चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९

Primary tabs

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
1 Aug 2019 - 10:51 pm
गाभा: 

राजकीय वार्ता :
राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्‍या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या.

शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्‍या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे.
आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे.

दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही.
काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल.
तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल.
भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ?

अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्‍या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे !

दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :)
फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल.

धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

2 Aug 2019 - 10:23 am | महासंग्राम

CCD चे मुख्य व्ही जी सिद्धार्थ यांची आत्महत्या हि एक दुःखदायक घटना घडली, उद्योग क्षेत्राला हा एक मोठा सेटबॅक मानला जातो.

धर्मराजमुटके's picture

2 Aug 2019 - 12:39 pm | धर्मराजमुटके

आजच्या लोकसत्तात अग्रलेख आला आहे. एकंदरीतच भारतात व्यवसायाला पोषक वातावरण नाही असा सुर जाणवतो.

माकडतोंड्या's picture

2 Aug 2019 - 4:15 pm | माकडतोंड्या

काय संबंध?
भरमसाठ कर्जे काढायची. नवश्रीमंतांसाठी चोचले पुरवायचे धंदे उभारायचे
नवश्रीमंत लल्ल झाले की गाळात जायचे

बिजनेस मॉडेलच भंकस !

आमच्या समोरचा चहावाला तीस वर्षांत फक्त चहा विकून (सामान्य जनतेला ) दोन फ्लॅट घेऊन आरामात जगतोय आणि म्हणे भारतात धंदे करता येत नाहीत.

१ राज ठाकरे याम्च्यावर ई डी ची नजर आहे अशी बातमी येतेय. हे खरे तर उद्धव थाकर्‍यांच्यासोबत व्हायल अहवे. पण ते केवळ भाजप सोबत आहेत म्हणून वाचलेत
मनसे फॅक्टर राष्ट्रवादीबरोबरच बुडणार असे वाटतेय.
२ राष्ट्रवादी येत्या निवडणुकीत नव्उमेदवारां ना घेवून उतरणार असे दिसतेय. हे एक प्रकारे त्याम्च्याच्यासाठी चांगलेच आहे. उगाच ई व्ही एम वगैरे मुद्द्यावरुन विरोध करण्यापेक्षा महाराष्ट्रातील औद्योगीक विकास खास करुन कोकण आणि विदर्भ पट्ट्यात . राष्ट्रवादीला तारेल. पश्चीम महाराष्ट्रात कुठे काय दाबायचे म्हणजे तोंड उघडेल हे भाजप पेक्षा तेच चांगले ओळखून आहेत.
३ सर्वच ऑटो मोबाईल कम्पन्यांनी त्यांच्या गेल्या तीमाहीतील विक्री घटल्याची चिंता बोलून दाखवली आहे.
४ रीयल इस्टेट चे नक्की काय चालले आहे तेच समजत नाहिय्ये

माकडतोंड्या's picture

2 Aug 2019 - 4:17 pm | माकडतोंड्या

४ रियल इस्टेट संपली हो कधीच

प्रसाद_१९८२'s picture

2 Aug 2019 - 1:57 pm | प्रसाद_१९८२

राज ठाकरेंच्या नेतृत्वात EVM विरोधात मुंबईत पत्रकार परिषद सुरु आहे. ह्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व विरोधीपक्ष उपस्थित आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

2 Aug 2019 - 2:02 pm | प्रसाद_१९८२

सध्या भारत चंद्रावर यान उतरवायच्या प्रयत्नात आहे व इकडे राजू ठाकरे मतपत्रिकेवर मतदान घ्या म्हणतोय. यावेळी मतदाना दरम्यान बॅलेटबॉक्स पळवायची योजना बनविलेली दिसते मनसेप्रमुखांनी.

सोशल मिडियावर मनसे बाबत टिका करणाऱ्यानां शोधून ठोका म्हणणाऱ्या राज ला जनमत कधीच समजेल नाही हे मात्र नक्की . ई व्ही एम बाबत जनता मूर्ख आहे का ? विरोधी पक्षानीं ई व्ही एम बद्दल रान उठवले आहे आणि त्यांच्या इशाऱ्या वर नाचणाऱ्या राज ला पाहुन उत्तर भारतीय लग्नात पोटाची खळगी भरण्यासाठी नाचकाम करणाऱ्या महिलांची आठवण झाली .
ई व्ही एम मुळे आता पर्यन्त हजारो झाडांचे प्राण वाचले , ई व्ही एम मध्ये जर फेरफार करता येत असती तर विरोधी पक्षानां पुरावे बाबूशाही ने लगेच पुरवले असते कारण बाबुशाही मध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात व भाजप वर तोंडसूख घेण्यासाठी या व्हिसलब्लोअर ने सर्वात पुढे पाऊल ठेवले असते .
ठाकरे बंधु महाराष्ट्रातील जनतेला गुलाम समजत असावेत , गुलामां वर हुकूमत गाजवीण्या साठी , एकमेकांचे पाय ओढण्यासाठी उगिचच शिवप्रेम , ई व्ही एम ची नाटके चालली आहेत .
या नाटका साठी राजने त्या भांडखोर ममताची मदत घेवून वैचारिक दिवाळखोरी चे प्रदर्शन घडविले यात शंका नाही .

विनोद वाघमारे's picture

8 Aug 2019 - 4:52 pm | विनोद वाघमारे

म्हणजे सन्शयाला जागा नको. दुध का दुध, पानी का पानी होइल. वैचारिक दिवाळखोरी वगैरे भ्रम आहेत सगळे.
'ई व्ही एम मुळे आता पर्यन्त हजारो झाडांचे प्राण वाचले' बिरबलच्या 'झाडाखाली बिर्यानी बनविन्याच्या गोष्टिची आठवण झाली.

