जुगलबंदी

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

जुगलबंदी

एखादा दुकानदार विक्रीच्या वस्तूंची सुंदर आणि आकर्षक मांडणी करतो. गायक रागस्वरांची शानदार मांडणी करतो, त्यांना विविध स्वरालंकारांनी नटवतो. गायकाचा आवाज तोच. प्रत्येक रागात ठरावीक स्वर. या स्वरांबाहेर जाता येत नाही. म्हणजे दुकान एकच. मोजके अलंकार, वस्तू जितक्या सुंदर तेवढे दुकान आकर्षक. स्वर जितके अचूक लागतील तितके गाणे चमकदार होते. शास्त्रीय संगीतातल्या गायक-वादकांची थोरवी ही की तरीही गायन एकसुरी होत नाही. प्रत्येक मैफलीत रेखीव विचार. आताच्या क्षणाचे गाणे काही क्षणांनंतर नाही, आजचे गाणे उद्या नाही. प्रत्येक गायक-वादकाच्या स्वतःच्या सादरीकरणामागच्या अपेक्षा वेगळ्या. कुमार गंधर्वांचे पुत्र आणि श्रेष्ठ गायक मुकुल शिवपुत्र म्हणतात की "एका मैफलीत गायलो की पुढच्या मैफलीची तयारी करायला मला महिने महिनेदेखील पुरत नाहीत." याला म्हणतात परिपूर्णतेचा ध्यास. आपण जर गायचे, वाजवायचे पैसे घेतो, तर तिकिटाचे पैसे मोजून येणार्‍या रसिकाला त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे, ही त्यामागील भावना. त्याहीपेक्षा मोठा स्वराचा ध्यास.

कधी एखाद्या संगीत समारोहात जास्तीत जास्त गायक-वादकांना संधी द्यावी लागते. मांडलेल्या वस्तूंमध्ये जास्त वैविध्य आले की मांडणीतले सौंदर्य वाढते. बहुधा यातून जुगलबंदी या संकल्पनेचा जन्म झाला असावा. मुंबईत कधीकधी एका दिवशी एका वेळी दोन-तीन ठिकाणी मैफली असत. मग आपल्या कार्यक्रमाचे खास आकर्षण पाहिजे, तरच रसिक दुसरी मैफील सोडून आपल्याकडे येतील. या गरजेतून वैविध्यातून आकर्षकता वाढविण्यासाठी जुगलबंदी या प्रकाराला नंतरच्या काळात जास्त वाव मिळाला असावा.

पूर्वी जुगलबंदी असे की नाही ठाऊक नाही. याबद्दल मी वाचलेले नाही. हद्दूखां व हस्सूखां यांची नावे जोडीने घेतली जात. परंतु जोडीने गात की नाही ठाऊक नाही. माझ्या लहानपणी रविशंकर आणि अली अकबर खां व तबलजी अल्लारखां, बिस्मिल्ला खां आणि रविशंकर - तबलजी अल्लारखां अशा काही जुगलबंद्या रेडिओवर ऐकल्या होत्या. सलामत अली-नजाकत अली, राजन-साजन मिश्रा हे जोडीने गात. राजन-साजन यांना तर मी त्यांच्या उभरत्या काळात प्रत्यक्ष मैफलीत ऐकलेही आहे. रविशंकर-अली अकबर खां आणि बिसमिल्ला खां आणि व्ही.जी. जोग या जोड्यांनी जुगलबंदी या प्रकाराला आपल्या सर्जनशीलतेने, कल्पकतेने आणि प्रयोगशीलतेने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. व्यवस्थापनशास्त्रात 'कोलॅबोरेशन' ही एक संज्ञा शिकवली जाते. यांच्या जुगलबंदीत या संज्ञेचा पुरेपूर प्रत्यय येतो.

माझ्या बालपणी माझ्या आजोळी गोकुळाष्टमीच्या दिवशी माझा मामा शास्त्रीय संगीताची मैफील ठेवीत असे. रविशंकर, अल्लारखां, अली अकबर खां, तबलानवाझ मुरली महाराज, पं. जगन्नाथ बुवा (सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचे गुरू) इ. कलावंत माझ्या आजोळी मैफली गाजवून गेले आहेत.

बालपणी रेडिओवर रोज सनई लागत असे. सनईशिवाय आकाशवाणीचे कार्यक्रमच सुरू होत नसत. पण रोज तीही फुकट ऐकायला येत असल्यामुळे बिस्मल्ला खांच्या सनईची थोरवी कळली नव्हती. लग्नप्रसंगी सनईचौघडा असतो. स्वर देणारी पेटी. सनई आणि चौघड्याची जोडी, सोबत री ओढणारे एकदोन छोटे सनईवादक असा लवाजमा असे. करंगळीच्या पुढच्या दोन पेरांच्या लांबीरुंदीच्या दोन पातळ पट्ट्या एकत्र बांधून केलेली पिपाणी सनईच्या तोंडाशी असते. तीतूनच सनईचा किनरा आवाज येतो आणि शंकूमधून कर्ण्यातून बाहेर येताना त्या किनर्‍या ध्वनीला मस्त, मंजुळ गोलाई मिळते. त्या सनईच्या पिपाण्यांमधून खर्रखर्र, फरफर असे वेगवेगळे अनावश्यक असांगीतिक आवाज सोबत करीत. किंचित सैल झालेला पितळी कर्णासुद्धा कधीकधी मधमाशीसारखा गूंगूं आवाज करी. पण विवाहसमारंभात हे कोणाच्या ध्यानात येते! शास्त्राला कोणीतरी थोडीफार सनई फुंकतो आणि चौघडा बडवतो ना, मग झाले तर!

