हैननीज चिकन राईस

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
23 Feb 2020 - 2:04 pm

सिगापोर चा राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून जो मानला जातो तो म्हणजे "चिकन राईस "
साहित्य
- अख्खी कोंबडी , देशी असेल तर उत्तम
- आल्याचे मोट्ठे काप
- लसूणीच्या पाकळ्या
- गाजर
- पातीचा कांदा
- लाला मिरची ठेचा + लसूण / सॉस
- बर्फ
- जस्मिन तांदूळ

-कोंबडी ला साधारण कोलीत तापमान आल्यावर ( रम टेम्प ) मीठ लावून त्यास मालिश करावे (थोडीशी चरबी वेगळी काढून ठेवावी )
- त्यात लसूण आले पातीचा कांदा, गाजर मधल्या जागेत भरावा
- मोठया पातेल्यात थोड्या तेलावर चरबी आणि लसूण आणि आले परतावे त्यात मग पाणी घेऊन ते गरम होऊ दयावे
- पाणी गरम झाल्यावर त्यात अलगद हि मालिश केलेली कोंबडी सोडावी व शिजू दवयवी .. शिजताना वर येणार घाण झाऱ्याने काढून टाकावी ... मीठ घालावे
- कोंबडी काढून ती बर्फाच्या पाण्यात बुडवावी
- रूम टेम्प ला आलयावर ती काढून बाजूला ठेवावी
- कोंबडी शिजवलेले पाणी टाकून देऊ नये
- जस्मिन तांदूळ थोडासा परतून या पाण्यात शिजवावा ( गचः गोळा होऊ देऊ नये आणि फार फडफडीत हि नको ) मिळत असेल तर "pandan " नावाचे पण पण यात घालतात.

- चटणी म्हणून , सिराचा नावाचं थाई सॉस किंवा ओली तांबडी मिरची लसूण मीठ अशी चटणी बरोबर + तेल मीठ आणि लसूणाची पंडहरी चटणी
आणि काकडी चे काप

"आधी छोट्या प्रमाणात करून बघावा मग आक्खी कोंबडी !
हा पदार्थ खाताना कोमट खातात त्यामुळे सर्वसाधारण भारतीय पद्धतीत "हे काय गारढोण" असे वाटू शकते.. ! जपून पाऊल टाकणे"

IMG_6247[1]
IMG_6250[1]
IMG_6249[1]
IMG_6253[1]