डीकॉन्स्ट्रुकंटेड फ्रुट सलाड

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
17 Feb 2020 - 7:38 am

याला "सुट्टी सुट्टी फळफळावळ" असलं काही तरी शीर्षक सुचत होतं....

आज काल डी कॉन्स्ट्रुकंटेड सँडविच इत्यादी ची चलती दिसते.. तर म्हणलं करून बघूया तरी

सोप्प आहे, नेहमीचाच दूध घातलेलं करायचे नसेल तर
फोटुत सर्व आहेच वेगळी पाकक्रिया काही अशी नाही
य पदार्थात पोत( टेक्श्चर) साठी ३ गोष्टी वापरल्या आहेत

- खुसखुशीत पणा साठी सुकलेला केक ( उत्तर हिंदुस्तानांत केक रस्क ,, हा बदामाचा आहे ) किंवा भाजलेलं बदाम काप / अक्रोड पण वापरू शकता
- मऊ पोत म्हणून ( आणि गोडवा) फळे - चांगली पिकलेली
- वेल्वेट सारखा पोत म्हणून फेसलेली साय ( क्रीम) त्यात पाहिजे तसे स्वाद , ( यात केशर आहे) किंवा नेहमीचेच म्हणजे कस्टर्ड वापरू शकता !
पीच , प्लम, चेरी ( फ्रोझन वापरली आहे ताजी असल्यास उत्तम) कापआणि वेगळा म्हणून फणसाच्या कापाचे बारीक उभट काप.

वाढणे:
हा केक तसा कडक असतो , वरील फळांना जर थोडे पाणी सुटले तर तो रस प्रथम केक च्या तुकडयांवर सोडावा म्हजे ते थोडे मऊ होतील
बाकी मग पाहिजे तसे "कोन्स्ट्रुक्ट " करावे
IMG_7372[1]

प्रतिक्रिया

डीकन्सट्रक्टेड मोदक, पुरणपोळी करता येईल ना?

चौकस२१२'s picture

17 Feb 2020 - 9:00 am | चौकस२१२

खेचताय कि गंभीर पणे विचारताय?
पुरणपोळी च माहित नाही पण डीकन्सट्रक्टेड मोदक बघितला आहे म्हणजे १००% नव्हे .. पण काहीसा
जर प्रमेय मांडला कि मोदक म्हणजे गाभ्यात नारळ गूळ सारण आणि वर तांदुळाचं पीठचे आवरण
तर म्हणजे डीकन्सट्रक्टेड मोदक काहीस ASA
मलेशिया मध्ये तामिळ उपहारगृहात ..पुलुट इंटी असा काही तरी नाव असते ..
https://www.youtube.com/watch?v=ppbN6rECRrc

कंजूस's picture

17 Feb 2020 - 11:50 am | कंजूस

खेचत नाही.

डी० मोदक - तांदुळाची उकड आणि खोबऱ्याचं सारण वेगळं द्यायचं.
डी ० पुरणपोळी - गूळ न घातलेले पुरण पोळी, गुळाच्या पाण्यात बुडवून खायची. (( गोड पदार्थ प्राणी खात नाहीत, म्हणून हे करत असावेत. एकदा एका जत्रेत खाल्ली ही. ))
------

डी फ्रुट सलाड - मी जेव्हा एकटा राहायचो तेव्हा करायचो. आठवड्यात एक दिवस हॉटेलातही खायचे नाही आणि, घरी काही शिजवायचे नाही तेव्हा हा सोपा पोटभरू पदार्थ होता.
टोस्टचे तुकडे + खजूराचे काप +चिकुचे काप दुधात घालून पाच मिनिटे ढवळले की झाले काम.

चौकस२१२'s picture

17 Feb 2020 - 11:59 am | चौकस२१२

तांदुळाची उकड आणि खोबऱ्याचं सारण वेगळं द्यायचं.
हा ठीक पण त्याची मांडणी अशी करता येईल जपानी nigiri: सारखी
bottom is rice, top is slice of fish or फूड
तसे चौकनी आकाराचा उकडीचा पाय ( एकढाय बर्फी सारखा ) आणि वरती सारण

विनटूविन's picture

22 Feb 2020 - 11:23 pm | विनटूविन

पुण्यातल्या हिंदुस्तान बेकरीचे कप केक चालतील
असेच सुकलेले असतात