कधीतरी आकाशवाणीचे अखिल भारतीय संगीत संमेलन सुरू झाले. शनिवार रात्री साडेनऊ वाजतां. तारीख, वर्ष आता आठवत नाही. कोणताही मंगल प्रसंग – खाजगी असो वा सरकारी – मंगल प्रसंग असला की सनई हवीच, म्हणून आपण सनईला मंगलवाद्य असेही म्हणतो. बनारसला गंगाकिनारीच्या काशीविश्वेश्वराच्या मंदिरात शुभप्रसंगी सनईवादनाचा मानही बिस्मिल्लाखां यांच्याकडेच असे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय संगीत संमेलनाचे उदघाटन म्हणजे मोठा मंगल प्रसंग. कलाकार बिसमिल्ला खांशिवाय कोण असणार? रेडिओवरून बहुतेक सर्व केंद्रांवर थेट सहक्षेपण होते. वादन सुरू झाले आणि या अलौकिक वादनाचे कसे वर्णन करावे हेच समजत नाही. सनईच्या पिपाणीतून येणारे खर्रखर्र फरफर आवाज पूर्णपणे अंतर्धान पावलेले. नाजूक सुरईतून बारीक धारेने रंगीत, नितळ पारदर्शक, सुगंधी स्वादयुक्त सरबत ओतावे असा स्वच्छ निर्मळ स्वर. ओंजळभर पारिजातकाची फुले घरात आणावीत आणि त्या मंद सुगंधाने सारे घर भरून जावे, तसे सारे घर त्या अद्भुत स्वरांनी भरून गेले. काय वाजवले आठवत नाह, परंतु आमच्या घरी सहसा श्रुतिका वा मराठी गाणी वगैरे नसतील तर रात्री साडेनऊनंतर रेडिओ बंद करावा लागे. शास्त्रीय संगीतही रात्री साडेनऊनंतर कधी लावले जात नसे. फक्त न लोळता वाचनाला मुभा होती. हिटलरचा दराराच होता तसा. पण आज वेगळे घडले होते. हिटलरही त्या मंत्रजालाने भारला गेला होता. त्या भारलेल्या अवस्थेतच निद्रादेवीने मला कधी पंखाखाली घेतले कळलेच नाही.

व्ही.जी. जोगांचे व्हायोलीनवादन अनेक वेळा रेडिओवर लागे. जयजयवंती, नटबिहाग आणि झिंजोटी ऐकलेले होते. फारच सुंदर अनुभव हे सांगायला नकोच. पण जुगलबंदीची मजा वेगळीच होती. एकाची लांबलचक पल्लेदार सुरावट दुसरा लीलया सहीसही उचलत असे.

एकदा सकाळी रवींद्रमध्ये कार्यक्रम होता. बिस्मिल्ला खान आणि व्ही.जी. जोग. जौनपुरी आठवतो आहे. नंतरचे नीट आठवत नाही, पण बहुधा फर्माइशीखातर ‘तेरे सूर और मेरे गीत’ची धून, मध्यांतरानंतर अल्हैया बिलावल किंवा देसी आणि नंतर भैरवी ठुमरी वगैरे. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात धावणारा धावपटू सहसा एकटा सराव करीत नाही. दुसर्‍या धावपटूला तो सोबत धावायला सांगतो. या धावपटूला पेसमेकर म्हणतात. त्यामुळे अव्वल धावपटूची कामगिरी खूपच उंचावते. असेच काहीसे जुगलबंदीत घडून येते. या दोघांच्याही स्वतंत्र एकल वादनापेक्षा ही जुगलबंदी वेगळी, सादरीकरणाचा दर्जा अनेक पायर्‍या वर नेऊन ठेवणारी अणि म्हणून सहभागी गायक-वादकांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी झाली. या मैफलीत एक गोष्ट माझ्या नजरेने नोंदली - बिस्मिलाजींच्या सनईला शंकूच्या सुरुवातीलाच दोन जास्तीच्या नाजूक पिपाण्या दोरा बांधून लटकवल्या होत्या.

सुरुवातीला दोघांनी गायकी अंगाने आलापी सुरू केली. बिस्मिलाजींची आलापीची पाचसहा आवर्तने होईपर्यंत पंडित व्ही.जी. जोग री ओढत दुय्यम भूमिकेत. नंतर पंडितजींची पाचसहा आवर्तने होईपर्यंत बिस्मिल्लाजी री ओढायला दुय्यम भूमिकेत. नंतर एकाने सुरावटीला सुरुवात करावी आणि मध्येच एखादा स्वर हवेत सोडावा दुसर्‍याने तो अचूक उचलून ती स्वरावली पूर्ण करावी. एकाने सोडलेला स्वर विरण्याआत दुसर्‍याने तो स्वर इतक्या लीलया उचललेला की सनईचा स्वर कोणता आणि व्हायोलीनचा कोणता हे कळणार नाही. पण वाद्य वेगळे असल्यामुळे पुढच्या स्वरावलीचा बाज वेगळा. व्हायोलीनच्या स्वराचा पोत हा अरुंद पातळ पट्टीसारखा, तर सनईच्या स्वराचा गोलाकार मोत्यांसारखा.

