मला आवडलेला 'गन्स ऑफ नॅव्हरोन'

चौकटराजा's picture
चौकटराजा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

मला आवडलेला 'गन्स ऑफ नॅव्हरोन'

300px-Guns-of-Navarone

हॉलीवूड या सदराखाली येणारे सर्वच बोलपट हे अमेरिकेतील हॉलीवूड येथील चित्रनगरीतच बनवले जातात असे नाही. त्यातील काही इटाली व ब्रिटनमध्येही बनवले जात. क्वचित ऑस्ट्रेलियातही. तेथील चित्रपटांची एक शाखा अशी आहे, ज्यात लेखकांची पुस्तके गाजतात व त्यावर मग बोलपट निर्मिला जातो. त्यात ब्रॅम स्टोकर, आयर्विंग वॅलेस, फ्रेडरिक फोर्सिथ, सिडने शेल्डन, रॉबिन कुक, इयान फ्लेमिंग, आर्थर हेली, हॅरोल्ड रॉबिन्स, स्टीफन किंग, जॉर्ज ऑरवेल या नामावळीत एक आवर्जून नाव येते ते म्हणजे अ‍ॅलिस्टर मॅकलिन यांचे. साधारणपणे मिलिटरी पार्श्वभूमी, संदेह (सस्पेन्स), कॅरॅक्टर्स, अ‍ॅक्शन असा मालमसाला असलेली अनेक पुस्तके त्यानी गाजविली व निर्मात्यांनी मग 'नेव्हरोन', 'फिअर इज द की', 'फोर्स टेन फ्रॉम नॅव्हरोन', 'व्हेअर ईगल्स डेअर', 'बेअर आयलंड', 'आइस स्टेशन झेब्रा', 'पपेट ऑन अ चेन' व मुख्य म्हणजे 'गन्स ऑफ नॅव्हरोन' या कृतींवर चित्रपट निर्मिले. रॉर्बर्ट शॉ, एडवर्ड फॉक्स, रॉक हडसन, ग्रेगरी पेक, रिचर्ड बर्टन, क्लिन्ट इस्टवूड, डेव्हिड निवेन, अँथनी क्वीन या अशा स्टार्सनी त्यात कामे केली.

१९६३च्या सुमारास, मी दहा वर्षांचा असताना एका आमच्यापेक्षा सिनियर मुलाकडून मी पहिल्यांदा ज्या चित्रपटाची कथा ऐकली, त्या वेळेपासून निरनिराळ्या स्वरूपात हा चित्रपट मी तीसेक वेळा तरी पाहिला असेल. आजही हा चित्रपट १९६१ ते २०१६ एवढा काळ जाऊनही आपली लोकप्रियता टिकवून आहे. मी १९७० ते आजतागायत अगणित हॉलीवूडपट पाहिले आहेत. मनोरंजन हा निकष ठेवून पाहिले. त्यात पहिल्या दहात गणण्यासाठी मी या गन्स ऑफ नॅव्हरॉनची निवड केली तर तो वेडेपणा ठरू नये.

१९५७ साली या नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली व १९६१च्या एप्रिल महिन्यात त्यावरील आधारित चित्रपट निर्माण झाला. थोडेफार काही बदल चित्रपट माध्यमासाठी झाले. ग्रीस भागातील 'लेरॉस'च्या मोहिमेवर अ‍ॅलिस्टर मॅक्लीनने ही कादंबरी लिहिली. प्रत्यक्ष चित्रपटात उल्लेख असलेले 'नॅव्हरोन' नावाचे गाव अस्तित्वात नाही. त्यात आलेली इतर स्थळे - मंद्राकोस व सेंट अ‍ॅलेक्सिस हीदेखील काल्पनिक नावे आहेत.