गब्रिएल's picture

8 Aug 2019 - 5:26 pm | गब्रिएल

ह्ये मातर लई ब्येस बगा !

लई येळापासून चालू आसलेली पद्धत, ज्यानं सुरू केली तोच हारला, की त्येची रड काडायला बदला आनी मंग दुसरा रडाया लागला की परत बदला. फकस्त दुदका दुद आनी पानी का हाच ख्योळ चालू ठ्येवा. द्येश काय आपोआप चालू र्‍हाईलच आनी जेवान द्यायला भगवान बसल्येला हाईच. लsssईच बेस आयडिया सर्जी ! =))

निवडून आलेल्याइतरांची मदत का घेतात? स्वत:च निवडून येऊन बाकं का वाजवत नाही?
-------
इविएम नको तर {महागडे} मोबाईल, तंत्रज्ञान तरी का वापरता? त्यातही बरीच गोलमाल आहेच.
-------
दगडी पाटीवर पुसूनपुसून शिकता येतेच. ट्याबचे वाटप कशाला?
-------
तुमच्याच नेत्यांनी भारताला एकविसाव्या शतकात नेलं हे चुकलं का?
-----------------
आणि समजा चिठ्ठ्या टाकुनही मतं नाही मिळाली तर कोणता मुद्दा मांडणार?

विनोद वाघमारे's picture

8 Aug 2019 - 4:58 pm | विनोद वाघमारे

"आणि समजा चिठ्ठ्या टाकुनही मतं नाही मिळाली तर कोणता मुद्दा मांडणार?"
तर मग खरोखर आत्मपरीक्षण करणार.

धर्मराजमुटके's picture

8 Aug 2019 - 6:01 pm | धर्मराजमुटके

मग अदृष्य शाईचा शोध लावायचा. सांगायचं की आमच्या मतापुढील शाई आपोआप गायब होते आहे आणि ती भाजप च्या उमेदवाराच्या जागी उमटते.

नाखु's picture

9 Aug 2019 - 4:38 pm | नाखु

त्या तमाम मतदारांनी समोर येऊन सांगायचे कि आम्ही भाजपा ला मत दिले मग आमचे मनसैनिक त्यांचा कायमचा बंदोबस्त करतील.

पुन्हा एकदा लाज टाकरे !!!

विनोद वाघमारे's picture

12 Aug 2019 - 7:57 pm | विनोद वाघमारे

चुकीला शिक्षा हि झालीच पाहिजे. पुन्हा एकदा ठोकरे !

सिमारेषेवर लष्कर वापर करत असलेल्या बोफोर्स तोफा ज्याचा पल्ला ३०km च्या पुढे आहे. दर्शवते की प्रसारमाध्यमात येणार्‍या बातम्यापेक्षा मोठ्या प्रमाणात युध्द सुरु आहे.

ट्रम्प's picture

4 Aug 2019 - 2:52 pm | ट्रम्प

भारत सरकार जम्मू काश्मीर मध्ये नक्की काय करणार आहे ते कळेनासे झाले आहे . अफ़ग़ानिस्तान मधून us माघार घेत असताना पाकिस्तान ची तोंड फाटेस्तो कौतुक करत आहे व जम्मू कश्मीर प्रश्ना मध्ये लुड़बुड करण्याचा प्रयत्न करत आहे .
Us च्या लुड़बुड मुळे पाकिस्तान जम्मू काश्मीर प्रश्न धगधगता ठेवण्यासाठी गेले चारपाच दिवस कुरापत्या काढत आहे .
जम्मू , कश्मीर आणि लदाख असे तीन राज्य स्थापन करण्याची हवा ट्विटर वर खुप वाहत आहे .

त्याच्या डोमॅस्टिक प्राॅब्लेम कडुन पब्लिकचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणी अमेरिकेला अफगणिस्तानमधे ब्लॅकमेल करण्यासाठी काश्मिर वापरुन घेत आहे.

अनन्त अवधुत's picture

5 Aug 2019 - 1:42 pm | अनन्त अवधुत

ट्रम्प तात्यांना अफगाणिस्तानातून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे. त्यांचे भारताला म्हणणे आहे कि अफगाण मध्ये सैन्य पाठवा. भारत अमेरिकेच्या मदतीला आला तर अमेरिकेला लवकर बाहेर पडता येईल. भारत सैन्य पाठवायला तयार नाही, एक सॉफ्ट स्टेट म्हणून भारताची अफगाण मध्ये चांगली पॉवर आहे. पण भारताला तिथे युद्ध लढायचे नाही. अजून एक उपाय (हा उपाय भारतीय सैन्य मदतीचा पर्याय नाही) म्हणजे तालिबानची दाढी कुरवाळून , त्यांना जरावेळ शांत करून गुपचूप निसटायचे. त्यासाठी पाकिस्तानची मदत गरजेची आहे. म्हणून तात्याने इम्रानला/ आयएसआय दिलेली ऑफर 'मी काश्मीर प्रश्नात मध्यस्ती करतो, तुम्ही अफगाण मध्ये मला मदत करा'

झेन's picture

5 Aug 2019 - 11:25 am | झेन

घटनेतील 370 कलम काश्मीर मध्ये रद्द करण्याची शिफारस

भंकस बाबा's picture

5 Aug 2019 - 2:36 pm | भंकस बाबा

आता हा पहिला अंक संपला आहे. पुढे पाकडे कश्मीरियत , जमुरियत , आवाम की मांग असे करून कुरापत काढण्याचे ठरवेल तेव्हा फुटिरतावाद्याना पहिला दणका बसेल, नंतर सैन्य तैनात आहेच

कदाचित लाहोरमधे स्वस्त मिळेल!

