समजली नाही कथा, कुणाबद्दल आहे ? ट्रम्प की आणखी कुणी ? कोरोनाने कुणी राज्यकर्ता तर खपला नाही अजून ..

एस's picture

5 May 2020 - 9:46 pm | एस

ही शशक समजायला तुम्ही एक कसलेले व जुने मिपाकर असायला हवे आणि तुमचे मिपाचे सखोल वाचन असायला हवे. ज्यांना समजली त्यांनी कृपया प्रतिसादात 'समजली' एव्हढेच लिहा आणि गंमत पहा! इतरांनी वाचा आणि सोडून द्या. हाकानाका! ;-) कृ. ह. घे.

गामा पैलवान's picture

4 May 2020 - 8:24 pm | गामा पैलवान

एस,

कथा छान आहे. पण लोकं खरंच इतके मूर्ख असतात का? सत्तेसमोर शहाणपण चालंत नाही म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.