चित्रपटासाठी निर्माता कार्ल फोरमन याने पटकथा लिहिली व जे.ली. थॉम्प्सन याने चित्रपट दिग्दर्शित केला. अमेरिकन नट ग्रेगरी पेक (कॅ. मॅलरी), मेक्सिकन नट अ‍ॅन्थनी क्वीन (आन्द्रया स्टवरोस) व ब्रिटिश नट डेव्हिड निवेन (कोर्पोरल मिलर) अशी मुख्य पात्रयोजना. बाकी स्टॅन्ले बेकर (ब्राउन), जेम्स डॅरेन (पापाडिमस), अन्थी क्वाएल (मोहिमेचा प्रमुख रॉय फ्रॅन्क्लिन), गिया स्कला इरिन पापास इ. मंडळी अशी कमांडोची फौज. एक गिर्यारोहण एक्स्पर्ट, दुसरा स्पाय, तिसरा सुरामार, चौथा फायरिग मशीन यांना जेन्सन नावाचा मिलिटरी अधिकारी एकत्र आणतो. काम काय असते, तर तुर्कस्तानने युद्धात आपल्या बाजूने लढावे असा दबाब त्या देशावर आणण्यासाठी जर्मनांचा त्या भागात शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न असतो. केरोस नावाच्या बेटावर थकलेले असे दोस्तांचे २००० सैनिक व त्यांची सुटका होऊ नये म्हणून एका सरळ फक्त विमानानेच हल्ला करता येईल अशा गुहेत ठेवलेल्या दोन रडारनियंत्रित तोफा. याच त्या 'गन्स ऑफ नॅव्हरोन'.

चित्रपटाची श्रेयनामावली ग्रीक खंडहरांच्या पार्श्चभूमीवर चालू होते... गर्द निळ्या फिल्टरचा वापर करून रात्रीचा परिणाम साधत. केशरी अक्षरात प्रकट होणारी अक्षरे जरी इंग्लिश भाषेत असली, तरी ती ग्रीक लिपीचा फील देत राहतात व नंतर करड्या आवाजात पूर्वपरिचय दिला जातो.
ग्रीस आणि एज्यन सागराने अनेक रोमांचक साहसकथांना व युद्धकथांना जन्म दिला आहे. हे एकेकाळचे अभिमान मिरवणारे पण आता फक्त भग्न अवशेष स्वरूपात राहिलेले पाषाण त्या कहाण्यांचे साक्षीदार आहेत. त्या संस्कृती जन्मास आल्या, वाढल्या व नष्ट झाल्या. आज रंगमंच तोच, पण आमच्या कथेचे नायक कुणी ग्रीक कथेतील देव नाहीत, तर आहेत सामान्य माणसे. १९४३च्या सुमारास ग्रीस सागराच्या कुशीतील खेरोस नामक एक बेटावर २००० दोस्त सैनिक हताश अवस्थेत सुटकेची वाट पाहात आहेत. त्यांना एक आठवडाच फक्त काय तो जगवू शकेल. दरम्यान तटस्थ तुर्कस्तानने आपल्या बाजूने युद्धात उतरावे, यासाठी जर्मन तुर्कस्तानला आपल्या सामरिक ताकदीचे दर्शन घडविण्यासाठी उतावीळ झालेत. या सागरी प्रदेशात थेट घुसणे कोणाही बलशाली जहाजाला शक्य नाही, कारण एका गुहेत जर्मनांनी लावलेल्या रडारनिर्देशित अतिशय ताकदवान तोफा.... नॅव्हरोन येथील 'गन्स ऑफ नॅव्हरोन' पुढे सहा दिवसात आमच्या या नायकांनी जे घडविले, ती एक दंतकथा बनून राहिली आहे.

***

एकूण कथानक

The-team-lands-in-Navarone-5a67487472dd57ad1a739d52d8d86967

जेसनने सर्वाना एकत्र एकत्र आणल्यावर ही कमांडो मंडळी त्याना दिलेल्या प्लानप्रमाणे एक बंदरात उतरतात. मेजर रॉय फ्रॅन्क्लिनकडे मोहिमेचे नेतृत्व असते.

todays-jetty

आज र्‍होडसचे ' मंद्राकी पोर्ट' असे गजबजलेले दिसते.

हे कमांडो मंडळ एकत्र आल्यावर एक बोट भाड्याने घेतात व आपण मच्छीमार आहोत असा वरकरणी देखावा करून बोट आपल्या गंतव्य स्थानाकडे - म्हणजे नॅव्हरोनकडे हाकू लागतात. पहिला टप्पा असा येतो की गस्त घालणार्‍या एका जर्मन जहाजाच्या नजरेत ही नाव येते. संशय येतो, म्हणून त्या जहाजावरील अधिकारी यांच्या जहाजावर येतो. आणि...