बाप्पू's picture

6 Aug 2019 - 11:45 pm | बाप्पू

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, सुषमा स्वराज यांचे निधन.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांनी ज्या पद्धतीने देशासाठी काम केले ते खरंच कौतुकास्पद होते. परराष्ट्र मंत्री या नात्याने ज्या आपुलकीने आणि जबाबदारीने त्यांनी भारतातील आणि भारताबाहेरील नागरिकांची काळजी घेतली, ते पाहून खरंच मन भारावून जायचे. आपल्या एका ट्विट ला देखील मिळणारा प्रतिसाद पाहून परदेशातील भारतीयांना आपण भारतीय असल्याचा गर्व व्हायचा. आंतरराष्ट्रीय राजकारणात गरज पडल्यास कणखर आणि सडेतोड भूमिका घेऊन भारताची ताकद जगाला दाखवून दिली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काय आर्थिक परिणाम होतील भारतावर आणि पाकीस्तानवर ?

सोन्या बागलाणकर's picture

9 Aug 2019 - 4:10 am | सोन्या बागलाणकर

पाकिस्तान : पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे
भारत: इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नाही जाता!

या संस्थळावर आणि एकूणच जनतेत असली तरीही व्यापारीदृष्ट्या पाकिस्तानचे आपल्या दृष्ठटीने पुष्कळच महत्व आहे. इथे कोणी बजाज ऑटोमध्ये काम करणारे असतील तर ते याची पुष्टी करतीलच. शेतमाल आणि चित्रपट उद्योग यांनाही याची झळ पोहोचणार आहे. सध्याच्या काळात जेंव्हा रोजगार आणि बाजारात उठाव कमी आहे त्या काळात हि झळ येत्या काही दिवसातच चांगली जानवू शकते.

सुबोध खरे's picture

8 Aug 2019 - 12:47 pm | सुबोध खरे

चूक

On a deeper analysis, it appears that Pakistan's decision to temporarily suspend trade ties will not have much impact on both the nations.

Read more at:
//economictimes.indiatimes.com/articleshow/70574898.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

धर्मराजमुटके's picture

8 Aug 2019 - 6:04 pm | धर्मराजमुटके

महिलांना मोफत मेट्रो प्रवास, घरटी २०० युनिट पर्यंत मोफत वीज, २ हजार सीसीटीव्ही नंतर राजमान्य राजश्री केजरीवाल सर आता दिल्लीकरांना मोफत इंटरनेट देणार आहेत. धरतीवर जन्नत कुठे असेल तर ती काश्मीर मधे आहे अश्या अर्थाचे एक वचन आहे पण मला वाटत दिल्ली हाच खरा स्वर्ग होणार. दिल्लीत स्थायिक व्हावे असा विचार परत मनात घर करुन राहिला आहे :)

धर्मराजमुटके's picture

9 Aug 2019 - 9:23 pm | धर्मराजमुटके

हल्ली एम्स चे नाव ऐकले की पोटात गोळाच येतो !

खटपट्या's picture

10 Aug 2019 - 1:38 pm | खटपट्या

खांग्रेस आणि अन्य पक्षातुन कितीही लोक्स भाजपात आले तरी त्यांचा वापर फक्त आणि फक्त संख्याबळासाठीच होइल. वरच्या लेवल ला भाजपाइच रहातील.
बाकी जे लोक्स भाजपात जात आहेत ते आपले प्रोजेक्ट, बेहिशेबी मालमत्ता वगैरे वाचवण्यासाठीच जात असतील.

ट्रम्प's picture

10 Aug 2019 - 2:30 pm | ट्रम्प

कोल्हापुर व सांगली मध्ये आलेल्या पूरामूळे झालेली हानी भरून यायला दोन चार वर्ष लागतील , पण भाजप सेने च्या सरकार ने पुरस्थिति गांभीर्य ने हातळली नाही हे ही नक्की . बोलबच्चन मुख्यमंत्री दोन दिवस जन आदेश च्या यात्रेत बिझी होते तर सेना प्रमुख बाल राज्यभिषेक तयारित मग्न होते . त्या दोन दिवसात कोल्हापुर कर अक्षरशः दैवाच्या भरोशावर होते .
नालायक विरोधकानी आरडाओरड चालू केल्या नंतर बोलबच्चन हवाई पाहणी करायला गेले .
त्यात अजून भर महाजननीं पाहणी करताना हसून सेल्फी काढल्या मुळे पुरग्रसतांच्या जखमें वर मिठ चोळले गेले .
एकंदरीत आपदकलीन परिस्थिति कशी हैंडल करु नये याचे उत्तम उदाहरण मुख्यमंत्री नीं

भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प यांच्याशी सहमत.
कोल्हापूर आणि सांगली दोन्ही ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले.
शिवसेनेने देखील कोल्हापूरकरांना वाऱ्यावर सोडून दिले होते, कोल्हापूर हार्दिक शिवसेनेचा गड समजला जातो तरीही शिवसेनेच्या नेतृत्वाने अक्षम्य दुर्लक्ष केले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प यांच्याशी सहमत.

हे वाचले आणि, 'राष्ट्राध्यक्ष ट्रंप चक्क इथेही पचकले की काय?' असा विचार मनात चमकला. प्रतिसाद पूर्ण वाचल्यावर तो गैरसमज दूर झाला. :)

डँबिस००७'s picture

10 Aug 2019 - 8:00 pm | डँबिस००७

NDTV च्या प्रमोटर प्रणय राॅय व राधिका राॅय ह्यांना मुंबई विमानतळावर अटक !! देश सोडुन बाहेर जात होते !!!

