मौनाचे गुपित

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
21 Apr 2020 - 6:33 pm

मौनामागे दडुनी असती
नाना परिची किती कारणे
कुठे व्यग्रता, कुठे खिन्नता
वरुन दाखवी 'नको बोलणे'

मौनाच्या वाटांचे वळसे
वाटसरूला होई चकवा
निबिड शांतता चहुबाजूला
असह्य होई अबोल थकवा

मौन राखते दाट अरण्ये
अनेक गुपिते अनेक आख्या
वरवर जे दिसते डोळ्यांना
खरे भासते असून मिथ्या

मौन पाहते सूचक, रोखुन
धारदार भेदक डोळ्यांनी
एका एका प्रश्नासंगे
यक्षाची तलवार परजुनी

प्रश्नहि ऐसे महाकठिण ते
सापडता सापडे न उत्तर
चकव्यामधुनी सुटण्याइतके
नशिब कुणाचे की बलवत्तर?

कुणास होतो मोह अनावर
मौनाशी दो हात करावे
मौनाला मौनाने उत्तर
नजर भिडवुनी आपण द्यावे

करू नये कधि दुस्साहस हे
समोर येइल भयाण खाई
शरणागतिचा एकच रस्ता
मौनासंगे नको लढाई

लिहून देता क्षमायाचना
मौनाचा पारा ये खाली
गायब होतो लगेच चकवा
क्षणात दिसते वाट आपुली

मौनालाही वाटत असते
कुणितरि यावे अन् बोलावे
मौनाचे हे गुपित परंतू
नसते बहुतेकांना ठावे!!

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Apr 2020 - 6:53 pm | चांदणे संदीप

मौनाची बोलकी कविता! (जरा जास्तच बोलली.) ;)

सं - दी - प

चलत मुसाफिर's picture

21 Apr 2020 - 6:57 pm | चलत मुसाफिर

हो, कविता थोडी लांब झाली खरी.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

21 Apr 2020 - 7:05 pm | प्राची अश्विनी

सुंदर!!

चलत मुसाफिर's picture

21 Apr 2020 - 7:12 pm | चलत मुसाफिर

प्रतिसादासाठी धन्यवाद

प्रचेतस's picture

21 Apr 2020 - 7:14 pm | प्रचेतस

मस्त

चलत मुसाफिर's picture

21 Apr 2020 - 7:16 pm | चलत मुसाफिर

प्रतिसादाबद्दल

ही कविता  नवरा बायको च्या भांडणाला फिट बसत्ये. मस्त आहे.

चलत मुसाफिर's picture

21 Apr 2020 - 9:45 pm | चलत मुसाफिर

धन्यवाद :-)

मन्या ऽ's picture

23 Apr 2020 - 10:24 am | मन्या ऽ

मस्त!

चलत मुसाफिर's picture

23 Apr 2020 - 12:35 pm | चलत मुसाफिर

प्रतिसादाबद्दल! :-)