...काही क्षणात धुमश्चक्री चालू होते. जर्मन जहाजाची पार वाट लावून हे कमांडो पुढे सरकतात. पण आता दुसर्‍या टप्प्यावर आणखी एक संकट समोर ठाकते - रात्रीच्या अंधारात प्रचंड वादळात नाव सापडते व अथक प्रयत्नानंतर नाव किनार्‍याला लागते तीच मुळात तुकडे तुकडे होऊन. कसेबसे सारे जण ओल्या भयानक अंधारात खवळलेल्या समुद्राशी सामना करीत अशा जागी पोहोचतात, जिथून ४०० फूट उंचीचा सरळसोट कडा त्यांची वाट पाहात उभा असतो. नॅव्हारोन गावात छुपेपणे घुसण्यासाठी फ्रॅन्कलीनने या अजब रस्त्याचा प्लान आखलेला असतो व त्याने त्यासाठी हाय कमांडकडे निष्णात गिर्यारोहक कॅ. मेलरी याची मागणी केलेली असते.

कडा चढून गेल्यावर असे लक्षात येते की मेजर फ्रॅन्कलीनच्या पायाला गँग्रीन झाले आहे व तो आता स्ट्रेचरशिवाय कंपूबरोबर येऊ शकत नाही. तेव्हा याचे काय करायचे? असेच सोडायचे की मारून टाकायचे? कारण तो असा जिवंतपणे जर्मनांच्या तावडीत सापडला, तर त्याचे हाल हाल करून त्याच्याकडून मोहिमेची बित्तंबातमी वदवून घेण्यात येईल व मग सब खतम! अशा वेळी कॅ. मॅलरी सर्व सूत्रे ताब्यात घेतो व अगदी नाइलाज झालाच तर मेजरला जीवनमुक्त करायचे, असे ठरते.

gunsnavarone18-2

User-On-At-St-Alexis-Ruins-309-5da6a33043927e67be47c7613e621ffa
आज पर्यटकांचे लाडके स्थान लिन्डॉस अ‍ॅक्रोपोलिस, र्‍होड्स बेट, ग्रीस.

नॅव्हरोनला जाण्याचा मार्ग सेट अलेक्सीस (चित्रीकरणात लिंडोस अ‍ॅक्रोपोलिस)च्या खंडहरातून जाणार असतो, पण मध्येच पुन्हा कमांडोजना ग्रीसमध्ये घुसलेल्या जर्मन सैनिकांबरोबर लढत जावे लागते. अखेर एका रात्री हे सेंट अलेक्सीसच्या खंडहरात पोहोचतात. पाळीपाळीने पहारा द्यायचे ठरते. तेवढ्यात दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असताना प़कडल्या जातात. जो पकडतो, त्याचे नाव पॅपाडिमस असते. त्याची सख्खी बहीण त्या दोन व्यक्तीतील एक असते. त्या दोघी या कंपूला सामील होतात व सर्व जण गुप्तपणे मंद्राकोस गावात प्रवेश करतात.

गावात एका चौकात एका लग्नाची पार्टी चालू असते, त्यात हे लोक शिरतात. असे असताना जर्मनांना आतापर्यंत पत्ता लागलेला असतो की गावात कुणी 'परका' आलेला आहे. जर्मन सैनिक येतात. पण पार्टीचा संयोजक त्यांची समजूत घालतो. पार्टीत पारंपरिक चाल असलेले 'यालो यालो' हे गीत चालू होते. पण आता नवीनच अडचण कंपूपुढे ठाकते. पुन्हा सैनिक येतात व या सर्वाना पकडून नेतात. यांनी आणलेली स्फोटके कुठे लपविली आहेत याविषयी कसून चौकशी सुरू होते. यांना युनिफॉर्म नसल्याने हेर ठरविले जाऊन मृत्यूची शिक्षा होईल अशी ताकीद दिली जाते. तेवढ्यात आन्द्रिया जर्मनाना सांगतो की तो सायप्रसचा एक साधा कोळी असून या लोकांनी त्याला डांबून बळेच आणले आहे. या प्रसंगात अँथनी क्वीन या नटाला नाट्यपूर्ण अभिनयाची संधी मिळाली आहे. गयावया करायचा अभिनय तो करीत असतानाच बाकी सारे अचानक जर्मन अधिकार्‍यावर तुटून पडत स्वतः ची सुटका करून घेतात व जर्मन अधिकार्‍यांना बांधून ठेवत फ्रॉन्कलीनला मेडिकल ट्रीटमेंटसाठी जर्मनांच्या ताब्यात देतात. दरम्यान मेजरला मेलरी खोटेच सांगतो की त्या जबरदस्त तोफा उडवायची त्यांची मोहीम रद्द झाली आहे. हेतू हा की जर्मनाना मिळालीच तर खोटी माहिती मिळावी.