एन्डीटीव्हीने एका बँकेकडून घेतलेलं कर्ज मुदतीआधी फेडलं म्हणून त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे.
कर्ज मुदतीआधी फेडलं म्हणून नाही तर कर्ज फेडताना बॅंक अधिकार्यांच्या संगनमताने कमी व्याज दराने कर्जाची परतफेड केली गेली. ह्या प्रकारामुळे बॅंकेला ४५ कोटीच नुकसान झाल. त्याप्रकरणात प्रणय राॅय विरोधात चौकशी सुरू आहे
"The Central Bureau of Investigation (CBI) has already filed a First Information Report (FIR) in this regard and raided their home for diverting around Rs. 45 crores from ICICI Bank loan fraud in 2008. This SEBI Order is a vindication for CBI which is yet to file charge sheet. CBI sleuths have already found that Roy diverted this money to buy a home in Cape Town in South Africa."
2008 ला केलेल्या ह्या गुन्ह्याची साधी दखल २०१४ पर्यंत काॅंग्रेसच्या सरकारात घेतली गेलेली नाही. आता NDTV चे प्रमोटर प्रणय राॅय व राधिका राॅय वर बर्याच केसे संबंधी चौकशी चालु आहे.

नाखु's picture

10 Aug 2019 - 10:09 pm | नाखु

केली तर कशाला त्यांचे भाऊबंद ( खाल्लेल्या पार्टीत मनसोक्तपणे फुकटची मद्य आदि चंगळ केलेले) कशाला सुद्धा अच्छे दिन म्हणणार नाहीत.

तुम्ही मिपावरील विचिरवंतांना विचारा,ते तुमच्याशी " भारत सरकार, संबंधीत बॅंक यांच्या दृष्टीने ४५कोटी म्हणजे काय मोठी रक्कम नाही.
मलल्यावर का नाही कारवाई केली,नीरव मोदीचे काय झाले?
तसेच ही माध्यमांची मुस्कटदाबी आहे, काश्मीरमध्ये बंद असलेली दोन दुकाने दाखविली म्हणून ( शेजारच्या उपहारगृहात आमच्याच बातमीदाराने चहा नाष्टा केला) ते दाखवता येणार नाही.

तस्मात् ही बातमी कुठेही येणार नाही.

आणि त्यांच्या समर्थनार्थ पेपरवाले ते डावे बुद्धीमंत लगेचच येतील याची खात्री बाळगा.

वाचकांची पत्रेवाला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

ट्रम्प's picture

10 Aug 2019 - 11:06 pm | ट्रम्प

" धरणात पाणी नाही तर मुतु काय ? " म्हणणारा बारामतीकर , मुंबई हल्ल्या नंतर उध्वस्त ताज होटल मध्ये रामगोपाल वर्मा ला घेवून जाणारा कोंबडा हेअरकट ,
आणि पुरग्रसतांच्या मदती वर लेबल छापणारा आमदार , नावेत बसून सूहास्यवदन करत सेल्फी काढनारा पालकमंत्री , विरोधकाच्या साथी ला जावून बसलेला पेंटर , मुलाच्या राज्याभिषेकसाठी तड़फड करणारा सेनामालक हे सगळे एकाच पातळी वरचे निर्दयी नेते आहेत .
आणि बोलबच्चन तर फक्त पुढील टर्म बूक करण्यासाठी केंद्रसरकारला न दुःखवीण्याचा प्रयत्न करत आहे .
" देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र " हि घोषणा ऐकायला चांगली वाटते पण कोणीही कितीही प्रयत्न करु द्या मोदींच्या नखाची ही सर कोणाला येणार नाही .

माहितगार's picture

10 Aug 2019 - 11:14 pm | माहितगार

सगळे नाटक करून सोनीया गांधीच पुन्हा एकदा अध्यक्ष जाहीर होणे जवळपास अपेक्षीत होते, कारण संसदीय पक्षाचे प्रमुखपद सवत;कडे ठेवल्या नतंर अद्याप गांधी घराण्या ची मक्तेदारी त्यांना संपवायची नाही ते स्पष्ट होतेच . झालेही तसेच, सगळ्यात विनोदी बाब
जाहीर झाल्यानंत पहिल्या काही ट्विटमध्ये एक ट्विट आले त्यात 'खोदा पहाड निकली बुढीया' हे चपखल वाक्य होते.

पण या घोषणेपुर्वी काही मिनीटे राहुल गांधी बाहेर आल्या नंतर काँग्रेस अध्यक्ष पदा बाबत राहुल गांधी काही बोलतील म्हणून गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली. त्या नंतर एनडी टिव्हीचा रिपोर्टर सुद्धा त्या अफवा आहेत आणि काश्मिर मध्ये आलबेल असल्याचे सांगत होता. राहुल गांधींना काश्मिरची काळजी वाटते एवढे म्हणूनही सरकारला प्रश्न विचारता आला असताच पण देशाचे काही होवो देश विरोधी बोलणे थांबवणार नाही असा पणच लांगलचलक पक्षाने घेतलेला अद्याप सोडलेला नाही आणि बुढीया आणि तिचा राजदुलारा सुद्धा :(

त्यांना हवे असलेल्या अध्यक्षांचे नाव मागितले गेले, त्यामुळे घाबरुन एकाही लोकशाहीच्या खंद्या समर्थक नेत्याने ते द्यायचे धाडस केले नाही, शेवटी लोकशाहीचा विजय झाला आणी महाराणीचे नाव फायनल झाले.

आईची तब्येत बरी नसते म्हणून तरुण तडफदार (कोण रे तो त्याला अर्धवट म्हणाला ..जाऊ द्या लक्ष देऊ नका ) मुलाला अध्यक्ष केला. पोराने अपेक्षेप्रमाणे दिवे लावले ( देखो भैय्या.. देखो भैय्या.. देखो भैय्या.. तुम लोग मेरा साथ नही देते तो ) अचानक बॅकग्राउंडला किशोरचं गाणं सुरू होतं.. " मै तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या खबर है कहा मेरी मंजील "

मग अगदी डिट्टो आपल्या आजीसारखं नाक असलेल्या बहिणीला साकडं घातलं. पण आपण अध्यक्ष झालो तर आपल्या नव-याच्या कर्तृत्वामुळे आपलं ते टोकदार नाक कधी कापलं जाईल याची शाश्वती नसल्याने बहीण पिछेमुड झाली

मग काय शेवटी दोन्ही मुले निकम्मी निघाल्यावर
" इस डेश को बॅचाने के लीये मुझे ही कुछ कॅरना पॅडेगा " असं म्हणत आईसाहेब पुन्हा सिंहासनावर विराजमान झाल्या .

