शतशब्द कथा!

Primary tabs

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
2 Sep 2019 - 11:00 pm

हो, मी खोटं बोलते. काय करणार, पांढऱ्या वस्त्रावर काळे आवरण घालण्याची आमची प्रथाच आहे. कोर्टातून बाहेर निघाल्यावर नेहा भेटली. नोटा मोजून घ्यायची गरज नव्हती कारण दिलेल पाकिट जड होतं आणि नेहा प्रामाणिक!
अजूनही आठवते आहे..... समीरच प्रेत....तिचे रक्ताने माखलेले हात.... खूनाचा आरोप.... अटक झाली तेव्हा केवढी सैरभैर झाली ती! मी केस घेतली. शेवटी फॅमिली फ्रेंड. कोर्टाला पटले - कुंडीवर डोके आपटून अपघाती मृत्यू.
रक्ताच्या थारोळ्यातल्या प्रेताला तिने हलवून पाहिले. नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच. आता हेच बघा ना.... छोट्याश्या भांडणाचं निमित्त. समीर ह्यांच्या अंगावर धावला नसता तर ह्यांनी त्याला कुंडी फेकून मारलीच नसती! नै का?

©मधुरा

कथालेख

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

3 Sep 2019 - 9:04 pm | मराठी कथालेखक

छान..

मृणालिनी's picture

4 Sep 2019 - 7:46 am | मृणालिनी

धन्यवाद!