परिणामतः नॅव्हारोनमध्ये किनार्‍यावर सरळ हल्ला होणार या समजुतीने जर्मन फौजा गस्त घालू लागतात. त्यामानाने 'गन्स'कडचा फौजफाटा कमी केला जातो. माद्रकोस गावातून नॅव्हरोनमध्ये प्रवेश करताना असे लक्षात येते की कंपूत कोणीतरी फितूर आहे. मिलरने आणलेली बहुतेक स्फोटके एकतर नाहीशी झाली आहेत किंवा निकामी. उपयोगास येतील असे फार कमी सामान शिल्लक. असे असताना सर्वांमध्ये अगदी नाट्यपूर्ण खडाजंगी होईल अशी व्यवस्था लेखक अलिस्टर मॅक्लीनने केलेली आहे. मिलर तावातावने आपला संशय मांडत असतानाच त्याला उमगते की दोन स्त्रियांपैकी अ‍ॅना ही फितूर आहे. जर्मनांनी अ‍ॅनाचे हाल केलेले असतात व सुटकेच्या बदल्यात तिला या 'फितुरी'च्या कामगिरीवर पाठविलेले असते. दरम्यान मॅलरी भावनिकरीत्या अ‍ॅनात गुंतलेला असतो, पण "घ्या इंग्लंडचे नाव व खेचा ट्रिगर!!" असे मिलर मॅलरीला आव्हान देतो. अ‍ॅनाला मारण्यासाठी मॅलरी चाप ओढणार, तोच अ‍ॅनाची मैत्रीण मरियाच तिला ठार करते.

आता सर्व जण वेगवेगळे होतात. आन्द्रिया व मारिया एक बोट पैदा करून सुटकेचा प्लान करतात. स्फोटकतज्ज्ञ मिलर व मॅलरी गन्स उडविण्यासाठी गढीत प्रवेश करतात. गावात गोंधळ माजविण्यासाठी गेलेला पापाडिमस मारला जातो. गढीत सर्वांची नजर चुकवीत मिलर व मॅलरी तोफा असलेल्या गुहेत प्रवेश करतात. लिफ्टच्या शाफ्टला
स्फोटके बांधून काही कुचकामी स्फोटके प्रत्यक्ष तोफांवर लावली जातात.

हे सर्व होत असताना तोफांच्या समोर असलेल्या समुद्रात दोस्त राष्ट्रांची जहाजे मात्र तोफांच्या समोर बेडरपणे कूच करू लागतात. तुफानी जहाजे पाण्यात बुडविण्यासाठी जर्मन सैन्य गुहेत सज्ज होते. दरम्यान मिलर व मॅलरी पाण्यात उड्या मारून पसार होत अगोदरच तयार ठेवलेल्या नावेत मारिया व आंद्रिया याना सामील होतात .तिकडे लिफ्ट शॅफ्टला लावलेली स्फोटके उडतात व दोन्ही गन्ससकट पूर्ण गुहा जमीन दोस्त होते.

मारिया व आन्द्रिया यांचे जे सूत जुळलेले असते, त्याचा परिणाम म्हणून किनार्‍याला बोट लागल्यावर ते दोघे क्रीटला स्थायिक होण्याचे मनोगत व्यक्त करतात. बोटीत उरलेले मिलर व मेलरी एकमेकाशी संवाद साधताना मिलर म्हणतो, "मॅलरी, मला वाटते जे घडले ते असे घडलेच नसते.. खरे ना?" मॅलरी म्हणतो, "हो, मलाही असेच वाटते.

इथे हा रोमहर्षक चित्रपट संपतो.

***

guns-of-navarone-04

'त्या' तोफांचा सांभाळ करणाऱ्या गुहेचा हा सेट. ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल, ते मान्य करणार नाहीत की याच त्या दोन तोफा व हीच ती गुहा. पण संकलन, प्रकाशयोजना इत्यादी इत्यादि साधनांनी सर्व खरे वाटावे असे जग चित्रपट दाखवीत असतो. या चित्रपटाला त्या वर्षीचा 'सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट'चा गौरव प्राप्त झाला तो कसा, याची झलक म्हणून वरचा फोटो.

Guns-of-Navarone-detail-04-CU-2

चित्रपटातील एकूण दृश्य परिणाम साधण्यासाठी दोन तीन लेअर (पातळ्या) वापरून पाहाव्या लागतात. विशेषतः ऐतिहासिक चित्रपटात अशा तंत्राची फार आवश्यकता भासते. वरील चित्रात चित्रकाराने तयार केलेले एक पेंटिंग आहे, ते नॅव्हॅरोन गावाची पार्श्वभूमी सूचित करते. त्यात खाली दाखविलेला तो गोलाकार किनारा अस्तित्वातील आहे, बाकी सर्व गाव काल्पनिक.

