किझाडी उत्खननाचे अन्वयार्थ

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Sep 2019 - 2:47 pm
गाभा: 

मूळ तमिळ उचारण किझाडी कि किलाडी नेमके माहित नाही, तामिळनाडूतील मदुराई पासून काही किलोमीटर अंतरावर वागई नदी खोर्‍यात एका वीटांचे बांधकाम असलेल्या प्राचीन नागरी वसाहतीचे उत्खनन इसवि २०१५ पासून काही फेज मध्ये झाले त्याच्या कार्बन डेटींगेचे अहवाल मागच्या आठवड्यात तामीळनाडू पुरातत्व खात्याने जाहीर केले. किझाडी नागरीकरण खुणा इस्विपुर्व सहाव्या शतकपुर्व पासून आहेत असे म्हणता यावे.

तामिळनाडूतील लोकांची तामिळनाडूतील पुरातत्वीय उत्खननांना डावलले जात असल्याची भावना होती. वस्तुतः सिंधू खोरे संस्कृती कालीन उत्खननांना जेवढे महत्व आणि प्रसिद्धी प्राप्त होते तेवढे उर्वरीत भारतातील पुरातत्वीय उत्खनानांना महत्व आणि प्रसिद्धी प्राप्त होत नसावी. भारतीयांनी इतिहासाचा कितीही गाजावाजा आणि राजकारण केले तरी भारतातील पुरातत्वीय उत्खनानांबद्दल प्रत्यक्षात बरेच निरुत्साही असावेत आणि तोच निरुत्साह काँग्रेस असो वा भाजपा दोन्हींच्या राज्य आणि केंद्रीय सरकारातुन असावा असे वाटते. ते असो.

सिंधू खोर्‍यात नागरी संस्कृती विकसीत झाली होती तर तिचे उर्वरीत भारतात पुरेशा खूणा का सापडत नाहीत अशा सारखे प्रश्न शिल्लक राहतात. तर तामिळनाडूच्या वागई नदी खोर्‍यात अंशतः नागरी संस्कृतीचे अवशेष -मिळण्याची शक्यता किझाडीच्या उत्खननामुळे बळावली आहे. या बद्दल मी खाली वृत्त आणि माहिती दुवे देतो पण या आठवड्यात तामीळ सोशल मिडीयात या संदर्भाने दोन अन्वयार्थ काढण्याचे प्रयत्न होत आहेत.

१) (सिंधू संस्कृती प्रमाणे) या उत्खननातही कोणत्याही धार्मिक स्वरुपाच्या खुणा सापडलेल्या नाहीत . याचा तामीळ अस्मित अन्वयार्थ आमची संस्कृती अधार्मिक सेक्युलर (अवैदिक अनार्य असेही वाचावे) होती

२) सिंधू संस्कृती अक्षरचिन्हांशी आणि प्राचीन तामीळ-ब्राह्मी लिपीशी साधर्म्य सांगणारी काही अक्षरचिन्हे आढळलीत. याचा तामीळ अस्मित अन्वयार्थ अ) तमीळ हेच खरे सिंधू सम्स्कृतीचे खरे उत्तराधिकारी आ) तमील संस्कृती साक्षर होती.

त्यापुढे जाऊन संस्कृत हिंदी आणि उत्तर भारतियांशी तुलना वगैरे सम्बंधी राजकिय दृष्टीकोण वगैरे. खरे म्हणजे अंतीम निश्कर्ष काढावेत एवढे उत्खनन आणि अभ्यास भारतीयांनी अद्याप केलेलाच नाही त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांच्या माहितीची एक मोठी दरी अद्याप भरली जाणे बाकी आहे.