व्हायोलीनच्या गजाने झंकारणार्‍या ताना छोट्या पट्ट्यांसारख्या स्वरमाला एकामागून एक हवाई प्रवासाला निघालेल्या, तर सनईतून स्वरांच्या मोत्यांचे सर पवनविहाराला निघालेले. तानांची, स्वरावलीची ही कलमे अभिनव, आणि उत्स्फूर्त – ज्याला उपज अंगाने (unplanned, spontaneous creation) म्हणतात, तशी घेतलेली. स्वरमालांच्या हिंदोळ्यावर स्वरपट्ट्या झोके घेत असताना मध्येच त्याच हिंदोळ्यावर अचानक स्वरपट्ट्यांच्या जागी स्वरमौक्तिकमाला विराजमान होत. स्वरचित्र स्थापित होता होता वरचा षड्ज लागला की अहाहा वाटे. श्रोते स्वरानंदात न्हात असताना एकमेकांच्या स्वरावली उचलून मध्येच व्ही.जी. जोग गायकी अंग काही काळ बाजूला ठेवून चक्क ‘दादिडदाडा’सारखा ‘झाला’सुद्धा ‘गजा’ने वाजवीत. दोनचार आवर्तनात एकमेकांची री ओढल्यावर शहनाईचे अनपेक्षित उत्तर केवळ लाजबाब असे. सारे काही उत्स्फूर्त. एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराने अर्धे चित्र काढावे आणि दुसर्‍या तितक्याच प्रतिभाशाली चित्रकाराने त्याच ताकदीने ते पुरे करावे असे काहीसे. शब्दकोडे, स्क्रिबल हे शब्दांचे खेळ, तर ही जुगलबंदी हा स्वरांचा.

व्हायोलीनने तीनतीन स्वरांच्या कधी डावीकडून उजवीकडे तर कधी उजवीकडून डावीकडे जाणार्‍या तिरक्या, कधी वर तर कधी खाली जाणार्‍या स्वरावलींच्या शिड्या सोडल्या. आता वाटले, पाहू या या सवालाला सनई काय जबाब देते ते. कारण आत्ताच असे चारपाच सवाल-जबाब झालेले. पण बिस्मिल्लाजींच्या मनात आज वेगळेच होते. सोडलेला स्वर बेमालूम उचलत सनईस्वराने घसरगुंडीवर स्वार होत जीवघेणी मींड घेत मनमोहक वळसे घेऊन समेवर येत रसिकांना मोदचकित करून सोडले. श्रोत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटासह व्यासपीठावरील जोगांनी आणि बाकी सर्व कलावंतांनी झुकून मानवंदना दिली आणि त्याही पेक्षा जास्त झुकून बिस्मिल्लाजींनी ती स्वीकारली. अगदी अभिनव, अलौकिक आणि अद्भुत असा स्वरविचार आणि त्या विचाराचा स्वरातून केलेला सौंदर्यचकित करणारा स्वरविलास. विद्या विनयेन शोभते हेही साक्षात पाहायला मिळाले. मोठ्ठे नवल म्हणजे पुढच्या सनईच्या तानेतला स्वर उचलून व्हायोलीनने वेगळ्या शैलीत तेवढीच सौंदर्यपूर्ण मींड घेऊन सम घेतली. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट. या वेळी झुकून मानवंदना देणारे होते बिस्मिल्लाजी आणि इतर कलावंत तर स्वीकारकर्ते होते व्ही.जी. जोग. विनयातही जुगलबंदी! हेच ते चमकदार सोनेरी क्षण, ज्यांच्या शोधात मी अनेक तू-नळ्या धुंडाळल्या, पण गवसले नाहीत. कुणाकडे ध्वनिपुंज असतील तर इथे जरूर शेअर करा.

या भारलेल्या वातावरणात विलंबित बंदिश सुरू झाली आणि तबलजींचा दिमाखदार पेशकारा झाला. दोन्ही वाद्यांतून बंदिशीच्या शब्दोच्चारावर तालातली आघातवजने देत सुरावट सुरू झाली. त्यामुळे बंदिशीचे शब्दच उमटताहेत असे वाटे. अवखळ ओढ्याच्या सोबतीने जाणार्‍या वळणावळणांच्या डोंगरपायवाटेवरून गात नाचत दुडदुडणार्‍या दोन खट्याळ सुरांना – चुकलो - मुलांना साथ द्यायला आता तबल्याच्या रूपाने एक अवखळ अबलख वारू आला. दोघांच्या मधून दुडदुडणारा. व्हायोलीनचे आवर्तन सुरू असताना तबलजी मृदंगासारखा नाद असलेला तबला घेई. ते आवर्तन संपून सनई सुरू झाली की कप चमच्याने वाजवल्यावर होणार्‍या किणकिणाटासारख्या टिपेचा तबला घेई. डग्गा बहुधा तोच असे, पण बाज वेगळा असे. काही मिनिटांनी विलंबितमध्येच थोडी लय वाढवून सवाल-जबाब सुरू होत. दोन्ही वाद्ये वेगळी, त्यांचे स्वरसौंदर्य, बाज वेगळे. एकाची स्वरावली ऐकली की वाटे - स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच का? पण दुसरा जेव्हा तीच स्वरावली अशा सौंदर्याने वाजवे की वाटे - अरे, हाही स्वर्गच. विलंबित ख्यालाच्या आठवणी मनात दाटल्या आणि मला सिंक्रोनाइज्ड जिमनॅस्टिक्सची आठवण झाली. त्यात कमनीय युवती रिंग, मोठ्ठा बॉल, लांबलचक रिबिन, पंखा असे एखादे आयुध घेऊन नेत्रदीपक कसरती करून प्रेक्षकांना घायाळ करते. इथे विलक्षणच घडले होते. दोन्ही कलावंत एकदोन कसरती करून आयुधेच बदलतात. चक्राकार रिंगच्या तानेची चकली होई, तर पुढच्या तानेच्या चकलीतून क्षणाक्षणाला आकार बदलणारी लांबचलांब प्रवाही पट्टी निघे.