***

या चित्रपटात अनेक गोष्टी पात्रांच्या खाजगी आयुष्यातील संदर्भ देऊन जातात. आपल्या बायका-मुलांची हत्या झाली ती मेलरीच्या उदार स्वभावामुळे, या समजुतीने आन्द्रियाला मेलरीला युद्धसमाप्तीनंतर संपवायचे आहे. मिलरला या युद्ध वगैरे प्रकाराचाच जाम राग आहे. मेलरीला मुळात रजेवर जाण्याच्या तयारीत असतानाच हा अशक्यप्राय कडा चढून जाण्याची कामगिरी दिली आहे, याची थोडीशी नाराजीच आहे. कर्नल आन्द्रिया यांच्या नावे पराक्रमाचा इतिहास आहे.
कमांडो मार्गी लागल्यावर त्यांना या मोहिमेवर पाठविणार्‍या जेसनला त्याचा स्वयंपाकी विचारतो, "सर, तुम्हाला वाटतं की हे यशस्वी होतील?" जेसन म्हणतो, "खरे सांगायचे झाले तर नाही...अर्ध्या वाटेवरच मरतील... पण काही फरक पडत नाही. युद्धात असे बळी जायचेच! कदाचित.. माणूस वेडाच्या भरात अचाट काम करून जातो ना, तसेही होईल. फत्ते करतीलसुद्धा!"
संपूर्ण चित्रपटात एक सीनला दुसरा सीन जोडत असताना संकलकाने सररास 'फेड इन फेड आउट' तंत्राचा वापर केला आहे. प्रेक्षकांचे अवधान सतत पडद्यावर असावे म्हणून एकामगून एक घटना उलगडत जात असतात. चित्रीकरणात वपरलेली स्थळे आता ६० वर्षांचा काळ उलटून गेल्याने आमूलाग्र बदलली आहेत. चित्रपटात काम करणारे जवळजवळ सर्व काळाच्या पडद्याआड गेलेत. यात काम करणार्‍या जेम्स डॅरेन या नटाने आपले लग्न झाल्यावर खास र्‍होडस बेटावर हनिमून साजरा केल्याची आठवण सांगितली आहे, तर चित्रीकरणाच्या काळात डेव्हिड निवेन हा जाम आजारी झाल्याने एकूण प्रोजेक्ट फाफलते की काय, असाही पेच उत्पन्न झाला होता. निर्मात्याच्या व आपल्या सुदैवाने निवेन खडखडीत बरा झाला व आपल्याला एका उत्तम मनोरंजक सिनेमाची कायमची देणगी मिळाली.
या चित्रपटास त्या वर्षी (१९६१) बॉक्स ऑफिसवर दुसर्‍या क्रमांकाचे यश मिळाले व ६ अ‍ॅकॅडमी नॉमिनेशन्स मिळाली, पैकी उत्तम स्पेशल इफेक्टचे अ‍ॅवार्ड अंतिमतः पदरात पडले. गोल्डन ग्लोबचे बेस्ट मोशन पिक्चर अ‍ॅवॉर्ड मिळाले.
एक मस्त युद्धपट-हेरपट-साहसपट-ड्रामा अशी या चित्रपटाची संमिश्र जातकुळी सांगता येईल. यात मात्र या सामान्य असणार्‍या माणसात युद्ध करण्याच्या कल्पनेविषयी काही ठिकाणी नाराजी दिसते. सुरामारीला अगदी कंटाळलेला बुचर (स्टॅन्ले बेकर), आपल्या माणसांच्या जीवनाला हाराकिरीपेक्षा अधिक महत्त्व देणारा स्क्वाड्रन लीडर बार्न्सबी (रिचर्ड हॅरिस), मनातून युद्ध अजिबात न आवडणारा कॉर्पोरल मिलर (डेव्हिड निवेन) या पात्रांच्या तोंडी असे नापसंतीचे उल्लेख दिसतात.
कोणताही चित्रपट उत्तम होण्यासाठी सशक्त व पटणारी कथा, बांधीव पटकथा, योग्य पात्रयोजना, उत्तम अभिनय, व्यक्तिरेखा याबरोबर बहारदार चित्रीकरण व दिग्दर्शन हे घटक महत्त्वाचे असतात. नुसत्या संगणकीय चमत्कृतींनी चित्रपट उत्तम बनत नसतो. गन्स ऑफ नॅव्हरोन या चित्रपटात हे सर्व गुण आढळून येतात. थोडा मानवी चेहरा असलेला युद्धसैनिक मॅलरी, निर्दय अन्द्रया, मिश्कील मिलर अशी व्यक्तीचित्रे आपल्याला पाहायला मजा येते. ब्रिटनमधील व अमेरिकेतील काही स्टुडिओंमध्ये चित्रपटाचे शूटिंग झाले, तसे ग्रीसमधील र्‍होडस बेटावर झाले. विशेषत: जुने र्‍होडस बंदर, राजवाडा, निकोलस बे व लिंडॉस अ‍ॅक्रोपोलिस इथे चित्रीकरण करण्यात आले.
चित्रपटात संगीताची बाजू दिमित्री टिओम्किन याने सांभाळ्ली आहे. त्याबद्दल त्यांना त्या वर्षीचा उत्तम संगीताचा गौरव प्राप्त झाला होता. पारंपरिक ग्रीस गाणे 'यालो यालो' याची मधुर चाल व सुरुवातीची गन्स ऑफ नॅव्हरोनची सिंफनी आजही अनेक वाद्यवृंद वाजवीत असतात. याच चालीवरचे 'गन्स ऑफ नॅव्हरोन' हे कोरस गीतही शेवटी पार्श्वभूमीवर वाजत असते .
जे युद्धशास्त्रात तज्ज्ञ आहेत, त्यांना चित्रपटात काही चुका नक्कीच आढळतील. पण शेवटी 'ये तो खाली पिच्चर है भाय' असा विचार करून मी परत परत हा सिनेमा न कंटाळता पाहात असतो.

