या पसाऱ्याचं काय करावं?

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
27 Sep 2019 - 9:16 pm

मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली.
दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत. भंगारात द्यायला मन होत नाही. मोबाईल हॅण्डसेट दहा-बारा पडले आहेत, कपडे बेडशीट तर साचतच जात आहेत. जुन्या कापसाच्या गाद्या जागा अडवून बसल्या आहेत. खूर्ची टेबलं अडगळीच्या खोलीत धुळखात पडली आहेत.
गरज नसताना वेगवेगळ्या पकडी, पाने, करवती, स्क्रू ड्रायव्हर, हातोड्या, ड्रील मशीन, ब्लोअर, व्हॅक्यूम क्लीनर, बागकामाची हत्यारं याची हजारो रुपयांची खरेदी करून ठेवली आहे.
दिवसातून एकदा तरी या साईटवर भेट देतोच, मेलबॉक्स सुध्दा याच साईटींच्या मेलनी भरलेला असतो. नवीन गॅजेट्स पाहिली की मन कंट्रोल होत नाही. हेडसेट, हेडफोन्स, ब्लूटुथ स्पिकर, प्रिंटर अशा अनेक गोष्टी आधी विकत घेतल्या आहेत तरी परत परत घ्याव्या वाटतात. शूज अक्षरशः न वापरता फेकून दिले आहेत. तरीही वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शूज खुणावत असतात.
मनावर कितीही ताबा ठेवला तरी ब्रेक सैल केला की खरेदीची गाडी परत सुसाट धावत सुटते.
घरच्यांनी आता समजावणं सोडून दुर्लक्ष करण्याची सवय करून घेतली आहे.
एवढा पसारा करुन ठेवला पण जुन्या वस्तू टाकवत नाहीत व कोणाला सेकंडहॅंड द्यायलाही मन होत नाही. पाश्चात्त्य देशांत गराज सेल तरी असतो. पण आपल्याकडे असं नाही. ओएलेक्स, क्विकर फार डोकेखाऊ प्रकरण आहे. त्याच्या नादाला लागणं मला तरी शक्य नाही.
मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा. धन्यवाद

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

Yogesh Sawant's picture

27 Sep 2019 - 9:37 pm | Yogesh Sawant

होऊ द्या खर्च. ओएलेक्स, क्विकर हे वापरायला सोपं आहे. पण कशाला उगाच. संग्रह करावा सगळ्याचा.

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 9:47 pm | राजे १०७

ओएल एक्स, क्विकरवर फार पडून मागतात लोक.

तुमची जन्मतारीख किंवा राशी कळेल काय ? त्यानुसार उपाय सांगता येतील.

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 9:46 pm | राजे १०७

मेष रास, वृषभ लग्न, अश्विनी नक्षत्र.

धर्मराजमुटके's picture

27 Sep 2019 - 10:01 pm | धर्मराजमुटके

अजुन २०२५ पर्यंत भरपूर खरेदी कराल.

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 10:03 pm | राजे १०७

वस्तू ठेवायच्या कुठे आणि निगा राखणं, उपयोगात आणणं हा प्रश्न आहे.

सुबोध खरे's picture

1 Oct 2019 - 6:13 pm | सुबोध खरे

त्यासाठी एक मोठं घरच खरेदी करा.
हा का ना का

राजे १०७'s picture

1 Oct 2019 - 6:30 pm | राजे १०७

नाही हो. आधीच एक वेअर हाऊस भरलंय.‌

सुबोध खरे's picture

1 Oct 2019 - 6:55 pm | सुबोध खरे

मग दुसरं घ्या

राजे १०७'s picture

1 Oct 2019 - 7:13 pm | राजे १०७

बोलणी चालू आहेत.

सुबोध खरे's picture

1 Oct 2019 - 7:32 pm | सुबोध खरे

हांगाश्शी

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 9:48 pm | राजे १०७

जन्मांक सात

आंबट चिंच's picture

27 Sep 2019 - 9:53 pm | आंबट चिंच

तुम्ही व्यनीतुन मला कोणती वस्तू किती रुपये किंमतीत विकणार आहात याची यादी द्याल काय .
मला शेगडी , मोबाईल आणि ब्लू टूथ या वस्तू हव्या आहेत.

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 10:00 pm | राजे १०७

छे हो मला घासाघीस प्रकाराचा जाम राग येतो. मला पत्ता द्या. फुकट पाठवून देतो.

जॉनविक्क's picture

27 Sep 2019 - 10:08 pm | जॉनविक्क

ओएल एक्स, क्विकरवर फार पडून मागतात लोक.

मला पत्ता द्या. फुकट पाठवून देतो.
असा विरोधाभास का ?

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 10:14 pm | राजे १०७

तिकडच्या लोकांना हाव सुटल्यासारखं काहीच्या काही बोलतात. नाही म्हटलं की काय काय ऐकवतात.