अर्थात अजूनही उत्खनन होऊनही जसे किझाडी निष्कर्षात दिसते तसे धार्मिक खूणा आणि विकासाचे टप्पे आढळले नाही तर तमीळींचे निष्कर्ष अंशतःतरी स्विकारणे क्रम प्राप्त ठरण्याची शक्यता असू शकते. केवळ मुर्तीपुजाच नव्हे अगदी यज्ञ संस्कृती उशिराने चालू झाली असण्याची शक्यता किंवा बाहेरून आल्याची शक्यता चर्चावी लागु शकते. वैदीक संस्कृती चालु होती पण यज्ञ संस्कृती चालू झाली नव्हती म्हणून त्या खुणा पुरातवीय संशोधनात मिळत नाहीत असे म्हणता येऊ शकते. कि अजून काही शक्यता असतील याची येत्याकाळात चर्चा करण्यास तमीळ लोक नक्कीच भाग पाडतील असे वाटते. असो.

* https://en.wikipedia.org/wiki/Keeladi_excavation_site
* https://www.theweek.in/news/india/2019/09/23/keezhadi-excavation-its-dif...
* https://timesofindia.indiatimes.com/city/chennai/sangam-age-is-older-tha...

* https://www.bbc.com/tamil/india-49754995 हे बिबीसी तमीळ वृत्त गूगल ट्रांसलेटरच्या सहाय्याने वाचावे लागेल.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , शुद्धलेखन -व्याकरण चर्चा , व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

24 Sep 2019 - 5:01 pm | उपयोजक

கீழாடி = कीऴाडि
यातलं मधलं जे अक्षर आहे त्याचा उच्चार हा टाळ्याला जीभ न टेकवता लांबवत नेलेल्या 'र' सारखा आहे.
फक्त तमिऴ आणि मल्याळम या दोनच भारतीय भाषांमधे हा वापरला जातो.
सुलभीकरणासाठी आपण ऴ वापरु शकतो. याआधी मराठमोळी या शब्दात मोळी = भाषा हा मूळ तमिऴ शब्द आपण शेकडो वर्षे वापरत आहोतच.ते पाहता ळ देखील वापरता येईल.पण अचूकतेसाठी यापुढे ऴ वापरणे योग्य.

या भाषेचे नाव தமிழ்(तमिऴ)असे आहे.मराठी लोक ते तामिळ असे करुन वापरतात.सुलभीकरणासाठी हे ही चालावे.पण अचूकतेसाठी तमिऴ लिहायला हरकत नसावी.
कारण खुद्द तमिऴ लोकही कन्नड भाषेचे नाव त्यांच्या सुलभीकरणासाठी तमिऴमधे 'कन्नडम्' असे वापरतात

उपयोजक's picture

24 Sep 2019 - 5:16 pm | उपयोजक

हे अहिंदू आहेत असा अपप्रचार करणारे बहुतांश तमिऴ लोक हे द्रमुक किंवा द्रमुकचीच बी टिम असणार्‍या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते असतात.तमिऴ संस्कृती हिंदू धर्मापेक्षा वेगळी आहे असा अपप्रचार करुन स्वत:चा स्वार्थ साधणे हा अजेंडा या मागे असतो.तमिऴ ब्राह्मण हे उत्तरेतून आलेत असं म्हणणारे करुणानिधी आणि पेरियार रामस्वामी या दोघांचेही मूळ तमिऴ नाही.यांचे पूर्वज सध्याच्या आंध्रप्रदेशातून ३०० वर्षांपूर्वी सध्याच्या तमिऴनाडूत आलेत.दक्षिण भारत किंवा निदान तमिऴनाडू तरी भारतापासून वेगळा करुन तमिऴ देश निर्माण करण्याचे स्वप्न हे द्रमुक नेते सतत पाहत असतात.जी कधीच पूर्ण होणारी नाही.

रच्याकने नदीचे नाव वागई नसून 'वैगै'असे आहे.

हेतुपुर्वक संशोधन करायला लावणे आणि वांछित अनुमान काढायला लावणे या दोन विचारप्रवाहामुळे संशोधनातली गम्मत निघून जाते.

उदा - बेट द्वारका. समुद्राखाली सोन्याची द्वारका आहे.

महासंग्राम's picture

25 Sep 2019 - 7:09 pm | महासंग्राम

म्हणता यावे म्हणजे अजून नक्की नाही ?

कार्बन डेटिंग ने अचूक वय काढता येते ना ?

जालिम लोशन's picture

26 Sep 2019 - 8:09 pm | जालिम लोशन

.