श्रेयनिर्देश: प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Oct 2019 - 6:11 pm | कुमार१

सुंदर परिचय.
छान फोटो.
लहानपणी हे नाव ऐकले होते. आता विषय कळला. सवडीने बघेन.

भंकस बाबा's picture

25 Oct 2019 - 8:50 pm | भंकस बाबा

मजा आला , अगदी लहानपणी हा सिनेमा बघितला होता . त्या आठवणी जाग्या झाल्या. आता परत एकदा बघिन

भंकस बाबा's picture

25 Oct 2019 - 8:51 pm | भंकस बाबा

मजा आला , अगदी लहानपणी हा सिनेमा बघितला होता . त्या आठवणी जाग्या झाल्या. आता परत एकदा बघिन

नाखु's picture

25 Oct 2019 - 11:11 pm | नाखु

हिंदी भाषेत डब केलेला असेलतर चांगले, किमान उपशिर्षक तरी हिंदी असलेले चालेल.

कॉलेजवयीन आठवणी सांगताना वडील कायम हरखून जातात ह्या सिनेमाबद्दल बोलताना. आम्हाला गमतीत हिनवताना म्हणतात "काय बेट्या तुमचे हे एमआय २ अन स्कायफॉल मजा होती बघा खरी नव्हेरॉन मधेच"

सोत्रि's picture

26 Oct 2019 - 8:28 am | सोत्रि

अतिशय भन्नाट चित्रपटाचे तितकेच भन्नाट रसग्रहण!

- (ह्या रोमहर्षक चित्रपटाचा चाहता) सोकाजी

सोकाजीबोवांसारखेच म्हणते, भन्नाट लिहिले आहे काका! एकदम कडक!

माझ्या इजिप्त मालिकेतील एका धाग्यावर ‘सिटाडेल ऑफ कैतबे’ चा फोटो पाहून तुम्हाला ह्या चित्रपटाची आठवण झाल्याचे तुम्ही प्रतिसादात लिहिलेले स्मरते. तुमच्या शिफारशीमुळे माझ्या पाहण्यात आलेला हा चित्रपट आवडला होता, आणि आता त्याचे तुम्ही केलेले रसग्रहणही आवडले! धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 7:40 pm | सुधीर कांदळकर

हा चित्रपट मेट्रोला लागण्याअगोदर त्याचा ट्रेलर पाहिला होता. त्यातला अ‍ॅक्सेन्ट कळत नव्हता आणि कादंबरीही उपलब्ध नव्हती म्हणून पाहिला नाही. आपण छान ओळख करून दिलीत.

अ‍ॅलिस्टर मॅक्लीनचे नाव काढलेत आणि अनेक स्मृती जाग्या झाल्या. अनेक अनेक धन्यवाद.

त्याची पाणबुडीची कादंबरी बहुधा फीअर इस द की वाचली तेव्हा तो चित्रपट पाहावासा वाटला होता. पण राहून गेला.

