भामरागड

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

भामरागड

भामरागड...! गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम समजल्या जाणार्‍या या भागाबद्दल इतकी भीती आहे की कुणीही नवीन व्यक्ती तिथे जायला आधीच घाबरते. मी मे २०१७मध्ये भामरागड येथील लोक बिरादरी संस्थेत कामावर रुजू झालो आणि हळूहळू या जागेच्या प्रेमातच पडलो. मग काय तर...!! ही जागा आहेच मुळी तशी.

इथलं निसर्गसौंदर्य, हिरवंगार जंगल, सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर आणि स्वच्छ नदीकिनारा, नदीकाठची गुळगुळीत रेती, भिन्न-भिन्न जातींचे पक्षी आणि त्यांचे सुमधुर आवाज, पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येच्या रात्री दिसणाऱ्या अगणित चांदण्या, नयनरम्य सूर्योदय आणि सूर्यास्त, लाकडी डोंग्याची सैर, विहंगम त्रिवेणी संगम, प्रेमळ आणि आपलंसं करून घेणारे माडिया-गोंड आदिवासी, आल्हाददायक पावसाळा आणि तुडुंब भरून वाहणार्‍या नद्या, पहाटेची थंडी या सगळ्याच गोष्टी मनाला भुरळ पाडणार्‍या आहेत.

दोन वर्षांत भामरागडमध्ये खूप फिरलो. बर्‍याच जंगलवाटांची सायकलवरून भ्रमंती केली. माझी सावलीही ऋतूनुसार साथ सोडायची, पण माझ्या कॅमेऱ्याने मात्र कधीच दगा दिला नाही. तो सदैव सोबतच असायचा. मग काय...? बरेच फोटो, व्हिडिओ कॅमेर्‍यात कैद केले. डेव्हलपमेंटच्या नावाखाली पुढे कधीतरी हा भाग 'सो कॉल्ड स्मार्ट' होईल आणि इथल्या निसर्गसौंदर्याचा नाश होईल या भीतीने मी काही आठवणी डिजिटली जपून ठेवल्या. एक आठवण म्हणून काही निवडक क्लिप्स आणि फोटोज एकत्र करून हा व्हिडिओ बनवला आहे. खरं पाहता काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भामरागडचं आख्खं सौंदर्य सामावणं अशक्यच आहे. मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही, त्यामुळे सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने व्हिडिओ त्या स्तराचा निश्चितच नाही. पण व्हिडिओ आपणा सर्वांना नक्कीच आवडेल आणि भामरागडची ओढ निर्माण करेल अशी आशा आहे.

लोकेश तमगीरे ह्यांचे यू ट्यूब चॅनेल

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 1:17 pm | यशोधरा

सुंदर आहे भामरागड. ही चित्रफीत पाहून एकदा तरी जावेसे वाटतेय.

लोकेश तमगीरे's picture

1 Nov 2019 - 9:38 pm | लोकेश तमगीरे

धन्यवाद ताई ..!
अवश्य भेट द्या.

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 7:39 pm | चौकटराजा

याचे पार्श्वसन्गीत तर फारच मन:शान्ती देणारे आहे पण प्रत्येक फ्रेम इतकी सच्ची आहे की काय बोलू ? तिला " सच्ची " हेच विशेषण योग्य ! इतर कोठे तुम्ही व्यक्त झाले आहात का ही उत्सुकता आता आहे !

लोकेश तमगीरे's picture

1 Nov 2019 - 9:41 pm | लोकेश तमगीरे

धन्यवाद ..!
संधी मिळाल्यास एकदा तरी नक्की भेट द्या भामरागडला.

अनिंद्य's picture

31 Oct 2019 - 1:20 pm | अनिंद्य

दिल बाग बाग हो गया !
काही दिवस/महिने अशा निवांत जागी जाऊन राहावेसे वाटायला लागले आहे.

लोकेश तमगीरे's picture

1 Nov 2019 - 9:41 pm | लोकेश तमगीरे

नक्की भेट द्या भामरागडला.

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 1:24 pm | पद्मावति

सुंदर.