सवाल-जबाबानंतर द्रुत ख्याल सुरू झाला. आता वारू चौखूर उधळला. व्ही.जी. जोगांच्या काही सुंदर, जोरकस नक्षीकामाच्या तानांच्या आतशबाजीनंतर बिस्मिलाजींकडून या तानांची सहीसही नक्कल वा वेगळी आतशबाजी अपेक्षित होती. पण त्याऐवजी बिस्मिल्लाजी कधी अनपेक्षित अशी जीवघेणी मींड घेऊन सम दाखवीत की ज्याचे नाव ते. तर कधी मींड न घेता नक्षीकाम करून अनपेक्षितरीत्या ‘चोर’सम घेऊन पुढच्या आवर्तनाला निघत. कोणत्याही तानेतल्या कोणत्याही स्वरातून अवचित अवतरून लीलया समेवर नेणारी ही जीवघेणी मींड हीच या जुगलबंदीची ओळख बनली. शिवाय लयीशी लपाछपीचा खेळ चाले तो वेगळाच. सुरावट कधी तबल्याच्या एक दशांश पाऊल मागे राही, तर कधी त्याला मागे टाकून एक दशांश पाऊल पुढे. कधी एखादे पाऊल हवेतच अधांतरी ठेवून पुढे ठरलेल्या ठिकाणी अंतराळातून सम येई. तबल्यावर कोण असे ते पार विसरलो आहे. तबलजीदेखील एक होता की दोन होते, काही काही आठवत नाही. पण वाद्यसंगीताला असते तशी सौंदर्यपूर्ण, आक्रमक, शानदार साथ असे. दोन वेगळ्या तबल्यांमुळे तबलासाथीला मस्त उठाव मिळे, वैविध्यात भर पडे आणि नवखे रसिकही खूश होत. पण सूक्ष्म, नाजूक नक्षीकाम सुरू झाले की तबलजीचा वारू रेशीमठेक्याने मांजराच्या हलक्या, नाजूक, चपल पावलांनी दौडे.

पंडितजींची तर्‍हा वेगळी. कधी कोणत्याही तानेतल्या कोणत्याही स्वरातून अवचित वामनाने तीन पावलांत तीन भुवने पादाक्रांत करावीत, तशी तारसप्तकातूनही अवघ्या दोन-तीन मात्रांत स्वरांची रेखीव, ठोस पावले घेऊन सम येई. तबलजीही निसर्गदत्त कौशल्याने अद्भुत अंदाजाने मधली योग्य अशी वजने घेत ही सम ठळकपणे दाखवे. बिस्मिल्लाजीही कमी नव्हतेच. तीच सुरावट सहीसही सनईवर घेऊन दाद मिळवीतच. बहुतेक वादक हीच कलाकारी वेगवेगळ्या शैलीत दाखवतात.

द्रुत ख्यालाच्या बंदिशीचेही शब्दच ऐकू येताहेत असे वाटे. इथेही एकच स्वरावली वेगवेगळ्या बाजात. पण द्रुत लयीत दोन्ही वाद्यांचे बाज वेगळेच वाटत. द्रुत बंदिशीतली खासियत म्हणजे लयकारी. इथे व्हायोलीनची खासियत वेगळी, तर सनईची खासियत वेगळी. इथे एक नवी कलाकुसरदेखील होती. भिन्न भिन्न लांबीच्या छोट्या छोट्या स्वरपट्ट्या आणि स्वरमोती तराण्याचा आभास उभा करीत. दोघेही आक्रमक सवाल-जबाबांचे द्वंद्व एकमेकांसह खेळीत, तर तबलजीसह वेगवेगळे. तबलजीकडे तर जोडी असते. कधी डावीकडचा डग्गा - बायां जबाब देईल, तर कधी उजवीकडचा तबला – दायां वा दोघेही मिळून. पण दाया केव्हा आणि बाया केव्हां हे साक्षात सरस्वतीही सांगू शकणार नाही. खालील ध्वनिचित्रपुंजात बासरी आणि तबला-डग्गा यांत सुंदर सवाल-जबाब रंगलेले आहेत, त्यात अनुराधाने तबल्यावर काय काय धमाल केली आहे पाहा. यात चित्रदेखील आहे, त्यामुळे तो पाहणेदेखील गरजेचे आहे. वाचता वाचता ऐकून ‘ती’ मजा कळणार नाही.