ऑर्थर हॅलेच्या मनीचेंजर्स, हॉटेल वगैरे पण वाचलेल्या आठवतात. एअरपोर्ट राहून गेली. चित्रपट/चित्रवाणी चा दिग्दर्शक सिडनी शेल्डन नंतर वयाच्या ५२व्या वर्षी त्या व्यवसायाला रामराम ठोकून कादंबरीलेखक बनला. त्याच्या पण काही कादंबरृया वाचल्या. मुंबईतल्या वाहतूक मुरांब्यातल्या प्रवासात कादंबर्‍या वाचण्यासारखे दुसरे सुख नाही.

तोतया बनवणे ही मध्यवर्ती संकल्पना असली तरीआयर्विंग वॉलेस हा तर माझा आवडता लेखक. द फर्स्ट लेडी आणि सेव्हन्थ सीक्रेट फारच सुंदर कादंबर्‍या. पण त्याच्या कोणत्या कादंबरीवर चित्रपट आला होता?

जातीवंत भटका's picture

26 Oct 2019 - 11:50 pm | जातीवंत भटका
जातीवंत भटका's picture

26 Oct 2019 - 11:51 pm | जातीवंत भटका
जातीवंत भटका's picture

26 Oct 2019 - 11:51 pm | जातीवंत भटका
जातीवंत भटका's picture

26 Oct 2019 - 11:51 pm | जातीवंत भटका

झक्कास...आता परत एकदा पाहावा लागणार ...

आवडनिवड वेगळी असते. ती बाजूला ठेवून - चौराकाका नेमकं आणि बरोबर वर्णन करतात.
मी याच वेळचा ' दी लॉन्गेस्ट डे' पाहिला बहुतेक पण मला युद्धपटाचा कंटाळा येतो हे ओळखून बाबांनी मला फक्त मायकल एन्जलोच्या ( शिल्पकार चित्रं कशी काय काढणार आणि त्याला हे चर्चच्या छतावरचे रंगवायचे काम का दिले असा विरोध असतो. पण रंगकाम पुढे सरकते तेव्हा लोक म्हणू लागतात अरे हा तर खरा चित्रकार.) सिनेमाला नेले होते.
बाकी इंग्लड आणि इतर देश दोस्त राष्ट्रे, वि जर्मन शत्रु हे काही समजत नव्हते. कोणी कोणाशीतरी लढते, माणसं मारतात एवढाच अर्थ निघायचा.
नंतर ७६ मध्ये एक 'प्याटन' नावाचा सैन्याधिकाऱ्यावर चित्रपट कॉलेज मित्राने बघायला नेले. एका रडणाऱ्या जखमी सैनिकाला तो थप्पड मारतो हे चित्रपटाचे सार होते एवढंच मला कळलं. एकूण युद्धपट, संगीत नाटके,चित्रपट एका प्रेक्षकाला मुकला.

युद्धपट आणि प्रेक्षक या विषयावर चौराकाका नक्की लिहितील दुसरा लेख.

Jayant Naik's picture

27 Oct 2019 - 7:15 pm | Jayant Naik

फारच सुरेख परिचय. पुन्हा चित्रपट पाहिला असे वाटले.

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 11:55 am | किल्लेदार

फार पूर्वी बघितला होता. जुना चित्रपट असल्यामुळे ऍक्शन अंमळ धीमी वाटली होती. लेख वाचल्यावर आता परत एकदा बघावा म्हणतो.

चौकटराजा's picture

29 Oct 2019 - 9:26 pm | चौकटराजा

अजिबात कथानक नसलेले कुंग फू , मार्शल आर्ट सारखा हा सिनेमा नाही तसा तो यद्धपट ही नाही युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ती सहासपूर्ण हेरकथा आहे ! त्यात सुरूवातीसच म्हटले आहे की ही माणसे कुणी डेमी गॉड नव्हेत तर ती सामान्य माणसे आहेत .

किल्लेदार's picture

30 Oct 2019 - 6:33 pm | किल्लेदार

पण फार लहान असताना हा चित्रपट बघितला आणि त्या वयात ऍक्शन जरा जास्त अपील होते. तेव्हा युद्धपट म्हणजे वेगळीच अपेक्षा असायची

गुल्लू दादा's picture

29 Oct 2019 - 4:36 pm | गुल्लू दादा

नक्की बघणार चित्रपट आता..आभारी आहे

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 9:29 pm | पद्मावति

खुप सुंदर ओळख. नक्की बघणार.

