पेंन ड्राइव्ह

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 5:02 pm

खूप छान व हॅण्डसम दिसतेस -बघत राहावेसे वाटते -प्रिया म्हणाली

काहीतरी काय- साधा माणूस आहे -सरळ साधा संवेदना क्षम मनाचा तो म्हणाला

म्हणून तर मला आवडतोस -प्रिया

पण तुला माझी पर्वा नाही -प्रिया

असं का बोलतेस ?

तू ज्या ब्यांकेत काम करतोस तिथल्या क्लायंट्स ची लिस्ट माहिती मला हवी होती

माझासाठी ते फार महत्वाचे आहे -माझं प्रमोशन -पगार वाढ सार त्यावर अवलंबून आहे -प्रिया

त्या बदल्यात आपण लग्न करणार अशी तुझी ऑफर आहे -तो

काहीतरी बोलू नकोस -ऑफर मला आली आहे -माहिती त्या बदल्यात प्रमोशन -पगार वाढ -

आपण लग्न करणार कारण तू मला व मी तुला आवडतात म्हणून -प्रिया

हो मंदसा हसला -तिच्या हातात पेंन ड्राइव्ह दिला -यात सारी माहिती आहे

पेन ड्राइव्ह हातात पडताच तिचे डोळे आनंदाने चमकले -त्याला मिठी मारत ती म्हणाली -तू माझे खूप महत्वाचं काम केलं आहेस

थ्यांक्स --

ती निघाली -

त्या नंतर ती बरेच दिवस भेटली नाही -बरेच वेळा फोन केल्यावर कॉफी शॉप ला भेटायचे ठरते

*

समोर ती बसली होती -

खूप छान दिसते आहेस -

ती हसली --

मी दिलेल्या माहितीचा उपयोग झाला ??

हो झाला -पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही -प्रिया म्हणाली

मी तुझ्या टाईप ची मुलगी नाही -मी महत्वाकांक्षी आहे -मला पैसा हवा आहे -माझी लाईफ स्टाईल एलिट क्लास ची आहे

तू दिलेली माहिती मी विकली बदल्यात मला लाखो रुपये मिळाले -ती बोलत होती

ते ऐकून तो हादरला -सहजीवनाच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता

माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हते -ते प्रेमाचं नाटक होते -माफ कर -आता हे सांगितल्यावर मला हलकं वाटत आहे -अपराधी पानांची भावना घेत जगणे मला पण शक्य नव्हते -

हो- तू मला माहिती दिले त्याबदल्यात तुला मोबदला म्हणून मी काही पैसे देऊ शकते -प्रिया म्हणाली

नको मला पैसे -मला व्यवहार कळत नाही -मी हृदयानी जगाकडे बघते -तू मेंदूचा वापर करत -तो

तुमच्या सारखी माणसं आयुष्यात फसतात --ती म्हणाले

तू प्रेमाचा अभिनय करत होती --मी फसत गेलो

प्रेमात सारे क्षम्य असते -ते असेच भरभरून करायचे असते -वेड असते-तो बोलत होता

परिणामाची तमा न बाळगता सारे झोकून देणारे प्रेम करतात-सर्वस्व पणाला लावावे लागते

समोरची व्यक्तीं आपल्यावर प्रेम करत नाही हे माहीत असूनही तिच्यावर निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे जिवलग जीवाला जीव देणारा जिवलग

प्रेमात झोकून देणारा जिवलग

मैत्री निभावणारा जिवलग

ते तुला कधीच कळणार नाही --ते तुझ्या डी एन ए मध्ये नाही -ते नैसर्गिक असावे लागते

आपले रस्ते भिन्न आहेत --

चल मी निघतो

बाय बाय अँड गुड बाय प्रिया

कथा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

9 Oct 2019 - 1:43 pm | गणेशा

वास्तव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2019 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं हो लेखन काका.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Oct 2019 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखकाचे नाव आणि लेखाचे शिर्षक वाचून मोठया अपेक्षेने लेख उघडला होता.
असे वाटले होते की पेनड्राईव्ह कसा वापरायचा या बद्दल काही मोलाचे मार्गदर्शन मिळेल.
पण छे ...लेखक आपल्या किर्तिला जागला नाही.
काका पुढच्या वेळी पेन ड्राईव्ह वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरायचा ते येउन जाउद्या
पैजारबुवा,

चुम्बनान्चा वर्षाव पण नाहि

जॉनविक्क's picture

9 Oct 2019 - 4:39 pm | जॉनविक्क

मूळातच परतल्याबद्दल अभिनन्दन.

गुरुदेव , आपण पुन्हा लेखणी हाती धरली आणि इथे पाझर फुटला .. पण लेख वाचताक्षणी तो बंद झाला .. गुरुदेव हे काय म्हणावे .. इतके भावनाप्रधान लेखन .. शक्य नाही गुरुदेव शक्य नाही .. आपल्याला असे भावनिक संदेश देऊन चालणार नाही गुरुदेव .. आम्ही पामर काय किंवा इतर लोक काय ,, चुना लावणारे चुना लावूनच जातात .. पण हा भावनांचा कल्लोळ थांबवा .. पुन्हा हाती लेखणी धरा,, निखळ मनोरंजनाचे वार करा ..

गुरुदेव त्या प्रियाचा जरी एलिट क्लास असला तरी आम्ही आपल्याला गुरु मानलं आहे कारण आपला क्लास अत्युच्च आहे .. आपण असे भावनाप्रधान लेख लिहायला लागलात तर आमच्यासारख्या भक्तांचे काय होणार .. चुराडा नि चुराडा .. तेव्हा प्राणप्रिय गुरुदेव ,, आपण भूतकाळाला जागावे आणि आम्हाला पुन्हा खुश करावे . गुरुदेव .. शप्पथ खोटं नाही बोलत आहे .. मला एकदा तरी ते निखळ निर्मळ लिखाण नव्याने वाचायचे आहे ..

जॉनविक्क's picture

12 Oct 2019 - 11:45 am | जॉनविक्क

याच पेंद्रइव्ह मदे भूत असेल बघ

ज्यात प्रेक्षकांना पेन (Pain) नाही.

पेन, पेशन्स आणि पेशन्स ड्राईव्ह असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु

ज्योति अळवणी's picture

15 Oct 2019 - 2:57 pm | ज्योति अळवणी

अजिबात आवडली नाही कथा/गोष्ट/विषय मांडणी... हे जे काही लिहिलं आहे त्याला जी काही उपमा देत असाल ते