सस्नेह's picture

27 Sep 2019 - 10:08 pm | सस्नेह

तुमच्याकडे कानांवर वरून लावायचे हेडसेट आहेत का ?
असतील तर कृपया फोटो आणि किंमत सांगा. मला हवे आहेत.

किती रुपये ? फुकट सुद्धा चालेल फारच अडचण होत असेल आपणास तर

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 10:12 pm | राजे १०७

बत्तीस इंची आहे. पत्ता द्या. पाठवतो.

जॉनविक्क's picture

28 Sep 2019 - 2:59 am | जॉनविक्क

तुमचा पत्ता द्या मी स्वतःच येतो घ्यायला.

जॉनविक्क's picture

28 Sep 2019 - 12:58 pm | जॉनविक्क

पत्ता देताय ना ? 32 इंची LED घ्यायला येतोय.

तुमच्या वस्तू खपवायची जबाबदारी माझी.

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 10:14 pm | राजे १०७

धन्यवाद जवान भावा.

समीर वैद्य's picture

28 Sep 2019 - 1:03 am | समीर वैद्य

तुम्ही जेव्हढ्या रकमेची खरेदी करता ती रक्कम मला पाठवून देत चला....
विनोदाचा भाग निराळा, पण प्रत्येक वेळी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उघडलत कि गरीब, अनाथ मुलांचा किंवा ज्यांना 2 वेळा जेवण पण मिळत नाही अश्या लोकांना आठवा. खरेदी थांबेल हळू हळू.

राहिला प्रश्न आधी घेतलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तूंचा... एखाद्या अनाथाश्रमात किंवा ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रात देऊन टाका गाद्या, खुर्च्या, टेबलं वगैरे....

बघा पटतंय का....

समीर जी खूप सुंदर सल्ला दिला आहे आपण. पण वापरलेल्या वस्तू कुणाला द्यायला कसेसेच वाटते. आमच्या इथे माणुसकीची भिंत आहे, तिकडं काही दिल्यात.

सतिश गावडे's picture

28 Sep 2019 - 12:04 pm | सतिश गावडे

तुम्ही इतकी खरेदी करण्याइतके पैसे कसे कमवता ते सांगू शकाल का?

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 1:50 pm | राजे १०७

माझ्या घरातील सर्व सरकारी नोकरी करत होते, करतात. भरपूर पगार, पेन्शन मिळते. वडिलोपार्जित संपत्ती अफाट आहे. आई-वडील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. बायको पंचेचाळीस हजार रुपये पगार कमावत आहे. मुलं शिकून नोकरीला आहेत.

जॉनविक्क's picture

28 Sep 2019 - 4:08 pm | जॉनविक्क

ईडी मागे लागणार ;)

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 9:20 pm | राजे १०७

:-( सांगू नका इडीला. उगीच काडी टाकून.

खुप छान वाटले. मन रमेल आणी खर्चावरही नियंत्रण येईल.

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 9:22 pm | राजे १०७

कुत्रा आहे ना. दररोज मारी बिस्किटे खातो. इतका सुंदर कुत्रा आहे की बस.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Sep 2019 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

त्याला एका बिस्कीटाचे चार तुकडे करुन घाला म्हणजे त्याला चार बिस्किटे दिल्यासारखे वाटेल व त्याचे तुमच्यावरील प्रेम चार पट वाढेल :)

इरसाल कार्टं's picture

28 Sep 2019 - 12:28 pm | इरसाल कार्टं

तेवढा वाचा

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 1:46 pm | राजे १०७

वाचला. धन्यवाद.

इरसाल कार्टं's picture

28 Sep 2019 - 2:12 pm | इरसाल कार्टं

विचार पक्का झला तर कलवा

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2019 - 12:47 pm | चौथा कोनाडा

वाह, भारीच की ! लै ह्येवा वाटतो तुम्हचा !

तुमचा सदरा द्या पाठवून, पत्ता व्यनि केला आहे.

क्लिमिश बौ काय पध्दतशीर लोकांना ** बनवलं तुम्ही.

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 1:40 pm | राजे १०७

मैंनेकिस्कोभी .. बनाया नयी. जो.. होते हैं उनको आवूर कैसे .. बनानेका भै.

जॉनविक्क's picture

28 Sep 2019 - 3:32 pm | जॉनविक्क

मैंनेकिस्कोभी .. बनाया नयी. जो.. होते हैं उनको आवूर कैसे .. बनानेका भै.

ओह क्लिमिश बौ... तुमारे नजर्मे वो पायलेसेही वाइसे हाय वय... बरं बरं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2019 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे (लिहून) जमा केलेले लेख धडाधड मिपावर रिकामे करत आहातच. तसाच थोडासा विचार करून शोध घेतलात तर, इतर वस्तू देण्याजोगी जागा सापडेलच. ;) :)

तिकडे आणि इकडे एकाच दिवशी लेख टाकले आहेत. माझ्या अप्रतिम लेखनाचा आस्वाद आपणास घेता यावा म्हणून इकडे लेखन प्रपंच केला आहे.