धर्मराजमुटके's picture

11 Aug 2019 - 9:28 pm | धर्मराजमुटके

सगळ्या गडबडीत राहूनच जातय सारखं, रोज लिहिन म्हणतो पण काही कारणास्तव राहून जातयं ! विचारायचं आहे की पुरगस्त भागात कोणी मिपाकर आहेत काय ? सुखरुप आहात काय ? इथे लांब बसून काळजी करण्याव्यतिरीक्त काही करु शकतो का आम्ही ? काही मदत होण्यासारखी असेल तर प्लीज इकडे लिहा कोणीतरी.

टर्मीनेटर's picture

12 Aug 2019 - 2:12 am | टर्मीनेटर

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2019 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

Rajasthan: All six accused acquitted in Pehlu Khan lynching case

देश-परदेशात प्रचंड राजकिय गदारोळ झालेल्या पेहलू खान खटल्याचा निकाल लागून कोर्टाने सर्व सहा आरोपींना आरोपातून मुक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी पहलू खानकडे गोमांस होते असा आरोप दाखल केला गेला होता. त्यामुळे, पहलू खान प्रकरणातील ज्यांनी प्रचंड गोंधळ केला होता त्या लिंचिस्तानी मंडळींची मोठी पंचाईत झाली होती. आणि आता हा निकाल !

मुख्य म्हणजे पहलू खानवरचे आरोप दाखल करणे, खटला चालवणे आणि खटल्याचा निकाल लागणे, या सर्व गोष्टी घडताना राजस्तानात कॉन्ग्रेस सरकार होते/आहे. त्यामुळे, आता लिंचिस्तान ब्रिगेडची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे मनोरंजक होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2019 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

‘Beaten’ by mob, Dalit youth from Alwar dies after 2 days

याच राज्यातल्या (राजस्तानातल्या) पहलू खानच्या प्रकरणात, घसा बसेल इतकी जगभर आरडाओरडा करणारी, तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकाराचे पुरस्कर्ती मंडळी, या दलित तरुणाच्या मृत्युच्या बाबतील तोंडात गुळणी धरून बसली आहेत. त्यानंतर...

‘Lynched’ Dalit man’s father ends life in Alwar

त्या दलित तरूणाच्या वडिलांनी, सरकार आणि इतर कोणीही आपल्या तक्रारीची दखल घेत नाही यामुळे निराश होऊन आत्महत्या केली अशी बातमी आहे.

इतके झाले तरीही, तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकाराचे पुरस्कर्ती मंडळींची दातखीळ सुटलेली नाही. लिंचीस्तान ब्रिगेडही अचानक गप्प झाली आहे... त्यांना भारतात राहण्यात भिती न वाटेशी लागली आहे ?! :(

"पिडित व्यक्तीचा धर्म" आणि "घटना घडताना सत्तेत असणारे सरकार" यांच्याकडे पाहून मगच आरडाओरडा करायचा की गप्प बसायचे ते ठरवणार्‍या, तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकाराच्या पुरस्कर्त्या मंडळींना कोणी "ढोंगी लिबरांड" म्हटले की, त्यांना आणि त्यांच्या अंधभक्तांना, राग येतो आणि ते रागाने इतरांना शिव्या देतात व इंटॉलरंट म्हणतात !!! धन्य आहे !

आज तरी अशक्य दिसत आहे, पण हे लोक जेव्हा सर्व प्रकारच्या अन्यायांना चूक समजायला लागतील, तेव्हाच त्यांना आपली (उरली असेल तरच) लाज वाचवता येणे शक्य होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2019 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
यशोधरा's picture

15 Aug 2019 - 2:12 pm | यशोधरा

FB-IMG-1565858413809

नाखु's picture

16 Aug 2019 - 8:05 am | नाखु

ते सगळं बंदुकीच्या धाकाने आहे हो, लडाखमध्ये कुणालाही आनंद झालेला नाही,काही मिपाकरांनी त्यांच्या दिव्यचक्षुंनी संपूर्ण जम्मू काश्मीर ची सफर केलीच आहे महाभारताच्या संजयासमान आणि जनतेचे भयानक हाल चालू आहेत.गेल्या पंधरा दिवसांपासून.

आधी सगळं कसं अगदी सुशेगाद होते,दगडफेकीचे रोखीत पैसे मिळायचे,नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या सुविधेत काही कसर नको म्हणून जे काही आर्थिक सहाय्य देता येईल ते अतिरेकी संघटना परस्पर देत असत आपण फक्त त्या बदल्यात अतिरेक्यांना आश्रय देणे आणि भारतीय जवानांची खबर देणे हे काम करायचे.
इतर वेळी सापडलाच एखादा जवान एकटा दुकटा तर त्याला मारुन त्याची शस्त्र द्यायची अतिरेक्यांना.

भारतातील पर्यटक येतात झक मारत इथेच,त्यांचे पैसे घेऊन पोषींद्याचाच देश कसा उध्दवस्त होईल ते बघायचे.

आपले समर्थक आहेतच जालावर आणि विचारवंताच्या रुपाने,कधी अल्लाने मौका दिलाच तर त्या विचारवंताची खिदमत करायची, नाही तर ते फुकटची प्रसिद्धी आणि परदेशी निमंत्रण यातच खुश असतात,इकडे यायला सवड थोडीच आहे.

