एक अबोल संवाद

राघव's picture
राघव in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

एक अबोल संवाद

प्रेमात पडण्याची अवस्था.. चाहूल.. त्यातली हुरहुर.. विरहातली वेदना.. आणि व्यक्त झाल्यावर होणारा आनंद.. हे अनुभव खरं तर न सांगता येणारे. म्हणूनच तिच्या आणि त्याच्या मनातल्या काही कप्प्यांमधले हे निवडक संवाद!

तो :

नजरेतलं चित्र कागदावर उतरत नाही..
मनातलं काव्य ओठांवर येत नाही..
हृदयातलं शल्य, हवं तिथं बोचत नाही..

शब्दांना जड व्हायला तीच वेळ हवी होती?

***

ती :

कुणास ठाऊक.. नसेल तैसे..
का माझे मन.. कातर.. कातर..
आठवणींचा स्पर्श अलौकिक..
आसवेसुद्धा होती अत्तर..

***

तो :

वाटतं.. झालं ते बरंच झालं..
तेव्हा सांगितलं नाही ते बरंच झालं..

कारण आत्ता मनापासून वाटतंय..
या जागी ती असायला हवी होती सोबत..

पण.. सोबत म्हणजेसुद्धा.. काय?

***

ती :

मनात उठते अनाम हुरहुर
विचार अवचित येता त्याचा..
निरभ्र आकाशीचा पाऊस
कुठवर वाहू भार तयाचा...

***

तो :

माणसाला दोन मनं असतात हे पुराव्यानं सिद्ध होऊ पाहतंय.
एकाच्या मते मी तिला सांगावं.. तर दुसरं नको म्हणतंय!

***

ती :

झुरणारं मन उनाड अल्लड
उगाच त्याची अनाम सोबत
हात धरुनी खेचत उठते..
धडधडणारी हृदयातील कळ!

***

तो :

मनातल्या कल्पना आणि वास्तव.. यांचा जिथं अज्जिबात संबंध नाही..
अशा तरल पातळीवर चाललेला आवेगाचा भयकातर आविष्कार..!

म्हंजे नक्की काय ते कळत नाहीये ना..
मलाही आत्ता आत्ता त्याचा अर्थ जरा उलगडायला लागलाय..!!
आणि या अवस्थेत आणिक राहणं शक्य नाहीये हेही समजतंय..

सोक्षमोक्ष लावायलाच हवा आता.

पण..

दुसरं मन : आता पुन्हा तो पण आला ना मध्ये, तर तुझ्या ***वर करकचून लाथ घालण्याचा पण करणार आहे मी!

***

ती :

क्षण कोवळा.. आनंदाचा!
ग्रीष्मामागून झरतो श्रावण..!
मूक धरेचे प्रश्न संपले..
ऐकून आभाळाचे उत्तर..!

***

फक्त तो :

या मनाला, शब्दांना आणि जिभेला
मी एकदा चांगला सडकून काढणार आहे..
तिला सांगेतोवर या मेल्यांचा ताळमेळ नव्हता अजिबात
आणि आता जणू हे तिघं, एकत्र, महाकाव्य प्रसवणार आहेत..! छळ नुसता..!!

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

भलतेच गोड आहे हे! एकदम मस्त!

कुमार१'s picture

31 Oct 2019 - 11:28 am | कुमार१

आवडले.

प्राची अश्विनी's picture

31 Oct 2019 - 11:56 am | प्राची अश्विनी

निरभ्र आकाशीचा पाऊस
कुठवर वाहू भार तयाचा..
क्या बात!!

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 1:26 pm | पद्मावति

आवडलं.

माणसाला लैंगिक भावना होतच नसत्या तर तो प्रेमात पडला असता का ?

हा हा.. या अँगलनं कधी विचार करायची गरज पडली नाही! त्यामुळं यावर काही बोलू शकणार नाही. :-)

पण आवडले.

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 1:57 pm | अलकनंदा

वेगळा बाज आहे, पण भावनांचं प्रकटीकरण, शब्दांतून उलगडलेली उलघाल आवडली. जमलं आहे.

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद! :-)