सर्वसाक्षी's picture

30 Oct 2019 - 10:05 am | सर्वसाक्षी

जाग्या करणारं झकास रसग्रहण. महाविद्यालयीन जीवनातील मित्रांबरोबर तास बुडवून पाहिलेल्या चित्रपटांपैकी हा एक युद्धपट.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2019 - 7:58 am | मुक्त विहारि

गन्स ऑफ नॅव्हेरॉन आणि व्हेअर ईगल्स डेअर हे माझे पण अत्यंत आवडते सिनेमे..

हा चित्रपट १९६१ साली आला, तेंव्हा मी ९ वर्षांचा होतो. मोठे भाऊ, काका वगैरे इंग्रजी सिनेमे बघायचे (तेंव्हा इंदुरात पत्र्याच्या बनलेल्या 'स्टार्लिट' नामक थेट्रातच फक्त इंग्रजी पिच्चर लागत) तेंव्हा मलाही घेऊन जायचे. त्याकाळी 'दुवन्नी' म्हणजे दोन आणे तिकीट असायचे (सर्वात पुढली लाकडी बाकड्यांची रांग) आणि लहान मुलांना फ्री. मात्र मला कोणत्याही पिच्चरातले काहीही कळत नसे, आणि मी आपला मागच्या बाजूने भोकातून येणार्‍या प्रकाशाच्या तिरिपी केंव्हा संपतात, हे वळून वळून बघत "आपण घरी केंव्हा जाऊ? असे विचारत रहायचो. मला मुख्य आकर्षण मध्यंतरात मिळणार्‍या 'क्रीम-रोल' चे असायचे.
थोडक्यात म्हणजे हा पिच्चर मी 'बघितलेला' आहे हे छातीठोकपणे सांगू शकतो.
.... मात्र त्यात काय काय होते, ते मात्र आज या लेखातून समजले, आणि तेही फारच उत्तम रितीने.

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 5:21 pm | श्वेता२४

रसग्रहण आवडले.

जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या, ग्रेट एस्केप, ब्रीज ऑन द रिव्हर कॉय, डर्टी हरी, खरोखर कुठे गेले हो ते चित्रपट , ते हिरो. चार्ल्स ब्रानसन तर माझा फेव्हरेट. रात्री सात वाजता श्रीनगर मधील लालचौकतील palladium टोकिजला हे चित्रपट लागायचे, ते पाहण्याची इतकी आवड की थंडीत रात्री परत येण्यासाठी बस नसल्याने आम्ही मुले पंधरा की. मी. पायपीट करत असू. मला नवीन रोबोचे, बॅटमॅन, सारखे चित्रपट अजीबात आवडत नाहीत.

चौकटराजा's picture

3 Nov 2019 - 9:00 am | चौकटराजा

अगदी अगदी ! तुम्ही बॉण्डच्या कोणत्याही सिनेमात तो एका वेळी दहा जणांशी लढताना व त्यांना सर्वाना बुककी मारून बेशुद्ध करणारा पहिले आहे काय ? बॉंडने कधी अर्नोल्ड सारखे एका हाताने मोटरचे दार उखडलेले पहिले आहे काय ? वास्तव व अद्भुत रस याचा संगम बॉण्डच्या पटात दिसतो तसा तांत्रिक अदभूत पणात दिसत नाही ! धातूचा माणूस काय होतो माणसाचा धातूचा पुतळा काय होतो !

सुंदर ओघवते वर्णन, साधारण 35 वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता, न्यू एम्पायरला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
धन्यवाद!

मॅक्लिनने सुरुवातीच्या काळात काही जबरदस्त कादंबर्‍या लिहिल्यात. नंतर नंतर मात्र त्याचा दर्जा काहीसा खालावत गेला. गन्स ऑफ नॅव्हरॉन त्याच्या उत्कर्षाच्या काळात लिहिलेली कादंबरी.
एखाद्या कादंबरीवरुन चित्रपट बनवणे प्रचंड आव्हानात्मक असते. बर्‍याचदा कादंबरीचा मूळ आत्माच चित्रपट बनवतांना हरवून जातो. मात्र ह्या चित्रपटाने हे शिवधनुष्य सुरेखरित्या पेललेय.

चौराकाका, आपले लेखन आवडलेच.

सुमो's picture

6 Nov 2019 - 5:45 am | सुमो

मॅक्लिन हे आवडते लेखक एकेकाळचे. हा चित्रपट आणि नंतरचा फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन अलका टॉकीजला पाहिले होते.

यालो यालो मुद्दाम ऐकलं बऱ्याच दिवसांनी.