अत्यंत भयभीत होऊन एका काश्मीरी इसमाने लिहिलेला प्रतिसाद.

आम्ही आमच्या दिव्यचक्षूंनी आपल्या साठी आणला आहे.

टपाली दूरस्थ नाखु बिनसुपारीवाला

mayu4u's picture

16 Aug 2019 - 10:37 am | mayu4u

लै भारी नाखुचाचा!

राघव's picture

16 Aug 2019 - 10:49 am | राघव

भारीये हे! :-)

अवांतरः बादवे तू आत्ता तिकडे की कुणाकडून हा फोटू आलाय?

यशोधरा's picture

16 Aug 2019 - 11:36 am | यशोधरा

लदाखी स्नेह्याकडून.

काश्मीरातही तिरंग्यापुढे संचलन, ध्वजवंदन झालं बरं. जमलं तर क्लिप टाकेन.

नंदन's picture

16 Aug 2019 - 1:20 pm | नंदन

ट्रम्पतात्या जोमात, भक्तसमर्थक कोमात!

As the protesters were being led out, a Trump supporter wearing a "Trump 2020" shirt near them began enthusiastically shaking his fist in a sign of support for the president.

But Trump mistook him for one of the protesters and said to the crowd: "That guy's got a serious weight problem. Go home. Start exercising. Get him out of here, please."

चीन ने 370 वरुन पाकिस्तान ची साथ देताना यूनो मध्ये भारताच्या मार्गात खोड़ा घालण्याचा प्रयत्न केला , राग याचा आला की भारताच्या बाजूने चीन ला कानफाडले गेले नाही .
त्यांचे परराष्ट्रसचीव भारताच्या अंतर्गत प्रश्न कश्मीर प्रश्नावर मुक्ताफळे उधळत असतील तर आपले सचिव हॉन्गकॉन्ग बद्दल का गप्प बसले आहेत ?
हल्ली पाकिस्तान पेक्षा चीन च्या भूमिके वर डोक गरम होत आहे आणि आपले परराष्ट्र विभाग मुग गिळून बसले आहे .

भंकस बाबा's picture

18 Aug 2019 - 7:35 pm | भंकस बाबा

सध्या भारताने ताक फुंकुन प्यायची भूमिका घेतलेली दिसते. हॉंगकॉंग प्रकरण चांगलेच तापलेले आहे. चीनला अनेक देशानी समज दिली आहे. या पार्श्वभूमिवर चीनकडून काही आगळीक झाली तर त्याचा सरळ फायदा भारताला व्यापारात होईल. शिवाय चीनची प्रतिमा जगात डागाळली गेल्यामुळे जॉब मार्केटवरदेखिल परिणाम होऊन भारताला अजुन एक फायदा मिळेल. ह्यावेळी तरी भारताने दखल न घेतलेली बरी! चीनची एक चूक पाकिस्तानला पण अकारण महागात पडेल, कारण चीनवर आर्थिक निर्बंध म्हणजे पाकिस्तानची गळचेपी! ट्रम्पतात्या (तुम्ही नाही हो) अकांडतांडव करून पाकिस्तानला खडे बोल ऐकवेल. मग जी पाकिस्तानची फरफट होईल ती बघायला मजा येईल.
हे आमचे मनातले मांडे हो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2019 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

१. आंतरराष्ट्रिय राजकारणात, पडद्याआडच्या यशस्वी खेळ्या करून, पाकिस्तानच्या बाबतीत भारताने चीनला अनेकदा माघार घ्यायला लावली आहे. ताजी उदाहरणे द्यायची झालीच तर, हाफिज सईदला अतिरेकी घोषित करण्यात चीनने दशक+ काळ केलेला विरोध मागे घेणे आणि नुकत्याच झालेली संयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीचा फियास्को (भारताच्या बाजूने १४-१ असा विजय), या दोन ठळक घटना सांगता येतील.

२. भारतिय परराष्ट्रमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीत, चीनने स्वतःहून भारत-चीन सीमासमस्या सोडविण्यासाठी भक्कम पावले उचलायची इच्छा सार्वजनिक्रित्या प्रकट केली आहे... ही कृती चीनच्या गेल्या काही दशकांच्या कृतीपेक्षा फार सकारात्मक आहे. तेव्हा आता चीनला हाँग काँग किंवा तिबेटवरून छळण्याने, आता केवळ जरासा चिमटा काढून त्याचा दीर्घकालीन विरोध/दुष्मनी पत्करण्याशिवाय इतर काहीही साधणार नाही. तसेही, हाँग काँग व तिबेट या दोन्ही संबंधात काही भरीव करून चीनला अडचणीत आणण्याइतकी ताकद सद्या भारताकडे नाही.

त्याविरुद्ध, "योग्य संधीची वाट पाहत परिस्थितीचे शांतपणे निरिक्षण करत राहणे (Watchful expectancy and masterly inactivity)" हे तत्व यासंबंधात सर्वात जास्त फायदेशीर आहे... हाँग काँग आणि तिबेट, दोन्हीही समस्या इतक्यात कोठेही पळून जाणार्‍यातल्या नाहीत... त्या चीनच्या कुशीत दीर्घकालीन खोल रुतलेले काटे आहेत. :)

३. गेल्या अनेक दशकांत, भारताने सतत, "नितीमत्तेच्या मोठ्या गप्पा मारण्याचे आणि वेळ आली की पायात शेपटी घालण्याचे", धोरण स्विकारले होते, ते चूक होते आणि त्याने भारताच्या आंतरराष्ट्रिय स्थानाला खूप मोठा धोका केला, यात वाद नाही. मात्र, उगाच छाती पिटत विरोधकाला/शत्रूला आव्हान देत राहण्याने किंवा त्याला चिमटे काढत राहण्याने सुद्धा काही साधले जात नाही. तसे असते तर अमेरिकेचा ट्रंप आजचा सर्वात यशस्वी मुत्सद्दी ठरला असता. :)

