मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
19 Feb 2020 - 1:24 pm

मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये

तुझ्याकडून गिफ्ट आलेलं

पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं

फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा

नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं

हादरून गेलो उभाआडवा , काहीच सुचलं नाही

लक्षच लागत नव्हते माझे , सारखा स्कीनवर बघत राही

त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे

समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे

सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती

राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती

इनबॉक्समध्ये तुझ्यातर्फे फक्त एकच गिफ्ट होती

तिंहीं मजला जड होऊन आता नकोशी वाटत होती

बुद्धू ती कि मीच खुळा

याचा हिशेब जुळत नव्हता

केव्हा कधी नि कुठं घडलं हे

याचा शोधत होतो पत्ता

सेंट करावं दुसरी अशी कुणी भेटतही नव्हती

शोधून शोधून थकलो साऱ्या , सर तिची नव्हती

पाहिलं प्रेम फुलासंगे जुळता जुळता राहिलं

पानिपत झाल्यानंतर तिला कायमच ट्रॅश केलं

सुरु झालं त्या मेलमध्ये आणि तिथेच सार संपलं

झोपेची झेड आणि स्वप्नांचं ओझं देऊन बाजूला झालं

===================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Feb 2020 - 2:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

एवढे मनाला नका लावून घेउ,
माझ्या इन बॉक्सात पण अशी २५ -३० फुले आहेत जपून ठेवलेली
सगळ्यांचा हिशेब ठेवायला वयोमानाने आता जड जाते आहे, तेव्हा त्यासाठी एक सेक्रेटरी ठेवावी म्हणातो...
बघा आहे का एखादी गरजू, तिचेही कल्याण होईल आणि माझेही काम
पैजारबुवा,

माहितगार's picture

19 Feb 2020 - 3:39 pm | माहितगार

;)

माहितगार's picture

19 Feb 2020 - 4:07 pm | माहितगार

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे. ह्यो सादसुद मुक्तक अस्मादीकांनी खिलजीकाव्याने प्रेरीत होऊन लिवले आहे त्याचा अवश्य आस्वाद घ्येवा.

खिलजि's picture

19 Feb 2020 - 4:25 pm | खिलजि

@ पैंबू काका

प्रतिसाद भारीच आवडला गेलेला है .. अक्कूककाकांना शेक्रेटरींच्या सिलेक्शनसाठी फोटू पाठवायला सांगण्यात आलेले है .. थोडा धीर धरावा , हि नम्र इनन्ती...

@ मागाकाका

आपली कविता तुरट वाचनाला घेणार है ...धन्यवाद

माहितगार's picture

19 Feb 2020 - 4:32 pm | माहितगार

:)