कडूनिंब गुलकंद पाककृती

आदिवासि's picture
आदिवासि in पाककृती
6 Apr 2020 - 1:14 pm

कडूनिंब गुलकंद पाककृती

साहित्य -
ताजा कडुनिंबाचा मोहोर
ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या
खडीसाखर
(सर्व साहित्य समप्रमाणात घ्या.)
ताजा कडुनिंबाचा मोहोर
ताजा कडुनिंबाचा मोहोर

ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या
 ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या

खडीसाखर
खडीसाखर

कृती -
स्वच्छ निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत वरील साहित्य आधी गुलाबाच्या पाकळ्या मग कडुनिंबाचा मोहोर आणि खडीसाखर आणि वर अजून गुलाबाच्या पाकळ्या असे थर द्या.

ही बरणी महिनाभर तरी नेहमीच उन्हात राहील अशा ठिकाणी ठेवा. महिनाभरानंतर घरात आणून ठेवा. फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल पण तशी आवश्यकता नाही.

बरणी

साधारणतः दोन तीन महिन्यानंतर खायला सुरू करा. याची चव प्रत्येकाला आवडेलच असं नाही. तथापि, कडूनिंब गुलकंदामुळे दम्याचा त्रास कमी होतो असा अनेकांचा अनुभव आहे. गुढीपाडव्यानंतर ते वैशाख महिना संपेपर्यंतच्या काळात हा गुलकंद तयार करता येतो व चांगला तयार केलेला गुलकंद वर्षानुवर्षे टिकतो. ही रेसिपी मला अमृत मासिकाच्या सप्टेंबर १९९८ च्या अंकात सापडली होती. तेव्हापासून दरवर्षी मी हा कडूनिंब गुलकंद तयार करतो.

या फोटोमधला गुलकंद पाच वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. अश्या माझ्याकडे मागच्या पाच सहा वर्षी तयार केलेल्या गुलकंदाचा बरण्या आहेत.
गुलकंदाचा बरण्या

आपणही नक्की करून पहा.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

भन्नाट आहे.
कडूनिंब गुलकंदा बद्दल पहिल्यांदाच ऐकण्यात / वाचण्यात आले.
करून बघायला पाहिजे !

वामन देशमुख's picture

7 Apr 2020 - 12:03 pm | वामन देशमुख

काहीतरी नवीनच प्रकार दिसतोय हा. करून पाहावा लागेल.

फोटो दिसत नाहीत, माझ्या कडे गुलाबाचे झाड नाही.
देशी गुलाबाच्या पाकळ्या कुठुन मिळु शकतात.