The बाल्कनी

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
15 Apr 2020 - 2:16 pm

का कुणास ठाऊक पण नभ दाटून आले होते आणि
वारा तुफान वहात होता.
आभाळाच्या छताखाली एक कागद उंचच उंच उडत होता.
मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत बसलो. मग शेवटी कंटाळलो.

नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. एक कुत्र्याचं लहानसं पिल्लू रस्त्यावर मनसोक्त बागडत होतो. मी बराच वेळ पाहत बसलो. पण शेवटी कंटाळलो.

तसा फारसा वेळही जात नव्हता. आणि मी आळसावलो होतो.
गेल्या दोन दिवसांत काहीच न लिहीता आल्याने पुरता वैतागलो होतो.

नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. बाल्कनीत एक कागद पडला होता. चांगला होता कोरा करकरीत. आता हाच वापरू म्हणून मी तो उचलला. पेन्सिल घेतली आणि बाल्कनीत खुर्ची टाकून टेबल लावून बसलो.

एक मुलगी रस्त्यावरून चालत येताना दिसली. तिच्याकडे मी निरखून पाहिले आणि कागदावर लिहिले,

'निर्मनुष्य रस्त्यावरून एक तरुणी जात होती.' मला हायसे वाटले. पहिली ओळ मला सुचली होती.

पुढे मी लिहिले,
'ती सुंदर होती, गोड गळ्याची. तिच्या केसांतून वारा भुरभुर वहात होता. आणि तिच्या गजऱ्याचा सुगंध दूरवर पसरला होता.'
वर्णन तर मी तंतोतंत जुळवले होते. याच्यापुढे काय लिहावे याचा विचार करू लागलो. एव्हाना ती मुलगी कुत्र्याच्या पिल्लाशी अल्लड खेळत बसली होती. फारच गोड.

कथेत काहीतरी ट्विस्ट असणे गरजेचे होते. पण तो काय असावा हे उमजत नव्हते. आणि यासाठी बराच विचार करावा लागत असे.
मी पुढे लिहिले,
'पण अचानक तिच्या चेहऱ्यावर भिती पसरली. कुठल्यातरी अनामिक दडपणाखाली ती दबून गेली'
तेवढ्यात ते पिल्लू तिच्यावर उगीचच भुंकले आणि ती थोडी मागे सरकली. फारच गोड

दरम्यान एक तरूण तिथे आला. त्या मुलीशी तो काहितरी बोलला. आणि ईकडे तिकडे बघत दोघे कुठेतरी निघून गेले.

बस आता एवढ्या प्रसंगावरंच मला कथा रचायची होती. आज काहितरी लिहील्याशिवाय मला चैन पडली नसती.

बराच विचार करून मी पुढे लिहिले,
'ती एकटीच झपाझप चालत होती, आणि अचानक गल्लीतील एक गुंड तिच्यासमोर येऊन ऊभा ठाकला. बऱ्याच दिवसांपासून तो तिच्या मागावर होता.
"ए छिनाल, तुला सांगितलं होतं ना रात्री भेट म्हणून. का नाही भेटली?" तो तिच्या झिपऱ्या धरत बोलला.
"साली रांड असून एवढे नखरे.." तो तिला फरफटवत झुडपात घेऊन चालला.'

कहाणी मे ट्विस्ट म्हणून तिला मी आता 'रांड' केले होते.

"साले भडवे, मेरा फोकट का पैसा खाता है.." ती त्याच्याशी झटापट करत बोलली. "अब मै ईधरपे धंधाइच नै करेगी.."

तो भडकला. सुरा बाहेर काढत बोलला, "कसमसे मै तेरा आज गेम बजाता हू!"
त्याने वार करायला सुरा उगारला आणि एकाकी हाताला हिसडा देऊन ती तरुणी जिवाच्या आकांताने परत पळत सुटली.'

मी हे लिहित असतानाच ती मघाची तरुणी मोठमोठ्याने ओरडत रस्त्यावरून पळत येताना दिसली. मी गडबडून गेलो. कागद बाजूला ठेवून मी बाल्कनीत पुढे होऊन पाहिले. तो गुंड हातात सुरा घेऊन तिच्यामागेच पळत येत होता. त्याने तिला गाठले. आणि कसलाही विचार न करता तिच्यावर सपासप वार केले. रक्तबंबाळ होऊन ती जमीनीवर कोसळली. मी पुरता गोंधळून गेलो. मी जसे लिहित होतो, प्रत्यक्षात तसेच घडत होते की काय? पण शेवट मात्र मला जसा अपेक्षित होता तसा मुळीच झाला नाही. किंबहुना मी शेवटाचा अजून विचार सुद्धा केला नव्हता. हा कागदच काहितरी विशेष असावा. उगाच नाही तो आपल्या बाल्कनीत येऊन पडला.

कथा कदाचित पुन्हा एकदा सुरुवातीपासून लिहिल्यास सर्वकाही ठिकठाक होईल असा विचार मनात आला.

मी पेन्सिलने लिहिलेल्या पूर्ण कथेवर खाट मारली. आणि आश्चर्य, समोरचे दृष्य क्षणार्धात पालटून पूर्वीसारखे झाले. आणि कागदही कोरा करकरीत.

एक कुत्र्याचे लहानसे पिल्लू रस्त्यावर मनसोक्त बागडत होते. आणि एक मुलगी रस्त्यावरून चालत येत होती. 'ती सुंदर होती, गोड गळ्याची. आणि तिच्या केसांतून वारा भुरभुर वहात होता..

एव्हाना ती तरूणी कुत्र्याच्या पिल्लाशी अल्लड खेळत होती. मला क्षणभरात एक कल्पना सुचली. मी कागदावर लिहिले,
'बाल्कनीत बसलेला एक तरुण जिन्यावरून खाली उतरतो. आणि रस्त्यावर ऊभ्या असलेल्या तरूणाच्या पोटात सुरा खुपसून ठार मारतो'.

मग मी खुर्चीवरून उठलो आणि घरात जाऊन किचनमधला सुरा हातात घेतला. मग जिन्याने खाली उतरत सरळ रस्त्यावर आलो. तेव्हा एक तरुण त्या मुलीशी काहितरी बोलताना दिसला. ते ईकडे तिकडे बघून कुठेतरी जायच्या तयारीत होते.
मी वेगाने पुढे सरसावलो आणि ठरल्याप्रमाणे त्या गुंडाच्या पोटात सपासप सुरा खुपसला.

"व्हाट द हेल!!" ती तरूणी जोरात किंचाळली. "हेल्प , हेल्प, धिस बास्टर्ड किलड् माय ब्रदर.."
"हे ड्यूड, व्हाय द फक यू आर किलींग मी?" तो तरूण रस्त्यावर कोसळत पुसटसं म्हणाला. आणि मग निपचित पडला.

हा माझ्यासाठीही एक धक्का होता. कथेमध्ये पात्रे निर्माण करायच्या आधीच मी या तरूणाचा बळी घेतला होता. जो की तिचा भाऊ होता. आणि ही तरुणी कोणी वेश्या वाटत नव्हती. जरा गडबडच झाली खरी. पण ही चूक दुरूस्त करता येणे सहज शक्य होते.

एव्हाना आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले होते. पोलिस गाडीचा सायरनही परिसरामध्ये घुमायला लागला होता.

"मी लवकरच हे दुरूस्त करतो. डोन्ट वरी. यू वील बी फाईन.." म्हणत मी धावतंच बाल्कनीकडे गेलो. सगळीकडे शोधले. पण कथेचा कागद मला कुठे सापडेचना.

का कुणास ठाऊक पण नभ दाटून आले होते आणि
वारा तुफान वहात होता.
आभाळाच्या छताखाली एक कागद उंचच उंच उडत होता.
मी बराच वेळ तिकडे पाहत बसलो.

body {
background: url(https://i.postimg.cc/nhLg0wbM/blue-watercolor-texture-background-24972-1...);

background-size: 1000px;
}

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

15 Apr 2020 - 2:27 pm | तेजस आठवले

ओहो ! झक्कास

चित्रगुप्त's picture

15 Apr 2020 - 2:48 pm | चित्रगुप्त

वा. अफाट कल्पना. आवडली.

अनन्त्_यात्री's picture

15 Apr 2020 - 4:45 pm | अनन्त्_यात्री

ट्विस्ट ! मस्त!!

प्रचेतस's picture

15 Apr 2020 - 5:07 pm | प्रचेतस

फॅन्टास्टीक.
जबरदस्त लिहिलंय एकदम.

सौंदाळा's picture

15 Apr 2020 - 6:13 pm | सौंदाळा

खरच अफाट
दिलीप प्रभावळकरांचा रात्रआरंभ चित्रपट आठवला

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2020 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा

ह्येच म्हणणार हुतो! +++१११
----------
बाकी ह्ये नील आसमंत कैसे केले?

जव्हेरगंज's picture

15 Apr 2020 - 11:29 pm | जव्हेरगंज

त्याच्यासाठी एक HTML code असतो. आपल्याला पाहिजे ती इमेज त्या code मध्ये टाकायची की झालं.
Code इथे देत नाही. कारण तो overlapping आहे.

लोथार मथायस's picture

15 Apr 2020 - 6:33 pm | लोथार मथायस

+१ :)

शलभ's picture

15 Apr 2020 - 7:16 pm | शलभ

खतरनाक...

शेखरमोघे's picture

15 Apr 2020 - 9:08 pm | शेखरमोघे

झकास - बदलत जाणारी कथा पण आणि निळे आकाश पण!!

सुखी's picture

16 Apr 2020 - 12:01 am | सुखी

एक लंबर....

नाद खुळा... जबरदस्त जमलीये

जेम्स वांड's picture

16 Apr 2020 - 6:32 pm | जेम्स वांड

अव्वल कलाकारी आहे राव!

वामन देशमुख's picture

16 Apr 2020 - 6:56 pm | वामन देशमुख

कथा आवडली.

स्मिताके's picture

16 Apr 2020 - 8:01 pm | स्मिताके

एकदम मस्त.

तुषार काळभोर's picture

16 Apr 2020 - 10:11 pm | तुषार काळभोर

एक्दम हुच्च!!!
या कथेला मिसळ अकादमीचा २०२० पुरस्कार द्यावा अशी मी शिफारस करतो!!

गामा पैलवान's picture

17 Apr 2020 - 2:33 am | गामा पैलवान

जव्हेरगंज,

कथा मस्त आहे. शेवट वाचकांवर सोडलाय का?

'एक गोड दिसणारी मुलगी जवळ येऊन मला म्हणाली, भाऊ, इकडे कुठे?' - असा काहीसा शेवट अभिप्रेत आहे .... ?

आ.न.,
-गा.पै.

चांदणे संदीप's picture

17 Apr 2020 - 6:12 pm | चांदणे संदीप

लूपमध्ये गेली का श्टोरी?

ब्येश्ट!

सं - दी - प

लई भारी's picture

17 Apr 2020 - 9:04 pm | लई भारी

भारी कल्पना आहे. _/\_

बांवरे's picture

21 Apr 2020 - 2:21 am | बांवरे

भारी कल्पना !!!!
सही !!

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2020 - 11:36 am | चौथा कोनाडा

+१
जव्हेरभाऊ _/\_ !

राघव's picture

21 Apr 2020 - 3:44 pm | राघव

भारी कल्पना!