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 1:41 pm | राजे १०७

मी वस्तू फुकट वाटायला तयार आहे. पण आवडल्या नाहीत तर परत माझ्या नावाचा शिमगा करताल.

सरनौबत's picture

28 Sep 2019 - 2:27 pm | सरनौबत

उद्या पासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर मेगा सेल चालू होतोय (प्राईम मेम्बर्स साठी सुरु झाला सुद्धा). तुम्ही खरेदीची हौस भागवण्यासाठी करा शॉपिंग, फक्त माझ्या पत्त्यावर पाठवा. तुमची हौस पण भागेल आणि घरी पसारा पण नाही होणार

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 2:30 pm | राजे १०७

बरं. आपली विच्छा पुरी करू.

नावातकायआहे's picture

28 Sep 2019 - 2:37 pm | नावातकायआहे

पत्ता व्य.नी. करा.

जे नको आहे ते न्यायची व पुढे त्याचे काय करायचे ती जबाबदारी माझी!

सुरक्षिततेच्या कारणास्तव माझा पत्ता देऊ शकत नाही. तुमचा पत्ता कळवा.शंभर टक्के सामान पोच करतो.

आणी आम्ही निवडलेल्या वस्तू घेऊन पाताळेश्वरला भेटा, तेथून आम्ही कलेकट् करू जे जे हवंय ते.

राजे १०७'s picture

28 Sep 2019 - 5:34 pm | राजे १०७

ओके. कधी भेटायचं. फोन नंबर द्या बरं.

जॉनविक्क's picture

28 Sep 2019 - 9:42 pm | जॉनविक्क

काय काय घेऊन किती वाजता येणार ते सगळे डिटेल्स लिहा आम्ही पोचतोच आहोत.

उपेक्षित's picture

28 Sep 2019 - 5:24 pm | उपेक्षित

चांगली २०/३० लिटर दुध देणारी म्हस असल तर सांगा भाऊ येतो न्यायला. :)))) (हवाघ्या बरका ;) )

प्रकाश घाटपांडे's picture

29 Sep 2019 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे

कंपल्सरी बायिंग डिसऑर्डर ही एक सामाजिक मानसशास्त्रात नोंद असलेली पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. ऒनलाईन शॉपिंग मुळे ती फक्त तुम्हा आम्हाला दिसायला लागली आहे एवढच. विकिपिडियावर याची विस्तृत नोंद आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Compulsive_buying_disorder

राजे १०७'s picture

29 Sep 2019 - 9:52 am | राजे १०७

धन्यवाद प्रकाश सर. मला तरी असा आजार असावा हे वाटतंय.

तुमच्या सारखे लोक अजून असणं फार गरजेचे आहे

राजे १०७'s picture

29 Sep 2019 - 12:08 pm | राजे १०७

माझ्या सारखे लोकच अर्थव्यवस्थेला चालना आणि लोकांच्या हाताला काम देत असतात. कंजूस, चिक्कू लोक फक्त पैसा साठवत राहतात. पैसा मिळवून त्याचा उपभोग घेता आला पाहिजे.

जॉनविक्क's picture

29 Sep 2019 - 12:32 pm | जॉनविक्क

आणी तरी तुम्हाला प्रश्न पडतात की या पसाऱ्याचे करायचे काय ?

अतिशय अराष्ट्रवादी प्रश्न आहेत तूमचे.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Sep 2019 - 12:38 pm | प्रकाश घाटपांडे

अशासकीय रोजगार हमी मोहिम :)

राजे १०७'s picture

29 Sep 2019 - 1:39 pm | राजे १०७

;-))

जयंत कुलकर्णी's picture

29 Sep 2019 - 2:07 pm | जयंत कुलकर्णी

वॉल्डन वाचून पहा... काही फरक पडतोय का ..
माझ्यात तरी पडलाय. मी हे पुस्तक अनुवादित केले आहे म्हणून सांगत नाही... गैरसमज नसावा (कोणाचाही)

राजे १०७'s picture

29 Sep 2019 - 2:35 pm | राजे १०७

धन्यवाद जयंत सर. आपण माझे आवडते लेखक आहात. वाचतो नक्कीच.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Sep 2019 - 11:22 am | प्रकाश घाटपांडे

जगी हा खास वेड्यांचा पसारा मातला सारा! हे लिहिणार्‍या कवीला हे माहित नसाव :)

राजे १०७'s picture

1 Oct 2019 - 9:44 pm | राजे १०७

मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा.
>> संपादक महाशय मला चांगले उपाय , ठोस माहिती कळेल असे वाटलं होतं. पण काही महाभागांनी टिंगलीचा सूर लावला. काही भिकाऱ्यासारखे वस्तू आम्हाला वाटा असे म्हणू लागले. प्रकाश घाटपांडे यांनी योग्य सल्ला दिला.
उथळ, नालायक लोकांनी मिपाचं डबकं करून टाकले आहे. मी परत इकडे लिहिणार नाही आणि इकडचं काही वाचणार सुध्दा नाही. धन्यवाद.