लोकेश तमगीरे's picture

1 Nov 2019 - 9:42 pm | लोकेश तमगीरे

मनःपूर्वक धन्यवाद ..!

मित्रहो's picture

2 Nov 2019 - 8:11 am | मित्रहो

सुंदर फोटो आहेत. भामरागडला एकदा जायचे आहे. आनंदवनमधे बऱ्याचदा गेलो आहे पण भामरागडला जाणे कधी झाले नाही.
खूप दिवसानंतर डोंगा हा शब्द वाचला.

लोकेश तमगीरे's picture

3 Nov 2019 - 12:47 pm | लोकेश तमगीरे

एकदा तरी भामरागडला जाऊन या.
डोंग्यातुन सैर करून या.
भामरागडला जाण्यासाठी हिवाळा हा योग्य ऋतू आहे.
धन्यवाद !

नरेश माने's picture

4 Nov 2019 - 11:44 am | नरेश माने

खुप सुंदर आहे चित्रफित!
नक्षलग्रस्त आणि खुप दुर्गम भाग असल्यामुळेच ही निसर्गसंपन्नता अजून टिकून आहे असे राहून राहून वाटते. या भागाला भेट द्यायला नक्कीच आवडेल. विदर्भातील गडचिरोली हाच एक जिल्हा आहे जिथे कधी जाता आले नाही.

लोकेश तमगीरे's picture

13 Nov 2019 - 10:07 am | लोकेश तमगीरे

@नरेश माने:
निसर्ग संपन्नतेचं आपण जे बोलले ते पण कारण असू शकते.
गडचिरोली हा जिल्हा ७५% वन प्रदेश आहे. येथील निसर्ग निश्चितच आल्हाददायक आहे.
नक्की जाऊन या.

टर्मीनेटर's picture

5 Nov 2019 - 1:12 pm | टर्मीनेटर

निसर्गरम्य भामरागड आवडले!
तुम्ही वर सांगितले आहे कि भामरागडला जाण्यासाठी हिवाळा हा योग्य ऋतू आहे. आता हिवाळा सुरु होईल, तिथे यायचे झाले तर किमान किती दिवसांसाठी यावे आणि निवास / भोजनाची व्यवस्था कशी आहे ह्याबद्दलही माहिती दिलीत तर ती उपयुक्त ठरेल.
धन्यवाद.

लोकेश तमगीरे's picture

13 Nov 2019 - 10:12 am | लोकेश तमगीरे

@टर्मिनेटर:
धन्यवाद ...!
या लिंकवर दिलेल्या व्यक्तींशी संपर्क करा. ते तुम्हाला मदत करतील
http://www.lokbiradariprakalp.org/#contact

सुधीर कांदळकर's picture

12 Nov 2019 - 8:07 pm | सुधीर कांदळकर

चित्र आवडले पण निसर्गावर आक्रमण करणारे संगीत मला अजिबात आवडले नाही. लाटांचे आणि वल्ह्यांचे चुबुक चुबुक आवाज, पक्ष्यांचे आवाज इ. नैसर्गिक आवाजच ठेवले असते तर जास्त चांगले झाले असते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. नदी, तलाव इ. विविध जलाविष्कार छान टिपले आहेत. लांब शेपटीचा उडता पक्षी फारच आवडला. अनेक अनेक धन्यवाद.

लोकेश तमगीरे's picture

13 Nov 2019 - 10:19 am | लोकेश तमगीरे

मनःपूर्वक धन्यवाद !
आपल्या मताशी सहमत आहे.

सुमो's picture

12 Nov 2019 - 9:36 pm | सुमो

बकेट लिस्टमध्ये घातल्या गेले आहे.

लोकेश तमगीरे's picture

13 Nov 2019 - 10:21 am | लोकेश तमगीरे

वाह ...! तुमची इच्छा लवकरच पूर्ण होवो.

विनिता००२'s picture

14 Nov 2019 - 3:53 pm | विनिता००२

खूप सुरेख चित्रफीत! डोळे निवले पाहून.

मध्यंतरी वरोर्याला येणे झाले, पण भामरागढला यायला पुरेसा वेळ नव्हता. नक्की येईन. :)

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 9:49 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद