कमीत कमी साहित्यात होणाऱ्या पाककृती

Primary tabs

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in पाककृती
25 Apr 2020 - 10:24 pm

कमीत कमी साहित्यात होणाऱ्या पाककृती

Lockdown रेसिपीज-मुगाच्या डाळीची खिचडी

साहित्य-

१. मुगाची डाळ

२. तांदूळ (मी दोन्ही एकास एक असे घेतले होते )

३. तूप

४. जिरे

५. .हळद

६.तिखट

७. गोडा मसाला

८. कसुरी मेथी (ह्याने थोडा कडवटपणा येतो चालत असल्यास घालणे किंवा मग नंतर साखर जास्त घालणे )

कृती-

१.एका पातेल्यात मंद आचेवर तूप गरम करून त्यात आधी जिरे घालायचे

२. जिरे तडतडले कि त्यात हळद घालायची.

३.हळद घातल्यावर लगेच तिखट आणि धने पावडर घालायची.

४. थोडी कसुरी मेथी घालायची (चवीनुसार )

५. मग धुतलेले डाळ तांदूळ घालायचे.

६. आपल्या चवीनुसार साखर आणि मीठ घालणे सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे.

७. सगळयात शेवटी पाणी घालून झाकण घालून १५-२० मिनिटे शिजवायचे. ह्यात पाणी आणि शिजवायचा वेळ ह्यात फरक पडू शकतो मऊसर खिचडी हवी असल्यास पाणी जास्त घालायचे

(खाली लागू नये म्हणून झाकणावर पाणी घालून शिजवायची)

टीप-बासमती तांदुळाची जास्त चांगली होते, उपलब्धतेनुसार कांदा -टोमॅटो & इतर अनेक आवडीच्या भाज्या घालून शकता तेवढा शिजायला जास्त वेळ लागेल.

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

25 Apr 2020 - 10:27 pm | Prajakta२१

mugachi khichdi

Prajakta२१'s picture

25 Apr 2020 - 10:29 pm | Prajakta२१

mugachi khichdi

रमेश आठवले's picture

25 Apr 2020 - 11:49 pm | रमेश आठवले

कमीत कमी साहित्य म्हणजे मुगाची डाळ. तांदूळ, मीठ आणि हळद -मुगाच्या डाळीची खिचडी.

Prajakta२१'s picture

26 Apr 2020 - 12:32 am | Prajakta२१

मला lockdown रेसिपीज म्हणून करायची होती पण कालपासून प्रकाशित होत नव्हती

विंजिनेर's picture

26 Apr 2020 - 5:53 am | विंजिनेर

लॉकडाऊन नसताना तुम्ही काय एरवी फक्त दम बिर्याणी करता काय, आँ? उगीच लॉकडाऊनच्या नावाखाली काहितरी नवशिका आचरटपणा, म्हणे मुगाची खिचडी...
आता उद्या मिपावर लॉकडाऊन चहा, लॉकडाऊन मॅगी अश्या रेशिप्या येऊ नये म्हंजे झालं... जरा कायतरी गणपा/केडी/स्वाती दिनेश/स्वाती२ इ. बल्लवांकडून काहीतरी धडे घ्या.. झालंच तर पिवशेकडे जा ति सांगेल कसा कित्ता गिरवावा..

जव्हेरगंज's picture

26 Apr 2020 - 9:35 pm | जव्हेरगंज

😆

मूळ लेख वेगळा आहे इथे प्रकाशित होत नाहीये

सहज म्हणून हे लिहून प्रकशित होतेय का ते बघावे तर हे प्रकाशित झाले आत्ता पण काही प्रकाशित होत नाहीये

ह्यात सगळ्या एकत्र आहेत मूळ कल्पना हि वेगवेगळ्या रेसिपीज ना एक कॉमन बॅकग्राऊंड द्यायचे होते