आहा ते सुंदर दिन हरपले

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 5:06 pm

आहा ते सुंदर दिन हरपले
---------------------------------
निवांत क्षणी आठवणीच्या गल्लीत फेरफटका मारला स्वीट होम
आठवले स्वीट होम उपाहार गृह
मंडईतून आठवड्याची भाजीपाला खरेदी झाली कि कुमठेकर रोड वरील हे उपहार गृह
त्याला भेट दिली नाही असा पुणेकर विरळाच
इडली सांबार -साबुदाणा खिचडी -व उपमा ह्या त्या हॉटेल मधल्या फेमस डिशेस
त्या काळी इडली सांबार वर शेव भुरभुरली जात असे
नव्या पिढीला माहीत नसेल पण इडली सांबार च्या बाउल मध्ये दोन चमचे सायक तूप घातले जाई
फोडणीत भरम साठ कोथिंबीर व तिखट असे त्यामुळे सांबार वर तर्रि चा तवंग असे
हटके चवीचं सांबार खावे तर स्वीट होम मध्ये
उपमा पण हटके चवीचा असे वर शेव भुरभुरली जात असे
साबुदाणा खिचडी मात्र मला नाही आवडली -तिखट जाळ तेलातली खिचडी -मात्र सोबत दही वाटी दिले जात असे
बहुतेक घरात खिचडी साजूक तुपात केली जाते -दाण्याच्या कुटाचा वापर करताना हात आखडता घेतला जात नसे

बटाट्याचे काप असे -अशी खचडी म्हणे चंगळ -त्या साठी लंगडा उपवास धरला जाई
जायफळ घातललेली कॉफी हि स्वीट होम ची खासियत
नाश्टा मग कॉफी घेतली कि नाश्टा संपन्न होत असे
हे वर्णन ६८-६९ सालातले आहे
हॉटेल भागीदारीत चालत असे
पुढे भागीदारात तंटे झाले -कामगारांनी युनियन केली सम्प झाले
व हॉटेल चि रया गेली -काही काळ हॉटेल बंद होते
आज मितीला हॉटेल चालू आहे
पदार्थांची चव मात्र सेम आहे
*
लक्षमी रोड वर समाधान उपहार गृह नावाचे हॉटेल होते
दही बटाटा पुरी हि डिश त्या उपहार गृहाची खासियत
फार चवदार डिश असायची
तिथ हाडदेगीरी झाली कि कॉर्नर ला गणू शिंदे कोल्ड्रिंक नावाचे आईस स्क्रीम पार्लर आहे
दही आईस स्क्रीम हि त्यांची खासियत -महाराष्ट्रात दही आईस स्क्रीम बनवणारे ते एकमेव आईस स्क्रीम पार्लर आहे
या व्यतिरिक्त क्याम्प मधल्या दोराबजी ची धनसाक -इस्लामिया हॉटेल मधला मटण मसाला -नाझ चे सामोसे
कयानी केक -मेंन स्ट्रीट वरील चुरमुरे भेळ -अश्या अनेक चवदार आठवणी आहेत
त्या वेळी वय तरुण असे -खाण्याचा शौक होता
आठवणी आल्या हि सहज म्हटले जाते -आहा ते सुंदर दिन हरपले

पाकक्रियालेख

प्रतिक्रिया

हस्तर's picture

10 Oct 2019 - 2:17 pm | हस्तर

२००४ मिलन dining हॉल केळकर रोड