पंडित हरिप्रसाद चौरासिया बासरी आणि अनुराधा पाल तबला : सवाल-जबाब

विलंबितमधे मींड असे, तर वायुवेगाने दौडणार्‍या लयकारीतली लांबलचक चक्राकार स्वरावलीच्या उंच आभाळात तारसप्तकातल्या मध्यमावरून अवचित दोनतीन स्वरांची पावले घेत टुण्णकन उडी मारून जमिनीवर येणारी सम वा चोरसम हा एक खास अलंकार होता. तानांची आतशबाजी आठवताना माझ्या डोळ्यांपुढे जलतरणातल्या बोर्ड डाइव्ह्ज येतात. उलट्सुलट कोलांट्या, डावेउजवे ट्विस्ट्स आणि शेवटच्या क्षणी शरीर अगदी सरळ रेषेत घेऊन पाण्याच्या पृष्ठभागाला काटकोनातून अंगुलीस्पर्श करून केलेला सफाईदार, सौंदर्यपूर्ण जलप्रवेश. जलतरण नेत्रदीपक, तर हे श्रवणदीपक. जलप्रवेशविलास फक्त वरून खाली, तर स्वरविलासाला दिशेचे बंधन नाही. वर, खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, सरळ – तिरके कसेही.

हे चार परिच्छेद लिहिताना मारुबिहागातली एक अफलातून मींड माझ्या मनात रुंजी घालताना गहिवर आणते आहे, तर कधी एखादा तरबेज मुष्टियोद्धा प्रतिस्पर्ध्याचे घणाघाती ठोसे लीलया चुकवून दोराच्या सीमेवरून चपळाईने क्षणार्धात दोनतीन पावलात रिंगणाच्या मध्यावर यावा, तशी द्रुत त्रितालाला हुलकावण्या देत चोरसम बिजलीसारखी मनात चमकून जाते आणि हृदयाचा ठोकाच चुकतो. यांच्या लयकारीची ही ओळख बनली. वेगवेगळे रंग दाखवीत अवचित अवतरणारी वर उल्लेखलेली खास मींड सोडली, तर बहुतेक सारे खालील दुव्यावरील स्वरपुंजात आहे. पण त्याअगोदर शास्त्रीय संगीताची फारशी सवय नसलेल्या काही वाचकांसाठी आपण एक हिंदी गाणे आणि एक नाट्यगीत ऐकू या.


तुम तो प्यार हो सजनी – चित्रपट सेहरा: https://www.youtube.com/watch?v=h6n18kjinUs

ही कनकांगी कोण ललना: गायक प्रसाद सावकार

बिस्मिल्ला खान सनई आणि व्ही.जी. जोग व्हायोलीन जुगलबंदी - राग मारुबिहाग

शिवाय व्हीजी व्हायोलीनचे एक खास वैशिष्ट्य दाखवीत, तर सनईचे खास वैशिष्ट्य बिस्मिल्लाजी दाखवीत, ते मुळातूनच ऐकले पाहिजे. त्यासाठी खाली काही तू-नळी दुवे दिले आहेत. बिस्मिलाजींची थोरवी ही की व्हायोलीनबरोबरचे चपल सनईवादन वेगळे, सारंगीसोबतचे डौलदार सनईवादन वेगळे, तर सरोदबरोबरचे धीरगंभीर सनईवादन आणखी वेगळे. लय साथीदाराच्या वाद्याच्या प्रकृतीला शोभेशी. पण संगीतविचाराची रेखीवता, दर्जा, कलात्मकता, सौंदर्य सारे तेच.

खालील ध्वनिपुंजात त्या सनईच्या पिपाण्यांमधून खर्रखर्र, फरफर असे आवाज येताहेत. मध्येच काही स्वरही बरोबर लागत नाहीयेत. तरी मैफील कशी रंगली आहे पाहा. बिसमिल्ला खान सनई आणि अली अकबर खां - राग मारुबिहाग आणि चैती धून.

आता वेगळ्या सुरावटीचे एक हिंदी गाणे ऐकू या आणि त्यानंतर पुन्हा आपली सनई-व्हायोलीनची जोडी. छ्म छम नाचत आयी बहार.

बिस्मिल्ला खान सनई आणि व्ही जी. जोग व्हायोलीन जुगलबंदी : राग बहार.

तेरे सूर और मेरे गीत - चित्रपट : गूंज उठी शहनाई, संगीत : वसंत देसाई, गायिका : लिहायला हवे?

सतार आणि सनई - कलाकार दिलेले नाहीत, पण ओळखता येतात.

संगीताला भाषेची बंधने नसतात - इलिया राजा यांनी संगीतबद्ध केलेले एक तामिळ गाणे. चित्रपट : व्हिएतनाम कॉलनी, गायिका : बॉम्बे जयश्री.

गुलाम अली यांनी गायलेली एक गझल

बिस्मिल्ला खान सनई आणि व्ही.जी. जोग व्हायोलीन जुगलबंदी - राग जयजयवंती


बिस्मिल्ला खान सनई आणि व्ही.जी. जोग व्हायोलीन जुगलबंदी - राग चंद्रकंस.

