विनाश

Primary tabs

alokhande's picture
alokhande in काथ्याकूट
23 Aug 2019 - 12:51 pm
गाभा: 

#विनाश
पृथ्वीवरील सर्वात मोठं असलेलं वर्षावन अमेझॉनच जंगल गेली 16 दिवस जळतंय आणि याच कोणालाही सोयर सुतक नाही. साधी दाखल घ्यावीशी वाटत नाही या पेक्षा मोठं दुर्दैव ते काय असेल. आपली माध्यम इडी चिदंबरम यांच्यात गुंतून पडली आहेत.जळणाऱ्या जंगलाची ही बातमी दाखवून त्यांना टीआरपी थोडीच मिळणारे.पण जर हे असच चालू राहिलं तर विनाश अटळ आहे...

प्रतिक्रिया

बरोबर आहे, पण.. काही चॅनेल राज्य पातळीवरचे, काही देश पातळीवरचे आणि काही आंतरराष्ट्रीय असतात.

आपापल्या क्षेत्रानुसार ते बातम्यांचं प्राधान्य ठरवतात. आंतरराष्ट्रीय चॅनेल्सवर पुरेसं कव्हरेज अशा बातम्यांनाही मिळत असतं. आपण कोणते चॅनेल्स बघतो किंवा न्यूजपेपर वाचतो त्यावर अवलंबून.

अनेक आंतरराष्ट्रीय चॅनेल्स सुदैवाने सर्व DTH सेवांमध्ये मिळतात. ते जगभर पाहिले जातात. आज तक किंवा आयबीएन लोकमत यावर स्थानिक आणि देशी बातम्या जास्त संख्येने आणि जास्त तपशिलात मिळतील. अल जझिरा, cnn, bbc यावर अमेझॉन जंगलच काय, आफ्रिका, मलेशिया, कोरिया, टास्मानीया सर्व ठिकाणी चाललेल्या आगी, दंगली, उठाव, उत्सव, निवडणुका अथवा दडपशाही सर्व कव्हर केलं जातं असं निरीक्षण आहे.

सतिश गावडे's picture

23 Aug 2019 - 9:24 pm | सतिश गावडे

हितं लेक लिवीत बसन्यापेकशा तिकडं पान्याची यकादी बालडी वतून आला आस्ताव तं कायतरी फायदा झाला आस्ता.

विजुभाऊ's picture

24 Aug 2019 - 5:04 pm | विजुभाऊ

इथले सगळॅ हिंदी चॅनेल्स हे स्थानीक वृत्तपत्रांप्रमाणे आहेत. बीहार मधल्या कोणत्यातरी पूर मधल्या गल्लीत कोण्या बाहुबली ने त्यांच्या भावाला कानाखाली वाजवली ह्या बातम्या ते दिवसभर रंगवून सांगत असतात

आनन्दा's picture

24 Aug 2019 - 9:08 pm | आनन्दा

बाकी अ‍ॅमेझोन च्या जंगलापेक्षा सोशल मिडियाच जास्त तापला होता अस दिसतय.

अ‍ॅमेझोनमध्ये पाउस पडला पण, तरी इथली आग विझायची काही लक्षणे नाहीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Aug 2019 - 12:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

तिकडं काही झालं की लगेच पर्यावरण बुडते जग संकटात येते

पण मग याच न्यायाने आमच्या कोल्लापुरच्या पुराची बातमी त्या अमेरीकेत बी बी शी आणि शी एन एन ने कितीवेळा अशीच रंगवून रंगवून दाखवली होती?

म्हणजे अ‍ॅमेझॉनची जंगले जळत आहेत याचे वाईटच वाटते आहे. पण ती बातमी आपल्या चॅनेल वर चघळून दाखवून काय मिळणार आहे?

का इंग्रजांचे ते पर्यावरण आणि आमची मात्र दळींद्री..... असे असेल तर ठीक आहे.

पैजारबुवा,