हातचं राखून

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
8 Jan 2020 - 3:24 pm

दात नाही
यावे दिसून
हसतो आम्ही
हातचं राखून

सर्वांपासून
लपून छपून
रडतो आम्ही
हातचं राखून

वजनावर
डोळा ठेऊन
जेवतो आम्ही
हातचं राखून

पहाटेचा गजर
लावून
झोपतो आम्ही
हातचं राखून

करत नाही
मनापासून
मदत करतो
हातचं राखून

मित्रांनाही
तोलून मोलून
मैत्री करतो
हातचं राखून

भावनांना
आवर घालून
जगतोच आम्ही
हातचं राखून

- सौ. रोहिणी विक्रम मनसुख

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

मनिष's picture

13 Jan 2020 - 1:10 pm | मनिष

भावनांना
आवर घालून
जगतोच आम्ही
हातचं राखून

अगदी चपखल! अल्पाक्षरी, नेमकी आणि छान कविता.

खिलजि's picture

13 Jan 2020 - 2:10 pm | खिलजि

शोल्लीड है ,, इडंबन स्पेशल माल है .. पण आवरते घेतलंय .. न्हायतर खत्रूड आलेली बोटांवर .. खत्रूड म्हणजी येकदम खत्तरनाक

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2020 - 4:44 pm | टवाळ कार्टा

इडंबन व्यनि करण्यात यावे अशी विनंती

पुरुष सुलभ कुचंबणा म्हणतात ती हीच....

#कोनाडा झालाच पाहिजे

चांगली कल्पना आहे. पण ती अंगावर येत नाहीये.. तशी आली पाहिजे. या कल्पनेची ताकद तशी आहे. तिला कवितेत आणखी थोडे रंगवून लिहायला हवे. :-)