एक नाट्यगीत : तेचि पुरुष दैवाचे. गायक - प्रभाकर कारेकर

बिस्मिल्ला खान सनई आणि व्ही.जी. जोग व्हायोलीन जुगलबंदी. राग मालकंस

व्ही.जी. जोगांचे व्हायोलीन चपळाईत वा लवचीकपणात सनईच्या तोडीस तोड अशी चपल सुरावट निर्माण करी. त्यामुळे या जोडगोळीच्या वादनाची खुमारी वेगळीच वाटे. सनईच्या साथीला सारंगी असतांना दर्जा उच्च असला, तरी तोच मालकंस थोडा वजनदार, भारदस्त, जास्त गंभीर वाटे. पण पल्लेदार सुरावटी उचलणे वगैरे वैशिष्ट्ये तीच. मी या दोघांच्या मैफलीला प्रत्यक्ष कधी गेलो नाही, त्यामुळे `ती’ मींड आणि संलग्न स्वरनर्तन होते की नाही, ठाऊक नाही.

बिस्मिल्ला खान सनई आणि पं. रामनारायण सारंगी : राग मालकंस

सनई, व्हायोलीन, सारंगी ही तिन्ही वाद्ये थोड्याफार समान पद्धतीच्या सुरावटी निर्माण करतात. त्यामुळे यातल्या वाद्यांच्या जुगलबंदीला वेगळीच खुमारी येते. व्यवस्थापनशास्त्रातले टीमवर्क आणि हे टीमवर्क यात एक मूलभूत फरक आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सहकार्‍याचे पाय खेचतात वा त्याला मागे ढकलतात, तर इथे अगोदर सहकार्‍याला कलाप्रदर्शनाला वाव दिला जातो आणि नंतर सहाकार्‍याच्या प्रतिभेपुढे आदराने माथा झुकवला जातो.

जशी सनई, व्हायोलीन, सारंगी ही तीन वाद्ये बरीचशी (आपल्या गळ्यासारख्या) समान पद्धतीच्या सुरावटी निर्माण करतात, तसेच सतार आणि सरोददेखील (वीणेसारख्या) समान पद्धतीची सुरावट निर्माण करणारी वाद्ये असल्यामुळे रविशंकर–अली अकबर खां, तसेच रविशंकर-अमजद अली खां या जुगलबंद्या अशाच अजोड झाल्या.

खालच्या ध्वनिपुंजात पंडित रविशंकरांनी सुरुवातीपासून सुमारे सहा मिनिटे झाल्यावर पुढची जवळजवळ दोन-तीन मिनिटे खर्जात किती अचूक स्वर छेडून किती सुंदर खेचकाम केले आहे आणि दर्जेदार ध्वनिमुद्रणाने ते कसे टिपले आहे, पाहा. दोन्ही वाद्यांच्या बनावटीचा दर्जा, वाद्यांचे जुळवणे – ट्यूनिंग, कलावंतांची अलौकिक कला आणि ध्वनिमुद्रणाचा दर्जा - सारेच अप्रतिम. मध्येच वीणा वाजत असल्याचाही भास होतो.

रविशंकर आणि अली अकबर खां : राग हेमबिहाग

पंडित जसराज म्हणतात की स्वर हाच ईश्वर आहे. गळ्याने घेतलेला स्वराचा शोध हाच ईश्वराचा शोध आहे. मनात हवा तसा स्वर गळ्यातून उमटला की ईश्वराचे दर्शन मिळाल्याचा अनुपम आनंद होतो. गायकाचे स्वर त्याच्या मनासारखे लागले की ‘सजल नयन’ होतेच. यालाच आपण अनूभूती येते असे म्हणतो. लेखक, कवी शब्दांच्या, शब्दातल्या भावनेच्या माध्यमातून ईश्वराचा शोध घेतात, तर चित्रकार, मूर्तिकार रेषांच्या, आकारांच्या, रंगांच्या, अवकाशाच्या माध्यमातून भावना व्यक्त करून ईश्वराचा शोध घेतात असे मला वाटते. शोधाच्या या प्रवासातच ईश्वरदर्शनाचा आनंद आहे. भाबड्या वारकर्‍यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनातून मिळणारी अनुभूती हीच असेल का? काही असले, तरी रसिकांना, अगदी ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या रसिकांनादेखील अशा सहजसुंदर, अलौकिक स्वरांतून, काव्यातून आणि शब्दांतून होणार्‍या भावनाविष्काराद्वारा ईश्वराचा साक्षात्कार होतो - किंबहुना स्वरानंद हेच त्यांच्यासाठी ईश्वरदर्शन असते यावर दुमत नसावे. या स्वरविभोर चित्तवृत्तीत असतानाच वाचकांना सुरेल धन्यवाद देऊन हा लेख संपवतो.

तळटीप : शास्त्रीय संगीताची तांत्रिक माहिती नसलेल्यांनादेखील वाचनाचा आनंद मिळावा, म्हणून प्रचलित संज्ञांचा वापर शक्यतो टाळला आहे, तरी काही संज्ञा अपरिहार्यपणे आलेल्या आहेत, त्याबद्दल क्षमस्व. चिजांचे शब्द तसेच स्वरमालिकांची सरगम वा नोटेशन्स मात्र पूर्णपणे वगळली आहेत.

श्रेयनिर्देश: सर्व व्हिडिओ आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Oct 2019 - 2:33 pm | कुमार१

फारच सुंदर अणि सुरेल लेख.
आवडला.
तुम्ही आता आमचे सन्गिताचे जाल-वर्ग घेउ लागा बरे !

बहुगुणी's picture

25 Oct 2019 - 3:17 pm | बहुगुणी

असेच म्हणतो. लेख संपूच नये असं वाटलं. बरंच काही शिकायला आवडेल.