त्याविरुद्ध, आपल्या विरोधकाला एकटे पाडून, इतरांकरवी दबाव आणून, आपल्याला हवा तो फायदा साधणे, ही चाणक्य निती केव्हाही जास्त चांगली मुत्सद्देगिरी आहे... विशेषतः तो विरोधी देश चीन आहे, जो केवळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचा कायम सभासदच नाही तर आर्थिक-सामरिकरित्या प्रबळ असलेला शेजारी देश आहे. गेल्या काही वर्षांतील पाकिस्तानसंबधातल्या घटना पाहिल्या तर हेच दिसते आहे. भारताने चीन-पाकिस्तान जोडगोळीला आंतरराष्टिय राजकारणात केवळ वेगळेच पाडले आहे असे नाही तर, अनेकदा चीनला पाकिस्तानचा पाठींबा काढून घेण्यास भाग पाडले आहे.

या सगळ्यात, भारताच्या प्रगल्भ मुत्सद्देगिरीचेच दर्शन होत आहे. "रक्ताचा एकही थेंब न गळता, एकही गोळी न झाडता आणि एकही अपशब्द न उच्चारता जो विजय मिळवला जातो, तोच सर्वोच्च विजय असतो", कारण या गोष्टींनी विजय मिळवला तरीही, केवळ शत्रूचेच नव्हे तर आपलेसुद्धा नुकसान होतच असते.

भंकस बाबा's picture

19 Aug 2019 - 12:24 pm | भंकस बाबा

अगदी मुद्देसुद प्रतिसाद
हेच लिहायचे होते , पण आमची प्रतिभा मर्यादित आहे हो!

ट्रम्प's picture

19 Aug 2019 - 4:05 pm | ट्रम्प

आमची डोकी त्या ममता सारखी तापट व्हायला लागल्यात , हाता सरशी त्या चीन ला दोन कानामागे टाकल्या जाव्यात ही ईच्छा त्यामुळे झाली .
बाकी म्हात्रे सर !!
एकदम मुद्देसूद प्रतीसाद .

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2019 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

आंतरराष्ट्रिय राजकारणात आपण गप्प बसून, आपले काम दुसर्‍यांकडून करून घेणे, केव्हाही जास्त परिणामकारक ठरते (Silence speak louder than words).

त्यातून, "आम्हाला स्वतः बोलायची गरज नाही, इतर अनेक जण ते काम आमच्यासाठी करायला तयार आहेत इतकी आमची पत वाढली आहे", असा संदेश जातो.

शिवाय, आता भारत-चीन सीमारेषा आखण्याबद्दल चीनने कधी नव्हे तो उघड पुढाकार दाखवला आहे... त्या बोलण्यांत कडवटपणा नसलेला जास्त फायद्याचे ठरेल.

तसे पाहिले तर चीन एक पोचलेलं (आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सभासद असलेलं) बेनं आहे. त्या मारक्या बैलाला आव्हान देण्याने तो मुद्दाम नाठाळपणे अंगावर येऊन टक्कर देण्याचीच खात्री आहे. तेव्हा, त्याला चुचकारून शक्य तेवढे आपले काम काढून घेणे, केव्हाही चांगले.

तसेही, गेल्या काही महिन्यांत चीनला अनेकदा पाकिस्तानविरोधी पवित्रा घ्यावा लागला आहे... (मनाविरुद्ध असूनही चीनला असे का वागावे लागले हे, आपण व चीन दोघांनाही, पक्के माहीत आहे, तरीही) त्यासंबंधी चीनला न खिजवता, आपला कार्यभाग साधून घेणे, केव्हाही जास्त मुत्सद्देगिरीचे असेल. कारण, आपला झालेला मानभंग चीन कधीच विसरत नाही, असा इतिहास आहे... आणि तो हट्टून बसलाच तर, त्याच्याशी तडक टक्कर देण्याइतका सबळ, भारत अजून तरी नाही.

असे असले तरी, हल्ली भारत चीनला एका ठराविक सीमेपलिकडे जाऊ देत नाही. याचे एक ताजे व उत्तम उदाहरण असे...

१. आताच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या काश्मीरसंबंधी झालेली बैठक फुसकी ठरेल याची भारताने पुरेपूर आणि यशस्वी खबरदारी घेतली. प्रथम, "भारताविरुद्ध उघड आणि मतदानासह बैठक घ्यावी असा पाकिस्तानचा अर्ज" फेटाळून लावण्यात आला. नंतर, केवळ चीन या कायम सदस्याने आग्रह धरल्याने बैठक घेतली गेली. ती बैठक...
(अ) बंद दाराआड केलेली,
(आ) (लिखित, ध्वनिमुद्रित, चलतचित्रिकरण, इ) कोणत्याही प्रकारची नोंद (मिनिट्स ऑफ मिटिंग) न ठेवता झालेली,
(इ) तक्रार करणार्‍या पाकिस्तानच्या अनुपस्थितीत (पक्षी पाकिस्तानला बाजू मांडायची संधी नाकारूनन) केलेली, आणि
(इ) बैठकीनंतर कोणतेही लिखित/तोंडी विधान न करणारी,
अशी पूर्णपणे फुसकी (पक्षी : उगी उगी घेतली ना बैठक, आता चूप हो पाहू अशी) बैठक व्हावी अशी तरतूद (भारत सद्याच्या सुरक्षा परिषदेच्या १५ राष्ट्रांमध्ये नसतानाही) भारत करवून घेऊ शकला... हा एक मुत्सद्दी विजयच (कू) समजला जात आहे.