कंजूस's picture

25 Oct 2019 - 3:51 pm | कंजूस

माझा पास बरं का.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 3:25 pm | यशोधरा

केवळ आणि केवळ सुरेल. श्रुतिसंपन्न लेख आहे.
ऐकायला खूप काही दिलंत, धन्यवाद!

जुइ's picture

27 Oct 2019 - 3:32 am | जुइ

जुगलबंदीचे अतिशय तालबद्ध वर्णन. तुम्ही लेखात दिलेल्या दुवे अवश्य ऐकणार.

विजुभाऊ's picture

27 Oct 2019 - 2:59 pm | विजुभाऊ

सुरेल लेख.
प्रेक्षणीय , वाचनीय आणि श्रवणीय सुद्धा

शास्त्रीय संगीताचे वावडे असणारे माझ्यासारखे करंटे अशा जुगलबंदी एन्जॉय (?) करू शकत नसले तरी तुमचा व्यासंगी, अभ्यासपूर्ण असा हा लेख नक्कीच एन्जॉय करू शकतात!
नेहमीप्रमाणेच तुमच्या अनुभव समृद्ध लेखणीतून उतरलेला हा रसग्रहणात्मक लेख आवडला 👍
धन्यवाद.

सुरेल लेख. शास्त्रीय संगीत नीट समजून घ्यायचे आहे ही जुनीच खंत पुन्हा उफाळून आली. पण तरीही लेख कळायला फारशी अडचण नाही आली.

जुगलबंदीविषयी काही वर्षांपुर्वी गिरीजादेवींनी एक सुरेख दाखला दिला होता - एका फुलदाणीत दोन रसिक जशी एकत्र फुलांची रचना करतील तशी जुगलबंदी रंगायला पाहिजे, आधीचे फुलाचे सौंदर्य न झाकता.

शिव-हरींनी म्युझिक दिलेल्या कित्येक चित्रपटांत संतुरीच्या आणि बासरीच्या स्वरांची अशी वीण/जुगलबंदी आहे, की ती विसरणे केवळ अशक्य. चांदनीतल्या 'तेरे मेरे होठों पे...' तल्या बासरीची ची जादू कितीतरी दिवस डोक्यात होती. बासरी शिकतांना हीच धून शिकायची होती. :-)

पद्मावति's picture

30 Oct 2019 - 5:06 am | पद्मावति

फारच सुरेख.

चौकटराजा's picture

30 Oct 2019 - 9:19 am | चौकटराजा

हा लेख दिवाळी अंकाचा मुकुटमणि ठरावा ! प्रत्येक साजाची काही वैशिष्ये व मर्यादा असतात . त्या मर्यादा ओळखून जुगलबंदी रंगविणे हे सोपे काम नसते . तरीही अनेकांनी हा संगीत प्रकार उत्तम प्रकारे हाताळलेला दिसतो. काहींच्या त्रिकुट बंदीही झाल्या आहेत .पण त्याला सह वादन असे म्हणता येईल उदा.चौरासिया,शर्मा व काब्रा .( कॉल ऑफ द व्हॅली ). बाकी पुर्णत: जुगलबंदी नव्हे पण असेच काही ची काही उदाहरणे म्हणजे " सप्त सूर झंकारीत बोले गिरिजेची वीणा हे गीत वा बसंत बहार मधील " केतकी गुलाब जुही चंपक बन फ़ूले " तसेच "आज गावत मन मेरो झुमके " !

सोत्रि's picture

30 Oct 2019 - 9:24 am | सोत्रि

श्रवणीय लेख, सुंदर!

- (कानसेन) सोकाजी

सर्वसाक्षी's picture

30 Oct 2019 - 10:24 am | सर्वसाक्षी

आपला सांगितीक व्यासंग, सखोल अभ्यास यासाठी सादर वंदन

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 4:33 pm | सुधीर कांदळकर

कुमार १, बहुगुणी अनेक अनेक धन्यवाद.

@कंजूसः `पास' ही छानच कल्पना. आपल्याकडून हे नवे शिकायला मिळाले. मात्र रॉयल्टीशिवायच वापरणार बरे कां.

यशोताई, जुइ, विजूभाऊ, अनेक अनेक धन्यवाद.

टर्मिनेटरः जीवनातला एखादा पैलू नाही आला म्हणून आपण करंटे होत नाही. ओरिसामधल्या मी काढलेल्या प्रकाशचित्रांमधल्या काही शिल्पांचा अर्थ मला मिपावर प्रचेतस आणि कंजूसराव यांनी सांगितला तेव्हा कळला होता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@मनीषः सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. गिरीजादेवींची आठवण आवडली. शिव हरींचे गाणे पुन्हा बारकाईने ऐकेन.

पद्मावति, सोत्रि आणि सर्वसाक्षी अनेक अनेक धन्यवाद.

चौरासाहेबः आपण बहुमान केल्यामुळे कानकोंडा होतो आहे. अनेक अनेक धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 11:36 pm | गुल्लू दादा

खूप छान लिहिलंय...मनोरंजनासाठी भरपूर सामग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

3 Nov 2019 - 1:39 am | चित्रगुप्त

बापरे, काय लिवलंय...काय लिवलंय...
आमचा शिरसाष्टांग नमस्कार आणि कोटि कोटि प्रणिपात.
चौकट्राजांनी लिहील्याप्रमाणे हा लेख या दिवाळीअंकाचा मुकुटमणि.
हे अवघे वाचून, दिलेले विडियो पुन्हा पुन्हा बघुनैकून सगळे नीट समजून घ्यायला आम्हाला महिना लागेल.
संगीताचे रसग्रहण करत त्यातले मर्म उलगडून सांगण्याची तुमची क्षमता आणि हातोटी अद्भुत आहे. अश्या प्रकारचा लेख माझ्या वाचनात पहिल्यांदाच आला आहे. अनेक आभार.

मित्रहो's picture

3 Nov 2019 - 1:44 pm | मित्रहो

खूप छान सुरेल लेख आहे. शास्त्रीय संगीताची अजिबात ज्ञान नसनाऱ्या माझ्यासारख्यालाही तुमचा लेख खूप आवडला. हळू हळू लेखात दिलेल्या दु्व्यातील गायनाचा आस्वाद घेतो.

सुधीर कांदळकर's picture

3 Nov 2019 - 8:52 pm | सुधीर कांदळकर

गुल्लु दादा, आणि मित्रहो: नम्रतापूर्वक धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2019 - 5:59 am | सुधीर कांदळकर

नम्रतापूर्वक धन्यवाद देतो.

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 11:38 am | श्वेता२४

अत्यंत सुरेल लेख. आणि दुव्यातील गायन काय वर्णावे? वाचनखूण साठविली आहे.

सुधीर कांदळकर's picture

7 Nov 2019 - 10:13 am | सुधीर कांदळकर

धन्यवाद श्वेताताई.

अनिंद्य's picture

7 Nov 2019 - 11:11 am | अनिंद्य

@ सुधीर कांदळकर,

या सुरेल मैफिलीला उशिरा हजेरी लावल्याबद्दल वाईट वाटते आहे.

फुलांचा ताटवाच उमललेला असावा आणि तो फुलवणारा रसिक वनमाळी प्रेमाने प्रत्येक फुलाची ओळख करून देत असावा असे फीलिंग आले.

उत्तम आणि रससंपृक्त. लेखन फार आवडले _/\_

सुमो's picture

7 Nov 2019 - 11:13 am | सुमो

न कळणार्‍यांना सुध्दा त्याचे मर्म उलगडून दाखविणारा सुगम लेख. एक एक दुवा उघडून आस्वाद घेतो आहे.

स्मिताके's picture

7 Nov 2019 - 9:18 pm | स्मिताके

अतिशय सुंदर लेख. दुव्यांवरचा खजिना ऐकते आहे.

कुमार१'s picture

9 Nov 2019 - 11:11 am | कुमार१

भारतीय वाद्यांमध्ये तबला हा एकच 'नर' आहे, असे एका लेखात वाचले होते.
खरे आहे का ?

चौकटराजा's picture

9 Nov 2019 - 4:32 pm | चौकटराजा

ढोल , ढोलक, पखवाज ,मृदंग हे आहेत की जोडीला !

पिवळा डांबिस's picture

9 Nov 2019 - 8:11 pm | पिवळा डांबिस

अत्यंत सुरेख आणि तितकाच सुरेल लेख.
सुधीरभाऊ, जिंकलंत.
माफ करा, प्रतिक्रिया द्यायला मला जरा उशीर झाला. पण तुम्ही पुढे केलेलं हे फराळाचं ताटच इतकं भरगच्च होतं की सगळ्या लिंकांचा आस्वाद घ्यायला वेळ तर लागणारच!
हार्दिक अभिनंदन!

सुधीर कांदळकर's picture

11 Nov 2019 - 4:09 pm | सुधीर कांदळकर

ऐंद्य, सुमो, स्मिताके. पिडा अनेक,अनेक धन्यवाद.
पिडा: नेहमीचे दिनक्रम सांभाळून, इतर वाचह करून सारे दुवे ऐकायला भरपूर वेळ लागणार हे खरेच.
@चौरा: स्वारस्यपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद.
@ डॉ. कुमारः जलतरंग, काचतरंग, काष्ठ्तरंग ही वाद्ये आहेत. प्रख्यात संगीतकार आणि संयोजक अनिल मोहिले सुरेख जलतरंग वाजवीत. मनहर बरवे काष्ठतरंग आणि काचतरंग वाजवीत. तबलातरंग आहे.

आणखी दिलरुबा आहे. सारंगीसारखे वाद्य आहे. परंतु लांबी सारंगीच्या जवळजवळ तिप्पट. स्वर सारंगीसारखाच पण थोडासा खर्जातला धीरगंभीर, जास्त 'टिंबर' असलेला. याच्या लांबीमुळे वाजवण्याला कठीण
https://chandrakantha.com/articles/indian_music/dilruba.html
आणि
https://en.wikipedia.org/wiki/Dilruba

इथे जास्त माहिती मिळेल. अस्सेच इसराज नावाचे देखील एक वाद्य आहे.

पाश्चात्य वाद्यापैकी बाँगो, काँगो, ऑर्गन, माऊथ ऑर्गन वगैरे आहेतच. चौघडा आहे. बासरीला अलगूज, पावा देखील म्हणतात. शिवाय शंकराच्या, नारदाच्या हातातला डमरू आहेच.

आपण उत्तरोत्तर जास्त शास्त्रीय संगीत ऐकाल असे वाटते.