२. यानंतर, आपले अपयश लपविण्यासाठी, पाकिस्तान व चीनने पत्रकार परिषद घेऊन, स्वतःला सोयिस्कर अश्या टिप्पण्या केल्याच... मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यानंतर, कधी नव्हे ते, भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघामधील कायम राजदूत असलेल्या स्येद अकबरुद्दीन यांनी पत्रकात परिषद घेऊन, "चीन आपले म्हणणे सर्व सदस्यांच्या नावांवर खपवत आहे" असे स्पष्ट करून, चीन-पाकिस्तान या जोडीला इतर कोणाचाही पाठींबा नाही हे उघड केले. या मुत्सद्दी वाक्यरचनेचा साध्या सोप्या भाषेतला अर्थ, "चीन-पाकिस्तानची जोडगोळी खोटे बोलत आहे", असा होतो. असे ताबडतोप पत्रकार परिषद घेऊन चिनचा प्रतिवाद करणे किंवा त्याचे पितळ उघड करणे, भारताने याअगोदर कधीच केले नव्हते. यातून, चीनला जो काही संदेश देणे अपेक्षित होते, तो पोचला. :)

बाप्पू's picture

18 Aug 2019 - 10:34 pm | बाप्पू

बरोबर.. सध्याचेअंतर राष्ट्रीय राजकारण हे खरंच किचकट असले तरी भारत प्रत्येक वेळी अगदी खंबीर आणि देशहिताची भूमिका घेत आहे. पूर्वीच्या सरकार सारखी घाबरलेली, आत्मविश्वास नसलेली आणि फक्त अल्पसंख्यांक ( खरंच? ) लोकांचे हित जपणारी नाहीये.

डोकलाम विवाद, आणि काश्मीर चा मुद्दा हे दोन्ही प्रश्न सरकारने अत्यंत योग्य रीतीने हाताळले.

mayu4u's picture

19 Aug 2019 - 9:48 am | mayu4u

कुणीतरी वेगळ्या प्रकारे हाताळणार होते; पण कसे ते त्यान्ना माहित नव्हते ते आठवले! :ड

माहितगार's picture

19 Aug 2019 - 1:07 pm | माहितगार

पाकीस्तानी मदरसा शिक्षण सुधारणा साधण्यातील समस्या संबंधाने पाकीस्तानी इंग्रजी वृत्तपत्र डॉनचा एक ऑनलाईन लेख वाचनात आला.

जिज्ञासुंच्या माहितीस्तव

आज महाराष्ट्र राजकारणात बरीच खळबळ .

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2019 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

Former MPs get 7-day deadline to vacate government houses

भारतिय नेते लोकांच्या दिव्य पारंपारिक प्रथेप्रमाणे जनतेची उर्फ सरकारी मालमत्ता आपल्या तिर्थरुपांची मालमत्ता असल्यासारखी ओरबाडायची असते, कबज्यात घ्यायची असते, तिच्याभोवती नागासारखे वेटोळे घालून बसायचे असते आणि जमेल तेव्हा गिळंकृत करायची असते. याच न्यायाने, आपला संसदेतील काळ संपला तरीही, दिल्लीतील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या Lutyens' नावाच्या वसाहतितील बंगले न सोडण्याची खासदारांची परंपरा आहे. या स्थितीबद्दल, सरकार अनेकदा नक्राश्रू ढाळते, इतकेच काय, सर्वोच्च न्यायालयानेही त्याबद्दल कडक ताशेरे मारलेले आहेत... पण, कथा मागील पानावरून पुढे सुरू !

काही, सांसद तर इतके पोचलेले असतात की, आपल्या मृत पूर्वज सांसदाचे घरसुद्धा ते अनेक वर्षे रिकामे करून देत नाहीत... आणि सरकारने तकादा लावला की त्यांना आपल्या पूर्वजाने "भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केलेले अथक परिश्रम आठवतात" आणि ते अजरामर करण्यासाठी ते त्या बंगल्यात त्याच्या नावे संग्रहालय स्थापन करण्याची योजना पुढे करतात... म्हणजे, त्या सरकारी बंगल्यावर कायम हक्काचे शिक्कामोर्तब झाले ! (कोण म्हणतोय रे की भारतिय राजकारणी हुशार नाहीत असे?).

उदाहरणार्थ : भूतपूर्व मंत्री श्री जगजीवनराम यांचा १९८६ साली मृत्यु झाला तरी त्यांच्या सांसद असलेल्या मीरा कुमार या कन्येने त्यांचा बंगला सरकारला परत केला नव्हता. सन २०१३ मध्ये या प्रकरणाचा गाजावाजा झाला तेव्हा सरकारने तो बंगला, "जगजीवन राम फाऊंडेशन"ला श्री राम यांच्या नावे संग्रहालय करण्यासाठी, तब्बल २५ वर्षांसाठी बहाल करून, सगळा व्यवहार सुरळीत करून दिला ! संसदेत कार्यरत असलेल्या विधायकांच्या निवासासाठी बांधलेले बंगले जर जुन्या विधायकांनी असे कायमस्वरूपी बळकावले तर मग एक-दोन दशकांत दिल्लीतील मुख्य वसाहती केवळ जुन्या-नव्या विधायकांची घरे बांधण्यासाठी राखून ठेवायला लागतील. :(

सद्याही, सुमारे २०० भूतपूर्व सांसदांनी आपला कार्यकाल संपल्यानंतर बंगले परत केलेले नाहीत. पण, अहो आश्चर्यम् ! या वेळेस, Lok Sabha Housing Committee ने त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवले आहे... त्यांनी बंगले रिकामे केले नाही तर चक्क पाणी आणि वीज तोडण्याचे आदेश दिले आहेत.

बघुया, या वेळेस तरी, सरकार सर्व अवैध कब्जे काढून टाकण्यात यशस्वी होईल का ते !